text
stringlengths 1
2.66k
|
---|
कृषी क्षेत्राचा उल्लेख करताना जितेंद्र सिंग यांनी माहिती दिली की इस्रोच्या तंत्रज्ञानामुळे आता किमान महत्त्वाच्या पिकांबाबत कृषी उत्पादनाचा अंदाज देता येतो ही पिके म्हणजे गहू खरीप आणि रब्बी भात मोहोरी ज्यूट कपास ऊस रब्बी ज्वारी आणि रब्बी कडधान्ये |
रेल्वेसंबंधी उदाहरण देताना जितेंद्रसिंह यांनी गेल्या काही वर्षात अंतराळ तंत्रज्ञानाचा उपयोग करून निर्मनुष्य रेल्वे क्रॉसिंगच्या जवळ अडथळा आणणाऱ्या वस्तू रेल्वे रूळावर असल्यास त्या ओळखण्याच्या आणि त्याद्वारे रेल्वेचे अपघात टाळण्याच्या तंत्रज्ञानाचा उल्लेख केला |
याशिवाय भारतीय सीमांचे रक्षण आणि त्यातून होणारी घुसखोरी टाळण्यासाठीही या तंत्रज्ञानाचा उपयोग होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले |
इस्रो आणि अंतराळ खाते यांनी याअगोदरच आपल्या अंतराळ मोहिमेत अनेक देशांना समाविष्ट करून घेतले आहे मास ऑर्बिटर मिशन (mom) सारख्या अनेक मोहिमांतून मिळालेली छायाचित्रे महत्वाच्या अंतराळ संशोधन केंद्रात वापरली जातात मूलभूत विकास आणि सार्वजनिक हिताचे प्रकल्प यामध्येही अंतराळ विज्ञानाच्या सहाय्याने भारत आघाडीवर आहे असे त्यांनी सांगितले |
प्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतात वेगाने जगातील एक महत्त्वाचा देश म्हणून उदयाला येत आहे आणि ह्या प्रवासात भारताचे अंतराळ तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक वारसा महत्त्वाची भूमिका बजावत आहे असे ते म्हणाले * * * |
कृषी मंत्रालय केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते कृषी मेघचा शुभारंभ नवभारताच्या डिजिटल शेतीच्या दिशेने कृषी मेघ हे पुढचे पाऊल आहे तोमर नवी दिल्ली 11 ऑगस्ट 2020 केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज कृषी मेघ (राष्ट्रीय कृषी संशोधन आणि शिक्षण प्रणालीक्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर अँड सर्व्हिसेस) आणि केव्हीसी अल्युनेट (कृषी विश्वविद्यालय माजी छात्र नेटवर्क) आणि उच्च कृषी शैक्षणिक संस्थाना ऑनलाईन मान्यता प्रणाली (एचईआय)सुरू केली |
नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या धर्तीवर देशातील राष्ट्रीय कृषी शिक्षण प्रणाली मजबूत करण्यासाठी आणि कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना अधिक संबंधित आणि उच्चगुणवत्तेचे शिक्षण प्रदान करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाची रचना करण्यात आली आहे यावर केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला |
देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यात आणि जगभरात कुठंही सहज उपलब्ध होण्यासाठी महत्त्वपूर्ण संशोधनआधारित माहितीचे तत्काळ डिजिटल पद्धतीने जतन करण्याची गरज तोमर यांनी व्यक्त केली |
शेतीत खासगी गुंतवणूक सक्षम करण्यावरही त्यांनी भर दिला |
कृषी मेघ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या नवभारताच्या संकल्पनेतील डिजिटल शेतीच्या दिशेने उचललेलं पुढचे पाऊल आहे असे ते म्हणाले |
