title
stringlengths 1
93
| url
stringlengths 31
123
| text
stringlengths 0
257k
|
---|---|---|
औदुंबर (कविता) | https://mr.wikipedia.org/wiki/औदुंबर_(कविता) | ॥ औदुंबर रसग्रहण ॥
एखाद्या कुशल चित्रकाराने कुंचल्याच्या अवघ्या चार-सहा फटकाऱ्यांसरशी एखादे सुरेख चित्र निर्माण करावे तद्वत अवघ्या आठ ओळीत बालकवींनी एक सुंदर निसर्गचित्र शब्दांच्या कुंचल्याने या कवितेत रेखाटलेले आहे. हे चित्र रंगविताना कवीने विविध रंग वापरलेले आढळतील. निळासावळा झरा, शेतमळ्यांची हिरवी गरदी, पांढरी पायवाट व काळा डोह-मोजक्या रंगांनी शब्दांच्या चौकटीत बसविलेले हे एक साधे व जिवंत चित्र आहे. बालकवींची रंगदृष्टी येथे आपल्या प्रत्ययास येते.
पहिल्या चार ओळींत टेकड्या, गाव, शेतमळे व झरा यांनी व्यापलेले विहंगम दृश्य दिसते.
शेतमळ्यांच्या हिरव्या गरदीतून वाहणाऱ्या निळ्यासावळ्या झऱ्यावरून जी नजर मागे जाते ती चार घरांचे चिमुकले गाव ओलांडून पैल टेकडीपर्यंत पोचते. केवढा विस्तीर्ण पट कवीने पार्श्वभूमीसाठी घेतलेला आहे! पुढील दोन ओळीत त्या काळ्या डोहाच्या लाटांवर गोड काळिमा पसरून जळात पाय टाकून बसलेला औदुंबर दाखविला आहे.
केवळ निसर्गाचे एक सुरम्य चित्र रंगविण्याचा कवीचा हेतू दिसत नाही. पहिल्या चार ओळींतील आनंदी व खेळकर वृत्तीच्या पार्श्वभूमीवर नैराश्याची छटा पसरविणारे, काळ्या डोहाकडे सरळ चाललेल्या पांढऱ्या पायवाटेचे चित्र पाहून वाचकांची वृत्तीही पार बदलते. जगातील सुखदुःखांकडे विरक्त वृत्तीने पाहणाऱ्या स्थितप्रज्ञासारखा हा औदुंबर वाटतो. विरक्त वृत्तीच्या दत्त या देवतेशी औदुंबराचा निकट संबंध असल्यामुळे या वृक्षाची येथे केलेली निवड औचित्यपूर्ण वाटते.
'ऐल तटावर पैल तटावर, आडवीतिडवी, झाकळुनी जळ गोड काळिमा, जळात बसला असला औदुंबर' या गोड शब्दांत सुंदर अनुप्रास साधला आहे. चिमुकले गाव, निळासावळा झरा, दाट हिरवी गरदी, गोड काळिमा, आडवीतिडवी पायवाट, अशी अर्थवाही व समर्पक विशेषणे वापरून मूळचे चित्र अधिक स्पष्ट केले आहे. औदुंबराला मनुष्य कल्पून येथे 'चेतनगुणोक्ती' हा अलंकार साधला आहे. शब्दमाधुर्य व पदलालित्य यांनी ओथंबलेली ही एक प्रासादिक कविता आहे.
औदुंबर
ऐलतटावर पैलतटावर हिरवाळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून.
चार घरांचे गाव चिमुकले पैलटेकडीकडे
शेतमळ्य़ांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.
पायवाट पांढरी तयातुनि अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणामधुनी चालली काळ्या डोहाकडे.
झाकाळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर.
कवी: बालकवी. (त्र्यंबक बापुजी ठोंबरे)
संदर्भ व नोंदी
वर्ग:बालकवी यांचे साहित्य |
मुखपृष्ठ | https://mr.wikipedia.org/wiki/मुखपृष्ठ | <div title="" class="welcomeHolder" style="display:none;box-sizing:border-box; margin-top:10px;">
105px|alt=|link=
मराठी विकिपीडियावर तुमचे स्वागत आहे. मराठी भाषेत लेख असून कोणीही बदल घडवू शकेल असा हा मुक्त ज्ञानकोश आहे.
{|class="mp-left" style="background:#faf5ff;"
! style="background:#FFDEAD; border:1px solid #EECFA1; border-right:0px; padding:0px; vertical-align:middle; font-weight:normal; width:100%;" |
25px|left|alt=|link=विशेष लेख
! style="background:#FFDEAD; border:1px solid #EECFA1; border-left:0px; padding:0px; vertical-align:middle;" | 90px|alt=|link=
|-
| colspan=2 style="color:#000; background:#FFFFE0; padding:15px 5px" | |}
25px|left|alt=|link= दिनविशेष 90px|alt=|link= <div style="text-align:left;">
{|class="mp-left" style="background:#f5fffa;"
! style="background:#FFDEAD; border:1px solid #EECFA1; border-right:0px; padding:0px; vertical-align:middle; font-weight:normal; width:100%;" |
25px|left|alt=|link= विकिपीडियाचे सहप्रकल्प
! style="background:#FFDEAD; border:1px solid #EECFA1; border-left:0px; padding:0px; vertical-align:middle;" | 90px|alt=|link=
|-
| colspan=2 style="color:#000; background:#FFFFE0; padding:15px 5px" | |}
25px| विशेष लेख मागील अंक पाहा ·आगामी सदर निवडा 25px| आजचे छायाचित्र 25px| थोडक्यात 'विकिपीडिया' प्रकल्पाविषयी पृष्ठे ·सहाय्य ·सांख्यिकी ·वर्ग 25px| आपण नवीन सदस्य आहात? 25px| दिनविशेष 25px| उदयोन्मुख लेख मागील अंक पाहा ·आगामी सदर निवडा 25px| आणि हे आपणास माहीत आहे का?
संक्षिप्त सूची
निवेदन
इतर ीय भाषांमधील विकिपीडीया
विकिपीडियाचे सहप्रकल्प
__NOTOC__
__NOEDITSECTION__ |
म्हणी | https://mr.wikipedia.org/wiki/म्हणी | ज्यात लोकपरंपरेने आलेला अनुभव वा ज्ञान ग्रथित झालेले असते अशी लोकोक्ती, ते वाक्य म्हणजे म्हण होय. किंवा कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात.
म्हणीमध्ये जीवनातील विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. म्हणी समाजाचा आरसाच आहेत. मानवाच्या चांगल्या वाईट प्रवृत्ती, आचार -विचार, नानाविध चालीरीती, निरनिराळी नातीगोती इ.चे प्रतिबिंब त्यांत पडलेले असते. समाजातील सर्व थरातील लोकांना 'म्हणी' आवडतात. कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात. यात उपमा, रूप, पर्यायोक्ती, विरोधाभास, यमक, अनुप्रास अशा विविध भाषा अलंकारां सोबत ठसकेदार रचनेचा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग केलेला असतो. 'म्हण' शब्द समूहात बऱ्याचदा ध्वन्यार्थ हा वाच्यार्थापेक्षा निराळा असू शकतो.<ref> या शिवाय गणिती अंक, संख्या व कल्पना यांचा चपखल उपयोग यामुळे म्हणी तसेच वाक्प्रचारयुक्त भाषा-साहित्य व बोलीभाषा लोकप्रिय राहिलेल्या आहेत. जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये म्हणी भरपूर प्रमाणात आढळतात.
प्रचलित मराठी म्हणी
मराठीतील म्हणी आणि त्यांचे अर्थ
एका हाताने टाळी वाजत नाही
अर्थ: कोणत्याही भांडणात दोन्ही बाजूंकडील माणसे जबाबदार असतात.
खाई त्याला खवखवे
अर्थ: अपराधी व्यक्तीला मनातून भीती वाटत असते, तो मनात अस्वस्थ असतो.
गर्जेल तो पडेल काय?
अर्थ: केवळ बडबड करणाऱ्याच्या हातून कोणतेही कार्य घडत नाही.
पाण्यात राहून माशाशी वैर कशाला?
अर्थ: समाजात ज्यांच्या सोबत राहायचे आहे त्यांच्याशी शत्रुत्व करू नये.
जी खोड बाळा ती जन्म काळा
अर्थ: जन्मजात अंगी असलेले गुण किंवा दुर्गुण जन्मभर जात नाहीत.
अति तेथे माती
अर्थ: कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच
अडला हरी गाढवाचे पाय धरी
अर्थ: शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते.
आधी पोटोबा मग विठोबा
अर्थ: आधी स्वतःच्या पोटापाण्याचा (स्वार्थाचा) विचार करावा आणि त्यानंतर अन्य कामांचा (परमार्थाचा) विचार करावा
आयत्या बिळात नागोबा
अर्थ: दुसऱ्याच्या कष्टांचा स्वतःसाठी उपयोग करून घेणे
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन
अर्थ: किमान लाभाची अपेक्षा केली असताना आर्थिक लाभ मिळणे.
उचलली जीभ लावली टाळ्याला
अर्थ: विचार न करता बोलणे.
करावे तसे भरावे
अर्थ: केलेल्या कर्माची फळे भोगावी लागतात.
काखेत कळसा गावाला वळसा
अर्थ: हरवलेली वस्तू जवळपास असताना सर्वत्र शोधत राहणे.
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
अर्थ: आपलाच माणूस आपल्याच माणसांच्या नुकसानीला जबाबदार होतो.
(गोत >गोत्र> कूळ >आपली माणसे )
कुठे इंद्राचा ऐरावत कोठे शाम भटाची तट्टाणी
अर्थ: अति थोर माणूस आणि अति सामान्य माणूस यांची बरोबरी होऊ शकत नाही.
खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी
अर्थ: आपल्याला हव्या त्या गोष्टी हव्या तितक्या प्रमाणात मिळाल्या पाहिजेत नाहीतर काहीच नको असे वाटणे.
गरज सरो नी वैद्य मरो
अर्थ: आपली गरज संपली की लोक उपकारकर्त्याला विसरतात.
गोगलगाय आणि पोटात पाय
अर्थ: वरून दिसायला अगदी घरी पण प्रत्यक्षात मात्र पक्का बेरकी असणे.
चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
अर्थ: प्रत्येकाला आयुष्यात कधीना कधी अधिकाऱ्याची संधी मिळते.
चोर सोडून संन्याशाला फाशी
अर्थ: अपराध्याला सोडून निरपराध्याला शिक्षा देणे.
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही
अर्थ: मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही.
झाकली मुठ सव्वालाखाची
अर्थ: स्वतःविषयी वल्गना करत राहण्याऐवजी मौन पाळल्यास अब्रूचे रक्षण होते.
तहान लागल्यावर विहीर खणणे
अर्थ: एखाद्या वस्तूची गरज निर्माण झाल्यावर उपाय शोधण्याची धडपड करणे.
दगडापेक्षा वीट मऊ
अर्थ: मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे.
दाम करी काम
अर्थ: पैशाने (बरीच) कामे होतात.
देश तसा वेश
अर्थ: भोवतालच्या परिस्थितीनुसार वागावे.
न कर्त्याचा वार शनिवार
अर्थ: काहीतरी सबबी सांगून काम टाळणे
नाव मोठे लक्षण खोटे
अर्थ: भपका मोठा पण वस्तुस्थिती नेमकी त्या विरुद्ध
नाचता येईना अंगण वाकडे
अर्थ: आपल्यातील उणेपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे.
पुढच्यास ठेच मागचा शहाणा
अर्थ: दुसऱ्याचा अनुभव लक्षात घेऊन स्वतः वागावे
प्रयत्नांती परमेश्वर
अर्थ: कितीही अवघड गोष्ट प्रयत्नांनी सध्या होते.
पी हळद नी हो गोरी
अर्थ: केलेल्या कामाचे फळ लागलीच मिळावे अशी अपेक्षा बाळगणे.
बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी
अर्थ: प्रत्यक्ष कृती न करता नुसती बडबड करणे.
भित्यापाठी ब्रह्मराक्षस
अर्थ: भित्र्या माणसावर अनेक संकटे कोसळतात.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात
अर्थ: एखाद्याच्या भावी काळातील कर्तबगारीचा अंदाज त्याच्या लहानपणीच बांधता येतो.
रात्र थोडी सोंगे फार
अर्थ: काम कमी करणे आणि देखवा जास्त करणे
लेकी बोले सुने लागे
अर्थ: एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे.
शेंडी तुटो का पारंबी तूटो
अर्थ: दृढ निश्चय करणे.
सुंठी वाचून खोकला जाणे
अर्थ: उपाययोजना करण्याआधीच संकट दूर होणे.
हसतील त्याचे दात दिसतील
अर्थ: चांगली गोष्ट करताना हसणाऱ्यांची पर्वा करू नये.
शेरास सव्वा शेर
अर्थ: समर्थ माणसाला त्याच्याहून अधिक समर्थ माणूस भेटणे.
हातच्या काकणाला आरसा कशाला?
अर्थ: प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते.
(मराठी म्हणींची यादी विकीकोट सहप्रकल्पात पहावी.)
म्हणीसंबंधातील ग्रंथ आणि कोशवाङ्मय
मराठी भाषेचे वाक्प्रचार व म्हणी (वि.वा. भिडे)
मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी - इंग्रजी पर्यायांसह (वा.गो. आपटे)
हेसुद्धा पहा
संस्कृत न्याय
वाक्प्रचार
उखाणे
संदर्भ
वर्ग:मराठी भाषा |
वसंत पंचमी | https://mr.wikipedia.org/wiki/वसंत_पंचमी | thumb|200px|right|वसंत ऋतूत पळसाला आलेला बहर.
thumb|विद्येची देवता सरस्वतीची
वसंत पंचमी ही शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी होय. वसंत पंचमीलाच श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी म्हणतात. वसंत ऋतूला ऋतूंचा राजा असे मानले जाते. त्याचे स्वागत करण्याचा हा विशेष दिवस आहे.
