title
stringlengths
1
93
url
stringlengths
31
123
text
stringlengths
0
257k
जागा भाड्याने देणे आहे
https://mr.wikipedia.org/wiki/जागा_भाड्याने_देणे_आहे
वर्ग:अत्यंत छोटी पाने वर्ग:इ.स. १९४९ मधील मराठी चित्रपट
मानाचे पान (चित्रपट)
https://mr.wikipedia.org/wiki/मानाचे_पान_(चित्रपट)
पार्श्वभूमी कथानक उल्लेखनीय बाह्य दुवे वर्ग:इ.स. १९४९ मधील मराठी चित्रपट वर्ग:रिकामी पाने
मोठी माणसे (चित्रपट)
https://mr.wikipedia.org/wiki/मोठी_माणसे_(चित्रपट)
पार्श्वभूमी कथानक उल्लेखनीय बाह्य दुवे वर्ग:रिकामी पाने
कश्‍मीर
https://mr.wikipedia.org/wiki/कश्‍मीर
पुनर्निर्देशन काश्‍मीर
महात्मा बसवेश्वर
https://mr.wikipedia.org/wiki/महात्मा_बसवेश्वर
पुनर्निर्देशन बसवेश्वर
राजा राममोहन रॉय
https://mr.wikipedia.org/wiki/राजा_राममोहन_रॉय
राजा राममोहन रॉय (जन्म : हुगळी-कलकत्ता, २२ मे १७७२) हे एक भारतीय समाजसुधारक होते. त्या काळात प्रशासनासाठी वापरली जाणारी भाषा पर्शियन व अरेबिक होती. त्यामुळे या भाषा शिकण्यासाठी वडिलांनी त्यांना पाटणा येथे पाठविले. अरबी आणि फारसी भाषांबरोबरच त्यांनी इस्लाम धर्म आणि सुफी पंथ, शायर आणि शायरी यांचादेखील अभ्यास केला. हाफीज आणि सादी हे त्यांचे आवडते शायर होते. पाटण्याचे शिक्षण पूर्ण केल्यावर वयाच्या बाराव्या वर्षी जिच्या माहेरची मंडळी प्रामुख्यान पौरोहित्य करणारी होती, त्या आपल्या आईच्या आग्रहामुळे, हिंदु धर्माचे शिक्षण घेण्यासाठी म्हणून राममोहन राॅय यांना काशीला पाठवण्यात आले. तिथे त्यांनी संस्कृत भाषेबरोबरच वेद, वेदान्त, उपनिषदे अशा गोष्टींचा अभ्यास केला. सोळाव्या वर्षापर्यंत त्यांनी बनारसमधे वास्तव्य केले. त्यानंतर ते बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी बनारसला व नंतर तिबेटमध्ये गेले. पर्शियन लिपीत व अरेबिक भाषेत त्यांनी 'वेदान्त' ग्रंथ नावाचे पहिले पुस्तक लिहिले. १८१५ मध्ये कलकत्ता येथे परतल्यावर त्यांनी 'वेदान्त' ग्रंथाचे बंगाली भाषेत भाषांतर केले. घरी परतल्यावर त्यांनी तुहफतूल मुवाहीद्दीन (एकेश्ववरवाद्यांना भेट) नावाचा अरबीत प्रस्तावना असणारा एक लेख फारसीमधे लिहिला. त्यामधे त्यांनी मूर्तिपूजेवर कडाडून टीका केली होती. त्यांच्या मते मूर्तिपूजा ही वेदांच्या शिकवणुकीच्या विरुद्ध होती. त्या लेखामुळे वडिलांशी त्यांचे पटेनासे झाले आणि ते घर सोडून निघून गेले. मुगल सम्राट दुसरा अकबर याने राममोहन राॅय यांना राजा ही उपाधी बहाल केली. मुगल सम्राटचे राजदूत म्हणून ते इंग्लंडला गेले होते. भारतातून इंग्लंडला जाणारे ते पहिले भारतीय होते. राजा राममोहन रॉय यांना भारतात नवविचाराचे जनक म्हंटले जाते. त्यांनी सर्वप्रथम "ब्रह्मपत्रिका"नावाचे वृत्तपत्र सुरू केले. ब्राह्मो समाज राजा राममोहन राॅय ह्यांनी मूर्तिपूजेला, देवदेवतांच्या पूजेला विरोध केला. जीवसृष्टीचा निर्माता एकच आहे व तो निर्गुण, निराकार आहे,असे ते मानत. हिंदू धर्मातील कालबाह्य झालेल्या रूढी व परंपराना त्याचा विरोध होता. भारतातील समाजाला नवी दिशा देणे ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी १८२८ साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली. ख्रिश्चन धर्माचा आभ्यास केला. जुन्या प्रथा, परंपराविरुद्ध लढा दिला. भारतातील धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था, व शिक्षणव्यवस्था यासंदर्भात लेखन करण्यास सुरुवात केली.त्यासाठी काही वृतपत्रे तसेच सुधारणा चळवळ सुरू केली. त्यांनी ४ डिसेंबर १८२१ रोजी संवाद कौमुदी हे बंगाली भाषेतील तर १२ एप्रिल १८२२ रोजी मिरात_उल_ अखबार हे पर्शियन वृतपत्र सुरू केले. त्यांनी १८२८ साली प्रेसिडेन्सी कॉलेज सुरू केले. राजा राममोहन रॉय यांनी लॉर्ड विलियम बेंटिक या भारताच्या गव्हर्नर जनरलच्या साहाय्याने सन १८२९ मध्ये भारतातील सतीची प्रथा कायद्याने बंद करवली. राजा राममोहन रॉय यांचे वर्तमानपत्र व साहित्य - तुहफत-उल-मुवहिद्दीन वेदांत ग्रंथ (वेदांत सार) संवाद कौमुदी मिरात उल अखबार गौडिय व्याकरण 1824 साली बंगाली या भाषेत इतिहास व भूगोल इ. अनेक विषयांवर पुस्तकांचे लिखाण. हे सुद्धा पहा ब्राह्मो समाज सती (प्रथा) संदर्भ http://www.aisiakshare.com/node/328 वर्ग:समाजसुधारक वर्ग:इ.स. १७७२ मधील जन्म वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती वर्ग:रावबहादुर
ईश्वरचंद्र विद्यासागर
https://mr.wikipedia.org/wiki/ईश्वरचंद्र_विद्यासागर
पुनर्निर्देशन ईश्वर चंद्र विद्यासागर
दयानंद सरस्वती
https://mr.wikipedia.org/wiki/दयानंद_सरस्वती
इवलेसे|स्वामी दयानंद सरस्वती स्वामी दयानंद सरस्वती (जन्म : मोरबी, १२ फेब्रुवारी १८२४; - मुंबई, ३० ऑक्टोबर १८८३) हे भारतीय समाजसुधारक व आर्य समाजाचे संस्थापक होते. आक्रमक व निर्भय धर्मसुधारक, कुशल संघटक आणि हिंदी भाषेचे राष्ट्रीय स्वरूप ओळखणारे महर्षी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे [[सत्यार्थ प्रकाश] हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ प्रसिद्ध आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी वरील ग्रंथामध्ये आर्य समाजाच्या तत्त्व विचारांची मांडणी केलेली आहे स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे व तो आम्ही मिळवणारच असे प्रतिपादन करणारे पहिले धर्मसुधारक म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती हे होत कौटुंबिक माहिती महर्षी दयानंद सरस्वतींचा जन्म सौराष्ट्रातील मोरबी संस्थानात अंबाशंकर नावाच्या औदिच्य ब्राह्मणाच्या पोटी झाला. त्यांचे मूळ नाव मूळशंकर अंबाशंकर तिवारी होते. संन्यास घेतल्यावर त्यांनी दयानंद सरस्वती असे नाव धारण केले. ग्रांथिक कार्य वैदिक धर्माचा प्रचार करण्यासाठी दयानंदांनी १० एप्रिल १८७५ रोजी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. वेदांतील तत्त्वज्ञानाचे यथार्थ ज्ञान व्हावे म्हणून यांनी "सत्यार्थ प्रकाश" नावाचा ग्रंथ संस्कृत व हिंदी भाषेत लिहिला. सत्यार्थ प्रकाश ग्रंथात वैदिक धर्माचे यथार्थ स्वरूप प्रतिपादन करताना इतर पंथमतांचे खंडनही त्यांना करावे लागले. या प्रचारात्मक ग्रंथानंतर वेदाचा अर्थ समजण्याकरिता यांनी "वेदभाष्य" लिहिण्यास सुरुवात केली पण तो ग्रंथ अपुराच राहिला. यानंतर "संस्कारविधी" हा ग्रंथ लिहून सोळा संस्कारांचे वर्णन व प्रयोग यांनी दिले. "पंचमहायज्ञविधी" या लहानशा ग्रंथात नित्य करावयाच्या यज्ञाचे यांनी विवेचन केले. "गोकरुणानिधी" या ग्रंथात यांच्या अंतःकरणाचे प्रतिबिंब पहावयास मिळते. आर्य समाजाचे कार्य आर्य समाजाच्या तत्त्वांचा प्रचार ते प्रथम अहमदाबाद, बडोदे, पुणे, मुंबई या ठिकाणी गेले त्यानंतर दिल्ली येथे भरणाऱ्या दरबारासाठी गेले. तेथे सर्व धर्मांच्या प्रतिनिधींना बोलाविलेले होते व चर्चेसाठी पाच प्रश्न ठेवलेले होते. दयानंदांनी त्या प्रश्नांची यथायोग्य उत्तरे दिल्यामुळे उत्तर हिंदुस्थानात व विशेषतः पंजाबात त्यांच्या मताचा चांगलाच बोलबाला झाला. शैक्षणिक संस्था, गुरुकुले व अनाथालये निघून होमहवनादी वैदिक पद्धतीचे कार्यक्रम तिकडे होऊ लागले.चित्राव सिद्धेश्वरशास्त्री,अर्वाचीन चरित्र कोश (१९४६) महर्षी दयानंद यांनी लिहिलेली पुस्तके गोकरुणानिधी पंचमहायज्ञविधी वेदभाष्य (अपूर्ण) सत्यार्थ प्रकाश संस्कारविधी दयानंदांची चरित्रे दयानंद (अनंत ओगले) दयानंद सरस्वती (प्रल्हाद कुळगेरी) स्वामी दयानंद सरस्वती : व्यक्ती विचार आणि कर्तृत्व (डॉ. जनार्दन वाघमारे) स्वामी दयानंद सरस्वती (मेघा अंबिके) पंडित स्वामी श्रीमद्‌दयानंद सरस्वती (१८८३) लेखक गोपाळ हरी देशमुख संदर्भ आणि नोंदी बाह्य दुवे वर्ग:इ.स. १८२४ मधील जन्म वर्ग:इ.स. १८८३ मधील मृत्यू वर्ग:आर्य समाज वर्ग:भारतीय समाजसुधारक वर्ग:धर्मसुधारक वर्ग:पुरुष चरित्रलेख वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती
जोतीराव गोविंदराव फुले
https://mr.wikipedia.org/wiki/जोतीराव_गोविंदराव_फुले
पुनर्निर्देशन महात्मा फुले
महादेव गोविंद रानडे
https://mr.wikipedia.org/wiki/महादेव_गोविंद_रानडे
thumb|right|250px|महादेव गोविंद रानडे यांचा पुतळा, चर्चगेट, मुंबई महादेव गोविंद रानडे (जन्म : १८ जानेवारी १८४२; मृत्यू : १६ जानेवारी १९०१), हे महाराष्ट्रातील समाजसुधारक होते, तसेच ते अर्थशास्त्रज्ञ व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे ते अध्यक्षही होते. १८८५ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. रानडे यांना आधुनिक भारताच्या इतिहासात महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीत महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षणाचा प्रसार व्हावा, स्त्रियांनाही शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी मुलींच्या शाळा सुरू केल्या. त्यांनी शिक्षण, समाजसेवा, राजकारण तसेच आर्थिक बाबतीत अमूल्य कार्य केले. जीवन महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिकमधील निफाड या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात झाले. त्यांना शालेय आयुष्यात विनायक जनार्दन कीर्तने यांची मैत्री लाभली आणि पुढे ती वाढली. लहानपणी माधवराव अबोल आणि काहीसे संथ होते. मात्र त्यांची तीव्र स्मरणशक्ती, सामाजिक भान इतरांच्या लक्षात आले होते. १८५६नंतर ते आणि कीर्तने मुंबईत शिक्षणासाठी आले, एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये दाखल झाले. त्यांचे इंग्रजी-संस्कृत भाषांमधील वाचन वाढले. लॅटिनचाही त्यांनी अभ्यास केला. मॅट्रिकच्या परीक्षेसाठी त्यांनी 'मराठेशाहीचा उदय आणि उत्कर्ष' या विषयावर निबंध लिहिला. पुढच्या काळात त्यांनी त्याच नावाचे पुस्तक लिहिले. अफाट वाचनाने त्यांची बुद्धी प्रगल्भ झाली होती. त्यामुळे त्यांना शिष्यवृत्ती मिळे; बक्षिसेही मिळत. १८६२(?) साली ते मॅट्रिक तर १८६४ साली एम. ए. झाले. त्या वेळी अलेक्झांडर ग्रॅन्ट यांचा सहवास आणि मार्गदर्शन त्यांना लाभले. या काळात माधवरावांनी विविध विषयांवर निबंधलेखन केले. इतिहास आणि अर्थशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय राहिले आणि त्यात त्यांनी अधिकारही प्राप्त केला होता. त्यांनी अध्यापन, परीक्षण, अनुवाद, न्यायदान अशा कामांमध्ये आपल्या बुद्धीची चमक दाखवली. त्यांनी इतिहास हा विषय घेऊन एम. ए. केले. इ.स. १८६६ साली ते कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो म्हणून त्यांची निवड झाली. न्यायमूर्ती रानडे यांना एल्फिन्स्टन महाविद्यालयात कनिष्ठ असलेले दिनशा वाच्छा रानडे यांबद्दल लिहितात :- “ते महाविद्यालयाच्या वाचनालयात अभ्यास करण्यांत कसे रमून जात ते मला नीट स्मरतं. महाविद्यालयाचा अभ्यास शिष्यवृत्तीसाठीच्या परीक्षेसाठी तयारी करणं तर त्यांना मुलांच्या खेळासारखे वाटे. कठीणात कठीण पुस्तक ते इतक्या सहजगत्या समजून घेत असत आणि ज्ञान प्राप्त करत. ज्ञान प्राप्तीची अहमनीय उत्कंठा आणि पुस्तकाच्या विषयाला हृदयंगम करण्याची क्षमता इतकी महान होती की ते दिवसभर पुस्तक वाचत असत. ते पुस्तके वारंवार वाचत. एवढा विस्तृत अभ्यास करायला आमच्यापैकी कुणातहीना धैर्य होतंना शक्ती,ना एवढी उत्कंठा! ते वाचण्यात एवढे तल्लीन होऊन जात की आजूबाजूला काय चालले आहे याकडे त्यांचे लक्षही जात नसे. खाण्यापिण्याकडे किंवा कपड्याकडे त्यांनी कधीही चौकसपणे लक्ष दिले नाही. काहीही खात, काहीही कपडे घालत.” विवाह म.गो. रानडे यांचा पहिला विवाह १८५१ साली वयाच्या ११-१२व्या वर्षी वाईतील दांडेकरांच्या रमा नावाच्या मुलीशी झाला. ही पत्नी आजारी पडली आणि तिचे १८७३ साली निधन झाले. माधवरावांचे विधवांच्या पुनर्विवाहासंबंधीचे विचार आणि त्या चळवळीतील त्यांचा सहभाग लक्षात घेता ते एखाद्या विधवेशी लग्न करतील अशी अटकळ त्यांच्या वडिलांनी बांधली आणि त्या सालच्या नोव्हेंबरच्या ३० तारखेला अण्णासाहेब कुर्लेकर यांच्या कन्येशी त्यांनी माधवरावांचा विवाह करून दिला. लग्नानंतर माधवरावांनी या पत्नीचे नावही रमा असेच ठेवले. माधवरावांची त्या काळात 'बोलके सुधारक' म्हणून सनातन्यांकडून संभावनाही झाली. विधवाविवाहाची हाती आलेली संधी आपण दवडली म्हणून ते दुःखी झाले, पण पुढे त्यांनी रमाबाईंना शिकवले. न्यायाधिशी काही काळ त्यांनी शिक्षक, संस्थानाचे सचिव, जिल्हा न्यायाधीश म्हणून विविध ठिकाणी काम केले. इ.स. १८९३ साली मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. सार्वजनिक कार्य ज्ञानप्रसारक सभा, परमहंस सभा, प्रार्थना समाज, सार्वजनिक सभा, भारतीय सामाजिक परिषद इत्यादी विविध संस्था स्थापन करण्यात व त्यांचा विस्तार करण्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता. ‘अनेक क्षेत्रांतील संस्था स्थापन करून त्यांनी भारतात संस्थात्मक जीवनाचा पाया घातला,’ असे त्यांच्याबद्दल गौरवाने म्हटले जाते. रानडे यांनी स्वातंत्र्यासाठी व सामाजिक सुधारणांसाठी कायम घटनात्मक व सनदशीर मार्गांचा पुरस्कार केला. स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘मवाळ’ प्रवाहाचे ते नेते होते. त्यांनी भारतीय राजकारणात अर्थशास्त्रीय विचार आणला. स्वदेशीच्या कल्पनेला त्यांनी शास्त्रशुद्ध व व्यावहारिक स्वरूप दिले. त्यांनी भारतातील दारिद्रयाच्या प्रश्नाचे मूलभूत विवेचन करून येथील दारिद्ऱ्याची कारणे व ते दूर करण्याचे उपाय यासंबंधी अभ्यासपूर्ण विचार मांडले. भारतीय समाजात संकुचित वृत्ती; जातिभेदांचे पालन; भौतिक सुखे, व्यावसायिकता व व्यावहारिकता यांविषयाचे गैरसमज यांसारखे दोष निर्माण झाल्यामुळे समाजाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. हे दोष दूर करूनच आपल्या समाजाची प्रगती साधता येईल असे त्यांचे ठाम मत होते. समाजाची राजकीय किंवा आर्थिक उन्नती घडवून आणायची असेल, तर सामाजिक सुधारणेकडे लक्ष पुरविले पाहिजे. "ज्याप्रमाणे गुलाबाचे सौंदर्य व सुगंध हे जसे वेगळे करता येत नाहीत, त्याप्रमाणे राजकारण व सामाजिक सुधारणा यांची फारकत करता येत नाही" असे त्यांचे मत होते. हे विचार त्यांनी समाजसुधारणा चळवळीच्या अगदी सुरुवातीच्या काळात मांडल्यामुळे त्यांना ‘भारतीय उदारमतवादाचे उद्गाते’, असेही म्हटले जाते. संस्था दिनांक ३१ मार्च, इ.स. १८६७ रोजी न्यायमूर्ती रानडे, डॉ. आत्माराम पांडुरंग, डॉ. रा. गो. भांडारकर, वामन आबाजी मोडक इत्यादी मंडळींनी पुढाकार घेऊन मुंबईत ‘प्रार्थना समाजा’ची स्थापना केली. त्याआधी इ.स. १८७१ साली रानडे यांचा सार्वजनिक सभेच्या स्थापनेशी व कार्याशी संबंध आला होताच. सामाजिक प्रश्नांचे महत्त्व लक्षात घेऊन, समाजसुधारणांसाठी रानडे यांनी पुढाकार घेऊन ‘भारतीय सामाजिक परिषदेची' स्थापना केली. या परिषदेचे ते १४ वर्षे महासचिव होते. जातिप्रथेचे उच्चाटन, आंतरजातीय विवाहांस परवानगी, विवाहाच्या वयोमर्यादेत वाढ, बहुपत्नीकत्वाच्या प्रथेस आळा, विधवा पुनर्विवाह, स्त्री-शिक्षण, तथाकथित जाति-बहिष्कृत लोकांच्या स्थितीत सुधारणा, हिंदू-मुसलमानांच्या धार्मिक मतभेदांचे निराकरण अशा या संस्थेच्या मागण्या होत्या. भारताच्या स्वातंत्र्यात पुढे मध्यवर्ती भूमिका बजावणाऱ्या ‘राष्ट्रीय काँग्रेस’ या संघटनेच्या स्थापनेतही (इ.स. १८८५) न्यायमूर्ती रानडे यांचा मोठा सहभाग होता. न्यायमूर्ती रानडे यांनी वक्तृत्वोत्तेजक सभा (हीच संस्था पुणे शहरात दरवर्षी, वसंत व्याख्यानमाला आयोजित करते), नेटिव्ह जनरल लायब्ररी, फीमेल हायस्कूल, मुलींच्या शिक्षणासाठी हुजूरपागा शाळा, इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया, इत्यादी अनेक संस्था पुढाकार घेऊन स्थापन केल्या. मराठी ग्रंथकार संमेलन सर्वप्रथम त्यांच्याच प्रयत्नांमुळे यशस्वी ठरले होते. त्यातूनच पुढे साहित्य संमेलन योजण्याची प्रथा सुरू झाली. न्यायमूर्ती रानडे हे स्वतः उत्तम संशोधक, विश्लेषक होते हे त्यांच्या द राइझ ऑफ मराठा पॉवर (मराठी सत्तेचा उदय) या ग्रंथावरून दिसून येते. त्यांच्या व्याख्यानांचे संग्रहही पुढील काळात प्रकाशित झाले. न्या.महादेव गोविंद रानडे हे १८९७ साली स्थापन झालेल्या गिरगांव,मुंबई स्थित आर्यन एज्युकेशन सोसायटीचे पहिले अध्यक्ष होते. ही संस्था आजही गिरगांव,मुंबई आणि पालघर येथे ज्ञानदानाचे कार्य करत आहे. लोकांचा रोष विष्णूबुवा ब्रह्मचारी, करसनदास मुलजी, भाऊ दाजी, रावसाहेब मंडलिक, विष्णूशास्त्री पंडित, सार्वजनिक काका आणि पंडिता रमाबाई यांच्या बरोबरीने आणि सहकार्याने माधवरावांनी विधवांच्या पुनर्विवाहाचा प्रश्न, संमतीवयाचा कायदा यांसारख्या अनेक समाजसुधारणांकरिता अथक प्रयत्न केले. परंतु स्वामी दयानंद सरस्वती, वासुदेव बळवंत फडके, पंचहौद मिशन, रखमाबाई खटला या व्यक्ती वा घटनांच्या संदर्भांत त्यांना टीका सहन करावी लागली. त्या काळात समाजसुधारकांना फार विरोध होई. माधवरावांच्या या समाजसुधारकी कामालाही सनातनी वर्गाकडून सतत विरोध झाला. माधवरावांनी तो विरोध सहनशीलतेने आणि समजुतीने हाताळला. सरकारी रोष माधवरावांच्या समाजकारणाच्या प्रारंभी अलेक्झांडर ग्रॅन्ट, सर बार्टल फ्रियर, बेडरबर्न यांच्या काळातील सरकारचा विश्वास त्यांनी अनुभवला. पण पुढे क्रांतिकारकांचे, पेंढाऱ्यांचे बंड, दुष्काळ आणि तत्कालीन सरकारविरोधी घटनांत माधवरावांचा हात असल्याचा संशय सरकारला येऊ लागला. त्याचा परिणाम म्हणून त्यांची बदली १८७९ साली धुळे येथे झाली आणि त्याचबरोबर त्यांच्या टपालावर नजर ठेवण्यात येऊ लागली. म्हणून गणेशशास्त्री लेले या मित्राने त्यांना नोकरीतून निवृत्ती स्वीकारण्याचा सल्ला दिला. माधवरांवांनी हा सल्ला मानला नाही, आणि पुढे यथावकाश सरकारचा संशय दूर झाला. मुंबई विद्यापीठात मराठी भाषेसाठी प्रयत्न पार्श्वभूमी ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांनी त्या त्या प्रांतातील शिक्षणाची व्यवस्था लावण्यासाठी १८४०मध्ये प्रांतनिहाय शिक्षणमंडळे (बोर्ड ऑफ एज्युकेशन) स्थापन केली. त्यांपैकी मुंबई प्रांताच्या शिक्षणमंडळाचे अध्यक्ष सर आर्स्किन पेरी ह्यांनी मंडळाच्या सभेत "उच्च शिक्षण देणाऱ्या सर्व संस्थांत शिक्षणाचे माध्यम केवळ इंग्लिश हेच असेल" असा ठराव मांडला. (त्यावेळी महाविद्यालये अथवा विद्यापीठ नसल्याने उच्चशिक्षण ह्या संज्ञेचा अर्थ माध्यमिक शाळांतील शिक्षण असा होता.) ह्या ठरावाला तीन भारतीय सदस्य आणि कर्नल जार्विस ह्यांनी विरोध केला. त्यामुळे पेरी ह्यांचा ठराव लगेच मान्य झाला नाही. परंतु कलकत्ता येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तो मान्य केल्यामुळे मुंबई प्रांतातील सर्व माध्यमिक शाळांतून (तत्कालीन चवथी ते सातवी (मॅट्रिक)) ह्या वर्गांत मराठी भाषा वगळता अन्य सर्व विषय मातृभाषेऐवजी इंग्लिशमधून शिकवण्यात येऊ लागले. चार्ल्स वुड ह्यांच्या मार्गदर्शनानुसार मुंबई प्रांतातील शिक्षणविषयक व्यवस्थापनाची एक संहिता १८५४ मध्ये तयार करण्यात आली. तिच्यातील एका कलमात शिक्षणव्यवस्थेत देशी भाषांना उत्तेजन देण्याचे कलम असले तरी त्यावर प्रत्यक्षात कार्यवाही झाली नव्हती. १८५७ ह्या वर्षी मुंबई विद्यापीठ स्थापन झाले तेव्हा मराठी हा विषय मॅट्रिक ते एम. ए.पर्यंतच्या सर्व परीक्षांना वैकल्पिक म्हणून घेण्याची सोय होती. पण १८५९ ह्या वर्षी झालेल्या विद्यापीठाच्या पहिल्या मॅट्रिक परीक्षेत मुंबई प्रांतातून परीक्षेला बसलेल्या १३२ विद्यार्थ्यांपैकी केवळ २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि अनुत्तीर्ण झालेल्या ११० विद्यार्थ्यांपैकी ८९ विद्यार्थी हे मराठी इ. देशी भाषांत अनुत्तीर्ण झाले होते. ह्या प्रकाराची पुनरावृत्ती १८६२ पर्यंत होत राहिल्याने २९ नोव्हेंबर १८६२ रोजी विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळापुढे (सिंडिकेट) विद्यापीठाचे कुलगुरू सर अलेक्झॅंडर ग्रॅंट ह्यांनी मॅट्रिक्युलेशननंतर विद्यापीठात केवळ अभिजात भाषाच (उदा. संस्कृत, अरबी, हीब्रू, ग्रीक, लॅटिन) शिकवण्यात याव्यात असा ठराव मांडला. ह्या ठरावाला डॉ. एम. मरे आणि डॉ. जॉन विल्सन ह्यांनी विरोध केला. पण हा ठराव १८६३मध्ये मान्य झाला. त्यामुळे मॅट्रिक ते एम. ए. ह्या सर्व स्तरावर मराठी भाषेचे अध्ययन-अध्यापन बंद झाले. रानडे ह्यांचे प्रयत्न १८७० ते १८८७ ह्या काळात मराठीला विद्यापीठात स्थान मिळावे ह्यासाठी जनमत तयार करण्यासाठी रानडे ह्यांनी प्रयत्न केले. 'विद्यापीठ आणि देशी भाषा' ह्या विषयावर श्री. ग. त्र्यं. जोशी ह्यांना निबंध लिहिण्यास प्रवृत्त करून त्या निबंधाचे सार्वजनिक सभेत प्रकट वाचन करवणे व चर्चा करणे जर्नल ऑफ रॉयल एशियाटिक सोसायटी ह्या संस्थेच्या नियतकालिकातून ह्या विषयावर लेखन मुंबईच्या टाइम्स ऑफ इंडिया ह्या वृत्त पत्रातून ह्या विषयावर लेखन तसेच देशी भाषांत प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांचा आढावा घेण्यासाठी मुंबईच्या शासनाने नेमलेल्या रजिष्ट्रार ऑफ नेटिव्ह पब्लिकेशन्स ह्या अघिकाऱ्याशी संपर्क साधून त्या वर्षीच्या अहवालात देशी भाषांत पुस्तके प्रकाशित होण्याचे प्रमाण कमी असण्याचे कारण विद्यापीठात ह्या भाषांना स्थान नसणे हे असल्याचे रानडे ह्यांनी नोंदवून घेतले. ह्यावर तत्कालीन भारतमंत्र्यांनी मुंबईच्या गव्हर्नरांना ह्या प्रकरणी लक्ष घालण्याची सूचना केल्याने विद्यापीठाच्या कार्यकारी सभेत (सिंडिकेट) ह्या विषयावर चर्चा झाली. रानडे ह्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. १८९७ ह्या वर्षी रानडे ह्यांनी मराठी आणि इतर देशी भाषा ह्यांच्या पुरस्कर्त्यांच्या सह्यांसह पुन्हा एक अर्ज कार्यकारी सभेपुढे मांडला. पण त्यावर चर्चा होऊन ती अनिर्णित राहिली. रानडे ह्यांनी विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ आर्ट ह्या मंडळापुढे तो ठराव मांडण्याचा प्रयत्न केला पण त्यालाही पाठिंबा मिळाला नाही. १९०० ह्या वर्षी मुंबई प्रांताच्या शिक्षणसंचालकांनी ह्या प्रश्नी विद्यापीठाला पत्र लिहून विचार करण्याची सूचना केली असता बी. ए. आणि एम. ए. ह्या परीक्षांना नेमण्यासाठी देशी भाषांतील पुस्तके सुचवण्यासाठी समिती नेमण्यात आली. समितीने मराठीतील अशा पुस्तकांची यादी सादर केल्यावर २९ जानेवारी १९०१ ह्या दिवशी (रानडे ह्यांच्या मृत्यूनंतरच्या १३ व्या दिवशी) सिनेटच्या बैठकीत विद्यापीठाच्या परीक्षांत देशी भाषांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव मांडणारे सदस्य चिमणलाल सेटलवाड ह्यांनी रानडे ह्यांच्या निधनाने झालेल्या हानीचा उल्लेख करून सदर प्रस्तावासंदर्भात रानडे आणि आपण ह्यांच्यात झालेल्या संभाषणाचा उल्लेखही केला. ह्या सभेत हा प्रस्ताव बहुमताने संमत करण्यात आला. त्यायोगे मॅट्रिकप्रमाणे एम.ए.च्या परीक्षेतही मराठी हा विषय विकल्पाने उपलब्ध करून देण्यात आला. मात्र मराठीची प्रश्न पत्रिका इंग्लिशमधून काढण्यात येणार होती आणि उत्तरेही इंग्लिशमध्येच देण्याची अट होती. निधन रानडे यांनी १६ जानेवारी १९०१ च्या रात्री जस्टीन मेकार्थी याचे ‘हिस्ट्री ऑफ अवर ओन टाईम्स’ हे पुस्तक वाचायला घेतले आणि पुस्तक वाचायला बसले नाहीत तोवर त्यांना त्रास सुरू झाला व त्यांची जीवनयात्रा संपली. पुस्तके रानडे यांनी लिहिलेली किंवा त्यांच्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके न्या. म. गो. रानडे व्यक्ति कार्य आणि कर्तृत्व (१९९२-त्र्यंबक कृष्ण टोपे) मराठेशाहीचा उदय आणि उत्कर्ष (१९६४-म.गो. रानडे) पुनरुत्थानाचे अग्रदूत - म.गो. तथा माधवराव रानडे यांचे चरित्र (२०१३-ह.अ. भावे) आमच्या आयुष्यातील काही आठवणी (१९१०-रमाबाई रानडे) न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे चरित्र (१९२४-न.र. फाटक) रानडे-प्रबोधन पुरुष (२००४-डॉ. अरुण टिकेकर) Mahadev Govind Ranade (इंग्रजी १९६३-टी.व्ही. पर्वते) Mr. Justice M. G. Ranade : A Sketch of the Life and Work. (इंग्रजी-जी.ए.मानकर). Ranade : The Prophet of Liberated India (इंग्रजी १९४२-डी.जी. कर्वे). मन्वंतर - (२००९-गंगाधर गाडगीळ) Mahadev Govind Ranade : A Biography Of His Vision And Ideas (इंग्रजी १९९८-वेरिंदर ग्रोवर) रानडे, गांधी आणि जीना (इ.स. १९४३) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर रानडेंबद्दल व्यक्त झालेली मते १९४२ साली रानडेंच्या जन्मशताब्दी दिनी (रानडे, गांधी आणि जीना) बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, "रानडे हे स्वभावतः प्रामाणिक होते. त्यांच्यात प्रचंड क्षमतेची बुद्धी होती. ते केवळ वकील किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नव्हते, तर सर्वोत्तम अर्थतज्ज्ञ, सर्वोत्तम इतिहासकार, सर्वोत्तम शिक्षणतज्ज्ञ, तसंच दिव्य दृष्टी असेलेले व्यक्ती होते." हे सुद्धा पहा उंच माझा झोका : (रमाबाई रानडे यांच्या आठवणींवर आधारित मराठी दूरचित्रवाणी मालिका) संदर्भ संदर्भसूची वर्ग:अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष वर्ग:इ.स. १९०१ मधील मृत्यू वर्ग:मराठी कायदेपंडित वर्ग:मराठी समाजसुधारक वर्ग:मराठी समाजसेवक वर्ग:इ.स. १८४२ मधील जन्म वर्ग:धर्मसुधारक
गोपाळ गणेश आगरकर
https://mr.wikipedia.org/wiki/गोपाळ_गणेश_आगरकर
गोपाळ गणेश आगरकर (जन्म : टेंभू-सातारा, १४ जुलै १८५६; - १७ जून १८९५) हे महाराष्ट्रातील विचारवंत, समाजसुधारक, पत्रकार व शिक्षणतज्ज्ञ होते. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत आगरकरांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक, केसरी व मराठा या वृत्तपत्रांचा आधार घेतला. सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञान‌-निष्ठा‌ ही त्यांची जीवनमूल्ये होती. मुलींनासुद्धा शिक्षण मिळायला पाहिजे असा लेख त्यांनी सुधारक या वृत्तपत्रात लिहिला. बुद्धिप्रामाण्य वादाचे पुरस्कार करून महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणा घडून आणणे या उद्देशाने समाजसुधारणा करणाऱ्या समाजसुधारकांमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या मांदियाळीतील क्रांतीकारी समाजसुधारक म्हणून आगरकर हे महत्त्वपूर्ण ठरतात. आरंभीचा काळ आगरकरांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात झाला. घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना अनेक मार्ग चोखाळावे लागले. कधी मामलेदार कचेरीत उमेदवारी करून, कधी मधुकरी मागून तर कधी कंपाउंडरचे काम करून त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासाठी ते कऱ्हाड, अकोला, रत्‍नागिरी येथे गेले. १८७५ साली ते मॅट्रिक झाले व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आले. पुण्यात त्यांनी डेक्कन कॉलेजला प्रवेश घेतला. वर्तमानपत्रात लिखाण करणे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यांत भाग घेऊन बक्षिसे जिंकणे, शिष्यवृत्ती मिळवणे अशा प्रकारे त्यांची गुजराण चालत असे. गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांची ओळख १८७९मध्ये एम. ए. करताना झाली. त्यांनी एकत्रच शिक्षण घेतले होते. त्यांनीच त्यावेळेस केसरी वृत्तपत्र सुरू करायचे ठरवले होते. त्यात लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर व विष्णूशास्त्री चिपळूणकर या तिघांचा पुढाकार होता. कारकीर्द आगरकर हे बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक (१८८०-१८८१) होते.१५ ऑक्टोंबर १८८७ला केसरी वृत्तपत्राचे संपादकत्व सोडले पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना लोकमान्य टिळक व आगरकर या दोघांच्याही मनात स्वदेशसेवेची प्रेरणा जागी झाली. दिनांक १ जानेवारी, १८८० रोजी विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. आगरकर १८८१ मध्ये एम. ए. झाल्यावर चिपळूणकरांना जाऊन मिळाले. आगरकर व टिळक यांनी १८८१ मध्ये इंग्रजीतून ‘मराठा’, तर मराठीतून ‘केसरी’ अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले. पुढे लोकमान्य टिळक व आगरकर यांनी २४ ऑक्टोबर १८८४ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व त्या अंतर्गत १८८५ साली फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले, पुढे ते फर्ग्युसनचे प्राचार्यही झाले. उल्लेखनीय कार्य १८८४ साली बाळ गंगाधर टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि आगरकरांनी पुण्यात 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी' स्थापली. १८८८ साली त्यांनी 'सुधारक' हे वृत्तपत्र सुरू केले. गोपाळ गणेश आगरकर हे, भौतिकता - ऐहिकता, बुद्धिप्रामाण्यवाद, व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक तत्त्वांना प्रमाण मानून जिवाच्या कराराने समाज सुधारणांचा पाठपुरावा करणारे समाजप्रबोधक होते. महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिष्ठान देऊन, परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळराव आगरकरांकडे जाते. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गती या काळामध्ये प्राप्त करून देण्याचे काम गोपाळ गणेश आगरकर यांनी केले विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारून ग्रंथ ब्राह्मण्याला विरोध करत बुद्धिप्रामाण्य चिक रास धरणारे तत्कालीन सुधारकांनी मध्ये आपला विचार परखडपणे मांडणारी सुधारक म्हणून आगरकर हे उल्लेखनीय आहेत आगरकरांनी बुद्धिवादाचा आधार घेऊन सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. बुद्धीला पटेल तेच स्वीकारले पाहिजे. केवळ अंधानुकरण करून ग्रंथांमध्ये दिले आहे म्हणून ते स्वीकारणे अयोग्य ठरते. रुढी प्रामाण्याऐवजी वैज्ञानिक कार्यकारणभावांनी युक्त बुद्धिप्रामाण्यवाद रुजविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्त्री सुधारणेचा पुरस्कार करताना स्त्रियांना देखील पुरुषांच्या बरोबरीने हक्क व अधिकार असले पाहिजेत हा विचार् प्रभावीपणे त्यांनी मांडला. 'स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत'. असे ते म्हणत. याचाच अर्थ असा होता की पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना समाजामध्ये महत्त्वाचे स्थान असले पाहिजे. राजकीय स्वातंत्र्याआधी समाजसुधारणा महत्त्वाची आहे. बालविवाह, अस्पृश्यता यांसारख्या समाजातील अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत अशा विचारांचे ते होते. समाजसुधारणा विरुद्ध राजकीय स्वातंत्र्य याच वादातून १८८७ च्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी केसरीचे संपादकत्व सोडले. १८८८ साली त्यांनी ‘सुधारक (वृत्तपत्र)’ हे वृत्तपत्र सुरू केले. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता या मूल्यांचा प्रचार त्यांनी सुधारकमधून केला, तसेच जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य, बालविवाह, ग्रंथप्रामाण्य- धर्मप्रामाण्य, केशवपन इत्यादी अन्यायकारक परंपरांना त्यांनी विरोध केला. अंधश्रद्धा, पाखंडीपणा यांच्यावर प्रहार केले. सुधारक हे इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते. इंग्रजी सुधारकची जबाबदारी काही काळ नामदार गोखले यांनी सांभाळली होती. आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला समाजाने व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करून समाजातील त्या-त्या घटकाला स्वातंत्र्य देणे आवश्यक आहेत याला स्त्रिया देखील अपवाद असता कामा नयेत श्री स्वातंत्र्याचा देखील पुरस्कार झाला पाहिजे याचा पुनरुच्चार आगरकरांनी केला आगरकर व्यक्तिवादाचे पुरस्कर्ते होते. बुद्धीला जी गोष्ट पटेल ती बोलणे व शक्य तितकी आचरणात आणणे, मग त्याला इतरत्र पूज्य ग्रंथांत वा लोकरूढीत आधार असो वा नसो, हे आगरकरांचे महत्त्वाचे तत्त्व होते. स्त्रियांच्या अगदी पेहेरावाविषयीही त्यांनी आधुनिक विचार समाजासमोर मांडले होते. राजकीय व सामाजिक बाबतीत समता, संमती व स्वातंत्र्य हे घटक महत्त्वाचे आहेत; मनुष्यकृत विषमता शक्य तितकी कमी असावी; सर्वांस सारखे, निदान होईल तितके सारखे सुख मिळण्याची व्यवस्था होत जाणे म्हणजे सुधारक होत जाणे - अशी त्यांची सुटसुटीत विचारसरणी होती. ‘विचारकलह हा समाजस्वास्थ्याला आवश्यक आहे,’ असे त्यांचे मत होते. त्यांच्या या विचारसरणीमुळे त्यांना टोकाचा विरोध झाला. सनातनी लोकांनी त्यांच्या जिवंतपणीच त्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती. पण तरीही निग्रहाने आणि निश्चयाने त्यांनी आपल्या विचारांचा पाठपुरावा केला. वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले. पत्रकारिता १८८१ मध्ये 'केसरी'हे वृत्तपत्र सुरू केले. याचे प्रथम संपादक म्हणून आगरकरांनी १८८७ पर्यंत काम केले. आगरकर हे बुद्धिवादी होते. त्यांनी प्रारंभीच्या काळात जनतेच्या विचार परिवर्तनाविषयक लिखाणांवर भर दिला. समाज सुधारणांच्या मूलगामी विचारांतून सामाजिक सुधारणा वेग धरू शकतील याबाबत त्यांनी जागरूकतेने सामाजिक सुधारणांवर आग्रही राहून 'केसरी'त लिखाण केले. त्याचबरोबर राजकीय स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला. आगरकरांचा सडेतोडपणा, वैविध्य यामुळे 'केसरी'ची लोकप्रियता वाढली खरी; परंतु पुढे टिळक व आगरकरांत वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे १८९० पासून 'केसरी'चे काम लोकमान्य टिळक पाहू लागले.Google's cache of http://www.dailykesari.com/sund2.html . It is a snapshot of the page as it appeared on 9 Jan 2010 05:35:56 GMT. आगरकरांनी पुण्यातच सुधारक वृत्तपत्र सुरू केले. सुधारक मधून आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्य, अनिष्ट धार्मिक रूढींचा निषेध, शिक्षणाचे महत्त्व इ. मुद्यांचा प्रसार केला. तत्कालीन समाजाच्या विरोधात जाताना आगरकरांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. टिळकांशी मतभेद आगकरांचे म्हणणे राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणेला महत्त्व देणे असे होते, तर टिळकांच्या मते राजकीय स्वातंत्र्य आधी मिळाल्यास सामाजिक सुधारणा नंतर करता येतील. संमतीवय आणि बालविवाहाच्या प्रश्नावर त्यांचे मतभेद वाढले. सहाजिकच केसरीतून सुधारणावादी मते मांडताना आगरकरांची कुचंबणा होऊ लागली. याची परिणती पुढे केसरी सोडण्यात झाली. कोल्हापूर प्रकरणावरून दोघांना झालेली शिक्षा भोगण्यासाठी त्यांना डोंगरी येथील कारागृहात ठेवले होते. त्यावर आगरकरांचा डोंगरीतील दिवस हा लेख प्रसिद्ध आहे. त्यात दोघांच्या संबंधांवर लिहिले आहे. त्यावेळी कोठडीत असताना, कॉलेजातील दिवस, सामाजिक सुधारणेची वचने, त्यातील किती साध्य केली या विषयांवर आपण दोघे चर्चा करीत असू असे आगरकरांनी लिहिले आहे. १८८७ या वर्षीच्या २५ ऑक्टोबरला केसरीच्या अंकात पाच ओळींचे स्फुट आले. ``आजपासून रा. बाळ गंगाधार टिळक बी. ए. एलएल. बी. हे केसरी पत्राचे प्रकाशक झाल्यामुळे प्रकाशकत्वाची जबाबदारी त्यांच्याच शिरावर आहे. रा. गोपाळ गणेश आगरकर एम. ए यांच्यावर ती जबाबदारी राहिली नाही.`` आगरकरांनी स्वतंत्र वर्तमानपत्र काढून आपल्यातील दुही स्पष्ट करू नये असे टिळकांचे म्हणणे होते. त्यांनी केसरीत स्वंतत्रपणे आपले नाव लिहून आपले विचार मांडायला टिळकांची काहीच हरकत नव्हती. सुरुवातीच्या काळात आगरकरांनी तेही केले. विशेष म्हणजे अग्रलेखाविरोधात भूमिकाही त्यात असत, आणि टिळकही त्या छापत. फीमेल हायस्कुलातील शिक्षणक्रम या नावाने केसरीच्या अग्रलेखाहून मोठा लेख आगरकरांनी लिहिला. यापूर्वी केसरीने छापलेल्या चार अग्रलेखांचा प्रतिवाद करणारा हा लेख केसरीनेही काटछाट न करता छापला. दोघांमधील संबंधांचे हे एक उदाहरण. अखेरच्या दुखण्यात आगरकरांना टिळकांची आठवण येऊन त्यांनी त्यांस मुद्दाम भेटीला बोलवून आपले दुःख हलके केले. त्याचप्रमाणे केसरीतला आगरकरांवरील मृत्युलेख लिहीत असता टिळक रडत होते व तो दोन कॉलमचा लेख लिहिण्याला त्याना या उमाळ्याच्या अडथळ्यामुळे चार तासही पुरले नाही. या लेखात टिळकांनी असे लिहिले आहे, की ``मृत्यूच्या उग्र स्वरूपापुढे बारीकसारीक मतभेदाच्या गोष्टी आपण विसरून गेलो व जुन्या आठवणी जागृत होऊन बुद्धि व लेखणी गोंधळून गेली. आगरकर हे मूळचे गरीब स्थितीतील असता त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग द्रव्य न मिळवितां समाजाचे ऋण फेडण्याकरताच केला या गोष्टीला योग्य महत्त्व दिले.`` आगरकरांच्या लेखन कौशल्यासंदर्भात टिळक म्हणतात, ``देशी वर्तमानपत्रास हल्ली जर काही महत्त्व आले असले तर ते बऱ्याच अंशी आगरकर यांच्या विद्वत्तेचे व मार्मिकतेचे फल होय यात शंका नाही.`` यानंतर २१ वर्षांनी म्हणजे १९१६मध्ये आगरकरांच्या श्राद्धतिथीच्या निमित्ताने टिळकांनी लिहिले होते, ``सत्याचा, करारीपणाचा एकनिष्ठतेचा आणि स्वार्थत्यागाचा महिमा इतका विलक्षण आहे की, भरभराटीच्या पाठीस लागलेल्या मनुष्यासहि दारिद्ऱ्यात राहून पूर्ण एकनिष्ठेने देशसेवेस लागणाऱ्या मनुष्याचा महिमा अखेर गावा लागतो.`` ``....आपल्या कर्तबगारीने व्यावहारिक उन्नति आपण प्राप्त करून घेऊं असा निश्चित भरंवसा असतां, आगरकरांप्रमाणे मनोदेवतेस साक्ष ठेवून संकटे विपत्ति हालअपेष्टा सोसूनहि मी आपले देशकार्याचे मनोगत पूर्ण करीन असे म्हणणारे पुरुषच खरे धीर पुरुष होत`` आगरकर व टिळक यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत वर्तमानपत्रांशी जागता संबंध ठेवला. पण या दोघांच्या सामाजिक विचारसरणीत उत्तर दक्षिण ध्रुवाइतके अंतर असल्यामुळे त्यांच्यातील मतभेद, सोसायटीतील मतभेद व टिळकांनी सोसायटी सोडल्यानंतर त्यांच्यातील मतभेद हा सर्व महाराष्ट्राचा मतभेद होऊन बसला. व तसा तो व्हावा अशीच बुद्धिवान, स्वार्थत्यागी, मताभिमानी अशी ही दोन्ही माणसे होती. http://marathi.webdunia.com/miscellaneous/special07/friendshipday/0708/04/1070804032_2.htm संस्था गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आचार्य अत्रे यांनी पुण्यात इ.स. १९३४साली आगरकर हायस्कूल ही मुलींची शाळा स्थापन केली. पुरस्कार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ’सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर या नावाचा पुरस्कार दिला जातो. इ.स. २०१०मध्ये हा पुरस्कार डॉ. श्रीराम लागू यांना, तर २०१२साली मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते श्री. सय्यदभाई यांना देण्यात आला. महाराष्ट्र संपादक परिषद ही संस्था, आदर्श पत्रकारितेसाठी गो.ग. आगरकर पुरस्कार देते. २०१२साली हा पुरस्कार महेश म्हात्रे यांना मिळाला होता. साहित्य गोपाळ गणेश आगरकर यांनी आणि इतर लेखकांनी त्यांच्यावर लिहिलेली पुस्तके - आगरकर दर्शन - ऑडिओ पुस्तक आगरकर-वाङ्मय. खंड १ ते ३. (संपादक : म. गं. नातू. दि. य. देशपांडे) आगरकर विचार (लेखक : अशोक चौसाळकर, तानाजी ठोंबरे, डाॅ. भा.ल. भोळे) आगरकर व्यक्ती आणि विचार (लेखक वि.स. खांडेकर) आगरकरांचे राजकीय विचार (अशोक चौसाळकर, २००५) गोपाळ गणेश आगरकर. लेखक, संपादक - प्रा. ग.प्र. प्रधान. गोपाळ गणेश आगरकर - निवडक लेखसंग्रह. लेखक गो. ग. आगरकर. प्रकाशक : प्रतिमा प्रकाशन गोपाळ गणेश आगरकर यांचे चरित्र (प्रा. अविनाश कोल्हे) टिळक आगरकरांचे राजकीय विचार (संपादक : अशोक चौसाळकर)(२००८) टिळक आणि आगरकर (नाटक). लेखक - विश्राम बेडेकर डोंगरीच्या तुरुंगांतील आमचे १०१ दिवस (लेखक गो.ग. आगरकर) द्रष्टा (आगरकरांच्या आयुष्यावर व समाजकार्यावर लिहिलेले नाटक, लेखिका - माधुरी आठवले) ’विकार विलसित’ हे शेक्सपियरच्या हॅम्लेटचे मराठी भाषांतर : लेखक गो. ग. आगरकर. वाक्यमीमांसा आणि वाक्यांचें पृथक्करण (लेखक गो.ग. आगरकर) ’वाक्य विश्लेषण’ हा व्याकरण ग्रंथ (लेखक गो.ग. आगरकर) श्रेष्ठ समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर, लेखिका : कुसुम बेदरकर; प्रकाशक : अस्मिता प्रकाशन(पुणे); प्रकाशन तिथी : नोव्हेंबर २००९ ’सुधारकातील निवडक निबंध’ लेखक गो.ग. आगरकर 'गुलामांची राष्ट्र'हा लेख। गुलामगिरीचे शस्त्र (गो ग आगरकर) १९. 'गुलामांचे राष्ट्र'.'गुलामगिरीचे शस्त्र'.(गो ग आगरकर) संदर्भ वर्ग:मराठी पत्रकार वर्ग:मराठी समाजसुधारक वर्ग:मराठी संपादक वर्ग:इ.स. १८५६ मधील जन्म वर्ग:इ.स. १८९५ मधील मृत्यू
धोंडो केशव कर्वे
https://mr.wikipedia.org/wiki/धोंडो_केशव_कर्वे
धोंडो केशव कर्वे ऊर्फ अण्णा कर्वे, (जन्म : १८ एप्रिल १८५८; - ९ नोव्हेंबर १९६२) यांनी महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपले १०४ वर्षांचे जीवन वाहिले. इ.स. १९०७ साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जीवन म्हणजे सामाजिक सुधारणा विशेषतः स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी वाहिलेले आधुनिक ऋषितुल्य जीवन त्यांच्या कार्याचा प्रारंभ हा विधवाविवाह पासून झाला आणि त्याची परिणीती स्त्रियांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विद्यापीठ काढण्यामध्ये झाली स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांनी अविरत परिश्रम केले धोंडो केशव कर्वे यांचे चिरंजीव र. धो. कर्वे हे होत. त्यांनीदेखील सामाजिक सुधारणेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. भारतामध्येच्या काळात संततिनियमनाच्या प्रश्नांवर बोलणे देखील गुन्हा मानला जात होता अशा या काळामध्ये या संपूर्ण कार्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन लोकांना संततिनियमनाचा महत्त्व पटवून देण्यासाठी र. धो. कर्वे व त्यांच्या पत्नी यांनी अथक परिश्रम घेतले या काळामध्ये त्यांना लोकांच्या विरोधाला सामोरे जावं लागलं समाजाकडून त्यांची उपेक्षा केली गेली. सहजासहजी त्यांचा हा विचार समाजाने या काळामध्ये स्वीकारला नाही. मात्र त्यांचा हा विचार नक्कीच स्पृहणीय होता काळाची पावले ओळखणारे असे हे समाजसुधारक होते. भारत सरकारने त्यांना १९५८ मध्ये त्यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले. बालपण आणि तारुण्य रत्‍नागिरी जिल्ह्यातील मुरुड हे अण्णांचे गाव. शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली. इ.स. १८८१ मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. राधाबाई त्या वेळी ८ वर्षांच्या होत्या. वयाच्या २७व्या वर्षी, इ.स. १८९१ साली बाळंतपणात राधाबाईंचा मृत्यू झाला. लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करीत होते. पण राजकारणाच्या रणधुमाळीत उतरल्यानंतर त्यांच्या रिकाम्या जागी गणित विभागाचे प्रमुख असणारे गोपाळ कृष्ण गोखले यांनी अण्णांना बोलावून घेतले. इ.स. १८९१ ते इ.स. १९१४ या प्रदीर्घ कालखंडात अण्णांनी गणित हा विषय शिकवला. पुनर्विवाह त्यांच्या सहचारिणी राधाबाई कालवश झाल्या, त्या वेळी अण्णांचे वय पंचेचाळीसच्या आसपास होते. प्रौढ वयात विधुर झालेल्या पुरुषानेही अल्पवयीन कुमारिकेशीच लग्न करण्याची त्या काळात प्रथा होती. लहान वयात मुलींची लग्ने होत, पण दुर्दैवाने पती लवकर मरण पावला तर त्या मुलीला मात्र त्याची विधवा म्हणून उर्वरित आयुष्य घालवावे लागे. ही समाज रीत नाकारणाऱ्या अण्णांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. ही गोष्ट काळाला मानवणारी नव्हती. अण्णा पत्‍नीसह मुरूडला गेल्यानंतर अण्णांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला. याच गोदूबाई पुढे आनंदी कर्वे किंवा बाया कर्वे म्हणून ख्यातनाम झाल्या. अण्णासाहेबांच्या कार्यात बाया कर्वे यांचा सक्रिय वाटा होता. अण्णांचा पुनर्विवाह ही व्यक्तिगत बाब नव्हती; घातक सामाजिक प्रथांविरुद्ध केलेले ते बंड होते. पुनर्विवाहासाठी लोकमताचे जागरण करावे, या हेतूने २१ मे, इ.स. १८९४ या दिवशी अण्णांनी पुनर्विवाहितांचा एक कुटुंबमेळा घेतला. याच सुमारास अण्णांनी ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक‘ मंडळाची स्थापना केली. विधवा-विवाहाला विरोध करणाऱ्या प्रतिगामी प्रवृत्तींना आवर घालणे हे या मंडळाचे काम होते. बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन यासारख्या अन्याय्य रूढींत अडकलेल्या अनिकेत स्त्रियांना मोकळा श्वास मिळावा म्हणून इ.स. १८९६ मध्ये अण्णांनी सहा विधवा महिलांसह ‘अनाथ बालिकाश्रम‘ काढला. ‘विधवा विवाहोत्तेजक‘ मंडळाची स्थापना केली. विधवाविवाह न्याय संमत मानला जात नव्हता अशा काळामध्ये अण्णांनी विधवा विवाहाचा आग्रह धरून समाजाच्या मानसिकतेमध्ये बदल करण्यासाठी चळवळ उभी केली या चळवळीचा एकूणच परिणाम म्हणजे या काळामध्ये पुनर्विवाह साठी समाजाची मानसिकता तयार होऊ लागली रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी अण्णांचे हे उदात्त कार्य पाहून हिंगणे येथील आपली सहा एकरांची जागा आणि रु. ७५० संस्थेच्या उभारणीसाठी अण्णांकडे सुपूर्द केले. या उजाड माळरानावर अण्णांनी एक झोपडी बांधली. ही पहिलीवहिली झोपडी ही हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेची गंगोत्री. आज अनेक वास्तूंनी गजबजून गेलेल्या या वैभवसमृद्ध परिसरात अण्णांची झोपडी त्यांच्या तपाचे महाभारत जगाला सांगत उभी आहे. कार्य इ.स. १९०० मध्ये अनाथ बालिकाश्रमाचे स्थलांतर हिंगण्यास करण्यात आले. याच परिसरात अण्णांनी विधवांसाठी एक हक्काची सावली निर्माण केली. विधवांचे हे वसतिगृह ही एक सामाजिक प्रयोगशाळा होती. स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यांना दिली जाणारी दुय्यम दर्जाची वागणूक यांचा त्यांना कायम राग येत असे. पंडिता रमाबाई आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या जीवनकार्यांमुळे अण्णासाहेब खूपच प्रभावित झाले होते. थोर तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचाही त्यांच्यावर पगडा होता. इ.स. १८९६मध्ये अण्णासाहेबांनी पुण्याजवळील हिंगणे (आता कर्वेनगर) या गावी विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केला. या आश्रमात याच ठिकाणी इ.स. १९०७ साली महिला विद्यालयाची स्थापना त्यांनी केली. अण्णासाहेबांची २० वर्षांची विधवा मेहुणी - पार्वतीबाई आठवले - या विद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी होत. आश्रम आणि शाळा या दोन्हींसाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी त्यांनी '`निष्काम कर्म मठा'ची स्थापना इ.स. १९१० साली केली. स्त्रियांना आपल्या आवडीनुसार शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी आरोग्यशास्त्र, शिशुसंगोपन, गृहजीवन शास्त्र, आहार शास्त्र असे विषय अभ्यासक्रमामध्ये ठेवले. यामुळे स्त्रियांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली. ग्रामीण भागातही स्त्री शिक्षणाची गरज ओळखून कर्वे यांनी स्त्री शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्यावर भर दिला ग्रामीण भागात त्यांनी ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ स्थापन केले व त्याद्वारे अनेक शाळा सुरू केल्या पुढे या तिन्ही संस्थांचे कार्य उत्तरोत्तर वाढत गेल्याने त्याचे एकत्रीकरण करून `'हिंगणे स्त्री शिक्षण संस्था' निर्माण झाली. तिचेच नाव पुढे '`महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था' (थोडक्यात, कर्वे शिक्षण संस्था) असे झाले. १९९६साली त्यांच्या कार्यारंभाला १०० वर्षे पूर्ण झाली म्हणून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ही दरवर्षी शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या स्त्रीला बाया कर्वे पुरस्कार देते. अर्थात, हे सगळे काही सहजसाध्य नव्हते हे नक्कीच. या कार्यामुळे कर्मठ, सनातन पुणेकरांचा त्यांना रोष पत्करावा लागला. संस्था चालविण्यासाठी पैसे अपुरे पडत असल्याने कित्येक वर्ष अण्णासाहेबांना हिंगणे ते फर्ग्युसन कॉलेज पायी प्रवास करावा लागत असे. आपल्या संस्थांसाठी कुणाकडे देणगी मागायला गेल्यावर कित्येक वेळा त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळत असे. पण अत्यंत जिद्दीने त्यांनी आपले कार्य चालू ठेवले. जपानच्या महिला विद्यापीठाला भेट दिल्यानंतर अण्णासाहेब अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी पुण्यात भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना १९१६ साली केली. पुढे विठ्ठलदास ठाकरसी यांनी १५ लाखांचे अनुदान दिल्याने या विद्यापीठाचे `श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ' (एसएनडीटी) असे झाले. अण्णासाहेबांनी अनेक परदेश दौरे केले. विशेषतः महिलांच्या सबलीकरणाचे आपले अनुभव त्यांनी आफ्रिकेतही जाऊन सांगितले. विधवा महिलांचे प्रश्न आणि त्यांचे शिक्षण यांव्यतिरिक्त जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता यांच्या विरोधातही त्यांनी कार्य केले. कर्वे यांची चारही मुले रघुनाथ, शंकर, दिनकर आणि भास्कर यांनीही पुढे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरीव कार्य केले. मराठी (आत्मवृत्त, इ.स. १९२८) आणि इंग्रजी (लुकिंग बॅक, इ.स. १९३६) अशा दोन्ही भाषांमध्ये त्यांनी आत्मचरित्र लिहिले. स्त्री शिक्षणासाठी कर्वे यांनी खूप मोलाचे कार्य केले. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी या विद्यापीठाची स्थापना त्यांनी एका जपानी महिला विद्यापीठाचे माहितीपत्रक पाहिले होते. त्यांच्या मनात भारतीय महिला विद्यापीठाचा विचार येत होता. विद्यापीठाची प्रस्तावना म्हणून त्यांनी माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली. शिक्षण संस्थांभोवती कार्यकर्त्यांची तटबंदी असावी म्हणून इ.स. १९१० मध्ये ‘निष्काम कर्ममठ‘ या संस्कारपीठाची स्थापना केली. इ.स. १९१५ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान अण्णांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘महिला विद्यापीठ‘ या कल्पनेचा पुनरुच्चार केला. ३ जून, इ.स. १९१६ रोजी महिला विद्यापीठाची स्थापना झाली. स्त्रीशिक्षणाची ही धारा विद्यापीठाच्या रूपाने विस्तार पावली. अंत्यजांना आणि स्त्रियांना दुर्बल घटक लेखून त्यांना विद्येपासून वंचित करणाऱ्या समाजात अण्णांनी आपल्या तपोबलावर हा चमत्कार घडविला. अण्णांच्या कर्तृत्वाने चकित आणि प्रभावित झालेल्या सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपल्या मातोश्री नाथीबाई ठाकरसी यांच्या स्मरणार्थ या विद्यापीठास १५ लाख रुपयांची देणगी दिली. या ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी‘ या विद्यापीठास सरकारने स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा दिला. अनेक प्रज्ञावंत महिलांनी विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविले. अण्णांना अभिप्रेत असणारे बोधवाक्य विद्यापीठाने शिरोधार्य मानले ते असे- ‘संस्कृता स्त्री पराशक्तिः‘ अण्णांच्या प्रयत्नाने अस्तित्वात आलेल्या प्रत्येक संस्थेचे भरणपोषण केले. इंग्लंड, जर्मनी, जपान, अमेरिका या देशांना भेटी देऊन अण्णांनी आपल्या संस्थांची आणि संकल्पांची जाणीव जगाला करून दिली. बर्लिनमध्ये असताना सापेक्षतावादाचे प्रणेते प्रा. अल्बर्ट आइनस्टाईन यांची त्यांनी भेट घेतली. त्यांनी बर्लिनमधली गृहविज्ञानशाळा पाहिली. टोकियोतील महिला विद्यापीठ पाहिले. अनेक राष्ट्रांत स्त्रियांनी चालविलेल्या संस्था पाहिल्या. त्या दर्शनाने सुचलेल्या अनेक नव्या योजना त्यांनी पूर्णत्वास नेल्या. अनेक भारतीय विद्यापीठांनी त्यांना डी.लिट. देऊन सन्मानित केले. `पद्मविभूषण' हा किताब त्यांना इ.स. १९५५ साली प्रदान करण्यात आला, तर लगेच इ.स. १९५८ साली त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान `भारतरत्‍न'ने सन्मानित करण्यात आले. एकशेचार वर्षांचे दीर्घायुष्य देऊन निसर्गानेही त्यांना सन्मानित केले. पुण्यातच ९ नोव्हेंबर, इ.स. १९६२ला त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. धोंडो केशव कर्वे हे आधुनिक महाराष्ट्रातील स्त्री सुधारणा करणारे एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. आज २०१९ सालीही `कर्वे स्त्री शिक्षण संस्था' दिमाखात उभी आहे, उत्तरोत्तर प्रगती करीत आहे. चरित्रे महर्षी धोंडो केशव कर्वे (डॉ. नीला पांढरे) भारतरत्न डॉ. धोंडो केशव कर्वे (प्रा. शैलेश त्रिभुवन) महर्षी धोंडो केशव कर्वे (लेखक - विलास खोले) नाटक महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जीवनावर वसंत कानेटकर यांनी 'हिमालयाची सावली' नावाचे नाटक लिहिले आहे. संदर्भ वर्ग:भारतरत्‍न पुरस्कारविजेते वर्ग:मराठी समाजसुधारक वर्ग:इ.स. १८५८ मधील जन्म वर्ग:इ.स. १९६२ मधील मृत्यू वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा वर्ग:शतायुषी वर्ग:पुरुष चरित्रलेख
महात्मा फुले
https://mr.wikipedia.org/wiki/महात्मा_फुले