23 icar संस्थांना आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संशोधन केंद्रे बनवावी असे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री परशोत्तम रुपाला म्हणाले |
तसेच संशोधकांना वास्तविक माहिती उपलब्ध करुन देण्यावरही त्यांनी भर दिला |
केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी हैदराबाद येथील आयसीएआरनॅशनल अकॅडेमी ऑफ ऍग्रिकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट येथील आपत्ती निवारण केंद्राबरोबर नवी दिल्ली येथील आयसीएआरभारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्थेचे आयसीएआरडेटा केंद्रचे एकात्मीकरण करणार्या कृषी मेघची स्थापना केल्याबद्दल आयसीएआरची प्रशंसा केली |
हा उपक्रम कृषी क्षेत्रातील क्रांती असल्याचे त्यांनी नमूद केले |
तत्पूर्वी आपल्या स्वागतपर भाषणात डॉआरसी |
अग्रवाल उपसंचालक (कृषी शिक्षण) आयसीएआर यांनी कार्यक्रमाच्या मुख्य उद्दिष्टाबाबत माहिती दिली |
कृषी विद्यापीठांच्या माजी विद्यार्थ्यांसाठी सोशल नेटवर्किंगच्या कल्पनेचा परिणामस्वरूप केव्हीसी अल्युनेट विकसित करण्यात आल्याचे अधोरेखित केले |
यामुळे सर्व 74 कृषी विद्यापीठांचे माजी विद्यार्थी एकमेकांशी संपर्क साधू शकतील आणि विद्यार्थ्यांना इंटर्नशिप प्लेसमेंटमध्ये मदत करू शकतील असे ते म्हणाले |
एडवर्ड विल्यम ब्रेस्न्यान कृती दल प्रमुख वर्ल्ड बँक यांनी आयसीएआरचा उपक्रम परिवर्तनात्मक असल्याचे म्हटले आहे यामुळे कृषी शिक्षण व्यवस्थेत मोठे परिवर्तन घडून येईल |
आयसीएआर आणि त्याच्या संस्थांचे वरिष्ठ अधिकारीही या कार्यक्रमात व्हर्च्युअली सहभागी झाले होते |
कृषी मेघची ठळक वैशिष्ट्ये राष्ट्रीय कृषी संशोधन आणि शिक्षण प्रणालीच्या (एनएआरईएस) डिजिटल कृषीच्या सेवा आणि पायाभूत गरजा भागवण्यासाठी 2012 मध्ये उभारलेले विद्यमान डेटा सेंटर (आयसीएआरडीसी) क्लाऊड संगणकीय पायाभूत सुविधांसह बळकट केले जाईल |
आयसीएआर डीसी आणि आयसीएआरकृष मेघ हे घटक असलेले एनएआरईएसक्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर आणि सर्व्हिसेस ईऑफिस आयसीएआरईआरपी एज्युकेशन पोर्टल केव्हीके पोर्टल आणि मोबाइल अॅप्स आयसीएआर संस्था संकेतस्थळे अॅकॅडमिक मॅनेजमेंट सिस्टम माजी विद्यार्थी पोर्टल यूजी आणि पीजी स्तरावरचे ईकोर्सेस इ सारख्या महत्वपूर्ण ऍप्लिकेशनच्या तैनातीसह एनएआरईएस प्रणालीच्या वाढत्या आयटी गरजा पूर्ण करण्यासाठी एक मजबूत आणि गतिशील व्यासपीठ उपलब्ध करतात |
एनएएचईपी अंतर्गत विद्यमान आयसीएआर डेटा सेंटरची व्याप्ती कृषी विद्यापीठांना त्यांची संकेतस्थळे आणि आयटी उपायांसाठी होस्ट करण्यास सक्षम बनवण्यासाठी वाढवण्यात आली आहे सध्याच्या कोविड 19 परिस्थितीमध्ये आयटी ऍप्लिकेशनच्या 24x7 उपलब्धतेमुळे घरून काम करणे तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वैज्ञानिक सहकाऱ्यांशी सहकार्य करणे शक्य झाले आहे |