भारतात साधारणतः मकर संक्रांतीनंतर (खरेतर २१ डिसेंबरनंतर) सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी खास करून या दिवशी, नृत्यादि कला शिकवणाऱ्या संस्थांत, विद्येची देवता - सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. वसंत पंचमीपासून वसंत ऋतू सुरू झाला असे समजले जाते. हा दिवस सरस्वतीचा जन्मदिवस आहे. वसंत पंचमी ही कामदेवाच्या पूजेसाठीही ओळखली जात असे. सुफी परंपरेतील चिश्ती संप्रदायात हजरत निजामुद्दीन अवलियाचे शागीर्द मोहरीच्या पिवळ्या फुलांच्या रंगात बुडविलेली वस्त्रे नेसून हा सण साजरा करतात. मध्ययुगात या दिवशी 'सुवसंतक' नावाचा उत्सव होत असे.जोशी महादेवशास्त्री ,भारतीय संस्कृती कोश खंड आठवा, पृष्ठ ५२३
कृषी संस्कृती
वसंत पंचमीचा कृषी संस्कृतीशी संबंध दिसून येतो. या दिवशी नवान्न इष्टी असा एक छोटा यज्ञ करतात. शेतात तयार झालेल्या नवीन पिकाच्या लोंब्या घरात आणून त्या देवाला अर्पण करतात.
देवी सरस्वती जयंती
हा दिवस देवी सरस्वतीचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो.
एकदा फिरत असताना सृष्टी निर्माता ब्रह्मदेव यांना अवतीभवती शांतात वाटू लागली, त्यामुळे येथे काही कमतरता आहे असे वाटून त्यांच्या मुखातून वीणावादन करीत देवी सरस्वती प्रकट झाली अशी कथी प्रचलित आहे.
नैवेद्याचे पदार्थ
वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीला नैवेद्य दाखविण्यासाठी भारताच्या विविध प्रांतात बुंदीचे लाडू, नारळाची बर्फी, खिचडी, केशरी राजभोग, विविध प्रकारची भजी असे पदार्थ केले जातात आणि त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार केला जातो.
दिनांक
गेल्या किंवा येत्या काही वर्षांतील वसंत पंचमीच्या तारखा :
सन २०२२ - ४ फेब्रुवारी,
सन २०२१ - १६ फेब्रुवारी
सन २०२० - ३० जानेवारी, ३१ जानेवारी
सन २०१९ - फेब्रुवारी १०
सन २०१८ - जानेवारी २२
पेशवेकालीन उत्सव
पेशव्यांंच्या काळात हा उत्सव महाराष्टात उत्साहाने साजरा होत असे असा उल्लेख ब्राॅॅटन याने केला आहे. या दिवशी स्री-पुरुष आपल्या नातेवाइकांंना फुलांंचा अथवा हिरव्या देठाच्या धान्याच्या कणसांंचा गुच्छ भेट म्हणून देत. डोक्यावरील पागोट्यात तो कणसाचा तुरा रोवत असत. याच दिवशी पिवळ्या रंंगाचे वस्त्र परिधान करण्याचीही पद्धत होती. फुले, फळे, मिठाई यांंची देवाणघेवाण होत असे. वसंंत ॠतूची सन्मानपूर्वक पूजा हा मुख्य भाग असे.डाॅॅ.कर्णिक शशिकांंत, पेशवेकालीन महाराष्ट्रातील सामाजिक व आर्थिक जीवन,इतिहास आणि संंस्कृृती,१९८६,पृृष्ठ ७४—७५
बाजीराव पेशवे यांंच्या काळात सरदारांंसोबत हा उत्सव साजरा केला जाई. केशरी रंंगाची उधळण केली जात असे. ब्राह्मण, शास्त्री आणि अन्य सन्माननीय व्यक्तींंना भोजन, कलावंंतिणींंचे नृत्य असे उत्सवाचे स्वरूप असे.डाॅॅ.पाटील रत्नप्रभा, पेशवे आणि मराठे सरदार घराण्यातील स्रियांंचे धार्मिक जीवन,२००७,श्वेता पब्लिकेशन्स,पृृष्ठ ७२
कुंभमेळा
वसंत पंचमीचा दिवस हा कुंभमेळाप्रसंगी विशेष पवित्र मानला जातो. या दिवशी कुंभमेळ्यात शाही स्नान होते.
सूर्य मंदिर
बिहार राज्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील देव नावाच्या गावामधील सूर्य मंदिरात असलेली देवतेची मूर्ती ही वसंत पंचमीच्या दिवशी स्थापन झाली असे मानले जाते. या दिवशी देवतेला स्नान घालतात आणि तिला जुनी वस्त्रे काढून नवी लाल वस्त्रे नेसवतात. भाविक मंडळी या दिवशी गीत, संगीत, नृत्य यांचे सादरीकरण करतात.Anirudha Behari Saran; Gaya Pandey (1992). Sun Worship in India: A Study of Deo Sun-Shrine. Northern Book Centre. p. 68. ISBN 978-81-7211-030-7.
प्रेमाचे प्रतीक
मथुरा येथील बांके बिहारी मंदिरातील ४० दिवसीय होळी उत्सवाचा आरंभ या दिवशी केला जातो. प्रेमभावनेचे प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जातो. लोक गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करतात. या दिवशी आंब्याची पाने गुंफलेली फुलांची माळ, गजरे इत्यादी घालण्याची प्रथा आहे. लोक या दिवशी राधाकृष्ण, तसेच मदन आणि रती यांच्या प्रेमाची गीते गातात.Roy, Christian. Traditional Festivals: A Multicultural Encyclopedia. ABC-CLIO. Vol.2. pp. 192-195. 2005. ISBN 9781576070895 Vema, Manish. Fast and Festivals of India. Diamond Pocket Books. p.72. 2000. ISBN 9788171820764
भारताच्या विविध प्रांतांत
मथुरा, वृंदावन, राजस्थान या भागात या दिवशी विशेष उत्सव साजरा केला जातो. या दिवशी गणपती, इंद्र, शिव आणि सूर्य यांची प्रार्थनाही होते. बंगाल प्रांतात या दिवशी भक्तिगीते म्हणत प्रभातफेरी काढतात.भारतीय संस्कृती कोश खंड आठ शक्ती गुप्ता , Festivals fairs and fasts of India
बंगाल-
पश्चिम बंगालमध्ये या दिवशी सर्वजण पिवळी वस्त्रे परिधान करून सरस्वतीची पूजा करतात. देवीच्या पायाशी पुस्तके व लेखण्या ठेवून देवीचा आशीर्वाद घेतात. काही लोक उपासही करतात. सरस्वतीला फुले वाहतात. याला 'पुष्पांजली' असे म्हणतात. या दिवशी लहान मुलांच्या पाटीवर पहिली मुळाक्षरे काढून देऊन त्यांच्या शिक्षणाची सुरुवात करतात.
thumb|कोलकाता येथील पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केलेली बालिका
राजस्थान - पिवळा पोशाख घालून, गोड जेवण करून, पिवळ्या रंगांच्या फुलांनी घराची सजावट करून हा उत्सव साजरा करतात. राजस्थानात मोगऱ्याच्या फुलांच्या माळा गळ्यात घालणे आवश्यक मानले जाते. Journal of the Indian Anthropological Society, Volume 30 (1995)
कुमाऊ पर्वतीय प्रदेशात या दिवशी महिला अपिवले वस्त्र परिधान करतात. पुरुष डोक्याला पिवळी टोपी अथवा रुमाल बांधतात.
सुफी संप्रदायात
लोचन सिंग बक्षी यांच्या मतानुसार, बाराव्या शतकात भारतीय सुफी मुस्लिम व्यक्तींनी ह्या हिंदू उत्सवाचा स्वीकार केल्याचे दिसते. चिश्ती संप्रदायानुसार आमीर खुस्रो यांनी एका हिंदू महिलेला या दिवशी पिवळी साडी नेसून मंदिरात गेल्याचे पाहून या संप्रदायाने ही पद्धत स्वीकारली असे मानले जाते.Lochan Singh Buxi (1994). Prominent Mystic Poets of Punjab: Representative Sufi Poetry in Punjabi, with English Rendering. pp. 49–50. ISBN 978-81-230-0256-9.
शीख संप्रदायात
वसंत ऋतूचा प्रारंभ म्हणून शीख संप्रदाय हा दिवस उत्सव म्हणून साजरा करतो. गुरुद्वारामध्ये सामाजिक उत्सव म्हणून या दिवसाचे आयोजन करण्याची पद्धत महाराजा रणजीतसिंग यांनी सुरू केली. या उत्सवाचा भाग म्हणून पतंग उत्सव करणे. या उत्सवाची सुरुवात अमृतसरमधील हरमंदिर साहिब गुरुद्वारा येथून झाली. महाराजांच्या दरबारातील विशेष कार्यक्रम या दिवशी होत असे आणि त्या दिवशी त्यांचे मंत्री आणि सैनिक पिवळ्या रंगाचा पोशाख परिधान करीत असत.Hari Ram Gupta (1991). History of the Sikhs: The Sikh lion of Lahore, Maharaja Ranjit Singh, 1799-1839. Munshiram Manoharlal. अब हमारे घर बसंत असा उल्लेख गुरुग्रंथसाहिब मध्ये आहे. याचा अर्थ आमच्यावर आज ईश्वरी कृपा आहे असा होतो.पतियाळा येथील गुरुद्वारात या विशेष दिवसाचे आयोजन केले जाते.
भारताबाहेर
भारतातीलच नव्हे तर फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या पश्चिम पंजाबातसुद्धा वसंतपंचमी ही पतंगोत्सवाच्या स्वरूपात साजरी केली जाते. शेतातील सरसों (मोहरी)ची फुले पिवळी जर्द झाल्यावर नदीकाठी पंजाबात हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी केशर घातलेला गोड भात खाण्याची पद्धत आहे.Nikita Desai (2010). A Different Freedom: Kite Flying in Western India; Culture and Tradition. Cambridge Scholars Publishing. pp. 32–34, 60, 99–100, 151. ISBN 978-1-4438-2310-4.
शक्ती गुप्ता festivals fairs and fasts of India
बालीमध्ये हरी राया सरस्वती या नावाने ही उत्सव साजरा होतो. मंदिरे, शिक्षण संस्था, सार्वजनिक ठिकाणे येथे सकाळपासून दुपारपर्यंत प्रार्थना म्हटल्या जातात. नेहमीच्या पोशाखापेक्षा विद्यार्थी व शिक्षक गडद रंगाचे पोशाख परिधान करतात. मंदिरांत आणि देवळांत पक्वान्ने प्रसाद म्हणून दिली जातात. "Bali Cultural Ceremony and Ritual". Balispirit.com. Retrieved 2017-10-08.
चित्रदालन
संदर्भ
वर्ग:हिंदू धर्मातील सण आणि उत्सव
वर्ग:शेती |
HomePage | https://mr.wikipedia.org/wiki/HomePage | पुनर्निर्देशन मुखपृष्ठ |
काश्मीर | https://mr.wikipedia.org/wiki/काश्मीर | काश्मीर हा अफगानिस्तान,तिबेट(चीनने अनधिकृत कब्जा केलेला) व भारतीय उपखंड (पाकिस्तान,भारत,भुटान, बांग्लादेश,नेपाळ, म्यांमार, श्रीलंका, मालदीव यांआ भारतीय उपखंडात धरतात) यांच्या मध्यभागी असलेला भारताच्या जम्मू आणि काश्मीर या राज्याचा प्रमुख भाग आहे.
काश्मीर खोऱ्याचा जवळजवळ २/३ भाग भारताच्या ताब्यात तर १/३ भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे. भारतातील भागाला जम्मू काश्मीर म्हणतात. पाकिस्तानच्या ताब्यातील भागाला पाकिस्तानात 'आझाद काश्मीर' तर भारतात 'पाकव्याप्त काश्मीर' म्हणतात. "पृथ्वीवरील स्वर्ग" असे काश्मीरचे वर्णन करतात. केशराचे उत्पन्न आणि सफरचंद ही काश्मीरची खासियत आहे.
२०१९ पूर्वी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा होता २०१९मध्ये भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून पूर्णपणे भारतात समाविष्ट केले.
जम्मू काश्मीरचे विभाजन करून जम्मू काश्मीर आणि लद्दाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले.
चित्रदालन
काश्मीरवरील मराठी पुस्तके
काश्मीर : वाजपेयी पर्व (अनुवादित, अनुवादक - चिंतामणी भिडे; मूळ इंग्रजी लेखक - ए.एस. दुलत आणि आदित्य सिन्हा)
वर्ग:जम्मू आणि काश्मीर |
मराठी भाषा | https://mr.wikipedia.org/wiki/मराठी_भाषा | मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे १४ कोटी आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. मराठीचे वय सुमारे २४०० वर्ष आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे. गोवा, गुजरात सारख्या राज्यातही मराठी भाषा काही प्रमाणात बोलली जाते. गोव्यात मराठीला समृद्ध असा इतिहास आहे.भारतील जनगणना २००१- केंद्र सरकार
मराठी भाषिक प्रदेश
मराठी भाषा मुख्यत्वे भारताच्या महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवा, उत्तर कर्नाटक (बेळगाव, हुबळी-धारवाड, गुलबर्गा, बिदर, कारवार), गुजरात (दक्षिण गुजरात, सुरत, बडोदा व अहमदाबाद), आंध्रप्रदेश (हैदराबाद), मध्यप्रदेश (इंदूर, ग्वाल्हेर), तामिळनाडू (तंजावर) व छत्तीसगढ राज्यांत आणि दमण आणि दीव, दादरा नगर हवेली या संघराज्यशासित प्रदेशांतील काही भागातही मराठी बोलली जाते. देशातील ९ राज्ये, ४ संघराज्यशासित प्रदेश आणि ११३ देशांमध्ये मराठी भाषिकांची वस्ती आहे. इतरही अनेक देशांमध्ये मराठी भाषा बोलण्याचे प्रमाण वाढत आहे.
मराठी भाषा भारतासह, फिजी, मॉरिशस व इस्रायल या देशांतही बोलली जाते.एथनोलॉगचा मराठी बाबतचा अहवाल त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या मराठी-भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंड येथेही बोलली जाते.इंडियनलॅंग्वेजेस.कॉम- मराठी .