जोतीराव गोविंदराव फुले (११ एप्रिल १८२७ - २८ नोव्हेंबर १८९०), महात्मा फुले नावाने लोकप्रिय, हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य केले. महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. जोतिरावांनी १८४८ मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. खालच्या समजल्या जाणाऱ्या जातींमधील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शोषित वर्गाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे. त्यांना १८८८ मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी सन्माननीय "महात्मा" (संस्कृत: "महान आत्मा", "पूज्य") पदवी प्रदान केली होती. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात. इवलेसे|१९७७ च्या टपाल तिकीटावर महात्मा फुले 'शेतकऱ्यांचे आसूड' हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती. त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्वमान्य आहे. बालपण आणि शिक्षण जोतीराव फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी जोतीराव यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला, जोतीराव यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. इवलेसे|महात्मा फुले वाडा, पुणे. याच ठिकाणी महात्मा जोतिराव फुले त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत आयुष्यातील काही काळ राहिले होते. हा वाडा १८५२ मध्ये बांधला होता. जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. जोतीबांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. ग्रामची या प्रसिद्ध तत्त्ववेत्त्याने महात्मा फुले यांना 'सेंद्रिय बुद्धिवंत' असे संबोधले आहे. जोतीराव करारी वृत्तीचे होते. त्यांस गुरुजनांविषयी व वडीलधाऱ्या माणसांविषयी फार आदर वाटत असे. ते आपला अभ्यास मन लावून करत असत. परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत. शाळेतील शिस्तप्रिय, हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यावेळी पुण्यात बरेच कबीरपंथी फकीर येत असत. चांगले लिहायला व वाचायला येणाऱ्या जोतीरावकडून काही कबीरपंथी फकीर रोज महात्मा कबीरांचा 'बीजमती' हा ग्रंथ वाचून घेत असत. त्यामुळे जोतीरावांच्या मनावर कबीराच्या विचारांची शिकवण चांगलीच बिंबली व कबीराचे अनेक दोहे त्यांना पाठ झाले. त्यातील एक "नाना वर्ण एक गाय, एक रंग है दूध, तुम कैसे बम्मन हं, कैसे सूद " शैक्षणिक कार्य इवलेसे|भिडे वाडा, बुधवार पेठ, पुणे. येथेच १ जानेवारी १८४८ रोजी फुले दांपत्यांनी मुलींची शाळा सुरू केली होती.|डावे महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत: विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली । नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले ।। बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्ऱ्य आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ.स.१८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी-सावित्रीबाईंवर सोपविली. आणि यानंतर जोतीबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या. महात्मा फुलेंनी शिक्षणाची प्रेरणा अहमदनगरच्या मिस फरार यांच्याकडून घेतली होती (मेजर कॅंडी फुलेंच्या शाळेला पुस्तके पुरवत असत). त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्याचं त्याच बरोबर अस्पृश्य मुलांसाठी देखील शाळा सुरू केलीत. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची प्रेरणा मावस बहीण -सगुणाबाई क्षिरसागर यांच्याकडून मिळाली. जोतीराव जसे सार्वजनिक ठिकाणी उपदेशपर भाषणे करीत, तसेच ते शाळांतील शिक्षकांना आदर्श पाठ देऊन शिक्षकांनी मुलांच्या हिताच्या दृष्टीने योग्य ती साधनेनी उपकरणे वापरावी म्हणून शिक्षकांनाही उत्तेजन देत असत. स्थापत्यशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे सत्यशोधक समाजाने एक अर्ज केला. त्या महाविद्यालयामध्ये काही प्रमाणात गरीब ब्राह्मणेतर विद्यार्थांना निःशुल्क शिक्षण द्यावे, अशी त्यांनी प्रार्थना केली होती. त्या अर्जातील त्यांचा हेतू सफल झाला. इवलेसे|महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले. भारत सरकारचे १९९८ चे टपाल तिकीट सामाजिक कार्य मानवी हक्कावर इ.स.१७९१ मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींच्या शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्‍चित मत आणि अनुमान होते. इवलेसे|महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील प्रवेशद्वारातील पुतळा, फोटो: ऑगस्ट २०१० ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व होते. महात्मा फुलेंनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड इ. ग्रंथ लिहून सामाजिक प्रबोधन केले. मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्वकुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचा वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे ज्योतीराव फुलेंनी आपल्या ' सार्वजनिक सत्यधर्म ' संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडली आहे.त्यातील काही महत्त्वाची वचने लिहिली. संसाराविषयी फुले यांचा दृष्टिकोन अर्थातच आशावादी होता. कष्टपूर्वक चालणाऱ्या गृहस्थाश्रमाला ते फार मान देत. कौटुंबिक जीवनाची व समाजाची खरी प्रगती परिश्रमाची वाढ होऊनच होणार आहे. 'कष्टाने जगण्याची ज्यांना धमक नाही, असे लोक संन्यासी व भिक्षुक होतात व प्रपंच खरा नाही, व्य्रर्थ आहे असा भ्रम प्रपंचातील लोकांच्या बुद्धीत उत्पन्न करतात. असे करण्यात त्यांचा आळशी-धूर्तपणाच असतो', असे त्यांचे मत होते. सर्व गावाच्या, प्रांताच्या, देशाच्या, खंडाच्या संबंधात अथवा कोणत्याही धर्मातील स्वतःच्या संबंधात, स्त्री आणि पुरुष या उभयतांनी अथवा सर्व स्त्रियांनी एकमेकात कोणत्याही प्रकारची आवडनिवड (भेदभाव) न करता या भूखंडावर आपले एक कुटंब समजून एकमताने सत्यवर्तन करून राहावे. आपणां सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व प्राणिमात्रांना उत्पन्न करतेवेळी मनुष्यास जन्मतःच स्वतंत्र प्राणी म्हणून निर्माण केले आहे आणि त्यास आपापसात साऱ्या हक्कांचा उपभोग घेण्यास समर्थ केले आहे. आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्याने सर्व मानवी स्त्री - पुरुषांस धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली आहे. जो आपल्यापासून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस कोणत्याही तऱ्हेचे नुकसान देत नाही, अथवा जो कोणी आपल्यावरून दुसऱ्या मानवांचे हक्क समजून इतरांना पीडा देत नाही त्याला 'सत्यवर्तन करणारा' म्हणावे. आपल्या सर्वांच्या निर्मिकाने एकंदर सर्व स्त्री - पुरुषांस एकंदर सर्व मानवी अधिकारांचे मुख्य धनी केले आहे. त्यातून एखादा मानव अथवा काही मानवांची टोळी एखाद्या व्यक्तिवर जबरी करू शकत नाही, त्याप्रमाणे जबरी न करणाऱ्या सत्यवर्तन करणारे म्हणावे. स्त्री अथवा पुरुष जे आपल्या कुटुंबासह, आपल्या भाऊबंदांस, आपल्या सोयऱ्याधायऱ्यांस आणि आपल्या इष्टमित्र साथींना मोठ्या तोऱ्याने पिढीजात श्रेष्ठ मानून आपल्यास पवित्र मानीत नाहीत, आणि एकंदर सर्व मानवी प्राण्यास पिढीजात कपटाने अपवित्र मानून त्यास नीच मानीत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे.इवलेसे|औरंगाबाद येथील पुतळे|डावे स्त्री अथवा पुरुष जे शेतकरी अथवा कलाकौशल्य करून पोटे भरण्यास श्रेष्ठ मानतात, परंतु शेतकरी वगैरे यांना मदत करणाऱ्यांचा आदरसत्कार करतात त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे. महात्मा फुले यांनी मानवास सत्यधर्माचा जो बोध केला त्यातील ही काही वचने आपण वाचली की लक्षात येते , जोतीरावांचा आवाका किती मोठ्ठा होता . त्यांना अखिल विश्वाला कवेत घेणाऱ्या माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा देणारा धर्म साकार करायचा होता. त्यासाठी मानवी वर्तनात, म्हणजेच व्यवहारात काय आमूलाग्र बदल घडवून आणायला हवा यासाठी मानवी स्वभाव आणि मानसिकता यात काय बदल केले पाहिजेत, याबाबतही ज्योतीरावांनी विपुल लेखन केले आहे. 'अखंड' या काव्यप्रकारात त्यांनी 'मानवाचा धर्म', आत्मपरीक्षण, नीती, समाधान, सहिष्णुता, सदसदविवेक, उद्योग, स्वच्छता, गृहकार्यदक्षता, इत्यादी गोष्टींवरही भाष्य केले आहे.जोतिरावांनी वेगवेगळ्या अखंडातून जे विचार मांडले, मानवी जीवनाला दिशा देणारा जो उपदेश केला, त्यामुळे व त्यांच्या समतावादी दृष्टिकोनामुळे समाजाला एक नवी दिशा मिळाली. पुढे हा वारसा त्यांच्या अनुयायांनी चालू ठेवला; त्यामुळे सामाजिक समतेचा जागर कायम राहिला. जोतीराव हे संशोधक नव्हते. ते पंडित नव्हते. ते भाषाशास्त्रज्ञही नव्हते. परंतु ते मूलग्राही विचारवंत होते. अवतारवादाची कल्पना त्यांना समूळ निर्मूलन करावयाची होती. महाभारताच्या काळापर्यंत ही अवतारवादाची कल्पना नव्हती. नंतर पुराणात ती घुसडली गेली असे दिसते. जोतीराव हे धर्मशास्त्राचे पंडितही नव्हते. तथापि चित्पावन ब्राह्मण हे आफ्रिकेतील पूर्व किना-यावरून किंवा इराण, इजिप्त किंवा पेलेस्टाईनमधून आले असावेत, हे त्याचे विधान कोणत्याही इतिहासकाराने खोदून काढलेले नाही. उलटपक्षी काही इतिहासकार आणि संशोधक यांना, जोतीरावांच्या विधानाला पाठिंबा मिळेल असे पुरावे आढळले आहेत. आधुनिक भारतामध्ये सामाजिक पुनर्घटनेसाठी चळवळ सुरू करणारी पहिली संस्था म्हणजे सत्यशोधक समाज होय. सत्यशोधक समाजाने सामाजिक गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजाचा आवाज ही हिंदुस्थानात अनेक शतके दडपून टाकलेल्या कनिष्ठ समाजाची किंकाळी होय. वेद हे ईश्वरनिर्मित नसून ते मानवनिर्मित आहेत, असे जोतीरावांचे ठाम मत होते. वेदाने समाजात भेद पडले . म्हणून वेद म्हणजे भेद असे त्यांना वाटे. ब्राह्मणांच्या पोथीतील जातींच्या उत्पत्तीविषयीची कल्पना त्यांना मुळीच मान्य नव्हती. ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण जन्मले, क्षत्रिय बाहुतून जन्मले, शूद्र त्याच्या पायातून निघाले हे विधान त्यांना भयंकर आणि धादांत असत्या वाटे. "मनुस्मृती" ही शूद्रांच्या बोकांडी गुलामगिरी बसविते म्हणून ती अपवित्र आहे, असे म्हणून त्यांनी मनुस्मृतीचा धिक्कार केला आहे. बुद्धाविषयी जोतिरावांना नितांत आदर वाटे. महाराष्ट्रातील संत कवींचा जोतीरावांनी धिक्कार केला आहे. मुकुंदराज, ज्ञानेश्वर, रामदास यांनी ब्राह्मणांच्या दुष्टाकर्मांचा उघड रीतीने त्याग करण्याचे धैर्य दाखविले नाही. समाजातील ब्राह्मणांचे वर्चस्व राहण्यासाठी ह्या महाराष्ट्र संत कवींनी साह्य केले, असा जोतीरावांनी निष्कर्ष काढला आहे. सत्यशोधक समाज २४ सप्टेंबर इ.स. १८७३ रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. वेदांना झुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरुवात केली. इवलेसे|कृषी महाविद्यालय, पुणे येथील पुतळा महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई यांच्याबरोबर १९ स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य करीत होत्या. त्याचवेळी सावित्रीबाई ह्या एका कन्याशाळेच्या शिक्षिकाही होत्या. दीनबंधू प्रकाशनाने सत्यशोधक चळवळीच्यावेळी लेखन-प्रकाशनचे काम केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत चळवळ पोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला. न्यायापासून, अत्याचारांपासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥ हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. लेखन साहित्य 'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून दीनबंधू हे साप्ताहिक चालविले जाई. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. 'सार्वजनिक सत्यधर्म' हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला. इवलेसे|तत्कालीन पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांनी 3 डिसेंबर 2003 रोजी नवी दिल्लीतील संसद भवन येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.|डावे 'सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक' हा फुले यांचा शेवटच ग्रंथ. तत्त्वज्ञ म्हणून त्यांचे थोरपण या ग्रंथातून लक्षात येते. 'सत्यमेव जयते' हे बीजसूत्र घेऊन साकारलेला हा ग्रंथ सत्यावर आधारलेल्या नव्या सर्वसमावेशक धर्माच्या तत्त्वज्ञानाची मांडणी करणारा ग्रंथ आहे. प्रस्थापित हिंदू धर्मातील सनातनी ब्राम्हण्यावादी तत्त्वज्ञाने निर्माण केलेल्या शोषण व्यवस्थेने बहुजन समाज समूह पूर्णतः नागवला गेला होता. त्याला नवा जीवनमार्ग दाखवण्यासाठीच २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि या सत्यशोधक समाजासाठी आचारधर्म सांगण्याच्या आवश्यकतेतून सार्वजनिक 'सत्य धर्म पुस्तका'ची निर्मिती झाली आहे. डॉ. नागनाथ कोतापल्ले म्हणतात, "सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक म्हणजे सत्याशोधाकांचा आचारधर्मच होय. परंतु हा आचारधर्म कर्मकांडाच्या पातळीवरील नाही तर एकूण माणसाला सुखाकडे नेहरा, विचारशक्तीला प्राधान्य देणारा, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांना केद्रवर्ती स्थान देणारा असा आहे. पारलौकिक विश्व फुले यांना मान्यच नाही. तेव्हा याच लौकिक जीवनाच्या सुखाचा शोध घेणारा असा हा सत्य धर्म आहे." त्यामुळेच माणसाच्या सुखाचे चिंतन प्रकट करणारा हा ग्रंथ मौलिक आहे. इवलेसे|कराड रा. ना. चव्हाण यांनी ‘सारसंग्राहक’ या पुस्तकात सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाचे सार एकत्र केले आहे. पहिल्या प्रकरणात सार दिले असून दुसऱ्या प्रकरणात फुले यांचे धर्मपर विचार दिले आहेत. एकेश्वर फुले, एकेश्वर समाजवाद, महात्मा फुले व ब्राह्मधर्म या प्रकरणांतून हे सर्व सार समजते. महात्मा फुले यांचं समग्र लेखन आणि साहित्य हे समाजाला दिशादर्शक आणि प्रेरणादायी असंच आहे लोकशाही राज्यव्यवस्थेत वर्तमानपत्र ही लोकशाहीचे आधारस्तंभ मानले जातात तत्कालीन स्थितीमध्ये हे वर्तमानपत्र लिहिणारे वर्तमानपत्रांचा अधिकार हा उच्चवर्णीय समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणारा होता त्यामुळे या काळात महात्मा फुले यांनी तत्कालीन पत्रकारितेवर टीका केली त्याचप्रमाणे पत्रकारिता तशी असावी याविषयीचा मापदंड देखील त्यांनी घालून दिला. एक मूलगामी विचारवंत म्हणून महात्मा फुले यांनी मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली. त्याचबरोबर बहुजन समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्या काळामध्ये वृत्तपत्र लिखाणदेखील केले. क्रांतिकारी व सुधारणावादी लेखक या नात्याने महात्मा फुले यांनी समग्र वाङ्मय लिहिले आहे त्यांच्या 'शेतकऱ्यांचा असूड', 'गुलामगिरी' या ग्रंथांतून सामाजिक स्थिती व त्यातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग याचे समग्र चित्रण महात्मा फुले यांनी केले आहे. त्यांच्या लिखाणात तत्कालीन निद्रिस्त उपेक्षित समाजाला जागृत करून, त्या समाजामध्ये शोषणाविरुद्ध बंड करण्याची ताकत निर्माण करण्याची क्षमता होती. यामुळेच महात्मा फुले यांचे लिखाण हे निर्विवाद क्रांतिकारी आहे. जोतीराव फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना मुंबईतील सेभेत १८८८ मध्ये ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे जोतीराव फुले हे "महात्मा फुले" या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, त्यांपैकी काही ही :- लेखनकाळसाहित्य प्रकार नाव इ.स.१८५५ नाटक तृतीय रत्‍न जून, इ.स. १८६९ पोवाडा छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा जून इ.स. १८६९ पोवाडा विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी इ.स.१८६९ पुस्तक ब्राह्मणांचे कसब इ.स.१८७३ पुस्तक गुलामगिरीसप्टेंबर २४ , इ.स. १८७६ अहवाल सत्यशोधक समाजाची तिसऱ्या वार्षिक समारंभाची हकीकतमार्च २० इ.स. १८७७ अहवाल पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट एप्रिल १२ , इ.स. १८८९ निबंध पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभ २४ मे इ.स. १८७७ पत्रक दुष्काळविषयक पत्रक १९ ऑक्टोबर इ.स. १८८२ निवेदन हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन १८ जुलै इ.स. १८८३ पुस्तक शेतकऱ्याचा असूड ४ डिसेंबर इ.स. १८८४ निबंध महात्मा फुले यांचे मलबारींच्या दोन टिपणांविषयीचे मत ११ जून इ.स. १८८५ पत्र मराठी ग्रंथागार सभेस पत्र १३ जून इ.स. १८८५ पुस्तक सत्सार अंक १ऑक्टोंबर इ.स. १८८५ पुस्तक सत्सार अंक २ १ ऑक्टोंबर इ.स. १८८५ पुस्तक इशारा २९ मार्च इ.स.१८८६ जाहीर प्रकटन ग्रामजोश्यांसंबंधी जाहीर खबर२ जून इ.स. १८८६ पत्र मामा परमानंद यांस पत्रजून इ.स. १८८७ पुस्तक सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधी इ.स. १८८७ काव्यरचना अखंडादी काव्य रचना १० जुलै इ.स. १८८७ मृत्युपत्र महात्मा फुले यांचे उईलपत्र इ.स. १८९१ (प्रकाशन) पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक जीवनक्रम अ.क्र.दिनांक / महिना इ.स.घटना १. एप्रिल ११ इ.स.१८२७ जन्म (कटगुण, सातारा) २. इ.स. १८३४ ते १८३८ पंतोजींच्या शाळेत मराठी शिक्षण. ३. इ.स. १८४०नायगावच्याच्या खंडोबा नेवसे पाटील यांच्या सात वर्षाच्या सावित्रीबाई नावाच्या कन्येशी विवाह. ४. इ.स. १८४१ ते १८४७ मिशनरी शाळेत माध्यमिक (इंग्रजी) शिक्षण. ५. इ.स. १८४७लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा तालीम व इतर शारीरिक शिक्षण आणि क्रांतिकारक विचार. ६. इ.स. १८४७ टॉमस पेन कृत “राईट ऑफ मॅन” या ग्रंथाचे मनन. ७ इ.स. १८४८ उच्चवर्णीय मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत झालेला अपमान . ८. इ.स.१८४८ शूद्रातिशूद्रांसाठी मुलींची शाळा. ९ इ.स. १८४९ शिक्षणदानाचे व्रत घेतल्याने पत्‍नी सावित्रीबाई फुले यांच्यासह करावा लागलेला गृहत्याग. १० इ.स. १८४९ मराठी प्रकाशनांना अनुदान देण्याची मागणी करणाऱ्या सुधारकांच्या सभेला दिलेले संरक्षण. ११ इ.स. १८५१ चिपळूणकरांच्या वाड्यातील व रास्ता पेठेतील मुलींच्या शाळांची स्थापना.१२नोव्हेंबर १६इ.स.१८५२मेजर कॅंडी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण कार्याबद्दल सरकारी विद्याखात्याकडून सत्कार. १३ इ.स. १८४७थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास. १४ इ.स. १८४८ मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला. १५ इ.स.१८४८ भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले. १६ सप्टेंबर १७ इ.स.१८५१ भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात. १७ इ.स.१८५२पूना लायब्ररीची स्थापना. १८ मार्च १५ इ.स.१८५२ वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. १९ नोव्हेंबर १६ इ.स.१८५२ मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार. २० इ.स.१८५३ 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स' स्थापन केली. २१ इ.स.१८५४स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी. २२ इ.स.१८५५रात्रशाळेची सुरुवात केली. २३ इ.स.१८५६ जोतिबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्‍न झाला. २४ इ.स.१८५८ शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली. २५ इ.स.१८६० विधवाविवाहास साहाय्य केले. २६ इ.स.१८६३ बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. २७ इ.स.१८६५ विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला. २८ इ.स.१८६४ गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला. २९ इ.स.१८६८ दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.३०इ. स. १९६९छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा लेखन ३१जून इ. स. १९६९'शिक्षण विभागाचे ब्राह्मण पंतोजी' रचना ३२इ. स. १९६९'ब्राह्मणाचे कसब' या पुस्तकाचे लेखन ३३१३ ऑगस्टइ. स. १९६९भगवान परशुराम याला नोटीस ३४इ. स. १८७३' गुलामगिरी' ३५२४ सप्टेंबर इ.स.१८७३सत्यशोधक समाजची स्थापना केली. ३६ इ.स.१८७५ शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर). ३७ इ.स. १८७५ स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले. ३८ इ.स. १८७६ ते १८८२ पुणे नगर पालिकेचे सदस्य होते. ३९ इ.स. १८८०दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला. ४० इ.स.१८८०नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन' या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले. ४१ इ.स.१८८२ 'विल्यम हंटर शिक्षण आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली. ४२ इ.स.१८८७ सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली. ४३ इ.स.१८८८ ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार. ४४११ मे इ.स.१८८८मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली. ४५ नोव्हेंबर २८ इ.स.१८९० पुणे येथे निधन. प्रभाव महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रात रुजवण्यासाठी दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनी खूप मेहनत घेतली. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना समाजप्रबोधनासाठी मदत केली. ब्राम्हणेतर चळवळीसाठी जेधे-जवळकर जोडीने अवघा महाराष्ट्र ढवळून काढला. इवलेसे|पुणे येथील सुप्रसिद्ध महात्मा फुले मंडई इवलेसे|कोल्हापूर येथील बिंदू चौकातील महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे|डावे तृतीय रत्‍न तृतीय रत्‍न या नाटकाचा सारा इतिहास नाट्यपूर्ण आहे. जोतीरावांनी २८ व्या वर्षी इ.स. १८५५ साली हे नाटक लिहिले. नाटक लिहिण्याचा हेतू जोतिबा लिहितात, ‘भट जोशी आपल्या मतलबी धर्माच्या थापा देऊन अज्ञानी शूद्रास कसकसे फसवून खातात व ख्रिस्ती उपदेशक आपल्या निःपक्षपाती धर्माच्या आधाराने अज्ञानी शूद्रास खरे ज्ञान सांगून त्यास कसकसे सत्यमार्गावर आणतात, या सर्व गोष्टीविषयी म्या एक लहानसे नाटक करून इ.स. १८५५ मध्ये दक्षिणा प्राइज कमिटीला अर्पण केले; परंतु तेथेही असल्या भिडस्त भट सभासदांच्या आग्रहामुळे युरोपियन सभासदांचे काही चालेना. तेव्हा त्या कमिटीने माझी चोपडी नापसंत केली. अखेर मी ते पुस्तक एकीकडेस टाकून, काही वर्षे लोटल्यानंतर दुसरी लहानशी ब्राह्मणांच्या कसबाविषयी नवीन चोपडी तयार करून आपल्या स्वतःच्या खर्चाने छापून प्रसिद्ध केली." इवलेसे|महात्मा फुले. चित्र दिनांक: इ.स. १८९१ च्या पूर्वी या नाटकाचे प्रत्यक्ष किती खेळ झाले, त्याला प्रतिसाद कसा मिळाला, याविषयी ठोस पुरावा उपलब्ध नाही. प्रथम इ.स. १९७९ मध्ये ‘पुरोगामी सत्यशोधक’मधून एप्रिल-मे-जूनच्या अंकात नेमक्या प्रस्तावनेसह हे नाटक प्रकाशित झाले. प्रा. सीताराम रायकर यांना बुलढाणा येथील पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्या संग्रही या नाटकाच्या तीन हस्तलिखित प्रती मिळाल्या. तीनपैकी एका प्रतीवर त्रितीय नेत्र असेही शीर्षक प्रा. रायकरांना आढळले. इ.स. १८५५ मध्ये लिहिलेल्या नाटकाच्या हस्तलिखित प्रती इ.स. १९७९ (१२५ वर्षांचा कालखंड उलटल्यानंतर) मिळतात, ही एक नाट्यपूर्ण घटनाच आहे. मराठी रंगभूमीचा प्रारंभ इ.स. १८४३ साली विष्णूदास भावे यांनी केला. पण मराठी नाट्यलेखन १८५६ साली प्रथम झाले आणि तेही गो.म. माडगावकर यांच्या ‘व्यवहारोपयोगी नाटक’ या पाचप्रवेशी नाटकापासून असे मानले जाई. पण तृतीय रत्‍न (तृतीय नेत्र) या इ.स. १८५५ साली लिहिलेल्या नाटकामुळे पहिले लिखित मराठी नाटक असून, जोतिराव फुले हे पहिले मराठी नाटककार आहेत. आपली परिवर्तनवादी चळवळ सशक्त आणि परिणामकारक करण्यासाठी ‘नाटक’ या हत्याराचा वापर करण्याचा त्यांचा हेतू होता. नाटकाचे स्वरूप या नाटकाला रूढ कथानक नाही. त्यात एक शोषकाचा, एक शोषिताचा असे दोन पक्ष आहेत. अशिक्षित कुणबी, त्याची बायको, भिक्षुक जोशी, त्याचा भाऊ, त्याची पत्‍नी, एक ख्रिस्ती धर्मोपदेशक, एक मुसलमान आणि विदूषक अशी एकूण आठ पात्रे आहेत. या सर्वच पात्रांना स्वतःचे असे चेहरे नाहीत. नाटकाची संकल्पना प्रातिनिधिक पातळीवर आहे. समाजातील एक विशिष्ट वर्ग जन्माने उच्च असल्याच्या एकमेव भांडवलावर समाजातील दुसऱ्या एका अंधश्रद्ध, अडाणी, गरीब वर्गाला कसा लुबाडत असतो, नागवित असतो याचेच प्रातिनिधिक चित्रण या नाटकात आहे. नाटक म्हणून तृतीय रत्‍नचे लेखन सलग झालेले असून ती अनेक प्रवेशांची मालिका आहे. त्यात लेखकाने पात्रे, स्थळ, काळ, प्रसंग आणि संवाद यात मुक्त संचार पद्धतीचाच वापर केला आहे. त्या दृष्टीने या नाटकाला मुक्तनाट्य किंवा वगनाट्य (वग म्हणजे ओघ. कथानकामधे खंड पाडू न देता ओघाओघाने सांगणे.) म्हणता येईल. दोन फेऱ्या मारल्या की, राजवाडा, आणखी दोन चकरा मारल्या की, घनदाट जंगल ही जशी लोकनाट्यात भरपूर सोय असते तशीच रचना तृतीय रत्‍नची आहे. ठरावीक नाट्यगृह, रंगमंच, प्रकाशयोजना यांचीही गरज नाही. लोक जमताच कोठेही नाटक सादर केले जावे अशीच याची अत्यंत लवचीक रचना आहे. ‘पथनाट्य’ म्हणूनसुद्धा या नाटकाला विशेष महत्त्व आहे. या नाटकातील ‘विदूषक’ हे पात्र अतिशय महत्त्वाचे आहे. विदूषक या संस्कृत कलोत्पन्न पात्रासह संस्कृत कुलोत्पन्न अशाच त्रितीय रत्‍न (किंवा त्रितीय नेत्र) या शीर्षकाखाली जोतिबांनी मराठी नाट्यरचना सुरू केलेली आहे. पण त्यांनी परंपरागत रचना नाकारलेली आहे. या विदूषकाचे सांकेतिक रूप, त्याचा खादाडपणा, आचरट बोलणे याला पूर्णपणे फाटा दिलेला आहे आणि अत्यंत वेगळाच विदूषक रंगभूमीवर साकारण्याचा प्रयत्‍न जोतिबांनी केलेला आहे आणि तो यशस्वीही झालेला आहे. हा ‘विदूषक’ एकाच नाटकात अनेक भूमिका वठविणारा आहे. काही प्रसंगी तो निवेदक आहे. काही प्रसंगी तो भाष्यकार आहे. काही ठिकाणी तर त्याची भाषा जहाल आणि तिखट झालेली जाणवते. उपहास, नेमके वर्मावर बोट ठेवणे, बिंग फोडणे आणि रहस्य उलगडून दाखविणे आणि ज्ञानाचा मार्ग धरा हा उपदेश करणे ही कामेही तो अत्यंत चोखपणे करीत असतो. एकाच वेळी नाटकातील पात्रांच्या कृतीमधून प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे अजब कसब व्यक्त होते. महात्मा फुले लिखित ऐतिहासिक 'तृतीय रत्न' हे नाटक 2015 साली पुण्यामधून दिग्दर्शक सिद्धार्थ सिताराम मोरे यांनी बसवायला सुरुवात केली. यातील विदूषकाची भूमिका ते स्वतः करत होते. तर जोगबाईची भूमिका अभिनेत्री सुप्रिया सिद्धार्थ या करत होत्या. या नाटकाचे सुरुवातीचे निर्माते विजय कांबळे होते. काही कारणास्तव कांबळे साहेब यांनी माघार घेतली त्यानंतर सिद्धार्थ मोरे यांनी निर्मितीची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन या नाटकाचे प्रयोग सादर केले. फुलेंवर लिहिलेली पुस्तके असूड (मराठी नाटक) लेखक : डॉ. सोमनाथ मुटकुळे क्रांतिजागर : महात्मा फुले यांची समग्र कविता (डॉ. रवींद्र ठाकूर) क्रांतिबा फुले (नाटक) अनुवादक : फ.मुं. शिंदे. (मूळ आचार्य रतनलाल सोनग्रा साहित्य अकादमीचे प्रकाशन) गोष्टीरूप महात्मा फुले (बालसाहित्य, लेखक - शंकर कऱ्हाडे) पहिली भारतीय शिक्षिका- सावित्रीबाई फुले (चरित्र) लेखक : बा.ग. पवार भारतीय समाजक्रांतीचे जनक महात्मा जोतीराव फुले (ना.ग. पवार) महात्मा (मराठीत आणि इंग्रजीत, डॉ. रवींद्र ठाकूर) महात्मा ज्योतिबा फुले (चरित्र) लेखक : ग.द. माळी महात्मा जोतिबा फुले (चरित्र) लेखिका : गिरिजा कीर महात्मा जोतिबा फुले (चरित्र) लेखक : गोविंद तळवलकर महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले (चरित्र) लेखिका : अनुराधा गद्रे महात्मा ज्योतिबा फुले यांचा सार्वजनिक सत्यधर्म (संपादित) प्रकाशक : श्री गजानन बुक डेपो महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांचे कार्य. लेखक : विठ्ठलराव भागवत महात्मा जोतीबा फुले (चरित्र) लेखक : सुखदेव होळीकर महात्मा जोतीबा फुले (संपादित) प्रकाशक : सूर्या अध्यापन साहित्य महात्मा जोतीबा फुले यांचे १०१ मौलिक विचार. संपादन : नागनाथ कोतापल्ले महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : धनंजय कीर महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : नागेश सुरवसे महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : निर्मळ गुरुजी महात्मा ज्योतीराव फुले (चरित्र) लेखक : पंढरीनाथ सिताराम पाटील महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : भास्कर लक्ष्मण भोळे महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : रमेश मुधोळकर महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : वसंत शांताराम देसाई महात्मा जोतीराव फुले - जीवन आणि कार्य. लेखक : दिलीप मढीकर महात्मा जोतीराव फुले यांचे शेतीविषयक विचार. संपादन : नूतन विभूते ; मनोविकास प्रकाशन महात्मा जोतीराव फुले - वारसा आणि वसा. लेखक : भास्कर लक्ष्मण भोळे महात्मा जोतीराव फुले सार्वजनिक सत्यधर्म (विश्वनाथ शिंदे) महात्मा फुले आणि शेतकरी चळवळ (संपादित) प्रकाशक : सुगावा प्रकाशन महात्मा फुले आणि सत्यशोधक चळवळ. लेखक : मा.प. बागडे महात्मा फुलेंची जीवनक्रांती. लेखिका : लीला घोडके महात्मा फुले जीवन आणि कार्य (संपादित). प्रकाशक : भारतीय विचार साधना प्रकाशन पुणे महात्मा फुले टीका आणि टीकाकार. लेखक : नीलकंठ बोराडे महात्मा फुले दुर्मिळ वाङ्‌मय आणि समकालीन चरित्रे. लेखक : मा.गो. माळी महात्मा फुले यांचा शोध व बोध. लेखक : रा.ना. चव्हाण महात्मा फुले यांची कविता-एक विचार मंथन (शशिशेखर शिंदे) महात्मा फुले यांचे निवडक विचार (संपादित) प्रकाशक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य. लेखक : तानाजी ठोेंबरे महात्मा फुले यांच्या अप्रकाशित आठवणी (संपादित) प्रकाशक : श्री गजानन बुक डेपो महात्मा फुले यांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग. लेखक : विद्याकर वासुदेव भिडे महात्मा फुले राजर्षी शाहू आणि वैचारिक प्रवास. लेखक : हरिभाऊ पगारे महात्मा फुले व सांस्कृतिक संघर्ष. लेखक : भारत पाटणकर महात्मा फुले व्यक्तित्व आणि विचार. लेखक : गं.बा. सरदार महात्मा फुले समग्र वाङ्मय - संपादक धनंजय कीर. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती आणि मंडळ महात्मा फुले सामाजिक क्रांतीचे अग्रदूत. लेखक : दत्ता जी. कुलकर्णी युगपुरुष महात्मा जोतीराव फुले. लेखक : बा.ग. पवार युगार्त (जोतिबा व सावित्रीबाई फुले यांच्यावरील चरित्रात्मक कादंबरी, लेखक - बाळ लक्ष्मण भारस्कर) महात्मा जोतीराव फुले - नजरीयात और ऊन का अदब.सरसरी जायजा,(ऊर्दू) लेखिका - डाॅ.नसरीन रमझान सैय्यद (पुणे) महात्मा फुलेंचे कार्य : शोध आणि बोध -- संपादक ..प्रा.डॉ. नरसिंग कदम ( उदगीर ) महात्मा फुले : साहित्य आणि विचार संपादक प्रा.डॉ. नरसिंग अप्पासाहेब कदम फुलेंवरील नाटके व चित्रपट महात्मा फुले (मराठी चित्रपट) निर्माते-दिग्दर्शक आचार्य अत्रे. महात्मा जोतीबा फुले (लोकनाट्य) लेखक : शंकरराव महात्मा जोतीराव फुले (नजरियात और उनका अदब (उर्दू) लेखिका : डा नसरीन रमजान सैय्यद) मी जोतीबा फुले बोलतोय (एकपात्री नाटक) : लेखक-सादरकर्ते कुमार आहेर. कुमार आहेरांना या कार्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्‍कार’ दिला आहे. सत्यशोधक (मराठी नाटक) लेखक : गो.पु. देशपांडे; दिग्दर्शक अतुल पेठे जोती सावित्री ( मराठी ऐतिहासिक नाटक ) लेखक व निर्माते : मंगेश एस.पवार,कविता मोरवणकर,दिग्दर्शक : प्रमोद सुर्वे सावित्रीजोती ही फुले दांपत्यावरील मालिका सोनी मराठी वाहिनीवर ६ जानेवारी २०२० पासून प्रदर्शित होत होती. ही मालिका दशमी क्रिएशनची निर्मिती होती. सावित्रीबाई फुले यांची भूमिका अभिनेत्री अश्विनी कासार यांनी साकारली होती, तर जोतीराव फुले यांची भूमिका ओंकार गोवर्धन यांनी केली होती. मालिकेचे दिग्दर्शन उमेश नामजोशी यांचे असून नितीन वैद्य यांची निर्मिती होती. प्रभाव आणि सन्मान इवलेसे|३ डिसेंबर २००३ रोजी नवी दिल्लीतील संसद भवन येथे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. thumb|फुले दांपत्याचे पुतळे, औरंगाबाद महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांच्या जीवन-कार्यावर आधारित, नाटक "मी जोतीराव फुले बोलतोय ..!" ...याची सुरुवात २००२पासून पुण्यातून झाली. या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक-संगीतकार-गीतकार आणि निर्माते सिद्धार्थ सीताराम मोरे हे आहेत तसेच महात्मा जोतिराव फुले यांची प्रमुख भूमिका सुद्धा सिद्धार्थ मोरे यांनीच साकारली आहे. तर सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत अभिनेत्री सुप्रिया सिद्धार्थ या आहेत. हे नाटक मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये सादर केले जाते. हे नाटक संपूर्ण देशभर देखील सादर झाले आहे. सन २०१० साली या नाटकाचा पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर येथे ७५० वा प्रयोग सादर झाला. पिंपरी-चिंचवड महापालिका ही 'फुले आणि आंबेडकर' यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करते. जोतीबा फुले यांच्या आयुष्यावर इ.स. १९५५ साली आचार्य अत्रे यांनी 'महात्मा फुले’ नावाचा चित्रपट काढला होता. त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. जोतिबांच्या जीवनावर 'असूड’ नावाचे एक नाटक डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी लिहिले आहे. या नाटकाचे रंगभूमीसाठी दिग्दर्शन बी. पाटील यांनी केले आहे. जोतीराव फुल्यांच्या गावी म्हणजे खानवडी येथे, दरवर्षी महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन भरते. याशिवाय फुले-आंबेडकर साहित्य संमेलन, फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन, सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन आदी अनेक दलित साहित्य संमेलने फुले यांच्या नावाने भरतात. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाच्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत. संदर्भ बाह्य दुवे महात्मा फुले समग्र वाङ्मय, १९९१, आवृत्ती. ५ pdf महात्मा फुले समग्र वाङ्मय, (पीडीएफ इ-पुस्तक) वर्ग:इ.स. १८२७ मधील जन्म वर्ग:इ.स. १८९० मधील मृत्यू वर्ग:मराठी समाजसुधारक वर्ग:मराठी समाजसेवक वर्ग:मराठी व्यक्ती वर्ग:मराठी लेखक वर्ग:भारतीय इतिहाससंशोधक वर्ग:भारतीय समाजसुधारक वर्ग:दलित इतिहास वर्ग:दलित नेते वर्ग:भारतीय तत्त्वज्ञ वर्ग:जातीविरोधी कार्यकर्ते वर्ग:पुरुष चरित्रलेख
अंकगणित
https://mr.wikipedia.org/wiki/अंकगणित
अंकगणित ही गणिताची एक प्रमुख शाखा आहे. यात अंक व त्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास केला जातो ओळख मूलभूत अंकगणितामधे संख्यांच्या गुणाकार व भागाकारविषयक गुणधर्मांचा अभ्यास केला जातो. बीजगणितीय अंकगणित (अल्जेब्राईक नंबर थिअरी) नामक याची एक शाखा असून तीमधे केवळ नैसर्गिक संख्या वा कॉम्प्लेक्स संख्यांचा (= काम्प्लेक्स नंबर्स) अभ्यास न करता अनेक अमूर्त संख्यांचाही अभ्यास केला जातो. आधुनिक अंकगणित हे बीजगणितीय भूमिती (अल्जेब्राईक जिअोमेट्री), कम्युटेटीव्ह् अल्जेब्रा व फिल्ड थिअरी या विषयांसोबत अत्यंत मुळापासून जोडलेले आहे. जगप्रिद्ध "फर्माचा शेवटचा सिद्धांत" व "गोल्डबाखचे तर्कीत" (गोल्डबाखचे कंजक्चर) हे गणितातील प्रश्न मुळात अंकगणितातीलच आहेत. मुंबईमधील "टाटा मूलभूत-संशोधन-केंद्र" हे अंकगणित, बीजगणितीय भूमिती, कम्युटेटीव्ह् अल्जेब्रा व फिल्ड थिअरी या विषयांतील त्यांच्या संशोधनासाठी जगप्रसिद्ध आहे. अंकगणित : अंकगणितात प्रामुख्याने धन पूर्णाकांच्या (म्हणजे १, २, ३, ४... या नेहमीच्या स्वाभाविक संख्यांच्या) गुणधर्मांचा अभ्यास केला जातो. धन पूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार इ. गणितकृत्ये तसेच क्षेत्रफळ, घनफळ, व्याज, सरासरी, शेकडेवारी इ. व्यवहारोपयोगी प्रश्नांमध्ये उपयुक्त असणारी सूत्रे व त्यांचा वापर करण्याच्या विविध पद्धती यांचा अंक गणितात विशेष उपयोग होतो. अंकगणितात वापरली जाणारी सूत्रे तर्क कठोरपद्धतीने सिद्ध करण्यावर फारसा भर दिला जात नाही तर ती गृहीत धरून त्यांचा नित्य व्यवहारातील प्रश्न सोडविण्यासाठी कसा उपयोग करता येईल याकडे विशेष लक्ष दिले जाते. संख्यांच्या व्याख्या आणि त्यांचे गुणधर्म यांचा ⇨संख्या सिद्धांत या गणितीय शाखेत विचार करण्यात येतो व या दृष्टीने अंकगणित हे संख्या सिद्धांताचे प्राथमिक स्वरूप आहे असे म्हणण्यास हरकत नाही. संच या संकल्पनेच्या आधारे धनपूर्णांक व यांची बेरीज म्हणजे काय हे सुलभतेने मांडता येते. १, २, ३, ४,... ही अंक चिन्हे सुपरिचित आहेत. त्यांच्या संचास ध म्हणतात. आता कोणत्याही दिलेल्या संचास किती घटक आहेत हे कसे मोजतात ते पाहू. समजा का या संचात या चिन्हांनी निर्देशित असे घटक आहेत. म्हणजेच का = { } या संचातील कोणताही एक घटक घेऊन त्याच्याशी १ या अंकचिन्हाची जोडी लावली. नंतर दुसरा घटक घेऊन त्याच्याशी २ या अंकचिन्हाचा संबंध जोडला आणि राहिलेल्या घटकाशी ३ ची जोडी जमवली. अशा प्रकारे दिलेल्या का या संचाशी {१, २, ३} या ध च्या उपसंचाशी एकास-एक संबंध प्रस्थापित झाला. उपरोक्त उपसंचातील शेवटचे अंकचिन्ह ३ म्हणजेच का मधील घटकांची संख्या होय. हेच, का चा संचांक ३ आहे असेही मांडतात. याचप्रमाणे दुसऱ्या एखाद्या खा संचांक {१, २, ३..., १०, ११} या ध च्या उपसंचाचा एकास-एक संबंध जोडता येत असेल तर खा मध्ये ११ घटक आहेत किंवा खा चा संचांस ११ आहे असे म्हणता येईल. याच पद्धतीने कोणत्याही दिलेल्या संचासाठी संचांक (म्हणजे त्यात असलेल्या घटकांची संख्या) काढता येईल. यामध्ये संचातील वस्तू कोणत्या प्रकारच्या आहेत याला महत्त्व नाही हे सहजच लक्षात यावे [→ संच सिद्धांत]. आता दोन धन पूर्णांकांची बेरीज म्हणजे काय ते पाहू. समजा का आणि खा हे दोन वियुक्त संच आहेत (म्हणजेच या दोन संचांमध्ये कोणताही घटक समाईक नाही). या का आणि खा या दोन संचांचे सर्व घटक एकत्रित करून गा हा संच बनवला तर गा ला का आणि खा यांचा युतिसंच असे म्हणतात, व तो का U खा असा दर्शवतात. या युतिसंचातील घटकांच्या संख्येस (का U खा च्या संचांकांस) ग म्हटले, आणि का, खा चे संचांक अनुक्रमे क आणि ख आहेत असे मानले तर ग ही संख्या क आणि ख ची बेरीज आहे असे म्हणतात, आणि हेच ग = क + ख असे लिहितात. वर्ग:गणित
भूमिती
https://mr.wikipedia.org/wiki/भूमिती
thumb|right|250px|पायथागोरसाचा सिद्धान्त - काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजूंवर उभारलेल्या चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज त्रिकोणाच्या कर्णावर उभारलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळाइतकी असते. भूमिती (ग्रीक: γεωμετρία ; इंग्रजी: Geometry, जॉमेट्री / जिऑमेट्री ; अर्थ: भू -जमीन, मिती -मापन ;) ही आकृत्यांचे आकार, आकारमान व अवकाशाचे गुणधर्म अभ्यासणारी गणिताची एक शाखा आहे. ज्ञात इतिहासानुसार अभिजात गणिताच्या शाखांमधील सर्वाधिक प्राचीन शाखांमध्ये भूमितीची गणना होते. आरंभिक कालखंडात लांबी, क्षेत्रफळ व घनफळ इत्यादी गुणधर्मांच्या व्यावहारिक अभ्यासापर्यंत सीमित असणाऱ्या भूमितीला इ.स.पू.च्या ३ ऱ्या शतकात युक्लिड या ग्रीक तत्त्वज्ञाने केलेल्या विषयाच्या संगतवार मांडणीमुळे सैद्धान्तिक बैठक मिळाली. आर्किमिडीज या ग्रीक पदार्थवैज्ञानिकाने याने क्षेत्रफळे आणि आकारमान मोजण्यासाठी आधुनिक पूर्णांकी गणन पद्धतीचे तंत्र कुशलतेने विकसित केले . खगोलशास्त्रामुळे, विशेषतः ग्रहताऱ्यांची आकाशातील स्थाने निश्चित करण्यासाठी आणि त्यांच्या हालचालींमधील परस्पर संबंध मांडून दाखवण्यासाठी पुढची दीड हजार वर्षे भूमितीचा उपयोग केला गेला. पूर्वीच्या काळी युरोपात भूमिती आणि खगोलशास्त्र हे सात कलांमध्ये गणले जात. रेने देकार्त याने लावलेला निर्देशकांचा (coordinates) शोध आणि त्याच दरम्यान लागलेल्या बीजगणितातील शोधांमुळे वेगवेगळ्या भौमितिक आकृत्यांचे गणिती समीकरणांद्वारे विश्लेषण करणे शक्य झाले. या शोधांनी १७ व्या शतकात अतिसूक्ष्म कलनशास्त्राचा (infinitesimal calculus) विकास करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे जाउन त्रिमितीदर्शनाद्वारे असे दिसून आले की भूमितीचा उपयोग केवळ आकृत्यांच्या मोजमापापुरता मर्यादित नाही. यातूनच पुढे प्रक्षेप भूमितीचा (projective geometry) विकास झाला. पुढे ऑयलर आणि गाउस यांनी भौमितिक वस्तूंच्या अंगभूत संरचनेचा अभ्यास करून भूमितीशास्त्रात मोलाची भर टाकली. यातूनच topology आणि अवकल भूमितीची (differential geometry) मुहूर्तमेढ रोवली गेली. युक्लिडच्या काळात भौतिक आणि भौमितिक अवकाशातील सीमारेषा सुस्पष्ट नव्हती. एकोणिसाव्या शतकात अयुक्लिडीय भूमितीचा शोध लागल्यापासून अवकाश या संकल्पनेत आमूलाग्र बदल झाले आणि त्यातून भौतिक अवकाशाला भौमितिक अवकाशाची कोणती संकल्पना जुळेल असा विचार सुरू झाला. विसाव्या शतकात गणिताचा अधिकृतरित्या उदय झाल्यानंतर अवकाश या संकल्पनेचा नैसर्गिक आशय लुप्त झाला त्यामुळे भौतिक, भौमितिक आणि अमूर्त अवकाश यांमध्ये फरक करणे आवश्यक झाले. सध्या भूमितिमध्ये manifolds (असे अवकाश कि जे युक्लिडीय अवकाशापेक्षा बरेच वेगळे असते, पण लहान प्रमाणात युक्लिडीय अवकाशाशी मिळतेजुळते असते) या संकल्पनेचा विचार केला जातो. आधुनिक भूमितीचा भौतिकशास्त्राशी खूप ठिकाणी संबंध येतो, उदा. सापेक्षता सिद्धांत आणि कृतक-रीमानीय (pseudo-Riemannian) भूमिती. भूमितीचा इतिहास पायथागोरस प्लेटो युक्लिड आर्किमिडीज श्रीनिवास रामानुजन बाह्य दुवे वर्ग:गणित वर्ग:विस्तार विनंती
त्रिकोणमिती
https://mr.wikipedia.org/wiki/त्रिकोणमिती
त्रिकोणाच्या, विशेषतः काटकोन त्रिकोणाच्या बाजू आणि कोन यांच्या परस्परसंबंधांचा अभ्यास करणाऱ्या गणितशाखेस त्रिकोणमिती असे म्हणतात. प्राचीन काळापासून खगोलशास्त्र, वास्तुरचनाशास्त्र, अंतर - मापन यासाठी त्रिकोणमितीचा वापर होतो. पृष्ठीय त्रिकोणमितीच्या संकल्पना वापरून गोलीय तसेच वक्र भूमितीचा अभ्यास करता येतो. या दोन शाखांचा संकर करून गोलीय त्रिकोणमिती ही शाखा निर्माण झाली आहे.भूमिती त्रिकोणमिती कल्पना ईसापूर्व तिसऱ्या शतकात आली. ती भूमिती आणि खगोलशास्त्रीय अभ्यासांच्या अनुप्रयोगांमध्ये वापरली जात होती. भारतीयांनी त्रिकोणमितीय प्रमाणातील सर्व मूल्ये मिळवण्यासाठी एक तक्ता तयार केला. आमच्या इतिहासात भूगर्भीय, सर्वेक्षण, खगोलीय यांत्रिकी, नॅव्हिगेशन, व्हिडिओ गेम्स, बुल्डींग्जची उंची मोजण्यासाठी इत्यादी सारख्या अनेक फाईलमध्ये त्रिकोणमिती लागू केली जाते. ट्रिंगोमेट्री संबंध आणि ओळख म्हणून ओळखली जाते जी सर्वत्र स्वीकारली जाते. त्रिकोणमिती कार्ये दरम्यान नवीन संबंध मिळविण्यासाठी कोणीही त्रिकोणमिती ओळख वापरू शकतो. इतिहास इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात, युक्लिड आणि आर्किमिडीज सारख्या गणितांनी वर्तुळांमधील जीवा आणि कोरलेल्या कोनांच्या गुणधर्मांचा अभ्यास केला. ते आधुनिक त्रिकोणमितीक सूत्राच्या बरोबरीचे सिद्धांत सिद्ध करण्यास सक्षम होते. त्यांनी सूत्रांचे पुरावे भूमितीय पद्धतीने सादर केले. इ.स. १४० बी.सी मध्ये हिप्परकसने त्रिकोमिती आणि गोलाकार त्रिकोणमितीतील समस्यांचे निराकरण करण्यासाठी जीवाचे प्रथम तक्ते (जे आता साइन व्हॅल्यूजचे टेबल म्हणून वापरले जातात) दिले. दुसऱ्या शतकात ग्रीको-इजिप्शियन खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यांनी तपशीलवार त्रिकोणमितीय सारणी तयार केली .त्यांनी त्रिकोमिती कार्याची व्याख्या करण्यासाठी जीवाची लांबी वापरली (जी आपण आज गणनामध्ये वापरतो).आधुनिक साइन संमेलनाची प्रथम साक्षात सूर्यसिद्धांतात झाली. भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांनी इ.स.५ व्या शतकात याची आणखी स्थापना केली. दहाव्या शतकात, इस्लामिक गणितज्ञ सर्व सहा त्रिकोणमितीय कार्ये वापरत होते, त्यांचे मूल्ये मांडले होते, आणि त्यांना गोलाच्या भूमितीतील अडचणींवर लागू करीत होते. त्रिकोमितीचा वापर गणिताच्या प्रमुख शाखांमध्ये वाढला. हे नेव्हिगेशनमध्ये वापरले जाते.१५९५ मध्ये त्रिकोनोमेट्रिया प्रकाशित करून बार्थोलोमियस पिटिसकस हा शब्द वापरणारा सर्वप्रथम होता. आज गेममा फ्रिशियस पहिल्यांदाच त्रिकोणीकरणाची पद्धत वर्णन करते जी आज सर्वेक्षणात वापरली जाते. १७ व्या शतकात स्कॉटिश गणितज्ञ जेम्स ग्रेगरी आणि कोलिन मॅकलॉरिन यांनी काम केले. १८ व्या शतकात ब्रूक टेलरने सामान्य टेलर मालिकेची व्याख्या केली. त्रिकोणमिती मूल्य सारणी कार्ये०३०४५६०९०साइन० १/२१/√२√३/२१ कोस१ √३/२ १/√२  १/२०टॅन०१/√३१√३ -कॉसेक -२√२  २/√३१सेक१२/√३√२२१कॉट-√३११/√३० त्रिकोणमिति संबंध सूत्रे इवलेसे समीप आकृतीमध्ये () कोन. अ (विरुद्ध), ब (समीप) आणि एच (कर्ण) बाजू = अ/एच = ब/एच = अ/ब संदर्भ *
बीजगणित
https://mr.wikipedia.org/wiki/बीजगणित
बीजगणित (अरबी: جبر; इंग्लिश: Algebra, अल्जिब्रा / अल्जेब्रा ;) ही गणिती क्रिया व संबंध यांचे नियम अभ्यासणारी आणि त्यांतून उद्भवणाऱ्या बहुपद्या, समीकरणे व बैजिक संरचना अभ्यासणारी गणिताची एक प्रमुख शाखा आहे. भूमिती, विश्लेषण, चयन व संख्या सिद्धान्त या गणिताच्या अन्य शाखांसह बीजगणित शुद्ध गणिताचा महत्त्वाचा भाग मानले जाते. इंग्लिश भाषेमधील अल्जिब्रा हे नाव मुहम्मद बिन मुसा अल्-ख्वारिझ्मी ह्या एका इराणी गणितज्ञाच्या "अल्-किताब अल्-जब्र वा-इ-मुकाबला" (अरबी الكتاب الجبر والمقابلة ;) ह्या प्रबंधाच्या शीर्षकावरून आले आहे. भासकराचारय लीलावतेी माधे समीकरणाचा ाबहयास केला बाह्य दुवे वर्ग:गणित
त्रिभुज प्रदेश
https://mr.wikipedia.org/wiki/त्रिभुज_प्रदेश
thumb|कृष्णा नदीने तयार केलेला त्रिभुज प्रदेश, उपग्रह चित्र त्रिभुज प्रदेश म्हणजे नदीच्या मुखाजवळ नदीने वाहून आणलेल्या गाळामुळे तयार झालेला त्रिकोणी प्रदेश होय. मोठ्या नद्यांचे त्रिभुज प्रदेश नदीच्या पात्राला सहसा अनेक प्रवाहांमध्ये विभागतात. निर्मिती त्रिभुज प्रदेशाची निर्मिती ही नदीवर अवलंबून असते. या प्रदेशातील जमीन गाळाची व बहुधा दलदलयुक्त असते. एखाद्या नदीच्या मुखाजवळ तयार होणाऱ्या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती खालील घटकांवर अवलंबून असते : नदीतील गाळाचे प्रमाण नदीचा मुखाजवळील वेग सागराची खोली त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्य सागरप्रवाह नदी समुद्राला जाऊन मिळताना नदीच्या शेवटच्या टप्प्यात नदीप्रवाहाचा वेग कमी होतो. वेग मंदावलेल्या प्रवाहातील वाळू, माती, खडी, दगड इत्यादी नदीच्या मुखाशी जमा होत जातात. खडी आणि वाळू जड असल्यामुळे सहसा ते सर्वांत पहिल्यांदा जमा होतात. माती हलकी असल्यामुळे समुद्रात आतपर्यंत वाहून नेली जाते. खाऱ्या पाण्यामुळे मातीच्या गुठळ्या तयार होतात व त्या गुठळ्यांमुळे माती जड होते आणि तळाशी जाऊन साचू लागते. अशा गाळाचे एकावर एक थर साठून त्रिभुज प्रदेश तयार होतो. नंतर या प्रदेशावर वनस्पती वाढून त्याला स्थैर्य देतात. बऱ्याच वेळा त्रिभुज प्रदेशाचा आकार पक्ष्याच्या पायांप्रमाणे अनेक फाटे पडल्यासारखा असतो. उंचीच्या दृष्टिकोनातून हा प्रदेश सखल मैदानी असतो. त्याची समुद्रसपाटीपासून उंची सहसा २० मीटरांपेक्षा जास्त नसते. त्रिभुज प्रदेशावर लाटा किंवा भरती-ओहोटी यांचा फारसा परिणाम होताना आढळत नाही. thumb|गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशाचे उपग्रह चित्र प्रमुख उदाहरणे सर्वांत प्रसिद्ध त्रिभुज प्रदेश नाईल नदीवर आहे. गंगा-ब्रह्मपुत्रा या नद्यांनी केलेले बांग्लादेशमधील त्रिभुजप्रदेश, अ‍ॅमेझॉन, मिसिसिपी, ऱ्हाइन, डॅन्यूब इत्यादी नद्यांचे त्रिभुज प्रदेश प्रसिद्ध आहेत. मिसिसिपी नदीचा त्रिभुज प्रदेश हा जगातील सर्वात विस्तृत त्रिभुज प्रदेश आहे. त्याचे क्षेत्रफळ ३१,००,००० किमी२ पेक्षा अधिक आहे. भारतीय उपखंडात कृष्णा, गोदावरी, कावेरी, महानदी,ओदिसा या नद्यांचे त्रिभुज प्रदेश विशेष लक्षणीय आहेत. संपूर्ण माहिती(Moin) त्रिभुज प्रदेश : नदी जेथे समुद्रास अथवा सरोवरास मिळते तेव्हा मुखाशी गाळाचा सपाट प्रदेश निर्माण होतो त्यास त्रिभुज प्रदेश म्हणतात. तो ग्रिक भाषेतील Δ डेल्टा या अक्षरासारखा दिसतो म्हणून इंग्रजी भाषेत त्यास डेल्टा म्हणतात तर मराठीत त्रिभुज (त्रिकोणी) प्रदेश म्हणतात. नदीच्या मुखाशी उतार कमी झाल्याने संथ वाहणारे पाणी सर्व गाळ वाहू शकत नाही. त्यामुळे पात्रातच गाळ साचल्याने मुख भरून येते आणि नदीचे पाणी दुसऱ्या मुखाने नवा मार्ग काढून समुद्रास मिळते व कालांतराने ते मुखही गाळाने भरून आल्याने नदी तिसऱ्या मुखाने समुद्रास मिळते, त्यामुळे नदी बहुमुखी बनते. नदीच्या अशा मुखप्रवाहांस उपमुख म्हणतात. नदीस जेथून उपमुख नद्या फुटतात तेथून त्रिभुज प्रदेश सुरू होतो. त्रिभुज प्रदेशातील जमीन सामान्यतः सखल असते. तिची उंची सहसा २० मी. पेक्षा जास्त नसते. काही उपमुख नद्या खोल पाण्याच्या, तर काही गाळाने भरलेल्या दिसतात. त्रिभुज प्रदेशाची निर्मिती नदीच्या गाळाचे प्रमाण, मुखाशी समुद्राची खोली, मुखाशी नदीचा वेग, समुद्रप्रवाह, पावसाचे प्रमाण व जलवाहन क्षेत्राची वैशिष्ट्ये इ. घटकांवर अवलंबून असते. म्हणूनच काही नद्यांस त्रिभुज प्रदेश नाहीत. उदा., ॲमेझॉन नदीचा वेग मुखाशी इतका जास्त आहे, की प्रवाह पुढे ५०० किमी. पर्यंत समुद्रात वाहतो. परिणामतः या नदीचा त्रिभुज प्रदेश लहान आहे. संथपणे उथळ कॅस्पियन समुद्रास मिळणाऱ्या व्होल्गाचा त्रिभुज प्रदेश विस्तीर्ण आहे. त्रिभुज प्रदेशाचे आकारावरून मुख्य तीन प्रकार पडतात. उथळ संथ पाण्यात परिपूर्ण सलग त्रिभुज प्रदेश बनतात त्यास ‘पंखा’ (कमानी) त्रिभुज प्रदेश म्हणतात. उदा., नाईलचा त्रिभुज प्रदेश. खोल समुद्रात तुटक विस्कळित त्रिभुज प्रदेश आढळतात त्यांस ‘खगपद’ त्रिभुज प्रदेश म्हणतात. उदा., मिसिसिपीचा त्रिभुज प्रदेश. मिसिसिपीचा त्रिभुज प्रदेश हा सर्वात मोठा (क्षेत्रफळ ३१,२०० चौ. किमी.) त्रिभुज प्रदेश आहे. तिसरा प्रकार ‘कुस्पेट डेल्टा’ नावाने ओळखला जातो. त्यात नदीमुखापासून शिंगासारखे दिसणारे संचयनाचे बांध वक्राकार दोन्ही बाजूंस वाढत जातात. उदा., टायबर नदीचा त्रिभुज प्रदेश. त्रिभुज प्रदेश सतत विस्तारत असतात आणि त्यामुळे नवीन जमीन तयार होते. व ती सुपीक असते. पूर व पाण्याचा निचरा ह्या त्रिभुज प्रदेशातील शेतीच्या समस्या होत. कराची, कलकत्ता, रंगून, बसरा, कैरो, न्यू ऑर्लीअन्स, ॲस्ट्राखान यांसारखी अनेक मोठी बंदरे आणि शहरे त्रिभुज प्रदेशात आढळतात व नदीखोऱ्याचा व्यापार त्यांद्वारे चालतो
त्र्यंबक बापूजी ठोंबरे
https://mr.wikipedia.org/wiki/त्र्यंबक_बापूजी_ठोंबरे
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (१३ ऑगस्ट १८९० - ५ मे १९१८) हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्गकवी होते. इ.स. १९०७मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्या संमेलनात ठोंबरेंना बालकवी ही उपाधी दिली. बालकवींची काव्यकारकीर्द उणीपुरी दहा वर्षांची होती. मराठी लेखक आणि कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक यांच्याबरोबर त्यांनी बालपणातील काही काळ घालवला . रेव्ह. ना.वा. टिळक यांनी त्र्यंबकमधील प्रतिभा ओळखून त्यांना आपल्या घरी आणले. लक्ष्मीबाई टिळक यांचे बालकवींबरोबर मातृत्वाचे संबंध होते. बालकवी जेव्हा टायफॉईडने आजारी होते तेव्हा रेव्ह. टिळकांनी व लक्ष्मीबाईंनी चाळीस दिवस त्यांची काळजी घेतली. लक्ष्मीबाईंनी त्यांच्या स्मृतिचित्रे या आत्मचरित्रात बालकवींच्या काही आठवणींचा उल्लेख केला आहे. स्मृतिचित्रे, लक्ष्मीबाई टिळक, पृष्ठे ३१८-३२२ काव्यपरिचय बालकवींच्या बहुतेक कवितांत निसर्ग मध्यवर्ती असला तरी रूढ अर्थाने निसर्गवर्णन हा त्यांच्या कवितांचा हेतू नाही. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे ते सहजोद्गार आहेत. निसर्गातील विविध दृश्यांत त्यांना मानवी भावना दिसतात. म्हणजे हे निसर्गाचे मानवीकरण नाही किंवा अचेतन वस्तूवर चेतनारोप नाही. ‘फुलराणी’तील एक कलिका आणि सूर्यकिरण यांची नाजूक प्रीतिकथा ह्या दृष्टीने लक्षणीय आहे. ती जेवढी अतिमानवी तेवढीच मानवी आहे. ‘अरुण’मध्ये पहाट फुलते या घटनेभोवती कल्पनाशक्तीच्या विभ्रमांचे भान हरविणारे जाळे विणले आहे; पण त्या केवळ उत्प्रेक्षा नव्हेत. त्या घटनेत भाग घेणाऱ्या निसर्गातील विविध गोष्टी तिथे सजीव होतात. इतकेच नव्हे तर कवितेच्या किमयेने रसिकही त्यांच्याशी एकरूप होतात. त्यांमागील दिव्य आणि मंगल यांच्या कवितेत अलौकिकाचा स्पर्श होतो. साध्या वर्णनात प्रतिकाची गहिरी सूचना लपलेली असते. मर्ढेकरांच्या कवितेवर बालकवींचा मोठा प्रभाव होता. अगदी अलीकडच्या ग्रेस आणि ना.धों. महानोर यांसारख्या परस्परांहून भिन्न प्रकृतीच्या कवींच्या घडणीतही बालकवींचा प्रभाव जाणवेल. रोमांचवादी संप्रदायाची तत्त्वे विषयांचे बंधन नको, निसर्गाचे वर्णन, अज्ञेयवाद आणि गूढगुंजन, ओसाड जागेचे व रात्रीच्या भयाणपणाचे तन्मयतेने वर्णन, अतिमाणूस व्यक्तींचे वर्णन, मरणाची उत्कंठा, स्वप्नाळू वृत्ती, दर्पयुक्त आशावाद, आत्मकेंद्रितता, समाजाविरुद्ध बंडखोरी, वस्तुजाताचे वर्णन करीत असताना वास्तववादाचा अवलंब न करता कल्पनावादाचा (आयडिअलिझम) अवलंब करणे. उदासीनता बालकवींच्या एकूण कवितेमध्ये उदासीनता व्यक्त करणाऱ्या बारा-तेरा तरी कविता आहेत. कविबाळे, पाखरास, दुबळे तारू, यमाचे दूत, निराशा, पारवा, शून्य मनाचा घुमट, काळाचे लेख, खेड्यातील रात्र, संशय, हृदयाची गुंतागुंत, जिज्ञासू, बालविहग ह्या कविता त्यांपैकीच होत. जोपर्यंत बालकवींची तंद्री आनंदी होती तोपर्यंत त्यांची कविता म्हणजे ‘अलवार कोवळे अंग, जशि काय फुलांची मूस’ होती, पण जेव्हा ही तंद्री कोळपल्यासारखी झाली तेव्हा त्यांची कविता ‘उदासीनता’च झाली. ‘शून्य मनाच्या घुमटा’त ‘दिव्यरूपिणी सृष्टी’ भीषण रूप धारण करू लागली. काळाच्या ‘भोवऱ्या’त पडून ‘जीवित केवळ करुणासंकुल’ झाले, मनाचा पारवा ‘खिन्न नीरस एकांतगीत’ गाऊ लागला. ‘अस्मान’ ‘धरणी’ला मिळून ‘रात्रिचा’ ‘अवकाळ प्रहर’ ‘घोर’पणे ‘घुमा’यला लागला. ‘भरले घर ओके’ ‘मायेच्या हलकल्लोळा’त ‘मायेच्या हिरव्या राव्या’ला दुखवून ‘जडता पसरलेला’ जीव ‘देहाचे पंजर’ टाकून उडून गेला. ‘यमाचे दूत’ बोलावू लागले. बालकवींच्या प्रसिद्ध कविता आनंदी आनंद गडे औदुंबर फुलराणी श्रावणमास बालकवींच्या कविता असलेली पुस्तके फुलराणी : बालकवींच्या निवडक कविता (कुसुमाग्रज- वि.वा. शिरवाडकर). ह्या संग्रहात ५७ कविता आहेत. बालकवींच्या निवडक कविता (संपादक - ना.धों. महानोर). या संग्रहात ३१ कविता आहेत. शिवाय बालकवींनी लिहिलेली त्यांच्या हस्ताक्षरातील पत्रेही आहेत. बालकवींच्या बालकथा (आत्मकथन) बालकवींच्या बालकविता (कवितासंग्रह, या संग्रहात २६ कविता आहेत) बालविहग (कवितासंग्रह, संपादक - अनुराधा पोतदार, या संग्रहात एकूण ७५ कविता आहेत.) समग्र बालकवी (संपादक - नंदा आपटे) बालकवींवर लिहिली गेलेली पुस्तके बालकवि (कृ.बा. मराठे) बालकवी (विद्याधर भागवत) बालकवी : मराठी कवी (व्यक्तिचित्रण, डॉ. दमयंती पांढरीपांडे) बालकवी आणि सुमित्रानंदन पंत - एक अभ्यास (मराठी आणि हिंदीतील निसर्गकवी (पद्मावती जावळे) त्रिदल : बालकवी, कुसुमाग्रज आणि इंदिरा संत यांच्या निवडक कविता (संपादक- डॉ. दत्तात्रय पुंडे; डॉ. स्नेहल तावरे, स्नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस-पुणे, प्रथमावृत्ती: १५ ऑगस्ट १९९३) या संग्रहामध्ये संपादकांनी बेचाळीस पृष्ठांची विस्तृत प्रस्तावना लिहिली असून त्यामध्ये उपरोक्त तिन्ही कवींच्या सोळा सोळा कवितांचा समावेश केला गेला आहे. ठोंबरे,त्र्यंबक बापूजी ठोंबरे,त्र्यंबक बापूजीवर्ग : मराठी कवी अधिक वाचन विकिस्रोतावर बालकवी यांच्या कविता विकिमीडिया कॉमन्सवर औदुंबर या कवितेचे वाचन संदर्भ वर्ग:मराठी कवी वर्ग:मराठी लेखक वर्ग:इ.स. १८९० मधील जन्म वर्ग:इ.स. १९१८ मधील मृत्यू
तुकाराम (निःसंदिग्धीकरण)
https://mr.wikipedia.org/wiki/तुकाराम_(निःसंदिग्धीकरण)
व्यक्ती 'संत तुकाराम' (तुकाराम बोल्होबा अंबिले, तुकारामबावा) कान्होबा (उर्फ तुकाराम बंधु : हे संत तुकारामांचे बंधु होते -'तुकाराम बंधु' या नावाने लेखन) तुकाराम तात्या संपादक: संकलीत/संपादीत, 'तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा' (प्रकाशन वर्ष इ.स. १८९१ प्रकाशक तत्त्वविवेचक छापखाना, मुंबई) या ग्रंथाचे संपादक. (हे आणि तुकाराम तात्या पडवळ एकच का याची माहिती हवी त्यांचे जन्म आणि मृत्यूवर्ष हवे.) तुकाराम तात्या पडवळ साहित्यिक आणि महात्मा जोतीराव फुल्यांचे समकालीन सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्ते. तुकाराम गंगाधर गडाख तुकाराम गणपत रेंगेपाटील तुकाराम भाऊराव साठे तुकाराम ओंबळे तुकाराम गणपत शेलार तुकाराम जाधव (गिर्यारोहक) चित्रपट संत तुकाराम (मुकपट) : कोहिनूर फिल्म कंपनी (?) 'तुकाराम (बोलपट)', शारदा फिल्म कंपनी, निर्मिती इ.स. १९३२ 'जय विठ्ठल', 'मास्टर अँड कंपनी' निर्मिती, इ.स. १९३२ 'संत तुकाराम (चित्रपट) प्रभात फिल्म कंपनी बॅनर, निर्मिती इ.स. १९३६ तुकाराम (मराठी चित्रपट), दिग्दर्शन: चंद्रकांत कुलकर्णी, निर्मिती इ.स. २०१२ चित्रपट पात्र तात्या तुकाराम तेंदुलकर (खिलाडी ७८६ या हिंदी चित्रपटातील मिथुन चक्रवर्ती यांनी रगंवलेल्या पात्राचे नाव)p7news.tv (हिंदी मजकुर) संस्थळावरील मजकुर दिनांक ३ ऑगस्ट २०१५ रोजी दुपारी १२ वाजून ५० मिनीटांनी जसा पाहीला संदर्भ वर्ग:निःसंदिग्धीकरण पाने
संत तुकाराम
https://mr.wikipedia.org/wiki/संत_तुकाराम
संत तुकाराम हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत - कवी होते. त्यांचा जन्म देहु या गावात वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी 'जगद्‌गुरू' म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - 'पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात. जगद्गुरू तुकाराम लोककवी होते. 'जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा!' अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो. तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण झालेली होती. अशा काळात संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनांतून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य केले. तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच' एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य शब्दकळेत पाझरते. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगलेखनाबरोबरच गवळणीही रचल्या आहेत. संत तुकारामांच्या अभंगाचा अनेकांनी अनेक अंगानी अभ्यास करून त्यांचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखांमध्ये कायम आहे. गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्यांच्या तोंडून मुखोद्गत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव झाला. इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोंचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग, आपली गाथा बुडालेली नाही. तर ती जनसामान्यांच्या मुखांमध्ये अखंड जिवंत आहे. आपल्या कार्याची ही खरी यथोचित पावती आहे. खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे या काळातील लोक संत होते. बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी ठरले. देव धर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचं काम संत तुकारामांनी केले. संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत लौकिक अर्थाने संत तुकाराम हे आठव्या पिढीतील नायक होते. ज्ञानदेवांनी रचलेल्या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने कळसास नेण्याचे काम हे संत तुकारामांनी केलेले आहे. जीवन तुकारामांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत, त्यातली चार संभाव्य वर्षे इ.स. १५६८, इ.स. १५७७, इ.स. १६०८ आणि इ.स. १५९८ ही आहेत. इ.स. १६५० मध्ये हजर असलेल्या तमाम जनतेच्या समक्ष त्यांचा देव, विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेले असे मानले जाते. पण याबद्दल पुरोगामी आणि अतिसुशिक्षित लोकांना साशंकता आहे. तुकाराम महाराज वाणी समाजाचे; त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले आहे. त्यांच्या घराण्यातील विश्वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. तुकारामांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांवरच होती. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवली) हिच्याशी त्यांचा द्वितीय विवाह झाला होता. तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तींचे तडाखे सहन करावे लागले. अनेक प्रापंचिक दुःखे भोगावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले, संसारात विरक्ती आली. या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप ‘श्रीविठ्ठल’ त्यांना भेटला असे मानले जाते. तुकारामांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने-कीर्तने करताना तुकारामांना अभंगांची रचना स्फुरू लागली. सुदुंबरे गावातील त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांचे अभंग कागदावर उतरवून घेण्याचे काम केले. देहू गावातीला मंबाजी नामक बुवाने तुकारामांना खूप त्रास दिला. परंतु तुकारामांच्या पत्नी आवलीने मंबाजींना बदडण्याचा प्रयत्न केल्यावर मंबाजी पळून गेला. पण नंतर तुकारामांचा आध्यात्मिक अधिकार ओळखून त्यानेही त्यांचे शिष्यत्व पत्करले. पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितल्यावरून त्यांना त्यांच्या अभंगांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. हा दिवस 'तुकाराम बीज' म्हणून ओळखला जातो. तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले. सर्व समाज श्रीमंत असावा अशी त्यांची धारणा होती. गरिबांविषयी त्यांना कळवळा होता. त्यांचे अंतकरण महासागरासारखे होते माणुसकीची त्यांना जाणीव होती. ते व्यापारी होते. त्यांनी स्वतःच्या वाट्याला जे आले ते त्यांनी लोकांना दिले. कर्जदारांची कर्ज माफ करणारा हा जगातील पहिला संत होय. जगामध्ये समता नांदावी अशी त्यांची मनोभूमिका होती. संसारातील विरक्तीचा ते महामेरू होते. महात्मा गौतम बुद्धाने जसे राजऐश्वर्याचा त्याग केला. तसा संत तुकाराम यांनी संसारातील सुखदुःखाचा त्याग केला. जगाचा संसार सुरळीत चालविण्यासाठी त्यांनी अभंगांद्वारे मानवाला व एकूणच तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले. त्यांचे मार्गदर्शन समाजाच्या दृष्टीने मौलिक ठरले. समाजातील काही विकृत विकारांच्या लोकांनी संत तुकारामांना वेडा ठरविण्याचा प्रयत्न केला. अनेक कट कारस्थाने रचली, त्यांतून तुकाराम सहीसलामत सुटले. संत तुकारामांना चार मुले होती. कन्या भागीरथी व काशी तर मुलगे नारायण आणि महादेव. यापैकी दोन आजाराने मरण पावले. पहिली बायको गेल्यानंतर त्यांनी पुण्यातील आप्पाजी गुळवे यांची कन्या नवलाई ऊर्फ जिजाऊ हिच्याबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला. ती स्वभावाने खाष्ट होती परंतु सती सावित्रीसारखी पतिव्रता होती. संत तुकारामांचा संसार तिने नीट सांभाळला, त्यांची विरक्ती सांभाळली. संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आत्मचिंतनासाठी तेरा दिवस बसले. ईश्वराची करुणा भाकत चिंतन केले, त्यावेळी त्यांची सर्व देखभाल जिजाऊने केली. संत तुकारामांनी स्वतःचा संसार सुखाचा करण्यापेक्षा जगाच्या कल्याणासाठी कीर्तनातून अभंगवाणी रचली, लौकिकार्थाने मायाजालात गुंतले नाहीत. देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले, त्या स्थानावर नांदुरकीचे एक झाड आहे. तुकाराम बिजेला बरोबर दुपारी १२:०२ वाजता तुकाराम वैकुंठाला गेले, त्या वेळी हा नांदुरकीचा वृक्ष प्रत्यक्ष हलतो, असे सांगितले जाते. संत तुकाराम महाराज हे देहू या गावी जन्मले. संत तुकाराम महाराजांना "जगदगुरू" असे संबोधले जाते. जगदगुरू तुकाराम महाराज हे सदैव "हरिनामात" गढलेले असायचे. होळी नंतर लगेच दुसऱ्या दिवशी "तुकाराम बीज" हा दिवस येतो. याच दिवशी जगदगुरू तुकाराम महाराज हे नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली ध्यानस्त बसून सदेह वैकुंठधामाला गेले. वैकुंठधाम म्हणजे साक्षात "श्री हरि भगवान विष्णू" यांचे धाम. जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या नावातच "राम" आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या एक युगप्रर्वतक महापुरुषाने तुकाराम महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली होती. यामुळे तुकाराम महाराजांना "जगदगुरू" असे संबोधले जाते. वंशावळ विश्वंभर आणि आमाई अंबिले यांना दोन मुले - हरि व मुकुंद यांतील एकाचा मुलगा विठ्ठल दुसऱ्याची मुले - पदाजी अंबिले, शंकर अंबिले, कान्हया अंबिले इवलेसे|संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान आणि वसतीस्थान, देहूगाव बोल्होबा आणि कनकाई अंबिले यांना तीन मुले - सावजी (थोरला). याने तीर्थयात्रेला जाण्यासाठी घर सोडले. मधला तुकाराम व धाकटा कान्होबा जीवनोत्तर प्रभाव संत बहिणाबाई शिवुर ता.वैजापूर ही तुकारामांची शिष्या. तुकारामांनी तिला स्वप्नात गुरुपदेश दिला होता. तुकाराममहाराजांनीं वैकुंठगमन केल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तिला साक्षात दर्शन दिले होते, असे म्हणतात. तुकारामांनी बहिणाबाईला बौद्धांच्या ’वज्रसूची’ या बंडखोर ग्रंथाचे मराठी भाषांतर करायला सांगितले होते. तुकारामांनी लिहिलेली पुस्तके संत तुकाराम गाथा म्हणजे हिंदूची गीता आहे. महाराष्ट्राच्या पावन भूमीत गेली चारशे वर्ष मुक्तीची ज्ञानगंगा या गाथेच्या रूपाने वाहत आहे. ज्ञानोबा, तुकाराम म्हणजे महाराष्ट्राची संस्कृतिक विद्यापीठे आहेत. त्यांचे साहित्य म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा आधारवड आहे. अभंग आणि ओवी हे तळागाळातील समाजात ठाण मांडून बसलेले आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जीवनाची बाग बहरली. ती ज्ञानोबा-तुकारामांच्या या अभंगाची भाषा सरळ आणि सोपी आहे. मुखामध्ये रुळणाऱ्या, कानामध्ये गुंज घालणारे शब्द आहेत. महाराष्ट्रातील देवगिरीच्या यादवांचा अस्त झाल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र अंदाधुंदीचा कारभार सुरू झाला. बहुजन समाजाचे आर्थिक, धार्मिक शोषण सुरू झाले. गुलामगिरीचे जू हिंदूंच्या मानेवर लटकत होते. धर्मसत्ता प्रबळ झालेली होती. हिंदू धर्माला कर्मकांडाची जळमटे चिकटलेली होती. परकीय सत्ता बळकट झाली होती. समाजातील सत्त्व आणि स्वाभिमान हरवलेला होता. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाहीचा विळखा समाजावर घट्ट झाला होता. महाराष्ट्रातील मराठा सरदार वतनांसाठी आपसांमध्ये लढत होते. स्वकीय कोण आणि परकीय कोण याची ओळख उरलेली नव्हती. हिंदू धर्मातील सनातनी लोकांनी चातुर्वर्ण्याची चौकट बळकट केली होती. त्यामुळे समाजात एकता अस्तित्वात नव्हती. अशा या काळामध्ये एक दिव्य ज्योत उदयाला आली. ती म्हणजे धर्म क्रांतीचा पहिला संत - ज्ञानेश्वर - या काळामध्ये पुढे आले. मराठी भाषेतील आध्यात्मिक क्रांतीची पहिली ज्ञान-ज्योत त्यांनी प्रज्वलित केली. तत्कालीन सनातनी धर्म-मार्तंडांनी ज्ञानेश्वरांचा अतोनात छळ केला. परंतु ज्ञानेश्वरांनी धर्मशास्त्रानुसार त्यांना सडेतोड उत्तर दिली. सात शतकांहून अधिक वर्षे ही ज्ञानज्योत तेवत राहिली यातच तिचे थोरपण आहे. ज्ञानेश्वरानंतर जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, नामदेव आणि त्यानंतर संत तुकाराम यांनी भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकवली. भागवत धर्माचा कळस म्हणजे संत तुकाराम,त्यांनी बहुजन समाजामध्ये पसरलेली धर्म कर्मकांडाची जळमटे आपल्या कीर्तनातून पुसून टाकली. अभंगवाणी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसली. अभंगवाणीतून सत्यधर्माची शिकवण जगाला संत तुकाराम यांनी दिली. सामाजिक परिवर्तनाची वादळ सर्वत्र पसरले. या वादळाला थोपविण्यासाठी सनातनी धर्ममार्तंडांनी कल्लोळ केला, कटकारस्थाने रचली अशा अनेक संकटातून नव्हे तर अग्निदिव्यातून जात असताना अभंग सतत गर्जत राहिला. जाती-धर्माची उतरंड त्यांनी मोडून काढली. गुलामगिरीची चौकट मोडली. बहुजन समाजामध्ये स्वाभिमान निर्माण केला. संत तुकाराम हे अभंग वाणी कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र धर्माची शिकवण देणारे या काळातील महत्त्वाचे संत ठरले. संत तुकाराम यांनी बहुजन समाजाला जागृत करून देव आणि धर्म यासंबंधी ठोस मते पटवून देण्याचा प्रयत्न केला. देवभोळेपणा धर्मातील चुकीच्या समजुती त्यांनी प्रयत्नपूर्वक दूर सारण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन धर्ममार्तंडांनी त्यांना खूप विरोध केला. नंतर ते विरोधक नमले. संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही मार्गदर्शनपर ठरलेले आहे. त्यांची वंशावळ पाहिली तर त्यांच्या घराण्यात वारकरी संप्रदायाची परंपरा अखंड दिसते.