जोखीम कमी करण्यासाठी ईगव्हर्नन्सची गुणवत्ता उपलब्धता आणि प्रवेशयोग्यता संशोधन वाढवण्यासाठी देशातील कृषी क्षेत्राचा विस्तार आणि शिक्षण वाढविण्यासाठी एनएएआरएम हैदराबाद येथील आयसीएआरकृषी मेघ आयसीएआरआयएएसआरआय नवी दिल्ली येथील आयसीएआरडेटा सेंटरसह जोडण्यात आले आहे एनएएआरएम हैदराबादची निवड निवडण्यात आली आहे कारण ती वेगळ्या भूकंपक्षेत्रात आहे |
हैदराबाद योग्य आहे कारण कुशल आयटी मनुष्यबळ तसेच अनुकूल हवामानासह कमी आर्द्रता पातळी देखील उपलब्ध आहे जी डेटा सेंटर वातावरणात नियंत्रित करता येते |
रसायन आणि खते मंत्रालय गौडा यांनी एचयुआरएलच्या तीन आगामी प्रकल्पांच्या प्रगतीचा घेतला आढावा या प्रकल्पांमुळे देशांतर्गत उत्पादन क्षमता 381 लाख मेटननी वृद्धिंगत होईल गौडा नवी दिल्ली 11 ऑगस्ट 2020 केंद्रीय रसायन व खते मंत्री डीव्ही सदानंद गौडा यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या बैठकीत गोरखपूर बरौनी आणि सिंदरी येथील हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन मर्यादित (एचआरयूएल) च्या आगामी तीन प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला |
एचआरयूएलचे व्यवस्थापकीय संचालक अरुण कुमार गुप्ता यांनी तिन्ही प्रकल्पांच्या प्रगतीबद्दल संक्षिप्त सादरीकरण केले आणि सांगितले की गोरखपूर सिंदरी आणि बरौनी प्रकल्पांनी आतापर्यंत क्रमशः 80 74 आणि 73 प्रगती केली आहे |
लॉकडाऊन प्रवास निर्बंध आणि कामगारांची अनुपलब्धता या सगळ्याचा प्रकल्पाच्या कामावर विपरीत परिणाम झाला आहे |
परिस्थिती आता सुधारली आहे आणि पूर्व कोविडपेक्षा 20 कमी परंतु पुरेसे मनुष्यबळ एकत्रित करून तिन्ही ठिकाणचे काम पुन्हा सुरु करण्यात आले आहे |
हे प्रकल्प कार्यान्वीत व्हायला निर्धारित मुदतीपेक्षा 5 ते 6 महिन्यांचा अधिक कालावधी लागेल परंतु पुढील वर्षाच्या अखेरीपर्यंत हे तिन्ही प्रकल्प कार्यान्वित होतील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले |
कोविड19 मुळे उद्भवलेल्या आव्हानांमुळे काम पूर्ण करण्यात जो विलंब झाला आहे त्याची भरपाई करण्यासाठी आक्रमक योजना तयार करण्याची आवश्यकता असल्याचे गौडा यांनी सांगितले |
प्रवास निर्बंध अजून काही काळ असाच राहील त्यामुळे परदेशातील तज्ञांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सल्लामसलत करावी अशी सूचना त्यांनी यावेळी केली |
तिन्ही प्रकल्प स्थळी काम पुन्हा सुरु करण्यासाठी एचयुआरएलच्या व्यवस्थापनाने केलेल्या प्रयत्नांबद्दल गौडा यांनी त्यांचे अभिनंदन केले |
पुढील वर्षाच्या अखेरीस हे तीन प्रकल्प चालू झाल्यावर देशांतर्गत क्षमता 381 लाख मेटन वाढेल आणि त्याद्वारे यूरिया उत्पादनात देशाची आत्मनिर्भरता वृद्धिंगत होईल |
हे प्रकल्प सुरु झाल्यानंतर देशाची आयात कमी होईल परकीय चलन बचत शेकडो प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष नोकऱ्यांची निर्मिती सरकराला कर इत्यादींच्या बाबतीत देशाला फायदा होईल |
कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) एनटीपीसी लिमिटेड (एनटीपीसी) आणि इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) यांनी संयुक्त उद्यम कंपनी म्हणून 15 जून 2016 रोजी हिंदुस्तान उर्वरक व रसयन लिमिटेड (एचयुआरएल) ची स्थापना केली |
