text
stringlengths
1
2.66k
संरक्षण मंत्रालय सन्मान आणि पुरस्कार स्वातंत्र्यदिन 2020 नवी दिल्‍ली 14 ऑगस्‍ट 2020 स्वातंत्र्यदिन 2020 च्या निमित्ताने लष्कराच्या कर्मचाऱ्यांना खालील शौर्य पुरस्कार जाहीर झाले आहेत
अनुक्रमांक पुरस्कार संख्या माहिती 1
शौर्य चक्र तीन स्मृतिचिन्हांसोबत 2
सेना पदक दंड (शौर्य) पाच 3
सेना पदकl (शौर्य) साठ आठ मरणोत्त्तर पुरस्कारांसहित 4
अधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार पुरस्कार एकोणीस आठ मरणोत्तर पुरस्कारांसहित attached files (a) list of gallantry awardees 2020
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय जैवतंत्रज्ञान विभागाच्यावतीने पुण्याच्या व्हेंचर सेंटरयेथे आता राष्ट्रीय सुविधा सीबीए जैवऔषध विकासक आणि उत्पादकांसाठी उच्च गुणवत्तेची विश्लेषणात्मक सेवा प्रदान करणार जैवतंत्रज्ञान विभागाच्या जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषद (बीआयआरएसी) च्यावतीने एनबीएम म्हणजेच नॅशनल बायोफार्मा मिशनच्या सहकार्याने सीबीए म्हणजेच द सेंटर फॉर बायोफार्मा अॅनालिसच्या जैवऔषध विकासक आणि उत्पादकांसाठी उच्च गुणवत्तेची विश्लेषणात्मक सेवा प्रदान करण्यात येणार आहे या सीबीएचे आभासी उद्घाटन जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव डॉ
सीबीए जैवऔषध विकासक आणि उत्पादकांसाठी उच्च गुणवत्तेची विश्लेषणात्मक सेवा प्रदान करणार आहे
जैविक आणि जैवऔषध संरचनात्मक आणि कार्यात्मक वैशिष्ट्य यांच्यासाठी एक संशोधन केंद्र म्हणून कार्यरत राहील जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव डॉ
यावेळी डॉ रेणू स्वरूप म्हणाल्या शैक्षणिक आणि सरकारी संशोधन प्रयोगशाळा या स्टार्टअप्स तसेच अनेक भारतीय कंपन्यांकडून होत जात असलेल्या विविध संशोधनासाठी ही सीबीए संस्था अतिशय महत्वाची भूमिका बजावेल कारण उच्चगुणवत्तेच्या विश्लेषणात्मक जैवऔषधांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना पाठिंबा यामुळे मिळू शकणार आहे
तसेच नियामक मान्यतेसाठी आवश्यक असलेल्या अभ्यासाला सल्ला देण्याची गरज असते त्यामुळे विकास प्रक्रिया वेग घेण्यास मदत मिळते यावेळी बोलताना सीएसआयआरएनसीएलचे संचालक प्राध्यापक एके नांगिया यांनी अतिसूक्ष्म रेणूंच्या उपचारासाठी एनसीएलने 1970 ते 80 च्या दशकामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन केले आहे हे अधोरेखित केले तसेच आता या क्षेत्रात भारतामध्ये होत असलेल्या संशोधनाला हातभार लावण्यास एनसीएल उत्सुक असल्याचेही सांगितले
पुण्याच्या आयबीपीएल म्हणजेच इंटरनॅशनल बायोटेक पार्क लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत बिस्वाल म्हणाले सीबीएच्या पायाभूत सुविधा विकासासाठी सीएसआरच्या पाठिंब्यामुळे आयबीपीएल आनंदी आहे जैवऔषध आणि वैद्यतंत्रज्ञान विकास आणि उत्पादन या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करण्यासाठी पुणे हे ज्ञानकेंद्र आहे
डीबीटी विषयी जैवतंज्ञान विभागाचे कामकाज विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत चालते कृषी आरोग्यसेवा पशूविज्ञान पर्यावरण आणि उद्योग या क्षेत्रामध्ये जैव तंत्रज्ञानाची होत असलेली वृद्धी आणि उपयोग यांना प्रोत्साहन देवून प्रकल्पांना गती दिली जाते
भारतातल्या जनतेच्या आरोग्य दर्जामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्वांना परवडणाया दरामध्ये वैद्यकीय उत्पादने तयार करण्यासाठी हा खर्च करण्यात येणार आहे
