text
stringlengths 1
2.66k
|
---|
अमित शाह म्हणाले फेसलेस मूल्यांकन फेसलेस अपील आणि करदात्यांची सनद या सुधारणांमुळे या मंचाद्वारे आपली करप्रणाली आणखी मजबूत होईल |
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले मोदी सरकारने देशाची प्रगती आणि विकासाचा कणा असणाऱ्या करदात्यांचे सबलीकरण आणि सन्मान करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत |
हा मंच म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्झीमम गव्हर्नन्स च्या कटीबद्धतेच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल होय |
आदिवासी विकास मंत्रालय आदिवासी विकास मंत्रालयाच्या वतीने आदिवासींचे सशक्तीकरण भारतामध्ये व्यापक परिवर्तन ऑनलाइन परफॉरमन्स डॅशबोर्ड विकसित नवी दिल्ली 13 ऑगस्ट 2020 नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद्र यांच्या हस्ते दि 10 ऑगस्ट 2020 रोजी आदिवासी विकास मंत्रालयाच्यावतीने विकसित करण्यात आलेल्या ऑनलाइन परफॉरमन्स डॅशबोर्ड आदिवासींचे सशक्तीकरण भारतामध्ये व्यापक परिवर्तनचा प्रारंभ करण्यात आला |
हा प्रारंभ नवभारत आणि इतर नीतींचा विचार करून त्याप्रमाणे रणनीती निरंतर विकास लक्ष्य याविषयी राष्ट्रीय विकास कार्यक्रमाअंतर्गत आदिवासी विकास मंत्रालयाच्य सीएसएस सीएस योजनांच्या कार्यप्रगतीचा आढावा घेण्यासाठी नीती आयोगाने आयोजित केलेल्या बैठकीमध्ये या डॅशबोर्डचा प्रारंभ करण्यात आला |
या संकल्पाचा एक भाग म्हणून सप्टेंबर2015 मध्ये एक परियोजना स्वीकारण्यात आली |
केंद्र सरकारच्या पातळीवर नीती आयोगाकडे देशामध्ये विविध 17 निरंतर विकास लक्ष्यांचे कार्यान्वयन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे |
मंत्रालयाने वेगवेगळ्या योजनांचे केलेले डिजिटायझेशन आणि त्यांचे कार्य यासंबंधी तयार केलेला डॅशबोर्ड आदिवासींचे सशक्तीकरण भारतामध्ये व्यापक परिवर्तनयासाठी अमिताभ कांत यांनी मंत्रालयाचे अभिनंदन केले |
प्रस्तुत डॅशबोर्ड एकमेकांशी संवाद प्रस्थापित करणारे प्रभावी आणि गतिशील व्यासपीठ आहे |
मंत्रालयाच्या सर्व योजना राबविण्यात येणारे कार्यक्रम यांचे अद्यतन तसेच योग्य तपशील या डॅशबोर्डवर प्रदर्शित केला जाणार आहे |
या डॅशबोर्डच्या माध्यमातून मंत्रालयाच्या वतीने देण्यात येत असलेल्या 5 शिष्यवृत्ती योजनांची माहिती मिळू शकणार आहे |
यासाठी सरकार सुमारे 2500 कोटी रूपये खर्च करते |
यामुळे आदिवासी विद्यार्थी वर्गाला दिल्या जाणाऱ्या सेवांच्या पूर्ततेसाठी सरकार अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी आहे |
त्यामुळे त्यांच्यामध्ये व्यापक सुधारणा दिसून येत आहे |
गतिशील डॅशबोर्डच्या मदतीने विविध राज्ये त्याचबरोबर इतर देशातल्या आदिवासी विद्यार्थी वर्गाची माहिती सामायिक करण्यात आली आहे |
डॅशबोर्डच्या मदतीने एकलव्य मॉडेल निवासी विद्यालय (ईएमआरएस) योजनेनुसार कार्यरत शाळा ज्यांच्या निर्मितीचे काम प्रगतीपथावर आहे आणि विविध ईएमआरएस शाळांचे विद्यार्थी यांची जिल्हावार माहिती मिळू शकणार आहे |
शिक्षण मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय यांच्यावतीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या बिगर सरकारी संघटनाला निधी उपलब्ध करून देण्यात येतो |
प्रस्तुत डॅशबोर्डमुळे या निधीचा तपशीलही जाणून घेता येणार आहे |