एचयुआरएलच्या माध्यमातून भारत सरकार गोरखपूर सिंदरी आणि बरौनी येथे एफसीआयएल आणि एचएफसीएलच्या तीन बंद यूरिया कारखान्यांचे पुनरुज्जीवन करीत असून प्रत्येकाची वार्षिक क्षमता 127 लाख मेटन आहे * * * |
निती आयोग अटल इनोव्हेशन मिशन आणि डेल टेक्नॉलॉजीजने सुरू केला विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रम 20 नवी दिल्ली 11 ऑगस्ट 2020 अटल टिंकरिंग लॅबच्या (एटीएलएस) तरूण संशोधकांसाठी अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम) नीती आयोग यांनी डेल टेक्नॉलॉजीजच्या सहकार्याने आज विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रम 20 (एसईपी 20) सुरू करण्यात आला |
एसईपी 10 च्या अभूतपूर्व यशानंतर लगेचच याच्या दुसऱ्या भागाचा प्रारंभ नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ राजीव कुमार डेल टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अलोक ओहरी एआयएमचे मिशन संचालक आर रामानन आणि लर्निंग लिंक्स फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ |
``एटीएलच्या तरुण आश्वासक संशोधकांकडून निर्माण होणाऱ्या अभिनव कल्पना पाहिल्यामुळे आज मी पूर्ण आशावादी आहे |
नागरिकांकडून येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाताना वेगळ्या पद्धतीचा विचार करण्याची संधी तरुणांना दिल्यास या देशातील तरूण मुले काय करू शकतात या त्यांच्या नवकल्पनांनी मला आश्चर्यचकित केले आहे |
एसईपी 10 चा समारोप करताना आणि एसईपी 20 ला प्रारंभ करताना यातील संशोधनाचे देशावर काय परिणाम दिसतील याबाबत मी खूप उत्सुक आहे`` असे नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ राजीव कुमार म्हणाले |
एसईपी 20 मुळे विद्यार्थी संशोधकांना डेलच्या प्रतिनिधींच्या बरोबरीने काम करण्याची संधी मिळणार आहे |
त्यांना मार्गदर्शकांचा पाठिंबा मिळेल नमुना आणि तपासणीसाठी प्रोत्साहन आणि अंतिम वापरकर्ता अभिप्राय इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन आणि कल्पनांचे पेटंट करून घेणे प्रक्रिया आणि उत्पादने उत्पादनासाठी प्रोत्साहन तसेच बाजारपेठेत उत्पादन प्रारंभ करताना देखील प्रोत्साहन दिले जाणार आहे |
डेल टेक्नॉलॉजीजचे भारतातील अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अलोक ओहरी म्हणाले ``विद्यार्थ्यांना त्यांचे स्वतःचे अनुभव मिळावेत यासाठी सक्षम बनविण्यासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा उपयोग डेल करीत आहे ज्यायोगे त्यांना एक नाविन्यपूर्ण मानसिकता विकसित करण्यास सक्षम केले जात आहे |
पहिल्या विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रमाच्या निकालामुळे आम्ही अतिशय आनंदित आहोत आणि पुढच्या बॅचच्या साठ्यात काय आहे याची आता आम्हाला उत्सुकता आहे |