राजभाषा
भारतीय राज्यघटनेतील २२ अधिकृत भाषांच्या यादीत मराठीचा समावेश आहे.महाराष्ट्राची मायबोली मराठी असल्याने महाराष्ट्र दिनानिमित्त 'मराठी राजभाषा दिन' अर्थात 'मराठी भाषा दिन' १ मे रोजी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांनी घेतला. तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या सरकारने 'मराठी राजभाषा अधिनियम 1964' सर्वप्रथम 11 जानेवारी 1965 रोजी प्रसिद्ध केला. या अधिनियमानुसार, महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करण्यात आले. त्यानंतर 1966 पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. मराठीला राजभाषेचा दर्जा देऊन जणू मराठीचे राज्यभिषेक करून आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंंतराव नाईक सरकारने मराठीचा ऐतिहासिक गौरव केला.
मराठी ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. गोवा राज्यात नियमानुसार कोकणी ही राजभाषा असली तरी मराठीचा वापर शासनाच्या सर्व कारणासाठी होऊ शकतो. शासनाशी मराठीत होणाऱ्या पत्रव्यवहाराचे उत्तर मराठीतच दिले जाते. दादरा व नगर हवेली या संघराज्यशासित प्रदेशात मराठी एक अधिकृत राजभाषा आहे.
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांत मराठीच्या उच्च शिक्षणाची सोय आहे तसेच महाराष्ट्राबाहेरील गोवा विद्यापीठ (पणजी), महाराजा सयाजीराव विद्यापीठ (बडोदे), उस्मानिया विद्यापीठ (तेलंगणा), गुलबर्गा विद्यापीठ, देवी अहिल्या विद्यापीठ (इंदूर)देवी अहिल्या विश्वविद्यालय, इंदूर व जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (नवी दिल्ली)जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय, नवी दिल्ली येथे मराठी उच्चशिक्षण विभाग आहेत. महाराष्ट्राबाहेरील एकूण १५ विद्यापीठांमध्ये मराठी शिकविली जाते.
प्रमाणभाषा
प्रमाणभाषा ही एक बोली भाषाच असते. तथापि त्याचे नियम पक्के बांधलेले आणि मान्यताप्राप्त असतात. यामुळे सर्वत्र एकाच प्रकारचे लेखन केले जाते आणि त्यामुळे भाषा वाढीस त्याचा उपयोग होतो. यास मानक भाषा अथवा प्रमाण भाषा असेही म्हंटले जाते. भाषेचे मानकीकरण ही एक निरंतर प्रक्रिया आहे. भाषा प्रमाणीकरण प्रक्रिया स्थिर करण्यासाठी प्रयत्न केले जावे लागतात. मानक भाषा हा समाजात वापरल्या जाणाऱ्या बोलल्या जाणाऱ्या आणि लिखित संप्रेषणांमध्ये व्यापकपणे ओळखल्या जाणाऱ्या परंपरांचा संग्रह असतो. मराठी साहित्य महामंडळाने पाठवलेल्या लेखनविषयक नियमांची यादी इ.स. १९७२ मध्ये महाराष्ट्र शासनाने मान्य केली. त्यात आणखी चार नियमांची भर घालण्यात आली. महाराष्ट्र शासनाने ते नियम मान्य करून मराठी प्रमाणभाषेचे लेखन या नियमांनुसार करावे आणि ते त्वरित अंमलात आणावेत, असा शासकीय आदेश काढला आहे. मराठी भाषेमध्ये त्या नियमांनुसार मानक भाषा मराठीचे लेखन केले जाते.
औपचारिक लेखन करतांना मराठी प्रमाणभाषा वापरली जाते. औपचारिक व ग्रांथिक लेखनासाठी सर्वमान्य अशी प्रमाणभूत मराठी भाषा असणे आवश्यक असते. औपचारिक लेखन म्हणजे वैचारिक, वैज्ञानिक, शास्त्रीय लेखन, ललितेतर साहित्य, रस्त्यावरच्या सूचना फलक, वर्तमानपत्र बातम्या, संपादकीय, मासिकातील लेख, शासकीय पत्रव्यवहार इत्यादी लेखनात प्रमाणभाषेचाच वापर करणे आवश्यक आहे. याशिवाय व्याख्याने आणि परिसंवादांमध्ये प्रमाणभाषेचाच वापर केला गेला जातो.
प्रमाण भाषा म्हणजे एकसारखी भाषा वापरल्याने भाषेला स्थिरता येते.
प्रमाणभाषा महत्त्व आणि उपयोग
एका प्रकारे लिहिलेल्या भाषेला संगणकीकृत शोध घेतांना प्रमाणभाषा वापरलेली असेल तर त्याचा उपयोग होतो आणि योग्य ते लेखन शोधयंत्रास सापडते. अन्यथा प्रत्येक वेळी निराळा शोध देत बसावे लागेल आणि इतके करूनही सर्व माहिती मिळाली असे म्हणता येणार नाही. तसेच नियम विषयक लेखन करतांना एकाच प्रकारच्या भाषेमध्ये करणे आवश्यक आहे. अन्यथा नियमाचा अर्थ लावणे अशक्य होईल. याच प्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात कोणतेही निदान करणे अवघड होईल. कारण एकाच रोगासाठी वैद्य/डॉक्टर अनेक शब्द वापरू लागले तर रुग्णास नक्की काय होते आहे याचे निदान करून त्याची औषधे मिळवणे शक्य होणार नाही. यामुळे मानक भाषेचा वापर करणे अतिशय आवश्यक आहे. एकच भाषा वापरल्याने सामायिक मराठी संस्कृती स्थापित होते आणि आम्ही मराठी आहोत असे म्हणत येते. असा भाषेचा उपयोग चीनमध्ये झालेला दिसून येतो. चीन मध्ये अनेक बोली भाषा होत्या पण एकच प्रमाणित चीनी भाषा ही मानक भाषा म्हणून लागू केल्याने सर्व चीनी लोक एकमेकांशी जोडले गेले आहेत. तसेच इस्राएल देशा मध्ये हिब्रू भाषा संवर्धनात मानक भाषा वापरल्याने हिब्रू भाषा समर्थ झाली आणि आज एकेकाळी मृत झालेलेल्या भाषेत आज शास्त्रीय संशोधने प्रकाशित होत आहेत. याच प्रमाणे मराठी भाषेत लेखन करतांना अथवा संशोधन निबंध प्रकाशित करण्यासाठी व्याकरणाचे शासकीय नियम असलेली मराठी भाषा वापरणे आवश्यक आहे.
मराठी भाषा दिवस
१ मे हा दिवस महाराष्ट्र दिन किंवा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. याखेरीज विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राची मायबोली मराठी असल्याने महाराष्ट्र दिनानिमित्त 'मराठी राजभाषा दिन' अर्थात 'मराठी भाषा दिन' १ मे रोजी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांनी घेतला. तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या सरकारने 'मराठी राजभाषा अधिनियम 1964' सर्वप्रथम 11 जानेवारी 1965 रोजी प्रसिद्ध केला. या अधिनियमानुसार, महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करण्यात आले. त्यानंतर 1966 पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. मराठीला राजभाषेचा दर्जा देऊन जणू मराठीचे राज्यभिषेक करून आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंंतराव नाईक सरकारने मराठीचा ऐतिहासिक गौरव केला.
मराठी पुस्तके
'लीळाचरित्र' हा महान ग्रंथ म्हाइंभटांनी लिहून मराठी भाषेचा पाया रोवला. मराठी भाषेत आजवर विविध विषयांवर विस्तृत लेखन प्रकाशीत झाले असून , त्यातील कैक प्रकाशने जागतिक साहित्यात मानाचे स्थान मिळवू शकतील अशी आहेत. मराठीत दरवर्षी दोन हजार नवीन पुस्तके प्रकाशित होतात व सुमारे ५०० दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. नामवंत खासगी प्रकाशन संस्था आणि शासकीय प्रकाशने यांची वार्षिक उलाढाल, तसेच पाठ्यपुस्तके धार्मिक, ललित आणि वैचारिक ग्रंथ यांची एकत्रित बाजारपेठ सुमारे २५० कोटी रुपयांपर्यंत आहे. शासकीय संस्था ’बालभारती’ दरवर्षी सुमारे ९ कोटी पुस्तके छापते. भारताच्या सर्वाधिक खपाच़े मासिक ’लोकराज्य’ हे, आणि देशातले सर्वाधिक खपाचे च़ौथ्या क्रमांकाच़े वर्तमानपत्र ’लोकमत’ हे आहे. देशभरातील एकूण ग्रंथालयांतली २५ टक्के ग्रंथालये एकट्या महाराष्ट्रात आहेत.
शब्दार्थ कोशांव्यतिरिक्त मराठी भाषेत अर्वाचीन चरित्र कोश, प्राचीन चरित्र कोश (सिद्धेश्वरशास्त्री चित्राव), तत्त्वज्ञानकोश, तुलनात्मक भाषा विज्ञान (भोलानाथ तिवारी+उदय नारायण तिवारी+पांडुरंग दामोदर गुणे) वाङ्मयकोश, विश्वकोश, समाजविज्ञान कोश, सरिता कोश, संस्कृती कोश, स्थलकोश, ज्ञानकोश (श्रीधर व्यंकटेश केतकर), असे अनेक प्रकारचे कोश मराठीत आहेत. या बाबतीत मराठी भाषेचा जगात दुसरा क्रमांक लागतो.
पुरस्कार
विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, वि.स. खांडेकर आणि भालचंद्र नेमाडे अशा चार मराठी साहित्यिकांना आजवर ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहेत.
'मूर्तिदेवी पुरस्कार' शिवाजी सावंत यांना मृत्युंजय या कादंबरीसाठी मिळाला आहे.
महेश एलकुंचवार आणि विजय तेंडुलकर या लेखकांना 'सरस्वती सन्मान' मिळाले आहेत.
विंदा करंदीकर आणि नारायण सुर्वे यांना 'कालिदास सन्मान' मिळाले आहेत.
महाराष्ट्रातले दादासाहेब फाळके यांचा नावाने 'अखिल भारतीय कला सन्मान' दिला जातो.
भारतीय संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार आजवर बालगंधर्वना मिळाले आहेत.
सर्वोत्तम चित्रपटाचे पहिले राष्ट्रपती सुवर्णकमळ आचार्य अत्रे यांच्या ''श्यामची आई'’ चित्रपटास मिळाले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धोंडो केशव कर्वे, पां.वा. काणे, भीमसेन जोशी, जे.आर.डी. टाटा, सचिन तेंडुलकर, विनोबा भावे आणि लता मंगेशकर हे आजवरचे भारतरत्न पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रीय.
भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू एक जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे.
मराठी भाषेचा इतिहास
मराठी भाषेचा उदय प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला, असे बहुतांशी मानले जाते. नव्या संशोधनानुसार मराठी अन् प्राकृत ह्या एकच भाषा असल्याचे सप्रमाण सिद्ध केले आहे. सदर महाराष्ट्र शासनाच्या संशोधन अभिजात मराठी प्रतिवृत्ताने केले आहे. ज्ञात इतिहासावर पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. मराठी ही भाषा देवनागरी लिपी वापरून लिहिली जाते.
मराठीतील आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ गाथा सप्तशती हा सुमारे २००० वर्षांपूर्वीचा आहे. मुकुंदराजांनी विवेकसिंधु या ग्रंथाद्वारे शंकराचार्यांच्या वेदांतावर निरूपणात्मक विवेचन केले आहे. शा.श. १११० सालच्या सुमारास लिहिला गेलेला मराठीतील हा आद्यग्रंथ त्यांनी बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई या आपल्या जन्मगावी लिहिला.
इ.स. १२७८ मध्ये म्हाइंभट यांनी लीळाचरित्र लिहिले. त्यानंतर इ.स. १२९० मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली. संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आदि ग्रंथांची भर घातली.
इवलेसे|इ.स.११३० मध्ये कोरलेला मराठी शिलालेख
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. स्वराज्याची राजभाषा म्हणून मराठीची निवड केली. अमराठी शब्दांचा वापर टाळण्यासाठी शिवरायांनी मराठीचा १४०० शब्दांचा राजव्यवहारकोश तयार करून घेतला. आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. तत्कालीन भारतावर (आताचा पाकिस्तान, इंडिया आणि बांग्लादेश) राज्य करतांना देखील मराठीचा अधिकृत भाषा म्हणून वापर होत असे. इ.स. १९४७ नंतर स्वतंत्र भारत/ इंडिया देशाने मराठीला अधिकृत भाषेचं पद दिलं. इ.स. १९६०१९६० मधे महाराष्ट्राच़े एकभाषिक राज्य स्थापन झाले - मराठीमाती मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला.
राजा केसिदेवरायच्या कारकिर्दीत कोरलेला अक्षी शिलालेख हा आजवर सापडलेला मराठी भाषेतील पुराणतम शिलालेख आहे . अक्षी शिलालेखाच्या शोधापूर्वी कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या उंच मूर्तीच्या पायाशी मराठीत कोरलेला लेख - "चामुण्डराजे करवियले" हा आद्य मराठी लेख समजला जात असे. अक्षी हे गाव महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबागपासून दक्षिण दिशेस ५ कि.मी. अंतरावर अलिबाग- मुरुड जंजिरा रस्त्यावर आहे. या शिलालेखाचा उल्लेख इ.स. १८८३च्या कुलाबा गॅझेटियरमध्ये आहे. त्या शिलालेखावरील वरील मजकूर खालीलप्रमाणे -
thumb|राजा केसिदेवरायाचा अक्षी शिलालेख इ.स. १०१२
हा लेख एका ओबडधोबड शिळेवर कोरला असून त्या शिळेचा माथ्यावर चंद्रसूर्य आणि मजकुराखाली गद्धेगाळ(?) व शेवटी पुन्हा चंद्रसूर्य असे कोरीवकामाचे स्वरूप आहे. लेख देवनागरी लिपीत असून भाषा संस्कृत व मराठी मिश्र आहे. इंग्रजी काल गणनेनुसार या लेखाची तारीख १६ मे सन १०१२ अशी आहे.
