text
stringlengths
1
2.66k
ज्ञानाला धारदार बनवून ते वापरणे हेच कौशल्य आहे
म्हणूनच आज ज्या वेगाने माहिती वाढत आहे त्याच वेगाने कौशल्य देखील वाढणे गरजेचे आहे आणि म्हणूनच मी म्हणतो स्किल एंगेजमेंट ऑप्टिमायजेशन (एसईओ) इंटरनेटचे जग सर्च इंजिनवर फिरते आणि म्हणूनच त्यात सर्च इंजिन ऑप्टिमायजेशनची मोठी भूमिका असते
म्हणूनच त्यात स्किल एंगेजमेंट ऑप्टिमायजेशनची मोठी भूमिका असते आणि जगाला असे लोक हवे असतात ज्यांना ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करणे माहित आहे जे आपल्या कौशल्याद्वारे स्वतःला लोकांशी क्लायंटशी जोडू शकतात
जेव्हा तुम्ही लोक स्किल एंगेजमेंट ऑप्टिमायजेशन वर लक्ष देणे सुरु कराल देशाचा डेमोग्राफिक डिविडेंड देखील डेव्हलपमेंट डिव्हिडंड मध्ये बदलेल
नवीन भारतासाठी मार्ग अधिक मजबूत करेल
मित्रांनो तुम्हाला जे काम देण्यात आले आहे पुढील काही तासात तुम्ही त्यावर काही ना काही तोडगा शोधणार आहात मात्र आपल्याला फक्त इथेच थांबायचे नाही या कार्यक्रमात केंद्र सरकारची २९ मंत्रालये सहभागी होत आहेत
आणि त्या सर्वांवर जबाबदारी आहे कि या हॅकॆथॉन मधून जे उपाय सुचतील त्यांना शेवटच्या टप्प्यापर्यंत तार्किक शेवटापर्यंत पोहोचवणे
काही बदल करण्याची गरज असेल तर त्यात बदल करून ते व्यवस्थेत लागू करावेत
तुमच्या प्रयत्नांमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल काही नवीन संशोधन कराल यासाठी सर्वांना माझ्या खूपखूप शुभेच्छा
अर्थ मंत्रालय दक्षिण आशियाई उपप्रादेशिक आर्थिक सहकार्य परिषदेत वित्तमंत्र्यांच्या बैठकीनंतर संयुक्त निवेदन 21व्या शतकात आशियाला सक्षम बनवणे नवी दिल्ली 3 एप्रिल 2017 नवी दिल्लीत झालेल्या दक्षिण आशियाई उपप्रादेशिक आर्थिक सहकार्य परिषदेत आज सर्व सदस्य देशांच्या वित्तमंत्र्यांची बैठक झाली या बैठकीत एसएएसईसीचा गेल्या 16 वर्षातला प्रवास विविध क्षेत्रात परिषदेने मिळवलेले यश आणि भविष्यातल्या कार्यांबद्दल चर्चा झाली
सदस्य राष्ट्रांमध्ये दळणवळण व्यापार सुविधा ऊर्जा पार्याभूत सुविधा अशा क्षेत्रात या परिषदेच्या माध्यमातून देवाणघेवाण होत असते त्यामुळे प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर एक संघटना म्हणून तिचे महत्व अधोरेखित झाले आहे
या परिषदेचे काम निश्चित करुन त्या देशाने धोरणात्मक प्रयत्न करण्यासाठी गेल्या वर्षी एसएएसईसी कार्य आराखडा 20162025 स्वीकारण्यात आला
त्या कार्य आराखड्यानुसार सदस्य राष्ट्रांमध्ये व्यापारी संबंध वाढवणे आणि नैसर्गिक स्रोत उद्योग पायाभूत सुविधा यांच्या देवघेवीतून परिषदेतल्या एकूण सदस्य राष्ट्रातले सकल उत्पादन 70 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचवणे आणि 2025 पर्यंत 20 दशलक्ष लोकांसाठी रोजगारनिर्मिती करणे हे उद्दिष्ट आहे
एसएएसईसीने आपल्या धोरणांनुसार पथदर्शी उपक्रम हाती घेतले असून विविध क्षेत्रातल्या संधींचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी आराखडा तयार केला आहे
भारत आणि नेपाळ यांच्यात इलेक्ट्रॉनिक मालवाहतूक व्यवस्था तयार करण्याचेही प्रयत्न सुरु आहेत नैसर्गिक वायू आणि इंधन यांच्यातील देवाणघेवाणीचाही प्रकल्प विचाराधीन असल्याचे सदस्य राष्ट्रांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहेत
आशियाई विकास बँकेनं एसएएसईसीला दिलेल्या पाठबळासाठी सर्व सदस्य राष्ट्रांनी आभार व्यक्त केले
माहिती आणि प्रसारण मंत्रालय चित्रपट व्हिजा आणि सुविधा केंद्रामुळे परदेशी चित्रपट निर्मात्यांसाठी भारत आकर्षक स्थळ कर्नल राठोड नवी दिल्ली 3 एप्रिल 2017 परदेशी चित्रपट निर्मात्यांना भारतात सहज प्रवेश मिळावा यासाठी केंद्र सरकारने चित्रपट व्हिजा ही नवी सुविधा सुरु केली असून त्यामुळे आणि चित्रपट सुविधा कार्यालयामुळे परदेशी निर्मात्यांसाठी भारत चित्रकरणाचे एक आकर्षण केंद्र बनले आहे असे प्रतिपादन केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी केले
राठोड यांनी आज रशियन दूरसंचार आणि जनसंवाद संघटनेचे उपमंत्री एजेक्से वॉलिन यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली
त्यावेळी ते बोलत होते अॅनिमेशन व्हिज्यूवल इफेक्ट्स गेमींग आणि कॉमिक्स यासाठीचे राष्ट्रीय केंद्र मुंबईत सुरु केले जाणार आहे अशी माहिती राठोड यांनी या शिष्टमंडळाला दिली
या सर्व क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही राष्ट्र प्रयत्न करतील असा निर्णय बैठकीत घेण्यात आला
दोन्ही देशातल्या संस्कृतींचे आदानप्रदान व्हावे यासाठी सिनेमा हे उत्कृष्ट माध्यम असून भारतीय आणि रशियन चित्रपट परस्परांच्या देशात दाखवले जावे यासाठी विशेष चित्रपट महोत्सव भरवले जावे अशी सूचना राठोड यांनी केले
राष्ट्रपती कार्यालय रामनवमीनिमित्त राष्ट्रपतींच्या शुभेच्छा नवी दिल्ली 3 एप्रिल 2017 राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रामनवमीच्या पूर्वसंध्येला जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत रामनवमीच्या पावन पर्वानिमित्त मी सर्व देशवासियांना आणि परदेशात असलेल्या भारतीयांना शुभेच्छा देता असे राष्ट्रपतींनी आपल्या शुभसंदेशात म्हटले आहे श्रीराम हे उच्च मूल्य आणि वर्तनाचे प्रतिक होते
त्यांच्या जीवनकार्यातून आपल्याला सत्याच्या मार्गाने जाण्याची प्रेरणा मिळो
रामनवमीच्या उत्सवानिमित्त देशातले लोक एकत्र येऊन मनं जोडली जातील अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी या संदेशात व्यक्त केली आहे
पंतप्रधान कार्यालय उज्ज्वला योजना लाभार्थ्यांची संख्या 2 कोटींच्या वर पोहचविल्याबद्दल पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त नवी दिल्ली 3 एप्रिल 2017 प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या एका वर्षातच 2 कोटीच्या वर पोहविचल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या एका वर्षातच 2 कोटीच्या वर पोहोचली ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे
गरीब महिलांच्या आयुष्यात गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्यासाठीची कटिबध्दता या योजनेतून दिसून येते
उज्ज्वला योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचे मी अभिनंदन करतो आणि या योजनेच्या यशस्वितेसाठी जे अविरत काम करत आहेत अशा सर्वांचेही मी आभार मानतो असे पंतप्रधानांनी म्हटले आहे
दोन्ही देशांमधले संबंध आणि विविध क्षेत्रात परस्पर सहकार्याने होत असलेल्या प्रगतीचा आढावा यावेळी दोन्ही नेत्यांनी घेतला