लस वैद्यकीय उपकरणे आणि निदान तसेच जैवउपचार क्लिनिकल चाचणी आणि इतर तंत्रज्ञान क्षमता बळकट करणे ही महत्वाची कामे देशात करण्यात येत आहेत
गृह मंत्रालय केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध होण्याचे आणि जास्तीत जास्त मेक इन इंडिया उत्पादनांचा उपयोग करत भारताला नव्या शिखरावर नेण्यासाठी योगदान देण्याचे केले आवाहन केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत74व्या स्वातंत्र्य दिनी त्यांनी नवी दिल्लीतल्या आपल्या निवासस्थानी राष्ट्र ध्वज फडकवला आपला पराक्रम आणि बलिदानाने देशालास्वातंत्र्य प्राप्त करून देणाऱ्या थोर स्वातंत्र्यसेनांनीना कोटी कोटी प्रणाम त्याचबरोबर स्वातंत्र्यानंतर देशाची एकता अखंडता आणि सुरक्षेसाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या वीरांनाही नमन करत असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे
एकीकडे मोदी सरकारने गरीब वंचित वर्गाला घरवीजआरोग्य विमा यासारख्या सुविधा पुरवल्याआहेत तरदुसरीकडे भारतालाएक मजबूत राष्ट्र बनवले आहे या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध होऊ याआणिजास्तीत जास्त मेक इन इंडिया उत्पादनांचाउपयोग करत भारताला नव्या शिखरावर नेण्यासाठी योगदान देऊ या असेआवाहन त्यांनी देशवासियांना केले आहे ***
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारतात एका दिवसात रुग्ण बरे होण्याचा आणखी एक विक्रम गेल्या 24 तासांत 57381 रुग्ण बरे32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुग्ण बरे होण्याचा दर 50 पेक्षा अधिकभारतात एका दिवसात सर्वाधिक 86 लाख कोविड चाचण्या एका दिवसात बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे भारतात एका दिवसात बरे होणाऱ्या कोविड19 रुग्णांच्या संख्येने नवा उच्चांक गाठला आहे
गेल्या 24 तासांत 57381 रुग्ण बरे झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात येत आहे आणि गृह अलगीकरण (सौम्य आणि मध्यम स्वरुपाचे रुग्ण) त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 18 लाखांपेक्षा (1808936)
बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय कोविड19 रुग्ण यांच्यातील अंतर वाढले आहे सध्या ते 11 लाखांहून अधिक आहे (आजची संख्या 1140716 एवढी आहे)
सध्या सक्रीय रुग्णांची संख्या (668220) एवढी आहे
ती आजच्या एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 2645 आहे आणखी 24 तासांत यात घट होईल
हे सर्व वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत
रुग्णालयातील सुधारित आणि परिणामकारक वैद्यकीय उपचारपद्धती रुग्णालयात रूग्णांना आणण्यासाठीची रुग्णवाहिका सेवा सुधारुन अधिक समन्वय आणणे आणि कोविडच्या रुग्णांना तात्काळ उपचार आणि एम्स नवी दिल्ली यांच्याकडून टेलिकन्सलटेशन अशा उपाययोजना सातत्याने केल्या गेल्या
परिणामी कोविडचा मृत्यूदर जागतिक मृत्यूदराच्या तुलनेत सातत्याने कमी राहिला आहे
आज हा दर 198 एवढा आहे
भारताच्या टेस्ट ट्रॅक ट्रीट पद्धतीमुळे चाचण्यांचा नवीन उच्चांक गाठला आहे गेल्या 24 तासांत 868679 चाचण्या करण्यात आल्या आहेत
यामुळे आतापर्यंतच्या एकत्रित चाचण्यांची संख्या 285 कोटींपेक्षा अधिक झाली आहे
श्रेणीबद्ध विस्तार आणि वाढत्या प्रतिसादामुळे चाचणी प्रयोगशाळांची संख्या वाढवण्यात आली आहे
सध्या देशात 1465 प्रयोगशाळा आहे 968 प्रयोगशाळा शासकीय आणि 497 खासगी प्रयोगशाळा आहेत