नीती आयोगासह असलेल्या आमच्या मजबूत भागीदारीमुळे आम्हाला उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या दृष्टीकोन विस्तारित करण्यासाठी अधिक सक्षम केले आहे`` या समारंभ प्रसंगी बोलताना एआयएम मिशनचे संचालक आर रामानन म्हणाले ``अटल इनोव्हेशन मिशनच उद्दिष्ट देशातील दहा लाख नवनवीन नवनिर्मिती आणि संभाव्य रोजगार निर्मिती करणारे आहे |
डेल टेक्नॉलॉजीज बरोबर भागीदारी म्हणजे अटल टिंकरिंग लॅबच्या तरुण संशोधकांच्या शाळेतील आकांक्षावादी विद्यार्थ्यांच्या उद्योजकता विषयक क्षमतांना विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रमातून उत्तेजन देणे हे आहे तसेच ही भागीदारी देशभरातील नाविन्यपूर्ण प्रतिभेसाठी मूल्यवर्धक ओळख व्यासपीठ तयार करते`` एसईपी 10 ची सुरवात जानेवारी 2019 मध्ये झाली |
10 महिन्यांच्या कठोर कार्यक्रमाच्या माध्यमातून एटीएल मॅरेथॉनचे देशभरातील सर्वोत्तम 6 संघांचे विद्यार्थी देशभरात सामाजातील आव्हानांना सामोरे गेले आणि तळागाळात संशोधन केले आणि त्यावरील उपायांनी त्या एटीएलएस ना त्यांच्या अभिनव नमुन्यांची पूर्णपणे कार्यक्षम उत्पादनांमध्ये रुपांतरित करण्याची संधी मिळाली जी आता बाजारपेठेत उपलब्ध आहेत |
रामानन यांनी सहा संघांचे अभिनंदन केले आहे ``गेल्या काही महिन्यात उद्योजक होण्यासाठी आपण आपले चातुर्य आणि योग्यता दर्शविली आहे |
आपल्या चिकाटीमुळे आपण आपल्या स्वतःच्या स्टार्टअप्स आणि उपक्रमांचे `सहसंस्थापक` बनू शकता |
यातच खरे आत्मनिर्भर भारताचे सार आहे``असे ते म्हणाले ते म्हणाले की यासारख्या उद्योगाच्या भागीदारीमुळे तरुण विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीचे पालनपोषण करणे कठीण आहे आणि ते आपल्या स्वतःसाठी एक चांगले स्थान बनविण्यास सक्षम ठरतील * * * |
संरक्षण मंत्रालय भारतीय हवाई दलासाठी 106 बेसिक ट्रेनर विमानासह 872238 कोटी रुपयांच्या खरेदी प्रस्तावांना डीएसीने दिली मंजुरी नवी दिल्ली 11 ऑगस्ट 2020 संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संरक्षणअधिग्रहण परिषदेने (डीएसी) स्वदेशी क्षमतेवर अवलंबून राहून दल बळकट करण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांना आवश्यक असलेल्या विविध प्लॅटफॉर्म्स आणि उपकरणाच्या भांडवल खरेदीसाठी मंजुरी दिली |
सुमारे 872238 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली |
हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) बेसिक ट्रेनर विमाने (एचटीटी 40) प्रोटोटाइपचा यशस्वीपणे विकास केला असून प्रमाणीकरण प्रक्रिया सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) मूलभूत प्रशिक्षण गरजा पूर्ण करण्यासाठी संरक्षणअधिग्रहण परिषदेने एचएएलकडून 106 बेसिक ट्रेनर विमाने खरेदी करायला मान्यता दिली आहे |
प्रमाणिकरणानंतर 70 बेसिक ट्रेनर विमानांची सुरुवातीला एचएएलकडून खरेदी केली जाईल आणि भारतीय हवाई दलात एचटीटी 40 फ्लीटच्या कार्यान्वयनानंतर उर्वरित 36 विमानांची खरेदी केली जाईल |
