text
stringlengths
1
2.66k
या धोरणामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात समावेशकता नाविन्यता आणि संस्था संस्कृती सक्षम होईल
कोवळ्या मनांना उन्मुक्तपणे विकास साधता यावा यासाठी मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्यात आला आहे
यामुळे भारतीय भाषांबरोबरच देशाची एकताही अधिक दृढ होईल
सक्षम देश घडविण्यासाठी युवांचे सक्षमीकरण आवश्यक आहे
राष्ट्रीय शिक्षण धोरण हे त्या दिशेने टाकलेले एक योग्य पाऊल आहे
माझ्या प्रिय देशबांधवांनो 23 अवघ्या दहा दिवसांपूर्वी अयोध्येत श्री राम जन्मभूमी येथे मंदिराचे बांधकाम सुरू झाले
हा सर्वांसाठी अभिमानाचा क्षण होता
देशातील नागरिकांनी याबाबतीत दीर्घकाळ संयम राखला आणि न्यायव्यवस्थेवर अखंड विश्वास दाखवला
रामजन्मभूमीचा प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातूनच सोडविण्यात आला
सर्व संबंधित पक्षांनी आणि जनतेने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदराने स्वीकार केला आणि अवघ्या जगासमोर शांतता अहिंसा प्रेम आणि सलोखा या भारतीय मूल्यांचा आदर्श ठेवला
या स्तुत्य आचरणाबद्दल मी सर्व नागरिकांचे मनापासून अभिनंदन करतो
माझ्या प्रिय देशबांधवांनो 24 जेव्हा भारताने स्वातंत्र्य प्राप्त केले तेव्हा लोकशाहीचा प्रयोग आपल्या देशात फार काळ चालणार नाही असा अनेकांचा अंदाज होता
आपल्या प्राचीन परंपरा आणि समृद्ध विविधता हे आपल्या राजकीय व्यवस्थेच्या लोकशाहीकरणातले अडथळे ठरतील असा त्यांचा कयास होता
आपण मात्र आपली ही बलस्थाने जपली आणि त्याचमुळे जगातला सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश एवढा जिवंत ठरला आहे
मानवतेच्या कल्याणासाठी भारताने आपली ही अग्रणी भूमिका कायम ठेवणे गरजेचे आहे
कोरोनाच्या या साथीच्या रोगाच्या काळात आपण सर्वांनी दाखविलेल्या संयमाचे आणि शहाणपणाचे जगभरात कौतुक झाले आहे
यापुढेही आपण अशाच प्रकारे काळजी घ्याल आणि जबाबदारीने वागाल याची मला खात्री वाटते
बौद्धिक आणि अध्यात्मिक समृद्धी आणि जागतिक शांततेसाठी प्रोत्साहक ठरेल असे बरेच काही आपण जगाला देऊ शकतो
याच भावनेसह मी सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः । सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःखभाग् भवेत् अर्थात सर्व आनंदात राहोत सर्व आजारांपासून मुक्त राहोत जे काही पवित्र आहे त्याचे सर्वांना दर्शन व्हावे कोणालाही दुःख होऊ नये
या प्रार्थनेतून सर्वांच्या कल्याणासाठी दिलेला संदेश ही मानवतेसाठी भारतातर्फे एक अनोखी भेट आहे
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मी पुन्हा एकदा आपले सर्वांचे अभिनंदन करतो
आपणा सर्वांना उत्तम आरोग्यासाठी आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो
संरक्षण मंत्रालय नौदल जवानांचा स्वातंत्र्यदिन 2020 रोजी शौर्य पुरस्काराने गौरव नवी दिल्‍ली 14 ऑगस्‍ट 2020 नौसेना पदक (शौर्य) कॅप्टन मृगांक श्योकंद (05107एफ) भारतीय नौदलाच्या मिग29के च्या ताफ्यातील सर्वात अनुभवी अधिकारी
