text
stringlengths 1
2.66k
|
---|
15 लाख आरोग्य आणि वेलनेस सेंटरपैकी एक तृतीयांश कार्यरत झाल्याचे ते म्हणाले |
प्रधान मंत्री जन आरोग्य योजने मुळे आरोग्य क्षेत्रातल्या सेवा अधिक प्रभावी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला |
राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाची घोषणा करतानाच प्रत्येक नागरिकाला विशिष्ट आरोग्य ओळख क्रमांक देण्यात येईल यामध्ये एकल आयडी च्या माध्यमातून डाटाबेस मध्ये आजार निदान तपसणी अहवालऔषधोपचार याबाबत तपशीलवार माहिती उपलब्ध होईल असेही त्यांनी स्पष्ट केले **** *** |
दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आगामी 1000 दिवसांमध्ये प्रत्येक गावापर्यंत ऑप्टीकल फायबर जोडणी पुरवणार पंतप्रधान नरेंद्र मोदी 1000 दिवसांमध्ये लक्षद्वीप समुद्राखालील ऑप्टीकल फायबर केबलने जोडणार आगामी 1000 दिवसांमध्ये देशातील प्रत्येक गावापर्यंत ऑप्टीकल फायबर जोडणी पोहचेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणात म्हणाले |
मोदी म्हणाले 2014 पूर्वी देशातील केवळ 5 डझन ग्रामपंचायती ऑप्टीकल फायबर केबलने जोडल्या होत्या |
गेल्या पाच वर्षात सुमारे 15 लाख ग्रामपंचायती ऑप्टीकल फायबर केबलने जोडल्या आहेत |
ते पुढे म्हणाले की देशाच्या संतुलित विकासासाठी डिजीटल इंडियामध्ये ग्रामीण भारत आणि खेड्यांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे |
यासाठी आम्ही ऑप्टीकल फायबर नेटवर्कचा वेगाने विस्तार करत आहोत |
आगामी 1000 दिवसांत सर्व 6 लाख गावांमध्ये हे पोहचेल |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या महत्त्वाच्या घोषणेप्रती कृतज्ञता व्यक्त करताना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण खात्याचे मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी ट्वीट केले की आज आपण 1000 दिवसांत ऑप्टीकल फायबर इंटरनेटच्या माध्यमातून भारतातील सर्व गावं जोडण्याची जबाबदारी दूरसंचार विभागाकडे सोपविली आहे |
हे डिजीटल इंडियासाठी गेमचेंजर ठरणार आहे |
तुमच्यापासून प्रेरणा घेत हे आम्ही पूर्ण करु 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी आगामी 1000 दिवसांत लक्षद्वीप सबमरीन ऑप्टीकल फायबर केबलने जोडले जाईल असे जाहीर केले |
आपल्याकडे 1300 द्वीप आहेत |
त्यांचे भौगोलिक स्थान आणि देशाच्या विकासातील महत्त्व लक्षात घेता काही द्वीपांवर नवीन प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले आहे |
जलद विकासासाठी आम्ही काही द्वीप निश्चित केले आहेत |
अंदमान आणि निकोबारमध्ये वेगवान इंटरनेटसाठी समुद्राखालून जोडणी केली आहे |
पुढे आम्ही लक्षद्वीपला जोडणार आहोत असे पंतप्रधान ऐतिहासिक लाल किल्ल्यावरुन भाषण करताना म्हणाले |
या आठवड्यातच पंतप्रधानांच्या हस्ते चेन्नई आणि अंदमान आणि निकोबार बेटांना जोडणाऱ्या आतापर्यंतच्या पहिल्याच समुद्राखालील ऑप्टीक फायबर जोडणीचे उद्घाटन करण्यात आले यामुळे आता या केंद्रशासित प्रदेशाला दिल्ली आणि चेन्नईप्रमाणेच वेगवान इंटरनेट मिळेल |
लक्षद्वीपला हाय स्पीड इंटरनेट पुरवण्याच्या घोषणेविषयी बोलताना रवी शंकर प्रसाद म्हणाले पंतप्रधानांनी या द्वीपांना सबमरीन ऑप्टीकल केबल जोडणी पुरवण्यासाठी 1000 दिवसांचे लक्ष्य दिले आहे |
अंदमान आणि निकोबारला दूरसंचार विभागाने पुरवलेल्या जोडणीप्रमाणेच हे कार्यसुद्धा लवकर पूर्ण करण्यात येईल |
युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय केंद्रीय युवा कार्य व क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रत्येक नागरिकामध्ये आरोग्यविषयक जागरुकता निर्माण करण्यासाठी फिट इंडिया यूथ क्लबचा देशव्यापी उपक्रम सुरू केला केंद्रीय युवा व क्रीडा मंत्री किरेन रीजिजू यांनी देशाच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने फिट इंडिया युवा क्लब हा आणखी एक देशव्यापी उपक्रम सुरू केला |
फिट इंडिया यूथ क्लब हा पंतप्रधानांच्या फिट इंडिया चळवळीचा एक भाग आहे जो संपूर्ण देशभरात आरोग्यविषयक व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी देशातील युवा शक्ती अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करत आहे |
फिट इंडिया यूथ क्लब वेगळ्याप्रकारे आरोग्य आणि स्वयंसेवा एकत्र आणतात ज्यात नेहरू युवा केंद्र संघटनेचे 75 लाख स्वयंसेवक आणि स्काउट्स आणि गाईड व एनसीसीसह राष्ट्रीय सेवा योजना आणि इतर युवा संघटना एकत्रितपणे जिल्हा संघटनेच्या वतीने देशातील प्रत्येक विभागात फिट इंडिया युवा क्लब म्हणून नोंदणी करण्यासाठी एकत्र येतील आणि क्लबमधील प्रत्येक सदस्य समाजातील लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील 30 ते 60 मिनिटांपर्यंत व्यायाम करण्यास प्रवृत्त करेल |
याव्यतिरिक्त क्लब प्रत्येक तिमाहीत समुदाय फिटनेस कार्यक्रम आयोजित करण्यासाठी शाळा आणि स्थानिक संस्थांना प्रोत्साहित करतील |
या उपक्रमाबद्दल बोलताना रिजीजू म्हणाले जेव्हा इतर नागरिकांना आवश्यकता असेल तेव्हा एक निरोगी नागरिकच आपल्या देशात योग्य योगदान देऊ शकेल आणि गरजेच्या वेळी मदत करेल |
भारताची लोकसंख्या 130 कोटी आहे आणि आमच्याकडे आताच 75 लाख युवा स्वयंसेवक आहेत आणि लवकरच हा आकडा 1 कोटी वर जाईल |
मला खात्री आहे की हे 1 कोटी स्वयंसेवक कमीतकमी 30 कोटी भारतीयांना भारताच्या प्रत्येक कोपयात नियमित व्यायाम करण्यासाठी प्रेरित करतील |
काळानुसार स्वयंसेवक आणि फिट इंडिया चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रेरणा घेणारे दोघांची संख्या वाढेल आणि लवकरच आम्ही प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचू शकू फिट इंडिया यूथ क्लबने सुरू केलेला फिट इंडिया फ्रीडम रन हा पहिला उपक्रम लोकप्रिय करायचा आहे 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर दरम्यान हा उपक्रम सुरु राहील ही एक वेगळी संकल्पना आहे जिथे सहभागी त्यांच्या गतीने त्यांच्या जागी धावू शकतात आणि त्यांचा स्वतःचा धावण्याचा मार्ग निश्चित करू शकतात |
यापूर्वीच खेळाडू कोर्पोरेट क्षेत्रातील मान्यवर गणवेशधारी शाळकरी मुले यांनी हा उपक्रम सोशल मिडीयावर नेला आहे आणि run4india आणि newindiafitindia सह त्यांनी त्यांचे स्वातंत्र्य दिनाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकून हा उपक्रम संपूर्ण देशभर नेला आहे |
29 ऑगस्ट ला फिट इंडिया चळवळीला एक वर्ष पूर्ण होईल |
गेल्या वर्षी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांप्रमाणे फिट इंडिया फ्रीडम रननेही देशातील प्रत्येक घटकाला आकर्षित केले आहे |
सीआयएसएफ आयटीबीपी बीएसएफ सीबीएसई शाळा सीआयसीएसई शाळा आमचे स्वतःचे एनएसएस एनवायकेएस स्वयंसेवक स्काउट्स आणि गाईड इतर युवा संघटना यामध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत |
कोणता विभाग जिल्हा आणि शहराने सर्वोत्तम कामगिरी केली आहे याचे आम्ही परीक्षण करणार आहोत |
लक्ष्य निर्धारित करणे आणि एक देश म्हणून आपल्या कामगिरीचे मुल्यांकन करणे महत्वाचे आहे ***** *** |