अर्थ : "जगी सुख नांदो. ओम पश्चिम समुद्राधीपती श्री कोकण चक्रीवर्ती श्री केसिदेवराय यांचा महाप्रधान भइर्जु सेणुई याने शक संवत ९३४ परिधावी संवत्सर अधिक मासात शुक्रवारी वद्यपक्षात देवीचा बोढणासाठी नऊ कुंवली धान्य दान केले." लुनया हे लेख कोरणाऱ्याचे नाव आहे.
कुडल संगम, ता. दक्षिण सोलापूर येथील मराठी शिलालेख - "वाछि तो विजेया होईवा ।।'
कुडल शब्द कन्नड असून त्याचा अर्थ संगम आहे. भीमा व सीना या दोन नद्यांचा संगमावर वसलेल्या या गावात चालुक्यकालीन संगमेश्वर मंदिर आहे. त्याची स्थिती बऱ्यापैकी असून तेथील सभामंडपातील तुळईवर अडीच़ ओळींच़ा लेख कोरलेला आहे. त्याच़ा काही भाग संस्कृत काही भाग मराठी आहे. शेवटच़े वाक्य "वाछि तो विजेया होईवा ।।' असे मराठीत आहे. त्यात काळाच़ा स्पष्ट उल्लेख आहे. तेथे शके ९४० असे कोरले आहे. साधारणतः इ.स. १०१८ या काळात तो कोरला गेला असावा. श्रवणबेळगोळच्यानंतर दिवे आगार ताम्रपटाच़ा शोध लागला. त्याच़ा काळ शके ९८२(इ.स. १०६०) होता. त्यानंतर कुडलचा शिलालेखाच़ा शोध लागला.
मराठी भाषेत कालानुक्रमे झालेले बदल
मराठी भाषेचे वय हे साधारणपणे २५०० वर्ष मानले जाते. या काळात समाज जीवनातल्या बदलानुसार ही भाषा सतत बदलत राहिली. तरीही सर्वसाधारणपणे ठळक फरक खालील प्रमाणे करता येतात.
आद्यकाळ
हा काळ इ.स. १२०० पूर्व, म्हणजे लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा लिखाणाचाही पूर्वीचा काल होय. काळातील मराठी शब्दांच़े तसेच़ काही वाक्यांच़े उल्लेख ताम्रपटात तसेच़ शिलालेखात आढळतात.
इवलेसे|परळ, मुंबई येथे आढळलेला शिलालेख. हा इ.स ११०९ मध्ये कोरला गेला.
यादवकाळ
हा काळ इ.स. १२५० ते इ.स. १३५० असा आहे. देवगिरीचा यादवांचे महाराष्ट्रावर राज्य असल्याने मराठी भाषेला राजभाषेच़ा दर्जा होता. अनेक लेखक व कवी यांना राजाश्रय होता. याच काळात महानुभाव या पंथाची सुरुवात झाली. चक्रधर स्वामी, भावे व्यास, महिंद्र व्यास, नागदेव आणि महदंबा यांनीही मराठी वाङ्मयात महत्त्वाची भर घातली. वारकरी संप्रदायास सुरुवात झाली. महाराष्ट्राचा बहुतेक सर्व जातीत यामुळे संतांची परंपरा जन्मास आली व त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे काव्यरचनेस सुरुवात केली. नामदेवशिंपी, गोरा कुंभार,नरहरी सोनार, सावता माळी, चोखा मेळा, बंका महार, सेना न्हावी, कान्होपात्रा यांनी भक्तिपर काव्यरचना केल्या व मराठी साहित्याचे दालन वैविध्यानी समृद्ध केले.
बहामनी आणि सल्तनत काळ
हा लेख बघा:मराठी भाषेत प्रक्षिप्त फारसी शब्द
इवलेसे|मराठी लेखक व कवी संत सर्वज्ञ दासोपंत यांच़े सुमारे १६ व्या शतकातील लिहिलेले मराठी.
हा काल इ.स. १३५० ते इ.स. १६०० असा आहे. यादवांच़े स्वराज्य संपून मुसलमानी काळ सुरू झ़ाला.
सल्तनत काळात मराठीचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. राज्यकर्ते मुस्लिम असले तरी स्थानिक सरंजामदार, जमीनदार,महसूल गोळा करणारे अधिकारी आणि बहुसंख्य लोकसंख्या हिंदू होती. प्रशासन आणि महसूल संकलन सुलभ करण्यासाठी, सुलतानांनी अधिकृत कागदपत्रांमध्ये मराठीच्या वापरास प्रोत्साहन दिले. तथापि, त्या काळातील मराठी भाषेत बरेच फारसी प्रचलित झाले. उदाहरणार्थ, दररोजच्या भाषणात वापरलेले शब्द जसे की बाग, कारखाना, शहर, बाजार, दुकान, हुशार, कागद,खुर्ची, जमिन,जाहिरात), हजार इत्यादी.
अहमदनगर सल्तनत काळात मराठी ही प्रशासनाची भाषा बनली.[20] विजापूरच्या आदिलशाहीनेही प्रशासन आणि रेकॉर्ड ठेवण्यासाठी मराठीचा वापर केला. अशा धकाधकीचा काळातही मराठी भाषेत साहित्याची भर पडली. नृसिंह सरस्वती, भानुदास, जनार्दन स्वामी, एकनाथ, दासोपंत, रंगनाथ, विष्णूदास नामा, चोंभा यांनीही मराठी वाङ्मयात भक्तिपर काव्याची भर घातली.
मराठा साम्राज्याचा काळ
हा काळ अंदाजे इ.स. १६५० ते इ.स. १८१८ असा आहे. या काळात मराठी स्वराज्याची स्थापना झ़ाल्याने मराठी भाषेवरील फारसी शब्दांच़े आक्रमण थंडावले. असे मानले ज़ाते की शिवाजी महाराजांनी रघुनाथ पंडित यांस राज्यव्यवहार कोश बनवतांना फारसी ऐवजी संस्कृत शब्द योजना करण्यास सांगितले. याच़ काळात मराठी भाषेला राजमान्यतेसोबत संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी यांचामुळे लोकमान्यताही मिळू लागली. मुक्तेश्वर, वामन पंडित यांनीही मराठी काव्य विकसित केले. या शिवाय शिवकल्याण, रमावल्लभदास, मोरया गोसावी, संत महिपती यांनी संत चरित्रे लिहुन संतविजय, भक्तिविजय आदि ग्रंथांद्वारे मराठी भाषेत मोलाची भर घातली.
इवलेसे|रामदास स्वामी यांच़े इ.स १६०० शतकातले मराठी हस्ताक्षर.
याकाळात मोरोपंतांनी मराठी भाषेत ग्रंथरचना केलया. तसेच श्रीधर या कवीने आपले हरिविजय व पांडव ,प्रताप या काव्यांद्वारे खेड्यापाड्यात आपल्या मराठी कविता पोहोचवल्या.
याच काळात शृंगार व वीर रसांना स्वतंत्र स्थान मिळाले. यासाठी लावणी व पोवाडा हे हे नवीन वाङ्मय प्रकार मराठीत निर्माण झ़ाले. याच़ काळात वाङ्मय हा रंजनाच़ा प्रकार आहे हे समाजाने मान्य करण्यास सुरुवात केली. याच़ काळात बखर लेखनाची सुरुवात झाली. निरंजन माधव, कृष्ण दयार्णव, रामजोशी, प्रभाकर, होनाजी बाळा, सगन भाऊ हे या काळातील महत्त्वाचे कवी आहेत.
इंग्रजी कालखंड
हा काळ इ.स. १८१८ ते आज़तागायत असा आहे. याकाळात गद्य लेखनाची सुरुवात झाली. कथा लेखनाची बीजे याच़ काळात रोवली गेली. नियतकालिके व गद्यसाहित्य छापण्याची सुरुवात होण्याच़ा हा काल होता. मराठी भाषेत अनेक नियतकालिके या काळात कथा छापू लागली.
छपाईची सुरुवात झ़ाल्यानंतर मराठी भाषेचा प्रसार उत्कर्ष वेगाने होत गेला. मराठी पंडित व मराठी भाषेचे अभ्यासक मेजर कॅंडी या आंग्ल अधिकाऱ्याने मराठी भाषेला विराम, अर्धविराम, प्रश्न आदी विरामचिन्हांनी बांधले. यामुळे मराठी लिखाण सुकर झाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1926 पासून राबवली त्यातूनच अनेक मराठी शब्द निर्माण झाले आणि ते आज प्रचलित आहेत . ते वापरण्यात येऊ लागले
स्वातंत्र्योत्तर कालखंड
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषाशुद्धी चळवळ राबवली त्यातूनच महानगरपालिका क्रीडांगण सारखे महत्त्वाचे मराठी शब्द निर्माण झाले साठीच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि सत्तरीच्या पूर्वार्धात महाराष्ट्रातील सांस्कृतिक-सामाजिक वातावरण बहरून आलेले होते. छबिलदास चळवळ जोमात होती. शेकडो उत्साही, नवर्जनशील तरुण आपापले मित्र घेऊन आणि खांद्याला झोळ्या अडकवून छबिलदासवर थडकत असत. ‘युक्रांद’च्या तालमीत तयार झालेले तरुण, दलित पॅंथर्सचा साहित्यप्रक्षोभ, नक्षलवादाने प्रेरित झालेले नव-कम्युनिस्ट असे एक वातावरण तर दुसऱ्या बाजूला ‘अॅकॅडेमिक’ साहित्याचा व समीक्षेचा सरोजिनी वैद्य, विजया राजाध्यक्ष आदींचा वाङ्मयीन दबदबा. ‘सत्यकथा’ नावाचे साहित्यिक केंद्र होते. श्री. पु. भागवत त्यात प्रभावशील होते. मध्यवर्गीयांना रिझविण्याची संपूर्ण जबाबदारी पु.ल. देशपांड्यांवर पडली. ‘सत्यकथा’ नावाच्या प्रस्थापिताला समांतर असा लघुनियतकालिकांचा प्रवाह आणि वाङ्मयक्षेत्रातील माहिती व गॉसिपचे व्यासपीठ (आणि चव्हाटा) ‘ललित’च्या उदयाने सुरू झाला.
‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बाईंडर’, ‘गिधाडे’ सत्तरीच्या पूर्वार्धातले. चिं. त्र्यं. खानोलकरांची ‘मिस्टरी’ आणि ‘कोकणी गूढ’ त्याचप्रमाणे दिलीप चित्रेंची, विलास सारंगांची बंडाळी याच काळातली. ‘नेमाडी’ पंथातील नवविद्वान आणि भाऊ पाध्येंची ‘वासुनाका’ हीसुद्धा साठीच्या दशकातलेच. ‘दलित पॅंथर्स’नी साठीच्या अखेरीस आणि सत्तरीच्या सुरुवातीस दिलेले आव्हान जितके उग्र तितकेच आश्वासकही होते.
‘माणूस साप्ताहिक’ आणि श्री.ग. माजगावकर यांनीही सर्व प्रस्थापितविरोधी प्रवृत्तींना (म्हणजे इंदिराविरोधी !) एकत्र आणायला सुरुवात केली होती. ग.वा. बेहेरेंचे ‘सोबत’ही त्याच काळात दणाणत होते. पु.ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले इचलकरंजीचे साहित्य संमेलन हा एक साहित्याचा महाआनंदोत्सव होता. असाच आणखी एक नवीन प्रवाह त्या परिस्थितीत येऊन थडकला- ‘स्त्री-मुक्ती’ चळवळीचा. छाया दातार, शारदा साठे, ज्योती म्हापसेकर अशा अनेकांनी सर्व वैचारिकतेला नवे परिणाम दिले होते. बाळ गांगल या वातावरणाशी निकट होते, त्यांनी प्रकाशात आणलेले कित्येक पुढे थेट प्रथितयश झाले वा विद्रोही- प्रथितयश झाले.
अभिजात मराठी
मराठी भाषा इसवी सनापूर्वी अस्तित्वात होती यासाठी प्रा. हरी नरके यांनी मांडलेले मुद्दे :-
इसवी सनापूर्वी २०७ या वर्षी ब्राह्मी लिपीत परंतु मराठी भाषेत लिहिलेले शिलालेख सापडले आहेत.
गाथा सप्तशती हा ७०० श्लोकांचा मराठी ग्रंथ इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिला गेला. त्याचा अर्थ असा की ही भाषा त्या लिखाणाआधी किमान ३०० वर्षे अस्तित्वात असली पाहिजे. ग्रंथातील वर्णन आजही मराठी लोकांच्या आचार-विचारांशी आणि त्यांच्या सध्याच्या संस्कृतीशी जुळणारे आहे. ग्रंथात वापरलेले गेलेले काही शब्द मराठीखेरीज अन्य भारतीय भाषेत नाहीत.
भांडारकर पुरातत्त्व संशोधन संस्थेमध्ये किमान ८० हस्तलिखिते मराठी भाषेचे पुराणत्व सिद्ध करणारी आहेत.
मराठी साहित्य
मराठी संस्कृती/साहित्याबाबतचे इतर काही लेख -
कथा, कविता, कादंबरी, नाटक, नाट्य, बाल साहित्य, बालगीते, ललित लेख, विनोद, मराठी साहित्य संमेलने, अग्रलेख संपादकीय स्तंभलेख समीक्षा, चारोळी, गझल, ओवी, अभंग, भजन, कीर्तन, पोवाडा, लावणी, भारूड, बखर, पोथी, आरती, लोकगीत, गोंधळ, उखाणे, वाक्प्रचार
मराठीचे आद्य कवी
मराठीचे आद्य कवी पुढील प्रमाणे मानले जातात.
मुकुंदराज
माहीमभट
महदंबा
ज्ञानेश्वर
नामदेव
जगमित्रनागा
एकनाथ
तुकाराम
रामदास
वामन पंडित
श्रीधर
मुक्तेश्वर
मोरोपंत
माधवस्वामी - तंजावरचे लेखक
होनाजी
महिपती
केशीराजव्यास - मराठीतील पहिले संपादक
दामोदर पंडित
मुसलमान मराठी संतकवी
मराठी विश्वकोश
thumb|200px|मोडी लिपीतील मजकूर
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर महाराष्ट्र शासनाने १९ नोव्हेंबर १९६०ला महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाची स्थापना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली केली. या मंडळाने मराठी विश्वकोशाची निर्मिती केली. त्याआधि श्री.व्यं. केतकरांनी मराठीतील पहिला ज्ञानकोश एकहाती लिहीला. मराठी विश्वकोश ही ज्ञानकोशाची सुधारून वाढवलेली आवृत्ती आहे.