शोधमोहिमेच्या ठिकाणी उच्च शक्ती प्रक्षेपित वाहिन्या (५ मीटर) पर्यंत होत्या
झाडावर अडकलेल्या व्यक्ती तीन दिवसांपासून भुकेल्या होत्या त्यामुळे त्या रेस्क्यू बास्केटपर्यंतही पोहचू शकत नव्हत्या
नौदल अधिकाऱ्याने निःस्वार्थी भावनेने आणि असमान्य शौर्याने जोरदार वाऱ्यातही हेलिकॉप्टर 125 फूट अशा अतिशय कमी उंचीवर आणण्याचा निर्णय घेतला आणि 25 मिनिटांच्या संघर्षानंतर दोघांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले
त्यांच्या या कार्याबद्दल कमांडर धनुष मेनन (05556 a) यांना नौसेना पदक (शौर्य) प्रदान करण्यात आले आहे
नौसेना पदक (शौर्य) हरिदास कुन्डू सीएचए (एफडी) 130956b हरिदास कुन्डू सीएच (एफडी) एअरक्रू डायव्हर म्हणून बेळगावी कर्नाटक येथे नौदलाच्या ऑपरेशन वर्षा राहत मोहिमेत 08 आणि 09 ऑगस्ट 19 रोजी सहभागी होते
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दोन ज्येष्ठ नागरिकांचे प्राण वाचवले या असामान्य कार्याबद्दल हरिदास कुन्डू सीएचए (एफडी) 130956b यांना नौसेना पदक (शौर्य) प्रदान करण्यात आले आहे
नौसेना पदक (शौर्य) नवीन कुमार एलएस (uw) 230889 नवीन कुमार हे नाविक काश्मीरमधील दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या एका गटामध्ये होते
त्यांच्या निःस्वार्थी कार्याबद्दल नवीन कुमार एल एस (युडब्ल्यू) यांना नौसैना पदक (शौर्य) प्रदान करण्यात आला आहे
रेल्वे मंत्रालय नवी दिल्‍ली 14 ऑगस्‍ट 2020 उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदक गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस पदक * * *
आदिवासी विकास मंत्रालय अर्जुन मुंडा 17 ऑगस्ट 2020 रोजी स्वास्थ्य या आदिवासी आरोग्य आणि पोषण पोर्टलचा ईप्रारंभ करणार नवी दिल्‍ली 14 ऑगस्‍ट 2020 केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा 17 ऑगस्ट 2020 रोजी भारतातील आदिवासींच्या आरोग्य आणि कल्याणासाठी स्वास्थ्य या आदिवासी आरोग्य आणि पोषण पोर्टलचा ईप्रारंभ करणार आहेत
या कार्यक्रमाला राज्यमंत्री रेणुका सिंह सरुता उपस्थित राहणार आहेत
आदिवासी कल्याण मंत्रालयाने पिरामल स्वास्थ्य या उत्कृष्टता केंद्राच्या सहकार्याने आदिवासींचे आरोग्य आणि अनुसूचित जमातीशी संबंधित पोषणविषयक सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे स्वास्थ्य हे आदिवासी आरोग्य व पोषण पोर्टल विकसित केले आहे
देशातील आदिवासी लोकसंख्येच्या आरोग्य आणि पोषण संबंधित माहितीसाठी स्वास्थ्य हे अशा प्रकारचे पहिले सर्वसमावेशक व्यासपीठ आहे
यात डॅशबोर्ड नॉलेज रेपॉजिटरी पार्टनर सेगमेंट सिकल सेल डिसिजिस (एससीडी) सपोर्ट कॉर्नर आहे
177 उच्च प्राथमिकता असलेल्या आदिवासी जिल्ह्यांसाठी डॅशबोर्डमध्ये विविध स्रोतांकडून संकलित माहिती आहे याव्यतिरिक्त पोर्टलमध्ये आदिवासींचे आरोग्य आणि पोषण संबंधी अनेक स्त्रोतांकडून प्राप्त आदिवासी समुदायावरील संशोधन अभ्यास नवकल्पना आणि सर्वोत्तम पद्धती देखील आहेत
याव्यतिरिक्त पोर्टलमधील सिकल सेल डिसीज सपोर्ट कॉर्नर सिकल सेल रोग असलेल्या लोंकाना स्वतःची नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करते
