text
stringlengths 1
2.66k
|
---|
सामाजिक सूक्ष्म वित्तीय संस्थेसाठी धोरण निश्चित केले जात आहे ज्यामुळे अत्यंत लहान उद्योजक व्यवसाय आणि दुकान मालक इ साठी 10 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध होईल असे ते म्हणाले |
शारीरिक अंतर हा आता नवीन नियम असल्याने एमएसएमईमधील ऑटोमेशन आणि डिजीटलिझेशनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात पाळावे अशी सूचनाही मंत्र्यांनी केली |
उद्योग संघटनेच्या प्रतिनिधींनी इतर सूचनांसह आघाडीच्या 50000 एमएसएमईची ऑनलाईन डिजिटल निर्देशिका तयार करण्याचे सुचविले व आत्मनिर्भर भारत अभियानाच्या उद्देशाने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले * * * |
माहिती आणि प्रसारण मंत्रालय यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त फिल्म्स डिव्हिजनबरोबर पुन्हा अनुभवा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे क्षण मुंबई 14 ऑगस्ट 2020 'इंडिया विन्स फ्रीडम ' हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या मालिकेचा एक भाग आहे ज्यामध्ये नवे गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांचे आगमन आणि राजवटीकडून भारताच्या जनतेकडे सत्ता हस्तांतरित होण्यासंबंधी विविध घटनांचे चित्रण आहे |
इंडिया इंडिपेंडेंट या माहितीपटात स्वातंत्र्यासाठी भारताच्या दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाचे वर्णन आहे |
सुमारे दोनशे वर्षांपासून भारतातील परदेशी राजवटीचा इतिहास पडद्यावर जिवंत करण्यात आला आहे |
1857 च्या विद्रोहाच्या काळापासून (स्वातंत्र्याचे पहिले युद्ध) महात्मा गांधींच्या हौतात्म्यापर्यंत भारतीय देशभक्तांची गाथा चित्ररूपात ध्वनिमुद्रित केली आहे |
या व्यतिरिक्त 7 21 ऑगस्ट 2020 दरम्यान सुरू असलेल्या 'ऑनलाईन देशभक्तीपर चित्रपट महोत्सवात' राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (एनएफडीसी) पुढाकाराने स्वातंत्र्य चळवळीला आणि देशभक्तीपर भावनेला समर्पित फिल्मस् डिव्हिजनचे 14 निवडक चित्रपट दाखवले जात आहेत |
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या स्वातंत्र्यदिन सोहळा 2020 चा भाग म्हणून हा महोत्सव 'wwwcinemasofindiacom' वर विनामूल्य दाखवला जात आहे * * * |
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आत्मनिर्भर भारत सह भारताची आगेकूच नवी दिल्ली 14 ऑगस्ट 2020 संक्रमणाच्या सुरुवातीच्या अवस्थेत सर्व वैद्यकीय उपकरणे यात एन95 मास्क पीपीई कीट व्हेंटीलेटर्स यांचा जागतिक तुटवडा अनुभवला |
यातील बहुतांश उत्पादने देशात निर्माण होत नसल्यामुळे सुरुवातील आवश्यक घटक बाहेरुन आयात करावे लागले |
संक्रमणाच्या वाढत्या परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत या घटकांचा तुटवडा निर्माण झाला होता |
संक्रमणाच्या परिस्थितीचे संधीत रुपांतर करण्यासाठी वैद्यकीय उपकरणांच्या स्वदेशी उत्पादनासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय वस्रोद्योग मंत्रालय औषधनिर्माण मंत्रालय उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग (डीपीआयआयटी) संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि इतर विभागांनी एकत्रित प्रयत्न केले या प्रयत्नांनी भारताची स्वतःची उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविली आहे |
संदेश खालीलप्रमाणे आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमय सोहळ्यानिमित्त मी आपल्या देशातील नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो |
आज आपण आपल्या देशाचा 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहोत |
स्वतंत्र राष्ट्राच्या निर्मितीसाठी आणि त्याच्या उज्ज्वल भविष्याच्या सुरक्षिततेसाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या शूर स्वातंत्र्य सैनिकांप्रति मी आदरांजली अर्पण करतो |
स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शहीद वीरांचे स्मरण आपण कृतज्ञतेने केले पाहिजे |
या देशभक्तांच्या स्वप्नातील महत्वाकांक्षी भारताची निर्मिती करून आपण त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहू शकतो |
जिथे अब्जावधी स्वप्ने पाहिली जातात आणि ती साकारही होतात असे संयुक्त मजबूत समृद्ध सर्वसमावेशक आणि शांततापूर्ण राष्ट्र बनवण्याची आपली बांधिलकी या स्वातंत्र्यदिनी आपण नव्याने निभावू या |
हा स्वातंत्र्यदिन आपल्या देशात समरसता सुसंवाद आणि समृद्धी आणो |
नौवहन मंत्रालय नौवहन मंत्रालयाने क्रूझ जहाजांसाठी बंदर सेवा शुल्क 60 ते 70 पर्यंत कमी केले या निर्णयामुळे कोविड 19 महामारीच्या दुष्परिणामांपासून क्रूझ उद्योग आणि देशांतर्गत क्रूझ पर्यटनाला बळ मिळेल मांडवीय नवी दिल्ली 14 ऑगस्ट 2020 नौवहन मंत्रालयाने क्रूझ जहाजांसाठी दरांचे सुसूत्रीकरण केले आहे |
शिथिल करण्यात आलेल्या दराचा निव्वळ परिणाम म्हणजे बंदर शुल्कामध्ये त्वरित 60 ते 70 कपात करण्यात येईल ज्यामुळे कोविड 19 महामारीच्या स्थितीत अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्याच्या सरकारच्या धोरणाच्या अनुषंगाने भारतातील क्रूझ उद्योगाला दिलासा मिळेल |
क्रूझ जहाजांसाठीचे तर्कसंगत दर खालीलप्रमाणे आहेत क्रूझ जहाजांसाठी सुरुवातीच्या 12 तासाच्या मुक्कामासाठी ('निश्चित दर ') सध्याच्या 035 दराच्या ऐवजी 0085 प्रति जीआरटी (ग्रॉस रजिस्टर्ड टनेज ) आणि प्रत्येक प्रवासी ('' हेड टॅक्स ) '' साठी 5 शुल्क आकारले जाईल |
बंदराचे भाडे बंदराची थकबाकी पायलट शुल्क प्रवासी शुल्क यासारखे इतर दर बंदराकडून आकारले जाणार नाहीत |
12 तासाच्या पुढील कालावधीसाठी क्रूझ जहाजांवरील निश्चित शुल्क एसओआर (दरांचे वेळापत्रक) नुसार देय असलेल्या बर्थ हायर शुल्काइतके (क्रूझ जहाजांसाठी लागू असलेल्या 40 सवलतीसह ) असेल |
तसेच क्रूझ जहाजांसाठी वार्षिक 150 कॉल केल्यास 10 सूट वार्षिक 51100 कॉल केल्यास 20 सूट 100 पेक्षा अधिक कॉलवर 30 सूट मिळेल वरील तर्कसंगत दर एक वर्षाच्या कालावधीसाठी तत्काळ लागू होतील |
कोविड 19 मुळे अतिशय विपरित परिणाम झालेल्या क्रूझ शिपिंग व्यवसायाला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून क्रूझ शिपिंग आणि पर्यटन वाढीसाठी योग्य धोरणात्मक वातावरण आणि पायाभूत सुविधा पुरवल्या जातील |
2014 पासून नौवहन मंत्रालयाच्या धोरणात्मक पाठिंब्यामुळे भारतातील क्रूझ जहाजांकडून करण्यात आलेल्या कॉलची संख्या 201516 मधील 128 वरून वाढून 201920 मध्ये 593 वर गेली आहे |
या सुसुत्रीकरणामुळे भारतीय बंदरांवरील क्रूझ फेऱ्या पूर्णपणे थांबणार नाहीत हे सुनिश्चित व्हायला मदत होईल |
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारतात एका दिवसात सर्वाधिक सुमारे 85 लाख चाचण्या रुग्ण बरे होण्याचा दर सुधारून तो 7117 टक्के कोविड मृत्यू दरात घट होऊन तो 195 टक्के नवी दिल्ली 14 ऑगस्ट 2020 दिवसाला 10 लाख चाचण्या करण्याच्या उद्देशाने चाचणी सुविधा सतत वाढविण्याचा परिणाम म्हणून भारताने एकाच दिवसात आतापर्यंतच्या सर्वाधिक चाचण्यांचा नवीन उच्चांक गाठला आहे गेल्या 24 तासांत 848728 चाचण्या करण्यात आल्या असून यामुळे एकूण चाचण्यांची संख्या 27694416 इतकी झाली आहे |
देशाला दर दशलक्ष लोकसंख्येमागे दररोज 140 चाचण्या करण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे |
संपूर्ण देशभरात डायग्नोस्टिक लॅबचे सतत विस्तारित असणारे जाळे टेस्ट ट्रॅक अँड ट्रीट योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मुख्य घटक आहे |
देशात आजवर 1451 प्रयोगशाळा असून यामध्ये सरकारी 958 आणि 493 खासगी प्रयोगशाळांचा समावेश आहे |
त्यांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे रियलटाईम rt pcr आधारित चाचणी प्रयोगशाळा 749 (सरकारी 447 + खाजगी 302) truenat आधारित चाचणी प्रयोगशाळा 586 (सरकारी 478 + खाजगी 108) cbnaat आधारित चाचणी प्रयोगशाळा 116 (सरकारी 33 + खाजगी 83) जास्तीत जास्त चाचण्यांची यशस्वी अंमलबजावणी व्यापक शोध घेणे आणि उपचार यामुळे रुग्ण बरे होण्याचं दर सुधारून 7117 टक्के इतका झाला आहे |
एकूण 175 लाखांहून अधिक (1751555) कोविड 19 रुग्ण बरे झाले आहेत |
सक्रिय रुग्णांपेक्षा (661595) बरे झालेले रुग्ण (1089960) 11 लाखांहून अधिक आहेत |
प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापनामुळे कोविड रूग्णांच्या मृत्युदरात घट झाली असून तो आज 195 टक्के आहे * * * |
माहिती आणि प्रसारण मंत्रालय चित्रपट विभाग आणि `आयडीपीए`तर्फे माहितीपट आणि लघुपट निर्मात्यांसाठी नीधी उभारणीवर आधारित वेबिनार मुंबई 14 ऑगस्ट 2020 माहितीपट आणि लघुपट निर्मात्यांचे नैतिक मनोधैर्य उंचावण्यासाठी एक पाऊल पुढे येत भारतीय माहितीपट निर्माता संघटनेच्या (आयडीपीए) सहकार्याने चित्रपट विभागाच्या वतीने 17 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत `क्राउडफंडिंग` विषयावर गूगल मीटच्या माध्यमातून वेबिनार आयोजित करण्यात आला आहे |
हा कार्यक्रम `क्राऊडेरा` आयोजित करेल ज्यासाठी सहभाग विनामूल्य आहे परंतु पूर्व नोंदणी अनिवार्य आहे |
वेबिनार आणि कार्यशाळा अशा संयुक्त उपक्रमात चित्रपटासाठी निधी उभारणी कशी करावी आधुनिक निधी उभारणीच्या पद्धती प्रकल्प कथा निर्मिती विकसित करणे (डेव्हलपिंग प्रोजेक्ट स्टोरी क्रिएशन) प्रदर्शन पूर्वीची आणि नंतरची रणनीती आखणे आणि समाज माध्यमांच्या उपयोगातून फायद करून घेणे आदी गोष्टींचा समावेश केला जाईल |
याशिवाय या विषयाशी संबंधित विषयांवर देखील यावेळी चर्चा केली जाईल |
वेबिनारनंतर प्रश्नोत्तरांचे सत्र होईल |
ना नफा तत्त्वावरील संस्थांना आणि सामाजिक संशोधकांना अर्थसहाय्य मिळवून देणाऱ्या `क्राऊडेरा` संस्थेचे श्री चेत जैन अधिवेशनाला संबोधित करतील आणि आपले अनुभव सादर करतील |
ते अनुक्रमे सिलिकॉन व्हॅली कॅलिफोर्निया आणि सिंगापूर येथील भारतीय उद्योजक आहेत आणि भारत तसेच अमेरिकेतील अनेक जागतिक पातळीवरील आघाडीच्या संघटनांबरोबर त्यांनी काम केले आहे |
pib headquarters पत्र सूचना कार्यालयाचे कोविड19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र (कोविड19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट) दिल्लीमुंबई 14 ऑगस्ट 2020 आरोग्य मंत्रालयाची कोविड19घडामोडींवरील माहिती दिवसाला 10 लाख चाचण्या करण्याच्या उद्देशाने चाचणी सुविधा सतत वाढविण्याचा परिणाम म्हणून भारताने एकाच दिवसात आतापर्यंतच्या सर्वाधिक चाचण्यांचा नवीन उच्चांक गाठला आहे |
डब्ल्यूएचओने कोविड 19 च्या संदर्भात सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपाययोजना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य निकष यासंबंधीच्या मार्गदर्शक सुचनेमध्ये संशयित रुग्णांसंदर्भात लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे |
देशाला दर दशलक्ष लोकसंख्येमागे दररोज 140 चाचण्या करण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे |
एकूण 175 लाखांहून अधिक (1751555) कोविड 19 रुग्ण बरे झाले आहेत |
सक्रिय रुग्णांपेक्षा (661595) बरे झालेले रुग्ण (1089960) 11 लाखांहून अधिक आहेत |
प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापनामुळे कोविड रूग्णांच्या मृत्युदरात घट झाली असून तो आज 195 टक्के आहे |
इतर अपडेट्स कोविड19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी संबधित सावधगिरी बाळगताना राष्ट्रीय सोहळ्याची प्रतिष्ठा आणि मांगल्य यामध्ये संतुलन राखत संरक्षण मंत्रालय 15 ऑगस्ट 2020 रोजी लाल किल्ला येथे स्वतंत्र्यदिन ध्वजारोहण सोहळा आयोजित करीत आहे |
सध्या संपूर्ण देशभर कोविड19 चा वाढता प्रसार लक्षात घेवून बहुतांश लोक सेंद्रिय उत्पादनाची मागणी करताना दिसत आहे |
सेंद्रिय उत्पादनाला केवळ भारतामध्येच नाही तर जागतिक स्तरावर सातत्याने मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे |
निरोगी शरीरासाठी सुरक्षित अन्नधान्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे |
त्यामुळे शेतामध्ये रसायनांचा रसायनिक खतांचा वापर करणे टाळून सेंद्रिय शेत करण्यास सिद्ध असलेल्या शेतकरी बांधवांच्या दृष्टीने चांगल्या संधी निर्माण होत आहेत |
माहितीपट आणि लघुपट निर्मात्यांचे नैतिक मनोधैर्य उंचावण्यासाठी एक पाऊल पुढे येत भारतीय माहितीपट निर्माता संघटनेच्या (आयडीपीए) सहकार्याने चित्रपट विभागाच्या वतीने 17 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत `क्राउडफंडिंग` विषयावर गूगल मीटच्या माध्यमातून वेबिनार आयोजित करण्यात आला आहे |
महाराष्ट्र अपडेट्स नागरी उड्डयन मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाने राज्यात कोविड 19 च्या प्रसार रोखण्यासाठी तयार केलेले अलगीकरण्याचे नियम शिथिल केले आहेत |
प्रवाशांना आता त्यांच्या प्रवासाच्या 72 तासांपूर्वी सेल्फडीक्लरेशन फॉर्म भरून संस्थात्मक अलगीकरणाचा पर्याय वगळता येणार आहे |
अशा प्रवाशांना प्रवासाच्या 96 तासात घेण्यात आलेल्या नकारात्मक आरटीपीसीआर चाचणीचा पुरावा अपलोड करावा लागेल |
राज्यात गुरुवारी 11813 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर 9115 रुग बरे झाले आहेत |
गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय द नेक्स्ट फ्रंटियर इंडियाज स्मार्ट सिटीज भारताच्या स्मार्ट सिटीज मिशनच्या पथप्रदर्शक प्रवासाचे इतिवृत्त दाखवणारा आगामी माहितीपट गृह व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने नॅशनल जिओग्राफिक वाहिनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी हा विशेष चित्रपट प्रदर्शित करणार असल्याची घोषणा केलीमाहितीपट स्मार्ट सिटी मिशन भविष्यासाठी शहरांची पुढील पिढी कशी तयार करीत आहे हे दर्शविते नवी दिल्ली 14 ऑगस्ट 2020 दर मिनिटाला 25 ते 30 लोकांचे गावाकडून शहराकडे होणारे स्थलांतर पाहता जागतिक आर्थिक मंचाने वर्ष 2050 पर्यंत भारताची 70 लोकसंख्या ही शहरात राहत असेल असा अंदाज व्यक्त केला आहे |
प्रामुख्याने आधुनिक जीवन शैली तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक शहरी स्थलांतर यांच्या आवश्यकतेमुळे आज देश परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा आहे |
भारतीय शहरांचे कायापालट करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या राष्ट्रीय उपक्रमाच्या प्रवासावर प्रकाशझोत टाकताना नॅशनल जिओग्राफिक वाहिनीने आज द नेक्स्ट फ्रंटियर इंडियाज स्मार्ट सिटीज या माहितीपटाची घोषणा केली |
15 ऑगस्ट 2020 स्वातंत्र्य दिनी संध्याकाळी 6 वाजता नॅशनल जिओग्राफिक वाहिनीवर हा माहितीपट प्रदर्शित होणार आहे संपूर्ण देशाला अभिमान वाटेल याचे आश्वासन देण्यासोबतच हा माहितीपट सामान्य माणसाच्या आयुष्यात स्मार्ट शहरांचा काय परिणाम झाला हे देखील दर्शविणार आहे |
44 मिनिटांच्या या चित्रपटात चार शहरांवर (सूरत विशाखापट्टणम पुणे आणि वाराणसी) लक्ष केंद्रित केले जाईल कारण ते अनुकरणीय उपक्रम सादर करतात आणि पायाभूत सुविधा वाहतूक तंत्रज्ञान नवीकरणीय ऊर्जा आणि प्राचीन वारसाचे संवर्धन व संरक्षण यासह विविध क्षेत्रातील मार्गांचे नेतृत्व करतात |
या चार अपवादात्मक शहरांचा विचारपूर्वक विचार करून प्रगतीशील भारताच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी या चित्रपटात अद्वितीय अंतर्दृष्टी आहे |
आम्हाला आशा आहे की ही नॅशनल जिओग्राफिक फिल्म भारताच्या स्मार्ट सिटीज मिशनबद्दलची जगाची समज अधिक सखोल करेल |
भारत वेगाने शहरीकरण होत आहे आणि आमची स्मार्ट शहरे भारताच्या शहरी प्रवासामध्ये नवीन कल्पना आणि परिवर्तनवादी विचारांचे अग्रदूत आहेत |
या चित्रपटाने त्यांच्या कामाचा धावता आढावा घेतला आहे असे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालायचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा (आयएएस) म्हणाले |
चित्रपटाविषयी बोलताना स्टार इंडियाच्या इंफोटेनमेंट इंग्लिश आणि किड्सच्या प्रमुख अनुराधा अग्रवाल म्हणाल्या आमचा आगामी चित्रपट द नेक्स्ट फ्रंटियर इंडियाज स्मार्ट सिटीज मध्ये आम्ही या चार शहरांमधील लोकांच्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय उपक्रमा विषयी दाखविले आहे |
वाढती लोकसंख्या असूनही भारत या विकासाच्या रुपवालीच्या केंद्रस्थानी आहे |
या माहितीपटाच्या माध्यमातून दर्शकांना नावीन्य आणि तंत्रज्ञान आपल्या देशाच्या विकासाला कसे प्रोत्साहन देत आहे आणि भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी मोलाची भूमिका बजावत आहे याची माहिती मिळेल 15 ऑगस्ट 2020 स्वातंत्र्य दिनी संध्याकाळी 6 वाजता नॅशनल जिओग्राफिक वाहिनीवर द नेक्स्ट फ्रंटियर इंडियाज स्मार्ट सिटीज हा माहितीपट प्रदर्शित होणार आहे * * * |
आयुष मंत्रालय आयुष मंत्रालयाने सुरू केलेल्या रोगप्रतिकारक्षमतेसाठी आयुष मोहिमेला डिजिटल अवकाशात उत्तम प्रतिसाद नवी दिल्ली 14 ऑगस्ट 2020 आयुष मंत्रालयाने आज रोगप्रतिकारक्षमतेसाठी आयुष या तीन महिन्यांच्या मोहिमेची वेबिनारच्या माध्यमातून सुरुवात केली |
या वेबिनारमध्ये 50 हजारांहून जास्त लोक सहभागी झाले होते |
आध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांनी उद्घाटनाचे भाषण केले आयुष चे उपाय संपूर्ण जगाला निरोगी आणि आनंदी जीवनाचा मार्ग दाखवतील असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाचे हे ठळक वैशिष्ट्य होते |
आयुष व्हर्चुअल कन्वेन्शन सेंटर या आयुष मंत्रालयाच्या नव्या डिजिटल मंचावर या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते |
आयुष मंत्रालयाच्या अधिकृत फेसबुक हँडलवर या कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आले आणि एकूण 60000 लोकांनी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहिले |
या कार्यक्रमात आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राकेश कोटेचा सेलेब्रिटी आणि फिटनेस आयकॉन बनलेले मिलिंद सोमण जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक अधिकारी डॉ |
गीता कृष्णन आणि एआयआयएच्या संचालक प्रा |
सध्याच्या काळात आपल्या रोगप्रतिकार क्षमतेत वाढ करण्याच्या आणि आपल्या जीवनशैलीत बदल करण्याच्या आवश्यकतेवर गुरुदेव श्री श्री रवीशंकर यांनी भर दिला |
आयुर्वेदिक आणि आयुषच्या इतर उपचारपद्धतींमध्ये असलेल्या आयुर्मानवाढीच्या क्षमतेबाबत त्यांनी एक विस्तृत दृष्टीकोन मांडला |
आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा यांनी आयुष उपाययोजनांच्या माध्यमातून सहज उपलब्ध होणाऱ्या आणि परवडणाऱ्या आरोग्यसुविधा ही या कार्यक्रमाची संकल्पना विषद केली |
रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी लोकांच्या वर्तनात बदल आवश्यक असण्यावर त्यांनी भर दिला आणि पारंपरिक औषधे आणि उपचारपद्धतींची रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यामध्ये असलेली सकारात्मक भूमिका अधोरेखित केली |
रोगप्रतिकारक्षमतेसाठी आयुष या मोहिमेच्या छत्राखाली आयुष मंत्रालय राबवणार असलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती दिली |
मिलिंद सोमण यांनी आरोग्य आणि तंदुरुस्ती संदर्भात आपला दृष्टीकोन मांडला आणि निरोगी जीवनशैली आत्मसात करण्यासाठी लोकांना प्रेरित केले |
कोविड19 विरोधातील संघर्षामध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद या संस्थेच्या माध्यमातून केलेल्या प्रतिबंधात्मक आणि सुधारणात्मक उपाययोजनांबाबतचे अनुभव यावेळी प्राध्यापक तनुजा नेसरी यांनी सांगितले |
त्यांनी सांगितलेले अनुभव श्रोत्यांसाठी खूपच मार्गदर्शक होते |
गीता कृष्णन या महामारीच्या संदर्भात आरोग्याचा संबंध ही संकल्पना स्पष्ट केली आजार आणि अनारोग्याचा फैलाव टाळण्यासाठी चांगल्या पायाभूत सुविधांची उभारणी करणे आणि प्रभावी संवादाचा अंगिकार करणे किती आवश्यक आहे त्याचे महत्त्व त्यांनी सांगितले |
या वेबिनारमध्ये जनतेचा सहभाग लक्षणीय होता आणि प्रश्नोत्तरे आणि त्यांच्या जोडीला होणाऱ्या सादरीकरणांच्या माध्यमातून परस्परांशी मोठ्या प्रमाणात संवाद झाला |
वेबिनारमध्ये सहभागी झालेल्यांनी विचारलेल्या प्रश्नांना या कार्यक्रमातील तज्ञांच्या पॅनेलने उत्तरे दिली |
या पॅनेलमध्ये सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस(सीसीआरएएस) चे महासंचालक प्रा |
वैद्य के एस धीमन मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा(एमडीएनआयवाय) चे संचालक डॉ ईश्वर व्ही बसवरेड्डी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी(एनआयएन) च्या संचालक डॉ |
पद्म गुर्मेत सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन योगा अँड नॅचरोपॅथी(सीसीआरवायएन) चे संचालक डॉ राघवेंद्र एम राव सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसिन( सीसीआरयूएम) चे महासंचालक प्रो असिम अली खान सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन सिद्धा( सीसीआरएस) चे महासंचालक डॉ |
के कनकवल्ली आणि सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी(सीसीआरएच)चे महासंचालक डॉ |
या तज्ञांनी वेबिनारमध्ये सहभागी दर्शकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि साध्या साध्या परंतु महत्त्वाच्या उपायांमधून कशा प्रकारे निरोगी राहाता येईल त्याची माहिती दिली |
त्यांनी जनतेशी संवाद साधताना वैज्ञानिक दृष्टीकोनातून त्यांचे अनुभव आणि निष्कर्ष यांचे कथन केले |
रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी आणि रोगप्रतिबंधासाठी आयुष आधारित उपायांच्या सामर्थ्याबाबत जनतेला महत्त्वाची माहिती देणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता प्रत्येक तज्ञाकडून रोगप्रतिकारक्षमताविषयक संदेश देऊन या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला |
दैनंदिन जीवनात अंगिकार केलेल्या अतिशय साध्या उपायांमुळे कशा प्रकारे दीर्घकाळ रोगप्रतिबंध करता येतात हे संदेशांतून दिसून आले |
राष्ट्रपती कार्यालय 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाचे माननीय राष्ट्रपती श्री राम नाथ कोविंद यांनी राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण नवी दिल्ली 14 ऑगस्ट 2020 माझ्या प्रिय देशबांधवांनो नमस्कार |
देशाच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सर्व देशवासियांना आणि देशाबाहेर असलेल्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतांना मला अत्यंत आनंद होत आहे |
Subsets and Splits