मराठीतील बोली भाषा / प्रांतिक भेद
प्रमुख विभागणी -
कोकणी
अहिराणी
माणदेशी
मालवणी
वऱ्हाडी
तमिळनाडू राज्यातील तंजावर येथे तंजावरी मराठी नावाची बोलीभाषा बोलली जाते.
मराठीभाषक ज्यू (बेने-इस्रायली) इस्रायलला परतले, तेव्हा मराठी भाषा तेथेही गेली.
तपशीलवार माहिती -
उत्तर महाराष्ट्र
अहिराणी - जळगाव जिल्हा, धुळे, नंदुरबार, नाशिक ते मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, शहापूर, अंतुर्लीपर्यंतच्या विस्तृत भूप्रदेशात ही बोलीभाषा प्रचलित आहे. शब्दांमध्ये नाद आणि लय हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. भालचंद्र नेमाडे, ना. धों. महानोर, के. नारखेडे या लेखकांनी आपल्या साहित्यात बोलीच़ा वापर केला आहे.
तावडी - जामनेर, भुसावळ, जळगाव, बांदवर, रावेर, यावल तालुका या भागात तावडी बोली प्रचलित आहे. तावडी बोलीत मोठ्या प्रमाणात आहेत. 'क'च्या जागी 'ख'च़ा उच्चार केला ज़ातो. उदाहरणार्थ- डोखं (डोकं), मोखा (मोका). बहिणाबाई चौधरींच्या कवितांमधून तावडी बोलीच़ा आविष्कार दिसतो. पूर्वी या बोलीला अहिराणी समज़त असत परंतु नवीन विचारानुसार ही स्वतंत्र बोली मानली गेली.
देहवाली - भिल्ल समाजात ही बोली आढळते. गुजराती आणि हिंदी भाषांचा हिच्यावर मोठा प्रभाव आहे. बोलीची वाक्यरचनाही गुजरातीशी मिळतीजुळती आहे. महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार या भागात ही बोली वापरात आहे. या भाषेच़े खळवाड आणि मेवासी असे दोन पोटप्रकारही आहेत. देहवालीच्या मूळ स्वरात 'ळ', 'क्ष' आणि 'ज्ञ' ही व्यंजने नाहीत, तर 'छ', 'श' आणि 'ष' यांच्याऐवजी 'स' हे एकच व्यंजन वापरले जाते. या भाषेचे अभ्यासक चामुलाल राठवा यांनी देहवाली मौखिक साहित्य शब्दबद्ध केले आहे. विश्राम वळवी, देवेंद्र सावे, बळवंत वळवी, सोबजी गावीत यांनी या भाषेत लेखन केले आहे. भाषासाहित्य प्रकल्पाअंतर्गत अकादमीद्वारे हे प्रसिद्धही झाले आहेत.
कोकण
कोंकणी / चित्पावनी - कोकणी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अनेक बोली आहेत. अधिक माहितीसाठी कोकणी भाषा हा लेख पहा.
माणदेशी सांगली, सातारा, या जिल्ह्यांतील आटपाडी, माण या तालुक्यांत प्रामुख्याने तर सांगली जिल्ह्यातील जत, खानापूर, कवठेमहांकाळ या तालुक्यांच्या, सातारा जिल्ह्यातील खटाव या तालुक्याच्या, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा, माळशिरस या तालुक्यांच्या काही भागांत बोलली जाते.
मालवणी - दक्षिण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलली जाणारी ही बोली आहे. या बोलीस कुडाळी असेही म्हणतात. हेल काढून आलेले अनुनासिक उच्चार हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. दशावतार या नाट्याचे सादरीकरण या भाषेत केले जाते. मच्छिंद्र कांबळी यांच्या मालवणी नाटकांमुळे ही भाषा जास्त प्रसिद्धीस आली. मालवणी बोलीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहेत. जसे की, झील (मुलगा), चेडू (मुलगी), घोव (नवरा).
कोळी - मुख्यतः महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, अलिबाग तसेच गुजरातमधील उमरगाव, दादरा नगर हवेली आणि गोव्यात त्याच़बरोबर संपूर्ण कोकणातील किनारपट्यांवर सर्रास कोळी भाषा बोलली ज़ाते. कोळी जातीतील अनेक उपजातींमध्ये थोड्याफार भाषेचे फरक पडतात ज़से, कोळी, मांगेली, वैती, आगरी इ..या भाषेत " ळ " उच्चार " ल " ने केला ज़ातो. फक्त ह्या कोळीतील " मांगेली " भाषेत "ळ"ची स्पष्ट सिद्ध होते. त्याचबरोबर ह्या भाषेत मराठी, गुजराती, हिंदी आणि फारशी भाषेच़े शब्द दडलेले आहेत. शब्दशः " त्याने जेवण केलं होतं " ( त्यान जेवण करीलता ), " तुम्हाला काहीतरी सांगायच़ं आहे " ( तुमाना कायतरी हांग्याय ).
कर्नाटक सीमा
कोल्हापुरी - कोल्हापूर भागात बोलली ज़ाणारी ही बोली आहे. लय काढून बोलण्याची लकब या भागात आढळते. तसेच़ कोकणी भाषेच़ा प्रभाव यावर दिसतो. भाषेत रांगडेपणा व शिव्यांच़ा वापर आढळतो.
चंदगडी बोली - कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती प्रदेशातील अनेक गावांची ही भाषा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड भागात ही भाषा प्रचलित आहे. या भूभागात दोन भिन्न भाषा-बोलींच़ा संपर्क, विविध राजकीय अंमल, मराठी, कन्नड आणि कोकणी भाषेचा प्रभावाखाली तयार झालेली ही एक बोली भाषा आहे. उच्चाराच़ा विशिष्ट हेल, सुरावट आणि निराळे व्याकरण हे या भाषेत दिसून येते. चंदगड तालुक्याच़ा पश्चिम भाग, दोडामार्ग-सावंतवाडी तालुक्याचा सीमेलगतची गावे, आजरा तालुक्याच्या दक्षिण भागातील गावे ती कोकणीच्या प्रभावाने तयार झ़ालेली बोली वापरतात. चंदगडच्या पूर्व भागात आणि बेळगाव परिसरातील गावांमध्ये कन्नड भाषेचा प्रभावाने तयार झ़ालेली बोली वापरात आहे. या मध्ये 'मिय्या जेवलो' (मी जेवले), 'मिय्या बाज़ारास गेल्लो'(मी बाज़ारात गेले) अशी शब्द रचना दिसते. तसेच 'कोठे'ऐवजी 'खट्टे' असा शब्द ऐकू येतो.
बेळगावी - बेळगाव या महाराष्ट्राचा सीमाभागातील ही बोलीभाषा ही कन्नड, चंदगडी, कोल्हापुरी, कोकणी अशा अनेक बोलींचा मिश्रणातून तयार झालेली आहे. या भाषेतील गोडव्याची ओळख पु.ल. देशपांडे यांचा रावसाहेब या कथेने करून दिली. त्याच बरोबर भीमराव गस्ती, नारायण अतिवाडकर या साहित्यिकांनीही या भाषेतून लेखन केले आहे. प्रकाश संत लिखित लंपन या व्यक्तीचित्रात या भाषेला विपूल वापर आढळतो. ज़से काय लंपूसाहेब, ओठ बाहेर काढून बसून सोडलात आज, सक्काळी सक्काळी.. एकदम मज्जा ऐद नोडरी ऽऽ अभ्यास इल्ला एन इल्ला... या भाषेत गा हा प्रत्यय लावला ज़ातो ज़से 'काय गा कव्वा येत्यास?' (काय, केव्हा येणार?)
मराठवाडा
मराठवाडी - मराठवाडा प्रदेशात ही ठसकेबाज मराठी भाषा वापरली ज़ाते. सहसा गावठी किंवा शिवराळपणा हे वैशिष्ट्य मराठवाड्यातल्या मराठीचे समज़ले ज़ाते. नांदेड जिल्ह्यात तेलंगणा राज्याला लागून असल्याने एक वेगळाच़ हेलका धरला ज़ातो. तर महाराष्ट्र - कर्नाटक सीमावर्ती भागातील उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात थोडी वेगळी भाषा बोलली ज़ाते. लातूरी भाषेत काही वेळा क्रियापदांवर कानडी भाषेच़ा परिणाम होतो, परंतु प्रभाव मात्र नाही. या भाषेत उर्दू शब्दही आढळतात. 'लाव', 'आव' या स्वरूपाच़े कारकवाचक प्रत्यय या बोलीच़े वेगळेपण दाखवतात. उदा. जेवलालाव, च़ाल्लाव, ठिवताव इत्यादी
विदर्भ
नागपुरी - पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूरचा काही भाग आणि गडचिरोलीचा काही भाग तसेच भंडारा (गोंदिया) या जिल्ह्यांत बोलली जाणारी नागपुरी ही काहीशी निराळी बोली आहे. तसेच मध्य प्रदेशातील शिवनी, छिंदवाडा, बालाघाट व रायपूर या भागातही ही बोली प्रचलित आहे. वऱ्हाडी आणि झाडीबोलीतील अनेक शब्द यात असले तरी ही बोली वेगळी आहे. नागपुरीला वऱ्हाडी भाषेचेच एक रूप मानल्याने नागपुरी बोलीचा स्वतंत्र भाषिक अभ्यास झाला नाही. परंतु नवीन विचारानुसार ही स्वतंत्र बोली मानली जाते. यावर हिंदी शब्दांचाही प्रभाव आढळतो.
वऱ्हाडी - बुलढाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या सहा जिल्ह्यांतून वऱ्हाडी बोलली जाते. मूळ मराठी अशी ही बोली कुठल्याही प्रकारचा हेल न काढता, अनुनासिक इ.चा अतिरेक न करता अत्यंत संथपणे बोलली जाते. प्रमाण मराठीतील काही शब्दात बदल होत असल्यामुळे ती थोडी अशुद्ध वाटते. म्हाइंभट यांच़ा 'लीळाचरित्र' हा मराठीतील पहिला गद्यग्रंथ वऱ्हाडी बोलीत लिहिला गेला. महानुभाव पंथातील अनेक रचना याच बोलीतून झ़ाल्या आहेत. प्रमाण मराठीतील 'ड'चा 'ळ', 'ळ'चा 'य' या बोलीत केला ज़ातो. ज़से, 'नदीचा गायात, गाय फसली' (नदीचा गाळात गाय फसली). तसेच जो हा प्रत्यय असलेली देईज़ो, येईज़ो, घेईज़ो अशी रूपे येतात. फारशी व हिंदीचा प्रभाव या बोलीवर आहे.
झाडीबोली - भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हा चार जिल्ह्यांचा भूप्रदेश 'झाडीपट्टी' म्हणून ओळखला जातो. या भागातील बोलीभाषेला झाडीबोली असे म्हणतात. मराठीतील 'ण, छ, श, ष आणि ळ' ही पाच़ व्यंजने झाडीबोलीत वापरली जात नाहीत. मराठीतील मुकुंदराजकृत 'विवेकसिंधू'मधील अनेक अपरिचित शब्द आजही झाडीबोलीत प्रचारात आहेत.
इतर
डांगी
नारायणपेठी बोली - महाराष्ट्रातील स्वकुळ साळी समाजाची बोली. आंध्र प्रदेशातून येऊन देशभर विखुरलेले मराठी विणकर ही बोलीभाषा बोलतात.
तंजावर मराठी - ही मराठी भाषेचीच़ एक बोली असून ती भारताच्या तमिळनाडू ह्या राज्यात बोलली ज़ाते. ज़वळपास एक लाखाहून अधिक लोक ही भाषा रोजच्या व्यवहारात उपयोगात आणतात. तमिळनाडू राज्यातील तंजावर किंवा तंजावूर ह्या नगरातील ही एक बोलीभाषा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे ह्यांच्यासोबत दक्षिणेत स्वारीसाठी गेलेली जी मराठी माणसे तंजावरला पिढ्यानपिढ्या स्थायिक झाली, त्यांची ही मातृभाषा आहे. ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण भाषा असून त्यात आज़ही बरेचसे प्राचीन मराठी शब्द वापरात आहेत. तसेच काळाचा ओघात पडलेला स्थानिक तमिळ भाषेच़ा प्रभाव ह्या भाषेवर ज़ाणवतो.
नंदभाषा - व्यापार करताना इतरांना कळू नये म्हणून व्यापारी ’ही एक सांकेतिक भाषा इतिहासात वापरत होती. आज़ही काही ठिकाणी वापरात आहे. त्या भाषेमध्ये चलनाच्या उल्लेखांसाठी निराळे शब्द आहेत. उदाहरणार्थ भुरका - एक, आवरू - दोन, उधानू - तीन, पोकू - चार, मुळू - पाच, शेली - सहा वगैरे. विसोबा खेचर (नामदेवांचे गुरू) यांनी या नंदभाषेच़ा वापर करून शंकराची स्तुती करणाऱ्या काव्यरचनाही केल्या आहेत.
भटक्या विमुक्त - भटक्या विमुक्त जमातींच्या मराठी संलग्न बोली आहेत. यांना पारूशी असेही संबोधन आहे. यामध्ये गोंधळी, कुडमुडे जोशी, गोसावी, भराडी, गोपाळ, शिकलगार, वैदू, नंदीवाले, बेलदार, कोल्हाटी आदी भटक्या जमाती येतात. सदैव भ्रमणात राहिल्याने यांच्या बोलीमध्ये विविध शब्द आहेत. आपली कौशल्ये आपल्याच जमातीत रहावीत यासाठी या बोली भाषांचा उपयोग केला जातो. भाषेतील शब्द उदाहरण मावशी म्हणजे माची. शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभागातील डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी या भाषांवर संशोधन केले आहे.