आदिवासी कार्य मंत्रालयाच्या एसटीसी (अनुसूचित जनजाती घटक) यांचीही माहिती देण्यात आली आहे |
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरणाच्या निर्मितीमध्ये वंचितांच्या आवाजाची दखल विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरणाच्या निर्मितीमध्ये कम्युनिटी रेडिओची महत्त्वाची भूमिका नवी दिल्ली 13 ऑगस्ट 2020 विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरणाच्या निर्मितीसाठी भारतात पहिल्यांदाच अशा आवाजांची दखल घेतली जाणार आहे ज्यांनी यापूर्वी कधीच आपले म्हणणे मांडले नव्हते आणि त्यासाठी कम्युनिटी रेडिओचा वापर केला जाणार आहे |
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाच्या सहकार्याने विज्ञान तंत्रज्ञान आणि नवनिर्मिती धोरण 2020 च्या निर्मितीची प्रक्रिया सुरु केली आहे धोरणाच्या रचनेमध्ये विकेंद्रीकरण करण्यावर भर देत या धोरणात आमूलाग्र बदल करून समावेशक प्रक्रियेचा अवलंब करण्यात येणार आहे |
परस्परांशी जोडल्या गेलेल्या चार मार्गांवर या धोरण निर्मितीची प्रक्रिया आधारित आहे सुमारे 15 हजार संबंधितांचा त्यात समावेश असून त्यामध्ये कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून मिळणाऱ्या सूचना आणि शिफारशींचाही समावेश असेल |
त्यानुसार एनसीएसटीसी अर्थात राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान दळणवळण परिषदेने लोकांकडून सूचना स्वीकारण्यासाठी कम्युनिटी रेडिओचा आगळावेगळा उपयोग करण्याची पद्धत अवलंबली आहे |
देशभरात 291 कम्युनिटी रेडिओ केंद्रांपैकी प्रादेशिक विविधता लिंग आणि लोकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता या आधारावर 25 केंद्रांची निवड करण्यात आली आहे |
सीईएमसीए अर्थात कॉमनवेल्थ एज्युकेशनल मिडिया सेंटर फॉर एशियाच्या माध्यमातून क्षमतावृद्धी आणि सहकार्यासाठी या प्रक्रियेचा अवलंब करण्यात येत आहे |
या धोरणासंदर्भातील विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने तयार केलेला श्राव्य मजकूर 13 भारतीय भाषांमधून एका आकर्षक घोषवाक्यासह या निवडक कम्युनिटी रेडिओवरून 1 ऑगस्ट 2020 पासून प्रसारित करण्यात येत आहे30 सप्टेंबर 2020 पर्यंत हे प्रसारण सुरू राहणार आहे |
या केंद्रांकडून मिळालेली माहिती या धोरणामध्ये विविध स्वरुपात संकलित करण्यात येणार आहे |
समुदायांच्या प्रतिनिधींशी समूह संवाद सुरू करण्यात आला आहे |
वैविध्यपूर्ण वैज्ञानिक क्षेत्रांच्या गरजांनुसार त्यांच्या प्राधान्यक्रमांच्या बाबींची पुनर्रचना करणे आणि देशाच्या समग्र सामाजिक आर्थिक विकासासाठी समाजाच्या बदलत्या आकांक्षांशी त्यांची सांगड घालणे हा या धोरणाचा उद्देश आहे |
तळागाळातील लोकांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेण्यासाठी आणि त्यावरील उत्तरे शोधण्यासाठी त्यांनी केलेल्या उपाययोजनांबाबतच्या दृष्टीकोनाचा विज्ञान तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीवरील धोरणाच्या निर्मितीसाठी फायदा होईल असे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव आशुतोष शर्मा यांनी सांगितले आहे |
pib headquarters पत्र सूचना कार्यालयाचे कोविड19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र दिल्लीमुंबई 13 ऑगस्ट 2020 (कोविड19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पारदर्शक करप्रणाली प्रामाणिकतेचा सन्मान मंचाचे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले |
पंतप्रधान म्हणाले पारदर्शक करप्रणाली प्रामाणिकतेचा सन्मान या मंचाचा आरंभ 21 व्या शतकाच्या करप्रणालीच्या आवश्यकता पूर्ण करण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे |
11 मार्च 2020 पासून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 304 कोटी एन95मास्कचा 128 कोटी पीपीईसंचाचा पुरवठा केला आहे |
तसेच देशभरामध्ये 1083 कोटी एचसीक्यू गोळ्यांचे वितरण केले आहे |
या व्यतिरिक्त 22533 मेक इन इंडिया व्हँटिलेटर्स विविध राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पोहोचवले असून त्यांची स्थापना करून कार्यान्वयन सुरू करण्यात येत आहेत |
याप्रसंगी रेल्वे मंडळाचे सर्व सदस्य आयआरसीटीसीचे अध्यक्ष सहव्यवस्थापकीय संचालक सीआरआयएसचे व्यवस्थापकीय संचालक सर्व महा व्यवस्थापक डीआरएम उपस्थित होते |
या प्रकल्पांमुळे प्रवाशांना दर्जेदार सुविधा प्रवासाच्या वेळेतील बचत आणि अत्याधुनिक रेल्वे गाड्यांच्या समावेशाने मागणीपुरवठा तफावतीमध्ये कपात होऊन प्रवासी रेल्वे परिचालनामध्ये एक मोठे परिवर्तन घडून येणार आहे |
राज्यात 147 लाख सक्रिय रुग्ण आहेत |
महाराष्ट्रात कोविडमुळे सर्वाधिक 18650 मृत्यू झाले असले तरी 381 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत |
कोविड 19 रुग्णालय शुल्काबाबतच्या अधिसूचनेचा महाराष्ट्र सरकारने आढावा घ्यावा असे आवाहन आयएमए अर्थात भारतीय वैद्यकीय संघटनेने केले आहे |
महात्मा फुले जन आरोग्य योजनेत ऑक्सिजन बेड व्हेंटीलेटर नसलेले अतिदक्षता विभाग आणि व्हेंटीलेटरसह अतिदक्षता विभाग यासाठी असलेले प्रतिदिन 4000 ते 9000 दरम्यानचे दर गंभीर कोविड रुग्णांच्या उपचारासाठी पुरेसे नाहीत असे आयएमएच्या महाराष्ट्र युनिटचे म्हणणे आहे |
सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तींसंदर्भात 202021 या निवडीच्या वर्षापासून महत्त्वाच्या सुधारणा नवी दिल्ली 13 ऑगस्ट 2020 अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मिळण्यासाठी 202021 या निवड वर्षासाठी कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेत सहा लाख रुपयांवरून आठ लाख रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे |
उच्च मानांकनप्राप्त आंतरराष्ट्रीय संस्थामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल |
यासाठी किमान पात्रता गुणांमध्ये 55 टक्क्यांवरून 60 टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे |
शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांच्या प्रगतीनुसार देखभाल भत्ता देण्यात येईल |
अनेक पडताळणी प्रक्रिया सुलभ करण्यात आल्या आहेत |
पोलिस पडताळणी काढून टाकली असून स्वयं घोषणा प्रक्रियेचा समावेश करण्यात आला आहे |
या बदलांमुळे निवड प्रक्रिया सुलभ झाली आहे आणि त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत सर्व जागा अतिशय कमी कालावधीत भरल्या जाण्याची शक्यता आहे |
एकूण 100 जागांपैकी पहिल्या तिमाहीत प्राप्त झालेल्या अर्जांच्या आधारे आतापर्यंत 42 जागा भरल्या गेल्या आहेत |
दुसऱ्या तिमाहीची प्रक्रिया सध्या सुरू आहे |