pib headquarters पत्र सूचना कार्यालयाचे कोविड19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र दिल्लीमुंबई 15 ऑगस्ट 2020 (कोविड19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट) देशाच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलेले संबोधन |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य क्षेत्रातली केंद्र सरकारची कामगिरी ठळकपणे मांडत सध्या सुरु असलेली कोविड 19 महामारी आणि त्या संदर्भात भारताच्या श्रेणीबद्ध आणि तत्पर दृष्टीकोनामुळे देश आत्मनिर्भर झाला या बाबींना 74 व्या स्वातंत्र्य दिनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात स्थान दिले या आजारात बळी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांच्या दुखाःत आपण सहभागी असल्याचे सांगून भारताच्या कोरोना योद्ध्यांनी सेवा परमो धर्म याचे उदाहरणच दर्शवले आहे असे सांगून या योध्यांची त्यांनी प्रशंसा केली |
कोरोना विरोधातला लढा आपण नक्कीच जिंकू याचा पुनरुच्चार त्यांनी केला |
प्रबळ इच्छा आणि संकल्प आपल्याला विजयाकडे नेतो असे त्यांनी सांगितले |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज नेपाळचे पंतप्रधान के |
महाराष्ट्र अपडेट्स राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील कोरोना चाचणीत पॉझिटीव्ह आढळले असून त्यांच्यावर कराड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत |
महाविकास आघाडीतील गेल्या तीन महिन्यात कोरोना पॉझिटीव्ह आढळलेले ते सातवे मंत्री आहेत |
महाराष्ट्रात 573 लाख कोविड रुग्ण आहेत आणि त्यापैकी 151 लाख सक्रीय रुग्ण आहेत |
पंतप्रधान कार्यालय 74 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात लाल किल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राष्ट्राला उद्देशून भाषण भाषणातील काही महत्वाचे मुद्दे माझ्या प्रिय देशबांधवांनो स्वातंत्र्यदिनाच्या या मंगल प्रसंगी मी सर्व देशवासियांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो |
आज आपण कोरोनाच्या एका विशिष्ट परिस्थितीतून जात आहोत |
या कोरोना कालावधीत लक्षावधी कोविड योद्धे सेवा परमो धर्मा हा मंत्र अक्षरशः जगत आहेत |
या संकटकाळात सरकार सर्व पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे अशी ग्वाहीही त्यांनी दिली |
भारताचा स्वातंत्र्यलढा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी होता |
विस्तारवादि धोरणामुळे काही देशांना गुलाम करण्यात आले मात्र दोन्ही महायुद्धाच्या सावटात असतांनाही भारताने आपला स्वातंत्र्यलढा तितक्याच कणखरपणे सुरु ठेवला |
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १३० कोटी भारतीयांनी आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याचा संकल्प केला आहे |
आत्मनिर्भर भारत आज सगळ्या भारतीयांच्या मनबुद्धीत रुजला आहे |
आत्मनिर्भर भारत आज १३० कोटी देशवासियांसाठी मंत्र बनला आहे |
एकदा आपण काही करायचे ठरवले तर आपण ते धेय्य पूर्ण करेपर्यंत स्वस्थ बसत नाही |
आज संपूर्ण जग परस्परांशी जोडलेले आहे परस्परावलंबी झाले आहे |
आता मेक इन इंडियाच्या बरोबरीने मेक फॉर वर्ल्ड हा मंत्र घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे |
नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन प्रकल्पासाठी एकशे दहा लाख कोटींपेक्षा जास्त खर्च केला जाणार आहे त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात सुमारे सात हजार प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे |
यातून देशाच्या पायाभूत सुविधा क्षेत्राला एक नवी दिशा मिळेल एक नवी गती मिळेल |
आपण आता तुकड्यांमध्ये काम करु शकत नाही |
आपल्या पायाभूत सुविधा सर्वंकष असाव्यात एकीकृत असाव्यात एकमेकाशी पूरक असाव्यात रेल्वेशी रस्ता पूरक आहेरस्त्याशी बंदर पूरक नव्या शतकासाठी आपल्या बहुआयामी पायाभूत सुविधा एकमेकांशी जोडत आपण पुढे जात आहोत |
हा नवा आयाम राहील |
मोठे स्वप्न घेऊन यावर काम सुरु केले आहे मला विश्वास आहे हे तुकडे संपुष्टात आणून सर्वसमावेशक कामातून आपल्या सर्व व्यवस्थेला नवी ताकद मिळेल |
आपण किती काल केवळ कच्चा माल पुरवत राहणार आणि तयार उत्पादनांची आयात करत राहणार |
एक काळ असा होता जेव्हा देशाची कृषीव्यवस्था अत्यंत बिकट होती आपल्यासमोरसर्वात मोठे संकट होते की आपण आपल्या सर्व नागरिकांना काय खायला घालणार |
आज आपण केवळ आपल्याच नागरिकांचे पोट भरु शकतोय एवढेच नव्हे तर अनेक देशांमध्ये अन्नाची निर्यातही करतो आहोत |
आत्मनिर्भर भारत म्हणजे केवळ आयात घटवणे नव्हे तर त्यातून आपल्या आपली कौशल्ये आणि जगाशी संपर्क देखील वाढवायचा आहे भारतात होत असलेल्या या सुधारणांकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे |
म्हणूनच तर अगदी कोविडच्या काळातही भारतात होणाऱ्या थेट परदेशी गुंतवणूकीत 18 टक्क्यांची वाढ झाली |
कोणी कल्पना करू शकत होते काकी कधी गरिबांच्या जनधन खात्यात लाखो करोडो रुपये थेट हस्तांतरित होऊ शकतात शेतकऱ्याच्या कल्याणासाठी एपीएमसी सारख्या कायद्यात इतके बदल आणले जाऊ शकतात |
एक देश एक रेशन कार्ड असोएक देश एक ग्रीड असो नादारी आणि दिवाळखोरी विषयीचा कायदा असो बँकांचे विलीनीकरण करण्याचा प्रयत्न असो हे सगळे आज वास्तवात घडले आहे आम्ही महिला सक्षमीकरणासाठी काम केले आहे |
नौदल आणि हवाई दलात महिलांना लढावू क्षेत्रात घेतले जात आहे महिला आज नेतृत्व करत आहेत आम्ही तीन तलाकची प्रथा रद्द केई महिलांसाठी केवळ 1 रुपयात सैनिटरी पैड देण्याची व्यवस्था केली |
माझ्या प्रिय देशबांधवांनो आपल्या शास्त्रात म्हटले गेले आहे सामर्थ्य मुलं स्वातंत्र्यम श्रम मुलंच वैभवं म्हणजे कोणत्याही समाजाचा कोणत्याही राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा स्रोत म्हणजे त्याचे सामर्थ्य आणि त्याचे वैभव उन्नती तसेच प्रगतीचा स्रोत म्हणजे त्याची श्रमशक्ती होय सात कोटी गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर दिला गेला शिधापत्रिका असो वा नसो 80 कोटींहून जास्त देशबांधवांच्या घरातील चूल पेटती ठेवण्यासाठी त्यांना मोफत अन्नधान्य पुरविण्यात आले 90 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त बँकेत थेट लाभ हस्तांतरण करण्यात आले |
असे 110 पेक्षा जास्त आकांक्षी जिल्हे निवडले आहेत ते 110 जिल्हे जे सरासरीपेक्षा सुद्धा मागासलेले आहेत त्यांना राज्याच्या राष्ट्राच्या सरासरी स्तरावर आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत जेणेकरून सर्वाना चांगले शिक्षण चांगली आरोग्य सुविधा |
आत्मनिर्भर भारताची महत्वपूर्ण प्राथमिकता म्हणजे आत्मनिर्भर कृषी आणि आत्मनिर्भर शेतकरी |
गेल्या वर्षी याच लाल किल्यावरुन मी जलजीवन अभियानाची घोषणा केली होती आज या अभियानाअंतर्गत दररोज एक लाखांपेक्षा जास्त घरांमध्ये नळजोडणी पूर्ण केली जात आहे |
मध्यमवर्गातून तयार झालेले व्यावसायिक आज जगात आपले नाव गाजवीत आहेत जगात आपली ओळख निर्माण करीत आहेत |
म्हणूनच मध्यमवर्गाला सरकारी हस्तक्षेपापासून मुक्ती हवी आहे त्यांना नवीन संधी हव्या आहेत खुले मैदान हवे आहे |
देशात पहिल्यांदाच कोणी घरासाठी कर्ज घेतले असले तर त्या कर्जाची प्रतिपूर्ती करताना सुमारे सहा लाख रुपयांची सूट त्याला मिळण्याची व्यवस्था सरकारने केलीकेवळ एका वर्षात अनेक अपूर्ण गृहप्रकल्प पूर्ण करण्यासाठी 25 हजार कोटी रुपये उभारण्यात आले |
आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यात आधुनिक भारताच्या निर्मितीत नव्या भारताच्या निर्माणात समृद्ध आणि सुखी भारताच्या निर्मितीत देशाच्या शिक्षण पद्धतीचे मोठे महत्व आहे |
याच विचाराने देशाला तीन दशकानंतर नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत |
या कोरोनाच्या काळात आपण डिजिटल व्यवहारांची महत्वाची भूमिका देखील पहिलीभीम यूपीआय च्या माध्यमातून तीन लाख कोटी रूपयांचे व्यवहार अवघ्या एक महिन्यात झाले आहेत |
2014 च्या आधी फक्त पाच डझन पंचायती ऑप्टिकल फायबरने जोडण्यात आल्या होत्या |
गेल्या पाच वर्षामध्ये 15 लाख ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरने जोडण्याचे काम पूर्ण झाले |
देशातील सर्व सहा लाख ग्रामपंचायती येत्या 1000 दिवसात ऑप्टिकल फायबरने जोडल्या जाणार आहेत |
माझ्या प्रिय देशबांधवांनो आपला अनुभव असे सांगतो की भारतामध्ये महिला शक्तीला ज्या ज्या वेळी संधी मिळाली त्या त्या वेळी त्यांनी देशाचे नाव उज्ज्वल केले आहे देशाला बळकट केले आहे |
आज महिला केवळ भूमिगत कोळसा खाणीत काम करत नाहीत तर लढावू विमानेही उडवत नवनव्या उंची गाठत आहेत |
जी 40 कोटी जनधन खाती उघडण्यात आली त्यापैकी 22 कोटी बँक खाती ही आमच्या भगिनींची आहेत |
कोरोना काळामध्ये जवळपास 30 हजार कोटी रूपये या माताभगिनींच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत |
कोरोनाच्या प्रारंभीच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये चाचणी प्रयोगशाळा कार्यरत नव्हत्या |
आज देशभरामध्ये 1400 चाचणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत |
नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन आज सुरू होत आहे |
भारतामध्ये एक नाही दोन नाही तीन तीन तीन व्यक्ती संस्था त्याच्या चाचण्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांपर्यंत पोहोचले आहेत |
संशोधकांकडून ज्यावेळी हिरवा कंदिल दाखवला जाईल त्यावेळी कोरोनाच्या लसीचे मोठ्या व्यापक प्रमाणात निर्मितीचे काम केले जाईल |
हे वर्ष जम्मू काश्मीरच्या विकासाच्या नव्या प्रवासाचे वर्ष आहे |
हेव वर्ष जम्मू काश्मीर मधली महिला आणि दलितांच्या अधिकारांचे वर्ष आहे |
जम्मू काश्मीरमधील शरणार्थी नागरिकांना प्रतिष्ठेचे जीवन मिळवून देणारे हे वर्ष आहे |
जम्मू आणि काश्मीरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी विकासाच्या नव्या युगाला पुढे नेत आहेत याचा आपल्या सर्वाना अभिमान वाटायला हवा |
लडाखला केंद्रशासित प्रदेश बनविण्याची अनेक वर्षांपासूनची त्यांची मागणी होती त्यांची आकांक्षा होती ती आकांक्षा पूर्ण करण्याचे आपण मोठे काम केले आहे |
हिमालयाच्या कुशीत उंचावर वसलेले लडाख विकासाच्या नव्या शिखराकडे वाटचाल करत आहे |
जशी सिक्कीमने सेंद्रिय राज्य म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे तसेच लदाखही येत्या काळात कार्बन न्यूट्रल प्रदेश म्हणून म्हणून ओळख बनवू निर्माण करू शकेल |
देशातल्या १०० निवडक शहरांमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी एकात्मिक दृष्टिकोन सह सर्वांगीण दृष्टिकोनासह लोकसहभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत प्रदूषण कमी करण्यासाठी मिशन मोड पद्धतीने काम करणार आहोत |
आपल्या जैवविविधतेच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी भारत संवेदनशील आहे |
आपण प्रोजेक्ट टायगर प्रोजेक्ट एलिफंट आपण यशस्वीपणे राबवले आहे |
Subsets and Splits