इस्रायली मराठी
मॉरिशसची मराठी
मराठी मुळाक्षरे
मराठी ही देवनागरी लिपीत लिहिली जाते. त्यामुळे देवनागरीची मुळाक्षरे हीच बहुसंख्य (पण सर्व नाही!) मराठी मुळाक्षरे होत. यात एकोणीस स्वर आणि छत्तीस व्यंजने आहेत. देवनागरी लिपीत नसलेली ॲ, ऑ, दीर्घ ॠ, दीर्घ ॡ, दंततालव्य च, छ, झ,आणि ऱ्य, ऱ्ह ही खास मराठी अक्षरे आहेत.
स्वर
अ आ इ ई उ ऊ ऋ ॠ ऌ ॡए ऐ ओ औ अं अः
ॲ ॲा
व्यंजने
क ख ग घ ङच छ ज झ ञट ठ ड ढ णत थ द ध नप फ ब भ मय र ल वश षस ह ळक्ष ज्ञ
विशेष - 'ङ' आणि 'ञ'चा उच्चार हा, 'ण' किंवा 'न' प्रमाणेच नासिक्य होतो.
'ङ' हा 'ड' नाही. तसेच 'ञ' हे 'त्र' नाही. उदाहरणार्थ- अङ्क=अंक, मञ्जूषा=मंजूषा.
अधिक माहितीसाठी पहा देवनागरी
मराठी मुळाक्षरांचे उच्चार
+Consonants LabialDentalAlveolarRetroflexAlveopalatalVelarGlottalVoicelessstops Voicedstops Voicelessfricatives Nasals Liquids
+Vowels FrontCentralBackHigh MidLow
संगणकावर मराठी
आधुनिक तंत्रज्ञान आणि मराठी लेखन
संगणकीकरणाच्या सुरुवातीच्या काळात मराठी लेखनासाठी विविध अडचणी होत्या -
प्रथमत: मराठी छपाई क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या विविध मराठी मुद्रांमध्ये एकमानकता (स्टॅंडर्डायझेशन) नसल्यामुळे सुसंगती (कंपॅटिबिलिटीही) नसते. टंकणयंत्रावरील मराठी लिपीसाठीचा कळफलक अजून प्रमणित होऊ शकलेला नाही. त्यामुळे एक माणूस अनेक टंक वापरू शकत नाही. यासाठी राज्य मराठी विकास संस्था प्रयत्नशील आहे.
मराठीचे टंक (फॉन्ट) हे व्यापारी तत्त्वावर निर्माण केले असल्याने ते महाग किंमतीला विकत घ्यावे लागतात. त्यामुळे त्यांचा वापर मर्यादित होतो व सर्वसामान्य जनतेला ते सहजासहजी मिळत नाहीत. सी डॅक या संस्थेने निर्माण केलेले टंक मोफत उपलब्ध आहेत. मात्र असे टंक मर्यादित संख्येत आहेत.
हे व्यापारी मराठी फॉन्ट विकताना ग्राहकाच्या गरजेनुसार त्याला टंकांमध्ये ANSI ते UNICODE (युनिकोड)असा पर्याय पुरवत नाहीत.
आंतरजालावर शोध घेण्यासाठी युनिकोडचा (इंग्रजी : UNICODE) वापर गुगलसारख्या शोध यंत्रामध्ये करता येतो. आपोआप डाउनलोड होणारे डायनामिक टंक युनिकोड कंपॅटिबल नसल्यामुळे शोध यंत्रात चालत नाहीत.
युनिकोड धर्तीचे टंक विंडोज २००० व त्या पुढील प्रणालींबरोबर मुळातच असतात. जुन्या विंडोज प्रणाली वापरणाऱ्यांना युनिकोड वापरणे जड जाते. परंतु लिनक्सवर आधारित संचालन प्रणालींत युनिकोडचा मूळ म्हणून वापर केल्यामुळे अशा संगणकांवर मराठी वापरताना कमी समस्या येतात.
हे टंक देवनागरी लिपीसाठी तयार केलेलेअसल्यामुळे ते हिंदी छपाईसाठी उत्तम चालतात. परंतु काही अक्षरे मराठीसाठी विशेष आहेत, ती सगळी टाईप करता येतील असे टंक कमी आहेत.
सध्या युनिकोडमुळे मराठी ही संगणकावर बरीच स्थिरस्थावर झालेली आहे आणि मराठी टंकलेखनाचे अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत.
काळानुसार आणि वापरलेल्या तंत्रज्ञानानुसार संगणकावरील टंकलेखनपद्धतीचे पूर्व-टंकनपद्धती आणि आधुनिक टंकनपद्धती असे दोन प्रकार करता येतील.
पूर्व टंकनपद्धती
युनिकोडच्या आधी ही टंकन पद्धती अस्तित्वात होती. यात इंग्रजी फॉन्टच्या ज़ागेवर मराठी फॉन्ट टाईप कर
'
'ता येत असत. (उदा. शिवाजी, कृतिदेव, किरण इत्यादी non-Unicode फॉन्ट आहेत.) तसेच पूर्वप्राथमिक अवस्थेत मराठी भाषेत टंकलेखनासाठी अनेक softwares बनविण्यात आली होती. (उदा. मराठी सोबत इतर भारतीय भाषांमध्ये टंकलेखनासाठी C-DACचे ISM-OFFICE, श्री-लिपी, इत्यादी)
आधुनिक टंकनपद्धती-१
आधुनिक टंकन पद्धतीत युनिकोड टंक व त्या विविध keyboard layout यांचा समावेश होतो.
युनिकोड टंकनपद्धती व software.
कगप :- कगप हा भाषाशास्त्रानुसार विकसित केलेला keyboard layout असून तो शब्द उच्चारणपद्धतीनुसार विकसित केलेला आहे. हा layout लिनक्स ऑपेरेटिंग सिस्टिम वर ....... उपलब्ध आहे. Windows साठी शुभानन गांगल याच़े
देवनागरी इनस्क्रिप्ट - ज्यांना पारंपरिक टंकन यंत्रावर टंकलेखनाचा सराव आहे, अशांसाठी देवनागरी इनस्क्रिप्ट हा पर्याय विंडोज़ आणि लिनक्स या परिचालन प्रणालींवर मिळतो.
बोलनागरी
Traditional :-
आधुनिक टंकन पद्धती-२
यामध्ये लिप्यंतर तंत्रज्ञानाचा वापर करून softwareच्या माध्यमातून मराठी टंकन करतात. ही पद्धती खासकरून कुठलेही प्रशिक्षण न घेता टंकन करणाऱ्या लोकांमध्ये प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. लिप्यंतरसाठी पुढील software लोकप्रिय आहेत.
Microsoft Indic Tool / मायक्रोसॉफ्ट इंडिक टूल : इंडिक टूल हे microsoft या कंपनीने विकसित केले आहे. हे Windows XP, Vista, Windows 7,8,8.1,10 आदी प्रणाल्यांवर चालते.
Google Input Tool / गूगल इनपुट टूल : गूगल इनपुट टूल हे गूगल या कंपनीने विकसित केलेले लिप्यंतर software आहे. हे Windows XP, Vista, Windows 7,8,8.1,10 बरोबरच गूगल क्रोम ब्राउजरच्या साहाय्याने कुठल्याही प्रणालींवर चालू शकते.
OCR तंत्रज्ञान
OCR तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठीतील स्कॅन केलेले दस्तऐवज, छायाचित्रांचे स्वयंचलित पद्धतीने टंकन करता येते.
टेसरॅक्ट ओसीआर हे software लिनक्स परिचालन प्रणालीवर उपलब्ध आहे.
मराठी आणि परिचालन प्रणाली
मराठी ही भाषा काही मोजक्या परिचालन प्रणालींमध्ये उपलब्ध आहे. त्यात सर्वात मोठा हिस्सा हा लिनक्स या परिचालन प्रणालीचा आहे. याव्यतीरिक्त मायक्रोसॉफ्ट विंडोज् आणि ॲपल मॅकओएस या परिचालन प्रणालींमधेही मराठी भाषा कमी-अधिक प्रमाणात उपलब्ध आहे.
युनिकोड तक्ता
हा तक्ता देवनागरी लिपीसाठी आहे, यातील काही अक्षरे मराठीत वापरली जात नाहीत आणि मराठीतील काही अक्षरे या तक्त्यात नाहीत.
मराठीत वापरली जाणारी पण युनिकोड तक्त्यात नसणारी अक्षरे
ॲ
च़ छ़ झ़ ञ़ शेंडीफोड्या श आणि मराठी ल आणि ख
ऱ्य
ऱ्ह
पाऊण य
युनिकोड तक्त्यात असलेली पण मराठीत न वापरली जाणारी अक्षरे
ऄ (हे अक्षर तक्त्यात २४ वेळा आले आहे, त्यांतले एकही मराठीत नाही)
ऍ
ऐ
ओ
े
ो
क़ (हे अक्षर तक्त्यात दोनदा आले आहे; दोन्ही अक्षरे मराठीत नाहीत.)
ख़
ग़
ड़
ढ़
ङ (हे अक्षर तक्त्यात दोनदा आले आहे, दोघांपैकी एक मराठीत आहे)
न
य़
ऱ
ळ
मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासाकरिता कार्यरत संस्था आणि त्यांचे योगदान
भाषा सल्लागार मंडळ : हे बंद पडले आहे.
भाषा संचालनालय
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ : हे बंद पडले आहे.
भाषा सल्लागार समिती
विधी अनुवाद व परिभाषा सल्लागार समिती (केवळ अस्तित्वमात्र शिल्लक आहे).
राज्य विकास मराठी संस्था (१९९२) : (केवळ पुस्तक प्रकाशने आणि ग्रंथप्रदर्शने आयोजित करण्याचे काम करीत राहिल्याने या संस्था-स्थापनेचा मूळ हेतू बारगळला आहे).
मराठी भाषा अभ्यास परिषद
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
विदर्भ साहित्य संघ : ही बिनसरकारी संस्था आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद : ही बिनसरकारी संस्था .
मराठवाडा साहित्य परिषद : ही बिनसरकारी संस्था आहे.
कोकण मराठी साहित्य परिषद : ही बिनसरकारी संस्था आहे.
बालकुमार साहित्य्य मंच, सोलापूर ही बिनसरकारी
संस्था आहे.
अभिजात मराठी भाषा परिषद : ही बिनसकारी संस्थ आहे.
हेसुद्धा पहा
शुद्धलेखनाचे नियम
देवनागरी
मोडी
युनिकोड
संगणक आणि मराठी
महाराष्ट्र
मराठीच्या संवर्धनाबद्दलची आवाहने
मराठी साहित्य संमेलने
अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण
मराठी-मराठी शब्दकोशांची सूची
शब्दकोशांची सूची
अभिजात मराठी भाषा परिषद
मराठी संकेतस्थळे
विकिपीडिया हे जाहिरात करण्याचे स्थळ नसल्यामुळे, कृपया संकेतस्थळांचे दुवे मुख्य लेख - मराठी संकेतस्थळे''
या लेखातच द्यावेत. या विभागात मराठी संकेतस्थळे हा लेख पूर्ण झाल्यानंतर दुवाविरहित परिच्छेद अतंर्भूत केला जाईल या दृष्टीने ह्या विभागात रस असलेल्यांनी मराठी संकेतस्थळे हा लेख परिपूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे ही विनंती.
संदर्भ आणि नोंदी
बाह्य दुवे
वर्ग:भारतामधील भाषा
वर्ग:महाराष्ट्र
वर्ग:भाषा
वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा |
विकीपीडिया | https://mr.wikipedia.org/wiki/विकीपीडिया | पुर्ननिर्देशन विकिपीडिया |
विकिपिडीया | https://mr.wikipedia.org/wiki/विकिपिडीया | पुर्ननिर्देशन विकिपीडिया |
ज्ञानकोश | https://mr.wikipedia.org/wiki/ज्ञानकोश | |
महाराष्ट्र | https://mr.wikipedia.org/wiki/महाराष्ट्र | महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी.ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. मध्ययुगीन महाराष्ट्र सातवाहन राजवंश राष्ट्रकूट राजवंश, पश्चिम चालुक्य, मुघल आणि मराठ्यांच्या साम्राज्याचा समावेश आहे. विस्तार १, १८, ८०९ चौरस मैल (३,०७, ७१३ चौरस किमी) असून, तो पश्चिम आणि कर्नाटक, तेलंगणा, गोवा, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि दादरा आणि नगर हवेली भारतीय राज्यांना अरबी समुद्र लागून आहे. महाराष्ट्राला जगद्गुरू संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा संत मुक्ताई यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास "संतांची भूमी" असेदेखील म्हटले जाते.पंढरपुर हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे.मुंबई भारतातील टॉप शहर असून येथूनच अभिनेते, राजकारणी आणि क्रिकेट खेळाडू तयार होतात. जगात महाराष्ट्राचे नाव गाजविणारे सचिन तेंडुलकर हे क्रिकेट खेळाडू महाराष्ट्रातले आहेत. मुघल साम्राज्याविरुद्ध लढा देऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज याच राज्यातील आहेत.या राज्याला खुप मोठा इतिहास आहे.महाराष्ट्रात शेतकरी वर्ग खुप आहे.
नावाचा उगम
महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महाराष्ट्र" या नावाने ओळखले जाऊ लागले असे चिनी प्रवाशी ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे.तर काहींच्या मते महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र होय. .काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ मर " व रट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ चक्रधर स्वामी यांनी "महन्त् म्हणूनी महाराष्ट्र बोलिजे' अशी व्याख्या केली आहे.
इतिहास या विषयाचा विस्तृत लेख पहा - महाराष्ट्राचा इतिहास
200px|thumb|left|अजिंठ्यातील लेणी
महाराष्ट्रातील विविध स्थळांचा - नदी, पर्वत, स्थळ इ.- रामायण महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. उपलब्ध ऐतिहासिक साधनातून इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून महाराष्ट्राबद्दल माहिती मिळते.
महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा राजकीय कालखंडानुसार इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मुघल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्लिश लोक, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडांत व्यापले होते.