संरक्षण मंत्रालय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते नौदल नवोन्मेष आणि स्वदेशीकरण संस्थेचा (एनआयआयओ) शुभारंभ नवी दिल्ली 13 ऑगस्ट 2020 संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांच्या हस्ते आज नौदल नवोन्मेष आणि स्वेदशीकरण संस्थे (niio) चा ऑनलाईन वेबिनारमध्ये शुभारंभ करण्यात आला |
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मान्यवरांची याप्रसंगी उपस्थिती होती |
एनआयआयओ वापरकर्त्यांसाठी समर्पित आराखडा आणि संरक्षणक्षेत्रात स्वावलंबी होऊन आत्मनिर्भर भारताचे ध्येय साध्य करण्यासंदर्भात शिक्षण आणि उद्योगक्षेत्रासोबत नवोन्मेष आणि स्वदेशीकरणासंदर्भात संवाद साधेल |
एनआयआयओ ही त्रिस्तरीय संस्था आहे |
नेव्हल टेक्नॉलॉजी ऍक्सीलरेशन कौन्सिल (ntac) नवोन्मेष आणि स्वदेशीकरण हे दोन पैलू एकत्र आणेल आणि उच्च स्तरीय निर्देश पुरवेल |
एनटीएसीअंतर्गत असलेला कार्यगट प्रकल्पांची अंमलबजावणी करेल |
टेक्नॉलॉजी ऍक्सीलरेशन सेल (tdac) ची स्थापना जलद स्वदेशी उदयोन्मुख विघटनकारी तंत्रज्ञान जलदगतीने समावेशासाठी करण्यात आली आहे |
संरक्षण खरेदी प्रक्रिया मसुद्यात 2020 (dap 20) सेवा मुख्यालयाला नवोन्मेष आणि स्वदेशीकरण संस्थेची स्थापना उपलब्ध स्रोतांमध्ये करण्याची अनुमती आहे |
भारतीय नौदलाचे अगोदरपासूनच स्वदेशीकरण संचालनालय (doi) कार्यरत आहे आणि सध्याच्या स्वदेशीकरणाच्या प्रयत्नांवरच नवीन आराखडा आधारीत असेल तसेच नवोन्मेषावर लक्ष केंद्रीत केले जाईल |
उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान भारतीय नौदलाने पुढील परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या उत्तर प्रदेश एक्सप्रेसवे इंडस्ट्रीअल डेव्हलपमेंट अथॉरिटी (upeida) रक्षा शक्ती विद्यापीठ (rsu) गुजरात मेकर व्हिलेज कोची आणि सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स (sidm) |
वेबिनारमध्ये देशी उद्योग आणि शैक्षणिक संस्थांची आरएसयूसोबत भागीदारी यासंबंधी ऑनलाईन चर्चा मंचाची स्थापना केली आणि वेबिनारमध्ये शुभारंभ करण्यात आला |
याप्रसंगी भारतीय नौदलाच्या स्वदेशीकरण योजनांसंदर्भात स्वावलंबन या संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले |
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारताने एका दिवसात 83 लाखांहून अधिक इतक्या विक्रमी संख्येने चाचण्या केल्या 268 कोटींहून अधिक नमुने आज तपासण्यात आलेप्रति दहा लाख लोकांमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढून 19453 इतके झाले नवी दिल्ली 13 ऑगस्ट 2020 एकाच दिवसात 8 लाखाहून अधिक चाचण्याचा महत्वाचा टप्पा पार करत भारताने गेल्या 24 तासांत 830391 इतक्या विक्रमी संख्येने चाचण्या केल्या टेस्ट ट्रॅक ट्रीट रणनीतीचा अवलंब करत दररोज 10 लाख चाचण्या करण्याची क्षमता प्राप्त करण्यासाठी भारत सज्ज झाला आहे |
प्रति दहा लाख लोकांमध्ये चाचणीचे प्रमाण वाढून 19453 इतके झाले आहे |
विविध प्रकारच्या प्रयोगशाळा पुढीलप्रमाणे रिअल टाईम आरटी पीसीआर चाचणी प्रयोगशाळा 733 (शासकीय434 + खासगी 299) ट्रूनॅट आधारीत प्रयोगशाळा 583 (शासकीय 480 + खासगी 103) सीबीएनएएटी आधारीत प्रयोगशाळा 117 (शासकीय 33 + खासगी 84 ) |
रसायन आणि खते मंत्रालय राष्ट्रीय औषधोत्पादन मूल्य प्राधिकरणाच्या तत्वाधना अंतर्गत मूल्य निरीक्षण आणि स्रोत युनिट स्थापन नवी दिल्ली 13 ऑगस्ट 2020 कर्नाटकमध्ये केंद्र सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालय औषधोत्पादन विभाग राष्ट्रीय औषधोत्पादन मूल्य प्राधिकरणाच्या (एनपीपीए) तत्वाधना अंतर्गत मूल्य निरीक्षण आणि स्रोत युनिट (पीएमआरयु) ची स्थापन करण्यात आली आहे |