त्यांच्या घराण्यातील मूळ पुरुष विश्वंभर त्यांची पत्नी रमाबाई हरी आणि मुकुंद अशी त्यांची दोन मुले ही दोन मुले लढाईत मारली गेली. तत्कालीन रूढीप्रमाणे मुकुंदाची पत्नी सती गेली. हरीची पत्नी गरोदर असल्याने सती गेली नाही. हरीला विठोबा नावाचा मुलगा झाला. विठोबाचा दाजी व दाजीचा शंकर, शंकरचा कान्होबा, कान्होबाचा बोल्होबा आणि बोल्होबाचा संत तुकाराम असा हा वंश आहे. संत तुकारामांचे उपनाव मोरे असे होते. वंशपरंपरेने घरी वाण्याच्या दुकानाचा व्यवसाय होता. सावकारी होती. पुण्यापासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर इंद्रायणी नदीकाठी देहू गाव वसले आहे. संत तुकाराम यांचे मूळ पुरुष विश्वंभर यांनी गावांमध्ये विठोबाचे देऊळ बांधलेले होते. घराण्यात वारकरी संप्रदाय अखंड चालत आलेला होता. असा उल्लेख महिपतीकृत संत तुकाराम चरित्रात सापडतो. संत तुकाराम यांच्या घराण्यात आठ पिढ्या सावकारी होती, ते महाजन होते. घरात श्रीमंती नांदत होती. कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती घरी नोकर-चाकर यांची मांदियाळी होती, असे असूनसुद्धा संत तुकाराम या गोष्टींपासून विरक्तच राहिले. संसार असूनसुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थासाठी वाहिले. तुकारामाच्या अभंगांची गाथा महाराष्ट्र सरकारने आणि शिवाय अनेक प्रकाशकांनी पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली आहे. गाथेचे तेलुगू भाषेत भाषांतर (भाषांतरकार - कर्णे गजेंद्र भारती महाराज) तुकाराम गाथा (संपादक नानामहाराज साखरे) दैनंदिन तुकाराम गाथा (संपादक माधव कानिटकर) श्री तुकाराम गाथा (संपादक स.के. नेऊरगावकर) श्री संत तुकाराम महाराजांची गाथा (संपादक ह. भ. प. श्री. पांडुरंग अनाजी घुल) चित्रपट इ.स.१९३६ मध्ये प्रभात फिल्म कंपनीच्या विष्णूपंत दामले आणि फत्तेलाल शेख यांनी मराठीत 'संत तुकाराम' या नावाने चित्रपट बनवला. या चित्रपटाला अपूर्व यश प्राप्त झाले. १२ डिसेंबर १९३६ रोजी मुंबईच्या सेंट्रल सिनेमा येथे प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात विष्णूपंत पागनीस यांनी संत तुकाराम यांचे काम केले होते. ५व्या व्हेनिस चित्रपट उत्सवामध्ये या चित्रपटाला पुरस्कार मिळाला होता. हा मराठी चित्रपट एकाच चित्रपटगृहात वर्षभर चालू होता. हा त्या काळचा उच्चांक होता. त्यानंतर भारतातील अनेक भाषांमध्ये संत तुकाराम यांच्यावर चित्रपट निघाले. हा १९३६ सालचा मराठी चित्रपट येण्याआधी तुकारामांवर तीन चित्रपट बनले होते. पहिला मूकपटांच्या जमान्यात कोहिनूर फिल्म कंपनीने निर्माण केलेला 'संत तुकाराम'. त्यानंतरचे दोन तुकाराम आले ते बोलपटांच्या जमान्यात १९३२ मध्येच. यांपैकी एक तुकाराम निर्माण केला होता 'शारदा फिल्म कंपनी'ने आणि दुसरा 'मास्टर ॲन्ड कंपनी'ने 'संत तुकाराम' अर्थात 'जय विठ्ठल' या नावाने. शुक्ल नावाच्या नटाने यात तुकारामांची भूमिका केली होती. यापलीकडे या चित्रपटाची काहीच माहिती उपलब्ध नाही. हा चित्रपट म्हणजे एका नाटकाचे चित्रण होते. शारदा फिल्म कंपनीचा 'तुकाराम' मात्र चित्रपट म्हणूनच तयार करण्यात आला होता. या 'तुकारामा'चीही काही माहिती आज उपलब्ध नाही. १९६३ मध्ये संत तुकाराम नावाचा कानडी चित्रपट आला होता. दिग्दर्शक - सुंदराराव नाडकर्णी तुका झालासे कळस (मराठी चित्रपट, १९६४) - दिग्दर्शक राजा नेने. या चित्रपटात तुकारामाची भूमिका कुमार दिघे यांनी केली होती. १९६५ मध्ये तुकारामांवर हिंदी चित्रपट आला. त्याचे नाव होते 'संत तुकाराम'. राजेश नंदा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट अशोक फिल्म्सने निर्माण केला होता. शाहू मोडकांनी यात तुकारामाची भूमिका केली होती. तर अनिता गुहा 'आवडी' बनल्या होत्या. त्यानंतर १९७४ मध्ये 'महाभक्त तुकाराम' आला. हा मूळ तामिळ चित्रपट होता,आणि मराठीत डब करण्यात आला होता. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीदेवी यात बालतारका म्हणून पडद्यावर दिसली होती. यानंतर २००२ मध्ये आणखी एक तुकारामांवरचा चित्रपट आला. कृष्णकला फिल्म्सचा 'श्री जगत्गुरू तुकाराम'. इ.स. २०१२सालचा 'तुकाराम' हा चित्रपट या सर्व संतपटांपेक्षा वेगळा आणि आधुनिक विचारसणी मांडलेला चित्रपट आहे. हा चित्रपट चंद्रकांत कुलकर्णींनी दिग्दर्शित केला होता. तुकारामाच्या आयुष्यावर कलर्स मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर ‘तू माझा सांगाती’ नावाची मालिका ११-७-२०१४पासून सुरू झाली. ११ ऑगस्ट २०१८ रोजी तिचा शेवटचा एपिसोड झाला. 'तुका आकाशा एवढा' हा मराठी चित्रपट ???? साली आला होता. दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक - जितेंद्र वाईकर तुकारामांचे चरित्र, अभंग आणि त्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके तुकारामांचे ’तुकारामबाबांचे चरित्र’ नावाचे मराठीतले पहिले चरित्र कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी इ.स. १८९६ साली लिहिले. ’आध्यात्मिक ज्ञान रत्‍नावली’ नावाच्या मासिकात हे चरित्र क्रमश: प्रसिद्ध झाले होते. न्यायमूर्ती रानडे यांनी या चरित्राचे कौतुक केले होते. दक्षिणा प्राईज कमिटीने या पुस्तकाला पहिले बक्षीस दिले होते. चमत्कारांवर भर न देता संत तुकारामांचे थोरपण या पुस्तकात सांगितले आहे. २०१५ साली औरंगाबादच्या साकेत प्रकाशनाने या पुस्तकाची ’संत तुकाराम’ या नावाची नवी आवृत्ती काढली आहे. अन्य पुस्तके - अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची (ग.बा. सरदार) अभंगवाणी श्री तुकयाची (प्रा. डाॅ. गणेश मालधुरे) आनंदओवरी (कादंबरी - लेखक दि.बा. मोकाशी) आनंड डोह (२०१४). नाटक - लेखक : योगेश्वर आनंदाचे डोही आनंद तरंग (कादंबरी, लेखिका मृणालिनी जोशी) ’A complete collection of the poems of Tukáráma, the Poet of Maharashtra (दोन खंड-इ.स.१८६९) मराठीतून इंग्रजीत भाषांतर करणारे : विष्णू परशुरामशास्त्री पंडित, शंकर पांडुरंग पंडित आणि जनार्दन सखाराम गाडगीळ तुका आकाशाएवढा : लेखक गो.नी. दांडेकर तुका झाला पांडुरंग (कादंबरी, भा.द. खेर) तुका म्हणे : लेखक डॉ. सदानंद मोरे तुका म्हणे भाग १, २ : लेखक डॉ. दिलीप धोंगडे तुका म्हणे सोपी केली पायवाट (डॉ. अविनाश वाचासुंदर - दैनंदिन उपयोगाच्या तुकारामांच्या निवडक १५० अभंगांचे निरूपण) तुका झाले कळस (डाॅ. व.दि. कुलकर्णी) तुका झालासे कळस : लेखक डॉ. प्रभाकर श्रावण चौधरी तुका झालासे कळस : लेखक स.कृ. जोशी तुका झालासे कळस : लेखक डॉ. रामचंद्र देखणे तुका झालासे कळस: लेखक अर्जुन जयराम परब तुका झालासे विठ्ठल : (ढवळे प्रकाशन) संत तुकाराम (बाबाजीराव राणे) तुकाराम - अंतर्बाह्य संघर्षाची अनुभवरूपे (म.सु. पाटील) तुकाराम दर्शन (डॉ. सदानंद मोरे) समग्र तुकाराम दर्शन (किशोर सानप) तुकाराम (हिंदी बालनाट्य, लेखिका - धनश्री हेबळीकर, दिग्दर्शन अभिजित चौधरी, निर्माता युवराज शहा) तुकाराम गाथा (भालचंद्र नेमाडे) तुका राम दास (तुलसी आंबिले, लोकसत्ता दैनिकात २०१६ साली प्रसिद्ध झालेल्या दोन सदरांतील मजकुराचे संकलन) तुकाराम नावाचा संत माणूस (विश्वास सुतार) श्री तुकाराम महाराज चरित्र - (प्रा. र.रा. गोसावी, वीणा गोसावी) तुकाराम महाराजांची जीवनसूत्रे : लेखक डॉ. यादव अढाऊ तुकाराम व्यक्तित्व आणि कवित्व : लेखक किशोर सानप आणि मनोज तायडे तुकारामांचा शेतकरी : लेखक डॉ. आ.ह. साळुंखे तुकारामांची अभंगवाणी : लेखक पंडित कृष्णकांत नाईक तुकारामाचे निवडक १०० अभंग : लेखक डॉ. दिलीप चित्रे तुकारामाचे निवडक १००० अभंग (व्हीनस प्रकाशन) तुकारामाच्या अभंगांची चर्चा (खंड १, २) (वासुदेव पटवर्धन) तुका, विठू आणि मी : लेखिका यशश्री भवाळकर तुकोबा : लेखक शंकर पांडुरंग गुणाजी तुकोबाचे वैकुंठगमन दिलीप चित्रे धन्य तुकाराम समर्थ (एकपात्री नाट्यप्रयोग), लेखक व सादरकर्ते नामदेव तळपे निवडक तुकाराम (वामन देशपांडे) ’The poems of Tukārāma’ : translated and re-arranged, with notes and an introduction. लेखक : जे. नेल्सन फ्रेझर आणि के. बी. मराठे. पुन्हा तुकाराम : दिलीप चित्रे प्रसादाची वाणी अर्थात तुका म्हणे (डॉ.सदानंद मोरे) मुलांसाठी तुकाराम (वामन देशपांडे) रोखठोक संत तुकाराम (डाॅ. यशवंतराव पाटीलसर) One Hundred Poems of Tukaram (चंद्रकांत म्हात्रे) वारीच्या वाटेवर महाकादंबरी (दशरथ यादव) विद्रोही तुकाराम : लेखक आ.ह. साळुंखे विद्रोही तुकाराम - समीक्षेची समीक्षा : लेखक आ.ह. साळुंखे संत तुकाराम आणि रेव्ह. टिळक : एक भावानुबंध (लेखक : सुभाष पाटील): श्री संत तुकाराम चरित्र (अनंत पैठणकर) संत तुकाराम (चरित्र) (कृ.अ. केळूसकर, १८९५) संत तुकाराम (बालवाङ्‌मय, रवींद्र भट) संत तुकाराम - व्यक्ती व वाङ्मय (प्रा. डाॅ. शोभा गायकवाड) संत तुकारामांचे अप्रकाशित अभंग (वा.सी. बेंद्रे) तुकारामबावांंच्या गाथेचे ‍‍निरूपण (संपादक : मारुती भाऊसाहेब जाधवगुरुजी; प्रकाशक : संत तुकाराम अध्यासन, ‍कोल्हापूर शिवाजी ‍विद्यापीठ) संतसूर्य तुकाराम (कादंबरी, लेखक : आनंद यादव) साक्षात्कारी संत तुकाराम (शं.दा. पेंडसे) 'Says Tuka (चार खंड) : लेखक दिलीप चित्रे द सेंट पोएट्स ऑफ महाराष्ट्र : देअर इम्पॅक्ट ऑन सोसायटी (इंग्रजी) (१९६९) (गं.बा. सरदार) तुकाराम महाराजांचे नाव दिलेली ठिकाणे तुकाराम उद्यान (निगडी-पुणे) तुकारामनगर (खराडी-पुणे) तुकारामनगर (तळेगाव दाभाडे-पुणे) तुकारामनगर (पिंपरी-पुणे) तुकारामवाडी (जळगांव) तुकारामवाडी (डोंबिवली पूर्व) तुकारामवाडी (पेण-कोंकण) संत तुकाराम कॅन्सर हॉस्पिटल (संत तुकाराम चौक अकोला) चित्रकला-शिल्पकला व मुद्राचित्र विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात हॉलंडमध्ये वास्तव्य असलेल्या चित्रकार, शिल्पकार व कवी भास्कर हांडे यांनी तुकारामाच्या गाथेतील अभंगावरून स्फुरलेल्या चित्रांची शिल्पांची व मुद्रा चित्रांची मालिका तयार केली. तिला 'तुझे रूप माझे देणे' असे नाव दिले आहे. त्या चित्रांची कायमस्वरूपी मांडणी वैश्विक कला पर्यावरण औंध (पुणे) येथे केली आहे. लोकांसाठी हे कलादालन उघडे आहे. गाथेतील अभंगांवर चित्र काढण्याचा हा पहिलाच प्रयोग होता. पुस्तके संत तुकाराम महाराज यांच्याशी संबंधित निवडक पीएच. डी  प्रबंध यादी १. संत तुकाराम आणि महात्मा बसवेश्वर यांच्या भक्तीकाव्याचा तुलनात्मक अभ्यास २. श्री संत तुकाराम व्यक्तित्व व कवित्व ३ संत तुकाराम : व्यक्ती आणि वाण्ग्मय ४ संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील लोकजीवन संदर्भ आणि चिंतन : एक अभ्यास ५ संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील अनौपचारिक मूल्यशिक्षणाचा अभ्यास ६ संत तुकाराम महाराज आणि त्यांची विठ्ठलभक्ती ७. संत तुकाराम आणि संत रामदास यांच्या साहित्यातील मुल्यविचारांचाअभ्यास ८. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व संत रामदास यांच्यासाहित्यात प्रतिबिंबित झालेले चित्तवृतीनिरोधाचे मार्ग ९. संत एकनाथ व संत तुकाराम यांचा अनुबंध : एक अभ्यास १०. संत तुकाराम महाराजांचे तत्त्वज्ञान एक चिकित्सक अभ्यास ११. संत तुकारामांच्या गाथेवरील स्वातंत्र्योत्तर  समीक्षेचा अभ्यास १२. संत तुकाराम गाथा – लोकतत्त्वीय अभ्यास १३. मराठी साहित्यात प्रतिबिंबित झालेले संत तुकारामांचे व्यक्तिमत्त्व १४. संत साहित्यातील कल्याणाच्या अर्थशास्त्राचा एक तौलनिक अभ्यास : विशेष संदर्भ – संत तुकाराम ,ज्ञानेश्वर, एकनाथ व नामदेव १५. संत तुकारामांची गौळण रचना : स्वरूप आणि चिकित्सा बाह्य दुवे संत तुकारामांविषयीचे एक संकेतस्थळ Wikisource येथील तुकाराम गाथा संत तुकाराम समग्र साहित्य संदर्भ वर्ग:वारकरी संप्रदायातील व्यक्ती वर्ग:मराठी संत वर्ग:भागवत धर्म वर्ग:वारकरी संत वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा वर्ग:इयत्ता १० वी मराठी कुमारभारती अभ्यासक्रमाचे संदर्भलेख वर्ग:इयत्ता ८ वी बालभारती अभ्यासक्रम संदर्भलेख
ग. दि. माडगूळकर
https://mr.wikipedia.org/wiki/ग._दि._माडगूळकर
पुनर्निर्देशन गजानन दिगंबर माडगूळकर
सुधीर फडके
https://mr.wikipedia.org/wiki/सुधीर_फडके
रामचंद्र विनायक फडके उर्फ सुधीर फडके (जुलै २५, १९१९ − जुलै २९, २००२) हे महाराष्ट्रातील संगीतकार व गायक होते. बाबूजी या नावानेदेखील त्यांना ओळखले जाते. त्यांनी जवळपास ५० वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. मराठी सुगम संगीतावरील त्यांचे प्रभुत्व वादातीतआहे. फडके यांनी मराठी व्यतिरिक्त अनेक हिंदी चित्रपटांमध्येही गाणी गायली आणि संगीतबद्ध केली. फडके यांनी अनेक अजरामर गीते तयार केली आहेत. त्यांची अनेक भक्तीगीते, सुगम संगीत आणि चित्रपट गीते प्रचंड लोकप्रिय आहेत. कवी ग.दि. माडगूळकर यांचे अजरामर गीतरामायण ही फडके यांच्या सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे. हा कार्यक्रम आजही एवढा लोकप्रिय आहे की, या कार्यक्रमाच्या स्टेज परफॉर्मन्सला आजही प्रचंड गर्दी होते. फडके यांनी यातील सर्व ५६ गाणी संगीतबद्ध केली. जीवन बाबूजींनी शास्त्रीय गायनाचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरच्या कै. वामनराव पाध्ये यांचेकडे घेतले. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९४१ साली एच्.एम्.व्ही या संगीत क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेतून केली. १९४६ साली ते पुण्याच्या 'प्रभात चित्र संस्थे'त संगीत दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांना संगीत दिले. तसेच अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायनसुद्धा केले. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च क्षण म्हणजे त्यांनी १९६० च्या दशकात स्वरबद्ध केलेले 'गदिमां'चे गीत रामायण. गीत रामायणाचे कार्यक्रम तेव्हा रेडियोवर (All India Radio) वर्षभर प्रसारित होत होते. आजही याचे प्रयोग अफाट गर्दी खेचत आहेत. आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस त्यांनी 'वीर सावरकर' या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी चित्रपटाच्या निर्मितीत लक्ष घातले होते. हा चित्रपट जनतेकडून जमा केलेल्या वर्गणीतून निर्माण करण्यात आला होता. बाबूजींनी पार्श्वगायन केलेला व संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुधीर फडके यांनी अफाट श्रम केले. या सर्व इतिहासाची माहिती देणारे पुस्तक - प्रभाकर मोनेयांनी लिहिले आहे. पुस्तकाचे नाव - स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - एक शिवधनुष्य (परचुरे प्रकाशन - २००४) कै. सुधीर फडके हे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'त जवळजवळ ६० वर्षे होते. तसेच अमेरिकेमध्ये 'इंडिया हेरिटेज फाउंडेशन'च्या स्थापनेमागे त्यांचीच प्रेरणा होती.गुजरातमधील दादरा नगर हवेली येथील पोर्टूगिस वासाहती मुक्त करण्यासाठी ,'आझाद गोमन्तक'दलाचे सदस्य होते .2 आगस्ट 1954 रोजी दलाच्या तरुणांना नी सशस्त्र हला करून दादरा वा नगर हवेली पोरतुगिस सत्तेपासून हा प्रदेश मुक्त केला.गोवा मुक्तिसंग्रमातील आझाद गोमंतक दलाचे नेते मोहन रानडे १९५५ मध्ये पोर्तुगीज पोलिसांनी त्यांना अटक केली रानडे यांच्या सुटकेसाठी सुधीर फडके यांच्या अध्यक्षतेखाली ‘मोहन रानडे विमोचन समिती’ स्थापन झाली होती. कारकीर्द संगीतकार बाबूजींनी एकूण १११ चित्रपटांना संगीत दिले. त्यांपैकी २१ चित्रपट हे हिंदी भाषेतील आहेत. त्यापैकी काही गाजलेले चित्रपट पुढीलप्रमाणे : गोकुळ (१९४६) आगे बढो (१९४७) सीता स्वयंवर (१९४८) अपराधी (१९४९) जय भीम (१९४९) माया बाजार (१९४९) राम प्रतीज्ञा (१९४९) संत जनाबाई (१९४९) श्री कृष्ण दर्शन (१९५०) मालती माधव (१९५१) मुरलीवाला (१९५१) पहली तारीख (१९५४) रत्न घर (१९५४) शेवग्याच्या शेंगा (१९५५) देवघर (१९५६) सजनी (१९५६) गज गौरी (१९५८) गोकुल का चोर (१९५९) भाभी की चूडियां (१९६१) प्यार की जीत (१९६२) एकटी (१९६८) आधार (१९६९) दरार (१९७१) शेर शिवाजी (१९८१) रुक्मिणी स्वयंवर आम्ही जातो आमुच्या गावा पुढचे पाऊल जगाच्या पाठीवर सुवासिनी प्रपंच मुंबईचा जावई गायक एक गायक म्हणून बाबूजींनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले. त्यापैकी काही अतिशय गाजलेली मराठी गीते पुढे दिली आहेत. यांतील काही चित्रपटांत नसलेली भावगीतेही आहेत : अंतरीच्या गूढ गर्भी (भावगीत) अशी पाखरे येती (भावगीत) आकाशी झेप घेरे पाखरा (चित्रपट- आराम हराम आहे) ऊठ ऊठ पंढरीनाथा (चित्रपट- झाला महार पंढरीनाथ) कुठे शोधिसी रामेश्वर (भावगीत) जग हे बंदीशाळा (चित्रपट- जगाच्या पाठीवर) डाव मांडून मांडून मोडू नको (भावगीत) तुज सगुण म्हणू की निर्गुण रे (संत-गीत) तुझे गीत गाण्यासाठी (भावगीत) तुझे रूप चित्ती राहो (चित्रपट- गोरा कुंभार) तोच चंद्रमा नभात (भावगीत) दिसलीस तू फुलले ऋतू (भावगीत) देव देव्हाऱ्यात नाही (चित्रपट- झाला महार पंढरीनाथ) देवा तुला दया येईना कशी (चित्रपट- पाटलीण) देहाची तिजोरी (चित्रपट आम्ही जातो अमुच्या गावा) धीरे जरा गाडीवाना (चित्रपट- नरवीर तानाजी) नवीन आज चंद्रमा (चित्रपट- उमज पडेल तर) प्रिया आज माझी नसे साथ द्याया (भावगीत) बाई मी विकत घेतला शाम (चित्रपट- जगाच्या पाठीवर) बोलत नाही वीणा (चित्रपट- पडदा) मानवतेचे मंदिर माझे (चित्रपट- ते माझे घर) यशवंत हो जयवंत हो (चित्रपट- भिंतीला कान असतात) लाडकी शकुंतला (चित्रपट- सुवासिनी) वज्र चुड्याचे हात जोडता विठ्ठला तू वेडा कुंभार (चित्रपट- प्रपंच) सखि मंद झाल्या तारका (भावगीत) स्त्री जन्मा ही तुझी कहाणी (चित्रपट- बाळा जो जो रे) स्वर आले दुरुनी (भावगीत) गीतरामायण कवी ग दि माडगूळकर यांचे अजरामर गीतरामायण ही फडके यांच्या सर्वाधिक लोकप्रिय कामांपैकी एक आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीवर एक वर्ष १९५५-५६ पर्यंत चालला. हा कार्यक्रम आजही एवढा लोकप्रिय आहे की, या कार्यक्रमाच्या स्टेज परफॉर्मन्सला आजही प्रचंड गर्दी होते. फडके यांनी यातील सर्व ५६ गाणी संगीतबद्ध केली आणि ती वेगवेगळ्या गायकांनी गायली (माणिक वर्मा, ललिता देऊलकर, लता मंगेशकर, फडके स्वतः, वसंतराव देशपांडे, राम फाटक, उषा अत्रे). सर्व ५६ गाणी फडके यांनीही त्यांच्या आवाजात रेकॉर्ड झाली. सुधीर फडके यांच्या कारकिर्दीतील मानाचा बिंदू म्हणजे त्यांनी स्वरबद्ध केलेले गदिमांचे गीतरामायण. गीतरामायणात एकूण ५६ गाणी आहेत. त्यामध्ये गदिमांनी रामायणातले सर्व प्रसंग अतिशय ओघवत्या भाषेत वर्णिले आहेत. गीतरामायणाचे आजपर्यंत हिंदी, गुजराती, कन्नड, बंगाली, असामी, तेलुगू, मल्याळी, संस्कृत, कोकणी अशा विविध भाषांमध्ये भाषांतरे झालेली आहेत. या सर्व भाषांतरांचे वैशिष्ट्य म्हणजे भाषांतरकर्त्यांनी अर्थामध्ये एका मात्रेचाही फरक केलेला नाही. ही सर्व भाषांतरे मूळ बाबूजींनी दिलेल्या चालीवरच गायली जातात. बाबूजींनी स्वतः त्यांच्या आयुष्यात गीतरामायणाचे जवळजवळ १८०० प्रयोग केले. हे प्रयोग त्यांनी स्वदेशात तसेच परदेशांत केले. पुरस्कार thumb|200px|सह्याद्री स्वररत्न पुरस्कार स्वीकारताना १. राष्ट्रपती पदक (१९६३) - हा माझा मार्ग एकला या चित्रपटासाठी. २. सह्याद्री स्वररत्न पुरस्कार (२००२) ३. दिनानाथ मंगेशकर पुरस्कार (१९९८) ४. लता मंगेशकर पुरस्कार (२००१) ५. अल्फा जीवन गौरव पुरस्कार (२००१) सन्मान सुधीर फडके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनेक कार्यक्रम होत असतात, त्यांपैकी काही हे :- पिंपरी प्राधिकरणातील मधुगंधर्व संस्थेतर्फे शाहूनगर येथे सुधीर फडके स्मृती गायन स्पर्धा चरित्रग्रंथ जगाच्या पाठीवर (आत्मचरित्र) स्वरश्री बाबूजी : लेखक वसंत वाळुंजकर सन्मान मुंबईतील बोरीवली पूर्व या भागातील एका उड्डाणपुलाला सुधीर फडके यांचे नाव दिले आहे. हे सुद्धा पहा ग.दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांचा सहयोग असलेल्या कलाकृती बाह्य दुवे फडके,सुधीर फडके,सुधीर वर्ग:हिंदुस्तानी गायक वर्ग:भारतीय शास्त्रीय गायक वर्ग:भारतीय गायक फडके,सुधीर फडके,सुधीर वर्ग:संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते वर्ग:मराठी पार्श्वगायक वर्ग:लता मंगेशकर पुरस्कार विजेते
जगदीश खेबुडकर
https://mr.wikipedia.org/wiki/जगदीश_खेबुडकर
जगदीश खेबुडकर (मे १०, इ.स. १९३२ - मे ३, इ.स. २०११) हे मराठी गीतकार होते. जीवन खेबुडकरांचा जन्म १० मे, इ.स. १९३२ रोजी कोल्हापूर - राधानगरी रस्त्यावरील खेबवडे, हळदी या गावी झाला. वडिलांच्या शिक्षकाच्या नोकरीमुळे त्यांच्या सतत बदल्या होत. त्यामुळे खेबुडकरांचे प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. वयाच्या १६ व्या वर्षी मानवते तू विधवा झालीस.. हे खेबुडकरांचे पहिले दीर्घकाव्य लिहिले गेले असे मानले जाते. महात्मा गांधींच्या खुनानंतर जेव्हा त्यांचे घर जाळले गेले. त्या घराच्या राखेचा ढिगारा पाहून हे काव्य त्यांना सुचले. त्यानंतरच त्यांचा कवी आणि गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला. लोकसंगीत, पोवाडा, अभंग, ओवी अशा विविध काव्य प्रकारांमध्ये त्यांनी रचना केल्या. जगदीश खेबूडकर हे पेशाने शिक्षक होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत तीन हजार पाचशे कविता आणि अडीच हजारांपेक्षा अधिक गीते लिहिली. सुधीर फडके, पं. भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर यांच्यापासून ते अलीकडच्या सोनू निगमपर्यंत सर्वच नामांकित गायकांनी त्यांची गीते गायली आहेत. संत एकनाथांच्या रचनांचा त्यांच्यावर प्रभाव होता. भा. रा. तांबे, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, बा. सी. मर्ढेकर या थोर कवींचा प्रभाव आपल्यावर असल्याचे खेबुडकर मानत असत. साधे सोपे परंतु अर्थगर्भ व नादमयी शब्द हे त्यांच्या गाण्याचे वैशिष्ट्य आहे. जेव्हा त्यांच्या शेवटच्या काळात त्यांना आधार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते त्यावेळी उपचार घेतानाही त्यांचे गीत-लेखनाचे कार्य सुरूच होते. कारकीर्द त्यांचे पहिले गीत इ.स. १९५६ रोजी आकाशवाणीवर प्रसारित झाले. इ.स. १९६० मध्ये त्यांचे पहिले चित्रगीत आणि पहिली लावणी मला हो म्हणत्यात लवंगी मिरची प्रदर्शित झाली. ’रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटाची गीते लिहिण्याची ही संधी त्यांना वसंत पवार, संगीतकार यांनी दिली होती. ‘साधी माणसं’, ‘आम्ही जातो आमच्या गावा’,‘कुंकवाचा करंडा’ आदी चित्रपटांसाठीची त्यांची गीते अतिशय गाजली. साडेतीन शक्तिपीठांचे वर्णन करणारे 'दुर्गा आली घरा' हे सर्वात मोठं १६ मिनिटे कालावधीचे गाणे खेबुडकर यांनी लिहिले आहे. त्यांनी सुमारे ३२५ मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिली. २५ पटकथा, संवाद , ५० लघुकथा, पाच नाटके, चार दूरदर्शन मालिका , चार टेलिफिल्म , पाच मालिका गीते इतकी साहित्य संपदा त्यांनी निर्माण केली आहे. त्यांची सांगीतिक कारकीर्द पाच दशकांइतकी मोठी होती. ग.दि.माडगुळकरांनंतर इतका मोठा गीतकार झालेला नव्हता. त्यांच्या कारकिर्दीत भालजीं पेंढारकर ते यशवंत भालकर असे विविध ३६ दिग्दर्शक, वसंत पवार ते शशांक पोवार असे ४४ संगीतकार आणि सुधीर फडके ते अजित कडकडे अशा ३४ गायकांसमवेत खेबुडकर यांनी काम केले. संस्था इ.स. १९७४ साली त्यांनी स्वरमंडळ ही पहिली नाट्यसंस्था स्थापन केली. स्वरमंडळसंस्थेमार्फत रामदर्शन हा रामायणावरील वेगळा प्रयोग त्यांनी सादर केला होता. त्यानंतर इ.स. १९८० मध्ये रंगतरंग व इ.स. १९८२ मध्ये रसिक कला केंद्राची स्थापना केली. रंगतरंग संस्थेद्वारे गावरान मेवा हा कार्यक्रम त्यांनी बसविला होता. त्याचे सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त कार्यक्रम झाले. इ.स. १९८६ मध्ये नाट्यकलेच्या सेवेसाठी "नाट्यछंद' आणि इ.स. १९८६ मध्ये अभंग थिएटर्सची स्थापना केली. पुरस्कार जगदीश खेबुडकर यांना ६०हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. राज्य शासनाच्यावतीने ११ वेळा सन्मानित (त्यातला एकः सवाल माझा ऐका इ.स. १९६४ साठी) गदिमा पुरस्कार कोल्हापूरभूषण पुरस्कार फाय फाउंडेशन पुरस्कार साहित्य सम्राट पुरस्कार रसरंग फाळके पुरस्कार व्ही.शांताराम स्मृति जीवनगौरव पुरस्कार शिवाजी सावंत पुरस्कार बालगंधर्व स्मारक समितीचा बालगंधर्व पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार शाहू पुरस्कार करवीर भूषण दूरदर्शन जीवनगौरव कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानातर्फे दिलेला राम कदम कलागौरव पुरस्कार (२००६) बाह्य दुवे संदर्भ वर्ग:मराठी गीतकार वर्ग:इ.स. १९३२ मधील जन्म वर्ग:इ.स. २०११ मधील मृत्यू वर्ग:इयत्ता १० वी मराठी कुमारभारती अभ्यासक्रमाचे संदर्भलेख वर्ग:चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कारविजेते
यशवंत देव
https://mr.wikipedia.org/wiki/यशवंत_देव
यशवंत देव(१ नोव्हेंबर १९२६-३० ऑक्टोबर २०१८) हे एक मराठी कवी, गायक आणि संगीत दिग्दर्शक होते. बालपण यशवंत देवांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ सालचा. त्यांच्या घरात वडिलांच्या रूपातच गाणे होते. तेच त्यांचे पहिले गुरू. देवांचे वडील विविध वाद्ये वाजवण्यात पटाईत होते पण त्यांतही तबल्यावर त्यांचे जास्त प्रेम होते. त्यांच्याचकडून देवांना तालाचे बाळकडू मिळाले. जी.एन. जोशी आणि गजाननराव वाटवे ह्यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले. कारकीर्द आपल्या वडिलांकडून मिळालेला संगीतसाधनेचा वारसा यशवंत देव यांनी समर्थपणे पुढे नेला. आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सादर केलेला ‘ भावसरगम ’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला. त्या द्वारेच, संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली. शब्दप्रधान गायकीचे उद्गाते, अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली. आचार्य रजनीश यांच्या लेखनाचा त्यांनी केलेला भावानुवादही रसिकांना आवडला. कवी यशवंत देवांनी लिहिलेली काही गाणी अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात, कुणी एकत्र नांदती कुणी दूर दहा हात अशी धरा असे गगन कधी दिसेल का? अशी ही दोन फुलांची कथा, एक शिवाच्या पदी शोभते एक शवाच्या माथा आयुष्यात खूप चौकटी पाहिल्या करिते जीवनाची भैरवी कामापुरता मामा कोटि कोटि रूपे तूझी कोटी सूर्य चंद्र तारे कृष्णा उडवू नको रंग चंद्राविना ठरावी जशी जीवनात ही घडी अशीच राहू दे तुझी झाले रे तुझ्या एका हाकेसाठी तू नजरेने हो म्हटले पण वाचेने वदणार कधी तेच स्वप्‍न लोचनांत त्याची धून झंकारली दत्तगुरूंचे दर्शन घडले दिवाळी येणार अंगण सजणार नीज रे नीज रे बाळा प्रिया आज माझी नसे साथ द्याया प्रिया साहवेना आता प्रेमगीते आळविता भारतमाता परमवंद्य धरा मन हे खुळे कसे मने दुभंगली म्हणून जोडता येत नाही माणसांच्या गर्दीत माणूस माणसाला शोधत आहे यश अंती लाभणार येतो तुझ्या आठवणींचा घेऊन सुगंध वारा रात्रिच्या धुंद समयाला लागेना रे थांग तुझ्या विश्वाचा खेळ मांडिला आम्ही शब्दमाळा पुरेशा न श्रीरामाचे चरण धरावे दर्शन मात्रे पावन व्हावे स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी यशवंत देवांनी कैक हिंदी, मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. तसेच बावनखणी, चारचौघी, सख्खे शेजारी, घनश्याम नयनी आला अशासारख्या जवळपास ३०-४० नाटकांचेही त्यांनी संगीतदिग्दर्शन त्यांनी केले होते. ग.दि. माडगुळकरांचे गीतरामायण जसे सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केले, तसे माडगुळकरांच्या सचिन शंकर बॅले ग्रुपने सादर केलेल्या "कथा ही रामजानकीची" या नृत्यनाटिकेला यशवंत देव यांनी संगीत दिले होते. यशवंत देव यांनी संगीत दिलेली काही गाणी अखेरचे येतिल माझ्या अपुल्या हाती नसते काही अंबरात नाजुकशी अरे देवा तुझी मुले अशी अर्धीच रात्र वेडी अशी धरा असे गगन अशी पाखरे येती आणिक असेन मी नसेन मी आज राणी पूर्विची ती आठव येतो मज आम्हींं जावें कवण्या आळवितां धांव घाली उघडी नयन शंकरा एवढेतरी करून जा करिते जीवनाची भैरवी कामापुरता मामा काही बोलायाचे आहे कुठला मधु झंकार कुठे शोधिसी रामेश्वर कुणि काहि म्हणा कुणि जाल का केळीचे सुकले बाग कोण येणार ग पाहुणे कृष्णा उडवू नको रंग गणपती तू गुणपती तू पुरस्कार आजवर यशवंत देव यांना अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार. दोन लाख रुपये रोख, मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गदिमा प्रतिष्ठानचा २०१२सालचा पुरस्कार शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार (१९-२-२०१५) पुस्तक प्रतिभावंत गीत-संगीतकार यशवंत देव (आत्मचरित्र, शब्दांकन - अशोक चिटणीस) ओंजळ (कवितासंग्रह) संदर्भ वर्ग:मराठी संगीतकार वर्ग:मराठी गायक वर्ग:इ.स. १९२६ मधील जन्म बाह्य दुवे 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर यशवंत देव यांनी संगीत दिलेली गाणी वर्ग:इ.स. २०१८ मधील मृत्यू वर्ग:लता मंगेशकर पुरस्कार विजेते
शिव्या
https://mr.wikipedia.org/wiki/शिव्या
शिवी म्हणजे दुसऱ्या माणसाचा अपमान करण्यासाठी त्याला दुखावतील असे असभ्य, अश्लील किंवा अपमानकारक शब्द वापरून टोचून बोलणे. शिव्यांचा वापर हा स्थळ, काळ आणि परिस्थितीनुसार बदलत असतो. सार्वजनिक ठिकाणी शिवराळ बोलणे असभ्य समजले जाते, तरीही शिव्या या प्रत्येक समाजाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असतात. इतर भाषांप्रमाणेच मराठी भाषेतदेखील अनेक प्रकारच्या शिव्या रूढ झाल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये निखळ मराठी शिव्या ऐकावयास मिळतील. बाकीच्या भागातील शिव्यांवर हिंदीचा प्रभाव दिसून येतो. साहित्यात किंवा लिखित स्वरूपात शिव्या उतरविणे हे असभ्य समजले जाते. अनेक असभ्य समजणाऱ्या शिव्या या भ या शब्दापासून सुरू होतात म्हणून कोणी यास भकार शब्द असेही म्हणतात. रागातून, तिरस्कारातून एखाद्या व्यक्तीची, समूहाची, किंवा परिस्थितीची मानखंडना करण्यासाठी शिवी दिली जाते. कधीकधी कारण नसताना पुरूषार्थाचा, पुरूष असण्याचा भाग म्हणून किंवा शाब्दिक सवयीचा भाग म्हणूनही शिव्या दिल्या जातात. शिवी देताना दुसरी व्यक्ती, समूह वा परिस्थिती यांच्या स्त्री नात्यांच्या संदर्भात संभोग वा लिंगनिदर्शक समाज अमान्य अशी वाचिक क्रिया शिवी देताना केली जाते. प्रमाणभाषेमध्ये शिव्या स्पष्ट लिहू नयेत किंवा वानगीदाखल घ्याव्यात किंवा फुल्या फुल्या लिहाव्यात असा प्रघात आहे. शिव्या या धर्मावरून, जातीवरून, व्यवसायावरून, शारीरिक आणि मानसिक व्यंगावरून, जनावरांवरून देता येतात. प्रियजनांवरून, लैंगिकतेवरून व विशेषतः या दोहोंच्या एकत्रीकरणातून दिलेल्या शिव्या सर्वांत जास्त अपमानकारक समजल्या जातात. शिवी खाणाऱ्याच्या मातृत्वाबरोबरच्या संबंधाला भाषिक रूपात आव्हान दिले जाते. हे सहन न झाल्याने शिवी लागते, मानखंडना होते असे म्हटले जाते. प्रकार धर्म व जातिवाचक शिव्या भारतात बरेचदा एखाद्याला कनिष्ठ जाति-धर्माचा मानून त्याच्या जातीचा किंवा धर्माचा उल्लेख शिवी म्हणून केला जाई. कायद्यानुसार असे करणे गुन्हा समजले जाते. कृपा करून अशा शिव्या (विशेषतः जातिवाचक) येथे उद्धृत करू नयेत. असे केल्यास विकिपीडियावर भारतीय कायद्यानुसार (ऍट्रोसिटीज ऍक्ट, इ.) कारवाई होउ शकते. चर्चा पानावरील 'धर्म व जातिवाचक शिव्या हा विभाग पहा.' त्यातल्यात्यात थोड्या साध्या शिव्यांची उदाहरणे गाढव, नालायक, बेशरम, हरामखोर, हलकट, चावट, कृतघ्न, बावळट, मूर्ख, बेअक्कल, पागल (या विभागातील शब्द असभ्य अथवा असंस्कृत समजले जात असण्याची शक्यता आहे.) असभ्यता उदाहरणे लैंगिकता नातेसंबंध नातेसंबंध आणि लैंगिक संबंध आईला/ आईचा/ मायला/ मायचा "आयला" किंवा "आयचा" या शिव्या अलीकडील काळात सर्रास व्यवहारात वापरल्या जातात. फक्त "आईला" किंवा "आईचा" या शब्दांना गलिच्छ अर्थ नसला तरी समोरच्या व्यक्तीच्या आईचा अपमान करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या "तुझ्या आईचा ---" किंवा "तुझ्या आईला ---" या शिव्यांचे ते छोटे स्वरूप आहे. अनैतिकता, संबंधित व्यवसाय आणि अनौरस जन्म शिंच्या, रांच्या हे दोन्ही शब्द शिंदळीच्या आणि रांडेच्याची लघुरुपे आहेत. शिंदळीचा अर्थ 'व्यभिचारी स्त्री' आहे तर रांडचा अर्थ रूढार्थाने 'विधवा' आहे. येथे एखाद्याला अनैतिक संबंधातून जन्माला आलेला असे म्हणण्यात त्याच्या आईला नावे ठेवण्याचा हेतू आहे (सहसा शिव्यांमध्ये वडिलांचा उल्लेख नसतो.) अक्करमाश्या अनौरस पुत्राला कोकणात 'अक्करमाश्या' असे बोलीभाषेत म्हटले जाते. मराठीतील कादंबरीकार श्री.ना.पेंडसे यांच्या लेखनात हा शब्द सापडतो. बोंब कुणाच्या नावाने बोंब मारणे हा प्रकार अशिष्ट समजला जातो.'ऑSSS' असा लांब मोठ्या आवाजात सुर लावून, स्वतःच्याच हाताची मूठ करून विरुद्ध बाजूने (तळहाताची विरुद्ध बाजू) सुर लावलेला असताना तोंड हाताने वारंवार झाकून उघडले असता जो आवाज निघतो त्या आवाजाला बोंब असे म्हणतात. तीव्र निषेध नोंदवण्याच्या व लोकांचे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने क्वचित निषेध मोर्चांमध्येसुद्धा 'बोंब' मारतात(करतात क्रियापदापेक्षा मारतात क्रियापद अधिक वापरले जाते). बोंब मारणे आणि शिव्या देण्याचा अजून एक उपयोग भारतातील काही भागात होळी सोबत येणाऱ्या "शिमगा" सणाच्या निमित्ताने होते. पेटलेल्या होळी भोवती किमान बोंब मारणे किंवा शिव्या देणे हे मनातले विचार मुक्त करून विसरून जाण्याचे साधन समजले जाते. महाराष्ट्रातील काही भागात रंगपंचमी खेळ चालू असताना स्वतःच्याच आप्तेष्टांना मोकळेपणाने कोणत्याही बंधनांशिवाय शिव्या देण्याची प्रथाही होती, पण स्त्रियांना शक्यतो समोरासमोर शिव्या शक्यतो टाळल्या जात. अर्थात प्रथा हल्ली कमी होत चालली आहे. अशा शिव्या देण्यात अर्थ न समजला तरी देण्यात बालगोपाळांचाही समावेश मोठ्या प्रमाणावर असे. (या विभागातील शब्द असभ्य अथवा असंस्कृत समजले जात असण्याची शक्यता आहे.) शिमग्यातील असभ्यता उदाहरणे समोर दिसलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याक्षणीचे त्याचे हावभाव किंवा हातातल्या कामाचा उल्लेख करत "*** करतंय कोण, त्याच्या ***त *** दोन " अशा किंबहुना अधिक अश्लील शिव्यांचा समावेश असे. अध्याहृत अर्थावर आधारित शिव्या साला 'साला' हा वस्तुतः 'मेहुणा' (अर्थात 'बायकोचा भाऊ'; बहिणीचा नवरा' नव्हे.) या अर्थीचा हिंदी भाषेतील शब्द आहे. 'बायकोचा भाऊ' अशाच अर्थाने याचेच 'साळा' हे रूप मराठी भाषेतही काही भागांत/काही समाजांत प्रचलित आहे. हा शब्द शिवी अथवा अपशब्द म्हणून का गणला जातो याचे एक सुंदर स्पष्टीकरण श्री. खुशवंत सिंह यांच्या 'ट्रेन टू पाकिस्तान' या पुस्तकात आढळते. थोडक्यात स्पष्ट करावयाचे झाल्यास, प्रत्यक्षात नात्याने बायकोचा भाऊ नसलेल्या व्यक्तीस, अशा व्यक्तीची बहीण ही शिवी देणाऱ्यास पत्नीसमान आहे हे सुचवण्यामागील अध्याहृत गर्भितार्थामुळे हा वरकरणी साधा शब्द शिवी अथवा अपशब्द म्हणून गणला जातो. महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत हा शब्द शिवीबरोबरच एखादे हलके संबोधन म्हणून सर्रास वापरला जातो. सार्वजनिक ठिकाणी, नाटक चित्रपटांत या शब्दाचा वापर सहजगत्या केलेला आढळतो. उदा.: चित्रपटातील एक गीत-पप्पू कांट डान्स साला मराठी साहित्यात शिव्यांचा वापर संत साहित्यातील शिव्यांचा वापर मराठी साहित्यात शिव्यांचा वापर संतकाळापासून केला गेला आहे. संत तुकाराम आपल्या परखड बोलांमध्ये शिव्यांचा वापर करत. तुकाराम गाथेतील एक उदाहरण येथे दिले आहे. उभ्या बाजारात कथा। हे तो नावडे पंढरीनाथा।। अवघे पोटासाठी सोंग। तेथे कैचा पांडुरंग।। लावी अनुसंधान। काही देईल म्हणून।। काय केले रांडलेका। तुला राजी नाही तुका।। २४७८ रांडलेका हा शब्द अनौरस {विधवेची (वैधव्यानंतर जन्मलेली)} संतती या अर्थी वापरला आहे. देखोनि हरखली अंड । पुत्र जाला ह्मणे रांड ॥ तंव तो जाला भांड । चाहाड चोर शिंदळ ॥१॥ जाय तिकडे पीडी लोकां। जोडी भांडवल थुंका ॥ थोर जाला चुका । वर कां नाहीं घातली ॥ध्रु. ७७॥ बाह्य दुवे संस्कृत भाषेतील शिव्या एक खमंग चर्चा वर्ग:भाषा
खंड
https://mr.wikipedia.org/wiki/खंड
समुद्राने वेढलेल्या विस्तृत भूप्रदेशास खंड असे म्हणता येईल. युरोप आणि आशिया सोडल्यास या सर्व खंडांच्या चारही बाजूने महासागराचे पाणी आहे. विविध खंड व्यवस्था thumb|400px|विविध खंड व्यवस्था सात खंड आशिया - आफ्रिका - ऑस्ट्रेलिया - अंटार्क्टिका - युरोप - उत्तर अमेरिका - दक्षिण अमेरिका आशिया - आफ्रिका - ओशनिया - अंटार्क्टिका - युरोप - उत्तर अमेरिका - दक्षिण अमेरिका सहा खंड आफ्रिका - अंटार्क्टिका - ओशनिया - युरेशिया - उत्तर अमेरिका - दक्षिण अमेरिका आफ्रिका - अमेरिका - अंटार्क्टिका - आशिया - ओशनिया - युरोप पाच खंड आफ्रिका - अमेरिका - ओशनिया - अंटार्क्टिका - युरेशिया आफ्रिका - अमेरिका - ओशनिया - युरोप - एशिया चार खंड अमेरिका - ओशनिया - अंटार्क्टिका - युराफ्रिशिया हेसुद्धा पहा ग्रीनलॅंड पॅंजिआ गोंडवन टेथिस भारतीय उपखंड महाराष्ट्र भूमी अभिलेखाची महाराष्ट्र सरकारद्वारे राज्य नागरिकांसाठी महाभूमिका अभिलेख ऑनलाइन बनवतात. ती महाराष्ट्र भूमिला संगणकीकृत करण्यासाठी केली गेली आहे. सह महाराष्ट्रातील राहणाऱ्या नागरिकांच्या घरी बसून स्वयंभू अभिलेख कार्ड बनवू शकता आणि रीन्यू देखील करू शकता. या शहराला नागपूर, औरंगाबाद, पुणे, अमरावती आदी राज्य सरकारच्या प्रमुखाने विस्तारित केले आहे. मध्ये सुलभ माध्यम से आप भू-नक्शा, अपना खतौनी नंबर, खसरा कार्ड नंबर, आपली भूमि रेकॉर्ड आणि महाराष्ट्र महाभूलेख सात बारा सदस्य इतर सर्व जानकार प्राप्त करू शकतात. * * वर्ग:भौगोलिक रचना
कोल्हापुर
https://mr.wikipedia.org/wiki/कोल्हापुर
पुनर्निर्देशन कोल्हापूर
भारतीय उपखंड
https://mr.wikipedia.org/wiki/भारतीय_उपखंड
भारतीय उपखंड हा दक्षिण आशियातील भारत, बांग्लादेश, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि अफगाणिस्तान या देशांनी व्यापलेला आहे. हा जगातील एकच असा प्रांत आहे ज्याला उपखंड असे संबोधले जाते. भौगोलिक दृष्टीने, 'उपखंड' ही संज्ञा वापरली जाते कारण हा भाग स्वतःच्या प्रस्तरावर वसला आहे जो बाकीच्या आशियापेक्षा वेगळा आहे. * वर्ग:आशिया खंडामधील भौगोलिक प्रदेश
हृदयनाथ मंगेशकर
https://mr.wikipedia.org/wiki/हृदयनाथ_मंगेशकर
(ऑक्टोबर २६, १९३७ - हयात) हे प्रसिद्ध मराठी संगीतकार आहेत. नामवंत पार्श्वगायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले या त्यांच्या थोरल्या बहिणी आहेत. कारकीर्द त्यांनी काही निवडक मराठी (उदा. चानी, जैत रे जैत, उंबरठा, निवडुंग) आणि हिंदी (उदा. धनवान, सुबह, मशाल, लेकिन, माया मेमसाब) चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले असले आणि यांतील बरीचशी गाणी गाजली असली तरी त्यांची ओळख प्रामुख्याने महाराष्ट्राचे 'भावगंधर्व' अशी करून देण्यात येते ती त्यांच्या अनेक अनवट चालींनी सजलेल्या आणि मराठी जगतात गाजलेल्या मान्यवर मराठी कवी आणि गीतकारांच्या कविता आणि गीतांमुळे. सुरेश भट, चिंतामणी त्र्यंबक खानोलकर, ग्रेस, शांता शेळके यांच्या अनेक कविता मराठी माणसापर्यंत पोहोचल्या त्या हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेल्या अनवट, भावपूर्ण चालींमुळेच. मराठीतले आद्यकवी आणि संत ज्ञानेश्वरांच्या काही रचना हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतामुळे मराठी जनसामान्यांच्या ओठी रुळल्या आहेत. मराठी भावसंगीतापलिकडे त्यांनी अमराठी जगतातही गालिबच्या गझला, संत मीराबाई, कबीर, सुरदासांच्या रचना, भगवद्‌गीतेतील काही श्लोक संगीतबद्ध करून प्रामुख्याने आपल्या ज्येष्ठ भगिनी लता मंगेशकर यांच्याकडून गाउन घेऊन अजरामर केले आहेत. त्यांच्या चाली हिंदुस्थानी अभिजात संगीत आणि रागदारींवर आधारित असल्यातरी त्यातही ते अनेक नवनवीन प्रयोग करतात. आपले वडील आणि संगीत नाटकांच्या जमान्यातले प्रख्यात गायक-नट मास्टर दिनानाथ मंगेशकर यांची पदेही ते आपल्या संगीतरचनांमधे वापरतात. गाजलेली गीते शीर्षक गायक/गायिका गीतकार चित्रपट सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या लता मंगेशकर सुरेश भट उंबरठा चांदण्यात फिरताना आशा भोसले सुरेश भट मालवून टाक दीप लता मंगेशकर सुरेश भट सूर मागू तुला मी कसा? अरुण दातेसुरेश भट तुज मागतो मी आता लता मंगेशकर रामकृष्ण बाबू सोमयाजी भय इथले संपत नाही लता मंगेशकर ग्रेस सावर रे लता मंगेशकर मंगेश पाडगावकर दे मला गे चंद्रिके लता मंगेशकर राजा बढे रातिची झोप मज येईना लता मंगेशकरशांता शेळकेपवनाकाठचा धोंडीत्या फुलांच्या गंधकोषी हृदयनाथ मंगेशकर सूर्यकांत खांडेकरॐ नमोजी आद्या लता मंगेशकर संत ज्ञानेश्वरतिन्हीसांजा सखे मिळाल्या लता मंगेशकर भा.रा.तांबे हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा लता मंगेशकर स्वातंत्र्यवीर सावरकर जिवलगा, राहिले दूर घर माझे आशा भोसले शांता शेळकेसागरा प्राण तळमळलाहृदयनाथ, मीना, उषा आणि लता मंगेशकर स्वातंत्र्यवीर सावरकरहासायाचे, आहे मला लता मंगेशकर आरती प्रभु जाईन विचारित रानफुला किशोरी अमोणकर शांता शेळके वादलवारं सुटलं गो लता मंगेशकर शांता शेळके नीज रे नीज शिवरायालता मंगेशकर राम गणेश गडकरी कशी काळनागिणी लता मंगेशकर भा.रा.तांबे नाहि कशी म्हणू तुला लता मंगेशकर चिंतामणी त्र्यंबक खानोलकर वेडांत मराठे वीर दौडले सातलता मंगेशकर वि.वा. शिरवाडकरशिवकल्याणराजाती येते आणिक जाते महेंद्र कपूरचिंतामणी त्र्यंबक खानोलकर हे श्यामसुंदर राजसा किशोरी आमोणकर शांता शेळके पुरस्कार २००९ साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले. पुणे नवरात्र महोत्सवातर्फे दिला गेलेला ’महर्षी पुरस्कार" (२०१४) पुणे-चिंचवड येथील नादब्रह्म परिवारातर्फे नादस्वरब्रह्मश्री पुरस्कार (७ जानेवारी २०१७) पुणे भारत गायन समाजाचा पं. राम मराठे स्मृती पुरस्कार (९ ऒक्टोबर २०१७) २०१८ सालचा मटा सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्कार (१६ मार्च २०१८) बाह्य दुवे 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेली गाणी 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेली गाणी वर्ग:मराठी गायक वर्ग:मराठी संगीतकार वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते वर्ग:मराठी पार्श्वगायक वर्ग:इ.स. १९३९ मधील जन्म वर्ग:लता मंगेशकर पुरस्कार विजेते
लता मंगेशकर
https://mr.wikipedia.org/wiki/लता_मंगेशकर
लता मंगेशकर (हेमा मंगेशकर म्हणून जन्म; २८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) या एक भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या. भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायकांपैकी एक म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावर गणले जाते. भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गानकोकिळा (Nightingale of India) आणि क्वीन ऑफ मेलडी सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या. लतादीदींनी तब्बल ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी ध्वनिमुद्रित केली होती. त्या प्रामुख्याने हिंदी आणि मराठीत गात होत्या. त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. १९८७ मध्ये त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. देशासाठी त्यांच्या योगदानाबद्दल २००१ मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळविणाऱ्या एम.एस. सुब्बुलक्ष्मी नंतर त्या दुसऱ्या गायिका आहेत. २००७ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, "द लीजन ऑफ ऑनर"ने सन्मानित केले. त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार, चार फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार, दोन फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि बरेच इतर पुरस्कार मिळाले. १९७४ मध्ये, लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या. इवलेसे|लता मंगेशकर यांचे कुटुंब (१९३० च्या दशकातील छायाचित्र) त्यांना चार भावंडे होती: मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर – ज्यात त्या सगळ्यात मोठ्या होत्या. लता मंगेशकर यांना कोविड-१९ची लागण झाल्यामुळे त्यांचे अनेक अवयव निकामी झाले. २८ दिवस उपचार घेतल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे ६ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांचे निधन झाले. बालपण इवलेसे|लहानपणीचे छायाचित्र (१९३० चे दशक) इवलेसे|गुरुकुल नाटकादरम्यान बहीण मीना मंगेशकर-खडीकर (सुदामा म्हणून) सोबत लता मंगेशकर (भगवान कृष्ण म्हणून), तारीख: १९३९ लता मंगेशकरांचा जन्म मध्य प्रदेश (ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजन्सी)च्या इंदूर शहरात झाला. त्यांचे पाळण्यातले नाव हृदया. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता ही आपल्या आई-वडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे आहेत. इवलेसे|तरुणपणीच्या लता मंगेशकर लताला पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली. संगीत क्षेत्रातील अलौकिक स्वरांनी त्यांनी जगाला मोहिनी घातली. त्यांच्या आवाजाने अनेक गाणी अजरामर झाली. त्यांचे बालपण सांगलीत गेले. नाटककार, गायक, संगीतकार दीनानाथ मंगेशकर यांच्या घरी लतादीदींचा जन्म झाला. मंगेशकर कुटुंबिय मूळचे गोव्याचे. त्यांचे मूळ आडनाव नवाथे. सांगली येथे दीनानाथ मंगेशकर यांना मास्टर ही पदवी प्राप्त झाली. लतादिदी सांगलीतील सध्याच्या मारुती चौकातील दांडेकर मॉलच्या जवळील ११ नंबरच्या सरकारी शाळेत आपल्या लहान भावंडांसह शाळेत शिकायला जात असत. एक दिवस लहानगी आशा रडू लागली. तेव्हा एका शिक्षकांनी छोट्या लताला खूप रागावले. तेव्हापासून लतादिदींचे शाळेत जाणे बंद झाले. तेव्हा एक शिक्षक घरी येऊन त्यांना शिकवत असे. नंतर काही काळाने मंगेशकर कुटुंबाने सांगली शहर सोडले. लता मंगेशकर यांची हरिपूर रस्त्यावरील बागेतील गणपतीवर फार श्रद्धा होती. त्यामुळे त्या कोल्हापूरला जात असताना नेहमी या गणपतीचे दर्शन घ्यायच्या. चित्रपटसृष्टीत कारकीर्द इवलेसे|लता मंगेशकर, आशा भोसले आणि नूरजहाँ इ.स. १९४२ मध्ये लता अवघ्या १३ वर्षांची होती, तेव्हा वडील हृदयविकाराने निवर्तले. तेव्हा मंगेशकरांचे एक आप्त तसेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक - मास्टर विनायक ह्यांनी लताच्या परिवाराची काळजी घेतली. त्यांनी लताबाईंना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला. लताने नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या किती हंसाल (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटासाठी गायले, पण हे गाणे चित्रपटातून वगळले गेले. मास्टर विनायकांनी लताबाईंना नवयुगच्या पहिली मंगळागौर (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका दिली. ह्या चित्रपटात त्यांनी नटली चैत्राची नवलाई हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले गीत गायले. इ.स. १९४५ मध्ये जेव्हा मास्टर विनायकांच्या कंपनी-कार्यालयाचे स्थानांतर मुंबईस झाले, तेव्हा लताबाई मुंबईला आल्या. त्या उस्ताद अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) ह्यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. त्यांनी वसंत जोगळेकरांच्या आपकी सेवामें (इ.स. १९४६) ह्या हिंदी चित्रपटासाठी पा लागूं कर जोरी हे गाणे गायले (दत्ता डावजेकर हे त्या गाण्याचे संगीतकार होते). लता आणि आशा (बहीण) यांनी मास्टर विनायकांच्या पहिल्या हिंदी चित्रपटात (बडी माँ - इ.स. १९४५) नूरजहाँ सोबत छोट्या भूमिका केल्या. त्या चित्रपटात लताने माता तेरे चरणोंमें हे भजन गायले. मास्टर विनायकांच्या दुसऱ्या हिंदी चित्रपटाच्या (सुभद्रा - इ.स. १९४६) ध्वनिमुद्रणाच्या वेळेस लताबाईंची ओळख संगीतकार वसंत देसाई यांच्याशी झाली. इ.स. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अलीखाँ भेंडीबाजारवाले यांनी नवनिर्मित पाकिस्तानला देशांतर केले, तेव्हा लतादीदी अमानत खाँ (देवासवाले) यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मांकडूनही लताबाईंना तालीम मिळाली. इ.स. १९४८ मध्ये मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदरांनी लताबाईंनार्गदर्शन केले. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये नूरजहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई (अंबालेवाली), ह्यांसारख्या अनुनासिक आणि जड आवाज असलेल्या गायिका जास्त लोकप्रिय होत्या. ग़ुलाम हैदरांनी लताजींची ओळख तेव्हा शहीद (इ.स. १९४८) ह्या हिंदी चित्रपटावर काम करीत असलेले निर्माते शशिधर मुखर्जींशी केली, पण मुखर्जींनी लताचा आवाज "अतिशय बारीक" म्हणून नाकारला. तेव्हा हैदरांचे थोड्या रागात उत्तर होते - येणाऱ्या काळात निर्माते आणि दिग्दर्शक लताचे पाय धरतील आणि आपल्या चित्रपटांसाठी गाण्याची याचना करतील. हैदरांनी लतादीदींना मजबूर (इ.स. १९४८) ह्या चित्रपटात दिल मेरा तोडा हे गाणे म्हणण्याची मोठी संधी दिली. सुरुवातीला लता आपल्या गाण्यात तेव्हाच्या लोकप्रिय असलेल्या नूरजहाँचे अनुकरण करीत असे, पण नंतर लताने स्वतःच्या गाण्याची एक आगळी शैली बनवली. त्या काळात हिंदी चित्रपटांतल्या गाण्यांचे गीतकार प्रामुख्याने मुस्लिम कवी असत, त्यामुळे गाण्यांच्या भावकाव्यात भरपूर उर्दू शब्द असत. एकदा सुप्रसिद्ध अभिनेता दिलीपकुमार यांनी लताच्या हिंदी/हिंदुस्तानी गाण्यातील "मराठी" उच्चारांसाठी तुच्छतादर्शक शेरा मारला, तेव्हा लताने शफ़ी नावाच्या मौलवींकडून उर्दू उच्चारांचे धडे घेतले. लोकप्रिय चित्रपट महल(इ.स. १९४९)चे आयेगा आनेवाला हे गाणे लताच्या कारकिर्दीला एक महत्त्वाचे वळण देणारे ठरले. (गाण्याचे संगीतकार खेमचंद प्रकाश होते, तर चित्रपटात गाणे अभिनेत्री मधुबालाने म्हटले होते.) १९५० च्या दशकात उत्कर्ष १९५० च्या दशकात लताने ज्या संगीत दिग्दर्शकांनी स्वरबद्ध केलेली गाणी गायिली, अशा नामांकित संगीतकरांची नावे - अनिल विश्वास, शंकर-जयकिशन, नौशाद, सचिनदेव बर्मन, सी. रामचंद्र, हेमंत कुमार, सलिल चौधरी, खय्याम, रवी, सज्जाद हुसेन, रोशन, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, मास्टर कृष्णराव, वसंत देसाई, सुधीर फडके, हंसराज बहल आणि उषा खन्ना. (सुप्रसिद्ध संगीतकार ओ.पी. नय्यर हे असे एकमेव अपवाद होते ज्यांनी आपल्या रचनांसाठी लताऐवजी आशा भोसले यांना प्राधान्य दिले.) संगीतकार नौशाद यांच्या दिग्दर्शनाखाली बैजू बावरा (इ.स. १९५२), मुग़ल-ए-आज़म (इ.स. १९६०) आणि कोहिनूर (इ.स. १९६०) ह्या चित्रपटांसाठी लताने शास्त्रोक्त संगीतावर आधारित काही गाणी गायिली. लताने नौशादांसाठी गायिलेले पहिले गाणे हे जी.एम.दुर्राणींसोबतचे द्वंद्वगीत छोरेकी जात बडी बेवफ़ा आहे. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी शंकर-जयकिशन यांनी तर आपल्या जवळजवळ सर्व चित्रपटांच्या(विशेषतः राज कपूरनिर्मित) गाण्यांच्या गायिका म्हणून लताचीच निवड केली. अशा चित्रपटांमध्ये आग, आह, (इ.स. १९५३), श्री ४२० (इ.स. १९५५) आणि चोरी चोरी (इ.स. १९५६) यांचा समावेश आहे. इ.स. १९५७ पर्यंत सचिन देव बर्मन आपल्या बहुतेक चित्रपटगीतांच्या प्रमुख गायिका म्हणून लताची निवड करीत, उदा. सज़ा (इ.स. १९५१), हाउस नं. ४४, (इ.स. १९५५) आणि देवदास (इ.स. १९५५). पण इ.स. १९५७ ते इ.स. १९६२ च्या काळात बर्मनदादांनी लतादीदी ऐवजी गीता दत्त आणि आशा भोसले ह्या गायिकांना घेऊन आपली सर्व गाणी बसवली. इ.स. १९५० च्या दशकात लताबरोबर अतिशय लोकप्रिय गाणी बनवणाऱ्यांपैकी एक सलिल चौधरी होते. लतादीदीला "सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका" म्हणून सर्वप्रथम फ़िल्मफ़ेअर पारितोषिक सलिल चौधरींनी स्वरबद्ध केलेल्या आजा रे परदेसी ह्या मधुमती (इ.स. १९५८) मधील गीतासाठी मिळाले. इ.स. १९६० चे दशक १९६० च्या दशकात लता मंगेशकर निर्विवादपणे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रथम श्रेणीच्या पार्श्वगायिका ठरल्या. ह्या काळात लताने जवळजवळ सर्व संगीतकारांबरोबर गाणी ध्वनिमुद्रित केली. त्यांपैकी असंख्य गाणी अजरामर झाली. १९६० मध्ये प्यार किया तो डरना क्या हे मुग़ल-ए-आज़म (इ.स. १९६०)चे नौशादने संगीतबद्ध केलेले आणि मधुबालावर चित्रित गाणे तुफान लोकप्रिय झाले. हवाई-धरतीचे अजीब दास्ताँ है ये हे शंकर-जयकिशन दिग्दर्शित आणि दिल अपना प्रीत पराई (इ.स. १९६०) मध्ये मीना कुमारी वर चित्रित गाणेही अतिशय प्रसिद्ध झाले. इ.स. १९६१ मध्ये लताने सचिनदेव बर्मन यांचे साहाय्यक जयदेव यांसाठी अल्ला तेरो नाम हे भजन गाण्याचे पाऊल उचलून बर्मनदादांसोबत पुन्हा वाटचाल सुरू केली. इ.स. १९६२ मध्ये लताने बीस साल बाद चित्रपटातील कहीं दीप जले कहीं दिल ह्या हेमंत कुमार यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या गाण्यासाठी दुसरा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. २७ जून, इ.स. १९६३ ला, भारत-चीन युद्धानंतर एका कार्यक्रमात लताबाईंनी कवी प्रदीप यांनी लिहिलेले आणि सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले ऐ मेरे वतन के लोगों हे देशभक्तिपर गीत भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत गायले. तेव्हा लताच्या सुमधुर कंठातून युद्धात देशासाठी प्राण देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहणारे ते गीत ऐकून पंडितजींच्या डोळ्यात अश्रू उभे झाले. इ.स. १९६३ मध्ये सचिन देव बर्मन यांच्यासाठी पुन्हा गाणे सुरू केल्यानंतर लताने गाईड (इ.स. १९६५) मधील आज फिर जीनेकी तमन्ना है, पिया तोसे नैना लागे रे, गाता रहे मेरा दिल हे (किशोर कुमार सोबतचे द्वंद्वगीत) तसेच ज्युवेल थीफ़ (इ.स. १९६७) मधील होटोंपे ऐसी बात यांसारखी बर्मनदादांची अनेक लोकप्रिय गाणी म्हटली. इ.स. १९६० च्या दशकात लतादीदीने मदनमोहन ह्या आपल्या आवडत्या संगीतकाराची अनेक गाणी म्हटली. अशा गाण्यांमध्ये अनपढ (इ.स. १९६२)चे आपकी नज़रोंने समझा, वो कौन थी (इ.स. १९६४)ची लग जा गले, नैना बरसे तसेच मेरा साया (इ.स. १९६६)चे तू जहां जहां चलेगा ह्या सुरेल गाण्यांचा विशेष उल्लेख होतो. १९६० च्याच दशकात लक्ष्मीकांत प्यारेलाल ह्या नवोदित संगीतकार-जोडीची जवळ-जवळ सर्व गाणी लतानेच म्हटली. लता मंगेशकरच्या गाण्यांमुळेच ही जोडी हिंदी चित्रपटसंगीतक्षेत्रात अजरामर झाली. पारसमणी (इ.स. १९६३) ह्या लक्ष्मीकांत प्यारेलाल जोडीच्या पहिल्या-वहिल्या चित्रपटातली लताची गाणी अतिशय लोकप्रिय ठरली. लतादीदीने मराठी सिनेमांसाठी अनेकानेक गाणी गायिली. त्यांनी ज्या नामांकित संगीतकारांबरोबर काम केले, त्यांमध्ये हृदयनाथ मंगेशकर, वसंत प्रभू, श्रीनिवास खळे आणि सुधीर फडकेंचा विशेष उल्लेख करायला हवा. लतादीदीने स्वतः 'आनंदघन' ह्या टोपणनावाने मराठी गाणी स्वरबद्ध करून गायिलेली आहेत. १९६० आणि १९७० च्या दशकांमध्ये लताने संगीतकार सलिल चौधरी आणि हेमंतकुमारांची बंगाली भाषेतली गाणीही म्हटली आहेत. लता मंगेशकरने (मुकेश, मन्ना डे, महेंद्र कपूर, मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांसारख्या त्या काळातील सर्व प्रसिद्ध गायकांबरोबर युगलगीते गायिली आहेत. अभिजात संगीतातलेउस्ताद अमीरखाँ आणि उस्ताद बडे गुलामअली हे त्यांचे आवडते गायक आहेत. 1970चे दशक 1972 मध्ये मीना कुमारीचा शेवटचा चित्रपट 'पाकीजा' रिलीज झाला होता. त्यात लता मंगेशकर यांनी गायलेली आणि गुलाम मोहम्मद यांनी संगीतबद्ध केलेली "चलते चलते" आणि "इंही लोगों ने" या लोकप्रिय गाण्यांचा समावेश होता. तिने एसडी बर्मनच्या शेवटच्या चित्रपटांसाठी अनेक लोकप्रिय गाणी रेकॉर्ड केली, ज्यात प्रेम पुजारी (1970) मधील "रंगीला रे", शर्मिली (1971) मधील "खिलते हैं गुल यहाँ" आणि अभिमान (1973) मधील "पिया बिना" आणि मदन मोहनच्या शेवटच्या चित्रपटांसाठी दस्तक (1970), हीर रांझा (1970), दिल की रहें (1973), हिंदुस्तान की कसम (1973), हंस्ते जख्म (1973), मौसम (1975) आणि लैला मजनू (1976) सह चित्रपट. 1970च्या दशकात लता मंगेशकर यांची अनेक उल्लेखनीय गाणी लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केली होती. 1970च्या दशकात लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेली तिची अनेक गाणी गीतकार आनंद बक्षी यांनी लिहिली होती. तिने राहुल देव बर्मनसोबत अमर प्रेम (1972), कारवां (1971), कटी पतंग (1971), आणि आंधी (1975) या चित्रपटांमध्ये अनेक हिट गाणी रेकॉर्ड केली. हे दोघे गीतकार मजरूह सुलतानपुरी, आनंद बक्षी आणि गुलजार यांच्यासोबतच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहेत. 1973 मध्ये, आर.डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि गुलजार यांनी लिहिलेल्या परिचय चित्रपटातील "बीतीना बिताई" या गाण्यासाठी लता दिदीना सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. 1974 मध्ये, तिने सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेले आणि वायलार रामवर्मा यांनी लिहिलेले नेल्लू चित्रपटासाठी तिचे एकमेव मल्याळम गाणे "कदली चेंकडाली" गायले. 1975 मध्ये, कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेल्या कोरा कागज चित्रपटातील "रुथे रुथे पिया" या गाण्यासाठी त्यांना पुन्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 1970 पासून, लता मंगेशकर यांनी भारत आणि परदेशात अनेक मैफिली आयोजित केल्या आहेत ज्यात अनेक धर्मादाय मैफिलींचा समावेश आहे. परदेशात त्यांची पहिली मैफल 1974 मध्ये रॉयल अल्बर्ट हॉल, लंडन येथे झाली आणि ती करणारी ती पहिली भारतीय होती. लतादिदीने हृदयनाथ मंगेशकरान सोबत संगीतबद्ध केलेला मीराबाईच्या भजनांचा "चला वही देस" हा अल्बमही रिलीज केला. अल्बममधील काही भजनांमध्ये "सांवरे रंग रांची" आणि "उड जा रे कागा" यांचा समावेश आहे. 1970च्या दशकाच्या सुरुवातीस, त्यांनी इतर गैर-फिल्मी अल्बम रिलीज केले, जसे की त्यांचा गालिब गझलांचा संग्रह, मराठी लोकगीतांचा अल्बम (कोळी-गीते), गणेश आरतींचा अल्बम (सर्व त्यांचा भाऊ हृदयनाथ यांनी रचलेले) आणि एक अल्बम श्रीनिवास खळे यांनी रचलेले संत तुकारामांचे "अभंग". 1978 मध्ये राज कपूर-दिग्दर्शित सत्यम शिवम सुंदरम, लता मंगेशकर यांनी वर्षातील चार्ट-टॉपर्समध्ये "सत्यम शिवम सुंदरम" हे मुख्य थीम गाणे गायले. चित्रपटाची कथा लता मंगेशकर यांच्यापासून प्रेरित आहे, हे कपूर यांची मुलगी रितू नंदा यांनी त्यांच्या ताज्या पुस्तकात उघड केले आहे. पुस्तकात कपूर यांचे म्हणणे उद्धृत केले आहे की, "मी एका सामान्य चेहऱ्याच्या पण सोनेरी आवाजाच्या स्त्रीला बळी पडलेल्या पुरुषाची कथा पाहिली आणि मला लता मंगेशकर यांना भूमिकेत टाकायचे होते. 1970च्या उत्तरार्धात आणि 1980च्या दशकाच्या सुरुवातीस, त्यांनी यापूर्वी काम केलेल्या संगीतकारांच्या मुलांसोबत काम केले. यापैकी काही संगीतकारांमध्ये सचिन देव बर्मन यांचा मुलगा राहुल देव बर्मन, रोशनचा मुलगा राजेश रोशन, सरदार मलिकचा मुलगा अनु मलिक आणि चित्रगुप्ताचा मुलगा आनंद-मिलिंद यांचा समावेश होता. त्यांनी आसामी भाषेतही अनेक गाणी गायली आणि आसामी संगीतकार भूपेन हजारिका यांच्याशी खूप चांगले संबंध निर्माण केले. त्यांच्या दिग्दर्शनाखाली लतादिदीनी अनेक गाणी गायली; रुदाली (1993) मधील "दिल हम हूम करे" या गाण्याने त्या वर्षी सर्वाधिक विक्रमी विक्री केली. 1980चे दशक 1980 पासून, लता मंगेशकर यांनी सिलसिला (1981), फासले (1985), विजय (1988), आणि चांदनी (1989) आणि उस्तादी उस्ताद से (1981) मध्ये राम लक्ष्मण (1981), बेजुबान (1981) मधील शिव-हरी या संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले. 1982), वो जो हसीना (1983), ये केसा फर्ज (1985), और मैने प्यार किया (1989). तिने कर्ज (1980), एक दुजे के लिए (1981), सिलसिला (1981), प्रेम रोग (1982), हीरो (1983), प्यार झुकता नहीं (1985), राम तेरी गंगा मैली (1985) यांसारख्या इतर चित्रपटांमध्ये गाणी गायली. नगीना (1986), आणि राम लखन (1989). संजोग (1985) मधील तिचे "झु झू यशोदा" हे गाणे चार्टबस्टर ठरले. 