यामध्ये रिअलटाईम rt pcr प्रयोगशाळा 751 (शासकीय 448 + खासगी 303) truenat आधारीत प्रयोगशाळा 597 (शासकीय 486 + खासगी 111) cbnaat आधारीत प्रयोगशाळा 117 (शासकीय 34 + खासगी 83) **** ***
उपराष्ट्रपती कार्यालय उपराष्ट्रपतींनी केले भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील दुर्लक्षित क्रांतीकारकांचे स्मरण उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली देशात सांस्कृतिक पुनरुत्थानाची आवश्यकतासर्व वंचितांचे सबलीकरण करण्याची मागणीअंत्योदय आणि सर्वोदय या तत्वानुसारच मार्गक्रमण करावे उपराष्ट्रपतीभारत प्रत्येक बाबतीत 2022 पर्यंत आत्मनिर्भर झालाच पाहिजे उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती एम वेंकैय्या नायडू यांनी आज 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील काहीसे दुर्लक्षित राहिलेल्या क्रांतीकारकांचे स्मरण केले
फेसबुक पोस्टमध्ये उपराष्ट्रपती नायडू म्हणतात आपल्या प्रतिकांचा उत्सव करणे स्वाभाविक आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्यांमध्ये अनेक स्वातंत्र्यसैनिक आपापल्या प्रांतात लोकप्रिय होते आणि त्यांच्या असंख्य पराक्रमांमुळेच ब्रिटीशांना सोडून जावे लागले
त्यांनी भर देऊन सांगितले की ते केवळ ठराविक प्रदेशापुरतेच मर्यादीत नाहीत तर ते राष्ट्रीय हिरो आहेत ज्यांचे शौर्य आणि बलिदान देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचले पाहिजे
राष्ट्राने सदैव या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण केले पाहिजे त्यांच्या निःस्वार्थी प्रयत्नांमुळेच आपण आज सार्वभौम आणि संसदीय लोकशाहीचे नागरीक आहोत
उपराष्ट्रपती म्हणाले लोकांना विशेषतः युवकांना अशा क्रांतीकारकांच्या कार्याची माहिती देणे आवश्यक आहे
त्यांनी सल्ला दिला की राज्यांनी शौर्य आणि बलिदानाच्या कथा इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये प्रकाशित कराव्या आणि त्यांचा वारसा जिवंत ठेवावा
त्याचवेळी आपण त्यांना न्याय देऊ आणि त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करु खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत श्रेष्ठ भारत आणि सशक्त भारत असे उपराष्ट्रपती म्हणाले
उपराष्ट्रपतींनी अल्लुरी सीताराम राजू चिन्नास्वामी सुब्रमण्य भारतीयार मातंगिणी हजरा बेगम हजरत महल पांडूरंग महादेव बापट पोट्टी श्रीरामलु अरुणा असफ अली गरीमेला सत्यनारायण लक्ष्मी सेहगल बिरसा मुंडा पार्वती गिरी तिरोत सिंग कंकलता बरुआ कन्नेगन्ती हनुमान्थू शहीद खुदीराम बोस वेलू नचीयार कित्तुर चेन्नमा वीरपांडेय कट्टाबोम्मन व्हीओचिदंबरम पिल्लई सुब्रमण्यम सिवा सुर्य सेन अशफाकउल्ला खान बटुकेश्वर दत्त पिंगलेई वेंकेय्या दुर्गाबाई देशमुख श्री अरविंद घोष आणि मॅडम भिकाजी कामा यांचा उल्लेख केला
ते म्हणाले टाळेबंदीमुळे या महान नेत्यांचे आयुष्य आणि कार्य याबद्दलच्या पुस्तकांचे वाचन करण्यास आणि ज्ञानार्जन करण्यास भरपूर वेळ मिळाला आहे
उपराष्ट्रपती म्हणाले ब्रिटीश राज्यकर्त्यांमुळे भारताचा विकास खुंटला अनेक बाबी खराब केल्या आणि संस्कृतीची पिछेहाट झाली
गतवैभवाच्या खुणा ब्रिटीश राज्यकर्त्यांमुळे नाहीशा झाल्या म्हणून उपराष्ट्रपतींनी सांस्कृतिक पुनरुत्थानाची गरज व्यक्त केली आणि साहित्य आणि कला आपल्या राष्ट्रीय भाषांमध्ये गुंफण्याची मागणी केली
त्यांनी विश्वास व्यक्त केला की भारत गतवैभव प्राप्त करेल आणि 130 कोटी नागरिकांची इच्छाशक्ती आणि प्रचंड ऊर्जेच्या जोरावर आदर्श संसदीय लोकशाही ठरेल