हे पोर्टल विद्यमान ज्ञानाचा पूल साधेल पुरावाआधारित धोरण तयार करेल आणि विविध उपाययोजनांना उत्तेजन देईल ज्यामुळे देशातील आदिवासींच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत व्यापक सुधारणा होईल अशी आशा आहे
पिरामल स्वास्थ्य व्यवस्थापन आणि संशोधन संस्थेच्या सहकार्याने आदिवासी कल्याण मंत्रालयाने स्थापन केलेल्या पोर्टलचे व्यवस्थापन आरोग्य आणि पोषण ज्ञान व्यवस्थापनातील उत्कृष्टता केंद्राद्वारे केले जाईल
आदिवासींचे आरोग्य आणि पोषण परिणाम सुधारण्यासाठी आदिवासींचे आरोग्य आणि पोषणाची माहितीसंकलित करणे पुरावेआधारित धोरण तयार करणे यशस्वी मॉडेल्स उत्तम पद्धती आणि नाविन्यपूर्ण उपायचे दस्तऐवजीकरण ज्ञानाचा प्रसार व आदानप्रदान सुलभ करणे नेटवर्क तयार करणे आणि हितधारकांशी सहकार्यासाठी हे केंद्र काम करते * * *
अर्थ मंत्रालय अर्थमंत्र्यांनी घेतली केंद्रिय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या भांडवली खर्चावरील तिसरी आढावा बैठक नवी दिल्‍ली 14 ऑगस्‍ट 2020 केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सितारामन यांनी आज नौवहन मंत्रालय रस्ते वाहतूक आणि महामार्ग गृहनिर्माण व नागरी व्यवहार संरक्षण आणि दूरसंचार विभागाच्या मंत्रालयांचे सचिव आणि या मंत्रालयांशी संबंधित 7 केंद्रिय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या (सीपीएसई) व्यवस्थापकीय संचालकांसमवेत आर्थिक वर्षाच्या भांडवली खर्चाचा आढावा घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली होती
कोविड 19 महामारीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक विकासाला गती देण्यासाठी अर्थमंत्री विविध भागधारकांसोबत असलेल्या बैठकींच्या शृंखलेचा एक भाग म्हणून ही तिसरी आढावा बैठक होती
आर्थिक वर्ष 202021 मध्ये या सात सीपीएसईंसाठी 124825 कोटी रुपयांच्या एकत्रित भांडवली खर्चाचे लक्ष्य आहे
आर्थिक वर्ष 201920 च्या पहिल्या तिमाहीत 20172 कोटी रुपये (1553) आणि आर्थिक वर्ष 202021 च्या माहे जुलै 2020 पर्यंत 24933 कोटी रुपये (20) भांडवली खर्च झाला
वर्ष 202021 च्या दुसऱ्या तिमाही पर्यंत एकूण भांडवलाच्या 50 पर्यंत भांडवली खर्च सुनिश्चित करण्यासाठी नियोजन करण्यासहीत अर्थमंत्र्यांनी सचिवांना सीपीएसईंच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवण्यास सांगितले
भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना देण्यासाठी सीपीएसईच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा उल्लेख करताना अर्थमंत्र्यांनी सीपीएसईंना लक्ष्य साध्य करण्यासाठी अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित केले आणि वर्ष 202021 साठी त्यांना देण्यात आलेला भांडवली खर्च योग्य पद्धतीने आणि वेळेत खर्च होईल हे सुनिश्चित केले
अर्थमंत्री म्हणाल्या की सीपीएसईच्या चांगल्या कामगिरीमुळे कोविड19 च्या प्रभावापासून अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी मिळण्यास मदत होईल
कोविड19 मुळे उद्भवलेल्या समस्यांविषयी सीपीएसईंनी चर्चा केली