मध्ययुगीन इतिहास व इस्लामी राज्य
महाराष्ट्री भाषेच्या वापराच्या संदर्भात महाराष्ट्राचा इतिहास तिसऱ्या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. त्या काळात हा 'दंडकारण्याचा' भाग होता. मगध, चालुक्य, वाकाटक, राष्ट्रकुट यांचे राज्य महाराष्ट्रावर वेगवेगळ्या मध्ययुगीन कालखंडात होते, परंतु सातवाहन राजा शालिवाहन आणि देवगिरीचे यादव यांच्या कालखंडात मराठी भाषा-संस्कृतीचा विकास झाला. मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी इ.स.पू २३०- २२५ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री प्राकृत भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रूपांतरीत झाली) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स. ७८ मध्ये महाराष्ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र सातकर्णी किंवा शातकारणी (शालिवाहन) हा होता. त्याने सुरू केलेले शालिवाहन शक पंचांग आजही रूढ आहे.
त्यानंतर देवगिरीच्या यादवांनी महाराष्ट्रावर राज्य प्रस्थापित केले. १३व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला जेव्हा दिल्लीचे अल्लाउद्दीन खिलजी व नंतर मुहम्मद बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले. इ.स. १३४७ मध्ये तुघलकांच्या पडावानंतर विजापूरच्या बहामनी सुलतानांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले.
मराठे व पेशवे
right|thumb|255px|छत्रपती शिवाजी महाराज
१७व्या शतकाच्या सुरुवातीस (पश्चिम महाराष्ट्रातील) मराठा-साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी आपले स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे सुरू केले. इ.स. १६७४ साली राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांच्या राज्याची 'अधिकृत' सुरुवात झाली.
शिवाजीराजांचे पुत्र संभाजी राजे भोसल्यांना मोगल बादशहा औरंगझेब यांनी पकडले व त्यांची हत्या घडवून आणली. पुढील चार दशकात मराठा साम्राज्याची सूत्रे छ्त्रपतींचे प्रतिनिधी म्हणजेच पेशव्यांच्या हातात गेली. भोसले हे केवळ नाममात्र राज्यकर्ते राहिले. मोगलांना हरवून पेशवे भारताचे नवे राज्यकर्ते म्हणून उदयास आले. बाळाजी विश्वनाथ पेशवे व त्यांचे पुत्र बाजीराव पहिले यांनी मराठा राज्य वाढवले व सध्याच्या भारताच्याही सीमेपार आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
इ.स. १७६१ साली पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली व महाराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतले.
ब्रिटिश राज्य व स्वातंत्र्योत्तर काळ
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान बसवल्यावर मराठे व ब्रिटिश यांच्यात इ.स. १७७७-१८१८च्या दरम्यान तीन युद्धे झाली. इ.स.१८१९ मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांना पदच्युत करून मराठ्यांचे राज्य काबीज केले.
महाराष्ट्र ब्रिटिशांच्या बॉम्बे राज्याचा एक भाग होता. बॉम्बे राज्यात (मुंबई प्रेसिडेन्सीमध्ये) कराची ते उत्तर दख्खन भाग समाविष्ट होते. अनेक राज्यकर्ते ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपापले राज्य सांभाळीत होते. मराठवाडा निजामाच्या प्रभुत्वाखाली राहिला. ब्रिटिशांनी सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोयी-सुविधा आणल्या. परंतु त्यांच्या पक्षपाती निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणीवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारला जो पुढे महात्मा गांधी यांनी चालवला. मुंबई हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्त्वाचे केंद्र होते.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती
130px|thumb|left|हुतात्मा स्मारक,मुंबईया विषयावरील विस्तृत लेख पहा - संयुक्त महाराष्ट्र चळवळ
ऑगस्ट १५, इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना प्रक्रियेत भाषावार प्रांतरचनेच्या विचाराचे वर्चस्व होते. तरीही भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पावित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली.
अखेर १ मे, १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरू आहेत.
भौगोलिक स्थान
thumb|left|200px|महाराष्ट्रातील पर्वत
thumb|right|200px|कोकण
महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेलाआहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी (homogeneous) आहे व खूप मोठे क्षेत्र (महाराष्ट्र देश) पठारी आहे. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. दख्खनचा पठारी प्रदेश विविध नद्यांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस व अरबी समुद्राला समांतर अशा सह्याद्री पर्वतरांगा (किंवा पश्चिम घाट) आहेत ज्यांची उंची सुमारे २१३४ मी. (अंदाजे ७,००० फूट) आहे.
या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात. अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास कोकण म्हणतात. कोकण भागाची रुंदी ५०-८० कि.मी आहे. राज्याच्या उत्तरेस सातपुडा तर पूर्वेस भामरागड-चिरोळी-गायखुरी पर्वतरांगा आहेत. राज्यात मौसमी पाऊस पडतो. महाराष्ट्रातील काळी बेसाल्ट मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे.
प्रशासन
200px|thumb|left|मंत्रालयःमहाराष्ट्र राज्य
भारतातील इतर राज्यांप्रमाणेच, राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो. राष्ट्रपती केंद्र सरकारच्या सल्ल्याने राज्यपालांची नेमणूक करतात. राज्यपाल हे पद केवळ नाममात्र असते. राज्याचे शासन मुख्यमंत्री, चालवतात. या व्यक्तीकडे शासनाचे सर्वाधिक अधिकार असतात. महाराष्ट्र विधानसभा व मंत्रालय राजधानी मुंबई येथे आहे. मंत्रालयात राज्य सरकारची प्रशासकीय कार्यालये आहेत. मुंबई उच्च न्यायालय याच शहरात आहे. राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे तर हिवाळी अधिवेशन नागपूर (महाराष्ट्राची उपराजधानी) येथे होते.
महाराष्ट्रात दोन विधान-सदने (bicamel) आहेत. विधान सभेत लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात तर विधान परिषदेत अप्रत्यक्षरीत्या निवडलेले प्रतिनिधी असतात. महाराष्ट्राचे संसदेत ६७ प्रतिनिधी असतात, पैकी राज्यसभेत १९ प्रतिनिधी तर लोकसभेत ४८ प्रतिनिधी असतात.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील राज्य मुख्यत: कॉॅंग्रेस पक्षाकडे आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार या काही महत्त्वाच्या काँग्रेस नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले आहे. १९९५ साली शिवसेना-भाजपा युती सत्तेवर आली. कॉॅंग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी कॉॅंग्रेस हा नवा पक्ष स्थापन केला.१९९९ नंतर १५ वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता राहिली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात भाजपा शिवसेना युतीची सत्ता प्रस्थापित झाली आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री बनले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले.
विभाग
right|thumb|400px|महाराष्ट्र राज्याचे विभागया विषयाचा विस्तृत लेख महाराष्ट्रातील जिल्हे
महाराष्ट्र राज्य ३६ जिल्ह्यांत विभागले गेले आहे. या जिल्ह्यांचे ६ समूह अथवा महसुली विभाग आहेत- पुणे , नाशिक , छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) , कोकण , नागपूर व अमरावती . हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत राजस्व विभाग आहेत.
भौगोलिक, ऐतिहासिक व राजकीय-मतांनुसार महाराष्ट्रात पाच मुख्य विभाग आहेत: देश पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे विभाग), उत्तर महाराष्ट्र विभाग (नाशिक विभाग), मराठवाडा (औरंगाबाद विभाग), विदर्भ किंवा बेरार (नागपूर आणि अमरावती विभाग) , आणि कोकण (कोकण विभाग).
२०१४ साली ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मीती करण्यात आली, त्यामुळे एकूण जिल्ह्यांची संख्या वाढून ३६ एवढी झालेली आहे.
हेसुद्धा पहा
महाराष्ट्रातील तालुके
अर्थव्यवस्था
right|thumb|150px|मुंबई शेअर बाजार
राज्याचे वार्षिक उत्पन्न पुढील तक्त्यात दिले आहे. स्रोत सांख्यिकी मंत्रालय, भारत सरकार (आकडे- कोटी रु.)
वर्ष वार्षिक उत्पन्न १९८० १६,६३१ १९८५ २९,६१६ १९९० ६४,४३३ १९९५ १,५७,८१८ २००० २,३८,६७२
सन १९७०नंतरच्या दशकातील योग्य आर्थिक धोरणांमुळे महाराष्ट्र राज्य भारताच्या अग्रगण्य औद्योगिक राज्य बनले. आर्थिक क्षेत्रात पहिला क्रमांक मिळविण्याच्या प्रयत्न करणाऱ्या आणि प्रगतिशील, पुरोगामी अशा राज्यांपैकी ते एक आहे. परंतु महाराष्ट्रात विकास सारख्या प्रमाणात होऊ शकला नाही. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला पण विदर्भ, मराठवाडा व कोकण हे भाग मागास राहिले. महाराष्ट्रातील राजकारणात व नोकरशाहीतही पश्चिम महाराष्ट्राचा अधिक प्रभाव आहे.
राज्याचे २००४ सालचे वार्षिक उत्पन्न (gross state domestic product) १०६ अब्ज अमेरिकन डॉलर इतके आहे. महाराष्ट्र भारताच्या दुसरे सर्वांत जास्त शहरीकरण झालेले राज्य आहे.
एकूण राष्ट्रीय औद्योगिक उत्पन्नापैकी १३% महाराष्ट्राचे योगदान आहे. ६४.१४% लोक कृषी व संबंधित उद्योगात रोजगार मिळवतात. एकूण वार्षिक उत्पन्नापैकी (GSDP) ४६% हिस्सा हा कृषी व संबंधित उद्योगातून मिळतो.
महाराष्ट्रातील प्रमुख उद्योगधंदे - रासायनिक आणि संबंधित उत्पादने, विद्युत आणि साधी यंत्रे, कापड, पेट्रोलियम आणि तत्सम उद्योग हे आहेत.
इतर महत्त्वाचे उद्योगधंदे - धातू उत्पादने, वाईन (द्राक्षापासून तयार केले जाणारे मद्य), दागिने, औषधे, अभियांत्रिकी सामान, यांत्रिक सामान, पोलाद व लोह उद्योग, प्लास्टिक वायर्स.
महत्त्वाची पिके- आंबा, द्राक्षे, केळी, संत्री, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि कडधान्ये.
महत्त्वाची नगदी पिके - शेंगदाणे, कापूस, ऊस, हळकुंड व तंबाखू. माहाराष्ट्रातील सिंचनाखालील जमीन ३३,५०० किमी२ इतकी आहे.
मुंबई, महाराष्ट्राची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. जवळजवळ सर्व प्रमुख बँका, आर्थिक संस्था, विमा संस्था व गुंतवणूक संस्थांची मुख्य कार्यालये येथे आहेत. भारताच्या चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रमांचे पहिल्या क्रमांकाचे निर्मिती केंद्र मुंबई आहे. मुंबई शेअर बाजार (भारताच्या सर्वांत मोठा व आशियातील सर्वांत जुना) ही महत्त्वाची संस्था मुंबईत आहे. महाराष्ट्र सरकारने सॉफ्टवेर पार्क्स पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, आणि औरंगाबाद येथे स्थापन केली आहेत.
कोळसानिर्मित व अणुनिर्मित वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. जट्रोफा लागवडीसाठी महाराष्ट्राने नवा प्रयोग सुरू केला आहे. ४१% पेक्षा जास्त S&P CNX 500 कंपन्यांची महाराष्ट्रात कार्यालये आहेत.
लोकजीवन
महाराष्ट्राच्या रहिवाशांना महाराष्ट्रीय अथवा मराठी माणूस असे संबोधतात. २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२ आहे. महाराष्ट्र लोकसंख्येनुसार भारताच्या दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. मराठी बोलणाऱ्यांची संख्या ६२,४८१,६८१ आहे. महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे केवळ ११ देश आहेत. लोकसंख्येची घनता ३७० कि.मी.२ (किमी२) इतकी आहे. लोकसंख्येपैकी ५.८३ कोटी पुरुष व ५.४० कोटी स्त्रिया आहेत. महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी ४२.४% आहे. लिंग-गुणोत्तर (sex-ratio) १,००० पुरुषांमागे ९४६ महिला इतका आहे. ८२.९% लोकसंख्या साक्षर आहे. साक्षरता-वाढीचा दर १९९१-२००१ला २२.५७% होता.
मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी प्रामुख्याने बोलली जाते. इंग्रजी सुद्धा शहरी भागात काही प्रमाणात बोलली जाते. वायव्य महाराष्ट्रात अहिराणी बोलीभाषा तर दक्षिण कोकणात कोळी, कोंकणी, मालवणी व विदर्भात वऱ्हाडी आणि झाडीबोली या बोलीभाषा अस्तित्वात आहेत.
राज्यात ८०% हिंदू, ६% बौद्ध, १२% मुस्लिम, १% जैन व १% ख्रिश्चन धर्मीय लोक आहेत. काही प्रमाणार शीख, ज्यू व पारशी धर्मीय देखील आहेत.