1980च्या दशकाच्या उत्तरार्धात, मंगेशकर यांनी अनुक्रमे आनंद (1987) आणि सत्य (1988) या चित्रपटांसाठी संगीतकार इलैयाराजा यांच्या "आरारो आरारो" आणि "वलाई ओसाई" या गाण्यांच्या दोन पाठांतराने तामिळ चित्रपटांमध्ये पुनरागमन केले. 1980च्या दशकात, लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकार जोडीने लतादीदींना त्यांचे सर्वात मोठे हिट गाणे गायले होते- आशा (1980) मधील "शीशा हो या दिल हो", कर्ज (1980) मधील "तू कितने बरस का", दोस्ताना (1980) मधील "कितना आसन है" 1980), आस पास (1980) मधील "हम को भी गम", नसीब (1980) मधील "मेरे नसीब में", क्रांती (1981) मधील "जिंदगी कीना टूटे", एक दुजे के लिए (1981) मधील "सोलह बरस की" 1981), प्रेम रोग (1982) मधील "ये गलियां ये चौबारा", अर्पण (1983) मधील "लिखनेवाले ने लिख डाले", अवतार (1983) मधील "दिन माहीने साल", "प्यार करनावाले" आणि "निंदिया से जगी" मधील हिरो (1983), संजोग (1985) मधील "झु जू जु यशोदा", मेरी जंग (1985) मधील "जिंदगी हर कदम", यादों की कसम (1985) मधील "बैठ मेरे पास", राम अवतारमधील "उंगली में अंघोटी" (1988) आणि राम लखन (1989) मधील "ओ रामजी तेरे लखन ने". या वर्षांत लतादीदींसाठी राहुल देव बर्मनच्या काही रचनांमध्ये अलीबाबा और ४० चोर (१९८०), फिर वही रात (१९८१) मधील "बिंदिया तरसे", सितारा (१९८१) मधील "थोडी सी जमीन" यांचा समावेश आहे. , रॉकी (1981) मधील "क्या यही प्यार है", लव्ह स्टोरी मधील "देखो मैं देखा" (1981), कुदरत (1981) मधील "तुने ओ रंगीले", शक्ती (1982) मधील "जाने कैसे कब", "जब हम" झटपट लोकप्रिय झालेला बेताब (1983) मधील जवान होंगे, आगर तुमना होते (1983) मधील "हमें और जीने", मासूम (1983) मधील "तुझसे नाराज़ नहीं", "कहींना जा" आणि "जीवन के दिन" बडे दिल वाला (1983), सनी (1984) मधील "जाने क्या बात", अर्जुन (1985) मधील "भूरी भूरी आँखों", सागर (1985) मधील "सागर किनारे", "दिन प्यार के आएंगे" मधील सावेरे वाली गाडी. (1986). लिबास (1988) मधील "क्या भला है क्या", "खामोश सा अफसाना" आणि "सीली हवा छू". राजेश रोशनच्या लूटमार आणि मन पासंदमध्ये देव आनंद यांच्या सहकार्यामुळे अनुक्रमे "पास हो तुम मगर करीब" आणि "सुमनसुधा रजनी चंदा" सारखी गाणी झाली. स्वयंवर (1980) मधील "मुझे छू राही हैं", जॉनी आय लव्ह यू (1982) मधील "कभी कभी बेजुबान", कामचोर (1982) मधील "तुझ संग प्रीत", "अंग्रेजी में खेते है" यांसारखी लताने रफीसोबत द्वंद्वगीते केली होती. खुद-दार (1982), निशान (1983) मधील "आंखियो ही आंखियो में", आख़िर क्यों मधील "दुष्मनना करे"? (1985) आणि दिल तुझको दिया (1987) मधील "वादाना तोड", नंतर 2004च्या इटरनल सनशाइन ऑफ द स्पॉटलेस माइंड या चित्रपटाच्या साउंडट्रॅकमध्ये प्रदर्शित केले गेले.[ बप्पी लाहिरी यांनी लतादीदींसाठी काही गाणी रचली, जसे की सबूत (1980) मधील "दूरियाँ सब मिता दो", पतिता (1980) मधील "बैठे बैठे आज आयी", करार (1980) मधील "जाने क्यूं मुझे", "थोडा रेशम लगता है" "ज्योती (1981), प्यास (1982) मधील "दर्द की रागिनी" आणि हिम्मतवाला (1983) मधील "नैनो में सपना" (किशोर कुमार सोबत युगलगीत). मोहम्मद जहूर खय्याम यांनी 80च्या दशकात लता मंगेशकर यांच्यासोबत काम करणे सुरू ठेवले आणि थोडिसी बेवफाई (1980) मधील "हजार रहें मुड" (किशोर कुमार यांच्यासोबत युगल), चंबल की कसम (1980) मधील "सिम्ती हुई", "ना जाने" यासारखी गाणी रचली. दर्द (1981) मधील क्या हुआ", दिल-ए-नादान (1982) मधील "चांदनी रात में", बाजार (1982) मधला "दिखाई दिए", दिल-ए-नादान (1982) मधील "चांद के पास", " लोरी (1984) मधील भर लेने तुम्हे" आणि "आजा निंदिया आजा" आणि एक नया रिश्ता (1988) मधील "किरण किरण में शोखियां". 80च्या दशकात, लतादीदींनी रवींद्र जैनसाठी राम तेरी गंगा मैली (1985) मधील "सुन साहिबा सुन", शमा (1981) मधील "चांद अपना सफर", सौतेनमधील "शायद मेरी शादी" आणि "जिंदगी प्यार का" सारखी हिट गाणी गायली. (1983),उषा खन्ना साठी सौतेन की बेटी (1989) मधील "हम भूल गये रे". हृदयनाथ मंगेशकर यांनी चक्र (1981) मधील "काले काले घेरे से", "ये आँखें देख कर", आणि धनवान (1981) मधील "कुछ लोग मोहब्बत को", मशाल (1984) मधील "मुझे तुम याद करना", आसामी गाणे होते. डॉ. भूपेन हजारिका यांच्या संगीत आणि गीतांसह जोनाकोरे राती (1986), अमर-उत्पलसाठी शहेनशाह (1989) मधले "जाने दो मुझे", गंगा जमुना सरस्वती (1988) मधील "साजन मेरा उस पर" आणि "मेरे प्यार की उमर" " वारिस (1989) मध्ये उत्तम जगदीशसाठी. जून 1985 मध्ये, युनायटेड वे ऑफ ग्रेटर टोरंटोने लता मंगेशकरांना मॅपल लीफ गार्डन्समध्ये परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित केले. ॲन मरेच्या विनंतीवरून लतादीदींनी तिचं ‘यू नीड मी’ हे गाणं गायलं. 12,000 मैफिलीत सहभागी झाले, ज्याने धर्मादाय संस्थेसाठी $150,000 जमा केले. 1990चे दशक 1990च्या दशकात, त्यांनी आनंद-मिलिंद, नदीम-श्रवण, जतीन-ललित, दिलीप सेन-समीर सेन, उत्तम सिंग, अनु मलिक, आदेश श्रीवास्तव आणि ए.आर. रहमान या संगीत दिग्दर्शकांसोबत रेकॉर्ड केले. लतादिदीनी जगजीत सिंग यांच्यासोबत गझलांसह काही गैर-फिल्मी गाणी रेकॉर्ड केली. लतादिदीनी कुमार सानू, अमित कुमार, एस.पी. बालसुब्रह्मण्यम, उदित नारायण, हरिहरन, सुरेश वाडकर, मोहम्मद अजीज, अभिजीत भट्टाचार्य, रूप कुमार राठोड, विनोद राठोड, गुरदास मान आणि सोनू निगम यांच्यासोबतही गाणी गायली आहेत. 1990 मध्ये, मंगेशकर यांनी हिंदी चित्रपटांसाठी स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले ज्याने गुलजार-दिग्दर्शित 'लेकिन' चित्रपटाची निर्मिती केली.... चित्रपटातील "यारा सिली सिली" या गाण्याच्या सादरीकरणासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा तिसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. , जो त्यांचा भाऊ हृदयनाथ याने संगीतबद्ध केला होता. चांदनी (1989), लम्हे (1991), डर (1993), ये दिल्लगी (1994), दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (1993) यासह मंगेशकरने यश चोप्राच्या यशराज फिल्म्सच्या निर्मितीगृहातील जवळपास सर्व यश चोप्रा चित्रपट आणि चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. 1995), दिल तो पागल है (1997) आणि नंतर मोहब्बतें (2000), मुझे दोस्ती करोगे! (2002) आणि वीर-झारा (2004). 1990 दरम्यान, लतादिदीनी पत्थर के फूल (1991), 100 दिवस (1991), मेहबूब मेरे मेहबूब (1992), सातवान आसमान (1992), आय लव्ह यू (1992), दिल की बाजी (1993), अंतीम न्याय या चित्रपटांमध्ये रामलक्ष्मणसोबत रेकॉर्ड केले. (1993), द मेलडी ऑफ लव्ह (1993), द लॉ (1994), हम आपके है कौन..! (1994), मेघा (1996), लव कुश (1997), मंचला (1999), आणि दुल्हन बनू में तेरी (1999). एआर रहमानने या काळात मंगेशकरसोबत काही गाणी रेकॉर्ड केली, ज्यात दिल से.. मधील "जिया जले", वन 2 का 4 मधील "खामोशियां गुनगुनाने लगीन", पुकारमधील "एक तू ही भरोसा", झुबेदामधील "प्यारा सा गाव" यांचा समावेश आहे. , झुबेदा मधील "सो गए हैं", रंग दे बसंती मधील "लुक्का छुपी", लगानमधील "ओ पालनहारे" आणि रौनकमधील लाडली. पुकार चित्रपटात तिने "एक तू ही भरोसा" गाताना ऑन-स्क्रीन भूमिका साकारली. 1994 मध्ये, लता मंगेशकर यांनी श्रद्धांजली - माय ट्रिब्यूट टू द इमॉर्टल्स रिलीज केली. अल्बमचे वैशिष्ट्य म्हणजे लतादीदींनी त्या काळातील अजरामर गायकांना त्यांची काही गाणी स्वतःच्या आवाजात सादर करून आदरांजली अर्पण केली. के.एल. सैगल, किशोर कुमार, मोहम्मद रफी, हेमंत कुमार, मुकेश, पंकज मल्लिक, गीता दत्त, जोहराबाई, अमीरबाई, पारुल घोष आणि कानन देवी यांची गाणी आहेत. मंगेशकर यांनी राहुल देव बर्मन यांची पहिली आणि शेवटची दोन्ही गाणी गायली. 1994 मध्ये, तिने 1942 मध्ये राहुल देव बर्मनसाठी "कुछना कहो" गायले: एक प्रेम कथा. 1999 मध्ये, लता इओ डी परफ्यूम, तिच्या नावावर असलेला परफ्यूम ब्रँड लाँच करण्यात आला. त्यांना त्याच वर्षी जीवनगौरवसाठी झी सिने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1999 मध्ये, मंगेशकर यांना राज्यसभेचे सदस्य म्हणून नामांकन देण्यात आले.तथापि, उपसभापती नजमा हेपतुल्ला, प्रणव मुखर्जी आणि शबाना आझमी यांच्यासह सभागृहातील अनेक सदस्यांकडून टीकेला आमंत्रण देऊन, ती राज्यसभेच्या सत्रांना नियमितपणे उपस्थित राहू शकल्या नाही. त्यांनी अनुपस्थितीचे कारण आजारी असल्याचे सांगितले; संसद सदस्य म्हणून तिने दिल्लीत पगार, भत्ता किंवा घरही घेतले नसल्याचेही वृत्त आहे. 2000चे दशक 2001 मध्ये, लता मंगेशकर यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.त्याच वर्षी, त्यांनी लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन (ऑक्टोबर 1989 मध्ये मंगेशकर कुटुंबाने स्थापन केलेले) द्वारे व्यवस्थापित केलेले, पुण्यात मास्टर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची स्थापना केली. 2005 मध्ये, त्यांनी स्वरांजली नावाच्या दागिन्यांचे कलेक्शन डिझाईन केले, जे Adora या भारतीय हिरे निर्यात कंपनीने तयार केले होते. संग्रहातील पाच तुकड्यांनी क्रिस्टीच्या लिलावात £105,000 जमा केले आणि पैशाचा एक भाग 2005 काश्मीर भूकंप मदतीसाठी दान करण्यात आला. तसेच 2001 मध्ये, त्यांनी लज्जा चित्रपटासाठी संगीतकार इलैयाराजासोबत तिचे पहिले हिंदी गाणे रेकॉर्ड केले; तिने यापूर्वी इलैयाराजा यांनी संगीतबद्ध केलेली तमिळ आणि तेलुगू गाणी रेकॉर्ड केली होती. लता मंगेशकर यांचे "वादाना तोड" हे गाणे इटरनल सनशाईन ऑफ द स्पॉटलेस माइंड (2004) या चित्रपटात आणि त्याच्या साउंडट्रॅकमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. 21 जून 2007 रोजी, त्यांनी जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या आणि मयुरेश पै यांनी संगीतबद्ध केलेल्या आठ गझल-सदृश गाण्यांचा सादगी अल्बम रिलीज केला. 2010चे दशक 12 एप्रिल 2011 रोजी, लतादिदीनी सरहदीन: म्युझिक बियॉन्ड बाऊंडरीज हा अल्बम रिलीज केला, ज्यात मंगेशकर आणि मेहदी हसन (पाकिस्तानच्या फरहाद शहजाद यांनी लिहिलेले) "तेरा मिलना बहुत अच्छे लगे" हे युगल गीत आहे. अल्बममध्ये उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, हरिहरन, सोनू निगम, रेखा भारद्वाज आणि आणखी एक पाकिस्तानी गायक, गुलाम अली, मयुरेश पै आणि इतरांच्या रचना आहेत. 14 वर्षांनंतर लतादिदीनी संगीतकार नदीम-श्रवणसाठी गाणे रेकॉर्ड केले; बेवफा (2005) साठी "कैसे पिया से". पेज 3 (2005) साठी "कितने अजीब रिश्ते हैं यहाँ पर" आणि जेल (2009) साठी "दाता सुन ले" नंतर, शमीर टंडनने पुन्हा एकदा लता मंगेशकरांसोबत गाणे रेकॉर्ड केले; सतरंगी पॅराशूट (2011) चित्रपटासाठी "तेरे हसने साई मुझेको". एका विरामानंतर, लतादिदी पार्श्वगायनात परत आल्या आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या स्टुडिओमध्ये दुन्नो Y2... लाइफ इज ए मोमेंट (2015) साठी "जीना क्या है, जाना मैं" हे गाणे रेकॉर्ड केले, जो कपिल शर्माच्या विचित्र प्रेमकथेचा सिक्वेल होता. ...ना जाने क्यूं. 28 नोव्हेंबर 2012 रोजी, लतादिदीनी मयुरेश पै यांनी संगीतबद्ध केलेल्या स्वामी समर्थ महामंत्र या भजनांचा अल्बम, एलएम म्युझिक, स्वतःचे संगीत लेबल लाँच केले. त्यांनी त्यांची धाकटी बहीण उषासोबत अल्बममध्ये गाणे गायले. 2014 मध्ये, त्यांनी एक बंगाली अल्बम, शूरोध्वानी रेकॉर्ड केला, ज्यामध्ये सलील चौधरी यांच्या कवितांचा समावेश होता, ज्यात पै यांनी संगीत दिले होते. 30 मार्च 2019 रोजी, लतादिदीनी भारतीय सैन्य आणि राष्ट्राला श्रद्धांजली म्हणून मयुरेश पै यांनी संगीतबद्ध केलेले "सौगंध मुझे इस माती की" हे गाणे रिलीज केले. 1940 ते 1970 पर्यंत, लता दिदीनी आशा भोसले, सुरैया, शमशाद बेगम, उषा मंगेशकर, किशोर कुमार, मोहम्मद रफी, मुकेश, तलत महमूद, मन्ना डे, हेमंत कुमार, जीएम दुर्रानी, ​​महेंद्र कपूर यांच्यासोबत युगल गीत गायले. 1964 मध्‍ये त्यांनी पी.बी. श्रीनिवाससोबत 'मैं भी लड़की हूं' मधील "चंदा से होगा" गायले. 1976 मध्ये मुकेश यांचे निधन झाले. 1980 मध्ये मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर, तिने शैलेंद्र सिंग, शब्बीर कुमार, नितीन मुकेश (मुकेशचा मुलगा), मनहर उधास, अमित कुमार (किशोर कुमारचा मुलगा), मोहम्मद अझीझ, सुरेश वाडकर, एस.पी. बालसुब्रह्मण्यम, विनोद राठोड यांच्यासोबत गाणे चालू ठेवले. 1990च्या दशकात, लता दिदीनी रूप कुमार राठोड, हरिहरन, पंकज उधास, अभिजीत, उदित नारायण, कुमार सानू यांच्यासोबत युगल गीत गाण्यास सुरुवात केली. "मेरे ख्वाबों में जो आये", "हो गया है तुझको तो प्यार सजना", "तुझे देखा तो ये जाना सनम", आणि "मेहंदी लगा के रखना" यांसारखी गाणी दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हे तिचे ९० च्या दशकातील सर्वात उल्लेखनीय काम होते. 2000च्या दशकात, लतादिदीनी युगल गीत प्रामुख्याने उदित नारायण आणि सोनू निगम यांच्यासोबत होते. 2005-06 हे तिच्या शेवटच्या सुप्रसिद्ध गाण्यांचे वर्ष होते: बेवफा मधील "कैसे पिया से" आणि "लकी:नो टाइम फॉर लव्ह" मधील "शायद येही तो प्यार है", अदनान सामी आणि रंग दे बसंती मधील "लुक्का छुपी" ( 2006 चित्रपट) ए आर रहमानसोबत. तिने पुकारमधील "एक तू ही भरोसा" हे गाणे गायले. उदित नारायण, सोनू निगम, जगजीत सिंग, रूप कुमार राठोड आणि गुरदास मान यांच्यासोबत गायलेली वीर-झारा या दशकातील इतर उल्लेखनीय गाणी होती. डन्नो वाय2 (2014) मधील "जीना है क्या" हे तिच्या नवीनतम गाण्यांपैकी एक आहे. गायनाशिवाय कारकीर्द संगीत दिग्दर्शन लता मंगेशकर यांनी १९५५ मध्ये ‘राम राम पावणे’ या मराठी चित्रपटासाठी पहिल्यांदा संगीत दिले. नंतर 1960च्या दशकात, तिने आनंद घन या टोपणनावाने मराठी चित्रपटांसाठी संगीत दिले. 1960 - राम राम पावना 1963 - मराठा तितुका मेळवावा 1963 - मोहित्यांची मंजुळा 1965 - साधी मानसे १९६९ - तांबडी माती साधी माणसे या चित्रपटासाठी तिला महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. याच चित्रपटातील "ऐरनिच्या देवा तुला" या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला. उत्पादन लता मंगेशकर यांनी चार चित्रपटांची निर्मिती केली आहे. १९५३ - वादळ (मराठी) १९५३ - झांझर (हिंदी), सी. रामचंद्र यांच्यासोबत सहनिर्मिती १९५५ - कांचन गंगा (हिंदी) १९९० - लेकीन... (हिंदी) भारत सरकारचे पुरस्कार १९६९ - पद्मभूषण १९८९ - दादासाहेब फाळके पुरस्कार १९९९ - पद्मविभूषण 2001 - भारतरत्न 2008 - भारताच्या स्वातंत्र्याच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त "वन टाइम अवॉर्ड फॉर लाइफटाइम अचिव्हमेंट" सन्मान . महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार 1966 - साधी माणसंसाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक * 1966 - 'आनंदघन' नावाने साधी माणसं (मराठी) साठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक 1977 - जैत रे जैतसाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक * 1997 - महाराष्ट्र भूषण पुरस्कार[4] 2001 - महाराष्ट्र रत्न (प्रथम प्राप्तकर्ता). राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार या पुरस्काराचे वयाच्या ६१ व्या वर्षी सर्वात वयस्कर विजेते होण्याचा विक्रम मंगेशकर यांच्या नावावर आहे. त्यांना या श्रेणीतील अलीकडचा पुरस्कार लेकीन चित्रपटातील गाण्यांसाठी मिळाला आहे.... ज्युरींनी तिला हा पुरस्कार "दुर्मिळ आणि शुद्ध शैलींसह उत्कृष्ट अभिव्यक्तीसह गाण्यासाठी" प्रदान केला आहे. 1972 - परिचय चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 1974 - कोरा कागज चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 1990 - लेकीन चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार... पार्श्वगायनासाठी फिल्मफेर पुरस्कार पहिल्यांदा 1959 मध्ये सुरू झाले. 1956 मध्ये शंकर जयकिशन यांच्या चोरी चोरी चित्रपटातील 'रसिक बलमा' या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा फिल्मफेर पुरस्कार मिळाला. पार्श्वगायिका श्रेणी नसल्याच्या निषेधार्थ लतादीदींनी ते थेट गाण्यास नकार दिला. शेवटी 1959 मध्ये ही श्रेणी सुरू करण्यात आली. तथापि, पुरुष आणि महिला गायकांसाठी वेगळे पुरस्कार नंतर सुरू करण्यात आले. लता मंगेशकर यांनी 1959 ते 1967 पर्यंत सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका पुरस्काराची मक्तेदारी केली. 1970 मध्ये, लतादीदींनी नवीन प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी फिल्मफेर पुरस्कार सोडण्याची घोषणा केली . १९५९ - मधुमती मधील "आजा रे परदेसी". 1963 - बीस साल बाद मधील "कही दीप जले कही दिल" 1966 - "तुम्ही मेरे मंदिर तुम्ही मेरी पूजा" खंडन मधील 1970 - जीने की राह मधील "आप मुझे अच्छे लगने लगे" 1993 - फिल्मफेर जीवनगौरव पुरस्कार 1994 - हम आपके है कौन मधील "दीदी तेरा देवर दिवाना" साठी फिल्मफेर विशेष पुरस्कार..! * 2004 - फिल्मफेर विशेष पुरस्कार ज्यामध्ये 50 वर्षे पूर्ण झालेल्या फिल्मफेर पुरस्कारांच्या निमित्ताने सुवर्ण ट्रॉफी प्रदान करण्यात आली सन्मान २०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये मंगेशकर दहाव्या क्रमांकावर होत्या.https://www.outlookindia.com/magazine/story/a-measure-of-the-man/281949 इवलेसे|भारताचे उपराष्ट्रपती श्री भैरोंसिंग शेखावत नवी दिल्ली येथे लता मंगेशकर यांनी गायलेल्या कवितांची ऑडिओ सीडी कॅसेट जारी करताना, दिनांक. ३० मार्च २००४ इवलेसे|"ऐ मेरे वतन के लोगो" या ऐतिहासिक गाण्याला ५१ वर्षे पूर्ण झाल्यावर लता मंगेशकर यांचा सत्कार मुंबई येथे करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी लेखन लता मंगेशकर यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह ग्रंथाली प्रकाशनाने सन १९९५ च्या आसपासच्या वर्षी प्रसिद्ध केला होता. त्याचे संपादन मधुवंती सप्रे यांनी केले होते. पुढे हे पुस्तक मिळणे कठीण झाले. जयश्री देसाई यांच्या पाठपुराव्यामुळे ’मैत्रेय प्रकाशन’ने ’फुले वेचिता’ या नावाने ते पुस्तक पुनर्मुद्रित केले आहे. लता मंगेशकर यांंच्या जीवनावर आणि कार्यावर लिहिलेली पुस्तके लता (इसाक मुजावर) लता : संगीत क्षेत्रातील चंद्रमा (सांज शकुन प्रकाशन) लता मंगेशकर यांचे व्यक्तिचित्रण करणारे ’स्वरयोगिनी’ नावाचे पुस्तक मधुवंती सप्रे यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाच्या परिशिष्टात लता मंगेशकरांनी गायिलेल्या चित्रपटगीतांची यादी आहे. The Voice of a Nation (मूळ लेखिका पद्मा सचदेव; मराठी अनुवाद : 'अक्षय गाणे' जयश्री देसाई) ऐसा कहाँ से लाऊँ (हिंदी- पद्मा सचदेव) लतादीदी आणि माझ्या कविता (सुचित्रा कातरकर) लतादीदी : अजीब दर्शन हैं यह (मूळ लेखक : हरीश भिमाणी-हिंदी); (मराठी अनुवाद : 'लतादीदी' अशोक जैन.) In search of Lata Mangeshkar. (इंग्रजी - हरीश भिमाणी) Lata in her own voice (नसरीन मुन्नी कबीर) लता मंगेशकर (चरित्र)- राजू भारतन लता मंगेशकर गंधार स्वरयात्रा (१९४५- १९८९) - संपादन : विश्वास नेरूरकर गाये लता, गाये लता- डॉ.मंगेश बिच्छू. प्रकाशक- पल्लवी प्रकाशन हे रत्‍न भारताचे - लता मंगेशकर (लेखक : रेखा चवरे) मोगरा फुलला (संपादक : रेखा चवरे) संगीतक्षेत्रातील चंद्रमा (प्रसाद महाडकर, विवेक वैद्य) सप्तसुरांच्या पलीकडे : लता मंगेशकर (हरीश भिमाणी) लता मंगेशकर - संगीत लेणे (मोरया प्रकाशन) हे सुद्धा पहा सर्वात महान भारतीय (सर्वेक्षण) संदर्भ वर्ग:मराठी गायक वर्ग:मराठी संगीतकार वर्ग:पद्मविभूषण पुरस्कारविजेते वर्ग:पद्मभूषण पुरस्कारविजेते वर्ग:भारतरत्‍न पुरस्कारविजेते वर्ग:मराठी पार्श्वगायक वर्ग:द ग्रेटेस्ट इंडियन वर्ग:महाराष्ट्र भूषण पुरस्कारविजेते वर्ग:इ.स. १९२९ मधील जन्म वर्ग:कोविड-१९ महामारीमुळे मृत्यू
उषा मंगेशकर
https://mr.wikipedia.org/wiki/उषा_मंगेशकर
(१९३५ - हयात) या मराठी आणी गुजराती गायिका, संगीतकार आहेत. त्यांची आजी देवदासी व आजोबा ब्राह्मण होते. मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या त्या कन्या. ज्वानीच्या आगीची मशाल हाती, छबीदार छबी, लागली कुनाची उचकी ही चित्रपट गीते त्यांनी गायली आहेत. पंडित दीनानाथ मंगेशकर आणि शेवंती (शुधामती) यांची  ती सर्वात लहान मुलगी. लता मंगेशकर, आशा भोसले आणि मीना खडीकर यांच्यामधील ती सर्वात लहान बहीण आणि संगीत-दिग्दर्शक भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांची मोठी बहीण  आहेत. ऑलटाइम ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'जय संतोषी मां (1975)' साठी कमी बजेट असलेल्या चित्रपटासाठी काही भक्तीगीते गायल्यानंतर त्या  पार्श्वगायिका म्हणून चर्चेत आल्या. त्या चित्रपटातील त्यांच्या "मै तो  आरती" गाण्यासाठी त्यांना फिल्मफेर बेस्ट फीमेल प्लेबॅक सिंगर पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते. २००६ मध्ये त्या चित्रपटाच्या रीमेकसाठी त्यांनी तीच गाणी गायली. उषा यांना चित्रकलेची आवड आहे. त्यांच्या "मुंगडा" या प्रसिद्ध गाण्यासाठी आणि पिंजरा या मराठी चित्रपटाच्या गाण्यांसाठी त्या प्रामुख्याने ओळखलया  जातात. त्यांनी दूरदर्शनसाठी 'फूलवंती' संगीत नाटकही तयार केले होते. पुरस्कार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नवी मुंबई शाखेच्या वतीने स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या सन्मानार्थ पुरस्कार लता दीदींच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. संदर्भ बाह्य दुवे वर्ग:मराठी गायक वर्ग:मराठी संगीतकार वर्ग:मराठी पार्श्वगायक वर्ग:इ.स. १९३५ मधील जन्म वर्ग:स्त्री चरित्रलेख वर्ग:लता मंगेशकर पुरस्कार विजेते
मीना मंगेशकर
https://mr.wikipedia.org/wiki/मीना_मंगेशकर
पुनर्निर्देशनमीना खडीकर
राधा मंगेशकर
https://mr.wikipedia.org/wiki/राधा_मंगेशकर
(इ.स. - हयात) या मराठी गायिका आहेत. बाह्य दुवे वर्ग:पार्श्वगायक वर्ग:मराठी गायक वर्ग:हिंदुस्तानी गायक वर्ग:स्त्री चरित्रलेख
दीनानाथ मंगेशकर
https://mr.wikipedia.org/wiki/दीनानाथ_मंगेशकर
दीनानाथ मंगेशकर (डिसेंबर २९, इ.स. १९०० - एप्रिल २४, इ.स. १९४२) हे मराठी गायक, नाट्यअभिनेते, संगीतकार होते. या गायक नटाला श्री.कृ. कोल्हटकरांनी मास्टर ही उपाधी बहाल केली, आणि तेव्हापासून ते मास्टर दीनानाथ मंगेशकर झाले. पंडित दिनानाथ मंगेशकर, ह्यांचा जन्म गोव्यातील मंगेशी , Mangeshi, गोवा.जन्म तारिक २९ डिसेंबर १९०० . त्यांच्या वडिलांचं नाव गणेश भट (भिकामभट्ट) नावथे हर्डीकर (अभिषेकी) एक लग्न झालेले कऱ्हाडे ब्राह्मण होते जे मंगेशीतील देवळात पूजारी होते भट,पूजारी Mangeshi Temple जे गोव्यात आहे. त्यांच्या आई येसूबाई राणे ह्या होत्या ज्या गणेश भटांच्या प्रेमिका mistress त्या गोव्यातील कलावंत समाजातील होत्या, Devadasi community , ज्याला आज Gomantak Maratha Samaj"Gomantak Prakruti ani Sanskruti" by B.D.Satoskar म्हटलं जातं.जन्म मंगेशी गावातील मंगेशी गाव असल्याने, त्यांनी आपल्या तरुणाईत "मंगेशकर" हे नाव धारण केले, ज्याचा अर्थ ते "मंगेशी गांवचे". मंगेश हे गावातील देवाचे म्हणजेच महादेवाचे नाव असल्याने,गावाचेही नाव मंगेशी Mangeshi Temple. देवदासी असल्याने,येसूबाई ह्या नावाजलेल्या गायिका होत्या. पंडित दिनानाथांच्या वडिलांचं मुळ आडनाव हर्डिकर होतं,त्यांच्या वडिलांचं नियमित अभिषेक वाहण्याचं काम होतं (ritual bathing). ते नित्य मंगेशी देवस्थानात भटजी म्हणून सेवा करायचे,म्हणून त्यांचे नाव अभिषेकी म्हणूनही प्रख्यात झाले. त्यांचेच नातू हे व कायदेशीर मूलाचे बळवंतराव सुपूत्र भारतीय गायकी जितेंद्र अभिषेकी होते, जे दिनानाथांच्या सावत्र भावाचे सुपूत्र होते‌. जन्म आणि संगीताचे शिक्षण गोमंतकातील मंगेशी येथे त्यांचा जन्म झाला. अद्वितीय गळा, अस्खलित वाणी, तल्लख बुद्धी हे उपजत गुण त्यांच्या अंगी होते. निकोप प्रसन्न चढा सूर, भिंगरीसारखी फिरणारी तान आणि पक्की स्वरस्थाने हीदेखील देवाने दिलेली देणगी होती. बाबा (रघुनाथ मामा) माशेलकर हे दीनानाथांचे पहिले गानगुरू. त्यानंतर रामकृष्णबुवा वझे, गणपतीबुवा भिलवडीकर, भाटेबुवा, निसार हुसेन, कथ्यक नर्तक सुखदेव प्रसाद आदींकडून त्यांनी गाणं मिळवले. त्या काळात सुमारे पाच हजार दुर्मिळ रागरागिण्यांचा, चिजांचा संग्रह त्यांच्याकडे होता. त्यांचे गायन म्हणजे चमत्कृती आणि माधुर्य यांचा मिलाफ होता. नाट्यसृष्टीतील कारकीर्द इ.स. १९१४ मध्ये बालगंधर्वांनी स्वतःची गंधर्व नाटक मंडळी सुरू केल्यावर किर्लोस्कर नाटक मंडळींत दीनानाथांचा प्रवेश झाला. १९१५ मध्ये ‘ताजेवफा’ या हिंदी नाटकात कमलेची पहिली स्वतंत्र भूमिका त्यांनी केली. तेथे दीनानाथ चार वर्षे होते. १९१८ मध्ये त्यांनी एका ध्येयवादी, नावीन्याची आवड असलेली साहित्यप्रेमी अशा ’बलवंत संगीत मंडळी’ नावाच्या नाटक कंपनीची स्थापना केली. अभिनय गडकऱ्यांनी ‘भावबंधन’ हे नाटक केवळ बलवंत मंडळींसाठीच लिहिले. या नाटकातील लतिका, ‘पुण्यप्रभाव’मधील कालिंदी, ‘उग्रमंगल’मधील पद्मावती, ‘रणदुंदुभी’मधील तेजस्विनी, ‘राजसंन्यास’मधील शिवांगी या भूमिका दीनानाथांनी आपल्या गायनाभिनयाने विशेष गाजविल्या. ‘उग्रमंगल’ नाटकात ‘छांडो छांडो बिहारी’ या ठुमरीवर ते नृत्य करीत. हा ठुमरी नाच हे त्या काळी रंगभूमीवरचे फार मोठे आकर्षण ठरले होते. ‘मानापमान’मध्ये धैर्यधर, ‘ब्रह्मकुमारी’मध्ये तपोधन इ. पुरुष भूमिकाही केल्या. पण ध्येयवादी, आक्रमक, स्वतंत्र बाण्याच्या त्यांच्या स्त्री भूमिका खूप गाजल्या. लोकमान्य टिळकांनी पुरस्कारलेल्या होमरूल चळवळीच्या फंडासाठी दीनानाथांनी ‘पुण्यप्रभाव’चा प्रयोग केला होता. दीनानाथांच्या ’बलवंत संगीत मंडळी’ने महाराष्ट्रभर फिरत राहून नाट्य संगीत गावोगाव पोचविले, आफ्रिकेचा दौरा आखला आणि हिंदी नाटकांची गुजराती रूपे करून बसविली. गोमंतकात या गायक नटाला कोल्हटकरांनी मास्टर हे उपपद लावले. निधन मा. दीनानाथ मंगेशकर यांचे वयाच्या अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी पुण्यात बुधवार पेठेत असलेल्या कस्तुरे वाड्यात निधन झाले. मास्टर दीनानाथांचा अभिनय असलेली नाटके (कंसात भूमिकेचे नाव) उग्रमंगल (पद्मावती) एकच प्याला (सिंधू) कॉंटो में फूल ऊर्फ भक्त प्रल्हाद (दुय्यम स्त्री भूमिका) गैरसमज (सदानंद) चौदावे रत्‍न (त्राटिका) जन्मरहस्य (कांता) झुंझारराव (जाधवराव) ताज-ए-वफा (कमला) देशकंटक (हिंमतराव) धरम का चॉंद ऊर्फ भक्त ध्रुव (सुरूचि) पुण्यप्रभाव (कालिंदी, किंकिणी) ब्रह्मकुमारी (गौतम, प्रबोधन) भावबंधन (लतिका) मानापमान (धैर्यधर) मूकनायक (सरोजिनी) रणदुंदुभी (तेजस्विनी) राजलक्ष्मी (वारुणी) राजसंन्यास (पद्मावती, शिवांगी) रामराज्यवियोग (राम) विद्याहरण (देवयानी) वीर विडंबन (उत्तरा) वेड्यांचा बाजार (वेणू) शाकुंतल (शकुंतला) शारदा (शारदा) संन्यस्त खड्ग (सुलोचना) सुंदोपसुंद (सुविभ्रमा) सौभद्र (अर्जुन) मास्टर दीनानाथांचे संगीत असलेली नाटके (अपूर्ण यादी) ब्रह्मकुमारी (लेखक : विश्वनाथ चिंतामण बेडेकर - विश्राम बेडेकर) संन्यस्त खड्ग (लेखक : विनायक दामोदर सावरकर) दीनानाथ मंगेशकरांच्या बलवंत पिक्चर्सने बनवलेले हिंदी-मराठी चित्रपट अंधेरी दुनिया कृष्णार्जुन युद्ध भक्त पुंडलिक या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन दीनानाथांचे होते. ‘अंधेरी दुनिया’त त्यांनी भूमिकाही केली होती. ‘कृष्णार्जुनयुद्ध’मध्ये ते ‘अर्जुन’ होते. ‘भक्त पुंडलिक’ मध्ये त्यांनी एका साधूची भूमिका केली होती. लेखन दीनानाथ मंगेशकर हे एक उत्तम ज्योतिषी होते. इ.स. १९२२ साली इंदूरच्या मुक्कामात असताना त्यांना ज्योतिषविद्येचा पहिला पाठ शंकरशास्त्री घाटपांडे या तेथील प्रसिद्ध ज्योतिषीबुवांकडून मिळाला होता. दीनानाथांनी ‘ज्योतिष आणि संगीत’ या विषयावरील ग्रंथ लिहायला घेतला होता. गायनाचा व ग्रहांचा शास्त्रशुद्ध संबंध कसा आहे, कोणता ग्रह कोणत्या स्वराचा स्वामी, त्याचप्रमाणे राग-रागिण्यांचे रंग, वर्णने, स्वरांच्या रंगांवरून त्यांचा निसर्गातील-सूर्यकिरणांतील रंगांशी, वेळेशी कसा संबंध लागतो आणि म्हणून अमूक वेळेला अमूक राग गाणे’ ही कल्पना कशी सिद्ध होते, यांवर त्या ग्रंथात माहिती असणार होती. सूर्योदयाचे आणि सूर्यास्ताचे राग-स्वर (वादी-संवादीच्या फरकाने) कसे तेच आहेत (उदा० देसकार-भलप-तोडी-मुलतानी) वगैरे छाननी त्यांनी या ग्रंथात केली होती. दुर्दैवाने ते लिखाण छापून प्रसिद्ध होण्यापूर्वीच गहाळ झाले. मास्टर दीनानाथ यांनी गायलेली व ध्वनिमुद्रिका असलेली गीते (कंसात रागाचे-नाटकाचे नाव) आजवरी पाहूनी वाट जिवलगा (लावणी, राजसंन्यास) आपदा राजपदा (तिलककामोद, रणदुंदुभी) कठीण कठीण कठीण किती (यमन, भावबंधन) काही नाही पाही जनी मोल (मिश्र कानडा, रणदुदुंभी चंद्रिका ही जणू (आरबी, मानापमान) चराचरी या तुझा असे निवास (ठुमरी-बिहाग, भावबंधन) छांडो छांडो बिहारी, ये नारी देखे सगरी (ठुमरी-) जगीं हा खास वेड्यांचा (कवाली, रणदुंदुभी) जिंकिते जगीं जे (गझल, रणदुंदुभी) झाले युवती मना (हंसध्वनी, मानापमान) दिव्य स्वातंत्र्य रवि (मालकंस, रणदुंदुभी) नसे जित पहा (दोन धैवतांचा देसी, संन्यस्त खड्ग) नाचत गा गगनात नाथा (यमन, पुण्यप्रभाव) नोहे सुखभया गतभया (यमन, उग्रमंगल) पतिव्रता ललना होती (मिश्र मांड, चौदावे रत्‍न) परवशता पाश दैवे (कवाली, रणदुंदुभी) पिया घे निजांकी आता (मिश्र पिलू, संन्यस्त खड्ग) प्रबलता बलहता (आरबी, देशकंटक) प्रेम सेवा शरण (मुलतानी, मधुवंती; मानापमान) भाली चंद्र असे धरिला (यमन, मानापमान) भाव भला भजकाचा (देसी, उग्रमंगल) मधु मीलनात या (मांड, ब्रह्मकुमारी) मर्मबंधातली ठेव ही (पटदीप, संन्यस्त खड्ग) माझी मातुल कन्यका (यमन कल्याण, सौभद्र) रंग अहा भरला (पहाडी, पुण्यप्रभाव) रति रंग रंगे (आरबी, संन्यस्त खड्ग) रवि मी चंद्र कसा (तिलक कामोद, मानापमान) वदनी धर्मजलाला (सिंधुरा, सौभद्र) वितरी प्रखर तेजोबल (तिलक कामोद, रणदुंदुभी) शत जन्म शोधिताना (पिलू गारा, संन्यस्त खड्ग) शांत शांत कलिका ही (बिहाग, रामराज्यवियोग) शूरा मी वंदिले, (बडहंस सारंग, मानापमान) समयी सखा नये (मिश्र मांड, संन्यस्त खड्ग) साजणी बाई नटुनी थटुनी (कवाली, राजसंन्यास) सुकतातचि जगी या (भैरवी, संन्यस्त खड्ग) सुखी साधना (देसकर, देशकंटक) सुरसुख खनी (किरवानी, विद्याहरण) हांसे जनात राया (कवाली, राजसंन्यास) दीनानाथ मंगेशकरांनी गायिलेल्या चिजा अब रुत भर आई (बसंत) झूता मुरारे (कानडी रचना) तन जहाज मन सागर (जयजयवंती) तारी बिछेला बा मनवा (पहाडी) नन्नु द्रोवनी किंत ताम समा (कानडी गीत, राग काफी सिंदुरा) निकेनिके शोभा (बहादुरी तोडी) नैन सो नैल मिला रखुॅंगी (दरबारी कानडा) परलोक साधनवे (कानडी गीत) मोरी निंदियॉं गमायें डारी नैन (बिहाग) शंकर भंडारी बोले(शंकरा) सकल गडा चंदा (जयजयवंती) सहेली मन दारूडा (पहाडी) सुहास्य तूझे (यमन, चित्रपट-कृष्णार्जुन युद्ध) हो परी मुशता (टप्पा-सिंधुरा) दीनानाथ मंगेशकर यांची स्मारके दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने अनेक संस्था उभ्या केल्या गेल्या आहेत. तर काही जुन्याच संस्थांना त्यांचे नाव नव्याने देण्यात आले आहे. त्यांचे नाव असलेल्या काही संस्था : दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ल पूर्व-मुंबई;(आसनसंख्या १०१०) दीनानाथ नाट्यगृह, सांगली. (हे नाट्यगृह पाडून तेथे नवीन नाट्यगृह बांधण्याचे घाटते आहे--२०१२मधली बातमी) मास्टर दीनानाथ सभागृह (गोव्याच्या कला अकादमीतले एक सभागृह) दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे. दीनानाथ मंगेशकर याच्या स्मरणार्थ पुण्यातील चिंचवड उपनगरात संगीत मराठी नाटकांचा महोत्सव होतो. डॉ. रवींद्र घांगुर्डे आणि वंदना घांगुर्डे यांचा नादब्रह्म परिवार हे आयोजक असतात. दीनानाथांची सांगीतिक कारकीर्द ’स्वरमंगेश’ या १७ मिनिटांच्य माहितीपटाच्या साहाय्याने चित्रपटाच्या पडद्यावर पाहता येते. दीनानाथांवरील पुस्तके दिना दिसे मज दिनरजनी (लेखक - डॉ. प्रभाकर जठार) मा. दीनानाथ स्मृति-दर्शन (संपादिका - लता मंगेशकर) ब्रीद तुझे जगी दीनानाथ (वंदना रवींद्र घांगुर्डे) शतजन्म शोधिताना (गो.रा. जोशी) शूरा मी वंदिले (बाळ सामंत) स्वरसम्राट दीनानाथ मंगेशकर (हिंदी अनुवादित, प्रकाश भातम्ब्रेकर, मूळ मराठी लेखिका - वंदना रवींद्र घांगुर्डे) पंडित दीनानाथ मंगेशकर संगीत नाट्य महोत्सव दीनानाथ मंगेशकर याच्या स्मरणार्थ पुण्यातील चिंचवड उपनगरात संगीत मराठी नाटकांचा महोत्सव होतो. डॉ. रवींद्र घांगुर्डे आणि वंदना घांगुर्डे यांचा नादब्रह्म परिवार हे आयोजक असतात. माहितीपट दीनानाथ मंगेशकर यांच्या सांगीतिक कारकिर्दीवर ’स्वरमंगेश’ नावाचा माहितीपट आहे. माहितीपट एक तास सतरा मिनिटांचा असून त्याची संकल्पना, त्याचे लेखन. दिग्दर्शन शैला दातार यांचे आहे. विक्रम गोखले, चित्तरंजन कोल्हटकर, भालचंद्र पेंढारकर आणि संगीत समीक्षक अशोक रानडे आदींचे या चित्रपटात निवेदन आहे. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दीनानाथ मंगेशकर यांची पहिली पुण्यतिथी २४ एप्रिल १९४३ या दिवशी होती. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कन्या लता मंगेशकर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान स्थापन केले आहे. या प्रतिष्ठानातर्फे इ.स. १९८८ सालापासून दरवर्षी २४ एप्रिल या दिवशी, समाजसेवा, नाट्यसेवा, साहित्य, रंगभूमी, चित्रपट, रंगभूमी आणि आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींस (१) आनंदमयीपुरस्कार, (२) मोहन वाघ पुरस्कार, (३) वाग्विलासिनी पुरस्कार (४)रंगभूमी पुरस्कार आणि (५) दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार देण्यात येतात. पुरस्काराचे स्वरूप एक लाख एक हजार एक रुपये रोख (सुरुवातीला ही रक्कम ५० हजार रुपये होती), आणि सन्मानचिन्ह असे आहे. २०१६ साली देण्यात आलेले दीनानाथ स्मृति-पुरस्कार नाट्यय़ क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेबद्दल अभिनेता प्रशांत दामले यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार’ ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासह अभिनेता रणवीर सिंग यांना हिंदी चित्रपटांतील अतुलनीय योगदानाबद्दल अभिनेते जितेंद्र कपूर यांना विशेष जीवनगौरव पुरस्कार संगीत क्षेत्रातील सेवेसाठी अजय चक्रवर्ती यांना साहित्य क्षेत्रातील ‘वाग्विलासिनी पुरस्कार’ अरुण साधू यांना उत्कृष्ट नाट्यनिर्मितीचा पुरस्कार ‘दोन स्पेशल’ या नाटकाला प्रदीर्घ पत्रकारितेसाठी देण्यात येणारा पुरस्कार दिलीप पाडगावकर यांना, आणि सामाजिक कार्यासाठीचा मास्टर दीनानाथ मंगेशकर आनंदमयी पुरस्कार परतवाडा येथील ‘गोपाळ शिक्षण संस्थेचे’ सचिव शंकरबाबा पापळकर यांना देण्यात आला. दीनानाथ स्मृति पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती, त्यांचे क्षेत्र, पुरस्काराचे नाव आणि वर्ष पुरस्कारप्राप्त व्यक्ती, संस्था, कलाकृतीक्षेत्रपुरस्काराचे नाववर्षअनिल कपूरचित्रपटविशेष दीनानाथ मंगेशकर पुरस्कार२०१५अपर्णा अभ्यंकर?आदिशक्ती पुरस्कार२०१५अमृत प्रॉडक्शननाट्यनिर्मिती (त्या तिघांची गोष्ट)मोहन वाघ पुरस्कार२०१५आपले घर(संस्था)समाजकार्यआनंदमयी पुरस्कार२००७आमिर खानचित्रपटविशेष दीनानाथ मंगेशकर पुरस्कार२००८आशा कामतसंमाजसेवाआनंदमयी पुरस्कार२०१५उल्हास प्रतिष्ठान(संस्था)समाजसेवाआनंदमयी पुरस्कार२००८ऋषि कपूरअभिनयदीनानाथ मंगेशकर पुरस्कार२०१४कुमार बोससंगीतदीनानाथ मंगेशकर पुरस्कार२०१२गणपतराव पाटीलशेतीक्षेत्रविशेष दीनानाथ मंगेशकर पुरस्कार२०१३उस्ताद गुलाम मुस्तफासंगीतदीनानाथ मंगेशकर पुरस्कार२०११कवी ग्रेससाहित्यवाग्विलासिनी पुरस्कारवर्ष?कुमार केतकरपत्रकारितादीनानाथ मंगेशकर पत्रकारिता पुरस्कार२०१५चारुदत्त आफळेसमाजसेवाआनंदमयीपुरस्कार२००३जया बच्च्चन चित्रपटक्षेत्रआदिशक्ती पुरस्कार२०१३दिलीप प्रभावळकररंगभूमीविशेष दीनानाथ मंगेशकर पुरस्कार२०१५धर्मेंद्रचित्रपटदीनानाथ मंगेशकर पुरस्कार२०११नीतिन वीरखरेसमाजसेवाआनंदमयी पुरस्कार२०११नीला श्रॉफ यांचे वात्सल्य फाउंडेशनसमाजसेवाआनंदमयी पुरस्कार२०१३प्रभा अत्रेसंगीतदीनानाथ मंगेशकर२००५डॉ. प्रसाद देवधरसमाजसेवाआनंदमयी पुरस्कार२०१२प्रसाद सावकारनाट्य आणि संगीतदीनानाथ मंगेशकर पुरस्कार२०११भालचंद्र नेमाडेसाहित्यवाग्विलासिनी पुरस्कार२०१५भालचंद्र पेंढारकरनाट्यमोहन वाघ पुरस्कार२००७भैरप्पासाहित्यवाग्विलासिनी पुरस्कार२०१२म.वा. धोंडसाहित्यवाग्विलासिनी पुरस्कार२००५महेश एलकुंचवारसाहित्यवाग्विलासिनी पुरस्कार२०११माधुरी दीक्षित नेनेचित्रपटदीनानाथ मंगेशकर पुरस्कार२०१२मालिनी राजूरकरसंगीतदीनानाथ मंगेशकर पुरस्कार२००८रत्‍नाकर मतकरीसाहित्यवाग्विलासिनी पुरस्कार२०१३राम शेवाळकरसाहित्यवाग्विलासिनी पुरस्कार १९९९रेखा चित्रपटदीनानाथ मंगेशकर पुरस्कार२००५वंदना गुप्तेनाट्य आणि चित्रपटदीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार२०१३वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान(संस्था)संगीत आणि नाट्यमोहन वाघ पुरस्कार२०१२विक्रम गोखलेनाट्य आणि चित्रपटविशेष दीनानाथ मंगेशकर पुरस्कार२०१२विजया मेहतानाट्यमोहन वाघ पुरस्कार२००५शंभूराजे(नाटक-निर्माते मोहन तोंडवळकर)नाट्यनिर्मितीदीनानाथ मंगेशकर पुरस्कार२००८शम्मी कपूरचित्रपटदीनानाथ मंगेशकर पुरस्कार२००७शरद अभ्यंकरसाहित्यवाग्विलासिनी पुरस्कार२००८श्रीराम लागूनाट्यक्षेत्रमोहन वाघ पुरस्कार२००८सरोजिनी वैद्यसाहित्यवाग्विलासिनी पुरस्कार२००७पंडित सी.आर. व्याससंगीतदीनानाथ मंगेशकर पुरस्कार१९९९पं. सुरेश तळवलकरसंगीतदीनानाथ मंगेशकर पुरस्कार२०१५उस्ताद सुलतान खानसंगीतदीनानाथ मंगेशकर पुरस्कार२००७सुधीर मोघेकवितालेखनपुरस्काराचे नाव?२००७सुनील बर्वेनाट्यसेवामोहन वाघ पुरस्कार२०१३सुरेश वाडकरसंगीतदीनानाथ मंगेशकर पुरस्कार२०१३उस्ताद सुलतान खानसंगीतदीनानाथ मंगेशकर पुरस्कार२००७सोनपंखी(नाटक)नाट्यलेखनदीनानाथ मंगेशकर पुरस्कार२००७हेमा मालिनीचित्रपटदीनानाथ मंगेशकर पुरस्कार२००७पुरस्कारप्राप्त व्यक्तीक्षेत्रपुरस्काराचे नाववर्षपुरस्कारप्राप्त व्यक्तीक्षेत्रपुरस्काराचे नाववर्षपुरस्कारप्राप्त व्यक्तीक्षेत्रपुरस्काराचे नाववर्ष (अपूर्ण) बाह्य दुवे वर्ग:मराठी गायक वर्ग:मराठी नाट्यअभिनेते वर्ग:मराठी संगीतकार वर्ग:हिंदुस्तानी गायक वर्ग:इ.स. १९०० मधील जन्म वर्ग:इ.स. १९४२ मधील मृत्यू वर्ग:मराठी संगीत नाटककार वर्ग:अल्पायुषी अभिनेते
पारिभाषिक संज्ञा
https://mr.wikipedia.org/wiki/पारिभाषिक_संज्ञा
पुनर्निर्देशन विकिपीडिया:पारिभाषिक संज्ञा
उन्हाळा
https://mr.wikipedia.org/wiki/उन्हाळा
उन्हाळा हा भारतातील तीन मुख्य ऋतूंपैकी एक आहे. उन्हाळ्यात हवामान उष्ण आणि कोरडे असते. उन्हाळ्यात शाळा आणि विद्यापीठांना सुट्टी असते. भारतात उन्हाळा फेब्रुवारी ते मे पर्यंत असतो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला वसंत ऋतूमध्ये झाडांना पालवी फुटताना दिसते. महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या सुरुवातीला होळी आणि रंगपंचमी हे सण साजरे केले जातात, याच वेळी कलिंगड, फणस, इत्यादी फळे पिकलेली दिसतात. उन्हाळ्याच्या शेवटी मोठ्या प्रमाणात आंबा पिकलेला दिसतो. याच काळात वळिवाचा वादळी पाऊस पडतो. उन्हाळ्यात सर्व शाळांना सुट्टी असते . सूर्याची किरणे पृथ्वीवर लंबरूप पडतात.त्यामुळे तापमानात वाढ होते. महाराष्ट्र राज्यातील विदर्भात तर उन्हाचा कहरच असतो. उन्हामुळे पारा ४७० सेल्सियस इतका वा त्याच्या थोडा मागेपुढे (४६.७ किंवा ४७.६) राहू शकतो.जमीन प्रचंड तापते. दिवसभर गरम वारे वाहतात. रात्रीही बराच वेळ गरम झळा वाहत राहतात.भारताच्या इतरही राज्यांत साधारणतः हीच परिस्थिती असते. राजस्थानमध्ये ४९० इतके तापमानही राहते. तापमान वाढीची कारणे लोकसंख्यावाढ, त्यामुळे होणारी उपलब्ध पाण्याची विभागणी, प्रचंड प्रमाणात वृक्षतोड, पर्यायी झाडे न लावणे, सिमेंटची बांधकामे, जमिनीवर झालेल्या रस्ते, पदपथ आदी बांधकामांमुळे जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत न मुरणे, पाण्याचा भूगर्भातून प्रचंड उपसा, औद्योगिकीकरण, इत्यादी कारणे आहेत. जगातील सर्वांत उष्‍ण ठिकाणे" बाहेरील दुवे द हेल्थसाईट-मराठी सन २०१६ च्या उन्हाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील उंचगाव परिसरातील नारळीची झाडे मारू लागली,तर काही मरणांत स्थितीत आहेत.आत्ताच पडलेल्या पावसाने थोडा झाडांना दिलासा दिला आहे.सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळा असतो. वर्ग:ऋतू वर्ग:हवामान वर्ग:निसर्ग
पावसाळा
https://mr.wikipedia.org/wiki/पावसाळा
जगभरातील विविध देशातील तेथील स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार पावसाळा हा ऋतू आहे. भारतातील उन्हा्ळा,पावसाळा आणि हिवाळा या ऋतुंपैकी जून ते सप्टेंबर या महिन्यांदरम्यान असणारा एक ऋतू.याला मोसमी पाउस असेही म्हटले जाते. पर्यटन संस्थेने त्याला "हिरवा ऋतू" (ग्रीन सीझन) असेही नाव आलंकरिक स्वरूपात दिलेले आहे. अरबी शब्द मौसम यापासून मान्सून असा शब्द तयार झाला आहे. मौसम याचा अर्थ ऋतू असा आहे. जगभरात Rainy जगातील विविध ठिकाणी पावसाळ्याचे-पर्जन्यमानाचे वैशिष्ट्य वेगवेगळे आहे.प्रमाण वेगळे आहे. काही देशात केवळ एकदाच पावसाळा असतो तर काही ठिकाणी वर्षातून दोनदा पाऊस पडतो. उष्ण कटिबंधात पावसाळा अधिक प्रमाणात असतो, कारण दिवसभर असलेल्या सूर्याच्या प्रखरतेमुळे हवेत असलेल्या आर्द्रतेचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे त्याचे रूपांतर पाण्यात होऊन संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता अधिक असते.विषुववृत्तीय परदेशात वनांच्या परदेशात पावसाळा असा स्वतंत्र ऋतू नसून तेथे वर्षभर पाऊस पडत असतो. भारतात भारत हा प्रामुख्याने कृषीप्रधान देश आहे. भारतीय अर्थव्यवस्था शेतीशी संबंधित असल्याने पिकांच्या उत्पादनासाठी पावसाळ्याचे महत्त्व भारतात विशेष आहे. दक्षिणेतील समुद्रात तयार होणार-या हवेच्या कमी दांबाच्या पट्ट्यामुळे भारतात नैऋत्य मोसमी वारे वाहू लागतात. दक्षिणेकडून हे वारे हळूहळू संपूर्ण भारतात पसरतात. याचे परिणामस्वरूप भारतात पाऊस पडतो ज्याला मान्सून असे म्हटले जाते.यामुळे भारताचा विचार करता अन्य राज्यांच्या तुलनेत दक्षिण भारतात अधिक पाऊस पडतो. thumb|पावसाळ्यातील दक्षिण कर्नाटकातील दृश्य thumb|पावसआल्यातील भातलावणी(दक्षिण भारत) पावसाळ्यात घडून येणारे बदल अन्नधान्य- प्रामुख्याने उष्ण परदेशातील गवताळ भागात वनस्पतींची वाढ होण्याचे सर्वाधिक प्रमाण हे पावसाळ्यात असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात अन्नधान्याची मुबलकता तुलनेने कमी असते. पावसाळ्यानंतर भरभरून पिके आल्यानंतर हा तुटवडा कमी होतो. पशू पक्षी,कीटक - पावसाळ्याच्या सुरुवातीला गायी ,म्हशी गरोदर (गाभण) रहातात तसेच वासरांना जन्म देतात. परदेशातील मेक्सिकोसारख्या प्रांतात फुलपाखरे स्थलांतर करतात. मासे,विविध प्रकारच्या बुरशी, बेडूक , आळंबीचे विविध प्रकार यांच्या वाढीचे प्रमाण पावसाळ्यात अधिक असते. आपत्तीजन्य परिणाम- पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर येणे, त्यांच्या किना-यावरील प्रदेशाचे नुकसान होणे, पर्वतीय प्रदेशात भूसख्लन होणे अशा आपतींना सामोरे जावे लागते. भारतातील सृष्टीसौंदर्य भारतातील जैवविविधता आणि पावसाळा यांचे समीकरण आहे. भारताच्या विविध प्रांतात पावसाळ्यात वाहणारे धबधबे,पश्चिम घाटातील निसर्गाचा हिरवेपणा याचा अनुभव घेता येतो.पावसाळ्यात येणार-या रानफुलांनी फुलणारं महाराष्ट्रातील सह्याद्रीचे पठार (सातारा जिल्ह्यातील कास पठार)प्रसिद्ध आहे. श्रावण महिन्यात भारतातील विविध राज्यात महिला आनंदाने सण आणि उत्सव साजरे करतात. thumb|महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील पावसाळ्यातील दृश्य संदर्भ वर्ग:हवामान वर्ग:निसर्ग
हिवाळा
https://mr.wikipedia.org/wiki/हिवाळा
भारतातील तीन ऋतुंपैकी ऑक्टोबर ते जानेवारी या महिन्यांदरम्यान असणारा एक ऋतू. या ऋतुत हवामान थंड असते. thumb|मेलबोर्न क्रिकेट ग्राउंडच्या बाहेरील हिवाळ्यात पानगळ झालेली झाडे thumb|जगात अनेक ठिकाणी हिवाळ्यात बर्फ पडतो वर्ग:ऋतू वर्ग:हवामान वर्ग:निसर्ग
वसंत
https://mr.wikipedia.org/wiki/वसंत
thumb|right|200px|वसन्त ऋतूत फुललेली फुले thumb|200px|right|वसंत ऋतुत पळसाला आलेला बहर हिन्दू दिनदर्शिकेप्रमाणे भारतात माघ आणि फाल्गुन या महिन्यांत वसंत ऋतू असतो. परंतु शाळांच्या क्रमिक पुस्तकांनुसार चैत्र आणि वैशाख हे वसंताचे महिने आहेत. वसंत ऋतूला ऋतूंचा राजा मानले जाते. नवचैतन्य , उत्कर्षाचा प्रतिक म्हणून वसंत ऋतू ओळखला जातो. वसंत ऋतूचा कृषी संस्कृतीशी एक विशेष नाते आहे. भारत हा अतिविशाल देश असल्याने, देशाच्या विविध भागांत वसंत ऋतू येणारे हिन्दू महिने वेगळेवेगळे आहेत. वसंत ऋतू मधे झाडाला पालवी फूटते मात्र, वसंत पंचमी पासून वसंतोत्सव सुरू होतो, हे देशभर मानले जाते. इंग्रजीमध्ये वसंत ऋतूला स्प्रिंग (Spring) म्हणतात. वसंत ऋतू मध्य झाडाला पालवी फूटते. युरोपात मार्च-एप्रिल हे महिने वसंत ऋतूचे आगमन होते, तर ऑस्ट्रेलियातील वसंत ऋतू हा सप्टेंबर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत येतो. अवान्तर वसन्त हे वासुदेव बळवन्त पटवर्धन या मराठी कवीने घेतलेले टोपणनाव आहे. 'वसन्त' हे दत्तप्रसन्न काटदरे यांनी चालवलेले मराठीतील एक दर्जेदार मासिक होते. वसन्त पंचमी (माघ शुद्ध पंचमी) वसन्ताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. तो ह्या दिवसापासून सुरू होतो. सतत सुन्दर भासणारा निसर्ग वसन्त ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. यौवन हा जर आपल्या जीवनातील वसन्त असेल तर वसन्त हे सृष्टीचे यौवन आहे. महर्षी वाल्मीकींनी रामायणात वसन्त ऋतूचे अतिशय सुन्दर व मनोहारी चित्रण केले आहे. भगवान श्रीकृष्णानेही गीतेत ’ ऋतूनाम्‌ कुसुमाकरः' असे म्हणून ऋतुराज वसन्ताची बिरुदावली गायली आहे. कवीश्वर जयदेव तर वसंत ऋतूचे वर्णन करताना थकलाच नाही. सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसन्त ऋतूमध्ये लोभस बनतो. स्वतःच्या आगळ्या सौन्दर्याने तो माणसाला स्वतःकडे ओढून घेतो. मात्र माणसाने त्याचे अवलोकन करण्याची फुरसत काढली पाहिजे. मानवाने स्वतःच्या अस्वस्थ प्रकृतीला स्वस्थ बनवण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात गेले पाहिजे. निसर्ग एक अशी अजब जादू आहे की, तो मानवाला त्याच्या सर्व वेदनांचे तात्काळ पुरेसे विस्मरण करवितो. जर ह्या निसर्गाचे सान्निध्य सतत राहिले तर त्याचा मानव जीवनावर फारच खोल प्रभाव पडतो व त्याचा परिणाम चिरगामी ठरतो. निसर्गात अहंशून्यता असते आणि म्हणूनच तो प्रभूच्या अधिक जवळ आहे. याच कारणामुळे निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर आपण प्रभूच्या अधिक जवळ गेलो आहोत असा अनुभव येतो. निसर्ग सुखदुःखाच्या द्वन्द्वापासुन दूर आहे. वसन्त असो अथवा वर्षा, वेगवेगळ्या रूपात प्रभूचा हात सृष्टीवर फिरत असतो आणि समग्र निसर्ग प्रभुस्पर्श प्राप्त करून फुलून उठतो. जीवनातही जर प्रभूचा स्पर्श झाला, प्रभूचा हात फिरला तर सम्पूर्ण जीवनच बदलून जाईल, जीवनात वसन्त फुलून उठेल आणि जीवनातून दुःख, दैन्य, दारिद्र्य क्षणभरात दूर होईल. प्रभुस्पर्शी जीवनात नेहमी एकच ऋतू असतो आणि तो म्हणजे वसन्त! त्याच्या जीवनात एकच अवस्था कायम राहाते आणि ती म्हणजे यौवन! परन्तु निसर्गाची सुन्दरता व मानवाची रसिकता ह्यांच्यात जर प्रभूचा सूर मिळाला नाही तर ही सुन्दरता व रसिकता विलासाचा मृदुल पन्थ निर्माण करून मानवाला विनाशाच्या गर्तेतदेखील ढकलून देईल. म्हणूनच वसन्ताच्या संगीतांत गीतेचा सूर मिसळला पाहिजे. thumb|left|शिशिर ऋतूतील पानगळ-झाडाची खाली पडलेली वाळलेली पाने. वसन्ताचा उत्सव हे अमर आशावादाचे प्रतीक आहे. वसन्ताचा खरा पुजारी जीवनात कधी निराश बनत नाही. शिशिर ऋतूत वृक्षाची पाने गळून पडतात, पण तो स्वतःच्या जीवनातून निराशा झटकून टाकतो. वसन्त म्हणजे आशा व सिद्धी ह्यांचा सुन्दर संगम. कल्पना व वास्तवता ह्यांचा सुगम समन्वय. खर्‌या महापुरुषाच्या जीवनात आशेला सिद्धीमध्ये बदलवणा‍र्‌या साधनांचे फारच महत्त्व असते. तो केवळ कल्पनात रमणारा स्वप्नशील असत नाही. तसाच रोजच्या वास्तविक जीवनापासून जरादेखील वर पाहू नये इतका जडही असत नाही. जीवन व वसन्त ज्याने एकरूप करून टाकले अशा मानवाला आपली संस्कृती सन्त म्हणते. ज्याच्या जीवनात वसन्त फुलतो तो सन्त! यौवन आणि संयम, आशा आणि सिद्धी, कल्पना आणि वास्तव्य, जीवन आणि कवन, भक्ती व शक्ती, सर्जन व विसर्जन ह्या सर्वांचा समन्वय साधणारा तसेच जीवनात सौन्दर्य, संगीत व स्नेह प्रकट करणारा वसन्त आपल्या जीवनात साकार बनला तरच आपण वसन्ताच्या वैभवाला जाणले, अनुभवले व पचवले असे म्हणता येईल. साभार:पांडुरंगशास्त्री आठवले हे सुद्धा पहा वसन्त पंचमी वर्ग:ऋतू sq:Pranvera
ग्रीष्म
https://mr.wikipedia.org/wiki/ग्रीष्म
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र आणि वैशाख या महिन्यात ग्रीष्म ऋतू असतो. ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे एप्रिल उत्तरार्ध, मे, जून पूर्वार्ध या महिन्यात ग्रीष्म ऋतू असतो. वर्ग:ऋतू
वर्षा
https://mr.wikipedia.org/wiki/वर्षा
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे ज्येष्ठ आणि आषाढ या महिन्यात वर्षा ऋतू असतो. ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे जून उत्तरार्ध, जुलै, ऑगस्ट पूर्वार्ध या महिन्यात वर्षा ऋतू असतो. वर्ग:ऋतू
हेमंत
https://mr.wikipedia.org/wiki/हेमंत
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे आश्विन आणि कार्तिक या महिन्यात हेमंत ऋतू असतो. ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे ऑक्टोबर उत्तरार्ध, नोव्हेंबर, डिसेंबर पूर्वार्ध या महिन्यात हेमंत ऋतू असतो. वर्ग:ऋतू
शिशिर
https://mr.wikipedia.org/wiki/शिशिर
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे मार्गशीर्ष आणि पौष या महिन्यात शिशिर ऋतू असतो. ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे डिसेंबर उत्तरार्ध, जानेवारी, फेब्रुवारी पूर्वार्ध या महिन्यात शिशिर ऋतू असतो. शिशिर ऋतूमध्ये झाडांची पाने पिवळी पडतात. व गळतात. त्यानंतर त्या झाडांना नवीन पालवी फुटण्यास सुरुवात होते. या ऋतूत फार गारवा व थंडी असते. या ऋतूत फळे व फुले बहरलेली असतात व झाड्यांच्या पानांवर दवबिंदू पडतात. वर्षा ऋतुच्या समाप्तिनंतर शरद् ऋतुचे आगमन होते. वर्ग:ऋतू
शरद
https://mr.wikipedia.org/wiki/शरद
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे श्रावण आणि भाद्रपद या महिन्यात शरद ऋतू असतो. ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे ऑगस्ट उत्तरार्ध, सप्टेंबर, ऑक्टोबर पूर्वार्ध या महिन्यात शरद ऋतू असतो. शरद ऋतू मध्ये स्वाभाविक पित्त प्रकोप होतो. वर्ग:ऋतू
ऋतू
https://mr.wikipedia.org/wiki/ऋतू
ऋतू हा हवामानावर आधारलेला असलेला वर्षाचा ढोबळपणे बनवलेला भाग आहे. ऋतूंची संख्या प्रदेशागणिक हवामानबदलामुळे ऋतूंची नेमकी संख्या बदलते. ही विभागणी मुख्यतः तापमान आणि पाऊस या घटकांवर आधारित आहे. परंतु प्रदेशागणिक हे घटकदेखील बदलतात. उदा. उष्ण कटिबंधातील लोक फक्त तापमानाच्या आधारावर ऋतू ठरवतात, कारण तेथे पाऊस वर्षभर पडत असतो. समशीतोष्ण कटिबंध दोन किंवा तीन ऋतू मानतो तर शीत कटिबंध प्रदेशांमध्ये केवळ दोनच ऋतू असतात. मात्र भारतामधील वर्ष तीन मुख्य ऋतूंमध्ये विभागले गेले आहे: उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, तर उपऋतू सहा - वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर. ऋतूंमागील कारणे आकृती क्र. १ ही आकृती सूर्य आणि पृथ्वीच्या गतीमुळे होणारी ऋतूंची निर्मिती स्पष्ट करते. पृथ्‍वीच्या उत्तर गोलार्धावरील प्रदेशात, हिवाळ्यात दिवसाची कुठलीही वेळ असली तरी उत्तर ध्रुव अंधारातच असतो तर दक्षिण ध्रुव प्रकाशमान राहतो. (ध्रुवीय हिवाळा हा देखील लेख पहावा). अर्थातच ही आकृती फक्त उत्तर गोलार्धातील हिवाळ्यादरम्यानची आहे. आकृती क्र. २ पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धातील आणि दक्षिण गोलार्धातील ऋतुचक्र चालू राहते. विविध ऋतू असण्याचे प्राथमिक कारण म्हणजे पृथ्वीचा अक्ष पृथ्वीच्या सूर्या भोवतीच्या भ्रमण कक्षेशी काटकोनात नसणे हे होय. तो काटकोनापासून '२३.५' अंशाने कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीवर पडणारे सूर्याचे किरण कमीअधिक तिरपे पडतात. जसजशी पृथ्वी सूर्यभ्रमण करते तसतसा सूर्यकिरणांचा तिरपेपणा कमी जास्त होत राहतो. त्यामुळे तापमानात फरक होतो आणि ऋतू बदलतात. पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण गोलार्धात दोन विरुद्ध ऋतू चालू असतात. ऋतूंमध्ये होणारे हवामानातील किरकोळ बदल इतर बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतात. उदा० पृथ्वीची गती (परिवलन आणि परिभ्रमण), सूर्याची पृथ्वीकडे येणारी उष्णता, समुद्र किंवा मोठी सरोवरे, गल्फ स्ट्रीम, एल निनो सारखे समुद्रातील प्रवाह, आणि वाऱ्यांचे प्रवाह, वगैरे. या गोष्टी हवामानावर परिणाम करतात. या सर्व घटकांमध्ये नवीन भर पडली आहे ती म्हणजे - जागतिक तापमानवाढ. संस्कृती आणि ऋतू जगात विविध संस्कृतीमधील लोक वेगवेगळे ऋतू मानतात. उदा०.भारतात पाळल्या जाणाऱ्या हिंदू पंचांगाप्रमाणे वर्षात सहा ऋतू आहेत. खालील समीकरणे प्रतीकात्मक आहेत. वसंत + ग्रीष्म = उन्हाळा= चैत्र, वैशाख + ज्येष्ठ आणि आषाढ हे मराठी महिने वर्षा + शरद = पावसाळा= श्रावण, भाद्रपद + आश्विन, कार्तिक हे मराठी महिने हेमंत + शिशिर = हिवाळा = मार्गशीर्ष, पौष + माघ, फाल्गुन हे मराठी महिने किंवा, वसंत ऋतू = सूर्य मीन आणि मेष या राशींत असण्याचा काळ (अंदाजे १५ मार्च ते १५ मे) ग्रीष्म ऋतू = सूर्य वृ्षभ आणि मिथुन मेष या राशींत असण्याचा काळ (अंदाजे १५ मे ते १५ जुलै) वर्षा ऋतू = सूर्य कर्क आणि सिंह या राशींत असण्याचा काळ(अंदाजे १५ जुलै ते १५ सप्टेंबर) शरद ऋतू = सूर्य कन्या आणि तूळ या राशींत असण्याचा काळ(अंदाजे १५ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर) हेमंत ऋतू = सूर्य वृश्चिक आणि धनु या राशींत असण्याचा काळ(अंदाजे १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी) शिशिर ऋतू = सूर्य मकर आणि कुंभ या राशींत असण्याचा काळ(अंदाजे १५ जानेवारी ते १५ मार्च) पृथ्वीच्या हजारो वर्षांच्या आयुष्यात वर दिलेल्या ऋतूंच्या तारखा आणि महिने बदलले गेले असण्याची शक्यता आहे. परंतु परंपरा फारश्या बदलेल्या नाहीत. उत्तर ऑस्ट्रेलिया प्रदेशातील लोक सहा ऋतू मानतात तर विषुववृत्तीय, उष्ण कटिबंधीय आणि काही समशीतोष्ण कटिबंधातील प्रदेशांमध्ये सुका ऋतू आणि ओला ऋतू (पावसाचा ऋतू) असे दोनच प्रकार मानले जातात, ज्यामध्ये आर्द्रतेच्या प्रमाणात होणारा बदल हा तापमानातील बदलापेक्षा जास्त लक्षणीय ठरतो. प्राचीन इजिप्तमध्ये तीन ऋतू मानले जात होते: पुराचा ऋतू, पूर ओसरण्याचा ऋतू आणि सुगीचा ऋतू. त्याचप्रमाणे काही प्रदेशांमध्ये तेथील विशिष्ट परिस्थितींनुसार ऋतू मानले जातात, जसे टोर्नाडो अ‍ॅली या अमेरिका देशातील भागामध्ये उत्तर हिवाळ्यापासून ते मध्य उन्हाळ्यापर्यंत टोर्नाडो वादळाचा ऋतू असतो. भारतातही मे, ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर ह्या चार महिन्यांच्या काळाला चक्री वादळाचा ऋतू म्हणतात. भूमध्यसागरी हवामान असणाऱ्या प्रदेशांमध्ये (उदा. पश्चिम ऑस्ट्रेलिया, कॅलिफॉर्निया किनारपट्टी आणि स्पेन, वगैरे) उन्हाळातील वणव्यांचा ऋतू असतो. चक्रीवादळांचा ऋतू उत्तर वसंताच्या आसपास सुरू होतो. पूर्वोत्तर प्रशांत महासागरी प्रदेशांमध्ये हा ऋतू मे १५ तर उत्तर अटलांटिक प्रदेशांमध्ये जूनच्या एक तारखेला सुरू होतो. पाश्चात्त्य देशांमधील ऋतू : स्प्रिंग, समर, ऑटम, विंटर विविध प्रदेशांतील ऋतू प्रदेशागणिक होणारा हवामानातील बदल हा वाढत्या अंतरानुसार अधिक स्पष्ट होतो. जसे की एकाच गावातील दोन ठिकाणचे हवामान सारखेच मानले जाते, तेव्हा सू़क्ष्म फरक बाजूला ठेवले जातात. परंतु हीच दोन ठिकाणे काहीशे किंवा काही हजार किलोमीटर अंतरावर असतील तर मात्र ही ठिकाणे वेगवेगळ्या हवामानाची असू शकतात. त्याचसोबत सभोवतालची भौगोलिक परिस्थितीही त्याकरिता महत्त्वाची ठरते. उदा. काश्मीर, हिमाचल प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ यांमधील हवामान एकमेकांपेक्षा खूपच वेगळे आहे, तसेच ऋतूदेखील थोडे अधिक वेगळे आहेत. पण हा ऋतूंमधील फरक काश्मीर आणि कन्याकुमारी दरम्यान जास्त स्पष्ट दिसून येतो. हीच अंतरे काही हजार किलोमीटरपर्यंत वाढविल्यास विविधता आणखी वाढते. वर्षभरातील तापमानानुसार पृथ्वीचे अनेक भाग कल्पिलेले आहेत. पैकी शीत कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध आणि उष्ण कटिबंध हे तीन मुख्य विभाग आहेत. + महिने आणि ऋतूउत्तर गोलार्धमहिनादक्षिण गोलार्धपारंपरिकहवामानशास्त्रीयखगोलीयहवामानशास्त्रीयखगोलीयहिवाळाहिवाळाहिवाळाजानेवारीउन्हाळाउन्हाळावसंतफेब्रुवारीवसंतमार्चशरदवसंतएप्रिलशरदउन्हाळामेउन्हाळाजूनहिवाळाउन्हाळाजुलैहिवाळाशरदऑगस्टशरदसप्टेंबरवसंतशरदऑक्टोबरवसंतहिवाळानोव्हेंबरहिवाळाडिसेंबरउन्हाळा शीत कटिबंध ध्रुवीय प्रदेश ध्रुवीय दिवस आणि रात्र टुंड्रा प्रदेश समशीतोष्ण कटिबंध मौसमी पावसाचे प्रदेश उष्ण कटिबंध विषुववृत्तीय प्रदेश वाळवंटातील ऋतू ऋतूंची सुरुवात *
निसर्ग
https://mr.wikipedia.org/wiki/निसर्ग
thumb * निसर्ग ही देवाने दिलेली अत्यंत सुंदर अशी देणगी आहे. निसर्गामध्ये हवा ,पाणी, वृक्ष, जनावरे, माणसे ,पक्षी यांचा समावेश होतो. नैसर्गिक, भौतिक किंवा भौतिक जग किंवा विश्वाचा व्यापक अर्थ आहे. "निसर्ग" भौतिक जगाची घटना आणि सामान्यतः जीवनाशी संबंधित आहे. नैसर्गिक अभ्यासाचा एक मोठा भाग नसतो तर विज्ञानाचा एक भाग असतो. जरी मानव निसर्गाचा भाग असला, तरी मानवी क्रियाकलाप इतर नैसर्गिक घटनांपासून वेगळी श्रेणी म्हणून समजली जाते. निसर्ग शब्द लॅटिन शब्द नतुरा, किंवा "आवश्यक गुणधर्म, जन्मजात स्वभाव" पासून प्राप्त झाला आहे आणि प्राचीन काळात शाब्दिक अर्थ "जन्म" असा होतो. [1] Natura ग्रीक शब्द फिजिस (φύσις)चा एक लॅटिन अनुवाद आहे, जो मूळतः वनस्पती, प्राणी आणि इतर वैशिष्ट्यांसह अंतर्गत मूलभूत वैशिष्ट्यांशी संबंधित आहे. [2] [3] निसर्गाची संकल्पना, संपूर्ण भौतिक विश्वाची मूळ कल्पना ही अनेक कल्पनांपैकी एक आहे; हे -ύσις शब्दाच्या काही मूलभूत अनुप्रयोगांसह प्रारंभिक-तत्त्वज्ञानी तत्त्वज्ञानींनी सुरू केले आणि त्यानंतरपासूनच चलन प्राप्त केले आहे. गेल्या काही शतकांमध्ये आधुनिक वैज्ञानिक पद्धतीच्या प्रारंभामध्ये हा उपयोग चालू राहिला. [4] [5] आजच्या शब्दांच्या विविध उपयोगांमध्ये, "निसर्ग" सहसा भूगर्भ आणि वन्यजीव याचा संदर्भ देते. निसर्ग जिवंत वनस्पती आणि प्राण्यांचे सामान्य क्षेत्र आणि काही प्रकरणांमध्ये निर्जीव वस्तूंशी संबंधित प्रक्रियांचा संदर्भ घेऊ शकतो - विशिष्ट प्रकारच्या गोष्टी अस्तित्वात असतात आणि पृथ्वीच्या हवामान आणि भूगर्भशास्त्र यासारख्या गोष्टी त्यांच्या स्वतःच्या बदलानुसार बदलतात. "नैसर्गिक पर्यावरण" किंवा वाळवंटातील जंगली प्राणी, खडक, जंगल आणि सर्वसाधारणपणे त्या गोष्टी ज्या मानवी हस्तक्षेपाने मोठ्या प्रमाणात बदलल्या नाहीत किंवा मानवी हस्तक्षेपानंतरही टिकत नाहीत. उदाहरणार्थ, उत्पादित वस्तू आणि मानवी परस्पर सहसा निसर्गाचा भाग मानले जात नाहीत, जसे की, "मानवी स्वभाव" किंवा "संपूर्ण निसर्ग" म्हणून पात्र नाही. नैसर्गिक वस्तूंच्या या अधिक परंपरागत संकल्पना आजही आढळतात ज्यात मानवी चेतनेमुळे किंवा मानवी मनामुळे कृत्रिम समजले जाणारे कृत्रिम आणि कृत्रिम दरम्यानचे फरक सूचित होते. विशिष्ट संदर्भावर आधारित, "नैसर्गिक" शब्द देखील अप्राकृतिक किंवा अलौकिक शक्तीपासून वेगळा केला जाऊ शकतो.निसर्ग म्हणजे नेमके काय?? यात एकूणच जैविक- अजैविक घटक मिळून तयार होणारी परिसंस्था. यात एकूणच प्राणी, मानव, झाडं, नदी, नाले , पर्वत हे प्रत्येक घटक एकमेकांवर अवलंबून असतात.