कोविड प्रोटोकॉल अंतर्गत एचसीक्यू पॅरासिटामोल लस इंसुलिन आणि औषधे यासह जीवनावश्यक औषधांची अखंड उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी कोविड19 साथीच्या आजाराच्या काळात एनपीपीए राज्य सरकारांसोबत सहकार्य करीत आहे |
देशभरात औषधांची कमतरता भासू नये यासाठी एनपीपीएने राज्य सरकारांसह एकत्र काम करत प्रयत्न केले आहेत |
पीएमआरयुने प्रादेशिक स्तरावर औषध सुरक्षा बळकट करणे अपेक्षित आहे |
नौकेत अत्याधुनिक अशी नेव्हिगेशन आणि संचार साधने सेन्सर आणि मशिनरी उपलब्ध आहे 105 मीटर जहाजाचे वजन 2350 टन असून जहाजाला 9100 किलोवॅटची दोन इंजिन आहेत ज्या माध्यमातून 6000 नॉटीकल मैलांपर्यत 26 नॉटस गती मिळेल |
नटराजन म्हणाले भारतीय तटरक्षक दलाची समुद्रातील उपस्थिती आश्वस्त करणारी असते |
दुष्प्रवृतींसाठी रोधक तर सागरी समुदायासाठी आश्वस्त करणारी असते भारतीय तटरक्षक दल समुद्रात जीवनावर बेतलेल्यांच्या मदतीला तातडीने प्रतिसाद देते |
भारतीय तटरक्षक दल वर्षभर कार्यरत राहणारे स्वदेशी तंत्रज्ञान सामील करुन घेण्यात आघाडीवर आहे |
आज जलावतरण करण्यात आलेल्या जहाजात 70 स्वदेशी तंत्रज्ञान आहे यामुळे जहाजबांधणी उद्योगाला चालना मिळाली असून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे |
वयम रक्षम हे ब्रीद सार्थ ठरवत भारतीय तटरक्षक दलाने समुद्रात 9730 जणांचे प्राण वाचवले आहेत विविध मोहिमांमध्ये सहाय्य करुन 12500 जणांचे प्राण वाचवले आहेत तर 400 वैद्यकीय तातडीच्या गरजा भागवल्या आहेत |
भारतीय तटरक्षक दलाकडून समुद्रात दररोज प्रतिसेकंद एक जीव वाचवला जातो |
भारतीय तटरक्षक दलाने आतापर्यंत 6800 कोटी रुपये किंमतीचा तस्करीमाल हस्तगत केला आहे |
कृषी मंत्रालय सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये भारत प्रथम क्रमांकावर सेंद्रिय शेती क्षेत्राचा विचार करता भारताचा नववा क्रमांक जवस तीळ सोयाबीन चहा वनौषधी तांदूळ आणि डाळी या सेंद्रिय उत्पादनांची प्रामुख्याने निर्यात किरकोळ आणि मोठ्या खरेदीदारांबरोबर थेट संपर्क साधण्यासाठी सेंद्रिय ईवाणिज्य मंच बळकटीचे प्रयत्नकृषी क्षेत्र आत्मनिर्भर बनविण्यासाठी तसेच आरोग्यपूर्ण पौष्टिक अन्नासाठी सेंद्रिय शेती नवी दिल्ली 13 ऑगस्ट 2020 सध्या संपूर्ण देशभर कोविड19 चा वाढता प्रसार लक्षात घेवून बहुतांश लोक सेंद्रिय उत्पादनाची मागणी करताना दिसत आहे |
सेंद्रिय उत्पादनाला केवळ भारतामध्येच नाही तर जागतिक स्तरावर सातत्याने मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे निरोगी शरीरासाठी सुरक्षित अन्नधान्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे |
सिक्कीम या संपूर्ण राज्यामध्ये केवळ सेंद्रिय शेती केली जाते पूर्णतः सेंद्रिय शेती करणारे हे जगातले पहिले राज्य आहे |
आता त्यापाठोपाठ त्रिपुरा आणि उत्तराखंड या राज्यांनी आपल्या क्षेत्रात संपूर्णपणे सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे |
या भागात रासायनिक खतांचा वापर इतर देशांच्या तुलनेमध्ये अतिशय कमी करतात |
त्याचबरोबर आदिवासी आणि इतर लहान लहान बेटांवरही सेंद्रिय शेती करण्यात येत आहे |