भारतीय नौदलाची अग्निशामक क्षमता सुधारण्यासाठी परिषदेने सुपर रैपिड गन माउंट (एसआरजीएम) च्या अद्ययावत आवृत्तीच्या खरेदीला मंजुरी दिली असून ती भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (बीएचईएल) कडून नौदल आणि भारतीय तटरक्षक दल (आयसीजी) युद्धनौकेवर प्रमुख गन म्हणून बसवण्यात येणार आहे |
एसआरजीएमच्या अद्ययावत आवृत्तीमुळे क्षेपणास्त्रे आणि वेगवान हल्ला करणारी विमाने यांचा सामना करण्याची क्षमता वाढली आहे शस्त्रात्रांच्या निर्मिती आणि तंत्रज्ञान या दोन्ही बाबतीत स्वदेशी विकासासाठी आवश्यक क्षमतेची उपलब्धता लक्षात घेता संरक्षण अधिग्रहण परिषदेने भारतीय सैन्य दलासाठी 125 मिमी एपीएफएसडीएस (आर्मर पियर्सिंग फिन स्टेबलाइज्ड डिस्करडींग सबोट ) शस्त्रास्त्रे खरेदी करण्यास मान्यता दिली खरेदी केलेल्या शस्त्रास्त्रांपैकी 70 टक्के स्वदेशी घटक असतील |
डीएसीने मंजुरी दिल्यामुळे एके 203 आणि मानवरहित हवाई वाहन उन्नतीकरणाच्या खरेदीला गती मिळण्याची शक्यता आहे * * * |
कंपनी व्यवहार मंत्रालय केहिन कॉर्पोरेशन निसिन कोग्यो कंपनी लि शोवा कॉर्पोरेशन आणि हिताची ऑटोमोटिव्ह सिस्टम्स लि |
यांनी संयुक्तपणे दाखल केलेल्या प्रस्तावित संयोजनास सीसीआय ने मान्यता दिली नवी दिल्ली 11 ऑगस्ट 2020 भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) केहिन कॉर्पोरेशन निसिन कोग्यो कंपनी लि शोआ कॉर्पोरेशन आणि हिताची ऑटोमोटिव्ह सिस्टम्स लि |
प्रस्तावित संयोजन केहिन कॉर्पोरेशन (केसी) निसिन कोग्यो कंपनी लिमिटेड (एनकेसीएल) शोआ कॉर्पोरेशन (एससी) आणि हिताची ऑटोमोटिव्ह सिस्टम्स लिमिटेड (एचआयएएमएस) होंडा मोटार कंपनी लि |
(एचएएमसीएल) आणि हिताची लिमिटेड (एचएल) दरम्यान संयुक्त उद्यम स्थापन करण्यासंबंधी आहे |
एचएएमसीएल ही जपानमध्ये समाविष्ट असलेली मर्यादित उत्तरदायित्व संयुक्त स्टॉक कॉर्पोरेशन आहे |
एचएएमसीएल जागतिक स्तरावर मोटारसायकल स्कूटर्स ऑटोमोबाईल्स आणि उर्जा उत्पादनांचा विकास उत्पादन आणि विक्री करते |
भारतात एचएएमसीएल प्रामुख्याने वाहन आणि दुचाकी मोटार वाहनांचा व्यवसाय करते |
भारतात केसी आर अँड डी ऑटोमोटिव्ह आणि मोटरसायकल घटकांचे उत्पादन आणि विक्री करण्यात गुंतलेला आहे |
भारतात केसी ऑटोमोटिव्ह आणि मोटरसायकल घटकांचे संशोधन आणि विकास उत्पादन आणि विक्री करते |
गाडीच्या ब्रेकचे भाग बनविण्याच्या उद्देशाने जपानमध्ये एनकेसीएलची स्थापना करण्यात आली आहे |
भारतात एनकेसीएल वाहनांसाठी एकत्रित ब्रेकिंग प्रणालीच्या निर्मिती आणि पुरवठ्याचे काम करते |
1938 मध्ये विमानाचे भाग तयार करण्यासाठी शोका एअरक्राफ्ट प्रेसिजन वर्क्स लि म्हणून एससीची स्थापना करण्यात आली होती |
सध्या ही कंपनी मोटरसायकल आणि हायड्रॉलिक भाग ऑटोमोटिव्ह भाग ड्राईव्हट्रेन भाग आणि स्टीयरिंग प्रणालीच्या भागांचे उत्पादन करते |
भारतात एससी वाहन आणि दुचाकी मोटार वाहनांसाठी शॉक शोषकची निर्मिती करते |
एचआयएएमएसचा 2009 मध्ये एचएलमध्ये समावेश करण्यात आला त्याच्या ऑटो पार्ट्सच्या व्यवसाया पेक्षा याचे कार्यान्वयन वेगळे होते |