भूखंडरचनाशास्त्र
https://mr.wikipedia.org/wiki/भूखंडरचनाशास्त्र
खंडांची रचना खंडांची हालचाल * वर्ग:रिकामी पाने
प्रागैतिहासिक महाखंड
https://mr.wikipedia.org/wiki/प्रागैतिहासिक_महाखंड
प्रागैतिहासिक महाखंड हे प्रागैतिहासिक काळातील दोन किंवा अधिक खंडांच्या एकत्रीकरणातून बनलेले जमीनीचे महाकाय तुकडे होते. महाखंड ही संज्ञा केवळ प्रागैतिहासिक काळातील खंडांच्या बाबतीतच लागू होती असे नव्हे तर आजच्या काळातदेखील युरेशिआ हा देखील महाखंडच मानला जातो (अर्थात यात देखील पाठभेद आहेत). पॅंजिआ हा एक प्रागैतिहासिक महाखंड होता, जो आजपर्यंतच्या माहितीतला सर्वात मोठा महाखंड आहे, ज्यात सर्व खंड एकत्र होते. Category:प्रागैतिहासिक महाखंड
पँजिआ
https://mr.wikipedia.org/wiki/पँजिआ
पॅंजिआ हा एक प्रागैतिहासिक महाखंड होता. ग्रीक भाषेमध्ये पॅंजिआचा अर्थ सर्व जमीन असा होतो. पॅंजिआ सुमारे २० कोटी वर्षांपूर्वीपर्यंत अस्तित्वात होता. खंडांच्या निर्मितीपासूनच खंडांची हालचाल होत आहे ज्यामुळे खंड कधी जवळ येतात तर दूर सारले जातात. या हालचालीचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाच्या शाखेला भूखंडरचनाशास्त्र म्हणतात. 275px|thumb|left|२३ कोटी वर्षांपूर्वीचा पॅंजिआ वर्ग:प्रागैतिहासिक महाखंड
उष्ण कटिबंध
https://mr.wikipedia.org/wiki/उष्ण_कटिबंध
उष्ण कटिबंध' हा पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या बाजूचा भाग आहे जो उत्तरेस कर्कवृत्त आणि दक्षिणेस मकरवृत्ताने बंधित आहे. हा भाग अंदाजे '२३.५° उत्तरअक्षांश' आणि '२३.५° दक्षिणअक्षांश' यांमध्ये सामावला आहे. सूर्य या भागात वर्षात एकदातरी डोक्यावर येतो. उष्ण कटिबंधीय प्रदेश साधारणत: गरम, दमट आणि दाट झाडी यामुळे ओळखू येतात. कोपेनच्या (Kopen) हवामान वर्गीकरणानुसार उष्ण कटिबंधातील सरासरी तापमान '१९° सेल्सिअस' इतके असते. उष्ण कटिबंधीय शहरे मुंबई, भारत ( १९.१º उ) हाँग काँग, चीन प्रजसत्ताक (२३.३º उ) नैरोबी, केन्या (१.३º द) ब्राझिलिया (पूर्वीचे रियो दि जानेरो), ब्राझिल (२२.९º द) मनिला, फिलिपिन्स हे पहा उष्ण कटिबंधीय वर्ष उष्ण कटिबंधीय रोग उष्ण कटिबंधीय जैवसंपदा उष्ण कटिबंधीय देश कोपेनचे हवामान वर्गीकरण * वर्ग:भूगोल
सह्याद्री
https://mr.wikipedia.org/wiki/सह्याद्री
सह्याद्री किंवा पश्चिम घाट ही भारताच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्याशेजारी उभी असलेली डोंगरांची रांग आहे. ही अंदाजे १६०० किलोमीटर लांबीची डोंगररांग तापी नदीच्या दक्षिणेकडून व महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेशेजारून चालू होते व महाराष्ट्र(६५० कि.मी.), गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतून भारताच्या दक्षिण टोकाजवळ पोचते. या डोंगररांगेचा जवळजवळ ६०% भाग हा कर्नाटकात येतो.कर्नाटक जंगल खाते (जंगल-सांख्यिकी) विदागारातील आवृत्ती या डोंगररांगेचे क्षेत्रफळ ६०,००० चौरस कि.मी. असून या रांगेची सरासरी उंची १२०० मीटर आहे . अनेक उंच शिखरे ही डोंगररांग सामावून घेते, त्यामध्ये डोंगररांगेच्या उत्तरेकडे महाराष्ट्रात कळसूबाई शिखर (उंची १६४६ मी),( साल्हेर १५६७ मी )महाबळेश्वर (उंची १४३८ मी) आणि हरिश्चंद्रगड(उंची १४२४ मी), कर्नाटकात १८६२ मी उंचीवर असलेले कुद्रेमुख शिखर आणि दक्षिणेकडे केरळमध्ये अनाई मुदी शिखर (उंची २६९५ मीटर). अनाई मुदी शिखर हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे. या डोंगररांगेत महत्त्वाचा खंडभाग पालघाट खिंडीच्या स्वरूपात आहे. ही खिंड तमिळनाडू आणि केरळ यांना जोडते. इथे सह्याद्रीची उंची सर्वात कमी आहे (३०० मी). पश्चिम घाट ही जगातील सर्वात जास्त जैवविविधता असणाऱ्या आठ जागांपैकी एक आहे. जगात सरीसृपांच्या १८७पेक्षा जास्त जाती आहेत, त्यातल्या निम्म्या फक्त सह्याद्रीवर सापडतात; बेडकांच्या शंभर जातींपैकी ऐंशी केवळ इथे आढळतात. त्यातही वृक्षमंडूकांच्या ३५ जातींपैकी २९ निव्वळ सह्यवासी आहेत. देवगांडुळे नावाचे बेडकांचे हात-पाय नसलेले भाईबंद आहेत, त्यांच्या २२ जातींपैकी २० येथेच आहेत. मातीत पुरून राहणाऱ्या बांडा सर्पकुलातील सर्वच्या सर्व ४५ जाती फक्त सह्याद्री व श्रीलंकावासी आहेत, आणि त्यातल्या ३४ केवळ सह्याद्रीत सापडतात. सपुष्प वनस्पतींच्या सह्याद्रीवरच्या ४००० अर्वाचीन जातींपैकी १४०० सह्याद्रीपुरत्या सीमित आहेत. त्यांच्यातही तेरड्यांच्या ८६ पैकी ७६ जाती पूर्णतः सह्यवासी आहेत. इथे ५००० पेक्षा जास्त फुलझाडे, १३९ प्राण्यांच्या जाती, ५०८ पक्ष्यांच्या जाती व १७९ उभयचर प्राण्यांच्या जाती आढळतात.मायर्स, एन., आर. ए. मिट्टरमेयर, सी.जी. मिट्टरमेयर, जी.ए.बी. दा फाँन्सेका, व जे. केंट. (२०००) बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स फॉर कॉन्झर्वेशन प्रायॉरिटीज. नेचर मासिक ४०३:८५३–८५८ मायर्स, एन. भौगोलिक रचना left|180px|thumb|भारतीय प्रस्तर (लाल रंगातील) thumb|उपग्रह छायाचित्र thumb|250px| पश्चिम घाट ही डोंगररांग दख्खनच्या पठारातील अंतर्गत घडामोडींमुळे निर्माण झालेली कड आहे. सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वी गोंडवन खंडाच्या झालेल्या तुकड्यामुळे सह्याद्रीची निर्मिती झाली असावी असे मानले जाते. या तुकड्याची पश्चिमेकडची बाजू साधारण १००० मी. उंचीचा कडा असावा असे शास्त्रज्ञांना वाटते डेक्कन हेराल्ड ची बातमी विदागारातील आवृत्ती. thumb|250px|left|दूधसागर,गोवा गोंडवन खंडाच्या तुकड्यातून वेगळी झालेली भारतीय उपखंडाची जमीन ही सरकत सरकत युरेशियन उपखंडाला जिथे येऊन मिळाली, तिथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या ज्वालामुखीतून निघालेला लाव्हा सुमारे ६.५ कोटी वर्षांपूर्वी थंड होऊन दख्खनचे पठार निर्माण झाले. या लाव्हामुळे जे खडक निर्माण झाले त्यांना बसाल्ट खडक असे म्हणतात. त्याखालील खडक हे सुमारे २०० दशलक्ष वर्षांपूर्वी तयार झालेले जुने खडक आहेत व ते निलगिरीच्या काही भागांमध्ये सापडतात.. 300px|thumb|बसाल्ट दगडाचा नमुना बसाल्ट खडक हा सह्याद्री डोंगररांगेत सर्वात जास्त सापडणारा खडक आहे. सह्याद्रीमध्ये सापडणारे इतर खडक पुढीलप्रमाणे. चार्नोकाईट, ग्रॅनाईट, खोंडालाईट, लेप्टिनाईट. लॅटराईट व बॉक्साईट हे खडक दक्षिणेकडील रांगांमध्ये आढळतात. शिखरे उत्तरेला सातपुडा रांगेपासूनसुरू झालेल्या सह्याद्री रांगेमध्ये माथेरान, महाबळेश्वर, पांचगणी, कुद्रेमुख व कोडागू इत्यादी थंड हवेची ठिकाणे आहेत. निलगिरी रांग, बिलिगिरिरंगन रांग, सेल्व्हराजन रांग आणि तिरुमला रांग इत्यादी काही छोट्या रांगा पूर्व घाट आणि पश्चिम घाट यांना जोडतात. कलसुबाइ हे उच शिखर आहेेे.. 300px|thumb|कळसूबाई शिखर काही छोट्या रांगा उदा० कार्डमम रांग व निलगिरी रांग, या तमिळनाडू राज्याच्या वायव्य क्षेत्रात आहेत. निलगिरी रांगेमध्ये प्रसिद्ध उटकमंड हे थंड हवेचे ठिकाण आहे. या रांगेमध्ये दोड्डाबेट्टा (२,६२३ मी) हे सर्वोच्च शिखर आहे. या रांगेच्या दक्षिणेकडे, अनामलाई रांगे मध्ये अनाई मुदी (२त,६९५ मी), चेंब्रा शिखर (२,१०० मी), बाणासुर शिखर (२,०७३ मी), वेल्लारीमाला शिखर (२,२०० मी) आणि अगस्त्यमाला शिखर (१,८६८ मी) इत्यादी शिखरे आहेत. केरळ राज्यातील सर्व चहा व कॉफीचे मळे हे पश्चिम घाटातच आहेत. पश्चिम घाटात दोन मुख्य खिंडी आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या मधोमध गोवा खिंड आहे व दुसरी पालघाट खिंड. ही निलगिरी व अनामलाई रांगांच्या मधे आहे. पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्या मधल्या चिंचोळ्या पट्टीच्या उत्तरेकडील सपाट भागाला कोकण असे म्हणतात. तर दक्षिणेला मलबार म्हणतात. सह्याद्रीच्या पायथ्याशी पूर्वेकडे असलेल्या भागाला महाराष्ट्र देश असे म्हणतात तर मध्य कर्नाटकात मळनाड म्हणतात. पश्चिम घाट मौसमी वाऱ्यांना अडवतो, त्यामुळे ढग उंचीवर जातात आणि थंड होतात व पाऊस पडतो. घनदाट जंगलेही पावसाला मदत करतात. तसेच जमिनीतील बाष्प पुन्हा वाफेच्यात स्वरूपात हवेत सोडण्यास मदत करतात. यामुळेच घाटाच्या पश्चिम उताराकडे पूर्व उतारापेक्षा खूप जास्त पाऊस पडतो. भरपूर पावसामुळेच पश्चिम घाटात अनेक नद्यांची उगमस्थाने आहेत. गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि त्यांच्या उपनद्या येथेच उगम पावतात. नद्या व धबधबे left|180px|thumb|जोग धबधबा (कर्नाटक) हा भारतातील एक प्रेक्षणीय धबधबा आहे. पश्चिम घाट हा अनेक लहान मोठ्या नद्यांचे उगमस्थान आहे. या पैकी मुख्य नद्या म्हणजे गोदावरी, कृष्णा व कावेरी. या तिन्ही नद्या पूर्ववाहिनी असून बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. तसेच इतर अनेक नद्या ज्या पश्चिमवाहिन्या आहेत, त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. यापैकी मुख्य नद्या म्हणजे मांडवी व झुआरी नदी. इतर अनेक नद्या या पश्चिम घाटात उगम पावतात. अन्य नद्यांमध्ये भीमा नदी, मलप्रभा नदी, कुंडली नदी, इत्यादी नद्या आहेत. अनेक पश्चिमवाहिनी नद्या ह्या खूप उतारावरून वाहत असल्यामुळे जलविद्युत प्रकल्पांसाठी खूप उपयुक्त आहेत. पश्चिम घाटात जवळजवळ ५० धरणे बांधलेली आहेत व त्यापैकी सर्वात जुना जलविद्युत प्रकल्प खोपोली येथे १९०० साली बांधला गेला. या सर्व धरणांपैकी मोठी धरणे म्हणजे महाराष्ट्रातील कोयना धरण, केरळमधील परांबीकुलम धरण व कर्नाटकातील लिंगणमक्की धरण. पावसाळ्यात पश्चिम घाटाचे सौंदर्य वाढविण्यास कारणीभूत घटक म्हणजे धबधबे. पश्चिम घाटात अनेक प्रेक्षणीय धबधबे आहेत. उदा. जोग धबधबा, कुंचीकल धबधबा, शिवसमुद्रम धबधबा , डब्बे धबधबा व उंचाल्ली धबधबा. जोग धबधबा हा दक्षिण आशियातील सर्वात उंच नैसर्गिक धबधबा आहे व तो जगातील १००१ नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आहे.मायकेल ब्राईट, जगातील १००१ नैसर्गिक आश्चर्ये, बॅरन्स एज्युकेशनल सीरीज २००५. तळकावेरी वन्यजीव अभयारण्य हे कावेरी नदीच्या उगमाजवळ असलेले एक मोठे अभयारण्य आहे. तसेच घनदाट जंगलांमुळे तुंगभद्रा नदीच्या उगमापाशी शरावती व सोमेश्वर ही दोन अभयारण्ये आहेत. हवामान thumb|120px|पश्चिम घाटातील वार्षिक पर्जन्यमान पश्चिम घाटातील वातावरण हे उंचीनुसार बदलत जाते. कमी उंचीवर उष्ण व दमट हवामान असून जास्त उंचीवर (१५०० मीटरच्यावर) सरासरी १५ °से. तापमान असते. काही अति उंचीच्या भागांमध्ये कायम धुके असते व हिवाळ्यात तापमान ४-५ °से. पर्यंत खाली येते. पश्विम घाटातील सरासरी तापमान उत्तरेला २० °से व दक्षिणेला २४ °से आहे. पश्चिम घाटातील (कोकणात) सरासरी पर्जन्यमान हे ३०००-४००० मिलिमीटर तर देशावर १००० मिलिमीटर. पश्चिम घाटातील पावसाचे प्रमाण हे बदलत जाणारे आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेच्या पश्चिम घाटाच्या डोंगराळ भागात खूप पाऊस पडतो पण थोडेच दिवस पडतो तर विषुववृत्ताच्या जवळ असणाऱ्या घाट प्रदेशांमध्ये थोडाच पाऊस पडतो पण वर्षभर पडतो. जैविक क्षेत्रे left|180px|thumb|निलगिरी रांग पश्चिम घाटात चार प्रकारची वृत्तीय जंगले आढळतात. पश्चिम घाटाच्या उत्तर व दक्षिण भागात पानगळीचीजंगले व सदाहरित जंगले आढळतात. पश्चिम घाटाच्या उत्तरेला सामान्यत: दक्षिण भागापेक्षा कमी आर्द्रता असल्यामुळे, कमी उंचीवर उत्तर भागात पानगळीची जंगले आढळतात. यात मुख्यत: सागाचे वृक्ष आहेत. १,००० मी. पेक्षा जास्त उंचीवर आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे सदाहरित जंगले आढळतात. केरळमधील वायनाड जंगले ही उत्तर व दक्षिणेकडील जैविक क्षेत्रांमधील जागेत मोडतात. दक्षिणेकडील जंगलांमध्ये जास्त जैवविविधता आहे. उत्तर भागाप्रमाणेच दक्षिण भागात सुद्धा कमी उंचीवर पानगळीची तर जास्त उंचीवर सदाहरित जंगले आढळतात. दक्षिण भागात १,००० मीटरपेक्षा जास्त उंचीवर सर्वाधिक प्रमाणात जैवविविधता आढळते. येथे संपूर्ण पश्चिम घाटात आढळणाऱ्या फुलझाडांपैकी ८०% पेक्षा जास्त जाती आढळतात. जैविक सुरक्षा thumb|200px|राजपालयम येथील सह्याद्री रांग पश्चिम घाटातील दाट जंगले ही मुख्यत: आदिवासी लोकांसाठी खूप उपयुक्त आहेत. त्यांना लागणारे अन्न व निवारे या जंगलांमध्ये मुबलक प्रमाणात मिळतात. या दाट जंगलांमुळेच पठारावरील लोक इथे स्थायिक होऊ शकले नाहीत. भारतात आल्यावर इंग्रजांनी मोठ्या प्रमाणावर जंगले साफ करून जमीन शेतीयोग्य बनविली. १९८८ मध्ये पश्चिम घाटाला पर्यावरणशास्त्रज्ञ नॉर्मन मायर्स यांच्या प्रयत्नांमुळे संरक्षित जैविक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. जरी पश्चिम घाट हा भारताच्या फक्त ५% क्षेत्रफळावर पसरलेला असला तरी भारतातील उंच वाढणाऱ्या झाडांच्या १५,००० जातींपैकी सुमारे ४,००० जाती (२७%) या इथेच सापडतात. यापैकी सुमारे १,८०० जाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात. सह्याद्री रांगेत जवळजवळ ८४ उभयचर प्राण्यांच्या जाती, १६ पक्ष्यांच्या जाती, ७ प्रकारचे सस्तन प्राणी व १,६०० प्रकारची फुलझाडे आढळतात जी जगात इतरत्र कोठेही आढळत नाहीत. भारत सरकारने पश्चिम घाटातील अनेक जंगले संरक्षित केलेली आहेत. यामध्ये २ संरक्षित जैविक क्षेत्रे, १३ राष्ट्रीय उद्याने, अनेक अभयारण्ये वगैरेंचा समावेश होतो. ही सर्व संरक्षित वनक्षेत्रे जतन करण्यासाठी वेगळे वनखाते बनवून या जंगलांचे रक्षण करण्यात येत आहे. यापैकी अनेक राष्ट्रीय उद्याने ही पूर्वी अभयारण्ये होती. निलगिरी संरक्षित जैविक क्षेत्र हे जवळजवळ ५,५०० वर्ग कि.मी. क्षेत्रफळावर पसरलेले सर्वात मोठे संरक्षित क्षेत्र आहे. यामध्ये नागरहोलची सदाहरित जंगले, बांदीपूर राष्ट्रीय उद्यानातील पानगळीची जंगले, कर्नाटकातील नुगू जंगल व केरळ व तमिळनाडूमधील अनुक्रमे वायनाड व मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान यांचा समावेश होतो.निलगिरी सुरक्षित जैविक क्षेत्र. विदागारातील आवृत्ती केरळमधील पश्चिम घाटात अनेक थंड हवेची ठिकाणे प्रसिद्ध आहेत. यामध्ये मुन्नार, पोन्मुदी व वायनाड ही प्रमुख ठिकाणे आहेत. केरळमधील सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान हे भारतातील शिल्लक असलेल्या सदाहरित जंगलांपैकी एक आहे. भारतात दोन ठिकाणी जैविक वधेता आढळते पहिली पूर्व घाट आणि दुसरा पश्चिम घाट.एलॅमॉन सुरेश(२००६) "केरळमधील ठेवा", यूट्यूब व्हिडियो,केरळमधील ठेवा नुकतेच कोयना आणि चांदोली या दोन अभयारण्याचे एकत्रीकरण करून नवीन अशा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती केली आहे. जागतिक वारसा thumb|अगस्त्यमलाई संरक्षित जैविक क्षेत्रांतर्गत असणाऱ्या पोन्मुदी रांगेचे एक दृश्य २००६ साली भारताने युनेस्कोकडे पश्चिम घाटाला जागतिक वारसा स्थानांमध्ये समाविष्ट करण्यासाठी विनंती केली आहे.युनेस्को, एमएबी, (२००७) जागतिक वारसा स्थान, तात्पुरती यादी, पश्चिम घाट. यामध्ये एकंदर सात उपक्षेत्रे असतील. अगस्त्यमलाई उपक्षेत्र - यामध्ये अगस्त्यमलाई संरक्षित जैविक क्षेत्र (९०० वर्ग कि.मी.) ज्यामध्ये तमिळनाडूतील कलक्कड मुंडणतुराई व्याघ्र प्रकल्प (८०६ वर्ग कि.मी.) व नेय्यार अभयारण्य , पेप्पारा तसेच शेंदुर्णी व त्याच्या आसपास असणारे आचेनकोईलचे क्षेत्र आचेनकोईल, केरळ, थेन्मला, कोन्नीकोन्नी, केरळ, पुनलुर, तिरुवनंतपुरम आणि अगस्त्यवनम, केरळअगस्त्यवनम, केरळ यांचा समावेश आहे. पेरियार उपक्षेत्र - यामध्ये केरळमधील पेरियार राष्ट्रीय उद्यान (७७७ वर्ग कि.मी.), रान्नी, कोन्नी व आचनकोविल इथली जंगले. पूर्वेला श्रीविल्लीपुत्तुर अभयारण्य व तिरुनवेली इथली जंगले यांचा समावेश आहे. अनामलाई उपक्षेत्र - यामध्ये चिन्नार अभयारण्य, एराविकुलम राष्ट्रीय उद्यान (९० वर्ग कि.मी.), इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान, ग्रास हिल्स राष्ट्रीय उद्यान व करियन शोला राष्ट्रीय उद्यान (एकूण ९५८ वर्ग कि.मी.) तसेच तमिळनाडूमधील पलानी रांग राष्ट्रीय उद्यान (७३६.८७ वर्ग कि.मी.) व केरळमधील परांबीकुलम अभयारण्य (२८५ वर्ग कि.मी.) यांचा समावेश आहे. निलगिरी उपक्षेत्र - यामध्ये निलगिरी संरक्षित जैविक क्षेत्र तसेच करीम्पुझा राष्ट्रीय उद्यान (२३० वर्ग कि.मी.), सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान (८९.५२ वर्ग कि.मी.) व केरळमधील वायनाड अभयारण्य (३४४ वर्ग कि.मी.) आणि तमिळनाडूमधील बंदीपूर राष्ट्रीय उद्यान (८७४ वर्ग कि.मी), मुकुर्थी राष्ट्रीय उद्यान (७८.४६ वर्ग कि.मी.), मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान (३२१ वर्ग कि.मी.) तसेच अमरांबलमचे संरक्षित जंगल (६,००० वर्ग कि.मी.) यांचा समावेश आहे. तळकावेरी उपक्षेत्र - यामध्ये ब्रह्मगिरी अभयारण्य (१८१.२९ वर्ग कि.मी.), राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान (३२१ वर्ग कि.मी), पुष्पगिरी अभयारण्य (९२.६५ वर्ग कि.मी.), कर्नाटकातील तळकावेरी अभयारण्य (१०५.०१ वर्ग कि.मी.) व केरळमधील आरळम संरक्षित वनक्षेत्र यांचा समावेश आहे. कुद्रेमुख उपक्षेत्र - यामध्ये कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान (६००.३२ वर्ग कि.मी.), सोमेश्वर अभयारण्य व आजूबाजूची सोमेश्वरची संरक्षित जंगले तसेच कर्नाटकातील अगुंबे व बलहल्ली येथील जंगले यांचा समावेश आहे. सह्याद्री उपक्षेत्र - यामध्ये आंशी राष्ट्रीय उद्यान (३४० वर्ग कि.मी.), चांदोली राष्ट्रीय उद्यान (३१७.६७ वर्ग कि.मी.), कोयना अभयारण्य व राधानगरी अभयारण्य यांचा समावेश आहे. याचा भूभाग सांगली व सातारा जिल्ह्यात समाविष्ट होतो. प्राणिजगत पश्चिम घाटात हजारो प्रकारचे प्राणी आढळतात. यांमध्ये जवळजवळ ३२५ प्रजाती या जागतिक स्तरावर नष्ट व्हायला आलेल्या प्रजाती आहेत. तसेच उभयचरांमधील बऱ्याच प्रजाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात. ही रांग वन्यजीवांसाठी खूप उपयुक्त जागा आहे. निलगिरीच्या जैविक क्षेत्रामध्ये आशियाई हत्ती मोठ्या प्रमाणावर आढळतात. ब्रह्मगिरी व पुष्पगिरी अभयारण्येसुद्धा हत्तींसाठी सुयोग्य निवासस्थाने आहेत. कर्नाटकातील पश्चिम घाटात ६,००० पेक्षा जास्त हत्ती आढळतात (२००४ सालातील गणनेप्रमाणे) व भारतात सापडणाऱ्या वाघांपैकी १०% वाघ सुद्धा इथेच आहेत.कर्नाटक जंगल खाते विदागारातील आवृत्ती. सुंदरबननंतर भारतात सर्वात जास्त वाघ हे कर्नाटक, तमिळनाडू व केरळच्या जंगलातच आढळतात. बंदीपूर राष्ट्रीय उद्यान व नागरहोल इथे ५,०००पेक्षा जास्त गौर (बैल) कळप करून राहतात. कोडागु जंगलांच्या पश्चिमेला निलगिरी माकडे मोठ्या प्रमाणावर आढळतात. भद्रा अभयारण्यात हरणांची मोठी संख्या आढळते. बरेच हत्ती, गौर, सांबर, चित्ते, वाघ इ. प्राणी केरळमधील जंगलांमध्ये आढळतात. सरपटणारे प्राणी:अजगराच्या काही जाती या फक्त पश्चिम घाटातच आढळतात. तसेच अनेक विषारी व बिनविषारी पकारचे सरपटणारे प्राणी आढळतात. पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गटाचा अहवाल गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील सह्याद्री, आणि तामिळनाडू - केरळातील निलगिरी व मलयगिरी यांनी बनलेला पश्चिम घाट “राष्ट्रदेवीचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन” असा रम्य प्रदेश आहे. ह्या डोंगर रांगा म्हणजे दक्षिण भारताचे उदकभांडार आहे. येथून गोदावरी, कृष्णा, तुंगभद्रा, कावेरी व वैगई यांसारख्या पूर्ववाहिन्या आणि वैतरणा, सावित्री, काळी, शरावती, नेत्रावती, भरतपुळा, पेरियार अशा अनेक पश्चिमवाहिनी नद्या उगम पावतात. शिवाय ही श्रेणी जैवविविधतेचे एक आगळे भांडार आहे. जोडीलाच इथे विपुल खनिज संपत्ती आहे. हा प्रदेश सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्याही समृद्ध आहे. साहजिकच, साऱ्या देशाप्रमाणेच इथेही वेगेवेगळे विकास प्रकल्प अधिकाधिक जोमाने राबवले जात आहेत. ह्या प्रदेशाची जीवसंपत्ती व संवेदनाशीलता लक्षात घेऊन भारत सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाने मार्च २०१० मध्ये प्रा.माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली चार शासकीय अधिकारी व दहा विशेषज्ञ ह्यांचा पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गट गठित केला. ह्या गटापुढे खालील उद्दिष्टे ठेवण्यात आली - पश्चिम घाटाच्या परिसराच्या सद्यःस्थितीचे परीक्षण करणे पश्चिम घाटातील कोणकोणत्या टापूंना संवेदनशील परिसरक्षेत्रे (Ecologically Sensitive Areas) म्हणून घोषित करणे आवश्यक आहे हे ठरवून अशा टापूंना १९८६ च्या पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार संवेदनशील परिसरक्षेत्रे म्हणून घोषित करण्याची शिफारस करणे. सर्व संबंधित राज्यांतील जनता व शासनांशी सर्वंकष विचार विनिमय करून पश्चिम घाट प्रदेशाचे संरक्षण, संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्याबाबत शिफारसी देणे. भारत शासनाच्या पर्यावरण व वन मंत्रालयाने १९८६ च्या पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार जाहीर केलेल्या पश्चिम घाट प्रदेशातील विवक्षित संवेदनशील परिसरक्षेत्रांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना सुचवणे. १९८६ च्या पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत पश्चिम घाट प्रदेशाच्या परिसराचे सयुक्तिक व्यवस्थापन करण्यासाठी व सर्व संबंधित राज्यांच्या सहकार्याने शाश्वत विकासासाठी प्रयत्न करण्यासाठी एक जाणकार लोकांचे पश्चिम घाट परिसर प्राधिकरण स्थापन करण्यासाठी काय पावले उचलावी ह्याबद्दल शिफारस करणे. पश्चिम घाटाच्या संदर्भातील इतर काहीही सयुक्तिक पर्यावरणीय अथवा जीवपरिसर संबंधित विषयांबाबत, तसेच कर्नाटकातील गुंड्या व केरळातील अतिरप्पिल्ली जलविद्युत् प्रकल्पांचे, गोव्यातील खाणींचे, तसेच संपूर्ण रत्‍नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे परीक्षण करून सल्ला पुरवणे.https://en.wikipedia.org/wiki/Gadgil_Committee तज्ज्ञ गटाची कार्यप्रणाली संपूर्ण पश्चिम घाट प्रदेशासाठी संवेदनशील परिसरक्षेत्रे आखणे व तेथील व्यवस्थापन कसे असावे हे सुचवणे ही तज्ज्ञ गटावर सोपवण्यात आलेली मुख्य जबाबदारी होती. अर्थातच तज्ज्ञ गटाच्या कामाच्या संदर्भात १९८६ च्या पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार १९८९पासून प्रचलित झालेली संवेदनशील परिसरक्षेत्रे ही संकल्पना महत्त्वाची आहे. संवेदनशील परिसरक्षेत्रांचे निकष सुचवण्यासाठी नेमलेल्या प्रणव सेन समितीने परिसर संबंधित माहितीचा एक देशव्यापी संग्रह तातडीने बनवावा अशी शिफारस २००० सालीच केली होती, परंतु २०१०पर्यंत ह्या शिफारसीकडे पूर्ण दुर्लक्ष केले गेले होते. तेव्हा तज्ज्ञ गटाने पश्चिम घाट प्रदेशासाठी असा माहिती संग्रह बनवणे, आणि मग संवेदनशील परिसरक्षेत्रांच्या स्थल-कालानुरूप व्यवस्थापनाची रूपरेषा आखणे ही कामे हातात घेतली. ह्यासाठी काही मूलभूत संशोधन करण्याची आवश्यकता होती; ते करून शास्त्रीय निष्कर्ष प्रकाशित केले. सर्व उद्दिष्टे साधण्यासाठी गटाने अनेक ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी दिल्या, ठिकठिकाणी खुली चर्चासत्रे आयोजित केली. खाण मालक व व्यवस्थापक, उद्योगपति, शिक्षक, बागायतदार, शेतकरी, शेतमजूर, पशुपालक, मच्छीमार अशा विविध व्यावसायिकांचा, आणि सर्व संबंधित विषयांतील तज्ज्ञांचा सल्ला घेतला. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री, गोव्याचे आजी व माजी मुख्य मंत्री, केरळ राज्यातील कृषि व वन मंत्री, कर्नाटकातील मंत्री दर्जाचे आयुक्त, सर्व राज्यांतील आमदार व खासदार, जिल्हा परिषदा, तालुक पंचायती व ग्राम पंचायती सदस्य ह्यांच्याशी चर्चा केली. सर्व राज्यांच्या तसेच केन्द्रीय शासनातील वेगवेगळ्या शासकीय अधिकाऱ्यांचे अनुभव व अभिप्राय समजावून घेतले. हे सर्व अत्यंत पारदर्शकतेने केले व वेळोवेळी सर्व इतिवृत्ते अधिकृत संकेतस्थलांवर उपलब्ध करून दिली. १९८९ साली पहिले संवेदनशील परिसरक्षेत्र जाहीर केले गेले. त्या वेळी ही क्षेत्रे कशी आखावीत व त्यांचे व्यवस्थापन कसे केले जावे ह्या संबंधी काहीही मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध नव्हती. २००० साली प्रणव सेन समितीने कोणत्या निकषावर संवेदनशील परिसरक्षेत्रे ठरवावीत याबाबतचा एक अहवाल सादर केला. त्यात समृद्ध जैवविविधता, भरपूर पर्जन्यमान, उभे डोंगर उतार व नद्यांचे उगम अशांवर आधारित विविध निकष सुचवले. तथापि प्रणव सेन समितीने अशा संवेदनशील क्षेत्रांचे व्यवस्थापन कसे करावे ह्याबाबत काहीही मांडणी केली नाही. संवेदनशील परिसरक्षेत्र ही संकल्पना राष्ट्रीय उद्यानासारख्या संरक्षित प्रदेशाहून खूप वेगळी आहे. साधारणतः राष्ट्रीय उद्यानासारख्या प्रदेशात कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप अपेक्षित नसतो. पण संवेदनशील परिसर क्षेत्रात मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात असू शकतो. उदाहरणार्थ, संपूर्ण डहाणू तालुका हा संवेदनशील परिसरक्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तेथे एक औष्णिक वीजनिर्मिती केंद्र, आणि चिक्कूच्या मोठमोठ्या बागा आहेत. तेव्हा संवेदनशील परिसर क्षेत्रांत पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार जिथे जिथे जे जे सयुक्तिक असतील तिथे तिथे ते ते निर्बंध लागू करता येतात, तसेच पर्यावरण पोषक उपक्रमांना खास प्रोत्साहनही देण्यात येऊ शकते. आजतागायत अशी संवेदनशील परिसरक्षेत्रे आखताना व तेथील व्यवस्थापनाची मांडणी करताना, स्थानिक जनतेला सहभागी करण्यात आलेले नाही. परंतु पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गटाचा ही संकल्पना लोकाभिमुख पद्धतीने - पायाकडून कळसाकडे जात - राबवण्याचा प्रस्ताव आहे. एकूणच संपूर्ण पश्चिम घाट परिसरात पर्यावरण पोषक विकासाची रचना करताना स्थानिक समाजांनी मोलाची भूमिका बजावावी अशी पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गटाची कळीची शिफारस आहे.http://www.moef.nic.in/downloads/public-information/wg-23052012.pdf पहा : महाराष्ट्रातील किल्ले महाराष्ट्रातील किल्ले, प्रकार आणि अवयव महाराष्ट्रातील घाटरस्ते सह्याद्रीविषयक पुस्तके आडवाटेवरचा महाराष्ट्र (प्र.के. घाणेकर) इतिहास दुर्गांचा (निनाद बेडेकर) इये महाराष्ट्र देशी (प्र.के. घाणेकर) ओळख किल्ल्यांची - भाग १ (प्र.के. घाणेकर) किल्ले (गो.नी. दांडेकर) किल्ले पाहू या (प्र.के. घाणेकर) कोकणचा मानबिंदू – सिंधुदुर्ग (प्र.के. घाणेकर) गड आणि कोट (प्र.के. घाणेकर) गड किल्ले गाती जयगाथा (निनाद बेडेकर) गडदर्शन (प्र.के. घाणेकर) गडसंच (बाबासाहेब पुरंदरे) गडांचा राजा - राजगड (प्र.के. घाणेकर) जंजिरा (प्र.के. घाणेकर) जलदुर्गांच्या सहवासात (प्र.के. घाणेकर) डोंगरयात्रा (आनंद पाळंदे) दुर्गकथा (निनाद बेडेकर) दुर्गदर्शन (गो.नी. दांडेकर) दुर्गभ्रमणगाथा (गो.नी. दांडेकर) दुर्गवैभव (निनाद बेडेकर) दुर्गांच्या देशात (प्र.के. घाणेकर) भटकंती, रायगड जिल्ह्याची (प्र.के. घाणेकर) महाराष्ट्रातील दुर्ग (निनाद बेडेकर) महाराष्ट्रातील लेणी (प्रा. सु.ह. जोशी) मैत्री सागरदुर्गांची (प्र.के. घाणेकर) लेणी महाराष्ट्राची (डॉ. दाऊद दळवी) लेणी महाराष्ट्राची (प्र.के. घाणेकर) शिवतीर्थाच्या आख्यायिका (प्र.के. घाणेकर) सह्याद्रि-माहात्म्य (रवळोबास) सह्याद्री (स.आ. जोगळेकर) सह्याद्रीतील ऑफबीट भटकंती (ओंकार वर्तले) सांगाती सह्याद्रीचा (यंग झिंगारो क्लब) सोबत दुर्गांची (प्र.के. घाणेकर) संदर्भ बाह्य दुवे सह्याद्री रांगेची चित्रे पश्चिम घाटातील खारी सह्याद्री मधील किल्ले, देवळे व गुहा पश्चिम घाटाची चित्रे पश्चिम घाटातील नद्या सह्याद्री रांगेची चित्रे सह्याद्री मधील किल्ले सह्याद्री मधील किल्ले, पक्षी प्राणी, फुले व इतर चित्रे वर्ग:भारतातील जागतिक वारसा स्थाने वर्ग:पर्यावरण वर्ग:पश्चिम घाट वर्ग:सह्याद्री डोंगररांग
ईमेल
https://mr.wikipedia.org/wiki/ईमेल
thumb|This screenshot shows the "Inbox" page of an email system, where users can see new emails and take actions, such as reading, deleting, saving, or responding to these messages|अल्ट= thumb|Thकचe at sign, a part of every SMTP email address ईमेल किंवा ई-मेल (मराठीत:विपत्र): हे electronic mail ह्या इंग्लिश संज्ञेचे लघुरूप असून इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या साहाय्याने संदेश पाठवण्याचे तंत्रज्ञान आहे. सध्याच्या बहुतांश ईमेल यंत्रणा इंटरनेटचा वापर करतात. इलेक्ट्रॉनिक मेल, ज्याला आपण रोजच्या वापरात ई-मेल ह्या नावानी ओळखतो, ती एका प्रकारची डिजिटल संदेशांची देवाण घेवाण आहे. ई-मेलने एका लेखकाने संगणकावर टंकलिखित करून पाठवलेला मजकूर अगदी थोड्याच वेळात दुसऱ्या एका किंवा अनेक वाचकांपर्यंत पोहोचतो. आजचे आधुनिक ई-मेल हे स्टोअर(साठवा) आणि फॉरवर्ड (पुढे पाठवणे) ह्या धर्तीवर बनवले गेलेले आहेत. ई-मेल सर्व्हर संदेश प्राप्त करतात, संदेश पाठवतात आणि संदेश साठवूनसुद्धा ठेवू शकतात. त्यासाठी आता संदेश पाठवणारे, वाचणारे आणि त्यांचे संगणक हे ऑनलाइन असण्याची गरज नाही. ते थोड्या काळासाठी एकमेकांबरोबर जोडले गेले तरी संदेश पाठवता येतो. हा थोडा काल एक संदेश पाठवण्यास लागणाऱ्या वेळापर्यंत सीमित असतो. ई-मेल संदेशाचे दोन भाग असतात. पहिल्या भाग असतो हेडर म्हणजेच ठळकपणे लिहिलेले संदेशाचे नाव, पाठवणाऱ्याचा ई-मेलचा पत्ता, आणि संदेश ज्याला पाठवला आहे त्याचाही ई-मेलचा पत्ता हे सगळे असते. दुसरा भाग म्हणजे मेसेज बॉडी ह्यामध्ये संदेश लिहिलेला असतो. प्राथमिक स्वरूपात असताना फक्त लिहिलेले संदर्भ पाठवता येणारा ई-मेल आधुनिक काळात जास्त विकसित होऊन मल्टिमीडिया अ‍ॅटॅचमेन्ट्‌स म्हणजेच छोट्या आकाराचा मल्टिमीडिया फायली पाठवण्याइतपत सक्षम बनला. ह्या पद्धतीला मल्टिपर्पज इंटरनेट मेल एक्सटेन्शन्स (MIME)असे म्हणतात. ई-मेल सेवेचा इतिहास आपल्याला "अर्पानेट” पर्यंत मागे घेऊन जातो. १९८०चा दशकात “अर्पानेट”चे इंटरनेट मध्ये झालेल्या रूपांतरामुळे ई-मेल सेवेचा जन्म झाला. १९७० मध्ये पाठवले गेलेले ई-मेल आणि आजचे फक्त शब्दबद्ध मजकूर असलेले ई-मेल यांमध्ये कमालीचे साम्य आहे. संगणकीय जाळ्यांचा मदतीने पाठवलेला ई-मेल प्रथमत: “अर्पानेट” वर फाईल ट्रान्स्फर प्रोटोकॉल (FTP)चा प्रणालीनुसार पाठवला गेला. सन १९८२ पासून ईमेल पाठवण्यासाठी सिम्पल मेल ट्रान्स्फर प्रोटोकॉलचा वापर होत असतो. व्याकरणदृष्ट्या 'ईमेल' हा पुल्लिंगी शब्द नाम (एक संदेश)म्हणून वापरला जातो. इंग्लिश भाषेमध्ये 'टु ईमेल' ही संज्ञा क्रियापद म्हणूनही (ईमेल पाठवणे ह्या अर्थी) वापरली जाते. __TOC__ ईमेलचा उगम हॉटमेल ही ईमेल प्रणाली सामान्य जनतेला फुकट वापरता येणारी पहिली यशस्वी ईमेल प्रणाली होती. आधुनिक ईमेल यंत्रणा right|thumb|ईमेल प्रक्रिया इंटरनेटचा प्रभाव इंटरनेट मुळे मोठ्या प्रमाणात फायदे तसेच तोटे झाले आहेत. ईमेल शिष्टाचार (ईमेल एटिकेट्‌स) ईमेल व कॉंप्यूटर व्हायरसचा धोका gy)yh स्पॅम ईमेल स्पॅम ईमेल म्हणजे अनाहूतपणे पाठविलेले, बहुतांशी जाहिराती करण्यासाठी पाठवलेले ईमेल होत. बाह्य दुवे ईमेल संवर्धन › Ian Peter's History of the Internet ईमेल इतिहास अर्पानेट फाईल ट्रान्स्फर प्रोटोकॉल == संदर्भ आणि नोंदी == वर्ग:इंटरनेट
जानेवारी १
https://mr.wikipedia.org/wiki/जानेवारी_१
ख्रिस्ती नववर्षारंभ ठळक घटना आणि घडामोडी १ जानेवारीचे दिनविशेष पंधरावे शतक सोळावे शतक अठरावे शतक १७५६ - डेन्मार्कने निकोबार बेटे काबीज करून त्यांना न्यू डेन्मार्क असे नाव दिले. १७८८ - द टाइम्स या लंडनहून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राची पहिली आवृत्ती उपलब्ध. एकोणिसावे शतक १८०८ - अमेरिकेत गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली. १८१८ - भीमा कोरेगाव येथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन. एफ‌.एफ. स्टॉंटन यांच्या नेतृत्वाखालील बॉंबे नेटिव्ह इन्फन्ट्री बटालियनने २५,००० संख्याबळाच्या पेशवे सैन्याचा पराभव केला. १८४२ - बाबा पद्मनजी यांचे ज्ञानोदय वृत्तपत्र सुरू झाले. १८४८ - महात्मा फुले यांनी पुणे येथे भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. १८६२ - इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले. १८८० - विष्णूुास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो.ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल, पुणेची स्थापना केली. १८८३ - पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना १८९९ - क्युबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली. विसावे शतक १९०८ - संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी हुबळी येथे ललित कलादर्श ही नाटक कंपनी स्थापन केली. १९०८ - पुण्याच्या कृषी महाविद्यालयाची स्थापना. १९१९ - गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १९१९ द्वारे भारतात कायदेमंडळे स्थापन झाली. १९२३ - चित्तरंजन दास आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली. १९३२ - डॉ. ना.भि. परूळेकर यांनी सकाळ वृत्तपत्र हे सुरू केले. १९५९ - क्युबामध्ये फिडेल कॅस्ट्रोच्या नेतृत्वाखालील क्रांतिकारकांचा राजधानी हवानावर ताबा. १९७८ - सम्राट अशोक हे बोईंग ७४७-२०० प्रकारचे विमान मुंबई विमानतळावरून उड्डाण करीत असताना समुद्रात कोसळले. एकविसावे शतक २००२ - युरोपीय महासंघातील १२ देशांत युरो चलन अमलात आले. मानवी इतिहासातील हा सर्वात मोठा चलनबदल होता. २०१० - आत्मघातकी दहशतवाद्याने पाकिस्तानच्या लक्की मारवात गावात चालू असलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या ठिकाणी कारबॉम्ब स्फोट केला. १०५ ठार, १०० जखमी. २०१३ - कोट दि आईव्होरच्या आबिजान शहरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन ६० व्यक्ती ठार, २०० जखमी.. जन्म १६६२ - बाळाजी विश्वनाथ भट, पेशवा. १८९२ - महादेव हरिभाई देसाई गांधीवादी कार्यकर्ते. १८९४ - सत्येंद्रनाथ बोस भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. १९०० - श्रीकृष्ण नारायण रातंजनकर, आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू १९०२ - कमलाकांत वामन केळकर भारतीय भूवैज्ञानिक. १९१८ - शांताबाई दाणी, सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी १९२३ - उमा देवी खत्री उर्फ टुनटुन, अभिनेत्री व गायिका १९२८ - डॉ. मधुकर आष्टीकर, लेखक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष. १९३६ - राजा राजवाडे साहित्यिक १९४१ - गोवर्धन असरानी ऊर्फ असरानी, चित्रपट अभिनेता. १९४३ - रघुनाथ माशेलकर, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक. १९५० - दीपा महेता, भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका. १९५१ - नाना पाटेकर, चित्रपट अभिनेता. १९७८ - विद्या बालन, हिंदी चित्रपट अभिनेत्री. मृत्यू १७४८ - योहान बर्नोली, स्विस गणितज्ञ. १९४४ - सर एडविन लुटेन्स, नवी दिल्लीचे नगररचनाकार. १९५५ - शांतिस्वरूप भटनागर भारतीय रसायनशास्त्रज्ञ. १९७५ - शंकरराव वासुदेव किर्लोस्कर, मराठी उद्योजक, साहित्यिक व चित्रकार. २००५ - कुसुमताई पटवर्धन, समाजवादी नेत्या. प्रतिवार्षिक पालन धूम्रपान विरोधी दिन आंग्ल नववर्ष दिन जागतिक शांतता दिन राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई, हैती, सुदान आर्मी मेडिकल स्थापना दिवस डिसेंबर ३० - डिसेंबर ३१ - जानेवारी १ - जानेवारी २ - जानेवारी ३ - (जानेवारी महिना) बाह्य दुवे वर्ग:दिवस वर्ग:ग्रेगरी दिनदर्शिका वर्ग:आंतरराष्ट्रीय दिनदर्शिका वर्ग:लाल दुवे असणारे लेख
जानेवारी २
https://mr.wikipedia.org/wiki/जानेवारी_२
ठळक घटना आणि घडामोडी पंधरावे शतक सोळावे शतक अठरावे शतक १७५७ - ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले. प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला. या विजयामुळे भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला. एकोणिसावे शतक १८८१ - लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या मराठा या दैनिकाची सुरुवात झाली. १८८५ - पुणे यथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले. विसावे शतक १९३६ - मध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना. १९४२ - दुसरे महायुद्ध - जपानने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जिंकली. १९४६ - आल्बेनियाच्या राजा झॉगने राज्यत्याग केला. १९५१ - सोवियेत संघाच्या ल्युना-१ अंतरिक्षयानाचे चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण. १९५५ - पनामाच्या राष्ट्राध्यक्ष होजे ॲंतोनियो रेमोनची हत्या. १९७१ - इब्रॉक्सच्या दुसऱ्याा दुर्घटनेत ६६ प्रेक्षक ठार. १९७४ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने अमेरिकेतील पेट्रोलचा वापर कमी करण्यासाठी तेथील महामार्गांवरील गतिमर्यादा कमी करून ताशी ५५ मैल (८९ किमी) केली. १९८९ - मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हाश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या १९९९ - अमेरिकेच्या मध्य भगातील हिमवादळात मिलवॉकीमध्ये १४ इंच तर शिकागोमध्ये १९ इंच हिम पडले. शिकागोत तापमान -१३ °F (-२५ °C) इतके खाली गेले. ६८ मृत्यू. २००० - संत ज्ञानेश्वरांची मुद्रा असलेल्या चलनी नाण्याचे भारतीय व्यक्तीपंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन. २००० - पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला. एकविसावे शतक २००१ - एदुआर्दो दुहाल्दे आर्जेन्टिनाच्या राष्ट्राध्यक्षपदी. २००६ - अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील सेगो येथील कोळशाच्या खाणीत अपघात होऊन १२ कामगार ठार तर एक गंभीररीत्या जखमी. २०१६ - सौदी अरेबियाने दहशतवादी असल्याचे ठरवून ४६ लोकांना मृत्युदंड दिला. जन्म १६४२ - महमद चौथा, ऑट्टोमन सुलतान. १९१० - श्रीरंगम श्रीनिवासराव, तेलुगू कवी. १९३२ - हरचंदसिंग लोंगोवाल, अकाली दलाचे अध्यक्ष १९४० - श्रीनिवास वरदन, भारतीय गणितज्ञ. १९४२ - डेनिस हॅस्टर्ट, अमेरिकन राजकारणी. १९५९ - कीर्ति आझाद, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९६० - रमण लांबा, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९६४ - रुमेश रत्नायके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. १९७० - ॲंथनी स्टुअर्ट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९७३ - जॉन बेनॉ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. मृत्यू १३१६ - अल्लाउद्दीन खिलजी, दिल्लीचा सुलतान. १९३५ - मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर, टिळक अनुयायी स्वातंत्र्यसैनिक, मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील १९४३ - भाई कोतवाल, भारतीय स्वातंत्र्यसैनिक. १९४४ - महर्षि विठ्ठल रामजी शिंदे, मराठी समाजसुधारक. १९४६ - ज्यो डार्लिंग, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९५२ - भास्कर वामन भट, भारतीय इतिहास संशोधक. १९८९ - सफदर हाश्मी, भारतीय पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवी आणि गीतकार. १९९५ - सियाद बारे, सोमालियाचा राष्ट्राध्यक्ष. १९९९ - विमला फारुकी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या २००२ - अनिल अग्रवाल, भारतीय पर्यावरणवादी. २०१५ - वसंत गोवारीकर, भारतीय शास्त्रज्ञ. प्रतिवार्षिक पालन डिसेंबर ३१ - जानेवारी १ - जानेवारी २ - जानेवारी ३ - जानेवारी ४ - (जानेवारी महिना) बाह्य दुवे वर्ग:दिवस वर्ग:ग्रेगरी दिनदर्शिका वर्ग:आंतरराष्ट्रीय दिनदर्शिका वर्ग:लाल दुवे असणारे लेख
जानेवारी ३
https://mr.wikipedia.org/wiki/जानेवारी_३
पृथ्वी उपभू स्थितीत(सुर्यापासून लंबवर्तुळाकार भ्रमणामुळे सर्वात कमी अंतर-१४ कोटी ७० लाख कि.मी.) ठळक घटना आणि घडामोडी पंधरावे शतक १४३१ - जोन ऑफ आर्क बिशप पिएर कॉशोंच्या हाती लागली. १४९६ - लिओनार्डो दा विन्चीने उड्डाणयंत्राचा एक असफल प्रयोग केला. सोळावे शतक १५२१ - पोप लिओ दहाव्याने पोपचा फतवा काढून मार्टिन ल्यूथरला वाळीत टाकले. अठरावे शतक १७७७ - प्रिंसटनची लढाई - जॉर्ज वॉशिंग्टनने चार्ल्स कॉर्नवॉलिसचा पराभव केला. एकोणिसावे शतक १८१५ - ऑस्ट्रिया, ब्रिटन व फ्रांसने एक गुप्त तह मंजूर करून रशिया व प्रशिया विरुद्ध संयुक्त फळी उभारली. १८२३ - स्टीवन ऑस्टिनने मेक्सिको सरकारकडून टेक्सासमध्ये जमीन मिळविली. १८३३ - ब्रिटनने फॉकलंड द्वीपसमूह बळकाविले. १८३४ - स्टीवन ऑस्टिनला मेक्सिको सरकारने मेक्सिको सिटीत तुरूंगात टाकले. १८५५ - हवाईमध्ये चीनी नागरिकांचे प्रथम आगमन. १८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - डेलावेरने संयुक्त संस्थानातून बाहेर न पडण्याचा निर्णय घेतला. १८६८ - जपानमध्ये शोगन सत्ता संपली. मैजी वंश पुन्हा राज्यकर्ता. विसावे शतक १९२१ - तुर्कस्तानने आर्मेनियाशी संधी केली. १९२५ - बेनितो मुसोलिनीने इटलीत हुकुमशाही जाहीर केली. १९३१ - महात्मा गांधीनी गोलमेज परिषदेत संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली . १९४७ - अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच दूरचित्रवाणीवरून प्रक्षेपण करण्यात आले. १९५० - पुणेयेथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे उदघाटन. १९५२ - स्वतंत्र भारतातपहिल्या राष्ट्रीय निवडणुका. १९५७ - हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले विद्युत घटांवर चालणारे पहिले मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले. १९५८ - सर एडमंड हिलरी हे दक्षिण ध्रुवावर पोहोचले. १९५९ - अलास्का अमेरिकेचे ४९वे राज्य झाले. १९६१ - अमेरिकेने क्युबाशी संबंध तोडले. १९६२ - पोप जॉन तेविसाव्याने फिदेल कास्त्रोला वाळीत टाकले. १९९० - पनामाच्या मनुएल नोरिगाने अमेरिकी सैन्यासमोर आत्मसमर्पण केले. १९९४ - रशियात ईर्खुट्स्क येथून निघालेले एरोफ्लोतचे टी.यू.१५४ प्रकारचे विमान कोसळले. जमिनीवरील एकासह १२५ ठार. एकविसावे शतक २००४ - ईजिप्तच्या फ्लॅश एरलाइन्स फ्लाइट ६०४ हे बोईंग ७३७ प्रकारचे विमान लाल समुद्रात कोसळले. १४८ ठार. जन्म १०६ - सिसेरो, रोमन राजकारणी. ११९६ - त्सुचिमिकाडो, जपानी सम्राट. १८३१ - सावित्रीबाई फुले, आधुनिक भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका, समाजसुधारक, महात्मा जोतीराव फुले यांची पत्नी. १८८३ - क्लेमेंट ऍटली, ब्रिटीश पंतप्रधान. १८८६ - जॅक झुल्च, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू. १८९२ - जे.आर.आर.टोकियेन, ब्रिटीश लेखक व भाषाशास्त्री, लॉर्ड ऑफ द रिंग्ज या पुस्तकत्रयीचा लेखक. १९१७ - कर्तारसिंग दुग्गल, पंजाबी साहित्यिक. १९२१ - चेतन आनंद, हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक १९२२ - कीरत चोइथराम बाबाणी, सिंधी साहित्यिक. १९३१ - यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहाससंशोधक. १९६९ - मायकेल शुमाकर, फॉर्म्युला १ चालक. १९७१ - आमेर नझीर, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. मृत्यू ७२२ - गेमेई, जपानी सम्राज्ञी. १३२२ - फिलिप पाचवा, फ्रांसचा राजा. १४३७ - व्हाल्वाची कॅथेरीन, इंग्लंडचा राजा हेन्री पाचवा, इंग्लंड याची पत्नी. १५४३ - हुआन रोद्रिगेझ काब्रियो, पोर्तुगालचा शोधक. १९६७ - जॅक रूबी, ली हार्वे ऑस्वाल्डचा मारेकरी. १९७५ - ललित नारायण मिश्रा, भारतीय रेल्वेमंत्री, राजकारणी.बिहारमधील समस्तीपूर रेल्वे स्थानकावरील बॉम्बहल्यात जखमी झालेले रेल्वेमंत्री ललितनारायण मिश्रा यांचे निधन. १९८२ - अब्राहम डेव्हिड, भारतीय अभिनेता. १९९४ - अमरेंद्र गाडगीळ, मराठी बाल-कुमार लेखक. १९९८ - केशव विष्णू बेलसरे,तथा "बाबा" बेलसरे , मराठी तत्त्वज्ञानी,श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य २००० - डॉ. सुशीला नायर, स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर. २००१ - सुशीला नायर, भारतीय आरोग्यमंत्री, भारतीय राजकारणी. २००२ - फ्रेडी हाइनिकेन, डच बियर उद्योगपती. २००२ - सतीश धवन, भारतीय अंतराळशास्त्रज्ञ. २००५ - जे.एन.दिक्षित, भारतीय राजकारणी. २०१३ - एम. एस. गोपालकृष्णन, भारतीय व्हायोलिनवादक. २०१५ - सरिता पदकी, मराठी लेखिका. प्रतिवार्षिक पालन ऑक्युपेशन थेरपी दिन बालिका दिन (सावित्रीबाई फुले जन्म दिन) महिला मुक्तिदिन मूलभूत कर्तव्यपालन दिन वर्धापनदिन : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे, अ‍ॅपल. जानेवारी १ - जानेवारी २ - जानेवारी ३ - जानेवारी ४ - जानेवारी ५ - (जानेवारी महिना) बाह्य दुवे वर्ग:दिवस वर्ग:ग्रेगरी दिनदर्शिका वर्ग:आंतरराष्ट्रीय दिनदर्शिका वर्ग:लाल दुवे असणारे लेख
जानेवारी ५
https://mr.wikipedia.org/wiki/जानेवारी_५
ठळक घटना आणि घडामोडी पंधरावे शतक १४६३ - कवि फ्रांस्वा व्हियोंची पॅरिसमधून हकालपट्टी. १४७७ - नॅन्सीची लढाई - चार्ल्स द बोल्डचा मृत्यू. बरगंडी फ्रांसमध्ये समाविष्ट. सतरावे शतक १६६४ - छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या सीमेवरून तेथील सुभेदार इनायत खानकडून खंडणीची मागणी केली. १६७१ - छत्रपती शिवाजी महाराजांनी साल्हेर मुघलांकडून काबीज केले.छत्रपती शिवाजी महाराज आणि मोरोपंत पिंगळे यांनी साल्हेरच्या किल्ल्यास वेढा घालून किल्ला जिंकून घेतला १६७५ - कोल्मारची लढाई - फ्रेंच सैन्याने ब्रांडेनबर्गला हरविले. अठरावे शतक १७५९ - जॉर्ज वॉशिंग्टन व मार्था डॅंड्रिज कर्टिसचे लग्न. १७८१ - अमेरिकन क्रांती - बेनेडिक्ट आर्नोल्डच्या ब्रिटीश नौदलाने रिचमंड, व्हर्जिनिया जाळले. एकोणिसावे शतक १८३२ - दर्पण या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित. १८५४ - सान फ्रांसिस्को जहाज बुडाले. ३०० ठार. १८९६ - विल्हेल्म रॉन्ट्जेनने विशिष्ट प्रकारचे किरणोत्सर्गत्त्व शोधल्याचे ऑस्ट्रियाच्या दैनिकात प्रसिद्ध झाले. या किरणोत्सर्गाला पुढे क्ष-किरण असे नाव दिले गेले. विसावे शतक १९०९ - कोलंबियाने पनामाचे स्वातंत्र्य मान्य केले. १९१४ - फोर्ड मोटर कंपनीने आठ तासांचा दिवस व ५ डॉलर प्रती दिवशीचा पगार जाहीर केला. याआधी कामगारांना ठरावीक तासांचे काम करणे भाग नसे. १९१९ - जर्मनीत जर्मन कामगारांच्या शांततेसाठीची मुक्त समिती स्थापन झाली. याचेच पुढे नाझी पक्षात रूपांतर झाले. १९२४ - महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्यांसाठी खुले केले. १९३३ - सान फ्रांसिस्कोच्या खाडीवर गोल्डन गेट ब्रिजचे बांधकाम सुरू झाले. १९४१ - दुसरे महायुद्ध - लिब्यातील बार्डिया इथे २५००० इटालियन सैनिकांनी दोस्तसैन्यापुढे शरणागती पत्करली. १९४८ - वॉर्नर ब्रदर्सनी प्रथम रंगीत सिनेमाचे प्रदर्शन केले. १९४९ - पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही संस्था सुरू झाली. १९५७ - भारतात विक्रीकर कायदा लागू झाला. १९६८ - अलेक्झांडर दुब्चेक चेकोस्लोव्हेकियाच्या राष्ट्राध्यक्षपदी. चेकोस्लोव्हेकियामध्ये प्राग वसंत सुरू. १९७२ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने स्पेस शटल कार्यक्रम सुरू करण्याचा हुकूम दिला. १९७४ - अंटार्क्टिकामधील सर्वोच्‍च तापमानाची (१५º सेल्सियस) नोंद झाली. १९७५ - ऑस्ट्रेलियातील टास्मानियाच्या टास्मान ब्रिजला खनिजवाहू जहाज लेक इलावाराने धडक दिली. १२ ठार. १९७६ - कंबोडियाने नाव बदलले. नवीन नाव काम्पुचियाचे गणराज्य. १९८४ - रिचर्ड स्टॉलमनने ग्‍नूवर काम सुरू केले. १९९३ - तेलवाहू जहाज एम.व्ही.ब्रेर शेटलंड बेटांवर किनाऱ्यास घसटले. ८४,७०० टन खनिज तेल समुद्रात. १९९७ - रशियाने चेचन्यातून सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली. एकविसावे शतक २००४ - संभाजी ब्रिगेड या जातीयवादी संघटनेने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरावर हल्ला करून अनेक अनमोल व दुर्मिळ ग्रंथ फाडले. जन्म १५८७ - झु झियाके, चीनी लेखक व शोधक. १५९२ - शहाजहान, भारतातील मोगल सम्राट. १७७९ - झेब्युलोन पाईक, अमेरिकन शोधक. १८४६ - रुडॉल्फ क्रिस्टॉफ युकेन, जर्मन लेखक, नोबेल पारितोषिक विजेता. १८५५ - किंग कॅम्प जिलेट, अमेरिकन शोधक.सेफ्टी रेझर तयार करून प्रथम बाजारात आणणारा. १८६८ - गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू, मराठी संतकवी. १८६९ - वेंकटेश तिरको कुलकर्णी, कन्नड साहित्यिक . १८८३ - खलील जिब्रान, अरब कवी, तत्त्वज्ञानी व चित्रकार. १८९२ - कृ.पां. कुळकर्णी मराठी भाषेचे अभ्यासक. १८९३ - परमहंस योगानंद, भारतीय तत्त्वज्ञानी. १९१३ - श्रीपाद नारायण पेंडसे, मराठी साहित्यिक. १९२० - मोहम्मद अस्लम, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. १९२२ - मोहम्मद उमर मुक्री, हिंदी विनोदी चरित्र अभिनेता. १९२५ - रमेश मंत्री, मराठी साहित्यिक . १९२८ - विजय तेंडुलकर, मराठी साहित्यिक . १९२८ - झुल्फिकार अली भुट्टो, पाकिस्तानी अध्यक्ष, पंतप्रधान. १९२८ - वॉल्टर मॉन्डेल, अमेरिकन राजकारणी. १९२८ - इम्तियाझ अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. १९३८ - पहिला हुआन कार्लोस स्पेनचा राजा. १९४१ - मन्सूर अली खान पतौडी, भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, पतौडी संस्थानाचा नववा व अखेरचा नवाब. १९४१ - बॉब क्युनिस, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू. १९४८ - पार्थसारथी शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९४८ - फैय्याज अभिनेत्री व गायिका. १९५१ - एझ्रा मोझली, वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू. १९५५ - ममता बॅनर्जी, बंगाली नेत्या. १९६१ - ना. धों. ताम्हणकर कथालेखक, कादंबरीकार व बाल साहित्यकार. १९६२ - ब्रॅंन्डन कुरुप्पु, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. १९७७ - जमालुद्दीन अहमद, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू. १९८१ - मार्लोन सॅम्युएल्स, वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू. १९८६ - दीपिका पदुकोण – कन्नड, हिंदी आणि तामिळ चित्रपट अभिनेत्री. मृत्यू ८४२ - अल मुतासिम, अब्बासी खलिफा. १५८९ - मेदिचीची कॅथेरीन, फ्रान्सचा राजा हेन्री दुसरा याची पत्नी. १६५५ - पोप इनोसंट दहावा. १७६२ - रशियाची एलिझाबेथ, रशियाची साम्राज्ञी. १८४७ - त्यागराज, कर्नाटक संगीताचे रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ व गायक. १९३३ - कॅल्विन कूलिज, अमेरिकेचा २९वा अध्यक्ष. १९४३ - जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, अमेरिकन शिक्षणतज्ञ, वनस्पतिशास्त्रज्ञ. १९८२ - रामचंद्र चितळकर उर्फ सी.रामचंद्र, भारतीय संगीतकार. १९८४ - सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, वेदशास्त्र अभ्यासक, चरित्रकोशकार. १९९० - रमेश बहल, चित्रपट निर्माता व दिग्दर्शक. १९९२ - द.ग. गोडसे, मराठी समीक्षक , नाटककार, इतिहासकार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार २००३ - गोपालदास पानसे, पखवाजवादक. प्रतिवार्षिक पालन पक्षी दिन - अमेरिकेची संयुक्त संस्थाने संदर्भ जानेवारी ३ - जानेवारी ४ - जानेवारी ५ - जानेवारी ६ - जानेवारी ७ - (जानेवारी महिना) बाह्य दुवे वर्ग:दिवस वर्ग:ग्रेगरी दिनदर्शिका वर्ग:आंतरराष्ट्रीय दिनदर्शिका वर्ग:लाल दुवे असणारे लेख
जानेवारी ४
https://mr.wikipedia.org/wiki/जानेवारी_४
ठळक घटना आणि घडामोडी नववे शतक ८७१ - रीडिंगची लढाई - वेसेक्सचा एथेलरेड डेन्मार्कच्या आक्रमकांकडून पराभूतhttp://en.wikipedia.org/wiki/Battle_of_Reading_%28871%29. पंधरावे शतक १४९३ - क्रिस्टोफर कोलंबस आपल्या पहिल्या सफरीच्या अंती नव्या जगातून परत निघाला. सतरावे शतक १६४२ - इंग्लिश गृहयुद्ध - चार्ल्स पहिल्याने ब्रिटिश संसदेवर हल्ला केला. अठरावे शतक १७१७ - नेदरलँड्स, इंग्लंड व फ्रान्सने तिहेरी तह केला. १७६२ - इंग्लंडने स्पेन व नेपल्स विरुद्ध युद्ध पुकारले. एकोणिसावे शतक १८४७ - सॅम्युअल कॉल्टने अमेरिकन सरकारला पहिले रिव्हाॅल्व्हर पिस्तूल विकले. १८८१ - लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले. १८८५ डॉ. विल्यम डब्ल्यू. ग्रँट यांनी मेरी गार्टसाईड या रुग्णावर आंत्रपुच्छ काढून टाकण्याची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया केली. १८९६ - युटाह अमेरिकेचे ४५वे राज्य झाले. विसावे शतक १९२६ - लखनौ येथे भारतीय क्रांतिकारकांवर काकोरी खटल्याच्या सुनावणीस सुरुवात. १९४४ - अॅडोल्फ हिटलरने जर्मनीतील १० वर्षावरील सर्व मुलामुलींना राष्ट्राच्या युद्धसेवेत दाखल करून घेण्याबद्दलचा वटहुकूम काढला. १९४८ - म्यानमार(तत्कालीन बर्मा)ला युनायटेड किंग्डमकडून स्वातंत्र्य. १९५१ - कोरियन युद्ध - चीन व उत्तर कोरियाच्या सैन्याने सेऊल काबीज केले. १९५२ - ब्रिटिश सैन्याने सुएझ कालव्याची नाकेबंदी केली. १९५४ - मेहेरचंद महाजन भारताच्या सरन्यायाधीशपदी. १९५८ - स्पुतनिक १, पहिला मानवनिर्मित उपग्रह पृथ्वीवर पडला. १९५८ - एडमंड हिलरी दक्षिण ध्रुवावर पोहोचले. १९५९ - रशियाचे अंतराळयान, लुना १, चंद्राच्या जवळ पोचले. १९६२ - न्यू यॉर्कमध्ये चालकरहित रेल्वे सुरू झाली. १९६४ - वाराणसी येथे भारतातील पहिले डिझेल रेल्वे इंजिन येथे तयार झाले. १९७४ - अमेरिकेची सेनेटच्या वॉटरगेट समितीने मागितलेली कागदपत्रे देण्यास अध्यक्ष रिचर्ड निक्सनने नकार दिला. १९८९ - अमेरिकन नौदलाच्या २ एफ.१४टॉमकॅट विमानांनी लिबियाची २ मिग २३ फ्लॉगर विमाने पाडली. १९९० - पाकिस्तानच्या सिंध प्रांतात प्रवासी रेल्वे थाबलेल्या मालगाडीवर आदळली. ३०० ठार. १९९६ - चंद्रकांत खोत यांच्या बिंब प्रतिबिंब या कादंबरीला कोलकता येथील भारतीय भाषा परिषदेचा पुरस्कार. १९९९ - पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये एका शिया मशिदीवर नमाजादरम्यान गोळीबार. १६ ठार, २५ जखमी. एकविसावे शतक २००४ - मिखाइल साकाश्विली जॉर्जियाच्या अध्यक्षपदी. २००४ - नासाची मानवरहित गाडी, स्पिरिट, मंगळावर उतरली. २००७ - नान्सी पेलोसी अमेरिकेच्या हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्जची सभापती असणारी प्रथम स्त्री ठरली. २०१० - बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीचे दुबईमध्ये उद्‍घाटन झाले. जन्म १०७६ - झ्हेझॉॅंग, सॉंग वंशाचा चिनीसम्राट. १६४३ - सर आयझॅक न्यूटन, इंग्लिश शास्त्रज्ञ व तत्त्वज्ञानी. १८०९ - लुई ब्रेल दृष्टिहीनांसाठी 'ब्रेल लिपी' तयार करणारा. १८१३ - आयझॅक पिट्समन लघुलिपी(शॉर्टहॅंड) तयार करणारा. १८४८ - कात्सुरा तारो, जपानी पंतप्रधान. १९०० - जेम्स बॉंड, अमेरिकन पक्षीिास्त्रज्ञ. १९०९ - प्रभाकर पाध्ये, मराठी नवसाहित्यिक. १९१४ - इंदिरा संत, मराठी कवियत्री. १९२४ - विद्याधर गोखलेनाटककार,खासदार,लेखक संपादक. १९२५ - प्रदीप कुमार, हिंदी व बंगाली चित्रपटअभिनेता. १९३७ - सुरेंद्रनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९४० - श्रीकांत सिनकर, मराठी कादंबरीकार. १९४१ - कल्पनाथ राय, केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार (३ वेळा), लोकसभा खासदार (४ वेळा), काँग्रेसचे नेते. १९५३ - जॉर्ज टेनेट, अमेरिकन गुप्तहेर यंत्रणा, सी.आय.एचा प्रमुख. मृत्यू १२४८ - सांचो दुसरा, पोर्तुगालचा राजा. १५६४ - होसोकावा उजित्सुना, जपानी सेनापती. १६९५ - फ्रांस्वा हेन्रि दि मोंतमोरेंसी-बुतेव्हिल, फ्रान्सचा सेनापती. १८३१ - जेम्स मन्रो, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष. १८५१ - दुसरे बाजीराव पेशवे कानपूरजवळ ब्रह्मावर्त येथे निधन. १८७७ - कोर्नेलियस व्हान्डरबिल्ट, अमेरिकन उद्योगपती. १९०७ - गोवर्धनराम त्रिपाठी 'सरस्वतीचंद्र' या गुजराती कादंबरीचे लेखक. १९०८ - राजारामशास्त्री भागवत विचारवंत व संस्कृत पंडित.विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत, शिक्षणविषयक स्वतंत्र ध्येये असल्यामुळे त्यांनी १८८४ मध्ये बॉम्बे हायस्कूल आणि पुढे मराठा हायस्कूल काढले. हिन्दुधर्म विवेचक पत्राचे ते काही वर्षे संपादक होते. १९६५ - टी.एस.इलियट, अमेरिकन साहित्यिक. १९९४ - राहुल देव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार २००६ - मक्तूम बिन रशीद अल् मक्तूम, दुबईचा शेख वसंयुक्त अरब अमिरातीचा पंतप्रधान. प्रतिवार्षिक पालन आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन स्वातंत्र्यदिन : म्यानमार (१९४८) संदर्भ जानेवारी २ - जानेवारी ३ - जानेवारी ४ - जानेवारी ५ - जानेवारी ६ - (जानेवारी महिना) बाह्य दुवे वर्ग:दिवस वर्ग:ग्रेगरी दिनदर्शिका वर्ग:आंतरराष्ट्रीय दिनदर्शिका वर्ग:लाल दुवे असणारे लेख