ओमानचे सुलतान कबूस बिन सईद अल सईद यांच्या शुभेच्छा अब्दुल्ला यांनी पंतप्रधानांना दिल्या
पंतप्रधानांनी या शुभेच्छांचा स्वीकार करत सुलतान सईद यांना आपल्या शुभेच्छा कळवल्या
अर्थ मंत्रालय वर्ष 201617 मध्ये 18 टक्क्यांच्या सुधारीत कर संकलन उद्दिष्टात महसूल विभागाकडून वाढ नवी दिल्ली 4 एप्रिल 2017 आर्थिक वर्ष 201617 मध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर संकलनाचा अपेक्षित अंदाज महसूल विभागाने बदलला असून 18 टक्के या सुधारीत अंदाजात वाढ केली आहे
या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन अंदाज 1697 लाख कोटी तर अप्रत्यक्ष कर संकलनाचा अंदाज 847 लाख कोटी इतका आहे
या वर्षात एकूण 1710 कोटी रुपये कर संकलन होईल अशी प्राथमिक आकडेवारी महसूल विभागाने जारी केली आहे
प्रत्यक्ष कर मार्च 2017 पर्यंत 847 लाख कोटी कर संकलन झाले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 142 टक्क्यांची वाढ झाली आहे ही अतिशय समाधानकारक आकडेवारी असल्याचे विभागाने म्हटले आहे
अप्रत्यक्ष कर या आर्थिक वर्षात मार्च 2017 पर्यंत 863 लाख कोटी रुपये अप्रत्यक्ष कर जमा झाला आहे
यात केंद्रीय उत्पादन शुल्क सेवा कर आणि सीमा शुल्काचा समावेश आहे
उत्पादन शुल्क 383 लाख कोटी सेवा शुल्क 254 लाख कोटी तर सीमा शुल्क 226 लाख कोटी रुपये इतके जमा झाले आहे
पंतप्रधान कार्यालय मलेशियाच्या पंतप्रधानानसोबतच्या संयुक्त वार्ताहर परिषदेतील पंतप्रधानांचे भाषण नवी दिल्ली 1 एप्रिल 2017 महामहीम पंतप्रधान दातो श्री मोहम्मद नजीब बिन तून अब्दुल रझाक प्रसारमाध्यमातील सदस्य मलेशियाच्या पंतप्रधानांचे भारतात स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे महामहीम नजीब जी नोव्हेंबर २०१५ मध्ये माझ्या मलेशिया दौऱ्या दरम्यान जो स्नेह आणि सदिच्छा मी अनुभवली तुमच्या या भारत भेटीमुळे मला आणि भारताच्या जनतेला तुमचे त्याच प्रकारे आदरातिथ्य करण्याची संधी लाभली आहे
आपण आपल्या राजकीय संबंध स्थापनेची ६० वर्ष साजरी करत आहोत आणि तुमचे वैयक्तिक लक्ष आणि नेतृत्वामुळे या संबंधांना अधिक स्थिर दिशा बळकटी आणि लवचिकता प्राप्त झाली आहे
मित्रांनो मलेशिया सोबत आपली सांस्कृतिक आणि ऐतिहासिक नाळ जोडली गेली आहे
आपले संबंध समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहेत आपले समाज विविध पातळ्यांवर एकमेकांशी जोडले गेले आहेत सांस्कृतिक आणि धार्मिक बंधांमुळे आपली जनता एकमेकांशी घट्ट जोडली गेली आहेत
मलेशियामध्ये मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करणाऱ्या भारतीय समाजाच्या योगदानाला विशेष महत्व आहे
माझ्या मागील दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नजीब आणि मी कोलाल्मवूर मधील तोरणा गेटचे संयुक्तपणे उद्‌घाटन केले होते
तोरणा गेटवरील सांची स्तूपाचे चिन्ह हे आपल्या अतूट मैत्रीचे प्रतिक आहे
मित्रांनो आजच्या आमच्या व्यापक चर्चेमध्ये पंतप्रधान नजीब आणि मी मिळून आपल्या सांस्कृतिक आर्थिक आणि धोरणात्मक प्रतिबद्धतेंचा आढावा घेतला नोव्हेंबर २०१५ मधील माझ्या मलेशिया दौऱ्या दरम्यान घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांच्या अंमलबजावणी मधील प्रगतीचा आम्ही आढावा घेतला आणि आपली धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्यासाठी वैचारिक दृष्टिकोनाचे आदानप्रदान करण्यावर सहमती दर्शवली