ते म्हणाले सार्वजनिक क्षेत्रासह प्रत्येक क्षेत्रातील भारतीयाने कर्तव्यपूर्ती करावी ज्यामुळे भारत विकास आणि भरभराटीची नवी उंची गाठेल
भारताच्या प्रगतीतील काही महत्त्वाच्या टप्प्यांविषयी सांगताना उपराष्ट्रपती म्हणाले गेल्या पाच वर्षांत भारतात पायाभूत सुविधांचे प्रचंड आधुनिकीकरण झाले आहे आणि सामाजिक सुरक्षेचे जाळे मजबूत झाले आहे
ते म्हणाले देशात सध्या वीज नसलेले कोणतेही गाव नाही तसेच उघड्यावर शौचापासून मुक्त आहे
विविध क्षेत्रांतील विशेषतः कृषी क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण निर्णयांमुळे अर्थव्यवस्था प्रगतीपथावर आहे
सरकारने नुकत्याच केलेल्या कर सुधारणांचे नायडूंनी कौतुक केले
आतापर्यंत देशाने केलेली प्रगती लक्षात घेऊन तटस्थपणे आत्मनिरीक्षण करावे 2022 पर्यंत आपण राष्ट्र म्हणून काय साध्य करु इच्छितो याची प्रत्येकाने विचारणा करावी असे उपराष्ट्रपती म्हणाले
उपराष्ट्रपतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्प से सिद्धी ही घोषणा आपल्या विचारसरणीत मुलभूत बदल करण्याविषयी आहे 202223 पर्यंत नवभारत निर्मितीसाठी आपण कसा विचार करतो कसे वागतो आणि कृत्य करतो यासंबंधी आहे असे सांगितले
2022 चे ध्येय स्पष्ट करताना ज्यावेळी भारत स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करेल नायडू म्हणाले भारतात कोणीही बेघर असता कामा नये
प्रत्येक नागरिकाला शिक्षण रोजगार आरोग्यसुविधा स्वच्छ अन्न आणि पिण्याचे पाणी आणि स्वच्छता मिळाली पाहिजे
ते म्हणाले 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत
उपराष्ट्रपती नायडू यांनी लोकसंख्याशास्त्रीय लाभांश लक्षात घेण्यासाठी युवकांच्या कौशल्यामध्ये सुधारणा करण्यावर नव्याने भर देण्यास सांगितले
ते म्हणाले आपण जोमाने कार्य करुन दारिद्र्यनिर्मुलन सामाजिक आणि लिंगभेद आणि भ्रष्टाचार निर्मुलन केले पाहिजे
आपण वंचित घटकांचे यात दिव्यांग महिला ज्येष्ठ नागरीक आणि तृतीयपंथी यांना सुरक्षित उत्पादनक्षम लाभदायी समृद्ध आणि शांततापूर्ण जीवन सुनिश्चित केले पाहिजे असे म्हणाले
अंत्योदय आणि सर्वोदय हेच आपल्या मार्गक्रमणाचे मुख्य तत्व असले पाहिजे आणि 2022 पर्यंत प्रत्येक बाबतीत भारत आत्मनिर्भर झाला पाहिजे यावर उपराष्ट्रपतींनी भर दिला
पंतप्रधान कार्यालय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळच्या पंतप्रधानांदरम्यान दूरध्वनी संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज नेपाळचे पंतप्रधान के
पी शर्मा ओली यांनी दूरध्वनी केला
नेपाळच्या पंतप्रधानांनी सरकार आणि भारतीय नागरिकांना 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि भारताची नुकतीच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत अस्थायी सभासद म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले
दोन्ही नेत्यांनी कोविड19 संक्रमणाचा परिणाम कमी करण्यासंदर्भात परस्पर एकवाक्यता व्यक्त केली
याबाबतीत पंतप्रधानांनी नेपाळला भारताचे निरंतर सहकार्य जाहीर केले
पंतप्रधानांनी नेपाळच्या पंतप्रधानांचे दूरध्वनीबद्दल आभार व्यक्त केले आणि भारत आणि नेपाळमधील नागरी आणि सांस्कृतिक बंधाचे स्मरण केले
अर्थ मंत्रालय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात आत्मनिर्भर भारताचे महत्त्व अधोरेखित केले कोविड19 च्या दुष्परिणामांमधून देशाला बाहेर काढण्यात राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन प्रकल्प महत्वाची भूमिका बजावणार पंतप्रधानमेक इन इंडिया सह मेक फॉर वर्ल्ड हा मंत्र असावा पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 74 व्या स्वातंत्र्य दिनी नवी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला
लाल किल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधानांनी कोविड 19 साथीच्या आजाराच्या व्यवस्थापनातील विविध मुद्यांपासून ते आत्मनिर्भर भारत अभियानाचा भाग म्हणून देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या उपययोजना आणि मध्यमवर्गीयांना केंद्रस्थानी ठेवून अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी उचललेली पावले यासगळ्याविषयी बोलले
पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारताचे महत्व पुन्हा अधोरेखित करत ही काळाची गरज असल्याने भारतीय नागरिकांनी यासाठी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन केले
कोरोना विषाणू साथीचा आजरा देशभर पसरला असताना देखील 130 कोटी भारतीयांनी आत्मनिर्भर होण्याचा निर्णय केला आहे
आत्मनिर्भर (स्वावलंबी) होणे हे अनिवार्य आहे भारत हे स्वप्न नक्की साकार करेल असा मला आत्मविश्वास आहे
मला माझ्या नागरिकांच्या क्षमता आत्मविश्वास यावर विश्वास आहे
एकदा आपण काही करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आपण ते साध्य करेपर्यंत विश्रांती घेत नाही असे ते म्हणाले
देशाच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनी देशाला संबोधित करताना पंतप्रधानांनी पायाभूत सुविधा क्षेत्राला मोठी चालना देण्याची घोषणा केली
ते म्हणाले की राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन (एनआयपी) योजनेच्या मदतीने जलद विकासासाठी एकूणच पायाभूत सुविधा सुधारण्यावर सरकार प्राधान्य देत आहे आणि एनआयपीमध्ये 110 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले
यासाठी विविध क्षेत्रात 7000 हून अधिक प्रकल्पांची ओळख पटवण्यात आली आहे असे पंतप्रधान म्हणाले कोविड19 च्या दुष्परिणामांमधून देशाला बाहेर काढण्यात राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन प्रकल्प महत्वाची भूमिका बजावेल
एनआयपी हा भारताच्या पायाभूत विकास निर्मिती प्रक्रियेत क्रांतिकारक बदल घडवून आणेल
अनेक नवीन रोजगार निर्माण होतील आणि आपले शेतकरी तरुण आणि उद्योजकांना याचा फायदा होईल
आता आपल्याला मेक इन इंडिया सोबतच मेक फॉर वर्ल्ड या मंत्रा सोबत पुढे जावे लागेल यावर पंतप्रधानांनी जोर दिला
आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की भारतात ज्या सुधारणा होत आहेत त्याकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष आहे
परिणामी एफडीआयने सर्व विक्रम मोडले आहेत
कोविड साथीच्या आजाराच्या काळात देखील देखील भारताच्या एफडीआयमध्ये 18 वाढ झाली
देशातील गरिबांच्या जनधन खात्यात कोट्यावधी रुपये थेट हस्तांतरित होतील याची कोणी कल्पना केली होती का
शेतकऱ्यांच्या हितासाठी एपीएमसी कायद्यात इतका मोठा बदल घडून येईल असा कोणी विचार केला होता का
एक देशएक शिधापत्रिका एक देश एक करप्रणाली नादारी आणि दिवाळखोरी कायदा आणि बँकांचे विलीनीकरण हे आज देशाचे वास्तव आहे असे पंतप्रधान म्हणाले
पंतप्रधान म्हणाले की 7 कोटी गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर देण्यात आले 80 कोटींपेक्षा जास्त लोकांना ज्यांच्याकडे शिधापत्रिका असो किंवा नसो अशा लोकांना मोफत अन्नधान्य वितरीत केले सुमारे 90 हजार कोटी रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यात आले