एचआयएएमएस पॉवरट्रेन प्रणाली चेसिस प्रणाली आणि प्रगत ड्रायव्हर सहाय्य प्रणाली इत्यादी विकसित करणे उत्पादन करणे विक्री करणे आणि सेवा देणे हे कार्य करते |
भारतात एचआयएएमएस त्याच्या सहाय्यक कंपन्यांमार्फत काम करत आहे ब्रेकिंग सिस्टमच्या घटकांसह ऑटोमोटिव्ह घटकांचे उत्पादन विपणन विक्री आणि सेवा देण्याचे काम करते |
पंतप्रधान कार्यालय पंतप्रधानांनी नागरिकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या नवी दिल्ली 11 ऑगस्ट 2020 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत |
सर्व देशवासियांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा जय श्रीकृष्ण |
अलिकडच्या काही वर्षांत सीसीबीडीटीने थेट करांमध्ये अनेक मोठ्या कर सुधारणा केल्या आहेत |
मागील वर्षी कॉर्पोरेट टॅक्सचे दर 30 टक्क्यांवरून 22 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले होते आणि नव्या उत्पादन युनिटसाठी हे दर 15 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले |
लाभांश वितरण कर' देखील हटविले गेले |
कर सुधारणांअंतर्गत कर दरामध्ये कपात करणे आणि थेट कर कायद्यांचेसुलभीकरण यावर लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे |
आयकर विभागाच्या कामकाजात कार्यक्षमता आणि पारदर्शकता आणण्यासाठी सीबीडीटीने कित्येक पुढाकार घेतले आहेत |
यामध्ये नव्याने सुरू केलेल्या कागदपत्र ओळख क्रमांकाद्वारे ( डीआयएन) अधिकृत माहितीमध्ये अधिक पारदर्शकता आणणेयाचा समावेश आहे याअंतर्गत विभागाच्या प्रत्येक संवादामध्ये संगणकाद्वारे उत्पन्न झालेला वेगळा कागदपत्र ओळख क्रमांक असतो |
वैयक्तिक करदात्यांसाठी आयकर विवरण पत्र मान्य होणं अधिक सुलभ होण्यासाठी आयकर विभाग आधीच माहिती भरलेली आयकर विवरण पत्र सादर करत आहेस्टार्टअप्सचे अनुपालन निकषसुद्धा सुलभ केले आहेत |
गृह मंत्रालय उत्कृष्ट तपास कार्य केल्याबद्दल गृहमंत्रालयाकडून पोलिसांचा विशेष पदकाने गौरव उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशभरातल्या 121 पोलीस कर्मचारीअधिकाऱ्यांचा केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे पदक देऊन गौरव करण्यात आला |
पोलिसांमध्ये तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टीकोन निर्माण व्हावा तसेच उत्तम तपास कार्य करणाऱ्या पोलिसांच्या कार्याची दखल घेतली जावी या हेतूने 2018 साली केंद्र सरकारने हे पुरस्कार सुरू केले |
गौरवार्थींच्या यादीसाठी येथे क्लिक करा *** |
पर्यटन मंत्रालय केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने देखो अपना देश वेबिनार मालिकेअंतर्गत स्वातंत्र्यदिन संकल्पनेवर दुसरा वेबिनार सेल्युलर जेल लेटर्स मेमॉयर्स ण्ड मेमरीज चे केले आयोजन सेल्युलर तुरुंगाच्या गॅलरी आणि कारागृहातून उलगडला भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा प्रवासआगामी वेबिनार जालियनवाला बाग भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील निर्णायक क्षण 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी देश सज्ज होत आहे केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने यानिमित्त देखो अपना देश वेबिनार मालिकेअंतर्गत 10 ऑगस्ट रोजी सेल्युलर जेल लेटर्स मेमॉयर्स ण्ड मेमरीज या वेबिनारचे आयोजन केले होते |