दृष्टीकोन जो क्रियाभिमुखतेला प्राधान्य देईल या प्रयत्नांमध्ये सहकार्याच्या विद्यमान क्षेत्रांना अधिक मजबूत करणे आणि प्रतीबद्धतेचे नवीन क्षेत्र शोधणे ही आपली महत्वपूर्ण उदिष्टे आहेत
जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून हि भागीदारी अधिक वृद्धिंगत करण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये भारत अनेक संधी उपलब्ध करून देत आहे आणि आपल्या समाजामध्ये समृद्धीचे नवीन मार्ग उभारण्यासाठी आम्ही उभय अर्थव्यवस्थांमधील व्यापार आणि भांडवली प्रवाह वाढविण्यासाठी आम्ही तयार आहोत पायाभूत सुविधा हे आपल्या भागीदारीतील फलदायी क्षेत्र आहे परंतु आपण यामध्ये अजून प्रगती करू शकतो
भारतीय पायाभूत सुविधांची गरज आणि स्मार्ट शहर विकसित करण्याचे आपले महत्वाकांक्षी स्वप्न आणि मलेशियाची क्षमता हे एकमेकांना पूरक आहेत
भारतातील विविध राज्यांमधील पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये मलेशियन कंपन्यांचा सहभाग आहे
भारतीय कंपन्या देखील मलेशियामध्ये कार्यरत असून त्यांनी मलेशियन अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक केली आहे आम्हाला आनंद आहे की पंतप्रधान नजीब यांच्यासोबत उच्च स्तरीय व्यापारी प्रतिनिधी मंडळ आहे
इतरांना मागे टाकत उभय देशांनी जी व्यावसायिक भागीदारी उभारली आहे ती अधिक मजबूत होईल आणि आपल्या व्यावसायिक प्रतिबद्धतेला गती प्राप्त होईल याबद्दल मला विश्वास आहे
आपल्या शेतकऱ्यांच्या कल्याणाशी निगडीत असलेले अन्न सुरक्षेचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने देखील आम्ही प्रयत्न करत आहोत
मलेशियामधील खत कारखान्याचा प्रस्तावित विकास सामंजस्य करार आणि मलेशिया मधील अतिरिक्त युरिया भारतात आणणे हे स्वागतार्ह विकासकार्य आहे
मित्रांनो मलेशियाच्या युटीएआर विद्यापीठाने मलेशियामध्ये प्रथमच आयुर्वेद पदवी अभ्यासक्रम सुरु केला आहे हा स्वागतार्ह उपक्रम आहे
आणि त्याच विद्यापीठात आयुर्वेद प्राध्यापक पद स्थापन करण्याचे कार्य सुरु आहे आपल्या शैक्षणिक देवाणघेवाणीमुळे उभय देशातील लोकांचे बंध अधिक दृढ झाले आहेत
पदवीच्या परस्पर मान्यतेवरील सामंजस्य करारावर आज स्वाक्षऱ्या झाल्या यामुळे उभय देशातील विध्यार्थ्यांना याचा लाभ होईल
मित्रांनो आपण अशा काळात आणि प्रदेशात रहात आहोत जिथे पारंपारिक आणि अपारंपरिक सुरक्षेचे धोके निरंतर उद्‌भवत राहतात या आव्हानांमुळे आपल्या देशाचे तसेच प्रदेशाचे स्थैर्य आणि आर्थिक समृद्धीला धोका निर्माण होतो यावर पंतप्रधान नजीब आणि मी सहमती दर्शवली आहे आणि याकरिता आपल्या प्रदेशातील देशांनी एकत्रितपणे या आव्हानांचा सामना करण्याची आवशक्यता आहे
या अनुषंगाने आपल्या संयुक्त दहशतवाद विरोधी प्रयत्नांमध्ये मलेशियन सरकार सोबतच्या निरंतर सहकार्याची मी प्रशंसा करतो
महामहीम मुलवाद आणि दहशतवादा विरूद्धचे तुमचे स्वतःचे नेतृत्व हे संपूर्ण प्रदेशासाठी प्रेरणादायी आहे
आपल्या विस्तृत संरक्षण भागीदारीमुळे उभय देशाच्या सैन्याला जवळ आणले आहे