अर्थमंत्र्यांनी नमूद केले की असाधारण परिस्थिती हाताळण्यासाठी असाधारण प्रयत्नांची आवश्यकता असते आणि एकत्रित प्रयत्नांच्या सहाय्याने आपण केवळ चांगली कामगिरीच नाही तर भारतीय अर्थव्यवस्थेलाही चांगले परिणाम साध्य करण्यासाठी मदत देखील करू शकतो * * *
विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पूर्ततेबद्दल साराभाई यांना अभिवादन करण्यासाठी इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एका अनोख्या मार्गाचा अवलंब केला आहे चांद्रयान दोन या ऑर्बिटरने चंद्रावरील 'साराभाई क्रेटर' या खळग्याची छायाचित्रे मिळवल्याची घोषणा करत इस्रोने साराभाई यांना अभिवादन केले असल्याची माहिती केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री पंतप्रधान कार्यालय कार्मिक सार्वजनिक तक्रार निवारण पेन्शन अणुउर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे 12 ऑगस्ट 2020 रोजी या जन्मशताब्दी वर्षाची सांगता झाली आणि इस्रोने या कामगिरीच्या माध्यमातून साराभाई यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत अभिवादन केले आहे
इस्रोने अलीकडच्या काही वर्षात केलेल्या काही महत्त्वाच्या कामगिरींमुळे अंतराळ क्षेत्रात भारत आघाडीच्या देशांच्या पंक्तीत पोहोचला आहे आणि साराभाई यांनी पाहिलेल्या स्वप्नाची ही पूर्तता आहे असे जितेंद्र सिंह म्हणाले
विक्रम साराभाई यांचे नाव चंद्रावरील एका खळग्याला देण्यात आले आहे आणि ज्या जागी अपोलो 17 आणि लुना 21 ही याने उतरली होती त्या जागेपासून सुमारे 250 ते 300 किलोमीटर अंतरावर हा खळगा आहे
देशाच्या 74व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भारताच्या वैभवशाली अंतराळ प्रवासात इस्रोने आणखी एका दिमाखदार कामगिरीची भर घातल्याचे वृत्त खरोखरच भावना उचंबळून आणणारे आहे अंतराळ क्षेत्रातील या प्रवासाची सुरुवात सहा दशकांपूर्वी विक्रम साराभाई आणि त्यांच्या टीमने अनेक प्रकारच्या आव्हानांना तोंड देत अतिशय धाडसाने केली होती
आज भारतीय अंतराळ मोहिमांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीचा उपयोग ते देश करत आहेत ज्यांनी आपल्या अंतराळ प्रवासाची सुरुवात आपल्या कितीतरी आधी केली होती हे ऐकल्यावर प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने आणि आत्मविश्वासाने भरून येईल असे जितेंद्र सिहं यांनी सांगितले
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार साराभाई क्रेटरच्या थ्री डी छायाचित्रामध्ये हा खळगा सुमारे 17 किलोमीटर खोल असल्याचे दिसत आहे आणि त्याच्या भिंतींचा उतार 25 ते 30 अंश आहे
या निष्कर्षांमुळे अंतराळ शास्त्रज्ञांना चंद्राच्या पृष्ठभागावरील लाव्हा भरलेल्या भागाची प्रक्रिया समजून घ्यायला आणखी जास्त मदत मिळणार आहे
चांद्रयान2 त्याच्या निर्धारित रचनेनुसार काम करत आहे आणि अतिशय महत्त्वाची शास्त्रीय माहिती पाठवत असल्याचेही इस्रोने सांगितले आहे
जागतिक वापरासाठी चांद्रयान दोनकडून ऑक्टोबर 2020 पासून शास्त्रीय माहिती सार्वजनिक करण्यात येणार आहे