मार्च १
https://mr.wikipedia.org/wiki/मार्च_१
ठळक घटना इ.स.पू. पहिले शतक ८६ - लुसियस कोर्नेलियस सुलाच्या नेतृत्वाखाली रोमन सैन्य अथेन्समध्ये घुसले व तेथील राज्यकर्ता ऍरिस्टियोनला पदच्युत केले. सोळावे शतक १५६२ - फ्रांसमधील वासी शहरात कॅथोलिक जमावाने १,००हून अधिक हुगेनो व्यक्तिंना मारले. १५६५ - ब्राझिलमध्ये रियो दि जानेरो शहराची स्थापना. सतरावे शतक १६४० - ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मद्रासमध्ये व्यापारी ठाणे उघडले. एकोणिसावे शतक १८०३ - ओहायो अमेरिकेचे १७वे राज्य झाले. १८१५ - एल्बाहून सुटका करून घेउन नेपोलियन बोनापार्ट फ्रांसला परतला. १८४० - ऍडोल्फ थियेर्स फ्रांसच्या पंतप्रधानपदी. १८६७ - नेब्रास्का अमेरिकेचे ३७वे राज्य झाले. १८६९ - रावजी श्रीधर गोंधळेकर यांनी जगदहितेच्छु नावाचे पत्र सुरू केले शिवरामपंत परांजपे यांचे काळपत्र सुरुवातीला जगदहितेच्छूच्या छापखान्यात छापले जायचे. १८७२ - यलोस्टोन नॅशनल पार्क जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान झाले. १८७३ - ई. रेमिंग्टन अँड सन्सनी पहिले टंकलेखन यंत्र विकण्यास सुरुवात केली. १८९६ - अडोवाची लढाई - इथियोपियाच्या सैन्याने इटलीला हरवले. १८९६ - आंत्वान हेन्री बेकरेलने किरणोत्सर्गाचा शोध लावला. विसावे शतक १९०७ - टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची स्थापना झाली. १९१२ - आल्बर्ट बेरी हा विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारणारा सर्वप्रथम व्यक्ति ठरला. १९१८ - जर्मन पाणबुडीने रॅथलिन बेटाजवळ इंग्लंडचे एच.एस.एस. कॅल्गारियन हे जहाज बुडवले. १९३२ - चार्ल्स लिंडबर्गचा मुलगा चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग तिसरा याचे अपहरण झाले. १९३६ - हूवर धरणाचे बांधकाम समाप्त. १९४१ - बल्गेरियाने जर्मनी व इटलीशी संधी केली. १९४६ - बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयकरण. १९४७ - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कामकाजास सुरुवात झाली १९४८ - गुवाहाटी उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली. १९४९ - इंडोनेशियाने जावा बेटावरील योग्यकर्ता प्रांत बळकावला. १९५३ - जोसेफ स्टालिनला पक्षाघाताचा झटका. १९५४ - अमेरिकेने बिकिनी बेटावर अणूबॉम्बचा स्फोट घडवला. आसपासच्या भागात प्रचंड प्रमाणात किरणोत्सर्ग फैलावले. १९६१ - अमेरिकेत शांति दलाची स्थापना. १९६२ - अमेरिकन एरलाइन्स फ्लाइट १ हे विमान न्यू यॉर्कजवळ कोसळले. १९६९ - नवी दिल्ली व कलकत्त्यामध्ये धावणारी पहिली राजधानी एक्सप्रेस ही अतिजलद रेल्वेगाडी सुरू झाली १९७१ - पाकिस्तानच्या अध्यक्ष याह्या खानने नॅशनल असेम्ब्ली(संसद)ची बैठक अनिश्चित काळासाठी तहकूब केली. १९७८ - स्वित्झर्लंडमधील चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली. १९९८ - जगभरात एकूण १ अब्ज डॉलर पेक्षा जास्त कमाई करणारा टायटॅनिक हा पहिला चित्रपट झाला. १९९९ - १३३ देशांनी भूसुरूंगावर बंदी घालणारा करार केला. एकविसावे शतक २००१ - भारत हा एक अब्ज पेक्षा अधिक लोकसंख्या असलेला चीनमागोमाग दुसरा देश झाला.. २००२ - स्पेनने पेसेटा हे चलन सोडून देऊन यूरो हे चलन स्वीकारले. २००४ - मोहम्मद बह्र अल-उलुम इराकच्या राष्ट्राध्यक्षपदी. २००६ - ताऱ्या हेलोनेन फिनलंडच्या राष्ट्राध्यक्षपदी. जन्म १८१० - फ्रेडरिक चॉपिन, पोलिश संगीतकार. १८८८ - इवार्ट ऍस्टील, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९१० - डेव्हिड निवेन, इंग्लिश अभिनेता. १९१४ - भानुदास श्रीधर परांजपे, मराठी कथाकार, समीक्षक. १९१७ - करतार सिंह दुग्गल, पंजाबी, हिंदी आणि उर्दू साहित्यिक. १९१८ - होआव गुलार्ट, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष. १९२२ - यित्झाक राबिन, इस्रायेलचा पंतप्रधान. १९३० - कोइंबताराव गोपीनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९३० - राम प्रसाद गोएंका, भारतीय उद्योजक. १९४२ - रिचर्ड मायर्स, अमेरिकन सेनापती. १९४४ - बुद्धदेव भट्टाचार्य, पश्चिम बंगालचे ७वे मुख्यमंत्री. १९५० - शहीद इस्रार, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. १९५१ - नितीश कुमार, केंद्रीय रेल्वेमंत्री व बिहारचे २२वे मुख्यमंत्री. १९५३ - बंदुला वर्णपुरा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. १९५८ - वेन बी. फिलिप्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९६१ - सज्जाद अकबर, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. १९६५ - अर्चना जोगळेकर, मराठी अभिनेत्री. १९६८ - कुंजारानी देवी, भारतीय महिला भारोत्तोलक. १९६८ - सलिल अंकोला, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९६८ - संजीवा वीरासिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. १९६९ - आझम खान , पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. १९७१ - झहूर इलाही, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. १९७१ - अनिसुर रहमान, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू. १९८० - शहीद आफ्रिदी, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. १९८१ - तिलन तुषारा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. १९८३ - मेरी कोम, भारतीय मुष्टियोद्धा. मृत्यू ११३१ - स्टीवन दुसरा, हंगेरीचा राजा. १७९२ - लिओपोल्ड दुसरा, पवित्र रोमन सम्राट. १९५५ - नारायण सदाशिव मराठे तथा केवलानंद सरस्वती, महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक. १९८८ - सोहन लाल द्विवेदी, हिंदी कवी. १९८९ - वसंतदादा पाटील, महाराष्ट्राचे ५वे आणि ९वे मुख्यमंत्री. १९९१ - एडविन लॅंड, अमेरिकन संशोधक. १९९४ - मनमोहन देसाई, हिंदी चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक. १९९९ - दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा दत्तमहाराज कवीश्वर, वेदविद्येचे आणि संस्कृतचे अभ्यासक, वेदांती पंडित. २००३ - गौरी देशपांडे, मराठी लेखिका. २०१४ - प्रफुल्ला डहाणूकर, मराठी चित्रकार. २०१७ - तारक मेहता, गुजराती लेखक. प्रतिवार्षिक पालन स्वांतत्र्य आंदोलन दिन - दक्षिण कोरिया. जागतिक संरक्षण दिन बाह्य दुवे फेब्रुवारी २८ - फेब्रुवारी २९ - मार्च १ - मार्च २ - मार्च ३ - (मार्च महिना) वर्ग:दिवस वर्ग:ग्रेगरी दिनदर्शिका वर्ग:आंतरराष्ट्रीय दिनदर्शिका वर्ग:लाल दुवे असणारे लेख
एप्रिल १
https://mr.wikipedia.org/wiki/एप्रिल_१
एप्रिल महिन्यात भारतात (बहुधा) कडक उन्हाळा असतो. त्या काळात चैत्र-वैशाख हे हिंदू महिने असतात. ठळक घटना आणि घडामोडी सहावे शतक ५२७ - बायझेन्टाईन सम्राट जस्टिन पहिला याने स्वतःचा भाचा जस्टीनियन पहिला यास आपला वारसदार घोषित केले. सतरावे शतक १६६९ - उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी मुघल सम्राट औरंगजेबने विशेष फौज तैनात केली. एकोणिसावे शतक १८२६ - इंटर्नल कंबस्चन इंजिनासाठी सॅम्युएल मोरी याला पेटंट. १८६९ - भारतात नवा घटस्फोटाचा कायदा लागू. १८८७ - मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली. विसावे शतक १९१२ - भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला हलवणार अशी अधिकृत सूचना जारी. १९२२ - भारतात आयकर लागू झाला. १९२८ - पुणे वेधशाळेच्या कामकाजास प्रारंभ झाला. यापूर्वी हवामानखात्याचे कामकाज सिमला येथून चालत असे. त्यामुळे पुण्यातील या वेधशाळेला ’सिमला ऑफिस’ असे म्ह्टले जाते. १९३३ - भारतीय वायुसेनेच्या पहिल्या विमानाचे कराची येथे उड्डाण. १९३५ - भारतीय रिझर्व बँकेची स्थापना. १९३६ - ओरिसा राज्याची स्थापना झाली. १९५४ - भारतातल्या फ्रेंच वसाहती भारताच्या नियंत्रणाखाली आल्या. १९५५ - गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरून प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती. १९५७ - भारतात दशमान पद्धतीची नाणी-नोटा प्रमाणित (१ रुपया =१०० नवे पैसे). त्यानुसार पोस्टाची तिकीटेही जारी. १९६९ - भारताचे पहिले अणुउर्जा केंद्र तारापूर येथे सुरू झाले. १९७३ - कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरुवात झाली. १९९० - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्‍न पुरस्कार जाहीर झाला. १९९७ - हेल-बॉप धूमकेतू सूर्याच्या सगळ्यात जवळ. एकविसावे शतक २००४ - गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली. जन्म १२२० - गो-सागा, जपानी सम्राट. १६२१ - गुरू तेगबहादूर – शिखांचे नववे गुरू, १८८९ - केशव बळीराम हेडगेवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक. १९०७ - शिवकुमार स्वामी, भारतीय धार्मिक नेते व समाजसेवक १९१२ - शिवरामबुवा दिवेकर (हिन्दगंधर्व) - भारतीय शास्त्रीय गायक १९३६ - तरुण गोगोई – आसामचे मुख्यमंत्री १९३७ - मोहम्मद हमीद अन्सारी - भारताचे १३वे उपराष्ट्रपति १९४१ - अजित वाडेकर, भारतीय क्रिकेट संघाचे नायक, मृत्यू १०८५ - शेन्झॉॅंग, चीनी सम्राट. १९८४ - पं नारायणराव व्यास, ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक १९८९ - एस. एम. जोशी, कामगार नेते व संयूक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू १९९९ - श्रीराम भिकाजी वेलणकर, भारतीय टपालखात्याच्या ’पिन कोड’ प्रणालीचे जनक २००० - संजीवनी मराठे, कवयित्री २००३ - प्रकाश घांग्रेकर, गायक व नट २००६ - राजा मंगळवेढेकर, बालसाहित्यकार २०१२ - एन.के.पी. साळवे, भारतीय राजकारणी प्रतिवार्षिक पालन एप्रिल फूल्स दिन उत्कल दिवस, ओरिसा बाह्य दुवे मार्च ३० - मार्च ३१ - एप्रिल १ - एप्रिल २ - एप्रिल ३ - (एप्रिल महिना) वर्ग:लाल दुवे असणारे लेख
फेब्रुवारी १
https://mr.wikipedia.org/wiki/फेब्रुवारी_१
ठळक घटना सतरावे शतक १६६२ - ९ महिने वेढा घातल्यावर चीनच्या सेनापती कॉक्सिंगाने तैवान जिंकले. अठरावे शतक १७९० - न्यू यॉर्कमध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सत्र सुरू झाले. १७९३ - फ्रांसने नेदरलँड्स व युनायटेड किंग्डम विरुद्ध युद्ध पुकारले. एकोणिसावे शतक १८१४ - फिलिपाईन्सच्या मेयोन ज्वालामुखीचा उद्रेक १,२०० ठार. १८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - टेक्सास अमेरिकेपासून विभक्त झाले. १८८४ - ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित. तेव्हापासून ऑक्सफर्डच्या कोशांचे काम अव्याहतपणे चालूच आहे. विसावे शतक १९०८ - पोर्तुगालचा राजा कार्लोस पहिला व राजकुमार लुइस फिलिपेची हत्या. १९१२ - कवी बी (नारायण मुरलीधर गुप्ते) यांची "चाफा " ही कविता मनोरंजन मासिकात प्रसिद्ध झाली. १९२० - कॅनडात रॉयल केनेडियन माउंटेड पोलिस तथा माउंटीज् या पोलीस संघटनेची स्थापना. १९४३ - दुसरे महायुद्ध - नाझी सैन्याने व्हिडकुन क्विस्लिंगला नॉर्वेच्या पंतप्रधानपदी बसवले. १९४६ - नॉर्वेच्या त्रिग्वे लीची संयुक्त राष्ट्रांच्या प्रथम सरचिटणीस पदी निवड. १९६२ - मराठा रेजिमेंट सिक्सची स्थापना १९७४ - साओ पाउलो, ब्राझिलमध्ये कार्यालये असलेल्या ईमारतीला आग. १८९ ठार, २९३ जखमी. १९७९ - रुहोल्ला खोमेनी १५ वर्षांनी परत ईराणमध्ये आला. १९८१ - ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंडमधील क्रिकेट एक दिवसीय सामन्यात शेवटच्या चेंडुवर न्यू झीलंडला ६ धावा हव्या असताना ग्रेग चॅपलने आपला भाउ ट्रेव्हर चॅपलला अंडरआर्म फेकी करण्यास सांगितले. ट्रेव्हरने तसे केले, ऑस्ट्रेलिया सामना जिंकले परंतु यानंतर अंडरआर्म फेकी बेकायदा ठरवण्यात आली. १९९१ - लॉस एंजेलस आंतरराष्ट्रीय विमानतळावर यु.एस. एरचे विमान दुसऱ्या छोट्या विमानाला धडकले. ३५ ठार. १९९२ - भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अँडरसनला फरारी घोषित केले. एकविसावे शतक २००२ - आयर्लंडमधील शांतता प्रक्रियेला चालना देणाऱ्या 'गुड फ्रायडे' कराराचे शिल्पकार जॉन ह्यूम यांना राष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा गांधी शांतता पुरस्कार प्रदान. २००३ - अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट. सात अंतराळवीर मृत्युमुखी. २००४ - मक्केत हज चालु असताना चेंगराचेंगरीत २४४ ठार. जन्म १८८१ - टिप स्नूक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू. १८८२ - लुई स्टीवन सेंट लॉरें, कॅनडाचा १२वा पंतप्रधान. १८८४ - सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, प्राच्यविद्यापंडित, मराठी कोशकार. १९०१ - क्लार्क गेबल, अमेरिकन अभिनेता. १९०४ - बाबूराव घोलप , शिक्षणमहर्षी १९१० - जहांगीर खान, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९१२ - राजा नीलकंठ बढे, मराठी कवी. १९२२ - क्लिफर्ड मॅकवॉट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. १९२७ - म. द. हातकणंगलेकर, मराठी साहित्यिक. १९२९ - जयंतराव साळगावकर, ज्योतिषी, कालनिर्णयकार १९३० - शहाबुद्दीन अहमद, बांगलादेशी राष्ट्राध्यक्ष. १९३१ - बोरिस येल्त्सिन, रशियन राष्ट्राध्यक्ष. १९३१ - इयाजुद्दीन अहमद, बांगलादेशी राष्ट्राध्यक्ष. १९४२ - डेव्हिड सिनकॉक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९४४ - अरुण टिकेकर, मराठी पत्रकार. १९५० - नसीर मलिक, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. १९५८ - जॅकी श्रॉफ, भारतीय चित्रपट अभिनेता. १९६५ - डेव्ह कॅलाहन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू. १९६९ - महबुबुर रहमान, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू. १९७१ - अजय जडेजा, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९७२ - कर्टली ऍम्ब्रोझ, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. १९८१ - ग्रेम स्मिथ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू. १९८२ - शोएब मलिक, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. मृत्यू १३२८ - चार्ल्स चौथा, फ्रांसचा राजा. १५६३ - मेनास, इथियोपियाचा सम्राट. १६९१ - पोप अलेक्झांडर आठवा. १७३३ - ऑगस्टस दुसरा, पोलंडचा राजा. १९०८ - कार्लोस पहिला, पोर्तुगालचा राजा. १९८१ - डोनाल्ड विल्स डग्लस, सिनियर, अमेरिकन विमानतंत्रज्ञ. १९९५ - मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार. २००३ - स्पेस शटल कोलंबियातील अंतराळवीर - मायकेल पी. अँडरसन डेव्हिड ब्राउन कल्पना चावला लॉरेल क्लार्क रिक डी. हसबंड विली मॅककूल इलान रमोन प्रतिवार्षिक पालन शेती तंत्रज्ञान प्रसार दिन तटरक्षक दिन बाह्य दुवे जानेवारी ३० - जानेवारी ३१ - फेब्रुवारी १ - फेब्रुवारी २ - फेब्रुवारी ३ - (फेब्रुवारी महिना) वर्ग:दिवस वर्ग:ग्रेगरी दिनदर्शिका वर्ग:आंतरराष्ट्रीय दिनदर्शिका वर्ग:लाल दुवे असणारे लेख
मार्च २
https://mr.wikipedia.org/wiki/मार्च_२
ठळक घटना अठरावे शतक १७९१ - पॅरिसमध्ये सेमाफोर यंत्राचे प्रथमतः प्रात्यक्षिक. एकोणिसावे शतक १८३६ - टेक्सासच्या प्रजासत्ताकने स्वतःला मेक्सिको पासून स्वतंत्र जाहीर केले. १८४४ - विरेश्वर छत्रे यांनी मित्रोदय सुरू केले १८५५ - अलेक्झांडर दुसरा रशियाच्या झारपदी. १८५७ - मुंबई येथे जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स सुरू झाले. १८६१ - झार अलेक्झांडर दुसऱ्याने रशियातील गुलामगिरी बंद केली. १८७७ - राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी सॅम्युएल जे. टिल्डनला मताधिक्य असूनही अमेरिकन काँग्रेसने रदरफोर्ड बी. हेसला अध्यक्षपदी बसवले. . १८८८ - कॉॅंन्स्टेन्टिनोपलचा करार स्वीकृत. ईजिप्तने युद्ध वा शांतिकालात सुएझ कालव्यातून जहाजांना सुखरूप जाउ देण्याची हमी दिली. विसावे शतक १९१७ - रशियात झार निकोलस दुसऱ्याने पदत्याग केला. त्याचा भाउ मायकेल झारपदी. १९३९ - पायस बारावा पोपपदी. १९४३ - दुसरे महायुद्ध - बिस्मार्कच्या समुद्रातील लढाई. १९४६ - हो चि मिन्ह व्हियेतनामच्या अध्यक्षपदी. १९४९ - कॅप्टन जेम्स गॅलाघरने विमानातून विनाथांबा पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली. १९५५ - कंबोडियाच्या राजा नोरोदोम सिहानुकने पदत्याग केला. त्याचे वडील नोरोदोम सुरामारित राजेपदी. १९५६ - मोरोक्कोला फ्रांसपासून स्वातंत्र्य. १९६२ - म्यानमारमध्ये लश्करी उठाव. १९६९ - फ्रांसच्या तुलु शहरात स्वनातीत प्रवासी विमान कॉॅंकॉर्डची पहिली चाचणी. १९७० - ऱ्होडेशिया प्रजासत्ताक झाले. १९९१ - पहिले अखाती युद्ध - रमैलाची लढाई. १९९१ - एलटीटीई केलेल्या बॉम्बहल्ल्यात श्रीलंकेचे संरक्षण उपमंत्री ठार १९९२ - उझबेकिस्तान व मोल्डाव्हियाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश. आर्मेनिया, अझरबैजान, कझाकस्तान, किरगिझस्तान, मोल्दोव्हा, सॅन मरिनो, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान देश युनायटेड नेशन्स मध्ये सामील झाले. १९९५ - बारिंग्ज बँकच्या घोटाळ्यात निक लीसमला अटक. १९९६ - जॉन हॉवर्ड ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी. १९९८ - गॅलेलिओ अंतराळनिरीक्षकाने पाठवलेल्या माहितीवरून निश्चित झाले की गुरूच्या उपग्रह युरोपा वर बर्फाच्या आवरणाखाली समुद्र आहे. एकविसावे शतक २००१ - अफगाणिस्तानातील बामियान शहराजवळील सुमारे ६,००० प्राचीन बुद्ध मूर्ती धर्मबाह्य ठरवून मूलतत्त्ववादी तालिबानने उखळी तोफा आणि रणगाड्यांच्या साहाय्याने उद्‍ध्वस्त करण्यास सुरुवात केली. २००४ - इराकवरील अमेरिकन आक्रमण - अल कायदाने अशुराचा मुहुर्त साधून १७० व्यक्तिंची हत्या केली. ५०० जखमी. २००४ - संयुक्त राष्ट्रांचा शस्त्रनिरीक्षण संघाने ने जाहीर केले की १९९४ नंतर इराककडे अतिविनाशकारी शस्त्रास्त्रे नव्हती. २००६ - पाकिस्तानच्या कराची शहरात बॉम्बस्फोट. अमेरिकन राजदूतासह ५ ठार, ५० जखमी. २००६ - भारत आणि अमेरिकेत परमाणु करार केला गेला. जन्म १३१६ - रॉबर्ट दुसरा, स्कॉटलंडचा राजा. १४५९ - पोप एड्रियान सहावा. १७४२ - विश्वासराव पेशवे, मराठा सरदार. १७९३ - सॅम ह्युस्टन, टेक्सासच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष. १८१० - पोप लिओ तेरावा. १८५५ - एडमुंड पीट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १८७६ - पोप पायस बारावा. १९१२ - चुड लॅंग्टन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू. १९२३ - डॉन टेलर, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. १९२५: - शांता जोग, मराठी चित्रपट आणि रंगभूमी अभिनेत्री. १९३१ - मिखाईल गोर्बाचेव्ह, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष. १९३१ - राम शेवाळकर, मराठी साहित्यिक. १९३२ - बसंत सिंह खालसा, भारतीय राजकारणी. १९३७ - अब्देलअझीझ बुटेफ्लिका, अल्जीरियाचा राष्ट्राध्यक्ष. १९५७ - स्टु गिलेस्पी, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. १९६२ - जॉन बॉन जोव्ही, अमेरिकन रॉक संगीतकार. १९७७ - अँड्रु स्ट्रॉस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९७९ - दर्शना गमागे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. १९७९ - जिम ट्राउटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९७९ - मार्क व्हर्मुलेन, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू. १९८६ - जयंत तालुकदार, भारतीय तिरंदाज. मृत्यू ८५५ - लोथार, पवित्र रोमन सम्राट. १५६८ - मीरा रत्‍नसिंह राठोड ऊर्फ संत मीराबाई. १७०० - छत्रपती राजाराम, मराठा छत्रपती. १७३० - पोप बेनेडिक्ट तेरावा. १७९१ - जॉन वेस्ली, मेथोडिस्ट चर्चचा स्थापक. १८३५ - फ्रांसिस दुसरा, पवित्र रोमन सम्राट. १९२१ - निकोलस पहिला, मॉॅंटेनिग्रोचा राजा. १९३० - डी.एच. लॉरेन्स, इंग्लिश लेखक. १९४९ - सरोजिनी नायडू, भारतीय स्वातंत्र्यसैनिक. १९८६ - डॉ. काशिनाथ घाणेकर, मराठी चित्रपट अभिनेता. प्रतिवार्षिक पालन स्वांतत्र्य दिन - मोरोक्को. स्वांतत्र्य दिन - टेक्सास. बाह्य दुवे फेब्रुवारी २९ - मार्च १ - मार्च २ - मार्च ३ - मार्च ४ - (मार्च महिना) वर्ग:दिवस वर्ग:ग्रेगरी दिनदर्शिका वर्ग:आंतरराष्ट्रीय दिनदर्शिका वर्ग:लाल दुवे असणारे लेख
फेब्रुवारी २
https://mr.wikipedia.org/wiki/फेब्रुवारी_२
ठळक घटना दहावे शतक ९६२ - पोप जॉन बाराव्याने सुमारे ४० वर्षे रिक्त असलेल्या पवित्र रोमन सम्राट पदावर ऑट्टो पहिल्याला बसवले. अकरावे शतक १०३२ - पवित्र रोमन सम्राट कॉन्राड दुसरा बरगंडीचाही राजा झाला. बारावे शतक १११९ - कॅलिक्सटस दुसरा पोप पदी. सोळावे शतक १५३६ - स्पेनच्या पेद्रो दि मेंदोझाने आर्जेन्टिनात बॉयनोस एर्स वसवले. १५४२ - इथियोपियात पोर्तुगालच्या सैन्याने बासेन्तेचा गड जिंकला. सतरावे शतक १६५३ - अमेरिकेत न्यूऍम्स्टरडॅम गावाची स्थापना. पुढे याचे नाव बदलून न्यू यॉर्क ठेवण्यात आले. एकोणिसावे शतक १८४८ - ग्वादालुपे हिदाल्गोचा तह - मेक्सिको व अमेरिकेची संधी. १८७८ - ग्रीसने तुर्कस्तान विरुद्ध युद्ध पुकारले. १८८० - अमेरिकेत वाबाश, ईंडियाना येथे विजेवर चालणारा रस्त्यावरील दिवा सुरू. १८९७ - अमेरिकेत पेनसिल्व्हेनियाचा विधानसभा आगीच्या भक्ष्यस्थानी. विसावे शतक १९२५ - कुत्र्यांनी ओढलेल्या गाड्या नोम, अलास्का येथे डिप्थेरियाची लस घेउन पोचल्या. या घटनेतुन प्रेरणा घेउन इडिटारॉड स्लेड रेस सुरू झाली. १९३३ - ऍडोल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली. १९४३ - दुसरे महायुद्ध - स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण. १९५७ - गोवा मुक्तिसंग्राम : नानासाहेब गोरे,मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरुंगातून मुक्तता १९५७ - सिंधु नदी वरच्या गुड्डु बंधाऱ्याचे पाकिस्तानमध्ये भूमिपूजन. १९६२ - प्लुटो व नेपच्यून ग्रह ४०० वर्षांनी एका रेषेत. १९८९ - अफगाणिस्तानमधून शेवटचे सोवियेत सैनिक परतले. १९९८ - फिलिपाईन्समध्ये सेबु पॅसिफिक एरचे डी.सी. ९ जातीचे विमान कोसळले. १०४ ठार. एकविसावे शतक जन्म १२०८ - जेम्स पहिला, अरागॉनचा राजा. १४५५ - जॉन, डेन्मार्कचा राजा. १६४९ - पोप बेनेडिक्ट तेरावा. १८५६ - स्वामी श्रद्धानंद, आर्य समाजाचे प्रसारक. १८८२ - जेम्स जॉईस, आयरिश लेखक. १८८४ - डॉ.श्रीधर केतकर, महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे संपादक, समाजशास्त्रज्ञ १९०५ - आयन रॅंड, अमेरिकन लेखक. १९५४ - जयंत अमरसिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. १९६१ - ज्योई बेंजामिन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९६८ - अमिनुल इस्लाम, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू. १९६९ - इजाझ अहमद, ज्युनियर, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. मृत्यू १२५० - एरिक अकरावा, स्वीडनचा राजा. १४६१ - ओवेन ट्युडोर, इंग्लंडच्या ट्युडोर वंशाचा राजा. १७६९ - पोप क्लेमेंट तेरावा. १९१७ - महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, लोकमान्य टिळकांचे स्नेही, विख्यात वैद्य. १९३० - वासुदेव गोविंद आपटे, मराठी लेखक, पत्रकार. १९७० - बर्ट्रान्ड रसेल, ब्रिटीश गणितज्ञ व तत्त्वज्ञानी. १९८७ - ऍलिस्टेर मॅकलेन, स्कॉटिश लेखक. १९९५ - फ्रेड पेरी, इंग्लिश टेनिस खेळाडू. २००७ - विजय अरोरा, हिंदी चित्रपट अभिनेता. प्रतिवार्षिक पालन ग्राउंडहॉग दिन - अमेरिका आंतरराष्ट्रीय पाणथळ जागा दिवस श्रीलंका राष्ट्रीय दिन बाह्य दुवे जानेवारी ३१ - फेब्रुवारी १ - फेब्रुवारी २ - फेब्रुवारी ३ - फेब्रुवारी ४ - (फेब्रुवारी महिना) वर्ग:दिवस वर्ग:ग्रेगरी दिनदर्शिका वर्ग:आंतरराष्ट्रीय दिनदर्शिका वर्ग:लाल दुवे असणारे लेख
एप्रिल २
https://mr.wikipedia.org/wiki/एप्रिल_२
ठळक घटना आणि घडामोडी अठरावे शतक १६७९ - सम्राट औरंगजेबाने हिंदूवर जझिया कर लावला. अठरावे शतक १७५५ - ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने सुवर्णदुर्ग किल्ला जिंकला. एकोणसावे शतक १८७० - गणेश वासुदेव जोशी उर्फ ’’सार्वजनिक काका’’ यांच्या नेतृत्वाखाली पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली. १८९४ - छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला. विसावे शतक १९७० - मेघालय राज्याची रचना आसाममधून करण्यात आली. १९८२ - फॉकलंडचे युद्ध- आर्जेंटिनाने फॉकलंड बेटे जिंकली. १९८४ - सोयुझ टी-११ या अंतराळयानातुन राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले. तो ७ दिवस २१ तास व ४० मिनिटे अवकाशात होता. एकविसावे शतक २०११ - क्रिकेट संघाने २८ वर्षांनी क्रिकेट विश्वचषक जिंकला. २०१७ - जम्मू काश्मीरमधील चेनानी ते नशरी या भारतातील सर्वात मोठ्या बोगद्याचे उद्घाटन झाले. जन्म १८९८ - हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय, हिंदी चित्रपट अभिनेता, विजयवाडाचे खासदार. १९०२ - बडे गुलाम अली खाँ, पतियाळा घराण्याचे हिंदुस्तानी गायक व वीणावादक. १९२६ - सूर्यकांत रामचंद्र खांडेकर, मराठी कवी. १९४२ - रोशन सेठ, इंग्लिश चित्रपट अभिनेता. १९६९ - अजय देवगण, हिंदी चित्रपट अभिनेता १९८१ - कपिल शर्मा, भारतीय विनोदी नट. मृत्यू १७२० - पेशवे बाळाजी विश्वनाथ भट १८७२ - सॅम्युएल मॉर्स – ’मोर्स कोड’ व तारायंत्राचे जनक आणि चित्रकार १९३३ - के. एस. रणजितसिंहजी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९९२ - आगाजान बेग ऊर्फ आगा, हिंदी चित्रपट अभिनेता. २००९ - गजानन वाटवे, मराठी गायक व संगीतकार. प्रतिवार्षिक पालन जागतिक ऑटिझम जागरूकता दिन आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिन बाह्य दुवे मार्च ३१ - एप्रिल १ - एप्रिल २ - एप्रिल ३ - एप्रिल ४ - (एप्रिल महिना)
मार्च ३
https://mr.wikipedia.org/wiki/मार्च_३
ठळक घटना पहिले शतक ८६ - युजेनियस चौथा पोपपदी. सोळावे शतक १५७५ - मुगल बादशाह अकबरने तुकारोईच्या लढाईमध्ये बंगाली सेनेला पराभूत केले एकोणिसावे शतक १८४५ - फ्लोरिडा अमेरिकेचा २७वे राज्य झाले. १८६५ - हाँग काँग अँड शांघाय बँकिंग कार्पोरेशन (एचएसबीसी)ची स्थापना झाली. १८४९ - मिनेसोटाला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता. १८५७ - फ्रांस व युनायटेड किंग्डमने चीन विरुद्ध युद्ध पुकारले. १८६३ - आयडाहोला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता. १८७७ - फ्रांसच्या नागरिकांनी अमेरिकेला स्वतंत्रता देवीचा पुतळा भेट दिला. १८७८ - बल्गेरियाला ओट्टोमान साम्राज्यापासून स्वातंत्र्य. १८८५ - अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (एटीअँडटी)ची स्थापना झाली. विसावे शतक १९०४ - जर्मनीचा कैसर विल्हेम दुसऱ्याचा आवाज प्रथम मुद्रित केला गेला. १९१८ - पहिले महायुद्ध - ब्रेस्ट-लिटोव्स्कचा तह - युद्धातील रशियाचा सहभाग समाप्त. फिनलंड, लात्व्हिया, एस्टोनिया, पोलंड व लिथुएनियाच्या स्वतंत्र अस्तित्वाला मान्यता. १९२३ - टाइम नियतकालिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. १९३१ - अमेरिकेने स्टार स्पॅंगल्ड बॅनर या गीतास राष्ट्रगीताचा दर्जा दिला. १९३८ - सौदी अरेबियात खनिज तेल सापडले. १९३९ - गांधीजींनी मुंबईत आमरण उपोषण सुरू केले. १९४२ - दुसरे महायुद्ध - जपानी वायुदलाने पश्चिम ऑस्ट्रेलियातील ब्रूम गावावर बॉम्बफेक केली. १०० ठार. १९४३ - दुसरे महायुद्ध - लंडनमध्ये बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १७३ ठार. १९४५ - दुसरे महायुद्ध - आत्तापर्यंत तटस्थ असलेल्या फिनलंडने जर्मनी, जपान व मित्रदेशांविरुद्ध युद्ध पुकारले १९५३ - कॅनेडियन पॅसिफिक एरलाइन्सचे विमान पाकिस्तानच्या कराची शहराजवळ कोसळले. ११ ठार. १९५८ - नुरी अस सैद १४व्यांदा इराकच्या पंतप्रधानपदी. १९६१ - हसन दुसरा मोरोक्कोच्या राजेपदी. १९६६ - ब्रिटिश ओव्हरसीझ एरवेझचे बोईंग ७०७ जातीचे विमान जपानच्या माउंट फुजीवर कोसळले. १२४ ठार. १९६६ - डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे ६वे कुलगुरू झाले. १९७१ - भारत-पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली १९७३ - भारताच्या ओडिशा राज्यात राष्ट्रपती राजवट. १९७४ - तुर्कस्तानचे डी.सी.१० जातीचे विमान पॅरिसजवळ कोसळले. ३४६ ठार. १९८६ - ऑस्ट्रेलिया कायदा १९८६ अनुसार, ऑस्ट्रेलिया युनायटेड किंग्डम पासुन पूर्णपणे स्वतंत्र झाला. १९९१ - लॉस एन्जेल्सच्या पोलिसांचे रॉडनी किंग नावाच्या टॅक्सीचालकाला चोप देतानाचे चित्रीकरण केले गेले. १९९५ - सोमालियातून संयुक्त राष्ट्रांचे शांतिदल बाहेर पडले. एकविसावे शतक २००१ - अमेरिकन वायु दलाचे सी.२३ जातीचे विमान जॉर्जियात कोसळले. २१ ठार. २००५ - स्टीव्ह फॉसेटने ग्लोबल फायर या विमानातून एकट्याने आणि इंधन न भरता ६७ तासांत पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली. जन्म १४५५ - जॉन दुसरा, पोर्तुगालचा राजा. १८३९ - जमशेटजी टाटा, भारतीय उद्योगपती. १८४७ - अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल, स्कॉटिश संशोधक. १९२० - मुकुंद शंकरराव किर्लोस्कर, किर्लोस्कर मासिकाचे संपादक. १९२३ - प्रा. सदाशिव नथोबा आठवले, मराठी लेखक. १९२६ - रवि शंकर शर्मा उर्फ रवि, हिंदी चित्रपट संगीतकार. १९३० - इयोन इलेस्कु, रोमेनियाचा राष्ट्राध्यक्ष. १९३९ - एम.एल. जयसिंहा, भारतीय कसोटी क्रिकेट खेळाडू. १९५५ - जसपाल भट्टी, भारतीय अभिनेता. १९६७ - शंकर महादेवन, भारतीय संगीतकार. १९७६ - रायफलमॅन संजय कुमार, परमवीर चक्र विजेते भारतीय सैनिक १९७७ - अभिजित कुंटे, भारतीय ग्रँडमास्टर. मृत्यू ५६१ - पोप पेलाजियस पहिला. १७०० - छत्रपती राजाराम महाराज, मराठा साम्राज्याचे छत्रपती. १७०७ - औरंगजेब, मुघल सम्राट. १९१९ - हरी नारायण आपटे, मराठी कादंबरीकार. १९३७ - आमेलिया इअरहार्ट, अमेरिकन वैमानिक (बेपत्ता). १९४३ - जॉर्ज थॉम्पसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९६५ - अमीरबाई कर्नाटकी, हिंदी चित्रपट अभिनेत्री, गायिका, पार्श्वगायिका. १९६७ - स. गो. बर्वे, माजी अर्थमंत्री. १९७७ - अभिजित कुंटे - भारतीय ग्रॅंडमास्टर. १९८२ - रघुपती सहाय, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू शायर. १९९५ - पं. निखिल घोष, भारतीय तबला वादक १९९९ - गेऱ्हार्ड हर्झबर्ग, जर्मन रसायनशास्त्रज्ञ. २००० - रंजना देशमुख, मराठी चित्रपट अभिनेत्री. २००२ - जी.एम.सी. बालायोगी, भूतपूर्व लोकसभा अध्यक्ष. प्रतिवार्षिक पालन हिनामात्सुरी - जपान शहीद दिन - मलावी मुक्ति दिन - बल्गेरिया जागतिक वन्यजीव दिन जागतिक श्रवण शक्ती दिन बाह्य दुवे मार्च १ - मार्च २ - मार्च ३ - मार्च ४ - मार्च ५ - (मार्च महिना) वर्ग:दिवस वर्ग:ग्रेगरी दिनदर्शिका वर्ग:आंतरराष्ट्रीय दिनदर्शिका वर्ग:लाल दुवे असणारे लेख
एप्रिल ३
https://mr.wikipedia.org/wiki/एप्रिल_३
ठळक घटना आणि घडामोडी विसावे शतक इ.स. १९२७ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केले. १९४८ - ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना झाली. १९७३ - मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपर यांनी भ्रमणध्वनीद्वारे पहिले दूरभाषण केले. एकविसावे शतक २००० - आयएनएस आदित्य ही भारतीय बनावटीची तेलपूरक नौका भारतीय आरमारात रुजू झाली. २०१० - पहिला आयपॅड विकायवास काढला गेला. जन्म १३६७ - हेन्री चौथा, इंग्लंडचा राजा. १५२९ - मायकेल नियांडर, जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ. १५९३ - जॉर्ज हर्बर्ट, इंग्लिश कवी. १७८१ - स्वामीनारायण, भारतीय धर्मगुरू. १८८१ - ऍल्सिदे दि गॅस्पेरी, इटलीचा पंतप्रधान. १८८२ - द्वारकानाथ माधव पितळे उर्फ ’’नाथमाधव’’, मराठी लेखक. १९०३ - कमलादेवी चट्टोपाध्याय, भारती. स्वातंत्र्यसैनिक, मॅगसेसे पुरस्कार विजेत्या . १९०४ - रामनाथ गोएंका, भारतीय वृत्तपत्र प्रकाशक. १९१३ - पेर बॉर्टेन, नॉर्वेचा पंतप्रधान. १९१४ - फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ, भारतीय सेनापती. १९२६ - गस ग्रिसम, अमेरिकन अंतराळयात्री. १९३० - हेलमुट कोल, जर्मनीचा चान्सेलर. १९४२ - वेन न्यूटन, अमेरिकन संगीतकार. १९४६ - हॅना सुचोका, पोलंडची पहिली स्त्री पंतप्रधान. १९४८ - कार्लोस सलिनास, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष. १९५५ - हरिहरन, भारतीय गायक. १९५८ - ऍलेक बाल्डविन, अमेरिकन अभिनेता. १९५९ - डेव्हिड हाइड पीयर्स, अमेरिकन अभिनेता. १९६२ - जयाप्रदा, हिंदी चित्रपट अभिनेत्री व संसद सदस्य. १९६५ - नाझिया हसन, हिंदी पॉप गायिका. १९७३ - निलेश कुलकर्णी, भारतीय क्रिकेट खेळाडू . १९७३ - प्रभु देवा - भारतीय नर्तक, नृत्यदिग्दर्शक. १९८६ - अमांडा बैन्स, अमेरिकन अभिनेत्री. मृत्यू १२८७ - पोप ऑनरियस चौथा. १६८० - छत्रपती शिवाजीराजे भोसले. १६८२ - बार्तोलोमे एस्तेबान मुरियो, स्पॅनिश चित्रकार. १८८२ - जेस्सी जेम्स, अमेरिकन दरोडेखोर. १९८५ - महामहोपाध्याय डॉ. वासुदेव विष्णू मिराशी, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक. १८९७ - योहान्स ब्राह्म्स, जर्मन संगीतकार. १९४१ - पाल तेलेकी, हंगेरीचा पंतप्रधान. १९९१ - ग्रॅहाम ग्रीन, इंग्लिश लेखक. १९९१ - चार्ल्स गोरेन, अमेरिकन ब्रिज खेळाडू व लेखक. १९९६ - रॉन ब्राउन, अमेरिकन वाणिज्य सचिव. १९९८ - मेरी कार्टराइट, इंग्लिश गणितज्ञ. १९९८ - हरकिसन मेहता, गुजराती लेखक. प्रतिवार्षिक पालन बाह्य दुवे एप्रिल १ - एप्रिल २ - एप्रिल ३ - एप्रिल ४ - एप्रिल ५ - (एप्रिल महिना) वर्ग:लाल दुवे असणारे लेख
फेब्रुवारी ३
https://mr.wikipedia.org/wiki/फेब्रुवारी_३
ठळक घटना पंधरावे शतक १४५१ - महमद तिसरा ऑट्टोमान सम्राटपदी. १४८८ - बार्थोलोम्यु डायसने केप ऑफ गुड होपला वळसा घालुन मॉसेल बे येथे नांगर टाकला. सोळावे शतक १५०९ - तुर्कस्तान व पोर्तुगालमध्ये दीवची लढाई. सतरावे शतक १६९० - मासेच्युसेट्सने अमेरिकेतील पहिले कागदी चलन वापरायला सुरुवात केली. अठरावे शतक १७८३ - अमेरिकन क्रांती - स्पेनने अमेरिकेचे स्वातंत्र्य मान्य केले. एकोणिसावे शतक १८०९ - अमेरिकेत ईलिनॉय प्रांताची रचना. १८६७ - जपानचा युवराज मात्सुहितोचा सम्राट मैजी या नावाने राज्याभिषेक. १८७० - अमेरिकेच्या संविधानातील १५वा बदल अमलात. मतदानातील वंशभेद संपुष्टात. विसावे शतक १९१३ - अमेरिकेच्या संविधानातील १६वा बदल अमलात. केंद्रीय सरकारला आयकर घेण्यास मुभा. १९१६ - कॅनडात ओट्टावातील संसदेची ईमारत आगीत भस्मसात. १९१७ - पहिले महायुद्ध - अमेरिकेने जर्मनीशी राजकीय संबंध तोडले. १९३१ - न्यू झीलंडच्या नेपियर शहरात भूकंप. २३८ ठार. १९४२ - दुसरे महायुद्ध - नाझींनी पिएर लव्हालला फ्रांसच्या पंतप्रधानपदी बसवले. १९४४ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने मार्शल द्वीपसमूह काबीज केला. १९५९ - विमान अपघातात अमेरिकन संगीतकार बडी हॉली, रिची व्हॅलेन्स व बिग बॉपर मृत्युमुखी. १९६६ - सोवियेत संघाचे लुना ९ हे मानवविरहीत अंतराळयान चंद्रावर उतरले. १९७२ - जपानच्या सप्पोरो शहरात हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू. १९८४ - स्पेस शटल चॅलेंजरच्या अंतराळवीरांनी अंतराळात प्रथमतः अनिर्बंध पदार्पण केले. १९८९ - दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्ष पी.डब्ल्यु. बोथाने राजीनामा दिला. १९९७ - पाकिस्तानमध्ये निवडणुका. एकविसावे शतक २००६ - लाल समुद्रात फेरी बुडाली. १,२०० ठार झाल्याची भीती. जन्म १८११ - होरेस ग्रीली, अमेरिकन पत्रकार, संपादक व प्रकाशक. १८३० - रॉबर्ट आर्थर टॅलबोट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. १८८७ - हुआन नेग्रिन, स्पेनचा पंतप्रधान. १९२० - हेन्री हाइमलिख, अमेरिकन डॉक्टर. १९६३ - रघुराम राजन, भारतीय अर्थशास्त्री. मृत्यू १०१४ - स्वेन पहिला, डेन्मार्कचा राजा. १११६ - कोलोमान, हंगेरीचा राजा. १४५१ - मुराद दुसरा, ऑट्टोमन सम्राट. १४६८ - योहान्स गटेनबर्ग, जर्मन प्रकाशक, स्वयंचलित मुद्रणाचा संशोधक. १९२४ - वूड्रो विल्सन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष. १९८५ - फ्रॅंक ऑपनहाइमर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. २००५ - झुराब झ्वानिया, जॉर्जियाचा पंतप्रधान. प्रतिवार्षिक पालन बाह्य दुवे फेब्रुवारी १ - फेब्रुवारी २ - फेब्रुवारी ३ - फेब्रुवारी ४ - फेब्रुवारी ५ - (फेब्रुवारी महिना) वर्ग:दिवस वर्ग:ग्रेगरी दिनदर्शिका वर्ग:आंतरराष्ट्रीय दिनदर्शिका वर्ग:लाल दुवे असणारे लेख
जानेवारी ६
https://mr.wikipedia.org/wiki/जानेवारी_६
ठळक घटना आणि घडामोडी पंधरावे शतक सतरावे शतक १६६४ - मराठी सैन्य सुरतेत शिरले. १६६५ - शिवाजी महाराजांनी महाबळेश्वर येथे जिजाबाई व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली. १६७३ - कोंडाजी फर्जंद यांनी ६० मावळ्यांनिशी पन्हाळा जिंकला. अठरावे शतक एकोणिसावे शतक १८३२ - बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबई येथे दर्पणचा पहिला अंक प्रकाशित केला. १८३८ - सॅम्युएल मॉर्सने तारयंत्राचा शोध लावला. विसावे शतक १९२४ - वि.दा. सावरकर यांची अंदमानच्या तुरुंगातून  जन्मठेपेतून सुटका. १९२९ - मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन. १९०७ - मारिया माँटेसोरी यांनी पहिली माँटेसोरी शाळा सुरू केली. त्यांच्या शाळांमुळे पूर्वप्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल झाला. १९१२ - न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे ४७वे राज्य बनले. १९२९ - मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन. १९४४ - दुसरे महायुद्ध – सोवियेत सैन्य पोलंडमध्ये शिरले. १९९३ - सोपोर हत्याकांड - अतिरेक्यांनी छावणीवर केलेल्या हल्ल्याला प्रतिसाद म्हणून भारतीय सीमा सुरक्षा दळाच्या जवानांनी ५५ काश्मिरी नागरिकांची हत्या केली. एकविसावे शतक जन्म १४१२ - संत जोन ऑफ आर्क. १७४५ - ऐलियन मॉंटगोल्फिएर बलूनच्या साहाय्याने आकाशात जाण्याचे प्रयोग करणारा. १८१२ - बाळशास्त्री जांभेकर – दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राचे आणि दिग्दर्शन या मासिकाचे प्रकाशक. १८६८ - गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू महाराज. १९२५ - रमेश मंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक १९२८ - विजय तेंडुलकर, मराठी साहित्यिक १९३१ - डॉ. आर.डी. देशपांडे, मराठी पर्यावरणशास्त्रज्ञ. १९५९ - कपिलदेव निखंज, भारतीय क्रिकेट खेळाडू. भारतीय क्रिकेट संघनायक, समालोचक व प्रशिक्षक. १९६६ - ए.आर. रहमान, भारतीय संगीतकार. मृत्यू १७९६ - जिवबा दादा बक्षी, महादजी शिंदे यांचे सेनापती, मुत्सद्दी. १८४७ - त्यागराज, दाक्षिणात्य संगीतकार १८५२ - लुई ब्रेल, अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक. १८८५ - भारतेंदू हरिश्चंद्र – आधुनिक हिंदी साहित्याचे जनक मानले जाणारे हिंदी साहित्यिक. १९१९ - थियोडोर रूझवेल्ट अमेरिकेचे २६वे राष्ट्राध्यक्ष. १९७१ - प्रफुल्लचंद्र तथा पी.सी. सरकार, भारतीय जादूगार. १९८४ - विद्यानिधी महामहोपाध्याय सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार. १९८७ - जयदेव , हिंदी चित्रपट संगीतकार. २०१० - प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे, लेखक व इंग्रजीचे प्राध्यापक २०१७ - ओम पुरी, हिंदी अभिनेता. प्रतिवार्षिक पालन पत्रकार दिन (महाराष्ट्र). वर्धापनदिन : मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण (१८३२) संदर्भ बाह्य दुवे जानेवारी ४ - जानेवारी ५ - जानेवारी ६ - जानेवारी ७ - जानेवारी ८ - (जानेवारी महिना) वर्ग:दिवस वर्ग:ग्रेगरी दिनदर्शिका वर्ग:आंतरराष्ट्रीय दिनदर्शिका वर्ग:लाल दुवे असणारे लेख
जानेवारी ७
https://mr.wikipedia.org/wiki/जानेवारी_७
ठळक घटना आणि घडामोडी पंधरावे शतक सोळावे शतक सतरावे शतक १६१०-गुरूचे आयो, युरोपा, गॅनिमीड व कॅलिस्टो हे चार चंद्र गॅलिलिओने दुर्बिणीद्वारे शोधले. १६८० - मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला. अठरावे शतक १७८९ - अमेरिकेतील राष्ट्रध्यक्षपदाच्या पहिल्या निवडणुकीत जॉर्ज वॉशिंग्टन विजयी. एकोणिसावे शतक विसावे शतक १९२२ - पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतनाम यांना राजद्रोहाच्या आरोपावरून १८ महिन्यांची शिक्षा झाली. १९२७ - न्यू यॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली. १९३५ - कोलकाता येथे इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमीचे (INSA) उद्‌घाटन झाले. पुढे १९५१ मधे तिचे मुख्यालय दिल्लीला हलवण्यात आले. १९५९ - क्यूबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली. १९६८ - अमेरिकेचे सर्वेक्षक यान चंद्राच्या टायको या विवराच्या किनारी उतरले. १९७२ - कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले. १९७८ - एम.व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका ६९ कर्मचाऱ्याांसह होनोलुलूजवळील महासागरात बेपत्ता झाली. १९७९ - कंबोडियामध्ये हुकूमशहा पॉल पॉट आणि ख्मेर रूजच्या क्रूर सत्तेचा अंत. १९८० - आणीबाणीनंतरच्या पराभवानंतर इंदिरा गांधी प्रचंड बहुमताने पुन्हा विजयी झाल्या व केंद्रात पुन्हा काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. १९८८ - विश्वनाथन आनंदने बुद्धिबळात ग्रॅंडमास्टर दर्जा मिळवला. एकविसावे शतक २००१ - २१० मेगावॉटचा प्रकल्प खापरखेडा औष्णिक केंद्राकडून ४० महिन्यांत पूर्ण. २०१५ - पॅरिसमध्ये शार्ली एब्दो ह्या उपरोधिक नियतकालिकावर दहशतवादी हल्ला; संपादक व प्रमुख व्यंगचित्रकारांसह १२ मृत. जन्म १५०२ - पोप ग्रेगोरी तेरावा १७८९ - आइल्हार्ड मिट्शेर्लिख - रसायनशास्त्रज्ञ. बेंझिन व मिथिल या रसायनांचा शोधक . १८०० - मिलार्ड फिलमोर, अमेरिकेचा तेरावा राष्ट्राध्यक्ष. १८२७ - सर सॅंडफोर्ड फ्लेमिंग, केनेडियन अभियंता. १८५८ - एलीझर बेन-येहुदा, हिब्रू भाषातज्ञ. १८८५ - माधव नारायण जोशी, मराठी नाटककार १८९३ - जानकीदेवी बजाज, भारतीय स्वातंत्र्यसेनानी. १९१० - फैझ अहमद फैझ, उर्दू कवी. १९१२ - चार्ल्स अ‍ॅडाम्स - न्यू यॉर्कचा व्यंगचित्रकार. १९२० - सरोजिनी बाबर - लोकसाहित्याच्या अभ्यासक.लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी १९२१ - चंद्रकांत गोखले, मराठी रंगभूमी नट व चित्रपट अभिनेता. १९२५ - जोराल्ड डरेल, निसर्ग लेखक. १९२५ - प्रभात सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या. १९२८ - विजय तेंडुलकर, मराठी पत्रकार व साहित्यिक. १९४५ - रैला ओडिंगा, केन्याचा पंतप्रधान. १९४८ - शोभा डे, भारतीय लेखिका. १९५० - जॉनी लिव्हर, भारतीय अभिनेता. १९६१ - सुप्रिया पाठक, अभिनेत्री. १९६४ - निकोलस केज, अमेरिकन अभिनेता. १९७९ - बिपाशा बासू, भारतीय चित्रपट अभिनेत्री. मृत्यू १९८९ - मिचियोमिया हिरोहितो, जपानचे सम्राट. २००० - डॉ. अच्युतराव आपटे, विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक. प्रतिवार्षिक पालन संदर्भ बाह्य दुवे जानेवारी ५ - जानेवारी ६ - जानेवारी ७ - जानेवारी ८ - जानेवारी ९ - (जानेवारी महिना) वर्ग:दिवस वर्ग:ग्रेगरी दिनदर्शिका वर्ग:आंतरराष्ट्रीय दिनदर्शिका वर्ग:लाल दुवे असणारे लेख
जानेवारी ८
https://mr.wikipedia.org/wiki/जानेवारी_८
ठळक घटना आणि घडामोडी तेरावे शतक १२९७ - फ्रांस्वा ग्रिमाल्डीच्या सैन्याने मोनॅको काबीज केले. ग्रिमाल्डी घराणे येथपासून २१व्या शतकापर्यंत मोनॅकोचे शासक होते. पंधरावे शतक सतरावे शतक अठरावे शतक एकोणिसावे शतक १८३५ - अमेरिकेचे राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाले. १८८० - सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्‍च न्यायालयाचा निर्णय. ब्राम्हणेतर लोकही लग्नाचे पौरोहित्य करु शकतात हे न्यायालयाने मान्य केले. १८८९ - संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी डॉ. हर्मन होलरिथ यांना अमेरिकेत गणकयंत्राचे पेटंट मिळाले. विसावे शतक १९०४ - पोप दहावा पायस याने चर्चमध्ये आखूड झगे घालून येण्यास बंदी घातली. १९०८ - बालवीर चळवळीस प्रारंभ १९४० - दुसरे महायुद्ध–ब्रिटनने अन्नधान्यावर नियंत्रण (रेशनिंग) आणले. १९४७ - जयपूर येथे राजस्थान विद्यापीठाची स्थापना. १९५७ - गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह तेवीस जणांना २४ वर्षांची शिक्षा झाली. भारत सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे गोवा स्वतंत्र झाल्यानंतरही अनेक वर्षे ते पोर्तुगालमधील तुरुंगात पडून होते. १९७१ - 'स्वतंत्र बांगलादेश जाहीर केल्याच्या गुन्ह्याखाली'' अटक झालेल्या शेख मुजिबूर रहमान यांची तुरुंगातून मुक्तता. एकविसावे शतक २००४ - आर.एम.एस. क्वीन मेरी २ या जगातील सगळ्यात मोठे प्रवासी जहाजाचे इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरी हिच्याकडून नामकरण. २००५ - अणुऊर्जावर चालणारी यु.एस.एस. सान फ्रांसिस्को (एस.एस.एन.०७७१) ही पाणबुडी पाण्याखाली पूर्णवेगात असताना समुद्रातील डोंगराशी धडकली. एक खलाशी ठार. पाणबुडी पृष्ठभागावर येण्यात यशस्वी. २००६ - ग्रीसच्या कायथिरा बेटाजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप. जन्म १८५१ - बाळकृष्ण आत्माराम उर्फ भाऊसाहेब गुप्ते, कृषी, आरोग्य आणि भारतीय देशी कारागिरीवर लिहिणारे मराठी लेखक. १९०१ - यशवंत श्रीधर परांजपे, युद्ध आणि लष्करविषयक ग्रंथकार १९०२ - जॅक इड्डॉन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९०४ - डॉ. मनोहर गोपाळ गुप्ते, समाजसेवक. १९०९ - ब्रुस मिचेल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू. १९०९ - आशापूर्णादेवी- ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणाऱ्या प्रथम लेखिका. १९१३ - डेनिस स्मिथ, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू. १९२३ - जॉनी वॉर्डल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९२४ - गीता मुखर्जी, स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य १९२५ - राकेश मोहन, हिंदी नाटककार १९२६ - केलुचरण महापात्रा, ओडिसी नर्तक १९२९ - सईद जाफरी, हिंदी व इंग्लिश अभिनेता. १९३६ - ज्योतिंद्रनाथ दिक्षीत, भारताचे परराष्ट्रसचिव, मुत्सद्दी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार १९३९ - नंदा, हिंदी चित्रपट अभिनेत्री. १९४२ - जुनिचिरो कोइझुमी, जपानी पंतप्रधान. १९४२ - स्टीफन हॉकिंग, गणितज्ञ व इंग्लिश लेखक. १९४५ - प्रभा गणोरकर- मराठी लेखिका. १९४७ - डेव्हिड बोवी, अमेरिकन संगीतकार. १९४९ - लॉरेंस रोव, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. १९५१ - केनी ॲंथनी, सेंट लुशियाचा पंतप्रधान. १९६१ - शोएब मोहम्मद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. १९६५ - चंपक रमानायके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. मृत्यू ४८२ - संत सेव्हेर्नियस. ११०० - प्रतिपोप क्लेमेंट तिसरा. ११०७ - एडगर, स्कॉटलंडचा राजा. ११९८ - पोप सेलेस्टीन तिसरा. १३२४ - मार्को पोलो, इटालियन शोधक. १६४२ - गॅलेलियो गॅलिली, इटालियन गणितज्ञ , इटालियन भौतिकशास्त्रज्ञ. १८८४ - केशव चंद्र सेन, ब्राम्हो समाजचे नेते. १९३४-परशुराम गोविंद चिंचाळकर, मराठी लेखक. १९४१ - लॉर्ड बेडन-पॉवेल, स्काउट चळवळीचे स्थापक. १९६६ - बिमल रॉय, हिंदी चित्रपट दिग्दर्शक १९६७ - श्रीपाद कृष्ण बेलवलकर- प्राच्यविद्यापंडित.संस्कृत पंडित. १९७३ - स.ज. भागवत, मराठी गांधीवादी. १९७३ - ना.भि. परुळेकर, दैनिक सकाळचे स्थापक. १९७६ - चाउ एन्लाय, चीनी पंतप्रधान. १९८४ - सुषमा मुखोपाध्याय, पहिल्या भारतीय महिला वैमानिक. १९९१ - भास्कर धोंडो कर्वे, कर्वे समाज संस्थेचे संस्थापक. १९९२ - द.प्र. सहस्रबुद्धे, आनंद मासिकाचे संपादक. १९९४ - परमाचार्य श्री. चंद्रशेखर सरस्वती, ६८वे शंकराचार्य. १९९५ - मधू लिमये, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, समाजवादी नेते व राजकारणी. १९९६ - फ्रांस्वा मित्तरॉॅं, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष. २००३ - राजभाऊ एस. माने, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते. प्रतिवार्षिक पालन संदर्भ बाह्य दुवे जानेवारी ६ - जानेवारी ७ - जानेवारी ८ - जानेवारी ९ - जानेवारी १० - (जानेवारी महिना) वर्ग:दिवस वर्ग:ग्रेगरी दिनदर्शिका वर्ग:आंतरराष्ट्रीय दिनदर्शिका वर्ग:लाल दुवे असणारे लेख
जानेवारी ९
https://mr.wikipedia.org/wiki/जानेवारी_९
ठळक घटना तेरावे शतक १२८८ - ज्ञानेश्वर महाराजांनी पैठण येथे रेड्याकडून वेद म्हणवून घेतले. चौदावे शतक १३४९ - प्लेगचे कारण ठरवून बासेल, स्वित्झर्लंडमधील ज्यूंना जाळण्यात आले. पंधरावे शतक १४३१ - जोन ऑफ आर्कवर खटला सुरू. अठरावे शतक १७६० - बरारी घाटच्या लढाईत अफघाणांकडून मराठ्यांचा पराभव. १७८८ - कनेटिकट अमेरिकेचे पाचवे राज्य झाले. एकोणिसावे शतक १८५८ - प्रजासत्ताक टेक्सासच्या पहिल्या अध्यक्ष ॲन्सन जोन्स]ने आत्महत्या केली. १८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - मिसिसिपी अमेरिकेपासून विभक्त होणारे दुसरे राज्य झाले. १८६३ - अमेरिकन यादवी युद्ध - फोर्ट हिंडमनची लढाई. १८७८ - उंबेर्तो पहिला इटलीच्या राजेपदी. १८८० - वासुदेव बळवंत फडके- क्रांतिकारक यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा.'तेहरान' बोटीने त्यांना एडन येथे आणण्यात आले. १८८२ - ऑस्कार वाइल्डने न्यू यॉर्कमध्ये इंग्लिश कलेचे पुनरुत्थान या विषयावर पहिले व्याख्यान दिले. विसावे शतक १९१२ - अमेरिकेने होन्डुरासवर हल्ला केला. १९१५: महात्मा गांधी अफ्रिकेतुन भारतात आले. १९१६ - कानाक्केलची लढाई - ब्रिटीश सैनिकांची माघार. १९१७ - पहिले महायुद्ध - रफाची लढाई. १९२२ - प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात आले. १९४५ - अमेरिकेने फिलिपाईन्समधील लुझोनवर हल्ला केला. १९५१ - न्यू यॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांचे मुख्य कार्यालय सुरू झाले. १९६० - इजिप्तमध्ये आस्वान धरणाचे बांधकाम सुरू झाले. १९६४ - अमेरिकेच्या ताब्यातील पनामा कालव्यावर पनामाचा ध्वज फडकावण्यावरून दंगल. १९६६ - भारत आणि पाकिस्तान यांच्यात ताश्कंद येथे करार झाला. १९८० : आणीबाणीनंतर इंदिरा गांधीं विक्रमी मतं मिळवून सत्तेवर. १९९० : पिसा कलता मनोरा पर्यटकांसाठी बंद झाला. १९९१ - लिथुएनियाला विभक्त होण्यापासून थांबविण्यासाठी सोवियेत संघाने व्हिल्नियसवर हल्ला केला. १९९७ - डेट्रॉईटच्या विमानतळावर एम्ब्राएर १२० जातीचे विमान कोसळले. २९ ठार. एकविसावे शतक २००१ - चीनने शेन्झू २ या मानवरहित अंतराळयानाचे प्रक्षेपण केले. २००१ - नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला २००१ - नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले. २००२: महात्मा गांधी भारतात परतल्या बद्दल ९ जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे योजण्यात आले. २००३ - जमिनीवरून जमिनीवर मारा करु शकणाऱ्या 'अग्नी १ 'या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची ओरिसामधील बालासोर येथे यशस्वी चाचणी २००७: स्टीव जॉब्स यांनी पहिला आयफोन प्रकाशित केला. २०११ - इराण एर फ्लाइट २७७ हे बोईंग ७२७ प्रकारचे विमान इराणच्या पश्चिम अझरबैजान प्रांतातील उर्मिया शहरात कोसळले. ७०पेक्षा अधिक ठार. २०१५ - व्हिस्टारा ह्या भारतीय प्रवासी विमानकंपनीच्या कार्यास सुरुवात. जन्म १५५४ - पोप ग्रेगोरी पंधरावा. १६२४ - मैशो, जपानी सम्राज्ञी. १८५९ - जेम्स क्रॅन्स्टन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १८८७ - डॅन टेलर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू. १८८९ - वृंदावनलाल वर्मा, हिंदी साहित्यिक. १९१३ - रिचर्ड निक्सन, अमेरिकेचे ३७वे अध्यक्ष १९१८ - प्रभाकर उर्ध्वरेषे, मराठी लेखक. १९२२ - हरगोविंद खुराना, नोबेल-पुरस्कृत भारतीयवंशी जैव-रसायनशास्त्रज्ञ. १९२६ - कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता. १९२७ - रा.भा. पाटणकर, सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक, समीक्षक. १९३४ - महेंद्र कपूर, भारतीय पार्श्वगायक. १९३८ - चक्रवर्ती रामानुजम, भारतीय गणितज्ञ. १९५१ - पं. सत्यशील देशपांडे, ख्यालगायक, पं. कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य. १९५६ - डेव्हिड स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९६५ - फराह खान, भारतीय नृत्यदिग्दर्शक. १९६८ - जिमी ॲडम्स, वेस्ट-इंडियन क्रिकेट खेळाडू. १९७२ - गॅरी स्टेड, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू. १९७४ - क्रेग विशार्ट, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू. १९७४ - फरहान अख्तर, हिंदी अभिनेता, दिग्दर्शक, गायक. १९८३ - शरद मल्होत्रा, हिंदी चित्रपट अभिनेता. १९८९ - हॅरीस सोहेल, पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू मृत्यू १२८३ - वेन तियान्शिंग, चीनी पंतप्रधान(मृत्युदंड). १८४८ - कॅरॉलीन हर्शेल - खगोलशास्त्रज्ञ. १८७३ - नेपोलियन तिसरा, फ्रेंच सम्राट. १८७८ - व्हिक्टर इमॅन्युएल दुसरा, इटलीचा राजा. १९२३ - सत्येंद्रनाथ टागोर, पहिले भारतीय सनदी अधिकारी (आयसीएस). १९६१ - एमिली ग्रीन बाल्च, अमेरिकन लेखिका. १९७५ - प्योत्र सर्जेयेविच नोव्हिकोव्ह, रशियन गणितज्ञ. १९९५ - मधू लिमये, स्वातंत्र्यसैनिक व समाजवादी विचारवंत १९९७ - एडवर्ड ओसोबा-मोराव्स्की, पोलंडचा पंतप्रधान. १९९८ - केनिची फुकुई, नोबेल पारितोषिक विजेता जपानी रसायनशास्त्रज्ञ. २००३ - कमर जलालाबादी, कवी. २००४ - शंकरबापू आपेगावकर- राष्ट्रीय ख्यातीचे पखवाजवादक. २०१३ - जेम्स बुकॅनन, नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ज्ञ. २०१८ - हू जिंताओ, चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष. प्रतिवार्षिक पालन शहीद दिन - पनामा. प्रवासी भारतीय दिवस - भारत जागतिक घरबांधणी कामगार दिन बाह्य दुवे जानेवारी ७ - जानेवारी ८ - जानेवारी ९ - जानेवारी १० - जानेवारी ११ - (जानेवारी महिना) वर्ग:दिवस वर्ग:ग्रेगरी दिनदर्शिका वर्ग:आंतरराष्ट्रीय दिनदर्शिका वर्ग:लाल दुवे असणारे लेख