यासाठी दोन योजना तयार करण्यात आल्या आहेत यामध्ये मिशन ऑर्गेनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट फॉर नॉर्थ ईस्ट रिजन (movcd) आणि परंपरागत कृषी विकास योजना (पीकेव्हीवाय) या योजना सन 2015 मध्ये सुरू करण्यात आल्या |
त्याच्याच जोडीला कृषी निर्यात धोरण 2018तयार करण्यात आल्यामुळे सेंद्रिय कृषी उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत खूप चांगली मागणी निर्माण होऊ लागली जागतिक सेंद्रिय बाजारपेठेत भारत एक महत्वाचा भागीदार म्हणून उदयास येऊ शकेल असा विश्वास आता निर्माण झाला आहे |
या निर्यातीमध्ये जवळपास 50 टक्के वाढ झाली आहे यामध्ये प्रामुख्याने अंबाडीचे बी म्हणजे जवस तीळ सोयाबीन चहा वनौषधी तांदूळ आणि डाळी यांचा समावेश आहे |
परंपरागत कृषी विकास योजनेमध्ये सुमारे 40000 क्लस्टर्स विकसित करण्यात आले असून त्यामध्ये 7 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड करण्यात आली आहे |
एमओव्हीसीडीअंतर्गत 160 कृषी उत्पादन संघटनांच्या माध्यमातून 80 हजार हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड करण्यात आली आहे |
हे सर्व शाश्वत क्लस्टर्स ठरावेत यासाठी बाजारपेठेतल्या मागणीचा विचार करून उत्पादनाच्या कराराची पद्धती स्वीकारण्यात आली आहे त्यामुळे आलेल्या उत्पादनाला तयार बाजारपेठ उपलब्ध होत आहे |
तसेच गरजेनुसार उद्योजकांना योग्य गुणवत्तेचे उत्पादन मिळण्यास मदत होत आहे |
यामध्ये आले हळद काळे तांदूळ मसाले पोषक तृणधान्य अननस औषधी वनस्पती गव्हाचे तृण बांबूचे कोवळे कोंब इत्यादींचा पुरवठा उद्योगांना करण्यात येत आहे |
मेघालयातून मदर डेअरी रेवांता अन्न आणि मणिपुरातून बिग बास्केट या कंपन्यांना सेंद्रिय उत्पादने पुरवली जातात |
तसेच पंजाबमध्ये विशेष प्रकारे तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक व्हॅनच्या माध्यमातून लोकांना घरपोच सेंद्रिय उत्पादने मिळत आहेत |
शेती करताना रसायनांचा वापर अजिबात न करता शेती करण्याची पद्धत आपल्याकडे अतिशय प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे यासाठी शेतीचे सेंद्रिय अवशेष गाईचे शेण पालापाचोळा कुजवून तयार करण्यात आलेले खत यांचा वापर शेतीमध्ये केला जातो |
याचा परिणाम म्हणजे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार उत्पादन केले जावू शकते अलिकडच्या काळात सेंद्रिय शेतीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे |
संरक्षण मंत्रालय हवाईदल प्रमुखांची पश्चिमी हवाईतळाला भेट नवी दिल्ली 13 ऑगस्ट 2020 भारतीय हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया पीव्हीएसएम एव्हीएसएम व्हीएम एडीसी यांनी पश्चिमी हवाई तळाला 13 ऑगस्ट 20 रोजी भेट दिली |
हवाई दल प्रमुखांचे आगमन झाल्यानंतर एअर ऑफीसर कमांडिंग यांनी त्यांचे स्वागत केले आणि हवाईतळाच्या तयारीविषयी आणि परिचालन स्थितीची माहिती दिली |
दिवसभराच्या भेटीत हवाईदलप्रमुखांनी परिचालन स्थितीच्या तयारीचा आढावा घेतला आणि आघाडीवर कर्तव्य बजावणाऱ्या हवाई योद्ध्यांशी संवाद साधला |
हवाई योद्ध्यांनी तयारीचे उच्च निकष पाळावे असे त्यांनी यावेळी सांगितले |
सध्याच्या कोविड19 संक्रमण परिस्थितीतही भारतीय हवाई दलाने लढाऊ क्षमतेचे प्रयत्न सुरु ठेवल्याबद्दल त्यांनी कौतुक केले |
Subsets and Splits