संरक्षण मंत्रालय लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिन सोहळा2020 नवी दिल्‍ली 14 ऑगस्‍ट 2020 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 74 वा स्वातंत्र्यदिन सोहळा ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पार पडेल
राष्ट्रध्वज फडकावून ते परंपरेने प्रतिष्ठित लाल किल्ल्यावरुन राष्ट्राला उद्देशून भाषण करतील
पंतप्रधानांचे सकाळी 07 वाजून 18 मिनिटांनी लाल किल्ल्याच्या लाहोर गेट येथे आगमन होईल त्याप्रसंगी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि संरक्षण सचिव डॉ अजय कुमार त्यांचे स्वागत करतील
संरक्षण सचिव जनरल ऑफीसर कमांडिंग (जीओसी) दिल्ली क्षेत्र लेफ्टनंट जनरल विजय कुमार मिश्रा यांचा पंतप्रधानांना परिचय देतील
जीओसी दिल्ली क्षेत्र त्यानंतर पंतप्रधानांना सॅल्युटींग बेसकडे घेऊन जातील ज्याठिकाणी संयुक्त आंतरसेवा आणि पोलीस गार्ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनरल सॅल्युट करतील
त्यानंतर पंतप्रधान मानवंदना स्वीकारतील
मानवंदना (गार्ड ऑफ ऑनर) ताफ्यात पंतप्रधानांसमवेत एक अधिकारी आणि लष्कर नौदल हवाई दल आणि दिल्ली पोलीस यांच्यातील प्रत्येकी एक असे एकूण 24 जण असतील
यावर्षी समन्वयक सेवेची जबाबदारी लष्कराकडे असल्यामुळे गार्ड ऑफ ऑनरचे नेतृत्त्व लेफ्टनंट कर्नल गौरव एस येवलकर करतील
पंतप्रधानांच्या संरक्षण ताफ्यातील सैन्य दलाच्या ताफ्याचे नेतृत्व मेजर पलविंदर गरेवाल करतील नौदलाच्या ताफ्याचे नेतृत्व लेफ्टनंट कमांडर के व्ही आर रेड्डी यांच्याकडे तर हवाई दलाचे नेतृत्व स्क्वाड्रन लिडर विकास कुमार यांच्याकडे आहे आणि दिल्ली पोलीस ताफ्याचे नेतृत्व अतिरिक्त उप आयुक्त जितेंदर कुमार मीना करतील
गढवाल रायफल्सची सेकंड बटालियन लेफ्टनंट कर्नल जे टी इव्हाट यांच्या नेतृत्वाखाली 01 मार्च 1901 रोजी अस्तित्वात आली
पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात या बटालियनने अकरा युद्ध गौरव प्राप्त केले आहेत हे दैदीप्यमान यश गणले जाते
स्वातंत्र्यानंतर बटालियनचा 1965 च्या युद्धात सक्रीय सहभाग होता
तसेच 1994 ते 1996 आणि 2005 आणि 2007 मधील ऑपरेशन रक्षक मोहिमेत काम करण्याची बटालियनला संधी मिळाली
बटालियनने 80 पेक्षा अधिक दहशतवाद्यांना ठार केले
मानवंदना स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्याच्या तटबंदीकडे जातील यावेळी त्यांचे स्वागत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत लष्कर प्रमुख जनरल एमएमनरवणे नौदल प्रमुख करमबीर सिंग आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस
जीओसी दिल्ली क्षेत्र पंतप्रधानांना राष्ट्रीय ध्वज फडकावण्यासाठी मंचाकडे घेऊन येतील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर नॅशनल गार्डकडून राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सॅल्यूट दिला जाईल
लष्कराचे बँड पथक राष्ट्रध्वज फडकावताना आणि राष्ट्रीय सॅल्युट देताना राष्ट्रगीत सादर करेल
सैन्य दलातील सर्व गणवेशधारक उभे राहून मानवंदना देतील त्यावेळी सर्वांनी उभे राहून राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्याची विनंती आहे