जानेवारी १०
https://mr.wikipedia.org/wiki/जानेवारी_१०
ठळक घटना पहिले शतक ४९ - ज्युलियस सीझरने रुबिकोन नदी ओलांडली. इटलीतील गृहयुद्ध सुरू. तिसरे शतक २३६ - संत फाबियान पोपपदी. सतरावे शतक १६६६ - सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले. अठरावे शतक १७३० - पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली. १७६० - पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या आधी दत्ताजी शिंदे आणि कुतुबशहा यांच्या फौजांमध्ये लढाई झाली. एकोणिसावे शतक १८०६ - बोअर युद्ध - केप टाउनच्या डच वसाहतीने ब्रिटीश सैन्यासमोर शरणागती पत्करली. १८१० - नेपोलियन बोनापार्ट व जोसेफिन दि बोहार्नेचे लग्न मोडले. १८११ - लुईझियानातील दोन पॅरिशमध्ये(जिल्हे) गुलामांचा उठाव. १८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - फ्लोरिडा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातून विभक्त झाले. १८६३ - लंडनमधील भुयारी रेल्वे पॅडिंग्टन व फॅरिंग्डन स्ट्रीट या स्थानकांमध्ये सुरू.चार्ल्स पिअर्सन यांच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या ७ किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरुवात झाली. १८७० - बॉम्बे, बरोडा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे (B. B. C. I. Railway) या ब्रिटिशकालीन रेल्वे कंपनीचे चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले. या स्थानकावर फक्त एक फलाट होता. विसावे शतक १९०१ - बोमोन्ट, टेक्सास जवळ खनिज तेल सापडले. १९२० - लीग ऑफ नेशन्सने आपल्या पहिल्या बैठकीत व्हर्सायच्या तहाला मान्यता दिली. १९२३ - लिथुएनियाने मेमेल बळकावले. १९२६ - स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद साप्ताहिक मुंबईत सुरू केले. १९२९ - टिनटिनची चित्रकथा पहिल्यांदा प्रकाशित. १९४६ - लंडनमध्ये संयुक्त राष्ट्रांचीची पहिली सर्वसाधारण सभा. ५१ राष्ट्रे उपस्थित. १९५७ - हॅरोल्ड मॅकमिलन युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी. १९६६ - भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला. १९७२ - शेख मुजीबुर रेहमान हे पाकिस्तानच्या कारावासातून ९ महिन्यानंतर सुटून बांगलादेश मध्ये नवीन राष्ट्रपती म्हणून परतले. १९८९ - क्युबाने ॲंगोलातून सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली. १९९९ : संजीव नंदा (माजी नौदलप्रमुखाचा नातू) नवी दिल्लीत गाडी चालवताना तीन पोलिसांची चिरडून हत्या केली एकविसावे शतक २००१ - विकिपिडीया न्यूपिडीयाचा एक भाग म्हणून सुरू झाला. पाच दिवसांनी त्याचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले. जन्म १७७५ - दुसरे बाजीराव पेशवे. १८१५ - सर जॉन अलेक्झांडर मॅकडोनाल्ड, कॅनडाचा पहिला पंतप्रधान. १८६९ - ग्रिगोरी रास्पुतिन, रशियन सन्यासी, राजकारणी. १८७१ - ज्यो ट्रॅव्हर्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १८९४ - पिंगली लक्ष्मीकांतम, तमिळ कवी. १८९६ - काकासाहेब तथा नरहर विष्णू गाडगीळ, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी साहित्यिक, वक्ता. १८९६ - दिनकर गंगाधर केळकर, वस्तुसंग्रहक. १९०० - मारोतराव सांबशिव कन्नमवार, महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री (२० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३) १९०१ - डॉ. गणेश हरी खरे, इतिहास संशोधक. १९०२ - शिवराम कारंथ, कन्नड साहित्यिक. १९०३ - पड थर्लो, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९१३ - गुस्ताव हुसाक, चेकोस्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष. १९१७ - टायरेल जॉन्सन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. १९१८ - आर्थर चुंग, गुयानाचा राष्ट्राध्यक्ष. १९१९ - श्री.र. भिडे, संस्कृत अभ्यासक, मराठी लेखक. १९२७ - शिवाजी गणेशन, तमिळ चित्रपट अभिनेता. १९३३ - लेन कोल्डवेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९३८ - डोनाल्ड क्नुथ, अमेरिकन गणितज्ञ व संगणकशास्त्रज्ञ. १९४० - येशु दास, भारतीय पार्श्वगायक. १९५० - नाजुबाई गावित, आदिवासी समाजसेविका. १९७४ - ॠतिक रोशन, भारतीय चित्रपट अभिनेता. १९७५ - जेम्स कर्टली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९८१ - जेहान मुबारक, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. मृत्यू ६८१ - पोप अगाथो. १०९४ - खलिफा अल् मुस्तान्सर. १२७६ - पोप ग्रेगोरी दहावा. १७६० - दत्ताजी शिंदे, पानिपतच्या पहिल्या युद्धातील मराठा सरदार. १८६२ - सॅम्युएल कोल्ट, अमेरिकन संशोधक. १९१७ - बफेलो बिल कोडी, अमेरिकन साहसवीर. १९९९ - आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर, भारतीय स्वातंत्र्यसैनिक. १९२२ - ओकुमा शिगेनोबु, जपानाचा आठवा पंतप्रधान. १९६६ - लालबहादूर शास्त्री, भारताचे पंतप्रधान. १९९९ - आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर, भारतीय स्वातंत्र्यसैनिक व समाजवादी विचारवंत. २००२ - पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी.आर. व्यास, ख्यालगायकव बंदिशकार. प्रतिवार्षिक पालन मार्गारेट थॅचर दिन - फॉकलंड द्वीप. वर्धापनदिन : मुंबईचे छत्रपती शिवाजी संग्रहालय (१९२२) जागतिक हास्य दिन बाह्य दुवे जानेवारी ८ - जानेवारी ९ - जानेवारी १० - जानेवारी ११ - जानेवारी १२ - (जानेवारी महिना) वर्ग:दिवस वर्ग:ग्रेगरी दिनदर्शिका वर्ग:आंतरराष्ट्रीय दिनदर्शिका वर्ग:लाल दुवे असणारे लेख
फेब्रुवारी ४
https://mr.wikipedia.org/wiki/फेब्रुवारी_४
ठळक घटना चौथे शतक ३६२ - रोमन सम्राट ज्यूलियनने सर्व धर्मांना समान अधिकार देणारा आदेश काढला. अठरावे शतक १७८९ - जॉर्ज वॉशिंग्टनची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी नेमणूक. एकोणिसावे शतक १८८१ - लोकमान्य टिळकांनी पुण्यातून "केसरी" हे मराठी वर्तमानपत्र  सुरू केले विसावे शतक १९४८ - श्रीलंकेस युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले. जन्म १८०९ - लुई ब्रेल. १९१४ - इंदिरा संत, मराठी कवयत्री. १९२२ - स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी, हिंदुस्तानी गायक. १९२४ - विद्याधर संभाजीराव गोखले, मराठी लेखक, पत्रकार, नाटककार व वक्ते. १९८२ - बेला शेंडे, हिंदुस्तानी गायिका. मृत्यू २०२४ - हेगे गींगोब, नामिबियाचे राजकारणी, राष्ट्रपती (2015 पासून) आणि पंतप्रधान (1990-2002, 2012-2015), कर्करोग. प्रतिवार्षिक पालन जागतिक कर्करोग दिन बाह्य दुवे फेब्रुवारी २ - फेब्रुवारी ३ - फेब्रुवारी ४ - फेब्रुवारी ५ - फेब्रुवारी ६ - (फेब्रुवारी महिना) वर्ग:दिवस वर्ग:ग्रेगरी दिनदर्शिका वर्ग:आंतरराष्ट्रीय दिनदर्शिका
फेब्रुवारी १२
https://mr.wikipedia.org/wiki/फेब्रुवारी_१२
ठळक घटना आणि घडामोडी सतरावे शतक अठरावे शतक एकोणिसावे शतक विसावे शतक १९७६ - पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हडेक्की (केरळ) प्रकल्प देशास अर्पण. १९९९ - संगीत क्षेत्रातील असाधारण स्वरूपाच्या कामगिरीबद्दल ज्येष्ठ गायक पंडित जसराज यांना टोरोंटो विद्यापीठाच्या संगीत विभागातर्फे डिस्टिंग्विश्ड व्हिजिटर ऍवॉर्ड जाहीर. एकविसावे शतक २००३ - आवाजापेक्षा दुप्पट वेगाने स्वनातीत जाणाऱ्या जहाजविरोधी ब्राह्मोस क्षेपणास्त्राची ओरिसाच्या किनाऱ्यापासून दूरवर खोल बंगालच्या उपसागरात यशस्वी चाचणी घेण्यात आली. जन्म १७४२ - नाना फडणवीस, पेशवाईतील नामवंत मुत्सद्दी. १८०९ - अब्राहम लिंकन, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा १६वा राष्ट्राध्यक्ष. १८०९ - चार्ल्स डार्विन, उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडणारे. १८५७ - बॉबी पील, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १८७१ - चार्ली मॅकगेही, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १८८० - विल्यम शेल्डर्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू. १८९१ - सिसिल डिक्सन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू. १८४१ - रॉस मॉर्गन, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू. १९४९ - गुंडप्पा विश्वनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९६४ - मिल्टन स्मॉल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. १९६६ - शकील अहमद, सिनियर, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. १९७२ - दुलिप समरवीरा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. मृत्यू १७७१ - एडॉल्फ फ्रेडरिक, स्वीडनचा राजा. १७९४ - महादजी शिंदे, पेशवाईतील मुत्सद्दी. १९९८ - पद्मा गोळे कवयित्री. २००० - विष्णूअण्णा पाटील, सहकार क्षेत्रातील नामवंत नेते. २००१ - भक्ती बर्वे, मराठी अभिनेत्री. प्रतिवार्षिक पालन डार्विन दिन बाह्य दुवे फेब्रुवारी १० - फेब्रुवारी ११ - फेब्रुवारी १२ - फेब्रुवारी १३ - फेब्रुवारी १४ - (फेब्रुवारी महिना) वर्ग:लाल दुवे असणारे लेख
फेब्रुवारी ६
https://mr.wikipedia.org/wiki/फेब्रुवारी_६
ठळक घटना चौथे शतक ३३७ - ज्युलियस पहिला पोपपदी. अठरावे शतक १७८८ - मॅसेच्युसेट्सने अमेरिकेचे संविधान मान्य केले. एकोणिसावे शतक १८१९ - सर थॉमस स्टॅमफर्ड रॅफल्सने सिंगापुरची स्थापना केली. १८४० - वैतंगीचा तह. न्यू झीलंड राष्ट्र म्हणून अस्तित्वात. विसावे शतक १९१८ - ३० वर्षे वयावरील ब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. १९२८ मध्ये हे वय २१ करण्यात आले. १९२२ - अकिल रॅट्टी पोप पायस अकरावा झाला. १९३२ - कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात वीणा दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळ्या झाडल्या. १९३२ - प्रभात कंपनीचा अयोध्येचा राजा (चित्रपट) हा पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला. १९३६ - जर्मनीत गार्मिश-पार्टेनकर्केन येथे चौथे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू. १९५१ - न्यू जर्सीत वूडब्रिज टाउनशिप येथे रेल्वे रुळावरून घसरली. ८५ ठार, ५०० जखमी. १९५२ - इंग्लंडचा राजा जॉर्ज सहाव्याचा अंत. एलिझाबेथ दुसरी राणी झाली. ज्याक्षणी एलिझाबेथ राणी झाली (जॉर्जचा मृत्यु) त्या क्षणी ती केन्यातील झाडावर असलेल्या हॉटेलमध्ये होती. १९५९ - टेक्सास इन्स्ट्‌रुमेन्ट्सच्या जॅक किल्बीने इंटिग्रेटेड सर्किटसाठी पहिला पेटंट घेतला. १९६८ - फ्रांसमध्ये ग्रेनोबल येथे दहावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू. १९९६ - टर्किश एरलाइन्सचे बोईंग ७५७ जातीचे विमान डॉमिनिकन प्रजासत्ताक जवळ अटलांटिक समुद्रात कोसळले. १८९ ठार. एकविसावे शतक २००१ - भारतात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास आणि तंबाखूपासून बनविण्यात आलेल्या सर्व उत्पादनांची जाहिरात करण्यावर बंदी. २००१ - पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेटच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल डाक विभागातर्फे टपाल तिकीट प्रसिद्ध. २००३ - संत तुकाराम महाराज यांचे चित्र असलेल्या नाण्याचे प्रकाशन नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा हस्ते करण्यात आले. २००४ - चेचेन अतिरेक्यांनी रशियात मॉस्कोतील रेल्वेत बॉम्बस्फोट घडवून आणला. ४० ठार. २०२३ - तुर्कस्तान आणि सिरीयामध्ये झालेल्या भूकंपात २८,००० पेक्षा अधिक व्यक्ती मृत्युमुखी. जन्म १६११ - चोंग्झेन, चीनी सम्राट. १६६४ - मुस्तफा दुसरा, ऑट्टोमन सम्राट. १६६५ - ॲन, इंग्लंडची राणी. १६९५ - निकोलस बर्नोली, स्विस गणितज्ञ. १८७६ - सेलर यंग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १८८२ - गॉर्डन व्हाइट, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू. १८८९ - एलियास हेन्ड्रेन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १८९५ - जॉर्ज हर्मन रुथ, जुनियर, अमेरिकन बेसबॉल खेळाडू. १९११ - रोनाल्ड रेगन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष. १९१२ - ॲव्हा ब्राउन, ऍडोल्फ हिटलरची सोबतीण. १९१५ - प्रदीप, हिंदी कवी. १९३९ - ब्रायन लकहर्स्ट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९४५ - बॉब मार्ली, जमैकन संगीतकार. १९७० - डॅरेन लेहमान, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९७६ - टोनी सुजी, केन्याचा क्रिकेट खेळाडू. १९८६ - ब्रॅन्डन टेलर, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू. १९९३ - आर्थर ॲश, अमेरिकन टेनिस खेळाडू. मृत्यू १५९३ - ओगिमाची, जपानी सम्राट. १६८५ - चार्ल्स दुसरा, इंग्लंडचा राजा. १७४० - पोप क्लेमेंट बारावा. १८९९ - लिओ फोन कॅप्रिव्ही, जर्मनीचा चॅन्सेलर. १९१८ - गुस्टाफ क्लिम्ट, ऑस्ट्रियन चित्रकार. १९३१ - मोतीलाल नेहरू, भारतीय स्वातंत्र्यसैनिक. १९३९ - सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे महाराज. १९५२ - जॉर्ज सहावा, इंग्लंडचा राजा. १९६४ - एमिलियो अग्विनाल्दो, फिलिपाईन्सचा पहिला राष्ट्राध्यक्ष. १९७६ - ऋत्विक घटक, चित्रपट निर्माते. १९८९ - चार्ल्स गुफ्फ्रोय, बर्लिनची भिंत ओलांडताना मृत्यू पत्करणारा शेवटचा माणूस. १९९३ - आर्थर अ‍ॅश, अमेरिकन टेनिस खेळाडू. २००१ - बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, कांग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री. २०२२ - लता मंगेशकर, भारतीय पार्श्वगायिका. प्रतिवार्षिक पालन वैतंगी दिन - न्यू झीलंड. बॉब मार्ली दिन - जमैका, इथियोपिया. जम्मू-काश्मीर दिन बाह्य दुवे फेब्रुवारी ४ - फेब्रुवारी ५ - फेब्रुवारी ६ - फेब्रुवारी ७ - फेब्रुवारी ८ - फेब्रुवारी ९ - (फेब्रुवारी महिना) वर्ग:दिवस वर्ग:ग्रेगरी दिनदर्शिका वर्ग:आंतरराष्ट्रीय दिनदर्शिका वर्ग:लाल दुवे असणारे लेख
फेब्रुवारी ५
https://mr.wikipedia.org/wiki/फेब्रुवारी_५
ठळक घटना एकोणिसावे शतक विसावे शतक १९२२ - रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध. १९५८ - टायबी नावाचा हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेच्या वायुसेनेने हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे. १९९६ - मुंबई येथील चौथ्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात 'सोना माटी' या भारतीय लघुपटाने सुवर्णपदक पटकावले. २००३ - अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा. २००४ - पुण्याच्या स्वाती घाटेने वूमन ग्रॅंडमास्टर किताबाचा तिसरा व शेवटचा नॉर्म संपादन केला. एकविसावे शतक २००० - रशियाच्या सैन्याने चेच्न्यातील ग्रोझ्नी शहराजवळ ६० नागरिकांना ठार मारले. २००४ - इंग्लंडच्या मोरेकांबेच्या खाडीत अचानक मोठी भरती येउन ३५ शिंपले वेचणारे अडकले. त्यातील २३ मृत्युमुखी पडले. २००८ - अमेरिकेच्या दक्षिण भागात टोरनॅडोंचा उत्पात. ५७ ठार. जन्म ९७६ - सांजो, जपानी सम्राट. १७८८ - रॉबर्ट पील, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. १८८९ - अर्नेस्ट टिल्डेस्ली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९०० - अडलाई स्टीवन्सन, अमेरिकन राजकारणी. १९४५ - शालट रामपलान १९७६ - अभिषेक बच्चन, भारतीय चित्रपट अभिनेता. मृत्यू १९२० - विष्णूबुवा जोग, वारकरी संप्रदायातील भक्त. १९१७ - जबर अल-मुबारक अल-सबाह दुसरा, कुवैतचा अमीर. २००० - वैद्य माधवशास्त्री जोशी, महाराष्ट्र आयुर्वेद महासंमेलनाचे माजी अध्यक्ष. २००३ - गणेश गद्रे, गांधीवादी विचारवंत. प्रतिवार्षिक पालन संविधान दिन - मेक्सिको. बाह्य दुवे फेब्रुवारी ३ - फेब्रुवारी ४ - फेब्रुवारी ५ - फेब्रुवारी ६ - फेब्रुवारी ७ - (फेब्रुवारी महिना) वर्ग:दिवस वर्ग:ग्रेगरी दिनदर्शिका वर्ग:आंतरराष्ट्रीय दिनदर्शिका वर्ग:लाल दुवे असणारे लेख
फेब्रुवारी ७
https://mr.wikipedia.org/wiki/फेब्रुवारी_७
ठळक घटना पाचवे शतक ४५७ - लिओ पहिला बायझेन्टाईन सम्राटपदी. सोळावे शतक १५५० - ज्युलियस तिसरा पोपपदी. सतरावे शतक १६१३ - मिखाइल रोमानोव्ह रशियाच्या झारपदी. अठरावे शतक १७८९ - जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे सर्वप्रथ राष्ट्राध्यक्ष झाले. एकोणिसावे शतक १८४२ - डेबर टॅबरची लढाई - इथियोपियाने सेमियेनच्या सैन्याला परतवले. १८६३ - एच.एम.एस. ऑर्फियुस हे जहाज न्यू झीलंडमध्ये ऑकलंडजवळ बुडाले. १८९ ठार. विसावे शतक १९०४ - बाल्टिमोर मध्ये आग. ३० तासात १,५०० ईमारती भस्मसात. १९२२ - पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरून १८ महिन्याची शिक्षा झाली. १९३५ - कोलकाता येथे इंडियन नॅशनल सायन्स अकादमीचे उदघाटन १९४२ - क्रोएशियातील बान्या लुका गावात नाझींनी ५५१ मुलांसह २,३०० नागरिकांना मारले. १९४४ - दुसरे महायुद्ध - इटलीतील ऍन्झियो गावातून नाझींनी दोस्त राष्ट्रांवर प्रतिहल्ला सुरू केला. १९६२ - अमेरिकेने क्युबाशी व्यापारी संबंध तोडले. १९६७ - अलाबामात मॉंटगोमरीतील हॉटेलला आग. २५ ठार. १९७१ - स्वित्झर्लंडमध्ये स्त्रियांनाही मतदानाचा अधिकार दिला गेला. १९७२ - कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे काम पूर्ण. १९७४ - ग्रेनेडाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. १९७७ - सोवियेत संघाने सोयुझ २४ हे अंतराळयान प्रक्षेपित केले. १९७९ - प्लुटो नेपच्यून पेक्षा सूर्याच्या जवळ. १९८६ - हैतीच्या हुकुमशहा ज्यॉं क्लॉड डुव्हालियरने देशातून पळ काढला. १९९१ - हैतीत पहिल्यांदाच निवडलेल्या अध्यक्षाची सद्दी. ज्यॉं-बर्ट्रांड अरिस्टिड राष्ट्राध्यक्षपदी. १९९१ - आय.आर.ए.ने युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानावर (१०, डाउनिंग स्ट्रीट)वर हल्ला केला. १९९२ - युरोपीय संघाची रचना. १९९५ - इ.स. १९९३ च्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याच्या सूत्रधार राम्झी युसुफला पाकिस्तानात इस्लामाबाद येथे अटक. १९९८ - जपानमध्ये नागानो शहरात १९९८ हिवाळी ऑलिंपिक सुरू. १९९९ - जॉर्डनचा राजा हुसेनच्या मृत्युनंतर युवराज अब्दुल्ला राजेपदी. एकविसावे शतक २००३ - महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडामहर्षींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार सचिन तेंडुलकरचे मार्गदर्शक रमाकांत आचरेकर यांना जाहीर. जन्म १६९३ - ऍना, रशियाची सम्राज्ञी. १८१२ - चार्ल्स डिकन्स, इंग्लिश लेखक. १८५७ - आल्फ्रेड लिटलटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १८७७ - गॉडफ्रे हॅरोल्ड हार्डी, इंग्लिश गणितज्ञ. १८९३ - जानकीदेवी बजाज, भारतीय स्वातंत्र्यसैनिक. १८९८ - रमाबाई आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी १९०६ - ओलेग ॲंतोनोव्ह, रशियन विमानशास्त्रज्ञ. १९०६ - पुयी, चीनी सम्राट. १९१४ - रमोन मर्काडेर, लिओन ट्रॉट्स्कीचा मारेकरी. १९२० - सरोजिनी बाबर, मराठी लेखिका आणि खासदार, १९२१ - चंद्रकांत गोखले, मराठी अभिनेते. १९२१ - एथॉल रोवन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू. १९२९ - विजय तेंडुलकर, मराठी साहित्यिक, पत्रकार. १९३८ - एस. रामचंद्रन पिल्ले, भारतीय कम्युनिस्ट पक्षातील नेता. १९४० - टोनी तान केंग याम, सिंगापुरी राजकारणी व सिंगापूरच्या प्रजासत्ताकाचा ७वा राष्ट्राध्यक्ष. १९७२ - रायन कॅम्पबेल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. मृत्यू १०४५ - गो-सुझाकु, जपानी सम्राट. १७९९ - क्वियान्लॉॅंग, चीनी सम्राट. १८३७ - गुस्ताफ चौथा ऍडोल्फ, स्वीडनचा राजा. १८७८ - पोप पायस नववा. १९९९ - हुसेन, जॉर्डनचा राजा. २००० - विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक डॉ. अच्युतराव आपटे २००३ - जीवनराव सावंत, ज्येष्ठ कामगार नेते. प्रतिवार्षिक पालन स्वातंत्र्य दिन - ग्रेनेडा. बाह्य दुवे फेब्रुवारी ५ - फेब्रुवारी ६ - फेब्रुवारी ७ - फेब्रुवारी ८ - फेब्रुवारी ९ - (फेब्रुवारी महिना) वर्ग:दिवस वर्ग:ग्रेगरी दिनदर्शिका वर्ग:आंतरराष्ट्रीय दिनदर्शिका वर्ग:लाल दुवे असणारे लेख
फेब्रुवारी ८
https://mr.wikipedia.org/wiki/फेब्रुवारी_८
ठळक घटना सोळावे शतक १५८७ - मेरी स्टुअर्टला मृत्युदंड. सतरावे शतक १६२२ - इंग्लंडचा राजा जेम्स पहिल्याने संसद बरखास्त केली. १६९२ - सेलम, मॅसेच्युसेट्सच्या एक डॉक्टरने जाहीर केले की तीन मुलींच्या अंगात सैतान आहे. एकोणिसावे शतक १८०७ - एलाउची लढाई - नेपोलियनने रशियन सैन्याचा पराभव केला. १८४९ - रोमन प्रजासत्ताकची रचना. १८९९ - रॅंडचा खून करण्याऱ्या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणाऱ्या द्रविड बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून खून केला. विसावे शतक १९०० - दुसरे बोअर युद्ध - दक्षिण आफ्रिकेत लेडी स्मिथ येथे ब्रिटीश सैन्याचा पराभव. १९०४ - रशिया आणि जपान यांचे युद्ध सुरू. या युद्धात जपानने बलाढ्य रशियाची दाणादाण उडवली. १९२४ - अमेरिकेतील नेव्हाडा राज्यात विषारी वायुने मृत्युदंड देण्यास सुरू केले. १९४३ - दुसरे महायुद्ध-कुर्स्कची लढाई - रशियन सैन्याने कुर्स्क शहर काबीज केले. १९४३ - दुसरे महायुद्ध-ग्वादालकॅनालची लढाई - अमेरिकन सैन्याचा जपानी सैन्यावर विजय. १९५५ - पाकिस्तानच्या-सिंध प्रांताने जहागीरदारी पद्धत बंद केली व १०,००,००० एकर जमीन कुळांमध्ये वाटुन टाकली. १९७१ - नॅस्डॅक शेरबाजार खुले. १९७४ - बर्किना फासोत सैनिकी उठाव. १९७९ - डेनिस सास्सू-न्ग्वेस्सो कॉॅंगोच्या अध्यक्षपदी. १९८४ - सारायेवोत चौदावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू. १९८९ - इंडिपेंडंट एरचे बोईंग ७०७ जातीचे विमान एझोर्स बेटावरील सांता मरिया डोंगरावर कोसळले. १४४ ठार. १९९४ - अष्टपैलू खेळाडू कपिलदेव निखंज यांनी श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ४३२ वा बळी नोंदवून न्यू झीलंडचे रिचर्ड हॅडली यांचा सर्वाधिक बळींचा जागतिक विक्रम मागे टाकला. एकविसावे शतक २००० - महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारीला साजरी करण्याचा निर्णय केला. २००२ - सॉल्ट लेक सिटीत एकोणिसावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू. जन्म ४१२ - प्रोक्लस, ग्रीक तत्त्वज्ञानी. १२९१ - आल्फोन्सो चौथा, पोर्तुगालचा राजा. १६७७ - जॉक कॅसिनी, फ्रेंच अंतरिक्षशास्त्रज्ञ. १७२० - साकुरामाची, जपानी सम्राट. १८१९ - जॉन रस्किन, इंग्लिश लेखक. १८२० - विल्यम टेकुमेश शेर्मन, अमेरिकन सेनापती. १८२८ - जुल्स व्हर्न, फ्रेंच लेखक. १८४४ - गोविंद शंकर बापट, मराठी साहित्यिक. १८९७ - डॉ. झाकीर हुसेन, शिक्षणतज्ञ, भारताचे तिसरे राष्ट्रपती. १९३६ - मनोहर हर्डीकर, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९३९ - सुधीर मोघे, मराठी गीतकार. १९४१ - जगजीतसिंह, भारतीय गझलगायक, संगीतकार. १९४७ - सॅम गॅनन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९६३ - मोहम्मद अझहरुद्दीन, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९७० - कॅमेरोन कफी, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. १९७६ - खालेद मशूद, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू. १९८८ - कीगन मेथ, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू. मृत्यू १२६५ - हुलागु खान, मोंगोल राजा. १२९६ - प्रझेमिसल, पोलंडचा राजा. १५८७ - मेरी स्टुअर्ट, स्कॉटलंडची राणी. १६९६ - इव्हान पाचवा, रशियाचा झार. १७२५ - पीटर पहिला, रशियाचा झार. १९५७ - जॉन फोन न्यूमन, हंगेरीत जन्मलेला गणितज्ञ, संगणकशास्त्रज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ. १९९४ - गोपाळराव देऊसकर, ख्यातनाम चित्रकार. १९९५ - भास्करराव सोमण, भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस ॲडमिरल १९९९ - डॉ.इंदुताई पटवर्धन, आनंदग्रामच्या संस्थापिका, ज्येष्ठ समाजसेविका. प्रतिवार्षिक पालन बाह्य दुवे फेब्रुवारी ६ - फेब्रुवारी ७ - फेब्रुवारी ८ - फेब्रुवारी ९ - फेब्रुवारी १० - (फेब्रुवारी महिना) वर्ग:दिवस वर्ग:ग्रेगरी दिनदर्शिका वर्ग:आंतरराष्ट्रीय दिनदर्शिका वर्ग:लाल दुवे असणारे लेख
फेब्रुवारी ९
https://mr.wikipedia.org/wiki/फेब्रुवारी_९
ठळक घटना सतरावे शतक १६२१ - ग्रेगोरी पंधरावा पोपपदी. एकोणिसावे शतक १८२२ - हैतीने डॉमिनिकन प्रजासत्ताकवर हल्ला केला. विसावे शतक १९०० - डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धा प्रथम सुरू. १९३३ - साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली. १९६९ - बोईंग ७४७ विमानाचे सर्वप्रथम उड्डाण. १९७१ - कॅलिफोर्नियात रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.४ तीव्रतेचा भूकंप. १९७३ - बिजु पटनायक ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी. १९८६ - हॅलेचा धूमकेतु सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेतील सूर्यापासून सगळ्यात जवळच्या बिंदुला पोचला. एकविसावे शतक २००१ - यू.एस.एस. ग्रीनव्हिल ही अमेरिकेची पाणबुडी जपानच्या एहिमे-मारु या जहाजाला आदळली. १७ ठार. जन्म १४०४ - कॉन्स्टन्टाईन अकरावा, शेवटचा बायझेंटाईन सम्राट. १५३३ - शिमाझु योशिहिसा, जपानी सामुराई. १८३० - अब्दुल अझीझ, ओस्मानी सम्राट. १८५५ - जॉन शुटर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १८५९ - मॉरिस रीड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १८७४ - कवी गोविंद, स्वातंत्र्यशाहीर. १८७८ - लिओनार्ड मून, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १८८२ - टॉम कॅम्पबेल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू. १९२२ - जिम लेकर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू (मृत्यू: १९८६). १९२८ - कृष्णा मेणसे, सीमा लढ्यातील अग्रणी नेते. १९२९ - लेनोक्स बटलर, वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू. १९६३ - माइक रिंडेल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू. १९७० - ग्लेन मॅकग्रा, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. मृत्यू १६३४ - मुराद चौथा, ऑटोमन सम्राट. १९६६ - दामूअण्णा जोशी, बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक १९७९ - राजा परांजपे, चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते. १९८१ - न्यायमूर्ती एम.सी. छगला, नामवंत कायदेपंडित १९८४ - युरी आन्द्रोपोव्ह, सोवियेत राष्ट्राध्यक्ष. १९९६ - सी.चिट्टीबाबू चलापल्ली, ख्यातनाम विचित्रवीणावादक. ११९९ - मिनामोटोनो योरिमोटो, जपानी शोगन. २००० - शोभना समर्थ, अभिनेत्री. २००१ - दिलबागसिंग, भारातचे हवाई दल प्रमुख. २००६ - नादिरा, हिंदी अभिनेत्री. (ज. १९३२) प्रतिवार्षिक पालन बाह्य दुवे फेब्रुवारी ७ - फेब्रुवारी ८ - फेब्रुवारी ९ - फेब्रुवारी १० - फेब्रुवारी ११ - (फेब्रुवारी महिना) वर्ग:दिवस वर्ग:ग्रेगरी दिनदर्शिका वर्ग:आंतरराष्ट्रीय दिनदर्शिका वर्ग:लाल दुवे असणारे लेख
फेब्रुवारी १०
https://mr.wikipedia.org/wiki/फेब्रुवारी_१०
ठळक घटना तेरावे शतक १२५८ - मोंगोल सरदार हुलागु खानने बगदाद लुटले व तेथील नागरिकांची हत्या केली. अंदाज १०,००० ते ८,००,०००. एकोणिसावे शतक १८४० - इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया व सॅक्स-कोबर्ग-गोथाच्या राजकुमार आल्बर्टचे लग्न. १८४६ - सोब्राओनची लढाई - इंग्लिश सैन्याविरुद्ध शीख सैन्याची हार. विसावे शतक १९३१ - भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली. १९४८ - पुणे विद्यापीठाची स्थापना. १९८१ - लास व्हेगास येथे हॉटेलला आग. ८ ठार, १९८ जखमी. १९९६ - महासंगणक डीप ब्ल्युने बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्हला हरवले. एकविसावे शतक २००६ - इटलीत तोरिनो येथे विसावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू. २०१३ - महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने जमलेल्या गर्दीमध्ये अलाहाबाद रेल्वेस्थानकात चेंगराचेंगरी होउन ३६ ठार आणि किमान ३९ जखमी. जन्म १६८५ - एरन हिल, इंग्लिश लेखक. १८९४ - हॅरोल्ड मॅकमिलन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. १९५० - मार्क स्पित्झ, अमेरिकन तरणपटू. मृत्यू ११६२ - बाल्डविन तिसरा, जेरुसलेमचा राजा. १२४२ - शिजो जपानी सम्राट. १८२९ - पोप लिओ बारावा. १८३७ - अलेक्सांद्र पुश्किन, रशियन लेखक. १९१८ - दुसरा अब्दुल हमीद, ओस्मानी सम्राट. १९३९ - पोप पायस अकरावा. १९९२ - ऍलेक्स हेली, अमेरिकन लेखक. प्रतिवार्षिक पालन बाह्य दुवे संदर्भ आणि नोंदी फेब्रुवारी ८ - फेब्रुवारी ९ - फेब्रुवारी १० - फेब्रुवारी ११ - फेब्रुवारी १२ - (फेब्रुवारी महिना) वर्ग:दिवस वर्ग:ग्रेगरी दिनदर्शिका वर्ग:आंतरराष्ट्रीय दिनदर्शिका वर्ग:लाल दुवे असणारे लेख
फेब्रुवारी ११
https://mr.wikipedia.org/wiki/फेब्रुवारी_११
ठळक घटना आणि घडामोडी इ.स.पू. सातवे शतक ६६० - सम्राट जिम्मुने जपानचे राष्ट्र निर्माण केले. अठरावे शतक एकोणिसावे शतक १८३० - मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना. विसावे शतक १९११ - डॉ. गोपाळ सदाशिव पळसुले यांनी पुण्यात श्रीकृष्ण होमिओ फार्मसी हा औषधांचा कारखाना सुरू केला. १९७५ - ब्रिटनच्या हुजूर पक्षाने संसदीय नेतेपदी मार्गारेट थॅचर यांची निवड केली. त्या ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत. १९७९ - पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले. १९३३ - म. गांधी यांच्या हरिजन वीकलीचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. १९९९ - मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलायराजा यांना जाहीर. एकविसावे शतक जन्म १५३५ - पोप ग्रेगोरी चौदावा. १५६८ - ऑनॉरे दुर्फे, फ्रेंच लेखक. १७६४ - मरी-जोसेफ दि शेनिये, फ्रेंच कवी. १८०० - विल्यम फॉक्स टॅलबॉट. छायाचित्रकलेचे निर्माते. १८३९ - जोसियाह विलार्ड गिब्स, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. १८४७ - थॉमस अल्वा एडिसन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. १८६९ - एल्से लास्कर-श्युलर, जर्मन लेखक. १८७४ - एल्सा बेस्को, स्वीडिश लेखक. १८८७ - जॉन व्हान मेल, दक्षिण आफ्रिकेचा लेखक. १८९४ - जे.डब्ल्यू. हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १८९८ - लिओ झिलार्ड, हंगेरीचा भौतिकशास्त्रज्ञ. १९०४ - सर कीथ होलियोके, न्यू झीलंडचा पंतप्रधान. १९१७ - सिडनी शेल्डन, अमेरिकन लेखक. १९२० - फारूक, इजिप्तचा राजा. १९२१ - लॉइड बेन्ट्सेन, अमेरिकन सेनेटर. १९२८ - बासरीवादक पं. अरविंद गजेंद्र गडकर १९३३ - सहकारतज्ञ व माजी मंत्री अनंतराव नारायण थोपटे १९३६ - शिक्षणतज्ञ, लेखक डॉ. न.म. जोशी १९३७ - बिल लॉरी, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू. १९३८ - बेव्हन कॉॅंग्डन, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू. १९४२ - गौरी देशपांडे, मराठी लेखिका. १९५३ - जेब बुश, फ्लोरिडाचा राज्यपाल. मृत्यू ६४१ - हेराक्लियस, बायझेन्टाईन सम्राट. ७३१ - पोप ग्रेगोरी दुसरा. ८२४ - पोप पास्कल पहिला. १६२६ - पियेत्रो कॅताल्डी, इटालियन गणितज्ञ. १६५० - रेने देकार्त, फ्रेंच गणितज्ञ व तत्त्वज्ञ. १८६८ - लेऑन फोकॉल्ट, फ्रेंच अंतराळशास्त्रज्ञ. १९२३ - विल्हेल्म किलिंग, जर्मन गणितज्ञ. १९४२ - जमनालाल बजाज, प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते आणि बजाज उद्योगसमूहाचे प्रवर्तक. १९६६ - लालबहादूर शास्त्री स्मृतिदिन १९६८ - पंडित दीनदयाळ उपाध्याय, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष. १९७३ - हान्स डी. जेन्सन, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ. १९७६ - फ्रांक अर्नाऊ, जर्मन कवी, लेखक. १९७७ - फक्रुद्दीन अली अहमद, भारताचे पाचवे राष्ट्रपती. १९७७ - लुई बील, नेदरलॅंड्सचा पंतप्रधान. १९७८ - हॅरी मार्टिन्सन, नोबेल पारितोषिक विजेता स्वीडिश लेखक. १९९१ - रॉबर्ट डब्ल्यू. हॉली, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन जैवरसायनशास्त्रज्ञ. १९९३ - कमाल अमरोही, चित्रपटांचे निर्माते, प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक. १९९६ - केबी मुसोकोट्वाने, झाम्बियाचा पंतप्रधान. १९९६ - सिरिल पूल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९९६ - आमेलिया रॉसेली, इटालियन कवियत्री. २००० - रॉजर व्हादिम, फ्रेंच चित्रपट दिग्दर्शक. २००७ - मॅरियेन फ्रेडरिकसन, स्वीडिश लेखक. २००८ - एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी प्रतिवार्षिक पालन बाह्य दुवे फेब्रुवारी ९ - फेब्रुवारी १० - फेब्रुवारी ११ - फेब्रुवारी १२ - फेब्रुवारी १३ - (फेब्रुवारी महिना) वर्ग:दिवस वर्ग:ग्रेगरी दिनदर्शिका वर्ग:आंतरराष्ट्रीय दिनदर्शिका वर्ग:लाल दुवे असणारे लेख
ग्रेगोरीयन दिनदर्शिका
https://mr.wikipedia.org/wiki/ग्रेगोरीयन_दिनदर्शिका
ग्रेगोरीय दिनदर्शिका ही जगातील सध्या सगळ्यात जास्त प्रचलित असलेली दिनदर्शिका आहे. ही कालमापनपद्धती अलोयसियस लिलियस याने प्रस्तावित केली. तेरावा पोप ग्रेगोरीने पोपचा फतवा काढून २४ फेब्रुवारी १५८२ रोजी तिला अधिकृत मान्यता दिली. ही कालगणनापद्धती मुळात ज्युलियन दिनदर्शिकेवर आधारित आहे. पण दोघांमध्ये ११ दिवसांचा फरक आहे. ज्युलियन कॅलेंडरमधील ४ ऑक्टोबर १५८२ च्या पुढच्या दिवशी ग्रेगोरियन कॅलेंडरची १५ ऑक्टोबर १५८२ ही तारीख आली. एक अधिवेशन म्हणून आणि व्यावहारिक कारणांसाठी, ग्रेगोरियन कॅलेंडर जगभरातील कॅलेंडर वर्ष ठरवण्यासाठी स्वीकारले जाते, जे राष्ट्रांमध्ये संबंध सुलभ करते. हे एकत्रीकरण ऐतिहासिकदृष्ट्या उर्वरित जगात त्याचे मानके निर्यात केले या वस्तुस्थितीवर आधारित आहे. इतिहास जगात वेगवेगळ्या भूप्रदेशांमधे कालौघात वेगवेगळ्या दिनदर्शिका वापरण्यात आल्या आहेत. त्यांपैकी ग्रेगरीय दिनदर्शिकेने आंतरराष्ट्रीय कारभारांकरताच नव्हे तर वेगवेगळ्या राष्ट्रांच्या अंतर्गत कारभारांकरताही गेली चारशे वर्षे जगात अधिकाधिक मान्यता मिळवली आहे. निदान गेली शंभर वर्षे सगळे आंतरराष्ट्रीय कारभार ग्रेगरीय दिनदर्शिका वापरून चालत आहेत. प्रसिद्ध रोमन सम्राट ज्युलियस सीझरने इ.स.पू. ४५ मधे आपल्या नावाने ज्युलियन दिनदर्शिका सुरू केली. त्यापूर्वी रोममधे प्रचलित असलेल्या दिनदर्शिकेप्रमाणेच ती दिनदर्शिका पृथ्वीच्या सूर्यभ्रमणावर अधिष्ठित होती, पण तिच्यातली कालमापनपद्धत सीझरच्या सल्लागारांनी बऱ्यापैकी सुधारलेली होती. पुढे ५७० वर्षांनी डायोनिसीअस एग्झिगस नावाच्या (सध्या रोमेनिया ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशातल्या) एका वजनदार मठवासीने त्यावेळच्या समजूतीनुसार येशू ख्रिस्ताचा जन्म ५२५ वर्षांपूर्वी झाला होता असे धरून तेव्हाचा जू.स. ५७० लोकांनी इ.स. ५२५ मानावा असे सुचवले. ती सूचना हळूहळू युरोपीय लोकांनी स्वीकारली. इ.स. १५८२ पर्यंत ज्युलियन दिनदर्शिकेमागे असलेली कालमापनपद्धतच वापरण्यात येत असे, पण तिच्यात बरेच दोष उरले होते. तेव्हा इ.स. १५८० मधे रोममधल्या क्रिस्ती धर्मगुरू पोप तेराव्या ग्रेगरींनी विद्वानांचे एक मंडळ स्थापून त्या मंडळावर कालमापनपद्धत निर्दोष करण्याची जबाबदारी सोपवली. त्या मंडळाच्या शिफारसींनुसार इ.स. १५८२ मध्ये सध्याची ग्रेगरीय दिनदर्शिका वापरायला रोममध्ये, हळूहळू युरोप खंडात आणि मग सगळ्या जगात सुरुवात झाली. ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसारचे एक वर्ष पृथ्वीच्या सूर्यभ्रमणानुसार अचूकपणे असावे त्यापेक्षा सरासरी २६.३ सेकंद अधिक लांबच आहे! म्हणजे ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसार शतायुषी मानली जाणारी व्यक्ती आपल्या शंभराव्या वर्षी पृथ्वीच्या सूर्यभ्रमणानुसार वास्तविक १०० वर्षे आणि ४३.८३३३३ मिनिटे जगलेली असेल! पण ४०० वर्षांपूर्वी पोप ग्रेगरींनी नियुक्त केलेले खगोलशास्त्रज्ञ सौरवर्षाचे कालमान केवळ सरासरी २६.३ सेकंदाच्या अगदी किरकोळ फरकाने चुकावेत ह्या गोष्टीत दिसणारे त्यांचे खोल ज्ञान फार कौतुकाचे निःसंशय आहे. महिने ग्रेगरी दिनदर्शिकेमध्ये एकूण १२ महिने पुढीलप्रमाणे आहेत. १. जानेवारी २. फेब्रुवारी ३. मार्च ४. एप्रिल ५. मे ६. जून ७. जुलै ८. ऑगस्ट ९. सप्टेंबर १०. ऑक्टोबर ११. नोव्हेंबर १२. डिसेंबर संदर्भ वर्ग:ग्रेगरी दिनदर्शिका वर्ग:कालगणना
अभयारण्य
https://mr.wikipedia.org/wiki/अभयारण्य
इवलेसे|१८२१ मध्ये चार्लस वाटरटन यांनी पहीले अभयारण्य बनवले. इवलेसे|अमेरीकेतील अभयारण्य अभयारण्य म्हणजे कायद्याने संरक्षित केलेले वन, जंगल, अरण्य, तळे किंवा सागर होय. ढोबळमानाने जी नैसर्गिक जैवसंपदा कायद्यान्वये सुरक्षित केली जाते त्यास 'अभयारण्य' म्हणता येईल. यात सागराचा समावेश करण्यामागचे कारण या लेखात पुढे दिलेले आहे. उद्देश अभयारण्यांचा मुख्य उद्देश हा दुर्मीळ होत जाणाऱ्या जैवसंपदेचे संरक्षण करणे आहे. आज काही जातींचे किंवा प्रकारचे जीव आढळत नाहीत (उदा. डायनोसॉर किंवा भीमसरट, स्मायलोडॉन किंवा कट्यारदंती वाघ, वूली मॅमथ किंवा केसाळ हत्ती, डोडो पक्षी, वगैरे). यातील काही प्राणी नष्ट होण्यामागील कारण पूर्णपणे नैसर्गिक होते पण डोडो पक्षी मात्र पूर्णपणे मानवी लोभामुळे नाहीसा झाला. 'डोडो' हे एकच उदाहरण नाही तर रोज २० प्राण्यांच्या जाती, ८ पक्ष्यांच्या जाती, ३३ झाडांच्या जाती तर अंदाज वर्तविण्याच्या बाहेर इतर जीवांच्या जाती नष्ट होत आहेत. त्यामुळे आज विपुल प्रमाणात आढळणाऱ्या जीवांच्या जाती अभयारण्यांचा माध्यमातून संरक्षित करण्याचा प्रयत्‍न केला जात आहे आणि तो बऱ्याच प्रमाणात यशस्वीही होत आहे. दुर्मीळ जैवसंपदेची अधिक माहिती दुर्मिळ जैवसंपदा या लेखामध्ये तसेच लुप्त झालेल्या जैवसंपदेची अधिक माहिती लुप्त जैवसंपदा या लेखामध्ये मिळेल. जगातील अभयारण्ये प्रत्येक अभयारण्याचे वैशिष्टय हे तेथे संरक्षित जैवसंपदेच्या स्वरूपात सांगता येईल, उदाहरणार्थ, भारतातील काझीरंगा अभयारण्य हे भारतीय गेंड्यांसाठी संरक्षित केलेले आहे. केवळ प्राण्यांच्याच जाती नाही तर वनस्पतींच्या, फुलपाखरांच्या, माशांच्या जातीदेखील संरक्षित केल्या जातात. विशेषतः माशांच्या संरक्षणासाठी सागराचा काही भाग हा संरक्षित म्हणून घोषित केल्यामुळे अभयारण्याची व्याख्या थोडी व्यापक करावी लागू शकते. काही प्रसिद्ध अभयारण्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत: आशियातील अभयारण्ये भारतातील अभयारण्ये अभयारण्य जिल्हा (राज्य) संरक्षित जैवसंपदा ताडोबा-अंधारी अभयारण्य चंद्रपूर, महाराष्ट्र भारतीय वाघ भीमाशंकर अभयारण्य महाराष्ट्र शेकरू, भारतीय सांबर मेळघाट अभयारण्य महाराष्ट्र भारतीय वाघ गीर अभयारण्य गुजरात भारतीय सिंह काझीरंगा अभयारण्य आसाम भारतीय एकशिंगी गेंडा ईगलनेस्ट अभयारण्य पश्चिम कामेंग, अरुणाचल प्रदेश बुगुन लिओसिकला पक्षी व इतर अनेक पक्ष्यांच्या प्रजाती भारतातील अन्य अभयारण्ये, भेट देण्यासाठी सोईस्कर महिने आणि राज्ये पक्षी अभयारण्य कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान – सिक्कीम गोरुमारा राष्ट्रीय उद्यान – पश्चिम बंगाल मानस व्याघ्र प्रकल्प, काझीरंगा – आसाम, फुलपाखरांसाठी पक्के अभयारण्य, नामदफा राष्ट्रीय उद्यान, मिश्मी हिल्स (खास पक्ष्यांसाठी) – अरुणाचल प्रदेश लोकतक (सरोवर) राष्ट्रीय उद्यान (संपूर्ण जगात केवळ ६० इतकिच संख्या असलेली थामिन जातीची हरणं येथे पाहता येतील.) – मणीपूर एप्रिल आणि मे दाचिगम राष्ट्रीय उद्यान येथे हंगूल ह्य़ा रेडडिअर जातीची भारतात सापडणारी एकमेव प्रजाती पाहता येते. – काश्मीर दाल लेक हे केवळ बोटिंगसाठीच नाही तर पक्षिवैभव पाहण्यासाठी उत्तम ठिकाण आहे – काश्मीर ग्रेट हिमालयीन राष्ट्रीय उद्यान – हिमाचल प्रदेश कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प, राजाजी राष्ट्रीय उद्यान – उत्तराखंड, गीर राष्ट्रीय उद्यान आणि वेलावदर वन्यजीव अभयारण्य, मरिन नॅशनल पार्क, खेजडिया पक्षी अभयारण्य – गुजरात रणथंबोर व्याघ्र प्रकल्प – राजस्थान, कान्हा बांधवगड, पन्ना, पेंच व्याघ्र प्रकल्प – मध्यप्रदेश ताडोबा, मेळघाट, नागझिरा, नवेगाव, बोर, उमरेड-करंडा – महाराष्ट्र सुंदरबन व्याघ्र प्रकल्प – पश्चिम बंगाल पक्ष्यांसाठी बिंसर वन्यजीव अभयारण्य – (कुमाऊ) उत्तराखंड काली व्याघ्र प्रकल्प (दांडेली) पक्षी आणि प्राणी दोन्हीसाठी. मुख्यत पक्ष्यांसाठी खास – कर्नाटक पेरियार राष्ट्रीय उद्यान, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान, मुन्नार राष्ट्रीय उद्यान, पेरंबिकुलम राष्ट्रीय उद्यान – केरळ चीनमधील अभयारण्ये अफ्रिकेतील अभयारण्ये टांझानियातील अभयारण्ये अभयारण्य जिल्हा (राज्य) संरक्षित जैवसंपदा सेरेंगेटी अभयारण्य ?? नू, अफ़्रिकन सिंह, अफ़्रिकन गेंडा, अफ़्रिकन चित्ता, अफ़्रिकन हत्ती, अफ़्रिकन झेब्रा उत्तर अमेरिकेतील अभयारण्ये दक्षिण अमेरिकेतील अभयारण्ये युरोपातील अभयारण्ये ऑस्ट्रेलियातील अभयारण्ये आर्क्टिकमधील अभयारण्ये अंटार्क्टिकामधील अभयारण्ये पहा : विदर्भातील अभयारण्ये बाह्य दुवे संयुक्त राष्ट्र संरक्षित प्रदेशांबद्दलचे अधिकृत संकेतस्थळ *
मराठी दिनदर्शिका
https://mr.wikipedia.org/wiki/मराठी_दिनदर्शिका
मराठी दिनदर्शिका:- मराठी दिनदर्शिका ही पंचांगावर आधारित असते.महालक्ष्मी,कालनिर्णय तसेच विविध पतसंस्था,कार्यकारी संस्था यांच्या दिनदर्शिका महाराष्ट्रातील प्रत्येक घरांमध्ये वापरल्या जातात.दिनदर्शिका मराठीत असूनदेखील याचे वर्गीकरण इंग्रजी बारा महिन्यात केलेले आहे. इंग्रजी महिने -जानेवारी,फेब्रुवारी,मार्च,एप्रिल,मे,जून,जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ,ऑक्टोबर,नोव्हेंबर,डिसेंबर. मराठी महिन्यात येणाऱ्या सणांची माहिती सविस्तर दिलेली असते. मराठी महिने-चैत्र,वैशाख,जेष्ठ,आषाढ,श्रावण, भाद्रपद,अश्विन, कार्तिक,मार्गशीर्ष,पौष, माघ, फाल्गुन बाह्य दुवे कालनिर्णय दिनदर्शिका - लोकप्रिय मराठी दिनदर्शिका मराठी सण, उत्सव, दिनविशेष यांची मराठी दिनदर्शिका. पंचांग * वर्ग:रिकामी पाने
भारतीय विज्ञान संस्था
https://mr.wikipedia.org/wiki/भारतीय_विज्ञान_संस्था
right|thumbnail|भारतीय विज्ञान संस्थेची मुख्य इमारत भारतीय विज्ञान संस्था (इंग्लिश: Indian Institute of Science) ही संशोधन आणि उच्च शिक्षणासाठी असलेली अग्रेसर शिक्षण संस्था बंगळूर, भारत येथे आहे. या संस्थेत पदव्युत्तर तसेच doctoral कार्यक्रम आहेत. ज्यामध्ये २०० पेक्षा अधिक संशोधक ३७ पेक्षा अधिक विभागांमध्ये काम करतात. उदाहरणार्थ: अभियान्त्रिकीमध्ये आंतरिक्ष अभियांत्रिकी, संगणकशास्त्र आणि स्वयंचलन इत्यादी, आणि शास्त्रांमध्ये भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र इत्यादी. भारतीय विज्ञान संस्था भारतातील संशोधनसंस्थांमध्ये पहिल्या दर्जाची संस्था आहे. इतिहास भारतीय विज्ञान संस्था सन १९०९ मध्ये उद्योगपती जमशेदजी टाटा यांच्या दूरदृष्टीतुन जन्माला आली. सन १८९८ मध्ये एक तात्पुरती समिती स्थापन करण्यात आली. नोबेल पारितोषिक विजेते सर विलियम रॅम्से यांनी बंगळूर हे आदर्श ठिकाण सुचवले आणि मॉरिस ट्रॅव्हर्स संस्थेचे पहिले संचालक बनले. काही प्रसिद्ध माजी विद्यार्थी आणि संस्थेशी निगडित असणाऱ्या व्यक्ती ए.पी.जे. अब्दुल कलाम जमशेदजी टाटा जवाहरलाल नेहरू जी.एन. रामचंद्रन राजा रामण्णा सतीश धवन चंद्रशेखर वेंकट रामन सी.एन.आर. राव विक्रम साराभाई मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या होमी भाभा बाह्य दुवे भारतीय विज्ञान संस्था भारतीय विज्ञान संस्था परिसर वर्ग:भारतातील शैक्षणिक संस्था वर्ग:बंगळूर
महालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)
https://mr.wikipedia.org/wiki/महालक्ष्मी_मंदिर_(कोल्हापूर)
कालनिर्णय दिनदर्शिका
https://mr.wikipedia.org/wiki/कालनिर्णय_दिनदर्शिका
कालनिर्णय दिनदर्शिका ही महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय दिनदर्शिका आहे. रोजचे पंचांग, महत्त्वाचे दिनविशेष सोप्या भाषेत यात नमूद केलेल्या असतात. या दिनदर्शिकेच्या प्रत्येक मागील पानावर नामांकित लेखकांचे लेख, स्वयंपाक टिप्स, रेल्वे वेळापत्रक, मासिक राशिभविष्य, इत्यादी वाचता येते. वि. वा. शिरवाडकर, पु.ल.देशपांडे, दुर्गा भागवत, जयवंत दळवी, व्यंकटेश माडगूळकर, शान्ता शेळके,वपु काळे इत्यादी सुप्रसिद्ध लेखकांनी तसेच सचिन तेंडुलकर,माधुरी दीक्षित,सुनील गावस्कर, शरद पवार यांसारख्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या दिनदर्शिकेसाठी लेखन केले आहे. इतिहास ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर right|thumb|जयंत साळगावकर बाह्य दुवे कालनिर्णयचे अधिकृत संकेतस्थळ वर्ग:मराठी दिनदर्शिका वर्ग:भारतीय दिनदर्शिका वर्ग:खास दिनदर्शिका
मे ९
https://mr.wikipedia.org/wiki/मे_९
ठळक घटना आणि घडामोडी अकरावे शतक १०९२ - इंग्लंडच्या लिंकनशायर काउंटीत लिंकन कॅथेड्रल खुले. पंधरावे शतक १४५० - तैमुर लंगचा नातू अब्द अल लतीफची हत्या. सोळावे शतक १५०२ - क्रिस्टोफर कोलंबस आपल्या चौथ्या व अखेरच्या सफरीवर नव्या जगाकडे निघाला. सतरावे शतक १६७१ - थॉमस ब्लडने टॉवर ऑफ लंडनमधून खजिना लुटण्याचा प्रयत्न केला. एकोणिसावे शतक १८६८ - अमेरिकेच्या नेव्हाडा राज्यातील रिनो शहराची स्थापना. १८७४ - मुंबईत घोड्याने ओढलेल्या ट्राम सुरू.ट्राम ओढण्यासाठी आणलेल्या विलायती घोड्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना टोप्या घालत असत. ही ट्रामसेवा सुमारे ३१ वर्षे सुरू होती. १८७७ - पेरू देशाच्या किनारपट्टीवरील झालेल्या ८.८ तीव्रतेच्या भूकंपामुळे २५४१ लोक ठार झाले. विसावे शतक १९०१ - मेलबॉर्नमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संसदेचे पहिले अधिवेशन सुरू. १९१४ - जे.टी. हर्न प्रथम वर्गीय क्रिकेटमध्ये ३,००० बळी घेणारा प्रथम खेळाडू झाला. १९१५ - पहिले महायुद्ध - आर्त्वाची दुसरी लढाई. १९२७ - ऑस्ट्रेलियाच्या संसदेचे नवीन राजधानी कॅनबेरा येथील पहिले अधिवेशन सुरू. १९३६ - इटलीने इथियोपिया बळकावले. १९४० - दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या यु.९ या पाणबुडीने फ्रांसची डोरिस या पाणबुडीचा नाश केला. १९४१ - दुसरे महायुद्ध - जर्मनीची यु.११० ही पाणबुडी ब्रिटीश आरमाराने पकडली. यातून एनिग्मा हे सांकेतिक भाषेत संदेश पाठविण्याचे यंत्र मिळाले. १९४२ - दुसरे महायुद्ध - बेलग्रेडमध्ये ज्यू व्यक्तिंची सैनिकांकडून सामूहिक हत्या. १९४५ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने हरमान गोरिंगला पकडले. १९४५ - दुसरे महायुद्ध - नॉर्वेच्या सैन्याने व्हिडकुन क्विसलिंगला पकडले. १९४५ - दुसरे महायुद्ध - लाल सैन्याने प्रागमध्ये प्रवेश केला. १९४६ - इटलीत व्हिक्टर इम्मॅन्युएल तिसऱ्याने पदत्याग केला. उंबेर्तो दुसरा राजेपदी. १९४९ - रैनिये तिसरा मोनॅकोच्या राजेपदी. १९५५ - पश्चिम जर्मनीला नाटोमध्ये प्रवेश. १९५६ - टी. इमानिशी व ग्याल्झेन नोर्बु यांनी नेपाळ मधील मनस्लौ शिखर सर केले. १९६० - अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या विकण्यास परवानगी. १९७० - व्हियेतनाम युद्ध - अमेरिकेत ८०,००० व्यक्तिंची व्हाईट हाउस समोर निदर्शने. १९७४ - वॉटरगेट कुभांड - अमेरिकेच्या विधीमंडळाने राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनविरुद्ध महाभियोग सुरू केला. १९८० - फ्लोरिडातील सनशाईन स्कायवे ब्रिजला लायबेरियाच्या मालवाहू जहाज एस.एस. समिट व्हेन्चरची धडक. ३५ ठार. १९८७ - पोलंडच्या लॉट एरलाइन्सचे आय.एल.६२एम. जातीचे विमान वॉर्सोच्या विमानतळावर कोसळले. १८३ ठार. १९९२ - प्लिमथ, नोव्हा स्कॉशिया येथील वेस्ट्रे खाणीत स्फोट. २६ कामगार ठार. १९९४ - नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी. एकविसावे शतक २००२ - रशियातील कास्पिस्क शहरात बॉम्बस्फोट. ४३ ठार, १३० जखमी. २००४ - एका जाहीर कार्यक्रमात व्यासपीठाखाली ठेवलेल्या बॉम्बच्या स्फोटात चेच्न्याच्या राष्ट्राध्यक्ष अखमद काडिरोव्हचा मृत्यू. २००६ - तास्मानियात खाणीतील अपघातानंतर १४ दिवस जमिनीखाली अडकलेल्या दोन कामगारांची सुटका. जन्म ११४७ - मिनामोटोनो योरिमोटो, जपानी शोगन. १४३९ - पोप पायस तिसरा. १५४०: मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप १८१४ - दादोबा पांडुरंग तर्खडकर, इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार १८३७ - ऍडम ओपेल, जर्मन अभियंता. १८६६ - गोपाळ कृष्ण गोखले, भारतीय स्वातंत्र्यसेनानी, मराठी समाजसुधारक. १८८६: स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेधे १८९२ - झिटा, ऑस्ट्रियाची साम्राज्ञी. १९०१ - जॉर्ज डकवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९२७ - मॅन्फ्रेड आयगेन, जर्मन जैवभौतिकशास्त्रज्ञ. १९२८ - वसंत नीलकंठ गुप्ते, मराठी कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक. १९३२ - कॉन्राड हंट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. १९४२ - जॉन ऍशक्रॉफ्ट, अमेरिकन सेनेटर. १९४३ - मॉरिस फॉस्टर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. १९५९ - अँड्रु जोन्स, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. १९५९ - अशांत डिमेल, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. मृत्यू १३३८: भगवद्‍भक्त चोखा मेळा हा मंगळवेढे येथील गावकुस बांधत असताना कोसळणाऱ्या कुसबाखाली सापडला. १४४६ - मेरी, नेपल्सची राणी. १९१७: डॉक्टर, कवी व शास्त्रज्ञ कान्होबा रणझोडदास . १९१९: रेव्हरंड नारायण वामन टिळक १९३१: वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक अल्बर्ट मायकेलसन १९५९ - कर्मवीर भाऊराव पाटील, मराठी शिक्षणतज्ञ. १९४९ - लुई दुसरा, मोनॅकोचा राजा. १९७८ - अल्डो मोरो, इटलीचा पंतप्रधान. १९८६ - तेनझिंग नॉर्गे, नेपाळी शेरपा; एडमंड हिलरी बरोबर एव्हरेस्ट सर करणारा प्रथम माणूस. १९९५: दिग्दर्शक अनंत माने– पाच तपांहुन अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक. ’पिंजरा’, ’लक्ष्मी’, ’सुशीला’, ’आई’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. ’अनंत आठवणी’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.   १९९८ - तलत मेहमूद, पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा . १९९९: उद्योगपती करमसीभाई जेठाभाई सोमय्या २००८: किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक पं. फिरोझ दस्तूर २०१३- धृपदगायक झिया फरिदुद्दीन डागर २०१४: भारतीय राजकारणी नेदुरुमल्ली जनार्दन रेड्डी प्रतिवार्षिक पालन जागतिक थॅलस्सेमिया दिन. विजय दिन - रशिया व भूतपूर्व सोवियेत संघातील राष्ट्रे. युरोप दिन - युरोपीय संघ. मुक्ति दिन - जर्सी, गर्न्सी व ईतर चॅनेल द्वीपे. स्वातंत्र्य दिन : रोमानिया बाह्य दुवे मे ७ - मे ८ - मे ९ - मे १० - मे ११ - (मे महिना)
मे १०
https://mr.wikipedia.org/wiki/मे_१०