आपण सहकार्य करत आहोत प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी अवजारांची देखभाल आणि लष्करी हार्डवेअर सागरी सुरक्षा आणि आपत्ती प्रतिसाद
आर्थिक समृद्धीला चालना देणे जलपर्यटनाचे स्वातंत्र्य आणि आशिया प्रशांत प्रदेशात आणि विशेषतः त्याच्या समुद्रात स्थैर्य निर्माण करण्यामधील आमच्या भूमिकेबद्दल आणि जबाबदारीबद्दल पंतप्रधान नजीब आणि मी सजग आहोत आपल्या समाजाला सुरक्षा प्रदान करण्यासाठी आणि अधिक चांगल्या प्रदेशासाठी आमच्या सामायिक चिंता आणि आव्हानांना परिणामकारकरीत्या हाताळण्यासाठी आपल्या धोरणात्मक भागीदारीला अधिक बळकट करण्यावर आम्ही सहमती दर्शवली आहे
महामहीम पंतप्रधान नजीब मी तुमचे पुन्हा एकदा भारतात स्वागत करतो आपल्यामधील फलदायी चर्चेबद्दल मी आभारी आहे
मला विश्वास आहे की आज आपल्यामध्ये झालेल्या चर्चेमुळे आपली धोरणात्मक भागीदारी पुढील स्तरावर जाईल
भारतामध्ये तुमच्या आनंददायक आणि फलदायी मुक्कामाची मी कामना करतो
निती आयोग डिजिटल व्यवहारविषयक मुख्यमंत्र्यांच्या समितीकडून पंतप्रधानांना अंतरिम अहवाल सादर नवी दिल्ली 24 जानेवारी 2017 डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या समितीने आपला अंतरिम अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केला या समितीचे समन्वयक आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी हा अहवाल सादर केला
यावेळी मध्य प्रदेश महाराष्ट्र सिक्कीम या राज्याचे मुख्यमंत्री नीति आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगड़िया आणि नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत उपस्थित होते
यावेळी अंतरिम अहवालात करण्यात आलेल्या शिफारसी नायडू यांनी बैठकीत सांगितल्या
पंतप्रधान कार्यालय बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची श्रध्दांजली नवी दिल्ली 5 एप्रिल 2017 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय मंत्री बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे
बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांचे स्मरण करुन आदरांजली वाहतो
देशासाठी आणि विशेषत वंचित लोकांसाठी त्यांनी केलेले कार्य कायमच प्रेरणादायी असेल असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे
निती आयोग डिजिटल व्यवहार जन चळवळ बनविण्यासाठी डिजिधन मेला नवी दिल्ली 30 मार्च 2017 डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच रोखरहित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्यासाठी निती आयोगाने काही योजना जाहीर केल्या होत्या
लकी ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापार योजना या दोन योजनांची घोषणा 25 डिसेंबर 2016 ला करण्यात आली होती या योजनेत सहभागी झालेल्या 14 लाख लोकांना तसेच 77000 व्यापाऱ्यांना मोठी बक्षिसे मिळाली आहेत
आतापर्यंत 2264540000 रुपयांची बक्षिसे भाग्यवान विजेत्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे
महाराष्ट्रातल्या सुनिल चव्हाण या युवा शेतकऱ्यालाही या योजनेंतर्गंत बक्षिस मिळाले आहे
स्वतचे दुकान चालवणाऱ्या नाहीदलाही या योजनेंतर्गंत बक्षिसे मिळाले आहे
तिने दुकानात डिजिटल व्यवहारांसाठीची उपकरणे लावून घेतली असून 80 टक्के व्यवहार त्याच्या मदतीने दिले जातात
डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी 100 दिवसात देशातल्या 100 शहरांमध्ये डिजि धन मेळावे भरविण्यात येत आहेत
याअंतर्गंत 5000 वित्तीय संस्था 15 लाख लोकांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाल्या असून आतापर्यंत 16000 शासकीय आणि खाजगी संस्था रोखरहित व्यवहारांकडे वळल्याचे दिसून येत आहेत
येत्या 14 एप्रिलला या मेळाव्याची सांगता होणार असून त्यादिवशी मेगा लॉटरी काढली जाईल
पंतप्रधान कार्यालय जम्मू आणि काश्मीरमध्ये चेनानीनाशरी बोगद्याच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण नवी दिल्ली 2 एप्रिल 2017 भारताच्या या सर्वात मोठ्या बोगद्याचे उद्‌घाटन झाले आहे याचे सोपस्कार तर मी केले आहेत पण माझी अशी इच्छा आहे आज या ठिकाणी जितके नागरिक उपस्थित आहेत त्या सर्वांनी या बोगद्याचे उद्‌घाटन करावे आणि उद्‌घाटन करण्याची पध्दत मी सांगतो
तुम्ही सर्वांनी आपापले मोबाइल फोन बाहेर काढा आणि त्याचे फ्लॅश चालू करा आणि भारत माता की जय या घोषणेसह पाहा सर्व कॅमेरामन तुमचे फोटो काढत आहेत
ज्यांच्याकडे मोबाईल आहेत त्यांनी आपले मोबाईल बाहेर काढा प्रत्येकाने आपल्या मोबाईलचे फ्लॅश मारा
किती अद्‌भूत दृश्य आहे
माझ्या समोर हे अद्‌भूत दृश्य मी पाहात आहे आणि खया अर्थाने या बोगद्याचे उद्‌घाटन तुम्ही आपापल्या कॅमेयाने करून दाखवले आहे
संपूर्ण भारत हे सर्व पाहात आहे
भारत माता की जय भारत माता की जय बंधुभगिनींनो नवरात्रीचे पवित्र पर्व सुरू आहे आणि मला मातेच्या चरणी येण्याची संधी प्राप्त झाली आहे
आताच नितीन गडकरी मला सांगत होते की जगातील जे मापदंड आहेत त्या मापदंडांनुसार या बोगद्याची निर्मिती झाली आहे
काही बाबतीत तर आपण जागतिक मापदंडांच्याही एक पाऊल कुठे कुठे पुढे आहोत
मी नितीन गडकरी यांना त्यांच्या संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा देतो त्यांचे मनापासून अभिनंदन करतो
त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्धारित कालावधीत हे काम पूर्ण करण्यात यश मिळवले आहे
मात्र बंधुभगिनींनो हा केवळ एक लांब बोगदा नाही आहे तर हा जम्मू आणि श्रीनगर यांच्यातील अंतर कमी करणारा लांब बोगदा नाही आहे
हा लांब बोगदा जम्मू काश्मीरच्या विकासाची एक लांब उडी आहे असे मला स्पष्ट दिसत आहे
पण जगातील जितके पर्यावरणवादी आहेत हवामान बदल जागतिक तापमानवाढ यांची जे चिंता करत असतात त्यावर चर्चा करत असतात त्यांच्यासाठी देखील या बोगद्याची निर्मिती एक फार मोठी बातमी आहे एक फार मोठी आशा आहे
भारताच्या कोणत्या ना कोणत्या कोपयात असा बोगदा तयार झाला असता तर पर्यावरणवाद्यांचे लक्ष त्या ठिकाणी जाण्याची शक्यता कमी होती
पण आम्ही हिमालयाच्या कुशीत हा बोगदा तयार करून हिमालयाच्या रक्षणाचे कार्य देखील केले आहे
आम्ही पर्यावरणाच्या रक्षणाचे काम केले आहे
जागतिक तापमानवाढीने हैराण झालेल्या जगाला भारताने संदेश दिला आहे की हिमालयाच्या उरावर हा बोगदा तयार करून हिमालयाचे नैसर्गिक संरक्षण करण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न भारत सरकारने यशस्वी केला आहे
बंधुभगिनींनो हा बोगदा हजारो कोटी रुपयांच्या खर्चाने तयार करण्यात आला आहे