बँड पथकाचे नेतृत्व सुभेदार मेजर अब्दुल गनी करतील
मेजर श्वेता पांडे पंतप्रधानांना राष्ट्रध्वज फडकावण्यासाठी मदत करतील
राष्ट्रध्वज फडकावताना 2233 फिल्ड बॅटरीच्या शूर जवानांकडून 21 तोफांची सलामी देण्यात येईल
याचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल जितेंद्र सिंग मेहता करतील आणि गन पोझिशन ऑफीसर नायब सुभेदार (एआयजी) अनिल चंद असतील
राष्ट्रीय ध्वज ताफ्यात 32 जण असतील आणि लष्कर नौदल हवाईदल आणि दिल्ली पोलीस यांचा एक अधिकारी असेल आणि दिल्ली पोलीस राष्ट्रध्वज फडकावताना पंतप्रधानांना राष्ट्रीय सॅल्युट सादर करेल
लष्कराचे मेजर सूर्य प्रकाश आंतरसेवा आणि पोलीस गार्डचे नेतृत्व करतील
नौदलाच्या ताफ्याचे नेतृत्व लेफ्टनंट कमांडर विवेग टिंगलू हवाई दलाच्या ताफ्याचे नेतृत्व स्क्वाड्रन लिडर मयांक अभिषेक आणि दिल्ली पोलीस ताफ्याचे नेतृत्व अतिरिक्त उप आयुक्त सुधांशू धामा करतील
राष्ट्रध्वज संचलनासाठी लष्कराचा ताफा गोरखा रायफ्लसच्या 5 व्या बटालिअनचा आहे
गोरखा रायफल्सची स्थापना जानेवारी 1942 मध्ये धरमशाला येथे करण्यात आली आणि नंतर 1946 मध्ये विसर्जन केले
पुन्हा 01 जानेवारी 1965 रोजी सोलन (हिमाचल प्रदेश) येथे गोरखा रायफल्सची पुर्नस्थापना करण्यात आली
राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला उद्देशून भाषण करतील
पंतप्रधानांच्या भाषणानंतर राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्सचे कॅडेटस राष्ट्रगीत सादर करतील
याप्रसंगी सर्व उपस्थितांना उभे राहून राष्ट्रगीत गाण्याची विनंती करण्यात येत आहे
स्वातंत्र्यदिन सोहळ्यात लष्कर नौदल आणि हवाईदलाच्या विविध शाळांतील 500 एनसीसी कॅडेटस सहभागी होणार आहेत * * *
रेल्वे मंत्रालय 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर 2020 दरम्यान सुरू होणाऱ्या फिट इंडिया फ्रीडम रन च्या अंमलबजावणीस भारतीय रेल्वेचा भक्कम पाठिंबा नवी दिल्‍ली 14 ऑगस्‍ट 2020 भारत सरकारच्या युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाने सुरू केलेल्या फिट इंडिया फ्रीडम रन या नव्या उपक्रमास पूर्णपणे पाठिंबा देण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे
हा कार्यक्रम 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर 2020 पर्यंत सुरू राहील
फिट इंडियन चळवळीच्या अंतर्गत हा उपक्रम घेण्यात येत आहे
भारतीय रेल्वेला फार पूर्वीपासूनच क्रीडा संवर्धनाचा उत्तम वारसा लाभला आहे
दरवर्षी 300 400 क्रीडापटूंना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना सर्व सुविधा आणि देशात गौरव मिळवून देण्यासाठी खेळामध्ये उत्कृष्ट काम करण्यास अनुकूल वातावरण निर्माण करून देऊन भारतीय रेल्वे हा क्रीडा क्षेत्रातील मोठा प्रवर्तक ठरला आहे
भारतीय रेल्वेकडे 29 क्रीडा प्रकारांमध्ये सुमारे 10000 खेळाडू आणि 300 प्रशिक्षक आहेत
2019 20 मध्ये 32 पैकी 6 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार भारतीय रेल्वेच्या खेळाडूंना प्रदान करण्यात आले