ठळक घटना आणि घडामोडी इ.पू. २८ : सौरडागांचे पहिले ज्ञात निरीक्षण चीनमध्ये नोंदले गेले तेरावे शतक १२९१ - स्कॉटिश सरदारांनी इंग्लंडचा राजा एडवर्ड पहिला याचे वर्चस्व स्वीकारले. सोळावे शतक १५०३ - क्रिस्टोफर कोलंबसने केमन द्वीपसमूहाला भेट दिली व त्यांचे नामकरण ला तोर्तुगा असे केले. १५३४ - जॉक कार्टियेने न्यू फाउंडलंड भेट दिली. अठरावे शतक १७६८ - न्यू ब्रिटोन या नियतकालिकात राजा जॉर्ज तिसऱ्यावर टीका करणारा लेख लिहिल्याबद्दल जॉन विल्किसला तुरुंगात टाकण्यात आले. लंडनमध्ये दंगे. १७७३ : ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीला अमेरिकन बाजारपेठेची मक्तेदारी देणारा टी अ‍ॅक्ट ब्रिटिश पार्लमेंटमध्ये संमत झाला. १६ डिसेंबरची विख्यात 'बॉस्टन टी पार्टी' त्याविरोधात होती १७७४ - लुई सोळावा फ्रांसच्या राजेपदी. १७७५ - अमेरिकन क्रांती - कर्नल बेनेडिक्ट आर्नोल्ड व इथन ऍलेनच्या सैन्याने फोर्ट टिकॉन्डेरोगा हा किल्ला जिंकला. १७७५ - अमेरिकन क्रांती - अमेरिकेच्या १३ वसाहतींच्या प्रतिनिधींनी खंडीय सैन्याची उभारणी केली व त्याचे नेतृत्व व्हर्जिनीयाच्या कॅव्हेलियर जॉर्ज वॉशिंग्टनकडे दिले. १७९६ - नेपोलियन बोनापार्टने इटलीत ऑस्ट्रियाच्या सैन्याचा पराभव केला. एकोणिसावे शतक १८०१ - ट्रिपोलीच्या बार्बेरी चाच्यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले. १८१८: इंग्रज व मराठे यांच्यात तह होऊन रायगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. १८२४: लंडनमधील नॅशनल गॅलरी सर्वसाधारण लोकांसाठी खुली करण्यात आली. १८५७ - पहिला भारतीय स्वातंत्र्य संग्राम सुरू.ब्रिटिशांविरोधात उठावाची पहिली ठिणगी मीरतला पडली १८६५ - अमेरिकन यादवी युद्ध - उत्तरेच्या सैन्याने दक्षिणेच्या राष्ट्राध्यक्ष जेफरसन डेव्हिसला पकडले. १८६९ - अमेरिकेचे दोन्ही किनारे रेल्वेने जोडले गेले. युटाहमधील प्रोमोन्टरी पॉईंट येथे पूर्व आणि पश्चिमेकडून बांधत आलेले लोहमार्ग जोडले गेले. १८७७ - रोमेनियाने स्वतःला तुर्कस्तानपासून स्वतंत्र जाहीर केले. विसावे शतक १९०९ - सावरकरांनी ब्रिटिशांच्या आनंदोत्सवाला प्रत्युत्तर म्हणून लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये १८५७ च्या वीरांचा गौरव करणारा समारंभ आयोजित केला. त्यात त्यांनी आपल्या भाषणात त्या संघर्षाला उघड उघड स्वातंत्र्यसमर म्हटले. १९२२ - अमेरिकेने किंगमन रीफ हा द्वीपसमूह बळकावला. १९२४ - जे. एडगर हूवर अमेरिकेच्या एफ.बी.आय.च्या निदेशकपदी. हूवर १९७२ पर्यंत या पदावर होता. १९३३ - जर्मनीत नाझींनी पुस्तकांची जाहीर होळी केली. १९३७: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रत्‍नागिरीच्या स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्तता. १९४० - दुसरे महायुद्ध - जर्मनीने इंग्लंडच्या पेलहाम गावावर बॉम्बफेक केली. १९४० - दुसरे महायुद्ध - जर्मनीने बेल्जियम, नेदरलँड्स व लक्झेम्बर्गवर आक्रमण केले. १९४० - दुसरे महायुद्ध - नेव्हिल चेम्बरलेनने राजीनामा दिल्यावर विन्स्टन चर्चिल युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी. १९४१ - दुसरे महायुद्ध - लुफ्तवाफेच्या बॉम्बफेकीत इंग्लंडचे हाउस ऑफ कॉमन्स नष्ट. १९६० - अमेरिकेच्या परमाणुचलित पाणबुडी यु.एस.एस. ट्रायटनने पाण्याखालून पृथ्वीप्रदक्षिणा केली. १९६९ - व्हियेतनाम युद्ध - हॅम्बर्गर हिलची लढाई. १९७९ - मायक्रोनेशिया प्रजासत्ताक झाले. १९८१ - फ्रांस्वा मित्तरां फ्रांसचा राष्ट्राध्यक्षपदी. १९८१ : मुंबईत पहिला विद्युतप्रकाशातला क्रिकेट सामना खेळला गेला १९९३ - थायलंडमध्ये खेळण्यांच्या कारखान्यास आग. १८८ ठार. १९९३: तीन महिला सदस्य असलेल्या एका तुकडीने माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्‍च शिखर सर केले. त्यातील २३ वर्षाच्या संतोष यादवने हे शिखर दुसऱ्यांदा सर करणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान मिळवला. एका वर्षाच्या आत हे शिखर सर करणारी ती जगातील पहिली महिला बनली. १९९४: दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांनी देशाची सूत्र हाती घेतली. १९९६ - एव्हरेस्टवर हिमवादळ. चढाई करणारे ८ व्यक्ति ठार. १९९७ - ७.३ मेगावॅट भूकंपाच्या तीव्र धक्क्याने इराण मधील सुमारे १५६७ लोक ठार, २३०० लोक जखमी आणि ५०००० लोक बेघर झाले. एकविसावे शतक २००२ - घानामध्ये फुटबॉलचा सामना सुरू असताना चेंगराचेंगरी. १२० ठार. जन्म १२६५ - फुशिमि, जपानी सम्राट. १८३८ - जॉन विल्क्स बूथ, अब्राहम लिंकनचा मारेकरी. १८५५: भारतीय गुरू आणि शिक्षक युकतेश्वर गिरी १८६३- संगीतकार, लेखक आणि चित्रकार उपेंद्रकिशोर राय १८७८ - गुस्ताव स्ट्रेसमान, जर्मनीचा चान्सेलर. १८८९: स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू, कादंबरीकार नारायण दामोदर सावरकर १८९७ - आयनार गेऱ्हार्डसन, नॉर्वेचा पंतप्रधान. १९०५: गायक व संगीतकार पंकज मलिक १९०९: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालयशास्त्रज्ञ, पद्मश्री, इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटरचे पहिले संचालक बेल्लारी शामण्णा केशवन. १९१४: चित्रपट निर्माते ताराचंद बडजात्या १९१८: रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरनाथ काओ १९२७ - नयनतारा सहगल भारतीय लेखिका. १९३१: ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबूडकर १९४०: प्रसिद्धी पराङमुख गीतकार व कवी माणिकराव गोडघाटे ऊर्फ ग्रेस १९५५ - मार्क चॅपमन, जॉन लेननचा मारेकरी. १९५८ - तौसीफ अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. १९६० - बोनो, आयरिश गायक. मृत्यू १०३४ - मियेस्झ्को दुसरा, पोलंडचा राजा. १४२४ - गो-कामेयामा, जपानी सम्राट. १४८२ - पाओलो डाल पोझो टोस्कानेली, इटलीचा गणितज्ञ व अंतराळतज्ञ. १७३७ - नाकामिकाडो, जपानी सम्राट. १७७४ - लुई पंधरावा, फ्रांसचा राजा. १८६३ - स्टोनवॉल जॅक्सन, अमेरिकन गृहयुद्धातील दक्षिणेचा सेनापती. १८९९: रॅंड वधाच्या प्रकरणी द्रविड बंधूंची हत्या केल्याबद्दल महादेव विनायक रानडे यांना फाशी. १९८१: विनोदी लेखक प्राध्यापक विमादि तथा विनायक माधव दीक्षित पटवर्धन १९९८: पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार, साधना मासिकाचे संपादक यदुनाथ दत्तात्रय थत्ते २०००: कवी नागोराव घन:श्याम तथा ना. घ. देशपांडे २००१ - जलक्रांतीचे जनक सुधाकरराव नाईक, महाराष्ट्राचे १३ वे मुख्यमंत्री, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल . २००२: गीतकार सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ कैफी आझमी २०१५: भारतीय इतिहासकार, लेखक निनाद बेडेकर प्रतिवार्षिक पालन संविधान दिन - मायक्रोनेशिया. पालक दिन - दक्षिण कोरिया. मातृ दिन - मेक्सिको. जलसंधारण दिन - महाराष्ट्र. बाह्य दुवे मे ८ - मे ९ - मे १० - मे ११ - मे १२ - (मे महिना)
मे ८
https://mr.wikipedia.org/wiki/मे_८
ठळक घटना आणि घडामोडी सोळावे शतक १५४१ - स्पॅनिश शोधक हर्नान्दो दि सोटो मिसिसिपी नदीच्या मुखाजवळ पोचला. त्याने या नदीचे नाव रियो दे एस्पिरितु सांतो असे ठेवले. अठरावे शतक १७९४ - फ्रेंच क्रांतीच्या काळात सरकारी नोकर असलेल्या रसायनशास्त्रज्ञ ऑंत्वान लेवॉइझियेला पकडून खटला चालवण्यात आला व संध्याकाळच्या आत त्याचा गिलोटिन वर वध केला गेला. एकोणिसावे शतक १८४६ - मेक्सिकन-अमेरिकन युद्ध-पॅलो आल्टोची लढाई. १८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेने रिचमंड, व्हर्जिनिया आपली राजधानी असल्याचे जाहीर केले. १८८६ - डॉ.जॉन स्टाइथ पेम्बरटनने कोका कोला प्रथमतः तयार केले. १८९६ - इंग्लिश काउंटी क्रिकेट स्पर्धेत यॉर्कशायरने वॉरविकशायर विरुद्ध ८८७ धावांची विक्रमी खेळी केली. १८९९ - रॅंड वधाच्या प्रकरणी फितुरी करणाऱ्या द्रविड बंधूंना ठार मारणाऱ्या वासुदेव चाफेकर यांना फाशी. विसावे शतक १९०२ - मार्टिनिक बेटावर माउंट पेली या ज्वालामुखीचा उद्रेक. सेंट पिएर हे शहर उद्ध्वस्त. ३०,००० ठार. १९१२ - पॅरामाऊंट पिक्चर्स (Paramount Pictures) या कंपनीची स्थापना झाली. १९३२- पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य पं. विनायकराव पटवर्धन यांनी पुणे येथे गांधर्व महाविद्यालय सुरू केले. १९३३ - महात्मा गांधींचे २१-दिवसांचे उपोषण चालू. १९४५ - दुसरे महायुद्ध-युरोप विजय दिन - जर्मनीची दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती. युरोपमधील युद्ध समाप्त. १९४५ - सेटीफची कत्तल - फ्रान्सच्या सैन्याने अल्जीरियात हजारो नागरिकांना ठार मारले. १९६२- पश्चिम बंगालमधील कलकत्ता येथे रवींद्र भारती विश्वविद्यालयाची स्थापना. १९७३ - अमेरिकेच्या दक्षिण डाकोटा राज्यातील वुन्डेड नी येथील मूळ अमेरिकन व्यक्तिंचा ७१ दिवस चाललेला वेढा बिनशर्त शरणागती नंतर उठला. १९७४ - कॅनडाचे सरकार अल्पमतात येउन कोसळले. १९७४ - रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप झाला. सरकारविरुद्धचा असंतोष वाढत जाऊन आणीबाणी पुकारली जाण्याला जी कारणे घडली, त्यात हा संप महत्त्वाचा मानला जातो. १९७८ - रेनहोल्ड मेस्नर व त्याचा सहकारी ऑक्सिजनच्या नळकांड्याविना एव्हरेस्टवर पोहोचले. १९८४ - सोवियेत संघाने लॉस एंजेल्समधील तेविसावे ऑलिंपिक खेळांवर बहिष्कार टाकला. १९८४ - डेनिस लॉर्टीने कॅनडातील क्वेबेक प्रांताच्या विधानसभेत गोळ्या चालवल्या. ३ ठार. १३ जखमी. १९९७ - चायना सदर्न एरलाइन्सचे बोईंग ७३७ जातीचे विमान शेंझेन विमानतळावर उतरत असताना कोसळले. ३५ ठार. एकविसावे शतक २००० : लंडनमध्ये टेट मॉडर्न गॅलरी प्रसारमाध्यमांसाठी खुली झाली. आधुनिक कलेच्या जगातील सर्वात महत्त्वाच्या संग्रहालयांपैकी टेट हे एक आहे. २००७ - उत्तर आयर्लंडमध्ये सत्तांतर. जन्म १७५३ - मिगेल हिदाल्गो, मेक्सिकोचा स्वातंत्र्यसैनिक. १८२८ - ज्यॉॅं हेन्री ड्युनांट, रेड क्रॉसचा संस्थापक. १८८४ - हॅरी ट्रुमन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष. १९०६: भारताचे माजी भूसेनाप्रमुख प्राणनाथ थापर १९१६ - स्वामी चिन्मयानंद, भारतीय तत्त्वज्ञानी. १९१६- भारतीय सिनेमॅटोग्राफर रामानंद सेनगुप्ता १९२५ - अली हसन म्विन्यी, टांझानियाचा राष्ट्राध्यक्ष. १९२९- गायिका गिरिजा देवी १९३८ - जावेद बर्की, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. १९७० - मायकेल बेव्हन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९६१ - रियाझ पूनावाला, संयुक्त अरब अमिरातीचा क्रिकेट खेळाडू. १९८९: भारतीय बेसबॉलपटू दिनेश पटेल मृत्यू ५३५ - पोप जॉन दुसरा. १२७८ - दुआनझॉॅंग, चीनी सम्राट. १३१९ - हाकोन पाचवा, नॉर्वेचा राजा. १७७३ - अली बे अल-कबीर, इजिप्तचा सुलतान. १७९४ - आंत्वान लेव्हॉइझिये, फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ. १८१९ - कामेहामेहा, हवाईचा राजा. १८९९ - वासुदेव चाफेकर, भारतीय क्रांतिकारक. १९२० : पाली भाषा व बौद्ध साहित्य या विषयावरचे अभ्यासक चिंतामण वैजनाथ राजवाडे १९५२ : फॉक्स थियेटरचे संस्थापक विल्यम फॉक्स १९७२ : भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पांडुरंग वामन काणे १९८१ : डॉ. केशव नारायण वाटवे – संस्कृतज्ञ, मराठी कवी. रसविमर्श, संस्कृत काव्याचे पंचप्राण, पाच मराठी कवी, संस्कृत सुबोधिनी (भाग १ ते ३), संस्कृत मुक्तहार (भाग १ ते ३) इ. पुस्तके त्यांनी लिहिली. १९८२ -४० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी अनिल उर्फ आत्माराम रावजी देशपांडे   १९८४ : रीडर्स डायजेस्टचे सहसंस्थापक लीला बेल वालेस १९९५ : पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दी प्रेम भाटिया १९९५ : देवदेवतांची आणि संतांची चित्रे चितारण्यासाठी प्रसिद्ध असलेले चित्रकार जि.भी. दीक्षित १९९९ : कलादिग्दर्शक श्रीकृष्ण समेळ २००३ : संस्कृत व प्राकृत विद्वान डॉ. अमृत माधव घाटगे २००३ - ‘भारतीय व्यवहार कोश’ आणि ‘भारतीय कहावत संग्रह’चे संपादक, कोशकार विश्वनाथ दिनकर नरवणे २०१३ : धृपद गायक झिया फरिदुद्दीन डागर २०१४ : जीपीएस प्रणालीचे सहसंशोधक रॉजर एल ईस्टन  प्रतिवार्षिक पालन जागतिक रेडक्रॉस दिन. युरोप विजय दिन. जागतिक थॅलेसेमिया जागरुकता दिन रेड क्रेसेंट दिन वर्धापनदिन : रवींद्र भारती विद्यापीठ, कोलकाता (१९६२) बाह्य दुवे मे ६ - मे ७ - मे ८ - मे ९ - मे १० - (मे महिना)
मे ४
https://mr.wikipedia.org/wiki/मे_४
ठळक घटना आणि घडामोडी पंधरावे शतक १४९३ - पोप अलेक्झांडर सहाव्याने नवे जग स्पेन व पोर्तुगालमध्ये वाटुन दिले. १४९४ - क्रिस्टोफर कोलंबस जमैकाला पोचला. सतरावे शतक १६२६ - डच शोधक पीटर मिनुइत न्यू ऍम्स्टरडॅम (आत्ताचे मॅनहॅटन) येथे पोचला. अठरावे शतक १७१५ - पहिली घडीची छत्री फ्रान्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध. १७९९ - श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतान ब्रिटिशांकडून मारला गेला. एकोणिसावे शतक १८१४ - नेपोलियन बोनापार्ट हद्दपारीची शिक्षा भोगण्यासाठी एल्बा येथे पोचला. १८५४ - भारतातील पहिले टपाल तिकिट प्रकाशित झाले. १८६९ - हाकोदातेची लढाई. विसावे शतक १९०४ - अमेरिकेने पनामा कालव्याचे काम सुरू केले. १९१० - कॅनडाचे आरमार, रॉयल केनेडियन नेव्हीची रचना. १९१२ - इटलीने ऱ्होड बेट बळकावले. १९२४ - १९२४ उन्हाळी ऑलिंपिक पॅरिसमध्ये सुरू. १९३० - ब्रिटीश पोलिसांनी महात्मा गांधींना अटक करून येरवडा तुरुंगात ठेवले. १९४२ - दुसरे महायुद्ध - कॉरल समुद्राची लढाई सुरू. १९४५ - दुसरे महायुद्ध - जर्मनीत हांबुर्ग जवळ नॉएनगामे कॉॅंसेन्ट्रेशल कॅम्पच्या बंदींची सुटका. १९४५ : पाच वर्षांच्या नाझी गुलामीनंतर डेन्मार्क पुन्हा स्वतंत्र. १९४९ - इटलीच्या तोरिनो शहराचा फुटबॉल संघ घेउन जाणारे विमान कोसळले. संपूर्ण संघ व ईतर मदतनीस ठार. १९५९ - पहिला ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा साजरा झाला. १९६७: श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक येथील मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्याचा अधिकार सर्वांना आहे असा उच्च न्यायालयाचा निर्णय. १९७० - अमेरिकेतील केंट, ओहायो येथील केंट स्टेट युनिव्हर्सिटीत व्हियेतनाम युद्धाविरुद्ध निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा गोळीबार. ४ ठार, ९ जखमी. १९७९ - मार्गारेट थॅचर युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी. १९८९: सर्व पंचायत समित्यांमध्ये महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव, अशी घोषणा पंतप्रधान राजीव गांधी यांनी केली. १९९० - लात्व्हियाने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले. १९९२: संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला. १९९४ : गाझा पट्टी आणि येरिको या पॅलेस्टिनी भागाच्या स्वायत्ततेसाठी इस्राएली नेते यित्झाक राबिन आणि पॅलेस्टिनी नेते यासर अराफत यांच्यात शांती करार. १९९५: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला. १९९६ - होजे मारिया अझनार स्पेनच्या पंतप्रधानपदी. १९९६: जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला ६ तर एन. कुंजुराणीदेवीला दोन रौप्यपदके मिळाली. एकविसावे शतक २००२ - नायजेरियाच्या ई.ए.एस. एरलाइन्सचे बी.ए.सी.१-११-५०० प्रकारचे विमान कानोहून निघाल्यावर कोसळले. १४८ ठार. जन्म १००८ - हेन्री पहिला, फ्रांसचा राजा. ११३१ - महात्मा बसवेश्वर, मध्यकालीन थोर समाजसुधारक. १६४९ - छत्रसाल बुंदेला, बुंदेलखंडचा राजा. १६५४ - कांग्क्सी, चीनी सम्राट. १७६७ - त्यागराज, भारतीय संगीतकार. १८२५: ब्रिटीश जीवशास्रज्ञ आणि विज्ञानकथा लेखक थॉमास हक्सले १८४७: धार्मिक आणि राष्ट्रीय मनोवृत्तीचे पुण्यातील एक नामांकित धन्वंतरी व लोकमान्य टिळकांचे स्‍नेही महर्षी विनायक रामचंद्र उर्फ अण्णासाहेब पटवर्धन १८४९: ज्योतिरिंद्रनाथ टागोर – थोर बंगाली साहित्यिक, नाटककार, संगीतकार, चित्रकार व संपादक, रविंद्रनाथ टागोर यांचे वडील बंधू, त्यांनी लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्याचे बंगालीत भाषांतर केले १९२८ - होस्नी मुबारक, इजिप्तचा पंतप्रधान. १९२९ - ऑड्रे हेपबर्न, ब्रिटीश अभिनेत्री. १९३३: प्रख्यात मराठी कादंबरीकार बाबा कदम १९३४: भावगीत गायक अरुण दाते १९४०: इंग्लिश कादंबरीकार रॉबिन कुक १९४२: विज्ञान आणि तंत्रज्ञान सल्लगार सॅम पित्रोदा १९४३: भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्रसांत पटनाईक १९४५: ज्येष्ठ पत्रकार एन. राम. १९५७ - पीटर स्लीप, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९६० - मार्टिन मॉक्सॉन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९७० - पॉल वाईझमन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. १९८१ - जॉक रूडॉल्फ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू. १९८३ - डॅनियल क्रिस्चियन, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू. १९५८ - रवी बोपारा, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९८४ - मंजुरल इस्लाम, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू. मृत्यू १५०६ - हुसेन बयकराह, हेरतचा राजा. १७९९ - टिपू सुलतान. १९८० - जोसेफ ब्रोझ टिटो, युगोस्लाव्हियाचा राष्ट्राध्यक्ष. प्रतिवार्षिक पालन जागतिक कोळसा कामगार दिन. जागतिक अस्थमा दिन. स्मृती दिन - नेदरलँड्स. युवा दिन - चीन. स्वातंत्र्य दिन - लात्व्हिया. आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन जागतिक दमा दिन बाह्य दुवे मे २ - मे ३ - मे ४ - मे ५ - मे ६ - (मे महिना)
मे ६
https://mr.wikipedia.org/wiki/मे_६
ठळक घटना आणि घडामोडी सोळावे शतक १५४२ - संत फ्रांसिस झेव्हिअर तत्कालीन पोर्तुगीज गोव्याची राजधानी ओल्ड गोवा येथे पोहोचला. सतरावे शतक १६३२ - मुघल सम्राट शाहजहान व आदिलशहा यांच्यामधे शहाजीला पराभूत करण्याबद्दल तह झाला. अठरावे शतक १७३९ - चिमाजीअप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी वसई मोहीम जिंकून उत्तर कोकण मराठा साम्राज्यात आणले. एकोणिसावे शतक १८१८ - राजधानी रायगड लढवत असताना शेवटच्या बाजीरावाची पत्‍नी वाराणशीबाई इंग्रजांकडून पराभूत झाली. १८८९ - पॅरिसमधील आयफेल टॉवरचे उद्‍घाटन झाले. १८४० - पेनी ब्लॅक नावाचे जगातील पहिले टपाल तिकीट प्रसारित झाले. विसावे शतक १९४९ - ईडीएसएसी पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संचयित संगणक सॉफ्टवेर सुरू झाले. १९५४ - रॉजर बॅनिस्टर हे १ मैल चार मिनिटांच्या आत धावणारे पाहिले व्यक्ती ठरले. १९८३ - अडोल्फ हिटलर यांच्या डायरीचा लबाडी म्हणून खुलासा केला गेला. १९८४ - कृत्रिम श्वसन न करता एव्हरेस्ट पादाक्रांत करणारा फू दोरजी हा पहिला भारतीय ठरला. १९९४ - इंग्लिश खाडी खालून जाण‍ाऱ्या आणि इंग्लंड फ्रान्स यांना जोडण‍ाऱ्या युरो टनेलचे इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रॅंकॉइस मित्रॉं यांच्या हस्ते  उद्‍घाटन झाले. १९९७ - बँक ऑफ इंग्लंडला स्वायत्तता देण्यात आली. १९९९ - महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांत महिलांसाठी तीस टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला. एकविसावे शतक २००१ - पोप जॉन पॉल दुसऱ्याने सिरियातील एका मशिदीस भेट दिली. मशिदीस भेट देणारे ते पहिलेच पोप होत. २००२ - भूपिंदर नाथ किरपाल भारताचे ३१वे सरन्यायाधीश झाले. २०१५ - भारतीय चित्रपट अभिनेता सलमान खानला सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली ५ वर्ष्याच्या कारावासाची शिक्षा. हायकोर्टाने अपील वर लगेच जामिनावर सुटका केली. जन्म १२३६ - वेन तियानशिंग, चीनी पंतप्रधान. १५०२ - होआव दुसरा, पोर्तुगालचा राजा. १७१४ - जोसेफ पहिला, पोर्तुगालचा राजा. १७५५ - नेथन हेल, अमेरिकन लेखक व स्वातंत्र्यसैनिक. १७९९ - अलेक्सांद्र पुश्किन, रशियन कवी. १८५० - कार्ल फर्डिनांड ब्रॉन, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ. १८५६: ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ, आधुनिक मानसशास्त्राचे जनक सिग्मंड फ्रॉइड १८६१ - मोतीलाल नेहरू, भारतीय स्वातंत्र्यसैनिक. १८६८ - रॉबर्ट फाल्कन स्कॉट, इंग्लिश शोधक. १८७२ - थॉमस मान, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक. १८९७ - पाउल आल्वेर्डेस, जर्मन कवी, लेखक. १९०१ - सुकर्णो, इंडोनेशियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष. १९१७ - कर्क कर्कोरियन, अमेरिकन उद्योगपती. १९२०: जुन्या पिढीतील संगीतकार गायक बुलो सी. रानी १९३३ - हाइनरिक रोह्रर, नोबेल पारितोषिक विजेता स्विस भौतिकशास्त्रज्ञ. १९३४ - आल्बर्ट दुसरा, बेल्जियमचा राजा. १९४०: प्रसिद्ध महिला तबलावादक, गायिका आणि संगीतज्ञ अबान मिस्त्री १९४३ - रिचर्ड स्मॉली, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ. १९४३: लेखिका वीणा चंद्रकांत गावाणकर १९५१: भरतनाट्यम नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका लीला सॅमसन १९५३: ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे अध्यक्ष टोनी ब्लेअर १९५६ - ब्यॉर्न बोर्ग, टेनिस खेळाडू. १९५७ - माइक गॅटिंग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९६१-अभिनेता जॉर्ज क्लूनी १९८३-ऑलिंपिक पदकविजेता नेमबाज गगन नारंग मृत्यू ६८० - खलिफा म्वाइयाह्. १५८९ - संगीतसम्राट तानसेन तथा रामतनू पांडे ऊर्फ मोहम्मद अट्टा खान, मुघल सम्राट अकबराच्या दरबारातील एक नवरत्‍न १८६२ - हेन्‍री थोरो, अमेरिकन लेखक. (ज. १२ जुलै १८१७) १९२२ - छत्रपती शाहू महाराज. १९४६- भुलाभाई देसाई भारतीय स्वातंत्र्यसेनानी व कायदेपंडित १९५२ - मारिया मॉंटेसरी, इटालियन डॉक्टर शिक्षणतज्ञ. १९६६ - रॅंगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे, भारतीय उदारमतवादी समाजसुधारक, नेमस्त पुढारी आणि शिक्षणज्ज्ञ. १९९५ - आचार्य गोविंदराव गोसावी, प्रवचनकार, संत वाङ्‍मयाचे अभ्यासक, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक. १९९९ - कृष्णाजी शंकर हिंगवे, पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे पहिले ग्रंथपाल व संस्थापक सदस्य. २००१ - मालतीबाई बेडेकर, मराठी कादंबरीकार, लेखिका. २०१७ - उस्ताद रईस खां, भारतीय सतारवादक. प्रतिवार्षिक पालन हॉलोकॉस्ट स्मृति दिन - इस्राइल आंतरराष्ट्रीय "नो-डाएट" दिवस. बाह्य दुवे मे ४ - मे ५ - मे ६ - मे ७ - मे ८ - (मे महिना)
मे २
https://mr.wikipedia.org/wiki/मे_२
ठळक घटना आणि घडामोडी सोळावे शतक १५६८ - मेरी स्टुअर्ट लॉक लेवेन तुरुंगातुन पळाली. एकोणिसावे शतक १८०८ - फ्रेंच आक्रमकांविरुद्ध माद्रिदमध्ये जनतेचा उठाव. १८२९ - चार्ल्स फ्रीमॅन्टलने ऑस्ट्रेलियातील स्वान रिव्हर वसाहतीची स्थापना केली. १८६६ - कॅलावची लढाई - पेरूच्या सैन्याने स्पेनच्या आरमाराचा पराभव केला. १८७२ - मुंबईत व्हिक्टोरिया अँड आल्बर्ट म्युझियमचे (आजचे भाऊ दाजी लाड संग्रहालय) उद्घाटन. १८८५ - कट नाईफची लढाई - क्री व एसिनिबॉइन जमातीच्या स्थानिक रहिवाश्यांनी कॅनडाच्या सैन्याचा पराभव केला. १८८५ - बेल्जियमचा राजा लिओपोल्ड दुसऱ्याने कॉँगोच्या राष्ट्राची निर्मिती केली. १८८९ - इथियोपियाचा सम्राट मेनेलिक दुसऱ्याने इटलीशी संधी केली व एरिट्रिया इटलीच्या हवाली केले. विसावे शतक १९०८: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमधे प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला. १९१८ - जनरल मोटर्सने डेलावेरमधील शेवरोले मोटर कंपनी विकत घेतली. १९२१: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू बाबाराव व तात्याराव यांची अंदमानातुन हिन्दुस्थानात पाठवणी केली. १९२५ : फरीदपूरच्या काँग्रेस अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी इंग्रज सरकारला सहकार्याच्या बदल्यात वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी केली १९३३ - जर्मनीत ऍडोल्फ हिटलरने ट्रेड युनियन वर बंदी घातली. १९४५ - दुसरे महायुद्ध-बर्लिनची लढाई - सोवियेत संघाने बर्लिनचा पाडाव केला व जर्मन संसदेवर आपला झेंडा फडकवला. १९५२ : जगातले पहिले जेट विमान लंडनहून जोहान्सबर्गला निघाले १९५३ - हुसेन जॉर्डनच्या राजेपदी. १९६४ - व्हियेतनाम युद्ध - साइगॉनच्या बंदरात अमेरिकेची युद्धनौका यु.एस.एस. कार्ड बुडाली. १९६९ - क्वीन एलेझाबेथ सेकंड या राजेशाही जहाजाची पहिली सफर सुरू. १९८२ - फॉकलंड युद्ध - युनायटेड किंग्डमच्या एच.एम.एस. कॉँकरर या पाणबुडीने आर्जेन्टिनाची युद्धनौका ए.आर.ए. जनरल बेल्ग्रानो बुडवली. १९८९ : ऑस्ट्रियालगतच्या आपल्या सीमा हंगेरीने खुल्या केल्या. त्यामुळे पूर्व जर्मन पश्चिमेला पळून जाऊ लागले. अखेर याची परिणती बर्लिनची भिंत पडण्यात आणि शीतयुद्धाची अखेर होण्यात झाली. १९९४: बँक ऑफ कराड चे बँक ऑफ इंडिया मधे विलीनीकरण झाले. १९९४: नगर जिल्ह्यातील रामदास ढमाले या अपंग युवकाने पुण्यातील टिळक तलावात सलग ३७ तास ४५ मिनिटे पोहून एक नवा विक्रम प्रस्थापित केला. १९९७ - टोनी ब्लेर युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी. १९९७: राष्ट्रीय अ बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या अभिजित कुंटेने इंटरनॅशनल मास्टर किताबासाठीचे निकष पूर्ण केले. १९९९ - मिरेया मॉस्कोसो पनामाच्या पंतप्रधानपदी. मॉस्कोसो पनामाची सर्वप्रथम स्त्री पंतप्रधान आहे. १९९९: कोल्हापूर येथील शर्वरी मानसिंग पवार या तीन वर्षे चार महिन्याच्या बालिकेने ५१.१ कि. मी. अंतर न थांबता स्केटिंग करून ३ तास ५१ मिनिटांत पार केले. एकविसावे शतक २००४: एस. राजेन्द्रबाबू यांनी भारताचे ३४वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. २००८ : 'नर्गिस' चक्रीवादळाचा म्यानमारला तडाखा. १,३८,००० मृत व लाखो बेघर २०११: अमेरिकन सैन्याच्या Navy Seals 6 या विशेष तुकडीने ओसामा बिन लादेन याची पाकिस्तानातील अ‍ॅबोटाबाद येथे हत्या केली. २०१२: नॉर्वेजियन चित्रकार एडवर्ड माँच यांचे द स्क्रीम हे चित्र लिलावात १२० मिलियन डॉलर्सला विकले गेले. हा एक नवा जागतिक विक्रम बनला. २०१३ : सरबजीत या पाकिस्तानने पकडलेल्या तथाकथित हेराचा तुरुंगातल्या मारहाणीमुळे मृत्यू २०१४ - अफगाणिस्तानच्या बदख्शान प्रांतात दोन दरडी कोसळून २,१०० व्यक्ती ठार. इतर शेकडो बेपत्ता. जन्म १३६० - यॉँगल, चीनी सम्राट. १७२९ - कॅथेरिन, रशियाची सम्राज्ञी. १८९२ - मॅन्फ्रेड फोन रिक्टोफेन, जर्मन लढाउ वैमानिक. १८९९ - भालजी पेंढारकर, मराठी चित्रपटनिर्माता, दिग्दर्शक. १९०३ - डॉ.बेन्जामिन स्पॉक, अमेरिकन बालरोगतज्ञ. १९२० - डॉ. वसंतराव देशपांडे, गायक व संगीतकार. १९२१ - सत्यजित रे, भारतीय चित्रपट दिग्दर्शक. १९२९ - जिग्मे दोरजी वांगचुक, भूतानचा राजा. १९३५ - फैसल दुसरा, इराकचा राजा. १९६० - रवि रत्नायके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. १९६९ - ब्रायन लारा, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. १९७५ - डेव्हिड बेकहॅम, इंग्लिश फुटबॉल खेळाडू. १९८१ - ले. कर्नल. ए. के. निरंजन, १० इंजिनिअर मृत्यू ७५६ - शोमु, जपानी सम्राट. ९०७ - बोरिस पहिला, बल्गेरियाचा राजा. १५१९ - लिओनार्डो दा व्हिन्ची, इटलीचा चित्रकार, संशोधक. १६८३ - रघुनाथ नारायण हणमंते तथा रघुनाथपंडित, राज्यव्यवहारकोश कर्ता. १९५७ - जोसेफ मॅककार्थी, अमेरिकन सेनेटर. १९६३ - डॉ. के.बी. लेले, मराठी जादूगार. १९६९ - फ्रांझ फोन पापेन, जर्मन चान्सेलर. १९७२ - जे. एडगर हूवर, अमेरिकेच्या एफ.बी.आय. या पोलीस संस्थेचा संचालक. १९७३ - दिनकर केशव बेडेकर, मराठी समीक्षक आणि विचारवंत. १९७५ - शांताराम आठवले, चित्रपट दिग्दर्शक, कवी आणि लेखक. १९९८ - पुरूषोत्तम काकोडकर, गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आणि काँग्रेस नेते. १९९९ - मेजर रमण दादा, कीर्ती चक्र विजेता, ११ सिंग रेजिमेंट १९९९ - पंडित सुधाकरबुवा डिग्रजकर, जयपूर घराण्याचे गायक. २००१ - मोहनलाल पिरामल, भारतीय उद्योगपती. २००५ - वी किम वी, सिंगापूरचा राष्ट्राध्यक्ष. २०११ - ओसामा बिन लादेन, अल कायदा नामक इस्लामी मूलतत्त्ववादी संघटनेचा संस्थापक. २०२० - कर्नल आशुतोष शर्मा, १९ गार्ड ब्रिगेड, राष्ट्रीय रायफल्स. २०२० - मेजर अनुज सूद, १९ गार्ड ब्रिगेड, राष्ट्रीय रायफल्स. प्रतिवार्षिक पालन ध्वज दिन - पोलंड. शिक्षक दिन - ईराण. शिक्षण दिन - ईंडोनेशिया. बाह्य दुवे एप्रिल ३० - मे १ - मे २ - मे ३ - मे ४ - (मे महिना)
मे ३
https://mr.wikipedia.org/wiki/मे_३
ठळक घटना आणि घडामोडी पंधरावे शतक १४९४ - क्रिस्टोफर कोलंबसला पहिल्यांदा जमैकाचा किनारा दिसला. अठरावे शतक १७१५ - उत्तर युरोप आणि उत्तर आशिया मध्ये खग्रास सूर्यग्रहण दिसले. १७९१ - पोलंडने मे संविधान अंगिकारले. एकोणिसावे शतक १८०२ - वॉशिंग्टन, डी.सी. या शहराची स्थापना. १८१० - लॉर्ड बायरन हेलेस्पॉन्टची खाडी पोहून गेला. १८६० - चार्ल्स पंधरावा स्वीडनच्या राजेपदी. विसावे शतक १९१३ - दादासाहेब फाळके यांचा पहिला भारतीय मूक चित्रपट राजा हरिश्चंद्र मुंबईत प्रदर्शित झाला. १९२८ - जपानच्या सैन्याने चीनच्या जिनान शहरात धुमाकुळ घातला. १९३९: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. १९४५ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सने ल्युबेकच्या अखातात जर्मनीची कॅप आर्कोना, थीलबेक व डॉइचलॅंड ही जहाजे बुडवली. १९४६ - दुसरे महायुद्ध - २८ जपानी सेनाधिकाऱ्यांविरुद्ध टोक्योमध्ये खटला सुरू झाला. १९४७ - जपानने नवीन संविधान अंगिकारले. १९४७: इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC)ची स्थापना झाली. १९५२ - अमेरिकेच्या जोसेफ ओ. फ्लेचर व विल्यम पी. बेनेडिक्ट या वैमानिकांनी उत्तर ध्रुवावर विमान उतरवले. १९७३: शिकागो येथील १४५१ फूट उंच आणि १०८ माजले असलेली सिअर्स टॉवर ही (त्या काळची) जगातील सर्वात उंच इमारत बनली. १९९१ - विंडहोकचा जाहीरनामा प्रकाशित. १९९४: सर्व वंशाच्या नागरिकांना मताधिकार असलेल्या दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्याच निवडणूकीत विद्यमान अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी. कर्क यांच्या पक्षाचा पराभव झाला. नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वाखालील अफ्रिकन नॅशनल काँग्रेस या पक्षाला बहुमत मिळाले. तोपर्यंत दक्षिण अफ्रिकेत वांशिक तत्त्वावर निवडणूका होत असत. १९९९ - ओक्लाहोमा सिटी येथे एफ.५ टोर्नेडो. ६६ ठार. ६५२ जखमी १,००,००,००,००० अमेरिकन डॉलरचे नुकसान. १९९९: एडविन जस्कुलस्की या ९६ वर्षीय गृहस्थाने १०० मी. धावण्याची शर्यत २४.०४ सेकंदांत पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम केला. एकविसावे शतक २००१ - अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क समितीवरील (UNCHR) सदस्यत्व गमावले. १९४७मध्ये समितीची स्थापना झाल्यानंतर प्रथमच असे घडले. २००३ - एरवर्क फ्लाइट २३ हे टपाल घेउन जाणारे विमान कोसळले. २ ठार. २००६ - आर्मेनियाचे एरबस ए-३१९ प्रकारचे विमान सोची शहराच्या विमानतळावर वादळात उतरत असताना कोसळले. ११३ ठार. जन्म ६१२ - कॉन्स्टन्टाईन तिसरा, बायझेन्टाईन सम्राट. १८४९ - बर्नहार्ड फोन ब्युलो, जर्मनीचा चान्सेलर. १८६७ - जे.टी. हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १८९६ - व्ही.के. कृष्ण मेनन, भारताचे संरक्षणमंत्री. १८९७ - झाकीर हुसेन, भारतीय राष्ट्रपती. १८९८ - चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर, मराठी चित्रपट दिग्दर्शक. १८९८ - गोल्डा मायर, इस्रायेलची पंतप्रधान. १९४५ - सादिक मोहम्मद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. १९५१ - अशोक गेहलोत, राजस्थानचा मुख्यमंत्री. १९५५ - डेव्हिड हूक्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू. १९५९ - उमा भारती, भारतीय राजकारणी. मृत्यू १२७० - बेला चौथा, हंगेरीचा राजा. १४८१ - महमद दुसरा, ऑट्टोमन सम्राट. १७५८ - पोप बेनेडिक्ट चौदावा. १९४२ - थोर्वाल्ड स्टॉनिंग, डेन्मार्कचा पंतप्रधान. १९५८ - फ्रॅंक फॉस्टर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९६२ - नजीर अहमद, उर्दू कादंबरीचे जनक आणि उर्दू लेखक. १९६९ - झाकीर हुसेन, भारतीय राष्ट्रपती; शिक्षणतज्ञ. १९७१ - डॉ. धनंजय रामचंद्र गाडगीळ, अर्थतज्ञ आणि विचारवंत. १९७७ - हमीद दलवाई, संस्थापक; मुस्लिम सत्यशोधक मंडळ. १९७८ - विठ्ठल दत्तात्रय घाटे, मराठी लेखक, कवी व शिक्षणतज्ज्ञ. १९८१ - फातिमा रशीद ऊर्फ नर्गिस, हिंदी चित्रपट अभिनेत्री. १९९६ - वसंत गवाणकर, व्यंगचित्रकार २००० - शकुंतलाबाई परांजपे, कुटुंब-नियोजनासाठी कार्य केलेल्या समाजसेविका २००२ - एम. एस. ओबेरॉय, भारतीय उद्योगपती २००३ - व्यंकटेश्वरन, तामिळ चित्रपट निर्माता. २००६ - प्रमोद महाजन, भारतीय राजकारणी. २००९ - राम बाळकृष्ण शेवाळकर, मराठी साहित्यिक. २०११ - जगदीश खेबुडकर, मराठी गीतकार कवी, प्रतिवार्षिक पालन संविधान दिन - पोलंड, जपान. जागतिक श्वसनदाह दिन. आंतरराष्ट्रीय सूर्य दिन जागतिक पत्रकारिता अभिस्वातंत्र्य दिन बाह्य दुवे मे १ - मे २ - मे ३ - मे ४ - मे ५ - (मे महिना)
मे १
https://mr.wikipedia.org/wiki/मे_१
ठळक घटना आणि घडामोडी अकरावे शतक १०४५ - ग्रेगोरी सहावा पोपपदी. चौदावे शतक १३२८ - एडिनबर्ग-नॉर्थहॅम्पटनचा तह - इंग्लंडने स्कॉटलंडला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली. अठरावे शतक १७०७ - ऍक्ट ऑफ युनियन - इंग्लंड व स्कॉटलंडने एकत्र येउन ग्रेट ब्रिटन या राष्ट्राची निर्मिती केली. १७३९ - चिमाजी अप्पाच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी तीन महिने लढलेला वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला. एकोणिसावे शतक १८३४ - इंग्लंडच्या वसाहतीतून गुलामगिरीची प्रथा कायदेबाह्य ठरवण्यात आली. १८६३ - अमेरिकन यादवी युद्ध-चान्सेलरव्हिलची लढाई. १८८२ - पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना. १८८४ - अमेरिकेत कामगारांना एका दिवसात ८ तास कामकाज असावे या मागणीची घोषणा. १८८६ - अमेरिकेत आठ तासाचे काम हे एक दिवसाचे काम असे प्रमाणित करण्यासाठी संप सुरू झाला. हा दिवस जगभर (अमेरिका सोडून) कामगार दिन म्हणून पाळला जातो. १८९० - जगात पहिल्यांदा जागतिक कामगार दिन साजरा केला गेला. १८९७ - स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. १८९८ - मनिला बेची लढाई - अमेरिकेच्या आरमाराने स्पेनची जहाजे बुडवली. विसावे शतक १९०० - अमेरिकेत स्कोफील्ड येथील खाणीत अपघात. २०० ठार. १९२७: जागतिक कामगार दिन हा भारतात पहिल्यांदा साजरा केला. १९३० - सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले. १९३१ - न्यू यॉर्क शहरातील एम्पायर स्टेट बिल्डींग खुली. १९४१ - दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या सैन्याने लिब्यातील टोब्रुक शहरावर कडाडून हल्ला चढवला. १९४८ - उत्तर कोरियाचे राष्ट्र अस्तित्वात आले. १९५० - गुआमला अमेरिकेच्या राष्ट्रकुलात प्रवेश. १९५६ - पोलियोची लस जनतेस उपलब्ध. १९६० - द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये निर्माण केली गेली. १९६०: गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना झाली. १९६० - शीत युद्ध - अमेरिकेचे यु-२ जातीचे टेहळणी विमान सोवियेत संघाने पाडले. १९६२: महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना. १९६४ : 'बेसिक' प्रोग्रॅमिंग भाषेतली पहिली प्रणाली (प्रोग्रॅम) कार्यान्वित झाली १९७८ - जपानचा नाओमी उएमुरा उत्तर ध्रुवावर एकटा पोचला. १९८३: अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली. १९९३ : श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रणसिंघे प्रेमदास आत्मघातकी हल्ल्यात ठार १९९८: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कोकण रेल्वे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला. १९९९: नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची मुदत एक वर्षावरून अडीच वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी सुधारणा करणारा अध्यादेश जारी झाला. एकविसावे शतक २००३ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु. बुशने इराकमधील युद्ध संपल्याचे जाहीर केले. जन्म १२१८ - रुडॉल्फ पहिला, पवित्र रोमन सम्राट. १९१३ - बलराज साहनी, हिंदी चित्रपट अभिनेता. (मृ. १९७३) १९१५ - 'अंचल' रामेश्वर शुक्ल, आधुनिक हिंदी कवी १९२० - मन्ना डे, हिंदी आणि वंग चित्रपटसृष्टीतील गायक १९२२ - मधु लिमये, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि समाजवादी नेते. (मृ. १९९५) १९३२ - एस.एम. कृष्णा, कर्नाटकचे १६वे मुख्यमंत्री आणि केंद्रीय परराष्ट्रमंत्री, १९४३ - सोनल मानसिंह, भारतीय नृत्यांगना. १९४४ - सुरेश कलमाडी, भारतीय राजकारणी. १९५१ - गॉर्डन ग्रीनीज, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू. १९८८ - अनुष्का शर्मा, हिंदी चित्रपट अभिनेत्री. मृत्यू ४०८ - आर्केडियस, रोमन सम्राट. १३०८ - आल्बर्ट पहिला, हॅब्सबर्गचा राजा. १५७२ - पोप पायस पाचवा. १९३१ - योहान लुडविग बाख, जर्मन संगीतकार. १९४५ - जोसेफ गोबेल्स, नाझी अधिकारी. १९५८ - गणेश शिवराम उर्फ नाना जोग, मराठी नाटककार. १९७२ - कमलनयन बजाज, भारतीय उद्योगपती. १९७५ - शांताराम आठवले, चित्रपट दिग्दर्शक, कवी व लेखक. १९९३ - पिएर बेरेगोव्होय, फ्रांसचा पंतप्रधान. १९९३ - रणसिंगे प्रेमदास, श्रीलंकेचा पंतप्रधान. १९९३ - नानासाहेब गोरे उर्फ ना. ग. गोरे, समाजवादी विचारवंत. १९९४ - आयर्टन सेना, ब्राझिलचा रेसकार चालक. १९९८ - गंगुताई पटवर्धन, शिक्षणतज्ञ. २००२ - पंडित आवळीकर, मराठी वाङ्मयाचे अभ्यासक. प्रतिवार्षिक पालन महाराष्ट्र दिन - महाराष्ट्र. मराठी राजभाषा दिन गुजरात दिन - गुजरात. कामगार दिन - अमेरिका व अमेरिकाप्रभावित देश वगळता जगभर. लेइ दिन - हवाई. बेल्टेन - आयर्लंड. राष्ट्रीय प्रेम दिन - चेक प्रजासत्ताक. कायदा दिन - अमेरिकेची संयुक्त संस्थाने. जागतिक अस्थमा निवारण दिन बाह्य दुवे एप्रिल २९ - एप्रिल ३० - मे १ - मे २ - मे ३ - मे महिना
मार्च ४
https://mr.wikipedia.org/wiki/मार्च_४
ठळक घटना चौदावे शतक १३५१ - रामातिबोदी पहिला सयामच्या राजेपदी. १३८६ - व्लादिस्लॉ दुसरा जोगैला पोलंडच्या राजेपदी. पंधरावे शतक १४६१ - वॉर ऑफ द रोझेस - एडवर्ड चौथ्याने इंग्लंडचा राजा हेन्री सहाव्याला पदच्युत केले. सोळावे शतक १५१९ - कॉॅंकिस्तादोर हर्नान कोर्तेझ मेक्सिकोत येउन पोचला. सतरावे शतक १६६५ - दुसऱ्या ॲंग्लो-डच युद्धाला सुरुवात. अठरावे शतक १७८९ - न्यू यॉर्क शहरात अमेरिकन काँग्रेसने अमेरिकेचे संविधान अमलात आल्याचे जाहीर केले. १७९१ - व्हर्मॉॅंट अमेरिकेचे बारावे राज्य झाले. एकोणिसावे शतक १८३७ - शिकागो शहराची स्थापना. १८६१ - अब्राहम लिंकन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी. १८९४ - चीनच्या शांघाय शहरात लागलेल्या प्रचंड आगीत १,००० इमारती भस्मसात. विसावे शतक १९०२ - शिकागो शहरात अमेरिकन ऑटोमोबाइल असोसिएशन तथा ट्रिपल-एची स्थापना. १९२१ - नानकाना येथील गुरुद्वारामध्ये ब्रिटिश सैनिकांच्या गोळीबारात ७० ठार. १९३० - दांडीयात्रेच्या सफलतेने प्रभावित भारतातील ब्रिटीश व्हाइसरॉय एडवर्ड फ्रेडरिक लिंडली वूड व महात्मा गांधींच्यात बैठक. भारतात देशी मिठाचा मुक्त वापर करू देण्याचा सरकारचा निर्णय तसेच दांडीयात्रेदरम्यान पकडललेल्या राजकैद्यांची मुक्तता करण्याचे आश्वासन. १९३६ - हिंडेनबर्गचे प्रथम उड्डाण. १९४५ - दुसरे महायुद्ध - फिनलंडने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. १९५१ - प्रथम आशियाई खेळांचे उद्घाटन.नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले. १९६० - हवानाच्या बंदरात फ्रेंच मालवाहू जहाज ला कूबरवर स्फोट. १०० ठार. १९६६ - केनेडियन पॅसिफिक एरलाइन्सचे विमान टोक्यो येथे उतरताना कोसळले. ६४ ठार. एकविसावे शतक २००१ - पोर्तुगालच्या कास्तेलो दि पैव्हा शहरातील पूल कोसळला. ७० ठार. २००१ - गुरदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण. जन्म १६७८ - ॲंतोनियो विवाल्डी, इटालियन संगीतकार. १८४७ - कार्ल बेयर, ऑस्ट्रियन रसायनशास्त्रज्ञ. १८७५ - मिहालि कॅरोल्यी, हंगेरीचा पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष. १९०१ - चार्ल्स गोरेन, अमेरिकन ब्रिज खेळाडू व लेखक. १९०६ - चार्ल्स रुडॉल्फ वॉलग्रीन, जुनियर, अमेरिकन उद्योगपती. १९२२ - दीना पाठक, गुजराती व हिंदी अभिनेत्री. १९३५ - प्रभा राव, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेत्या. १९३७ - ग्रॅहाम डाउलिंग, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू. १९८० - रोहन बोपन्ना, भारतीय टेनिस खेळाडू. मृत्यू २५१ - पोप लुशियस पहिला. ५६१ - पोप पेलाजियस पहिला. ११७२ - स्टीवन तिसरा, हंगेरीचा राजा. ११९३ - सलादिन, तुर्कस्तानचा सुलतान. १४९६ - सिगिस्मंड, ऑस्ट्रियाचा राजा. १९२५ - ज्योतीन्द्रनाथ टागोर, बंगाली साहित्यिक आणि चित्रकार. १९३९ - लाला हरदयाल, गदर पार्टीचे स्थापक. १९४८ - बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक. १९७७ - लुट्झ ग्राफ श्वेरिन फोन क्रोसिक, जर्मनीचा चान्सेलर. १९८१ - टोरिन थॅचर, भारतीय अभिनेता. १९९२ - शांताबाई परुळेकर, दैनिक सकाळच्या प्रकाशिका. १९९६ - आत्माराम सावंत, मराठी नाटककार आणि पत्रकार. १९९७ - रॉबर्ट एच. डिक, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. १९९९ - विठ्ठल गोविंद गाडगीळ, एर इंडियाचे पहिले कर्मचारी. १९९९ - कारेल व्हान हेट रीव्ह, डच लेखक. २००० - गीता मुखर्जी, स्वातंत्र्यसैनिक, साम्यवादी खासदार. २००४ - जॉर्ज पेक, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. २००७ - सुनील कुमार महातो, भारतीय संसदसदस्य. २०११ - अर्जुन सिंग, भारतीय राजकारणी.केन्द्रीय मानव संसाधन मंत्री, ३ वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल २०१६ - पी.ए. संगमा, भारतीय राजकारणी. प्रतिवार्षिक पालन राष्ट्रीय सुरक्षा दिवस - भारत बाह्य दुवे मार्च २ - मार्च ३ - मार्च ४ - मार्च ५ - मार्च ६ - (मार्च महिना) वर्ग:दिवस वर्ग:ग्रेगरी दिनदर्शिका वर्ग:आंतरराष्ट्रीय दिनदर्शिका वर्ग:लाल दुवे असणारे लेख
मे ५
https://mr.wikipedia.org/wiki/मे_५
ठळक घटना आणि घडामोडी तेरावे शतक १२६० - कुब्लाई खान मोंगोल सम्राटपदी. सतरावे शतक १६४० - इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिला याने संसद बरखास्त केली. १६४६ - इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिला याने स्कॉटलंडच्या सैन्यासमोर शरणागती पत्करली. अठरावे शतक १७६२ - रशिया व प्रशियानी सेंट पीटर्सबर्गचा तह केला. एकोणिसावे शतक १८०९ : अमेरिकेत पेटंट मिळालेल्या पहिल्या महिला मेरी कीस यांना रेशीम आणि धागे वापरून गवत विणण्याच्या कल्पनेचे पेटंट मिळाले. १८०९ - स्वित्झर्लंडच्या आर्गाउ प्रांताने ज्यू व्यक्तिंना नागरिकत्त्व नाकारले. १८३५ - युरोपमध्ये सर्वप्रथम रेल्वे बेल्जियमच्या ब्रसेल्स व मेकेलेन शहरांच्या दरम्यान धावली. १८६२ - मेक्सिकोत इग्नासियो झारागोझाच्या नेतृत्वाखाली स्थानिक लोकांनी फ्रांसच्या सैन्याला पेब्लाच्या लढाईत हरवले. हा दिवस मेक्सिकोत सिंको दि मायो (मेची ५ तारीख) म्हणून साजरा केला जातो.. १८६५ - ओहायोच्या सिनसिनाटी शहराजवळ अमेरिकेतील पहिल्यांदा रेल्वे लुटण्यात आली. १८७७ - अमेरिकेच्या सैन्याकडून होणाऱ्या छळास कंटाळून सिटींग बुल या स्थानिक नेत्याने आपली लाकोटा जमातीचे कॅनडात स्थलांतर केले. १८९३ - न्यू यॉर्क शेरबाजाराचा निर्देशांक कोसळला. देशभर मंदीस सुरुवात. विसावे शतक १९०१: पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. १९०५ : खुनाच्या प्रकरणात दोषी ठरवण्यासाठी हाताच्या ठशांचा प्रथम वापर. १९१६ - अमेरिकेने डॉमिनिकन प्रजासत्ताकवर चढाई केली. १९२१ : कोको शानेलने Chanel Nº 5 हा परफ्यूम बाजारात आणला. १९२५ - अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील डेटन गावातील शाळेत डार्विनचा उत्क्रांतिवाद शिकवल्याबद्दल जॉन स्कोप्स या शिक्षकाला अटक करण्यात आली. १९२५ - दक्षिण आफ्रिकेत आफ्रिकान्स भाषेला राजभाषेचा दर्जा. १९३६ - इटलीचे सैन्य इथियोपियाची राजधानी अदिस अबाबात शिरले. १९४० - दुसरे महायुद्ध - नॉर्वेच्या पदच्युत सरकारची लंडनमध्ये रचना. १९४१ - इथियोपियाचा सम्राट हेल सिलासी अदिस अबाबाला परतला. १९४४ - महात्मा गांधींची तुरुंगातून सुटका. १९४५ - दुसरे महायुद्ध - नेदरलँड्स व डेन्मार्कमधील जर्मनीच्या सैन्याने ब्रिटीश व केनेडियन सैन्यासमोर शरणागती पत्करली. १९४५ - दुसरे महायुद्ध - प्रागमध्ये जर्मन सैन्याविरुद्ध उठाव. १९४५ - दुसरे महायुद्ध - मॉटहाउसेन छळछावणीमधील कैद्यांची सुटका. १९५० - भुमिबोल अदुल्यादेज राम नववा या नावाने थायलंडच्या राजेपदी. १९५४ - पेराग्वेत लश्करी उठाव. जनरल आल्फ्रेदो स्त्रोसनेरने सत्ता बळकावली. १९५५ - पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्त्व. १९६१ - ऍलन शेपार्ड अंतराळात जाणारा प्रथम अमेरिकन ठरला. १९६३ : यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी. प्रत्यारोपण झालेला हा पहिला अवयव होता. १९६४: युरोप परिषदेने ५ मे हा युरोप दिन घोषित केला. १९८० - ६ दिवस घेराव घातल्यावर ब्रिटीश कमांडोंनी लंडनमधील इराणच्या वकिलातीवर हल्ला चढवला. १९९१ - वॉशिंग्टन डी.सी.मध्ये दंगा. १९९४ - सिंगापुरमध्ये दोन मोटारींवर रंग फेकल्याबद्दल मायकेल पी. फे या अमेरिकन नागरिकास छडीने मारण्याची शिक्षा. १९९७: जयदीप आमरे या साडेपाचवर्षीय बालकाने गोव्यातील मांडवी नदी पोहून पार केली. एवढ्या छोट्या बालकाने ही नदी पोहून पार करण्याची ही पहिलीच घटना आहे. १९९९: दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा येथे केलेल्या उत्खननात पुरातत्त्ववेत्त्यांना सर्वात प्राचीन लिपीचे अवशेष मिळाले. एकविसावे शतक २००५ - युनायटेड किंग्डममध्ये निवडणुकी. टोनी ब्लेरच्या पक्षास पुन्हा बहुमत. जन्म ८६७ - उदा, जपानी सम्राट. १२१० - आल्फोन्सो दुसरा, पोर्तुगालचा राजा. १४७९: शिखांचे तिसरे गुरू गुरू अमर दास १७४७ - लिओपोल्ड दुसरा, पवित्र रोमन सम्राट. १८१८ - कार्ल मार्क्स, जर्मन तत्त्वज्ञानी. १९११: भारतीय शिक्षक व कार्यकर्ते प्रितलाता वडेदार १९१६ - ज्ञानी झैलसिंग, भारतीय राष्ट्रपती. १९८९: लक्ष्मी राय तमिळ अभिनेत्री मृत्यू १०२८ - आल्फोन्सो पाचवा, कॅस्टिलचा राजा. ११९४ - कॅसिमिर दुसरा, पोलंडचा राजा. १२१९ - लिओ दुसरा, आर्मेनियाचा राजा. १३०९ - चार्ल्स दुसरा, नेपल्सचा राजा. १७०५ - लिओपोल्ड पहिला, पवित्र रोमन सम्राट. १८२१ - नेपोलियन बोनापार्ट, फ्रांसचा सम्राट. १९१८: त्र्यंबक बापूजी ठोमरे उर्फ बालकवी तथा निसर्गकवी १९२२: छत्रपती राजार्षी शाहू महाराज १९४३: गायक नट,  गायनगुरू रामकृष्णबुवा वझे १९४५- महाराष्ट्राचे पहिले विमा गणिती ग. स. मराठे १९६२ - अर्नेस्ट टिल्डेस्ली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९७७ - लुडविग एर्हार्ड, जर्मन चान्सेलर. १९८९: उद्योगपती, पद्मभूषण नवल होर्मुसजी टाटा १९९५ - मिखाईल बॉट्व्हिनिक, रशियाचा बुद्धिबळपटू. १९९६ - आय छिंग, चिनी भाषेमधील कवी. २०००: वि. मा. कुलकर्णी – मुलांच्या समस्यांचे अभ्यासक व समाजशास्त्रज्ञ २००६: नौशाद अली ज्येष्ठ संगीत दिगदर्शक २०१२: भारतीय क्रिकेट खेळाडू सुरेंद्रनाथ २०१७- दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश लीला सेठ प्रतिवार्षिक पालन 'बालकवी' त्र्यंबक बापुजी ठोंबरे पुण्यतिथी (निसर्ग कवी). भारतीय आगमन दिन - गुयाना, १८३८ पासून. आंतरराष्ट्रीय सुईण/दाई दिन. मुक्ति दिन - डेन्मार्क, नेदरलँड्स, इथियोपिया. बाल दिन - जपान, दक्षिण कोरिया. सिंको दे मायो - मेक्सिको, अमेरिका. शहीद दिन - आल्बेनिया. जागतिक हास्य दिन युरोप दिन बाह्य दुवे मे ३ - मे ४ - मे ५ - मे ६ - मे ७ - (मे महिना)
मे ७
https://mr.wikipedia.org/wiki/मे_७
ठळक घटना आणि घडामोडी एकोणिसावे शतक १८४९: स्त्री शिक्षणाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा: जॉन इलियट ड्रिंकवॉटर बेथुन यांनी ’कलकत्ता फिमेल स्कूल’ सुरू केले. या शाळेचे आता ’बेथुन कॉलेज’ मध्ये रूपांतर झाले आहे. १८७८ : पुण्यात पहिले मराठी ग्रंथकारांचे संमेलन (आताचे साहित्य संमेलन) भरविण्यात आले १८९५ : अलेक्झांडर पोपॉफने प्राथमिक रेडिओ रिसीव्हर वापरून रेडिओ संदेशवहनाचा प्रयोग यशस्वी केला १८९९ : रॅंड वधाच्या प्रकरणी फितुरी करणाऱ्या द्रविड बंधूंना ठार मारणाऱ्या वासुदेव चाफेकर यांना फाशी विसावे शतक १९०७: मुंबईत विजेवर चालणारी ट्रॅम सुरू झाली. १९४५ : जर्मनीची दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती. युरोपमधील युद्ध समाप्त - युरोप विजय दिन १९४६: सोनी ह्या कंपनीची स्थापना झाली. १९५२ : जेफ्री डमर याने आधुनिक संगणनाचा आधार असलेल्या 'इंटिग्रेटेड सर्किट्स'ची संकल्पना प्रकाशित केली १९५४ - १९५५पासून सर्व विषयांसाठी मराठी माध्यम आणण्याचा ठराव पुणे विद्यापीठाच्या विधिसभेत एकमताने मंजूर करण्यात आला १९५५: एर इंडियाची मुंबई – टोकियो विमानसेवा सुरू झाली. १९७३ : अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरचा पायाभरणी समारंभ १९७६: होंडा एकॉर्डा या गाडी प्रकाशित करण्यात आली. १९७८ : एव्हरेस्टची पहिली ऑक्सिजनरहित मोहीम यशस्वी १९८० : जागतिक आरोग्य संघटनेने देवी रोगाचे उच्चाटन झाल्याचे जाहीर केले १९९०: लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान. १९९२: एन्डेव्हर हे अंतराळयान आपल्या पहिल्या मोहिमेवर निघाले. १९९४ : नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी १९९८: मर्सिडीज-बेंज कंपनी ने क्रिस्लर ही कंपनी ४० अब्ज अमेरिकन डॉलर्स मध्ये विकत घेतली ही इतिहासातील सर्वात मोठी औद्योगिक विलीनीकरण आहे. एकविसावे शतक २००० - व्लादिमिर पुतिन रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी. २००० - कोची येथे झलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तिरुवनंतपुरमचा नऊ वर्षाचा बुद्धिबळ खेळाडू अर्जुन विष्णूवर्धन हा भारतातील सर्वात लहान फिडे मास्टर झाला. जन्म १८४७ - आर्चिबाल्ड प्रिमरोझ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. १८६१ - रबिन्द्रनाथ टागोर, नोबेल पारितोषिक विजेता साहित्यिक. १८६७ - व्लादिस्लॉ रेमॉंट, पोलिश लेखक. १८८० - डॉ. पांडुरंग वामन काणे, कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक; भारतरत्‍न. १८९२ - जोसिप ब्रॉझ टिटो, युगोस्लाव्हियाचा राष्ट्राध्यक्ष. १९०९ - एडविन लॅंड, अमेरिकन संशोधक. १९१९ - एव्हा पेरॉन, आर्जेन्टिनाची गायिका. १९२३ - आत्माराम भेंडे, मराठी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक यांचा आरोंदा (सिंधुदुर्ग) येथे जन्म.. १९३९ - रूड लुबर्स, नेदरलँड्सचा पंतप्रधान. १९५६ - यान पीटर बाल्केनेंडे, नेदरलँड्सचा पंतप्रधान. १९०९: पोलरॉइड कॉर्पोरेशनचे संस्थापक एडविन लँड १९१२: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार पन्नालाल पटेल १९४८: मैहर घराण्याचे बासरी वादक नित्यानंद हळदीपूर मृत्यू १९२४: आदिवासींना जंगलात जाण्याचा हक्क मिळण्यासाठी लढणारा क्रांतिकारक अल्लुरी सीताराम राजू १९८६- समाजसुधारक शिवाजीराव पटवर्धन १९९१: लोककवी मनमोहन उर्फ गोपाळ नरहर नातू यांचे पुणे येथे निधन. १९९४: ध्रुपद गायक उस्ताद नसीर झहिरुद्दिन डागर २००१: लेखिका मालती बेडेकर ऊर्फ विभावरी शिरुरकर २००१: गीतकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रेम धवन २००२ - दुर्गाबाई भागवत, मराठी लेखिका, लोक संस्कृती तसेच लोकसाहित्याच्या संशोधक, लेखन विचार स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या. २०२० - मालविका मराठे, (१९९१-२००१ या काळातल्या त्या दूरदर्शन या दूरचित्रवाणी प्रसारक संस्था-सह्याद्री वाहिनीच्या निवेदिका.) प्रतिवार्षिक पालन रेडियो दिन - रशिया. जागतिक अस्थमा दिन एड्समुळे अनाथ झालेल्यांचा जागतिक दिवस बाह्य दुवे मे ५ - मे ६ - मे ७ - मे ८ - मे ९ - (मे महिना)
भारतीय दिनदर्शिका
https://mr.wikipedia.org/wiki/भारतीय_दिनदर्शिका
भारतीय दिनदर्शिका ही भारताची अधिकृत दिनदर्शिका आहे. चैत्र - चैत्र शुद्ध प्रथमा चैत्र शुद्ध द्वितीया चैत्र शुद्ध तृतीया चैत्र शुद्ध चतुर्थी चैत्र शुद्ध पंचमी चैत्र शुद्ध षष्ठी चैत्र शुद्ध सप्तमी चैत्र शुद्ध अष्टमी चैत्र शुद्ध नवमी चैत्र शुद्ध दशमी चैत्र शुद्ध एकादशी चैत्र शुद्ध द्वादशी चैत्र शुद्ध त्रयोदशी चैत्र शुद्ध चतुर्दशी चैत्र पौर्णिमा चैत्र वद्य प्रथमा चैत्र वद्य द्वितीया चैत्र वद्य तृतीया चैत्र वद्य चतुर्थी चैत्र वद्य पंचमी चैत्र वद्य षष्ठी चैत्र वद्य सप्तमी चैत्र वद्य अष्टमी चैत्र वद्य नवमी चैत्र वद्य दशमी चैत्र वद्य एकादशी चैत्र वद्य द्वादशी चैत्र वद्य त्रयोदशी चैत्र वद्य चतुर्दशी चैत्र अमावस्या वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तीक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन *
मे ११
https://mr.wikipedia.org/wiki/मे_११
11 may भारतीय राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस ठळक घटना आणि घडामोडी चौथे शतक ३०३ - बायझेन्टाईन साम्राज्याची राजधानी बायझेन्टियमचे नोव्हा रोमा (नवीन रोम) असे नामकरण. कॉन्स्टेन्टिनोपल हेच नाव जास्त प्रचलित. चौदावे शतक १३१० - नाइट्स ऑफ टेम्पलार या संघटनेच्या ५४ सदस्यांना फ्रांसमध्ये अधर्मी ठरवून जिवंत जाळण्यात आले. सोळावे शतक १५०२: ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या ४ थ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडीज बेटांकडे निघाला. एकोणिसावे शतक १८१२ - युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान स्पेन्सर पर्सिव्हालची हाउस ऑफ कॉमन्समध्ये हत्या. १८१८ - चार्ल्स चौदावा स्वीडनच्या राजेपदी. १८५७ - पहिला भारतीय स्वातंत्र्य संग्राम - स्वातंत्र्यसैनिकांनी दिल्ली शहर जिंकले. १८५८ - मिनेसोटा अमेरिकेचे ३२वे राज्य झाले. १८६२ - अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेची युद्धनौका सी.एस.एस. व्हर्जिनीया बुडाली. १८६७ - लक्झेम्बर्गला स्वातंत्र्य. १९८७ : गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. १८८८ - ज्योतिबा फुले यांना 'महात्मा' ही पदवी देण्यात आली. विसावे शतक १९०७ - कॅलिफोर्नियातील लॉम्पॉक गावाजवळ गाडी रुळावरून घसरली. ३२ ठार. १९१० - अमेरिकन काँग्रेसने ग्लेशियर राष्ट्रीय उद्यानची रचना केली. १९२७ - चलत चित्र कला व विज्ञान अकादमीची स्थापना. ही संस्था दरवर्षी ऑस्कार पुरस्कार बहाल करते. १९३४ - अमेरिकेच्या मध्य भागात भयानक वादळ सुरू झाले. शेतीलायक जमीनींवरून अतीप्रचंड प्रमाणात माती उडुन गेली. याचे पर्यवसान पुढील काही वर्षांतील दुष्काळात झाले.. १९४३ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने अल्युशियन द्वीपसमूहातील अट्टु येथील जपानी सैन्यावर हल्ला केला. १९४९ - सयामचे थायलंड असे नामकरण. १९४९ - इस्रायेलला संयुक्त राष्ट्रात प्रवेश. १९५३ - अमेरिकेच्या वेको शहरात एफ.५ टोर्नेडो. ११४ ठार. १९६० - इस्रायेलच्या गुप्त पोलिसी संस्था मोसादने नाझी अधिकारी ऍडोल्फ आइकमनला आर्जेन्टिनाच्या बोयनोस एर्स शहरात पकडले. १९७० - अमेरिकेच्या लबक शहरात एफ.५ टोर्नेडो. २६ ठार. १९८५ - इंग्लंडच्या ब्रॅडफर्ड शहरात फुटबॉलचा सामना सुरू असताना आग. ५६ ठार. १९८७ - अमेरिकेच्या बाल्टिमोर शहरात सर्वप्रथम हृदय व फुप्फुस बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. १९८७ - गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला. १९९२ - फिलिपाईन्समध्ये निवडणुका. जनरल फिदेल रामोस विजयी. १९९६ - व्हॅल्युजेट फ्लाइट ५९२ हे डी.सी.९ प्रकारचे विमान फ्लोरिडातील मायामी जवळ कोसळले. ११० ठार. १९९६: १९९६ माउंट एव्हरेस्ट आपत्ती: एकाच दिवसात माउंट एव्हरेस्टच शिखर चढणाऱ्या ८ लोकांचे निधन झाले. १९९७ - बुद्धिबळातील जगज्जेता गॅरी कास्पारोव्ह आय.बी.एम.च्या डीप ब्ल्यु या संगणकाकडून पराभूत. १९९८ - भारताने राजस्थानमधील पोखरण येथे परमाणु बॉम्बची चाचणी केली. १९९८ - फिलिपाईन्समध्ये निवडणुका. जोसेफ एस्ट्राडा विजयी. १९९९ - जर्मन टेनिस खेळाडू स्टेफी ग्राफ जर्मन खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या कारकिर्दीचा १,०००वा सामना खेळली. एकविसावे शतक २००१ - विजेवर चालणारी पहिली भारतीय मोटार रेवाच्या विक्रीला सुरुवात झाली. २००२ - स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरात प्लास्टिकच्या कारखान्यास आग. ९ ठार. जन्म १७२० - कार्ल फ्रेडरिक हियेरोनिमस फ्राइहेर फोन मंचहाउसेन, जर्मन सेनाधिकारी व भटक्या. १८९५ - जे. कृष्णमुर्ती, भारतीय तत्त्वज्ञानी. १९०४ - साल्वादोर दाली, स्पॅनिश चित्रकार. १९१४ - ज्योत्स्ना भोळे, गायिका व संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री. १९३० - एड्‍स्टार डाइक्सट्रा, डच संगणक तज्ञ. १९१८ - रिचर्ड फाइनमन, क्‍वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक १९४६ - रॉबर्ट जार्विक, कृत्रिम हृदय विकसित करणारे कार्डियोलॉजिस्ट. १९५० - सदाशिव अमरापूरकर, मराठी आणि हिंदी नाट्य आणि चित्रपट अभिनेता. १९७२ - जेकब मार्टिन, भारतीय क्रिकेट खेळाडू. मृत्यू ९१२ - लिओ सहावा, बायझेन्टाईन सम्राट. १३०४ - महमुद गझन, पर्शियाचा राजा. १७७८ - विल्यम पिट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. १८१२ - स्पेन्सर पर्सिव्हाल, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. १८७१ - जॉन हर्षल, इंग्लिश गणितज्ञ व अंतराळतज्ञ. १९५५ - गिल्बर्ट जेसप, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९८१ - बॉब मार्ली, जमैकाचा संगीतकार. १९९३ - शाहू मोडक, अभिनेते. २००१ - डग्लस अ‍ॅडम्स, ब्रिटिश लेखक, नाटककार. २००४ - कृष्णदेव मुळगुंद, मराठी चित्रकार व नृत्यदिग्दर्शक. २००९ - सरदारीलाल माथादास नंदा, भारतीय दर्यासारंग. प्रतिवार्षिक पालन तंत्रज्ञान दिन - भारत. बाह्य दुवे मे ९ - मे १० - मे ११ - मे १२ - मे १३ - (मे महिना)