देखो अपना देश मालिकेअंतर्गत सेल्युलर जेल लेटर्स मेमॉयर्स मेमरीज या 46 व्या वेबिनारला निधी बन्सल सीईओ इंडिया सिटी वॉक्स इंडिया विथ लोकल्स डॉ सौमी रॉय हेड ऑफ ऑपरेशन्स इंडिया विथ लोकल्स अँड इंडिया हेरिटेज वॉक्स आणि सौमित्र सेनगुप्ता सिटी एक्सप्लोरर इंडिया सिटी वॉक्स यांनी संबोधित केले |
देखो अपना देश वेबिनार मालिका एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत समृद्ध भारतीय वैविध्यतेचे दर्शन घडवण्यासाठीचा व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म आहे |
या वेबिनारमध्ये सेल्युलर तुरुंगाच्या गॅलरी आणि कारागृहाच्या भिंतींमधून भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा प्रवास दर्शवण्यात आला |
प्रसिद्ध राजकीय बंदी वीर सावरकर बीकेदत्त फजलएहक खैराबादी बरींद्र कुमार घोष सुशील दासगुप्ता यांच्या गाथा सादर करण्यात आल्या |
भारताच्या स्वातंत्र्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अंदमानमधील महत्त्वाच्या योगदानाचीही सादरीकरणातून माहिती देण्यात आली |
पर्यटन मंत्रालयाचे संचालक राजेश कुमार साहू यांनी समारोपाच्या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन केलेल्या अंदमान आणि निकोबार बेटांवरील सबमरीन ऑप्टीकल फायबर केबलचा उल्लेख केला |
या जोडणीमुळे बेटांवर आता अमर्याद संधी निर्माण होतील |
पंतप्रधान म्हणाले अंदमान आणि निकोबार बेटांना आता स्वस्त आणि चांगली जोडणी मिळाली आहे त्यामुळे डिजीटल इंडिया विशेषतः ऑनलाईन शिक्षण टेलिमेडिसीन बँकींग व्यवस्था ऑनलाईन व्यवसाय आणि पर्यटनाला चालना मिळेल *** |
उपराष्ट्रपती कार्यालय ऐतिहासिक घटनांचा सर्वंकष आणि वस्तुनिष्ठ लेखाजोखा घेणे आवश्यक उपराष्ट्रपती देशभरातील सर्व स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या त्यागाची पाठ्यपुस्तकात मांडणी आवश्यक उपराष्ट्रपतीनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरील पुस्तकाचे अनावरण ऐतिहासिक घटनांचा सर्वंकष सत्य आणि वस्तुनिष्ठ लेखाजोखा मांडण्याची गरज असल्याचे आग्रही प्रतिपादन उपराष्ट्रपती एम वैंकेय्या नायडू यांनी आज केले |
नेताजी सुभाष बोस भारतीय राष्ट्रीय सेना (ina) ट्रस्ट मधील सहयोगी सदस्य असलेल्या डॉ कल्याण कुमार डे लिखित नेताजीइंडियाज इंडिपेन्डन्स अँड ब्रिटीश अर्काइव्हज या पुस्तकाचे अनावरण केल्यानंतर उपराष्ट्रपती निवास येथे ते बोलत होते |
नेताजींशी संबधीत काही महत्वाचे दस्तावेज या पुस्तकात त्याद्वारे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात नेताजींनी बजावलेल्या महत्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकल्याचा उल्लेख करत उपराष्ट्रपतींनी नवीन पिढीला भारताच्या इतिहासाबद्दल सजग राहण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले |
Subsets and Splits