लोकसंख्येचे घनता
सन २०११ च्या जनगणनेनुसार,महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता ३६५ प्रति चौरस किमी इतकी झाली आहे. सन २००१ मध्ये ती ३१५ इतकी होती. इंग्लिश मजकूर
संस्कृती
thumb|200px|जेजुरी देवस्थान, पुणे जिल्हा
महाराष्ट्रातील काही मंदिरे अनेक शतके जुनी आहेत. मंदिरांच्या शिल्पशैलीत उत्तर व दक्षिण भारताचा मिलाप आढळतो. मंदिरांवर हिंदू, बौद्ध व जैन संस्कृतींचा ठसा आहे. औरंगाबादजवळील अजिंठा व वेरुळची लेणी जगप्रसिद्ध आहेत. मोगल शिल्पशैलीची झलक औरंगाबाद येथीलच बीबी का मकबरा येथे पहायला मिळते. महाराष्ट्रात अनेक दुर्ग व किल्ले आहेत. रायगड, प्रतापगड व सिंधुदुर्ग ही काही उदाहरणे. महाराष्ट्राचे लोकसंगीत समृद्ध आहे. गोंधळ, लावणी, भारुड अभंग आणि पोवाडा हे प्रकार विशेष लोकप्रिय आहेत. मराठी साहित्य भारताच्या अग्रगण्य असे असून ज्ञानेश्वर (भावार्थदीपिका अर्थात 'ज्ञानेश्वरी'चे रचयिते), संत एकनाथ, संत तुकाराम, पु.ल. देशपांडे, प्र.के.अत्रे, व्यंकटेश माडगूळकर हे काही प्रमुख लेखक व कवी आहेत. प्रत्येक वर्षी अनेक मराठी पुस्तके प्रकाशित होत असतात. मराठी नाटक, चित्रपट व दूरचित्रवाणीचे केंद्र मुंबई येथे आहे आणि बहुतेक कलाकार सर्व माध्यमातून कामे करतात. मराठी चित्रपटसृष्टीतील काही प्रसिद्ध व्यक्ति - पु.ल.देशपांडे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे आणि व्ही. शांताराम. मराठी नाटकांचा जुना काळ हा कोल्हटकर, खाडिलकर, देवल, गडकरी व किर्लोस्कर आदी लेखकांनी गाजवला. तो काळ संगीत नाटके आणि नाट्यसंगीताचा होता. याच काळात बालगंधर्व, केशवराव भोसले, भाऊराव कोल्हटकर व दीनानाथ मंगेशकर या गायक-कलावंतानी रंगभूमीची सेवा केली.
thumb|left|200px|त्र्यंबकेश्वर, नाशिक
मराठी दूरचित्रवाणी वाहिन्या पुढीलप्रमाणे - दूरदर्शन-सह्याद्री, ABP माझा, कलर मराठी, झी मराठी, स्टार माझा, मी मराठी, झी टॉकीज, झी २४ तास, आयबीएन-लोकमत आणि साम मराठी. मागील काही वर्षांपासून मराठी वाहिन्यांनी लोकप्रियता मिळवली असून बहुतेक वाहिन्या २४ तास सुरू असतात. परदेशस्थ मराठी माणसेदेखील यांचा आस्वाद घेतात.
महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती भागानुसार बदलते. कोकणात भात व मासे लोकप्रिय आहेत तर पूर्व महाराष्ट्रात गहू, ज्वारी आणि बाजरी जास्त खाल्ली जाते. सर्व प्रकारच्या डाळी, कांदे, बटाटे, टॉमेटो, मिरची, लसूण व आले हे पदार्थ मराठी जेवणात सर्रास वापरले जातात. सामिष अन्न अनेक जणांना आवडते.
thumb|right|150px|गणेशोत्सव
मराठी स्त्रियांचा पारंपरिक वेष नऊवारी साडी तर पुरुषांचा धोतर/पायजमा आणि सदरा असा आहे. परंतु शहरी भागात आधुनिक पेहराव केले जातात.
त्याचबरोबर महाराष्ट्रातील खास महाराष्ट्राच्या राजधानीतील मुंबईमधील एक महत्त्वाची जात म्हणजे " कोळी ". ह्या मुंबईला संपूर्ण समुद्र किनारा लाभल्याने येथील समुद्र किनाऱ्यावर आद्य अवलंबून असणारा कोळी समाज हा मूळ मुंबईचाच आहे, असे म्हणण्यात काहीही वावगे ठरणार नाही. मुळात मुंबई हे बेटच सात भूभागांनी एकत्र बनण्यात आले आहे. ते म्हणजे कुलाबा, जुने स्त्रीचे बेट ( लहान कुलाबा ), माहीम, माझगाव, परळ, वरळी आणि मलबार हिल ह्या कोळीवाड्यांमुळे बनली आहे. ह्या कोळी लोकांत फार जातीचे लोक असून त्यांच्यात स्त्रिया लुगडे (चोळी-पातळ-फडकी) आणि पुरुष रुमाल आणि कान टोपेरा आणि शर्ट असे असते. कोळी नृत्य हे महाराष्ट्रातील लावणी नृत्यानंतर प्रसिद्ध आहे.
भारताच्या इतर प्रांतांप्रमाणेच क्रिकेट हा खेळ येथेही लोकप्रिय आहे. कबड्डीसुद्धा खेळली जाते. लहान मुलांत विटी-दांडू, पकडा-पकडी हे खेळ लोकप्रिय आहेत.
दिवाळी, रंगपंचमी, गोकुळाष्टमी व गणेशोत्सव, होळी हे महाराष्ट्राचे मुख्य उत्सव आहेत. यांपैकी गणेशोत्सव सर्वांत मोठा व लोकप्रिय सण आहे जो आता देशभर साजरा केला जातो. दहा दिवस साजरा होणारा हा सण बुद्धी व विद्येचे दैवत असणाऱ्या गणपतीचा आहे. त्याचबरोबर शिव-जयंती, वटपौर्णिमा, मकरसंक्रांती, दसरा इ. सण देखील साजरे केले जातात.
स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक सुधारणा व चळवळ व स्त्री शिक्षणाची चळवळ महाराष्ट्रातूनच सुरू झाली. ह्यात महात्मा जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, धोंडो केशव कर्वे हे अग्रणी होते.
thumb|right|150px|महात्मा जोतिबा फुले
हवामान
राज्याचा सर्व भाग मान्सून प्रकारच्या हवामानाच्या पट्ट्यात मोडतो. मार्चपासून सुरू असणारा उन्हाळा मे महिन्यात संपतो. जूनच्या आरंभापासून मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. पावसाळ्यात जमिनीवर पसरलेली हिरवळ त्यानंतर येणाऱ्या सौम्य हिवाळ्यात देखील टिकून राहते. मात्र एकदा का उन्हाळा सुरू झाला की हिरवळ वाळून जाते व सर्वत्र रूक्षपणा पसरतो. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पडणारा मोसमी पाऊस जोराचा असतो आणि घाटमाध्यावर त्याचे प्रमाण ४०० सें.मी. वर जाऊन पोहोचते. सह्यादीच्या पश्चिमेकडील, वाऱ्यांच्या दिशेत येणाऱ्या, कोकण भागात मुसळधार पाऊस पडतो. मात्र उत्तरेकडे त्याचे प्रमाण कमी होत जाते. सह्याद्रीच्या पूर्वेकडे पर्जन्यछायेच्या प्रदेश असून मावळ भागातून हळूहळू पूर्वेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी होते व दख्खनचे पठाराच्या (Deccan Plateau) पश्चिम भागात ते ७० से.मी. इतके खाली येते. सोलापूर व अहमदनगर हे जिल्हे कोरड्या भागाच्या मर्मस्थानीच आहेत. मोसमी ऋतूच्या उत्तरकाळात पूर्वेकडील मराठवाडा आणि विदर्भ या भागात पावसाचे प्रमाण थोडेसे वाढते. मराठवाड्यात थोडासा वळवाचा पाऊस पडतो तर विदर्भात बंगालच्या उपसागरावरून येणारी मोसमी वाऱ्यांची शाखादेखील थोडासा पाऊस देते.
वाहतूक व्यवस्था
thumb|200px|मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग
भारतीय रेल्वेचे जाळे राज्यभर आहे व लांबच्या प्रवासाकरीता रेल्वे हे सोयीचे साधन आहे. महाराष्ट्राच्या बहुतेक भागांना मध्य रेल्वे सेवा पुरवते. कोकण भागात कोकण रेल्वे तर इतर काही भागांना पश्चिम रेल्वे सेवा देते. सध्या मुंबई शहरात मोनोरेल व पुणे शहरात मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची (एस.टी) सेवा बहुतेक शहरे व खेड्यांत उपलब्ध असते. एस.टी.चे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे. विशेषतः ग्रामीण विभागात या बसेस लोकप्रिय आहेत. अनेक शहरात एस.टी. बरोबरच खाजगी बससेवाही असतात.
महाराष्ट्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई असे एकूण पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. नागपूर व पुणे विमानतळांवर देशांतर्गत तसेच काही आंतरराष्ट्रीय उड्डाणेदेखील होतात. छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, कोल्हापूर व सोलापूर येथेही राष्ट्रीय विमानतळ आहेत. मुंबईतल्या बंदरांपासून कोकण किनारपट्टीवरील इतर बंदरात फेरी-सेवा (समुद्रावरून वाहतूक) होत असते. शहरी भागात ३ आसनी रिक्षा तर उपनगरात सहाआसनी रिक्षा लोकप्रिय आहेत. महाराष्ट्रात महामार्गांचे मोठे जाळे आहे. मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग हा भारताच्या सर्वांत पहिला टोलमार्ग आहे. मुंबई–नागपूर दरम्यानच्या या प्रतीच्या मार्गाचे काम सुरू आहे. मुंबई व न्हावा-शेवा ही महाराष्ट्रातील मोठी बंदरे आहेत.
मुख्य शहरे
मुंबई - मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारताच्या सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. मुंबईत व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने भारताच्या विविध भागांतून लोक रोजगारासाठी येथे मोठ्या संख्येने येतात.
पुणे - शिवाजीपूर्वकाळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाते. शिक्षण आणि संशोधनसंस्था येथे मोठ्या संख्येने आहेत. पुणे शहर परिसरात आधुनिक उद्योगव्यवसाय मोठ्या संख्येने उभे राहिले आहेत. विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताच्या आघाडीचे शहर असा लौकिक पुण्याने मिळवला आहे.
नागपूर – विदर्भ विभागातील सर्वांत मोठे शहर असलेले नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येथे भरते.
छत्रपती संभाजीनगर - महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असा लौकिक असलेल्या या शहरात आणि परिसरात अनेक जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ येथे आहे. वाहनांचे सुटे भाग आणि पेयनिर्मितीच्या कारखान्यांची संख्या छ्त्रपती संभाजीनगर परिसरात मोठी आहे. मराठवाडा विभागाचे मुख्यालय छ्त्रपती संभाजीनगर येथे आहे.
नाशिक - हे उत्तर महाराष्ट्रातील ऐतिहासिक व औद्योगिक शहर आहे. दर १२ वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. या मुहूर्तावर गोदावरी नदीत स्नान करणे पवित्र मानले जाते. त्यासाठी हिंदू साधू आणि भाविक मोठ्या संख्येने येथे येतात.
कोल्हापूर- शिवाजीच्या काळापासून व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हे शहर अंबाबाईच्या महालक्ष्मी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. त्याच बरोबर येथे शिवाजी विद्यापीठ आहे.
सोलापूर- महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील एक प्रमुख शहर. एके काळी कापड गिरण्यांसाठी प्रसिद्ध होते. येथील सिद्धेश्वराचे मंदिरही प्रसिद्ध.
अमरावती- एक प्रमुख शहर. एके काळी कापूस उत्पादनात प्रसिद्ध होते. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे गांव. आधुनिक संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जिल्हा म्हणुन ओळख.
सातारा- मराठी साम्राजाची राजधानी म्हणून प्रसिद्ध असणारे शहर. या शहरात इतिहासाच्या पाऊलखुणा प्रखरतेने जानवतात. शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळख.
नांदेड- नांदेड हे गोदावरी नदीच्या खोऱ्यात आहे. येथे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागाचे उप मुख्यालय आहे. येथेच शीख धर्मीयांचे दहावे गुरू श्री गोविंदसिंग यांची समाधी (गुरुद्वारा) आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ येथेच आहे.
पर्यटन
right|thumb|वेरूळची लेणी
महाराष्ट्र हा भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, आर्थिक अश्या सर्व दृष्टीने संपन्न आहे. प्रवासासाठी चांगले लोहमार्ग, पक्के रस्ते, चांगली आणि स्वस्त उपाहारगृहे, धर्मशाळा यांची येथे रेलचेल आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाने महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले असून डेक्कन ओडिसी'' नावाची विशेष रेल्वे गाडी सुरू केली आहे. लेणी, मुंबई, थंड हवेची ठिकाणे, किल्ले व इतर ऐतिहासिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक दिसून येतात.
धार्मिक
त्र्यंबकेश्वर, तुळजापूरची भवानी, शनी शिंगणापूर, ज्योतिबा मंदिर, अष्टविनायक गणपती मंदिरे, पंढरपूर येथील भगवान पांडुरंग मंदिर या मंदिरांमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने हिंदू भाविक येतात.पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील खंडोबाचे देवाचे खंडोबा मंदिर संपूर्ण महाराष्ट्रातील यात्रेकरूंना आकर्षित करतात जेथे उपासक एकमेकांना भांडार (हळद पावडर) ची वर्षाव करतात. पंढरपूर, देहू आणि आळंदी यांसारखी वारकरी संप्रदायाशी संबंधित ठिकाणे वर्षभर लोकप्रिय राहतात आणि धार्मिक निरीक्षणादरम्यान राज्यभरातून मोठ्या संख्येने लोक येतात.
महाराष्ट्रावरील ग्रंथसाहित्य
महाराष्ट्राच्या इतिहास-भूगोलावर आणि संस्कृतीवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यांतली काही अशी:-
आधुनिक महाराष्ट्राचे राजकारण - लेखक वसंत सिरसीकर
मराठ्यांचा युद्धेतिहास - ब्रिगेडियर का.गं. पित्रे
महाराष्ट्र - लेखक प्रा. वि.पां. दांडेकर
महाराष्ट्र - एका संकल्पनेचा मागोवा - लेखक माधव दातार
महाराष्ट्र दर्शन (संपादक - सुहास कुलकर्णी)
महाराष्ट्र संस्कृती - लेखक पु.ग. सहस्रबुद्धे
महाराष्ट्र संस्कृती - प्रा. शेणोलीकर आणि प्रा. देशपांडे
महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास - लेखक प्रा. द.बा. डिकसळकर
महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास - लेखक डॉ. शं.दा. पेंडसे
महाराष्ट्रातील दुर्ग - लेखक निनाद बेडेकर
हे सुद्धा पहा
महाराष्ट्राचे विशेष दिवस
मराठी लोक
महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी
संदर्भ
बाह्य दुवे
इंटरॅक्टीव्ह महाराष्ट्र नकाशा खेळ
महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ
महाराष्ट्र राज्य पर्यटन मंडळ
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ
वर्ग:भारतीय राज्ये |
End of preview. Expand
in Dataset Viewer.
README.md exists but content is empty.
- Downloads last month
- 30