गावातील गरीबांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू करण्यात आले आहे
पहिल्यांदाच तुमच्या गृह कर्जाचे हफ्ते भरण्याच्या कालावधीत 6 लाख रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे
हजारो अपूर्ण घरे पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षी 25 हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला आहे असे पंतप्रधानांनी राष्ट्राला संबोधित करताना सांगितले
पंतप्रधान म्हणाले की देशात सुरू झालेल्या 40 कोटी जन धन खात्यांपैकी सुमारे 22 कोटी खाती महिलांची आहेत
कोरोनाच्या काळात एप्रिलमेजून या तीन महिन्यांत सुमारे तीस हजार कोटी रुपये या महिलांच्या खात्यावर थेट हस्तांतरित करण्यात आले आहेत आपण पहिले की कोरोनाच्या काळात डिजिटल इंडिया मोहिमेनी महत्वाची भूमिका बजावली आहे
गेल्या महिन्यात फक्त भीम यूपीआयकडून सुमारे 3 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत असे ते म्हणाले
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय स्वातंत्र्य दिनी राष्ट्राला केलेल्या संबोधनात कोविड विरोधातल्या देशाच्या खंबीर लढ्याला पंतप्रधानांचा सलाम राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाची केली घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य क्षेत्रातली केंद्र सरकारची कामगिरी ठळकपणे मांडत सध्या सुरु असलेली कोविड 19 महामारी आणि त्या संदर्भात भारताच्या श्रेणीबद्ध आणि तत्पर दृष्टीकोनामुळे देश आत्मनिर्भर झाला या बाबींना 74 व्या स्वातंत्र्य दिनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात स्थान दिले
या आजारात बळी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांच्या दुखाःत आपण सहभागी असल्याचे सांगून भारताच्या कोरोना योद्ध्यांनी सेवा परमो धर्म याचे उदाहरणच दर्शवले आहे असे सांगून या योध्यांची त्यांनी प्रशंसा केली कोरोना विरोधातला लढा आपण नक्कीच जिंकू याचा पुनरुच्चार त्यांनी केला
प्रबळ इच्छा आणि संकल्प आपल्याला विजयाकडे नेतो असे त्यांनी सांगितले
देशाच्या आत्म निर्भर भारत या भावनेमुळे कोविड19 च्या काळात स्वयंपूर्णता साध्य झाल्याचे त्यांनी सांगितले
देशात पूर्वी पीपीई किट एन 95 मास्क व्हेंटीलेटर यांची निर्मिती होत नव्हती मात्र आता देश यांची निर्मिती करत असल्याचे ते म्हणालेजागतिक तोडीच्या अशा वस्तूंच्या उत्पादन क्षमतेत झालेल्या वाढीमुळे व्होकल फॉर लोकल लाही पुष्टी मिळत आहे
लाल किल्यावरुन बोलताना पंतप्रधानांनी कोविड चाचण्या करण्याच्या क्षमतेत आपण केलेली प्रगती सांगितली केवळ एका प्रयोगशाळेपासून देशात आता 1400 प्रयोगशाळा आहेत
सुरवातीला आपण दिवसाला 300 चाचण्या करत होतो आता आपण दिवसाला 7 लाखाहून अधिक चाचण्या करत आहोत
अतिशय कमी कालावधीत आपण हे साध्य केल्याचे ते म्हणाले
वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य पायाभूत सुविधा यात देशाची क्षमता व्यापक झाली आहे याबाबत सांगतानाच नव्या एम्स आणि वैद्यकीय महाविद्यालयांमुळे देशाच्या वैद्यकीय पायाभूत सुविधा बळकट होणार असल्याचे त्यांनी सांगितलेएमबीबीएसआणि एमडी अभ्यासक्रमात 45000 पेक्षा जास्त जागा वाढवण्यात आल्या आहेत
सध्याच्या महामारीच्या काळात कोविड व्यतिरिक्त आरोग्य सेवाची तरतूद करण्यात आयुष्मान भारत आरोग्य आणि वेलनेस सेंटर यांनी बजावलेल्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली