text
stringlengths 1
2.66k
|
---|
भेटीदरम्यान सुरुवातीला हवाईदल प्रमुखांनी रेसिडेंट स्कावॅड्रनसमवेत मिग21 विमानाचे उड्डाण केले |
संरक्षण मंत्रालय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उपक्रम आणि ओएफबीने विकसित केलेल्या 15 उत्पादनांचा केला शुभारंभ संरक्षण मंत्रालयाकडून आत्मनिर्भर भारत सप्ताह कार्यक्रम सुरू नवी दिल्ली 13 ऑगस्ट 2020 डीपीएसयूचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ओएफबीचे अध्यक्ष व्हिडिओ कॉन्फरन्स लिंकद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले |
देशातील संरक्षण उद्योगांना देशाची कार्यक्षमतेने सेवा बजावण्यात मदत करण्यासाठी आपण आधुनिक व्यवस्थापन तंत्र तंत्रज्ञान वापर आणि सहयोगात्मक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे |
या उद्देशाने सरकारने ओएफबीच्या कॉर्पोरेटायझेशनच्या दिशेने पाऊल उचलले आहे |
मला खात्री आहे की यामुळे नियंत्रित किंमतीची मर्यादा दूर करण्यात मदत होईलच तसेच कॉर्पोरेट व्यवस्थापन पद्धती आणि कार्यकुशल प्रणालींचा वापर वाढेल |
मला वाटते की ओएफबीसाठी स्वतःचा नव्याने शोध घेण्यासाठी हे एक आव्हान असेल आणि यात ते यशस्वी होतील आज सादर करण्यात आलेल्या उत्पादनांमध्ये डीआरडीएल हैदराबाद यांच्या सहकार्याने ऑर्डनन्स फॅक्टरी मेडक यांनी विकसित केलेल्या नाग मिसाइल कॅरियरचा (नामिका) प्रोटोटाइप आहे |
नामिकामध्ये पहिल्या टप्प्यात 260 कोटी रुपयांपर्यंत आयातीला पर्याय उपलब्ध करून देण्याची क्षमता आहे |
जी कदाचित 3000 कोटींपेक्षा जास्त होईल |
ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डाची इतर उत्पादने जसे की संपूर्ण स्वदेशी 145 एमएम अँटी मटेरियल रायफल ऑर्डनन्स फॅक्टरी त्रिची येथे विद्यमान सुविधांसह तयार केली जात आहे टी 90 मेन बॅटल टँकसाठी अपग्रेडेड कमांडर थर्मल इमेजर कम डे साइट आणि रायफल फॅक्टरी ईशापूर यांनी विकसित केलेला 86x70 एमएम स्निपरचा प्रोटोटाइप यांचा समावेश आहे |
संरक्षण मंत्रालयाने बीईएमएलचे आज सुरू केलेल्या उत्पादनांसाठी कौतुक केले स्वदेशीकरण आणि आयात कमी करण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेले प्रयत्न प्रभावी आहेत असे ते म्हणाले |
सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक मायनिंग डंप ट्रक पैकी एक असलेला 150 टन पेलोड क्षमता डंप ट्रक आणि 180 टन क्षमतेचा सुपर जायंट मायनिंग एस्केवेटर दोन्हीची स्वदेशी रचना आणि निर्मिती असून आयात केलेल्या उपकरणापेक्षा 20 हून अधिक स्वस्त आहेत |
यामुळे अनुक्रमे 1500 कोटी आणि 220 कोटी रुपये इतकी परकीय चलनात बचत होईल हे खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर उत्पादने आहेत गौर उच्च गतिशील चेसिसवर बनवलेले बीईएमएल मीडियम बुलेट प्रूफ वाहनआणि अनुकूल संरक्षण पातळी आणि कस्टम बिल्ट हेलीपोर्टेबल 100 एचपी डोझर ज्यांची पातळी अनुक्रमे 85 आणि 94 आहे ती देखील उल्लेखनीय उत्पादने आहेत असे ते म्हणले हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड एचएएलच्या 150 व्या डिओ 228 विमानाची सुरुवात स्वदेशी निर्मितीत एक मैलाचा दगड आहे |
150 व्या विमानाचे आयएन 259 म्हणून नामकरण आणि मेरीटाईम रेकॉनिसन्स आणि इंटेलिजन्स वॉरफेअर मध्ये भारतीय नौदलासाठी एक समर्पित व्यासपीठ म्हणून एचएएलच्या तांत्रिक सामर्थ्याचे हे खरे प्रतिबिंब आहे |
एचएएल आणि आयआयएससीने कर्नाटकातील आयआयएससीच्या चालाकेरे संकुलात एक कौशल्य विकास केंद्र स्थापित करण्यासाठी करार केला आहे |
स्थानिक समाजातील सदस्यांपासून ते उच्चअभियांत्रिकी व्यावसायिकांपर्यंत विविध लाभार्थ्यांना कौशल्य विकास कार्यक्रम प्रदान करणारे एक मॉडेल सुविधा तयार करणे हे या केंद्राचे लक्ष्य आहे |
बीईएलने पूर्णतः तयार केलेले आणि विकसित केलेले लिनिअर व्हेरिएबल डिफरेन्शिअल ट्रान्सड्यूसरहे लक्ष्य शोधण्यात अचूकता प्राप्त करण्यासाठी आवश्यक आहे आणि भारतीय नौदलाला उत्तम दीर्घकालीन सहाय्य प्रदान करण्यासाठी एचएफ एरियल स्विचिंग युनिटसाठी आयात पर्याय म्हणून 1 केडब्ल्यू ट्रान्समीटर एरियल स्विचिंग रॅकची सुरूवात ही अस्सल स्वदेशी उत्पादने आहेत |
संरक्षणमंत्र्यांनी रिमोट बटण दाबून या उत्पादनांचे अनावरण केले |
त्यांनी डीपीएसयू आणि आयुध कारखान्यांचे व्यवस्थापन आणि कर्मचार्यांचे स्वदेशी वस्तूंच्या उतपादनासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल अभिनंदन केले आणि आत्मनिर्भर भारताच्या प्रति त्यांच्या बांधिलकीचे कौतुक केले |
राजनाथ सिंह यांनी 07 ते 14 ऑगस्ट 2020 या कालावधीत 'आत्मनिर्भर सप्ताह साजरा करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सचिव संरक्षण उत्पादन आणि त्यांच्या गटाचे विशेष अभिनंदन केले |
ते म्हणाले आज सुरू झालेल्या देशी उत्पादनांची आणि नवीन उत्पादनांची प्रभावी यादी मधून स्पष्ट होते कि डीपीएसयू आणि ऑर्डनन्स फॅक्टरीज 'आत्मनिर्भर भारत अभियाना'चे प्रमुख चालक ठरतील आणि राष्ट्रीय सुरक्षा आणि स्वावलंबनासाठी अतुलनीय योगदान देतील ते पुढे म्हणाले आज बाजारात आणलेली काही उत्पादने केवळ संरक्षण क्षेत्राच्या गरजांची पूर्तता करणार नाहीत तर गरज भासल्यास नागरी समाजासाठीही उपयुक्त ठरतील |
युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते 14 ऑगस्ट रोजी फिट इंडिया फ्रीडम रनचे होणार उद्घाटन नवी दिल्ली 13 ऑगस्ट 2020 केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सर्वात मोठ्या देशव्यापी फिट इंडिया फ्रीडम रनचे आयोजन होणार आहे |
सध्याची महामारीची स्थिती लक्षात घेऊन आणि वैयक्तिक अंतराच्या निकषांचे पालन करून या उपक्रमात सहभागी होणाऱ्या धावपटूंना त्यांच्या स्वतःच्या गतीने त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही ठिकाणी धावण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे |
त्या व्यतिरिक्त ते या अनेक दिवस धावण्याच्या उपक्रमाच्या कालावधीत मध्येच धाव खंडित करू शकतात |
त्यांनी कापलेले एकूण अंतर आणि त्यासाठी घेतलेला वेळ याची माहिती जीपीएस घड्याळाच्या मदतीने किंवा स्वतः नोंदवता येऊ शकेल |
केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू 14 ऑगस्ट रोजी या उपक्रमाची सुरुवात करणार आहेत |
कोविड19 च्या निकषांचे पालन करतानाच स्वतःला तंदुरुस्त राखण्याबाबत जनतेला प्रोत्साहित करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहेआपल्या पंतप्रधानांनी सुरू केलेल्या फिट इंडिया चळवळीला आणखी बळकट करण्याचा आणि तंदुरुस्तीला आपली जीवनशैली बनवण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे असे रिजीजू यांनी या उपक्रमाबद्दल बोलताना सांगितले |
आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तंदुरुस्त राहणे गरजेचे असल्याने सध्याच्या काळात तर या उपक्रमाला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे आणि कोविड19 च्या विरोधात लढा देण्यासाठी ही काळाची गरज आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले |
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी व्यक्ती आणि संस्थांना फिट इंडियाच्या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल |
15 ऑगस्टला असलेल्या देशाच्या 74व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आणि 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या 151व्या जयंती निमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे |
लठ्ठपणा आळस ताण बेचैनी आणि इतर आजारांपासून नागरिकांना मुक्त करणे आणि तंदुरुस्तीला प्रोत्साहन देणे हे या फ्रीडम रनचे घोषवाक्य आहे |
गेल्या काही दिवसात फिट इंडियाने सर्वसामान्य नागरिकांमध्ये तंदुरुस्तीचा संदेश देण्यासाठी फिट इंडिया प्लॉग आणि फिट इंडिया सायक्लोथॉन यांसारख्या उपक्रमांचे व्यापक स्तरावर आयोजन केले आहे |
सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय थावरचंद गेहलोत नशामुक्त भारत अभियाना संदर्भात 272 जिल्हाधिकारी आणि 32 राज्यांच्या सचिवांना वेबकास्टच्या माध्यमातून संबोधित करणार राष्ट्रीय समाजसुरक्षा संस्थेच्या नवी दिल्ली द्वारका येथील नव्या इमारतीचा ईउद्घाटन सोहळा नवी दिल्ली 13 ऑगस्ट 2020 याप्रसंगी थावरचंद गेहलोत राष्ट्रीय समाजसुरक्षा संस्थेच्या (nisd) द्वारका नवी दिल्ली येथील नवीन इमारतीचे ईउद्घाटन करतील |
एनआयएसडीला 15 जुलै 2002 रोजी स्वायत्त संस्था म्हणून मान्यता दिली |
संस्था मादक पदार्थांच्या गैरवापरावर लक्ष केंद्रित करते ज्येष्ठ नागरिकांचे आणि तृतीयपंथियांचे कल्याण भीक थांवबणे आणि इतर सामाजिक संरक्षण मुद्यांवर कार्य करते |
संस्था भारत सरकारला सामाजिक संरक्षण कार्यक्रमांची माहिती पुरवते आणि या क्षेत्रात प्रशिक्षण आणि संशोधनाचे कार्य करते मादक पदार्थ मागणी कपात विषयक राष्ट्रीय कृती आराखडा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय कृती आराखडा तयार करण्याचे काम करते |
मादक पदार्थांचा देशात वाढता वापर चिंतेची बाब आहे आणि यामुळे केवळ नशाखोरी करणाऱ्यावरच नाही तर कुटुंब आणि समाजावर विपरीत परिणाम होतो |
यासंदर्भात केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय नोडल मंत्रालय असून ते प्रतिबंध समस्येच्या प्रमाणाचे मूल्यांकन वापरकर्त्यांवर उपचार आणि पुनर्वसन माहितीचा प्रसार आणि जनतेत जागृती करण्यावर देखरेख ठेवते |
सर्वेक्षणाचे निष्कर्ष 2019 मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे |
सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने नशामुक्त भारत अभियान राबवून मादक पदार्थ्यांच्या वापराने सर्वात प्रभावित झालेल्या 272 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे |
राज्य सरकारे आणि 272 जिल्हाधिकारी 7 महिन्यांच्या नशामुक्त भारत मोहिमेची 15 ऑगस्ट 2020 रोजी सुरुवात करणार आहेत ही मोहीम 31 मार्च 2021 पर्यंत राबवली जाणार आहे |
जिल्हा आणि राज्य स्तरीय नशामुक्त भारत समित्यांची स्थापना करण्यात आली आहे या समित्या मोहिमेसाठी कृती आराखडा तयार करतील |
नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो आणि मंत्रालयाच्या व्यापक सर्वेक्षणातून समोर आलेल्या निष्कर्षाच्या आधारावर 272 जिल्हे निवडले आहेत |
अभियानात पुढील बाबींचा समावेश आहे जनजागृती कार्यक्रम उच्च शैक्षणिक संस्थांवर विद्यापीठ परिसर आणि शाळांवर लक्ष सामुदायिक जागरुकता आणि अवलंबित्व लोकसंख्येची ओळख रुग्णालयात उपचारावर लक्ष आणि सेवा प्रदात्यांसाठी क्षमता निर्माण कार्यक्रम |
संरक्षण मंत्रालय व्हाईस ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी एव्हीएसएम एनएम यांनी डायरेक्टर जनरल नेवल ऑपरेशन्स (डीजीएनओ) म्हणून पदभार स्वीकारला नवी दिल्ली 13 ऑगस्ट 2020 व्हाईस ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी एव्हीएसएम एनएम यांनी आज नेवल ऑपरेशन्स (डीजीएनओ) चे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला |
ते राष्ट्रीय संरक्षण अकादमी खडकवासलाचे माजी विद्यार्थी आहेत आणि 01 जुलै 85 रोजी नौदलात रुजू झाले |
फ्लॅग अधिकारी असलेले त्रिपाठी कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक वॉर फेअरमधील तज्ञ आहेत आणि त्यांनी नौदलचे सिग्नल कम्युनिकेशन ऑफिसर आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर ऑफिसर म्हणून काम केले आहे आणि नंतर आयएनएस मुंबई या मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिकेवर कार्यकारी अधिकारी आणि प्रधान युद्ध अधिकारी म्हणून काम केले आहे |
ते वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे पदवीधर असून तिथे त्यांना थिमैय्या पदक देण्यात आले व्हाईस ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी 200708 मध्ये अमेरिकेच्या नेव्हल वॉर कॉलेज न्यूपोर्ट र्होड आयलँड येथे नेव्हल हायर कमांड कोर्स आणि नेव्हल कमांड कॉलेजमध्ये शिक्षण घेतले त्यांनी प्रतिष्ठित रॉबर्ट ई बेटमबेटमन आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे |
फ्लॅग ऑफिसरनी 15 जाने 2018 ते 30 मार्च 2019 दरम्यान ईस्टर्न फ्लीटचे नेतृत्व केले |
जून2019 मध्ये वाइस अॅडमिरल पदावर पदोन्नती मिळाल्यावर त्यांची नेमणूक केरळ येथील प्रतिष्ठित भारतीय नौदल अकादमीचे कमांडंट म्हणून झाली |
सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडरकडून नोव्हेंबर 2019 मध्ये अकादमीला प्रेसिडेन्ट कलरने सन्मानित केले होते |
फ्लॅग ऑफिसरना कर्तव्यनिष्ठेसाठी अति विशिष्ठ सेवा पदक आणि नौसेना पदक देऊन गौरवण्यात आले आहे |
आंतरराष्ट्रीय संबंध लष्करी इतिहास आणि कला आणि नेतृत्व यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे |
जलशक्ती मंत्रालय देशातील 123 जलाशयांमध्ये 13082020 रोजी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 88 आणि गेल्या दहा वर्षांच्या सरासरी साठयाच्या तुलनेत 98 जलसाठा आहे नवी दिल्ली 13 ऑगस्ट 2020 देशातील 123 जलाशयांमधील पाणीसाठ्यावर साप्ताहिक स्वरूपात देखरेख करत आहे या जलाशयांपैकी 43 जलाशयांमधून 60 मेगावॅटहून अधिक स्थापित क्षमता जलविद्युत निर्मिती होते |
या 123 जलाशयांची एकूण जलसाठा क्षमता 171090 बीसीएम आहे जी देशभरातील अंदाजित पाणीसाठयाच्या अंदाजे 6636 टक्के आहे दिनांक 13 ऑगस्ट 2020 रोजी जारी करण्यात आलेल्या जलाशय साठा बुलेटिन अनुसारया जलाशयांमध्ये सध्या 92916 बीसीएम पाणीसाठा आहे जो एकूण क्षमतेच्या 54 आहे |
अशा प्रकारे 13 ऑगस्ट 2020 रोजी जारी बुलेटिन अनुसार 123 जलाशयांमध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 88 आणि गेल्या दहा वर्षांच्या सरासरी साठयाच्या तुलनेत 98 जलसाठा आहे |
पश्चिम क्षेत्रांमध्ये गुजरात आणि महाराष्ट्रचा समावेश आहे |
त्यांची पाणीसाठा क्षमता 3524 बीसीएम आहे |
जलाशय साठा बुलेटिन दिनांक 13082020 अनुसार या जलाशयांमध्ये सध्या 1902 बीसीएम पाणीसाठा आहे जो एकूण क्षमतेच्या 54 टक्के आहे गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा 70 टक्के होता |
संरक्षण मंत्रालय कोविड19 च्या पार्श्वभूमीवर उद्या लाल किल्ल्यावर साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी संरक्षण मंत्रालयाने केली विशेष व्यवस्था नवी दिल्ली 14 ऑगस्ट 2020 कोविड19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी संबधित सावधगिरी बाळगताना राष्ट्रीय सोहळ्याची प्रतिष्ठा आणि मांगल्य यामध्ये संतुलन राखत संरक्षण मंत्रालय 15 ऑगस्ट 2020 रोजी लाल किल्ला येथे स्वतंत्र्यदिन ध्वजारोहण सोहळा आयोजित करीत आहे |
कमीतकमी गर्दी होऊन विनाअडथळा सुलभ हालचाल व्हावी यासाठी आसन व्यवस्था आणि पादचारी मार्ग येथे लाकडी फरसबंदी आणि गालीचा घालण्यात आला आहे |
रांगेत उभे राहणे टाळण्यासाठी आणि सर्व आमंत्रितांना सुरळीतपणे प्रवेश करता यावा हे सुनिश्चित करण्यासाठी अतिरिक्त दरवाजाच्या अतिरिक्त मेटल डिटेक्टरची व्यवस्था केली आहे |
जास्तीत जास्त व्यवहार्य मर्यादेपर्यंत वाहनांच्या सुलभ प्रवेशासाठी आणि निर्गमनासाठी बहुतेक वाहनतळ क्षेत्रामध्ये विटांच्या रांगा आणि फरसबंदी करण्यात आली आहे |
सुरक्षिततेच्या दृष्टीने गार्ड ऑफ ऑनर च्या सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे |
मार्गदर्शक तत्त्वांनुसार कार्यक्रमाच्यावेळी दोन अतिथींच्या आसन व्यवस्थेमध्ये 6 फुटाचे अंतर (दो गज की दूर) ठेवण्यात आले आहे |
आमंत्रितांनाच कार्यक्रमात सहभागी होता येईल आणि ज्या सदस्यांना औपचारिक आमंत्रण नाही त्यांनी सोहळ्याला उपस्थित राहू नये अशी विनंती करण्यात आली आहे |
अधिकारी राजनैतिक अधिकारी लोक सदस्य आणि प्रसारमाध्यमे इत्यादींना 4000 हून अधिक आमंत्रणे देण्यात आली आहेत |
सुरक्षिततेच्या दृष्टीने एनसीसी कॅडेट्सना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे (लहान मुलांच्या ऐवजी) आणि त्यांना ज्ञानपथ येथे बसवले जाईल |
कोविडशी संबंधित सुरक्षा उपायांसाठी आमंत्रित व्यक्तींना संवेदनशील बनविण्यासाठी प्रत्येक आमंत्रण पत्रिकेबरोबरच कोविडशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करण्यासाठी विशिष्ट सल्ला देणारे पत्र देण्यात आले आहे |
कार्यक्रम संपल्यानंतर गर्दी कमी होईपर्यंत निमंत्रित व्यक्तींनी संयम आणि धीर राखावा यासाठी यासंबंधित विनंती पत्र प्रत्येक आसनावर ठेवण्यात येईल |
वेळोवेळी या संदर्भातील उदघोषणा करण्यात येणार आहे |
वाहतूक पोलिसांच्या सल्ला सूचनेत या संदर्भातील टीप देखील असेल |
नियंत्रण अधिकाऱ्यांच्या मार्फत पद्धतशीरपणे गर्दी पांगवण्यासाठी योजना आखण्यात आली आहे |
यासंदर्भात सर्व आमंत्रितांना सहकार्य करण्याची विनंती करण्यात येईल |
औपचारिक कवाईती मध्ये शारीरिक अंतराचे नियम आणि इतर सावधगिरी बाळगण्यात आली आहे |
कार्यक्रमातील आमंत्रित व्यक्तींमध्ये प्रवेशाच्या वेळी कोविड19 संबधित कोणतीही लक्षणे आढळल्यास व्यासपीठाजवळ 1 माधवदास उद्यानात 1 आणि 15 ऑगस्ट उद्यानात 2 असे एकूण 4 वैद्यकीय बूथ उभारण्यात आले आहेत |
या चार ठिकाणी रुग्णवाहिकादेखील ठेवण्यात येतील |
सर्व प्रवेश स्थानांवर आमंत्रितांचे थर्मल स्क्रीनिंग करण्याचे नियोजन केले आहे |
लाल किल्ल्याच्या आत आणि बाहेरील परिसराची नियमितपणे संपूर्ण स्वच्छता केली जात आहे |
सर्व आमंत्रितांना मास्क घालण्याची विनंती करण्यात आली आहेयाव्यतिरिक्त कार्यक्रमाच्या विविध ठिकाणी योग्य प्रमाणात मास्क वितरणासाठी ठेवण्यात आले आहेत |
तसेच पूर्वनिर्धारित ठिकाणी हॅण्ड सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे |
आमंत्रितांचे लक्ष वेधण्यासाठी प्रदर्शन बोर्ड लावण्यात आले आहेत |
सोहळ्याच्या ठिकाणाला अधिक सुशोभित करण्यासाठी ज्ञानपथ येथे एनसीसी कॅडेट्स च्या मागे फुलांची सजावट करण्यात आली आहे * * * |
गृह मंत्रालय स्वातंत्र्यदिन 2020 निमित्त 926 पोलिस कर्मचाऱ्यांना पदके प्रदान नवी दिल्ली 14 ऑगस्ट 2020 स्वातंत्र्यदिन 2020 निमित्त एकूण 926 पोलिस कर्मचाऱ्यांना पदके प्रदान करण्यात आली आहेत |
215 पोलिस कर्मचार्यांना शौर्य (पीएमजी) पोलिस पदके देऊन गौरवण्यात आले |
अतुलनीय सेवेसाठी 80 पोलिस कर्मचार्यांना राष्ट्रपतींचे पोलिस पदक आणि गुणवंत सेवेसाठी 631 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलिस पदक प्रदान करण्यात आले |
पुरस्कार विजेत्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा * * * |
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय मणिपूरमधील 13 महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी आणि रस्ता सुरक्षा प्रकल्पाचे गडकरी यांच्या हस्ते होणार उद्घाटन नवी दिल्ली 14 ऑगस्ट 2020 ईशान्येकडील मणिपूर राज्यातील 13 महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी आणि रस्ता सुरक्षा प्रकल्पाचे उदघाटन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोमवारी 17 ऑगस्ट 2020 रोजी होणार आहे |
रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री जनरल (सेवानिवृत्त) व्हीके सिंग अनेक खासदार आमदार आणि केंद्र व राज्यातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत |
या प्रकल्पांतर्गत 316 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार होणार असून त्याचा बांधकाम खर्च सुमारे 3000 कोटी रुपये आहे |
या रस्त्यांमुळे मणिपूरच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे त्याचबरोबर ईशान्येकडील राज्यात चांगली जोडणी सुविधा आणि आर्थिक विकास होईल |
संरक्षण मंत्रालय लष्करी जवानांसाठी मानद कमिशन नवी दिल्ली 14 ऑगस्ट 2020 74 व्या स्वातंत्र्य दिन 2020 च्या निमित्ताने मानद कमिशनने सन्मानित झालेल्या लष्कराच्या जवानांची यादी या ईमेलशी संलग्न आहे |
टीप स्वातंत्र्यदिन 2020 च्या निमित्ताने सर्व मानद कप्तान आणि मानद लेफ्टनंट उमेदवारांना सक्रिय यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी यादी तयार करण्याकडे विशेष लक्ष दिले गेले आहे |
तथापि ही यादी मानद कमिशनच्या दाव्याचा अधिकार म्हणून घेऊ नये |
मानद कमिशन प्रदान करण्याचे अंतिम अधिकार भारतीय मसुदा राजपत्र अधिसूचना आहे जे संबंधित नोंदी कार्यालये किंवा मुख्यालय आदेशाद्वारे प्राप्त केली जाऊ शकते |
संलग्न फाइल कर्नल अमन आनंद जनसंपर्क अधिकारी (सेना) * * * |
सुक्ष्म लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय धोरण तयार करण्यासाठी स्थानिक पातळीवरील समस्यांचा क्षेत्र आणि उद्योगनिहाय अभ्यास करणे ही काळाची गरज नितीन गडकरी नवी दिल्ली 14 ऑगस्ट 2020 नवीन धोरणे तयार करताना विचार गटांनी स्थानिक पातळीवरील समस्यांचा क्षेत्रनिहाय आणि उद्योगनिहाय अभ्यास करण्याची गरज आहे जेणेकरुन त्यांच्या शिफारशी लक्षात घेऊन नवीन धोरणे आखता येतील यावर केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग व रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जोर दिला |
ते आज एका वेबिनारला संबोधित करत होते |
एमएसएमई सदस्य संस्था आणि फिक्कीच्या क्षेत्रीय संघटनांशी संवाद साधताना ते म्हणाले की प्लास्टिक वस्त्र चामडे औषधनिर्माण इत्यादी सर्व क्षेत्रांमध्ये आणि त्यांच्याशी संबंधित उद्योगांना अनन्य समस्या आहेत |
त्यांनी फिक्की आणि इतर उद्योग संघटनांना विविध विचार गटांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण क्षेत्रातील स्थानिक पातळीवरील समस्यांचा अभ्यास करण्याची आणि त्यांच्या शिफारसी सादर करण्याची विनंती केली जेणेकरुन विविध समस्या सोडविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेता येतील |
उद्योजकांनी आत्मनिर्भर भारत अभियान उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले जेणेकरून देशाची आयात कमी होईल आणि देशातील उत्पादन आणि निर्मिती क्षमता वृद्धिंगत होऊन रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतील देशभरात विशेषतः ग्रामीण आदिवासी आणि कृषी क्षेत्रात औद्योगिक संकुल विकसित करण्याहे आम्ही प्रयत्न करीत आहोत गडकरी म्हणाले |
Subsets and Splits